वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून मान्यता पावलेले आणि तमाम मराठी भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट येथे सुमारे २२ वर्षे वास्तव्य होते.
तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या अक्कलकोटचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोग्य सेवा, पर्यटन असा विविध अंगांनी विकास करणे हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थानतर्फे ४२ एकरांच्या जागेवर भव्य असा अनुभुती प्रकल्प साकारण्यात येत आहे.
अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामीसमर्थांची पंचधातूमध्ये बनवलेली १०८ फुटी भव्य मूर्ती (स्ट्याचू ऑफ मिरॅकल) उभारण्यात येणार असून त्यासोबत दिव्य दर्शन, बहूउद्देशीय रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, स्टुडिओ अपार्टमेंट, भव्य पार्किंग व्यवस्था, पंचकर्मा रिसॉर्ट, फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारासाठी कुंजरबन हे जंगल यांचाही समावेश आहे.
या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजी राजे भोसले (तिसरे) यांची असून त्यासाठी त्यांनी अक्कलकोट संस्थानची सुमारे २५० कोटीहून जास्त मुल्याची ४२ एकर जागा सेवा स्वरूपात दिलेली आहे. आता सर्व स्वामीभक्तांचा स्वामीसेवा स्वरुपात या प्रकल्पाला हातभार लागावा या उद्देशाने लोकवर्गणीतून हा प्रकल्प उभा रहात आहे.
सुयोग्य प्रकाश योजना, दिशा दर्शक फलक, भाविकांना मनःशांती प्रदान करणारे भारतीय आध्यात्मिक वृक्ष आणि फुलझाडांदे नक्षत्रवन हे देखील या प्रकल्पाचे आकर्षण ठरणार आहे. तज्ज्ञ कलाकार आणि अनुभवी कारागीरांच्या कलाविष्कारातून साकारण्यात येणारा हा प्रकल्प देशाच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनात आपला वेगळा ठसा उमटविणारा ठरणार आहे.
या प्रकल्पाव्दारे पर्यटकांना अक्कलकोटच्या इतिहासाची परिपूर्ण माहिती देण्यात येणार असून अक्कलकोटच्या राजघराण्याची झलक देखील यातून मिळणार आहे.
प्रकल्पाची विस्तृत माहिती:
ब्रह्मस्थान (स्ट्याचू ऑफ मिरॅकल) ह्या नावाने श्री स्वामी समर्थ महाराज यांची १०८ फुटी पंचधातूमधील मूर्ती उभारण्यात येणार आहे. येथे चौथऱ्यावर स्थापित श्री स्वामी समर्थाचे भव्य शिल्प शांतता आणि समतोलाची अनुभुती देणारे असणार आहे. सदर १०८ फुटी मूर्तीच्या खाली २२ फुटी कमळ आहे. त्या कमळाच्या खाली भाविकांसाठी ध्यान केंद्र आणि पारायण केंद्र असणार आहे.
दिव्य दर्शन :- दिव्य दर्शनमधील १८ दिव्य गुंफा आणि दगडावरील कोरीव कामातून पर्यटकांना श्री स्वामी समर्थाच्या जीवन चरित्राचा आस्वाद घेता येणार आहे. येथील प्रत्येक शिल्पामधून भाविक आणि पर्यटकांना एक आगळावेगळा अनुभव मिळणार आहे.
बहूउद्देशीय रुग्णालय :- अनुभूती प्रकल्पामधील येणाऱ्या उत्पन्नातून बहुउद्देशीय रुग्णालय उभारण्यात येणार असून त्याद्वारे अक्कलकोटच्या राजघराण्याची समाजप्रती असलेली सेवेची बांधिलकी व्यक्त होत आहे. हे बहूउद्देशीय रुग्णालय अक्कोलकोटवासीयांच्या सेवेसाठी नि शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे.
प्रशस्त पार्किंग :- प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या पार्किंगसाठी ५०० कार, बसेस आणिक इतर वाहने उभी करण्यासाठी वृक्षेच्या छायेखाली जागा उपलब्ध करून देणार आहे. हे पार्किंग वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरापासून साधारण १०० मीटर अंतरावर आहे.
पार्किंग परिसरात अग्निशामक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी कॅन्टीन देखील उभारण्यात येणार आहे.
फूड कोर्ट :- स्वामी समर्थ महाराजांच्या भव्य मूर्तीच्या परिसरात असलेल्या फूड कोर्टमध्ये महाराष्ट्रातील विविध विभाग आणि जिल्ह्यांमधील तसेच भारतातील विविध राज्यांमधील आणि जगातील प्रमुख देशांमधील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळी उपहारगृहे उभारण्यात येणार असून त्याद्वारे पर्यटकांना अक्ललकोट येथे आकर्षित करण्यात येणार आहे. अक्कलकोट आणि परिसरातील जनतेसाठीसुद्धा ही एक खाद्य अनुभूती असणार आहे.
लाईट आणि साऊंड शो :- प्रकाश, ध्वनी आणि जलाचा मनोहारी सांगीतिक आविष्कार असलेल्या या विभागातून पर्यटकांना अतिउच्च आनंदाचा अनुभव मिळणार आहे.
प्रसादम् :- या प्रकल्पाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला प्रसादम् विभागात सात्विक प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
कुंजर बन :- शाही हत्तींच्या मुक्त संचारासाठी हे वनरुपी परिपूर्ण निवासस्थान असेल.
पंचकर्मा रिसॉर्ट :- स्वामी समर्थ महाराजांच्या १०८ फुटी मूर्ती समोर आणि स्वामींच्या सानिध्यात १८ वैशिष्टयपूर्ण बंगल्याचे रिसॉर्ट देखील उभारण्यात येणार आहे. भारतातील तसेच परदेशी पर्यटकांना आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म यासाठीच्या उच्च दर्जाच्या सुविधा देणारे हे रिसॉर्ट अक्लकोट परिसरातील पर्यटनाला चालना देणार आहे.
स्टुडिओ अपार्टमेंट :- देशभरातून आणि जगभरातून अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांना दर्जेदार वास्तव्याची सोय करण्यासाठी विविध सोयी सुविधांनी युक्त स्टुडिओ अपार्टमेंट बांधण्यात येणार असून या निवासस्थानात अतिथींना सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
या संपूर्ण प्रकल्पाची माहिती www.swamisamarthanubhuti.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
January 2, 2025
गुंतवणुकीच्या पारंपरिक पध्दतीच्या पलिकडं बघणं सध्याच्या काळात आवश्यक आहे. महागाईचा वाढता दर आणि बचत खात्यांवर मिळणारा व्याजाचा दर यात बरीच तफावत आहे. त्यामुळे गुंतवलेल्या रुपयांचं मूल्य मुदतीनंतर हे कमी झालं असतं.
January 21, 2015
पवार साहेबांचे आयुष्य चिमटे, कानपिचक्या, धोबीपछाड यातच गेले. मागून आलेले ममता, जयललिता, केजरीवाल, मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली पण 55 वर्षे राजकारणात असूनही पवार साहेबांना महाराष्ट्रात स्वबळावर एकहाती सत्ता मिळवता आली नाही.
आणि येड्या भक्तांना वाटतं साहेब राजकारणात काहीही घडवू शकतात.
4 वेळा मुख्यमंत्री, 15 वर्षे केन्द्रीय कृषी मंत्री राहूनसुद्धा आज जर जेल भरो करत असाल तर पवार साहेब मला एवढेच सांगा की 20 वर्षे काय केलत आपण ????
हे सरकार एक वर्षभर जलयुक्त शिवार म्हणून काय कर होतं ते काल सर्व बंधारे भरल्यावर आम्हाला समजलं..
एका पावसात सर्व बंधारे भरून गेले हो... यान्नी एका वर्षात जे केले ते तुम्हाला 15 वर्षात का नाही जमल हो...
आणि आता जेलभरो?? अहो त्यापेक्षा भुजबळ तटकरे अजित पवार रमेश कदम यांना सांगा की अक्षय ,नाना ,मकरंद यांचा आदर्श घ्यायला...
का फसवता आम्हाला साहेब...
अक्षय कुमार 90 लाख
रोहित शर्मा 5 लाख
अजिंक्य राहणे 5 लाख
लालबाग बागचा राजा 25लाख.
विठ्ठल मंदिर 1कोटी
mca - 1 कोटी
नाना पाटेकर.मकरन्द असे अनेक कलाकार मंडळी. अजून कितीतरी गणपती मंडळे हे सर्व दुष्काळी लोकांना मदत करत आहे आणि महाराष्ट्राला लूटणारे बारामतीकर काय तमाशा बघत आहे.
जास्तीत जास्त शेअर करा. बघा मग.बारामती कर 70हजार कोटी मधले 7 हजार कोटी तरी देतील.
नाही तर जेल भरो नक्की.
-- मकरंद
August 31, 2016
माननीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बांधकाम क्षेत्रात येणारा काळापैसा रोखण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करणे गरजेचे आहे असे दोन दिवसापूर्वी विधान केले होते. परंतु मुद्रांक शुल्कात कपात केल्याने काळापैसा रोखता येईल म्हणणे धाडसाचे होणार तर नाहीच पण हा पर्यायही होऊ शकत नाही. मुळात काळा पैसा कसा निर्माण होतो ह्याच्या मुळाशी जाऊन त्यावर नियंत्रण व निर्बंध घालण्यासाठी काही उपाय योजना कठोरपणे अमलात आणल्या तरच काळ्या पैशाला रोखता येईल अन्यथा हे स्वप्नवत भासेल.
March 22, 2011
शुद्ध तूप हा प्राणीजन्य पदार्थ आहे. यात वनस्पती तूपचा समावेश होत नाही. दूध हा नाशवंत पदार्थ आहे, पण त्यापासून बनवलेला शुद्ध तूप हा टिकाऊ पदार्थ आहे. बाजारातून आणलेल्या शुद्ध तुपाला घरच्या तुपासारखा वास नसतो. सायीसकट कोमट दुधास विरजण लावून त्याचे दही झाल्यावर ते घुसळून वर तरंगत असलेले लोणी बाजूला काढून ते कढवितात म्हणजे उष्णता देतात. योग्य उष्णता मिळाल्यानंतर लोण्यातील पाण्याचा अंश बाष्परूपात निघून जातो, वर बुडबुड्याच्या स्वरूपात दुधातील काही पदार्थ वर येतात.
November 13, 2023
आपण एखादे घर नव्याने विकत घेतो तेव्हा या संज्ञांचा आपल्याला विचार करावा लागतो. कारण या संज्ञा घराच्या क्षेत्रफळाशी निगडीत आहेत. संख्येबाबत विचार करता कार्पेट एरिया ही इतर दोन एरियांच्या तुलनेत सगळ्यात कमी असते. त्याचा खरा अर्थ असा की संपूर्ण घरातील सर्व खोल्यांच्या (हो, संडास, बाथरूम धरून) सगळया भितीना चिकटेल (वॉल टू वॉल) अशी सतरंजी (कार्पेट) अंथरली तर तिचे जे क्षेत्रफळ भरेल ते म्हणजे एकाद्या घराचा कार्पेट एरिया. घराच्या भिंती वजा करून मोजलेला एरिया.
January 11, 2023
भारतातील सण हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे हे वनौषधींपासून बनवलेले असावे, असा संकेत आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये भल्या पहाटे उठून अंगाला तेल लावून घातलेले स्नान म्हणजेच अभ्यंग स्नान होय. अभ्यंग स्नानासाठी जे सुवासिक तेल वापरले जाते ते केवळ सुवासिक न वापरता त्यासोबत कोमट तीळ तेलाने अभ्यंग करावा. शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यंग करताना सर्वागाला तेल लावून हलकेसे मालिश करणे आवश्यक असते. अभ्यंग करताना तो हातापायांच्या ठिकाणी खालून वरच्या दिशेने करावा तर सांध्याच्या व पोटाच्या ठिकाणी घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने गोलाकार करावा. आपल्याकडे फक्त दीपावलीच्या दिवसांमध्येच केला जातो. अनेक कुटुंबातील स्त्रिया सर्व घरातील सदस्यांना अभ्यंग करून स्नान घालतात; परंतु स्वत:साठी वेळ काढून अभ्यंग करीत नाहीत. अनेक जणींचा बाळंतपणानंतर अंगाला तेल लावून स्नान करणे एवढाच काय तो अभ्यंगाशी संबंध आलेला असतो. परंतु त्यामुळेच बऱ्याच स्त्रियांमध्ये नियमित अभ्यंग न झाल्याने वयाच्या तिशी-पस्तिशीनंतर कंबरदुखी, पाठदुखी, संधिवात, गुडघेदुखी, अंगदुखी अशा अनेक तक्रारी दिसून येतात. धावपळीच्या युगात बऱ्याचशा स्त्रिया डोक्यालादेखील तेल लावण्यास वेळ काढत नाही. त्यामुळे केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, केस व डोक्याची त्वचा रूक्ष होणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा तक्रारी अनेक जणींमध्ये आढळतात. या तक्रारी दूर करण्यासाठी पौष्टिक आहाराबरोबरच आठवडय़ातून दोन वेळा डोक्याला तेल लावून हलकीशी मालिश करणे गरजेचे आहे.
नियमित अभ्यंग केल्याने रोजच्या रोज होणारे शारीरिक श्रम दूर होतात. शरीराला बल मिळते. शरीरातील वाढलेल्या वायूचे शमन होऊन दृढता प्राप्त होते. त्वचेचा कोरडेपणा जाऊन त्वचा कांतियुक्त होते. अभ्यंगामुळे आजच्या आधुनिक काळात प्रवासामुळे व हवेतील प्रदूषणामुळे होणारा वात प्रकोप व त्वचेवरील दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात. नियमित अभ्यंग केल्याने भूक चांगली लागून मलबद्धतेचे विकार नाहीसे होतात. मानसिक थकवा दूर होऊन झोप चांगली लागते; मनाची एकाग्रता वाढून स्मरणशक्ती वाढते. एवढेच काय तर वृद्धत्व उशिरा येऊन चिरतारुण्य प्राप्त होते. म्हणून सर्वानीच दीपावलीच्या काळात तळपायापासून ते डोक्यापर्यंत सर्व अवयवांना अभ्यंग करावे व नंतरही आठवडय़ातून एकदा तरी सुटीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे.
अभ्यंगानंतर स्नान करताना सुगंधी उटणे लावण्याची प्रथा आहे. शरीराला लावलेले तेल त्वचेमध्ये जिरून शिल्लक राहिलेले जास्तीचे तेल किंवा त्वचेचा तेलकटपणा जावा व शरीरातील रक्ताभिसरण सुधारून हालचालीमधला सहजपणा व चपळपणा कायम राहून शरीराला सुगंध यावा. हा यामागे उद्देश असतो. जसे अभ्यंग करताना आपण तेल लावतो अगदी त्याच दिशेने व पद्धतीने उटणेही शरीराला लावावे. जाहिरातीमध्ये आकर्षक वाटलेला परंतु रासायनिक प्रक्रियेने तयार केलेला साबण या अभ्यंगाच्या वेळी लावू नये. त्यामुळे त्वचा जास्तच रूक्ष होते. म्हणून कुठलाही साबण लावू नये. अशा पद्धतीने अभ्यंग करून उटणे लावून नंतर सोसवेल अशा गरम पाण्याने केलेले स्नान शरीर स्वच्छ करून मनाला तरतरीतपणा, प्रसन्नता आणते व एकूणच शरीराचे सर्व आजार बरे होऊन दीर्घायुष्य प्राप्त होते.
अभ्यंगासाठी तेल अभ्यंग करण्यासाठी कोमट तीळ तेल वापरावे किंवा आपल्या प्रकृतीनुसार व एखादी व्याधी असेल तर त्या व्याधीनुसार वेगवेगळी तेले तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरता येतात. उदाहरणार्थ वातशामक तेल, चंदन बलालाक्षादी तेल, सहचर तेल आदी.
उटणे सहसा उटणे हे घरीच किंवा तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार वापरावे. बाजारात मिळणाऱ्या उटण्यांमध्ये अनेक वेळा चूर्णाची भेसळ झालेली दिसून येते.
उटणे बनविण्याची कृती.
साहित्य:- पाव किलो मसूर डाळ पीठ, २५ ग्रॅम आवळकाठी, २५ ग्रॅम सरीवा, २५ ग्रॅम वाळा, २५ ग्रॅम नागर मोथा, २५ ग्रॅम जेष्टमध, २५ ग्रॅम सुगंधी कचोरा, ५ ग्रॅम आंबेहळद, २५ ग्रॅम तुलसी पावडर, २५ ग्रॅम मंजीस्ट, ५ ग्रॅम कापूर. ( हे सर्व साहित्य कास्टा औषधीच्या दुकानात मिळते.)
कृती : वरील सर्व साहित्य चांगले मिक्स करून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.
हे उटणे लावल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारून त्वचा कांतियुक्त होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 9, 2017
फळे आरोग्यासाठी चांगली असतातच पण या फळांचे आरोग्यासाठी असणारे विशिष्ट फायदे आपल्याला माहिती नसतात. पपई उष्ण असल्याने उन्हाळ्यात खावू नये की थंडीत खावी याबाबत नेहमीच चर्चा झटत असते. मात्र, पपई खाण्याचे तुम्हाला फायदे माहीत आहेत का?
- पपईमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर तो लवकर बरा होता.
- पपईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'क' असते. पपई खाल्ल्याने शरीरातील या जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास मदत होते.
- पपईने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पपईमध्ये जीवनसत्त्व 'अ'चे प्रमाण चांगले असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी 'अ' जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.
वयानुसार दृष्टी राहण्यासाठी पपई खाणे फायदेशीर केव्हाही चांगले असते.
- पपई खल्ल्याने पचन सुधारते. जेवणाच्या वेळा बदलणे, काही कारणांनी बाहेरचे खावे लागणे, वातावरणातील बदल यांचा शरीरावर परिणाम होत असतो. यामध्ये
पचनशक्तीवर परिणाम होतो. मात्र पपई खाल्ल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
- वजन कमी करण्यास उपयुक्त फळ आहे. अनेकदा आपल्याला अवेळी भूक लागते. मात्र पपईने या भुकेवर नियंत्रण मिळविणे शक्य होते.
- एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये साधारण १२० कॅलरीज असल्याने पोट भरते. याशिवाय पपईमध्ये असणारे फायबर्स भूकेवरील नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त ठरते.
- पपई खाणे केव्हाही चांगले. त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. दिवसभराच्या धावपळीने आपल्याला बऱ्याचदा थकल्यासारखे जाणवते. अशावेळी वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास आलेला शीण कमी होण्यास मदत होते.
- पपई खाण्यामुळे शरीरातील हॉर्मोन्सचे प्रमाण संतुलित राखण्यासही मदत होते.
-- सुषमा मोहिते
-- Sushama Mohite
आरोग्यदूत - Aarogyadoot
September 13, 2017
डेल (Dell) ही संगणक क्षेत्रातील जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी असून तिची स्थापना १९८४ मध्ये मायकल डेल यांनी केली. डेलचे लॅपटॉप आणि डेस्कटॉप त्यांच्या टिकाऊपणा आणि विविध श्रेणींसाठी ओळखले जातात.
April 9, 2026
दिल्लीत श्री दत्त विनायक मंदिरात दरवर्षी दास नवमीच्या निमित्ताने समर्थांचे विचार आणि शिकवण लोकांपर्यंत पोहचविण्या साठी कार्यक्रम होतात. या वर्षी मनोबोधावर कार्यक्रम होता. श्रीरामाचा सर्वोत्तम दास कसा असतो या विषयावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
August 16, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti