वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सकाळी पंधरा मिनिटात पूजा करून टाकतात आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?
April 28, 2020
‘वेळ कसा मारुन न्यावा’ नावाचे पुस्तक वाचून आल्याप्रमाणे यॉर्की कप्तान वागत होता. ते त्याने वाचलेले नसेल तर कुणीही रसिक प्रेक्षक बसल्या बसल्या या शीर्षकाचे पुस्तक लिहून पूर्ण करू शकला असता! इंग्रजांना हे खपणार नव्हतेच. कप्तान ब्रायन क्लोज खपला.
August 18, 2010
भगवान श्री विष्णूंच्या उदराचे नितांत मनोहर वर्णन केल्यानंतर स्वाभाविक आणखीन वर गेलेली आचार्यश्रींची दृष्टी भगवंताच्या विशाल वक्षस्थलावर रुळते. त्याचे अद्वितीय वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
December 31, 2020
1972 चा काळ अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांचा होता. त्या वेळी त्यांची दृष्टी पडली माऊलींच्या समाधी वर, संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली त्यावेळी झालेली सविस्तर घटना थोर शास्त्रज्ञ आर एन शुक्ल यांनी सांगितली ती अशी...
त्यावेळी वारकरी सांप्रदायाची थोर व्यक्ती ह.भ.प मामासाहेब दांडेकर हे होते त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला आळंदीची समाधी उखडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मुलन चे लोक येत आहेत, त्यांचे असे म्हणणे आहे कीजर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या
शरीरातील हाडे तरी सापडतील. मामासाहेबां समोर खुप मोठा प्रश्न पडला होता यांना रोखायचे कसे त्यावेळी शुक्ल साहेब यांनी मामासाहेबांना सांगितले
माऊली पाहुन घेतील.
दुसरा दिवस उजाडला सकाळीच दोन अडिचशे माणसांचा ट्रक पुण्याहुन आळंदीला जाणार आहेत असे समजल्या वर त्यांच्या अगोदर मामासाहेब दांडेकर व शास्त्रज्ञ शुक्ल साहेब आळंदीला पोहचले होते.
शुक्ल साहेबांनी सोबत तीन मीटर्स घेतले होते. त्यातला एक होता गीगरम्यूलर काऊंटर त्यात एक्सरे अल्फा, गॅमा, बीटा नावाचे जे किरण किंवा उर्जा असते ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाहीत हे शोधून काढु शकतो. ते मीटरवर दाखवले जाते. त्याला गीगरम्यूलर स्किंटीलेशन काऊंटर असे नाव आहे.
तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी पासून सहा फुट अंतरावर ठेवला.
दुसरा मीटर ज्याला थर्मिस्टर बोलोमीटर म्हणतात. तो घेतला होता. त्याने अल्ट्राव्हायोलेट इन्फारेड आहेत की नाही हे पहाता येते. तो ही मीटर समाधी जवळ ठेवला.
तिसरा फ्रिक्केन्सी मीटर रडार हा मीटरही त्या ठिकाणी ठेवला.
तोपर्यंत अंधश्रद्धावाली मंडळी डाॅक्टर, दोन तीन इंग्लीश माणसे, घोषणा देतच मंदिरा पर्यंत पोहचली.
सर्व जमावाला दाराजवळच मामांनी थांबवले आणि सांगितले समाधी बद्दल आम्ही जे सांगतो तो प्रयोग करा. आणि मग तुमचे काम करा.
तो पर्यंत शुक्ल साहेबांनी समाधी झाकण्यासाठी तीन वेष्टणे आणली होती. एक जस्ताचे, एक पितळेचे आणी एक लोखंडाचे.
शुक्ल साहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले या ठिकाणी तीन मीटर्सही ठेवले आहेत.समाधी वर एकेक झाकण टाकून मीटरवर काय दिसते ते पाहावयाचे आहे. तुम्ही पहाल त्यावेळी आम्ही येथे थांबणार नाही. बाहेर थांबू.
त्यांच्यातील दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना गाभा-यात घेतले आणि त्यांना माहिती देऊन मामा व शुक्ल साहेब गाभा-याबाहेर निघुन आले. आम्ही सांगितल्या प्रमाणे त्यांनी प्रयोग करून पाहिला.
लोखंडी, पितळी, जस्ताचे आवरण काढल्यावर एकच ठराविक रिडींग मीटर दाखवायचे. आत कोणी नसल्याने काटा हलविण्याचा प्रश्न चनाही. त्या लोकांन पैकी कोणी मीटरला हात लावत नव्हते मग काटा रिडींग का दाखवीत आहे. रिडींग दाखविणारे चैतन्य स्फुरणस्पंदने कोठून येत आहेत असा गहन प्रश्न अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांना पडला. यामध्ये कसलाच जादुटोणा हातचलाखी नव्हती हे त्यांच्या लक्षात आले.
शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखविल्यावर त्यांच्या लक्षात आले संजीवन समाधी म्हणजे काय? हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चित पणे चैतन्य आहे. उर्जा आहे, स्पंदने आहेत,म्हणून च त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. चैतन्य दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व असते. क्ष किरण दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. तसेच संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहेच त्यांचे अस्तित्व मनुष्यच काय विज्ञान सुद्धानाकारू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाने सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम दुर झाल्या नंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्याला समाधी च्या दर्शनाला येवु लागली. तीन परदेशी नागरिकां पैकी एकाने स्वताला आळंदीला वाहून घेतले. पुन्हा कधीच कुणी माऊलींवर आक्षेप घेण्याचे धाडस केले नाही.
वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यु ह.भ.प. मामासाहेब दांडेकरांनी आलेल्या सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या सदस्यांना पुन्हा एकदा संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन सांगताना म्हणाले एखाद्या साधु संत संजीवन समाधी घेतो, तेव्हा योगशास्त्राप्रमाणे तोपंचमहाभूतात्मक होतो. शरीर पृथ्वी आप तेज वायु आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा तो संजीवन समाधीत उतरतो तेव्हा तो सजग असतो. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते. निर्देही होते याचा अर्थ त्याच्या शरीरातील पृथ्वी आप तेज वायु हे जे भाग असतात ते बाहेरच्या ब्रम्हांडातील पृथ्वी आप तेज वायु आकाश यात एकरूप होऊन जातात. त्यामुळे समाधी च्या जागी काहीही शिल्लक रहात नाही.
-- संजीव थोरात.
पुणे
July 9, 2017
शहरं स्मार्ट असून उपयोग नाही, तर शहरवासी स्मार्ट असावे लागतात. रस्ते व वाह्न स्मार्ट असली तरी ते वापरणारेही स्मार्ट असले पाहिजेत. तसच आहे गॅजेट्सचं. फोन स्मार्ट नसतो, तर तो वापरणारा स्मार्ट असावा लागतो. विचार प्रगल्भ करा. आपली गरज आहे वैचारिक श्रीमंतीची. तेव्हा ‘विचारी बना’ हा आपल्या सर्वांसाठी मंत्र आहे.
March 7, 2019
बँकेचे पहिली शाखा मांडवी (बडोदा) मध्ये उघडली गेली. दोनच वर्षात बँकेने दुसरी शाखा अहमदाबाद इथे काढली गेली. त्यानंतर मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली इथे बँकेने शाखा काढल्या. बँक खऱ्या अर्थानी वाढली ती दुसऱ्या महायुद्धानंतर.
July 20, 2021
मराठी भाषा आणि साहित्य यांची जपणूक, विकास व प्रसारासाठी ज्या संस्था सातत्याने कार्यरत आहेत, त्यापैकी सर्वात आद्य संस्था म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद.
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि समीक्षा यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम ही संस्था गेली अनेक वर्षे करते आहे. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात. नागरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात मिळून संस्थेच्या ७० शाखा आहेत. दहा हजारापेक्षा जास्त आजीव सभासद असणारी ही महाराष्ट्रातील एकमेव साहित्यसंस्था आहे. शतकोत्तर दशकपूर्ती करणाऱ्या या संस्थेची वाटचाल मराठी भाषा आणि साहित्य यांच्या प्रसारासाठी आणि विकासासाठी साह्यभूत ठरलेली आहे.
एकोणविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. १८७८ मध्ये पहिले ग्रंथकार संमेलन न्या. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात हिराबागेत भरले. दुसरे १८८५ मध्ये बुधवार पेठेतील सार्वजनिक सभेच्या जोशी सभागृहामध्ये भरले. तिसरे संमेलन १९०५ मध्ये सातारा येथे भरले. ही संमेलने अनेकदा काही काही कारणांमुळे खंडित होत होती. या खंडित संमेलनांना एखाद्या स्थायी संस्थेचे स्वरूप देण्याचा पहिला प्रयत्न पुण्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात झाला. पुण्यात २६ आणि २७ मे १९०६ रोजी झालेले चौथे संमेलन विद्वान कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नागनाथ पाराजवळच्या मळेकर वाड्यात भरलेले होते. लोकमान्य टिळक, न. चिं. केळ्कर, चिंतामणराव वैद्य, विसुभाऊ राजवाडे, पांगारकर, रेव्हरंड टिळक या संमेलनात सहभागी झाले होते. २७ मे रोजी समारोपाच्या दिवशी महाराष्ट्र साहित्य परिषद आज रोजी स्थापन झाली आहे, अशी घोषणा केली. लो. टिळकांनी उठून या घोषणेला पाठिंबा दिला.
साहित्य परिषदेची पुण्याच्या टिळक रस्त्यावर जी इमारत उभी आहे, ती १९३५ पर्यंत अस्तित्त्वात नव्हती. तिची उभारणी टप्या टप्याने झाली. आरंभीच्या काळात या संस्थेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रा. श्रीनिवास बनहट्टी, श्री. ना. ग. गोरे, रा. शं. वाळिंबे, प्रा. रा. श्री. जोग, ग. दि. माडगूळकर, गं. बा. सरदार, प्रा. वसंत कानेटकर, श्री. ज. जोशी, शंकरराव खरात, शंकर पाटील, ग. प्र. प्रधान, डॉ. सरोजिनी बाबर, राजेंद्र बनहट्टी, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. प्र. चिं शेजवलकर अशा मान्यवरांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. पुणे शहराचा चालता बोलता इतिहास म्हणून ज्यां आदराने उल्लेख केला जातो असे ज्येष्ठ साहित्यसेवक म. श्री. दीक्षित परिषदेशी कार्यालय अधिक्षक, कार्यवाह, कोषाध्यक्ष आणि विश्वस्त अशा अनेक नात्यांनी निगडित होते.
केवळ पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यापर्यंत कार्यरत असणाऱ्या परिषदेच्या कार्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे वाड्मयीन कार्यक्रमांचे आयोजन. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात स्मृतिदिन, व्याख्यानमाला, चर्चा, परिसंवाद, कविसंमेलन, मुलाखती, मेळावे अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (कै) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय परिषदेच्या वैभवात भर घालण्याचे काम करीत आहे. ५०,००० जुने नवे ग्रंथ, दुर्मिळ नियतकालिके, सर्व प्रकारचे कोश, संदर्भग्रंथ इथे असल्यामुळे हे ग्रंथालय अभ्यासकांच्या आकर्षणाचा विषय बनलेले आहे. अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन करण्याचे मोलाचे काम परिषद करीत आहे. सर्व वाडमय प्रकारातील पुस्तकांना पारितोषिके देऊन गौरविण्याचे काम परिषदेतर्फे केले जाते. मराठी भाषा, साहित्य यांच्या अध्ययनाच्या प्रसारासाठी विविध स्तरांवरील परीक्षांचे आयोजन परिषदेतर्फे केले जाते. या सर्व उपक्रमांबरोबर परिषदेने साहित्यिक साह्यनिधी उभा केला आहे. अपंग, वृद्ध, निराधार अशा साहित्यिकांना या निधीतून दरमहा मानधन देण्यात येते. अनेक प्रज्ञावंत साहित्यिकांनी आणि निष्ठावंत साहित्यसेवकांनी तन, मन आणि धन अर्पण करुन, आपल्या आयुष्यातला बाहुमोल वेळ देऊन ही संस्था नावारूपाला आणली. लो. टिळक, न. चिं. केळकर, कृ. प. खाडिलकर, वा. गो. आपटे, दा. ग. पाध्ये. विविधवृत्तकार मोरमकर रेव्हरंड जोशी, धनंजयराव पटवर्धन, न. र. फाटक, वा. दा. गोखले, गं. भा. निरंतर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ग. ल. ठोकळ, के. नारायण काळे, रा. श्री. जोग, श्री. के. क्षीरसागर, स. कृ. पाध्ये, अनंतराव कुलकर्णी, रा. ज. देशमुख, रा. शं. वाळिंबे, ग. दि. माडगूळकर, कवी यशवंत, न. का. घारपुरे, वि. भि. कोलते, भालबा केळकर, ना. ग. गोरे, दि. के. बेडेकर, गं. बा. सरदार, ग. वा. बेहेरे, अ. ना. भालेराव, म. वि. फाटक, म. ना. अदवंत, कृ. ब. निकुम्ब, वा. रा. ढवळे, श्री. ना. बनहट्टी, स. गं. मालशे, श्री. ज. जोशी, शंकर पाटील, भालचंद्र फडके, वि. स. वाळिंबे, व. दि. कुलकर्णी, गो. म. कुलकर्णी, शंकरराव खरात, भीमराव कुलकर्णी या मान्यवरांनी संस्थेच्या संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले. या कर्तुत्त्वसंपन्न परंपरेत मोलाची भर घालून परिषदेची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम डॉ. गं. ना. जोगळेकरांनी केले.
१९६१ मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांच्या पुढाकाराने मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळी ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. साहित्य महामंडळाची स्थापना झाली, त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ, नागपूर अशा चार घटक संस्था मिळून महामंडळ असे त्याचे स्वरूप होते. मराठी भाषेसंबंधी असलेल्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समान प्रश्नांवर विचार करणे, त्यावर चर्चा घडवून आणणे, एकाच व्यासपीठावरून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यासाठी, समाजाच्या आणि शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते. त्यातही भाषेच्या प्रश्नाला अग्रक्रम देण्यात आला होता. दत्तो वामन पोतदारांबरोबर विदर्भ साहित्य संघाचे ग. त्र्यं. माडखोलकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अनंत भालेरव, भगवंतराव देशमुख, नरहर, कुरुंदकर आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे वा. रा. ढवळे आणि पत्रकार श्री. शं. नवरे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते.
महामंडळाच्या स्थापनेच्या वेळी महामंडळाने अखिल भारतीय मराठी भाषकांची संमेलने भरविण्याचे काम हाती घ्यावे असे आपल्या घटनेत नमूद केले. त्यानुसार १९६५ च्या सुरुवातीला संमेलनाची योजना पूर्ण करून ते काम महामंडळाने आपल्या हाती घेतले. या योजनेनुसार डिसेंबर १९६५ मध्ये प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबादला जे संमेलन भरले होते, ते साहित्य महामंडळाचे पहिले संमेलन ठरले, त्यापूर्वी १९६४ पर्यंतची ४५ साहित्य संमेलने भरविण्याचे महत्त्वाचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले.
१९६४ साली कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगाव (गोवा) येथे भरलेले संमेलन हे महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेले शेवटचे संमेलन. आपली साहित्य संमेलने गणनेसाठी उदारपणे साहित्य महामंडळाला देऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेने महामंडळासाठी मोठाच त्याग केलेला आहे. त्यामुळेच संमेलनाची गणना होती तशीच कायम राहिली आणि हैदराबादचे संमेलन हे महामंडळाचे पहिले संमेलन असूनही ते सेहेचाळीसावे संमेलन ठरले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ मोठे असले तरी त्यात सहभागी होणाऱ्या लेखक, कवी, वक्त्यांच्या संख्येला मर्यादा येते. त्यामुळे इच्छा असूनही सर्वांना कार्यक्रमात सहभागी करून घेणे अवघड जाते. त्या त्या विभागातील प्रतिभावंतांना अभिव्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करावे या भावनेतून विभागीय साहित्य संमेलनाची कल्पना पुढे आली. गेल्या काही वर्षांत विभागीय साहित्य संमेलनांना मिळणारा प्रतिसाद विलक्षण आहे. प्रतिभेचे अनेक नवीन कवडसे अशा संमेलनातून साहित्यक्षेत्राला मिळाले आहेत. मसापच्या विविध शाखांनी आयोजित केलेल्या विभागीय साहित्य संमेलनांनी आदर्श नियोजनाचा आणि गुणवत्तपूर्ण कार्यक्रमांचा वस्तुपाठ निर्माण केला.
जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था आणि उदारीकरणाचे जीवनाच्या सर्व क्षेत्रावर दूरगामी परिणाम होत आहेत. जगण्याचा तीव्र झालेला संघर्ष, साहित्यातूनही तेवढयाच प्रभावीपणे प्रकट होत आहे. बदलांचा वेध घेत जुन्यातले नवे आणि नव्यातले अगदी नवे स्वीकारत रचनात्मक अशी कामे उभी करण्याचा प्रयत्न परिषदेने यापूर्वी केलेला आहे आणि या नंतरही तो तसाच पुढे चालू राहील.
http://www.masapapune.org
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / महाराष्ट्र साहित्य परिषद
May 27, 2017
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 17, 2018
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपली जडण घडण देखील या समाजात झाली आहे… आपण सर्व या समाजाचे भाग आहोत आणि या समाजात राहणाऱ्या लोकांची आपण जरा जास्तच पर्वा करतो. आम्हाला नेहमी अशी भीती असते ही लोकं काय म्हणतील पण आपण विसरलो की आपल्या त्रास आणि संघर्ष या मध्ये हे लोकं कधीच आपल्या सोबत नसतात.
June 13, 2023
शिकारीचा सीझन आला की शिकार्यांच्या अंगात संचारतं. जवळ जवळ प्रत्येक घरी बंदुक ही असायचीच. मग तिची घासून पुसून साफसफाई करणं, काडतुसांची जमवाजमव करणं, शिकारीचं लायसन्स नव्याने करून घेणं, वगैरे गोष्टींची नुसती धांदल उडते. इथे बंदुका तर काय वॉलमार्टमधे देखील मिळतात. त्यामुळे कोणत्या प्रकारची बंदुक, कोणती काडतुसं, त्यांचा पल्ला, वगैरे गोष्टींची चर्चा कानावर यायला लागते. काही ठिकाणी तर हरणांच्या शिकारीच्या सीझनच्या पहिल्या दिवशी सुट्टी असते. लोक आपल्या मित्र मंडळींबरोबर एखादी मॅच खेळायला जावं, तशा उत्साहाने आपापल्या पिक-अप ट्रकमधे बसून शिकारीला निघतात. जंगलाच्या रंगसंगतीशी मिळत्या जुळत्या (camouflage) कपड्यांबरोबरच, शेंदरी रंगाची टोपी, गळ्यातला रुमाल किंवा जॅकेट घालणे बंधनकारक असते. कारण हा रंग चटकन नजरेत भरणारा. त्यामुळे करड्या, मातकट रंगाच्या रानाच्या पार्श्वभूमीवर, त्याच रंगाचे कपडे घालून शिकार करणारे ५०-१०० शिकारी आसमंतात फिरत असले, तर इतर शिकारी चटकन नजरेत भरावेत म्हणून ही काळजी. तरी देखील काही लोकं शिकारीच्या अपघातात जखमी होणं किंवा मृत्युमुखी पडणं ही दर वर्षी घडणारी गोष्ट. हरणांच्या शिकारीचा सीझन ऐन हिवाळ्यातला. गरम कपड्यात स्वत:ला लपेटून घेऊन, हाडं गोठवणार्या थंडीमधे, सुकलेल्या वाळलेल्या गवतातून आणि निष्पर्ण झाडांच्या जंगलातून हरणांचा माग काढत फिरण्याचा या लोकांचा उत्साह बघण्यासारखा असतो. त्यातून बर्फ पडलेलं असलं तर अधिक चांगलं, कारण बर्फावर उमटलेल्या हरणांच्या पाऊल खुणांवरून त्यांचा माग काढणं सोपं जातं.
आमच्या ऑफिसमधले बरेचजणं वेगवेगळ्या प्राण्यांच्या शिकारीचे शौकीन. त्यातही डॉक्टर पॉल म्हणजे खाण्यातलादेखिल दर्दी माणूस. दर सीझनमधे हरणांची शिकार करून, मारलेल्या हरणांना घरी घेऊन यायचं, गराजच्या दारामध्ये मोठा लोखंडी हुक लावून, त्याला एकेक हरिणाचं धूड टांगून ते सोलायचं, मांसाचे तुकडे करुन ते वाळवायचे वगैरे कामं तो मोठया आवडीने करतो. हरणांच्या वाळवलेल्या व खारवलेल्या मांसाच्या छोट्या छोट्या तुकड्यांनी भरलेल्या प्लॅस्टीकच्या बॅगा तो आपल्या घरच्या फ्रीझर मध्ये ठेवून देतो. इथे मिळणार्या beef jerkey सारखी ही deer jerkey. त्यामुळे, त्याच्याबरोबर, ऑफिसच्या कामानिमीत्ताने field wokला जायचे झाले की तो ही deer jerkey घेऊन येणारच आणि गाडीतल्या सगळ्यांना खायला घालणार.
एल्क म्हणजे हरणांची एक मोठी जात. नर खांद्यापाशी दीड मिटर उंच तर लांबीला अडीच मिटर लांब व साधारणपणे ३०० किलो वजनाचे असतात. माद्या आकाराने थोड्या लहान आणि वजनाला साधारण २२५ किलो भरतात. फक्त नरांनाच शिंग असतात आणि ती चांगली ४ फूट लांब आणि वजनाला १८ किलो एवढी जड असतात. दर वर्षी स्प्रिंग सीझनमधे नरांना नवीन शिंग फुटायला लागतात. फॉल सीझन संपता संपता यांची माजावर येण्याची वेळ येते. त्यावेळेस या मोठ्या ऐटदार शिंगांचा उपयोग इतर नरांना आव्हान देण्यासाठी तसेच झुंजीसाठी होतो. ब्रीडींग सीझन संपला की नरांची शिंगे गळून पडतात आणि ते पुनश्च एकेकटे फिरू लागतात तर माद्या कळप करून रहातात. माद्यांच्या या कळपात साधारणपणे ५० पर्यंत माद्या असतात. लांडगे आणि कायोटीचे कळप किंवा एकांडा माउंटन लायन हे यांचे प्रमुख शत्रू. कधी कधी काळी अस्वलं देखील एल्कच्या पिल्लांना मारून टाकतात. माद्यांचे कळप आपल्या कळपातल्या वासरांचं संरक्षण करण्यासाठी जिवाचा आटापिटा करतात. एल्क हे सर्वसाधारणपणे जंगलात किंवा जंगलाच्या कडेवर गवत झाडपाला, झाडांच्या बुंध्यांच्या साली वगैरे खाऊन रहातात. आज एल्कची संख्या १० लाखांच्या आसपास आहे.
हरणाच्या जातीचा आणखी एक मोठा प्राणी म्हणजे मूस. हे कॅनडा, अलास्का, न्यू इंग्लंड, अपस्टेट न्यूयॉर्क, मिनेसोटा, मिशीगनच्या उत्तरेकडचा भाग, रॉकी पर्वतराजीच्या उत्तरेकडच्या राज्यांमधला भाग, अशा उत्तरेकडच्या थंड प्रदेशात आढळतात. नर जवळ जवळ ६ फूट उंच आणि ४०० ते ५०० किलो वजनाचे असतात. तर माद्या साधारणपणे ३००-३५० किलो वजनाच्या असतात. मूसची शिंगं पंजासारखी पसरट असतात. सप्टेंबर ऑक्टोबरमधे यांचा माजावर येण्याचा काळ असतो. या काळात मुस आक्रमक बनतात आणि माणसांवर देखील हल्ले चढवतात. ब्रीडींग सीझन संपल्यावर नरांची शिंग गळून पडतात आणि स्प्रिंग सीझन सुरू झाला की पुन्हा उगवायला लागतात. शिंगांची वाढ फार झपाट्याने होते आणि तीन चार महिन्यातच शिंगे चांगली ४-५ फूट येवढी पसरतात. मूस सहसा एकटेच असतात. बछड्याचा जन्म झाला की ते मादी समवेत असते. पुढच्या बछड्याच्या जन्मापर्यंत मादी आपल्या आधीच्या बछड्याची काळजी घेत असते. उत्तरेकडच्या या राज्यांमधे, आपलं मोठ्ठं बेंगरुळ शरीर, लांबोडक्या काटकुळ्या पायांवर सांभाळत, रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करणार्या मूस मुळे गाड्यांचे होणारे अपघात, ही एक मोठीच डोकेदुखी आहे.
क्रमशः ....
-- डॉ. संजीव चौबळ
December 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti