(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ३

    प्रौढोहं यौवनस्थौ विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्
    धौ दष्टो नष्टो विवेकः सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः ।
    शैवीचिन्ताविहीनं मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥३॥

    मानवी जीवनातील दुःख परंपरेचे वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात की काळाच्या ओघात मी मोठा झालो. बालपणीच्या दुःख कारणांना दूर करण्याचे बळ तर अंगी आले पण तरी दुःख कुठे संपले? तारुण्यात वेगळे दुःख सुरू झाले.
    प्रौढोहं यौवनस्थौ - मी थोडा मोठा झाल्यावर यौवन अवस्थेला प्राप्त झालो.
    विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्धौ
    दष्टो - त्यावेळी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयरूपी विषधर म्हणजे सापांनी माझ्या मर्म स्थानांना चावा घेतला.
    त्या पाच विषयांचा आस्वाद घेणारी अनुक्रमे कान,त्वचा, डोळे, जीभ आणि नासिका ही पाचही इंद्रिये त्याविषयांच्याच ताब्यात गेली होती. जणु त्यांच्या विषाने बेशुद्ध झाली होती.
    नष्टो विवेकः - त्याचा परिणाम म्हणून माझा विवेक नष्ट झाला. काय करावे? आणि काय करू नये? हेच समजत नव्हते. सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः - मुलगा, पैसा, पत्नी यांच्या गोड गोड वाटणाऱ्या सुखात मी आकंठ बुडून गेलो.
    शैवीचिन्ताविहीनं - भगवान शंकरांचे चिंतन करण्याचे सोडून,
    मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं- माझे हृदय मानसन्मान गर्व यांच्या टोकावर आरूढ झाले होते.
    हे सर्व माझे दोष आहेत.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेवा ! शिवशंकरा! माझ्या या अपराधांना क्षमा करा.
    मला आपले चिंतन करण्याची बुद्धी प्रदान करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 22, 2020


  • “कोला कोला – पेप्सीकोला”

    “कोला कोला – पेप्सीकोला”

    जवळपास दीड दशकांपूर्वी सॉफ्ट ड्रींक्स चा विस्तार झपाट्याने होत होता; वेगवेगळ्या फ्लेवर्सची आणि नामांकित ब्रॅण्ड्सची शीतपेय लोकांना आवडू लागली होती आणि त्यांच्यासाठी अशी कोल्ड्रींक्स् म्हणजे काहीतरी खास असंच होतं….

      July 29, 2013


  • पाकिस्तानात डोकावणारा भारत

    पाकिस्तानात डोकावणारा भारत

    ‘केसरी’ चे माजी संपादक अरविंद व्यंकटेश गोखले यांनी अनेक देशांचा दौरा केला आहे आणि यापुढेही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा असा प्रवास करत राहतील. तथापि त्यांनी पाकिस्तानला जाऊन आपल्यातल्या लेखकाच्या धर्माची जपणूक केली. त्यांनी पाकिस्तानात जाऊन भारताचा शोध घेतला. पन्नास वर्षांपूर्वी या देशाचं अविभाज्य अंग असणाऱ्या; परंतु आता परक्या बनलेल्या प्रदेशाचा त्यांनी मागोवा घेतला आहे. भारतीय उपखंडातल्या या दोन्ही देशांचा पिंड एकच असल्याने त्यांच्यात काही मूलभूत परिवर्तन व्हायचा सवालच निर्माण होत नाही.

      July 3, 2025


  • “धड भारतीय; मस्तक विदेशी!”

    भारतातील गरिबी दूर झाली, हा देश बलाढ्य झाला, इथे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाले, काम करणार्‍या हातांची संख्या वाढली, तर आपली दुकानदारी बंद होईल, ही भीती ज्यांना वाटते त्या परकीय शक्तींचा पगडा इथल्या सरकारवर आहे. हे सरकार भारतातील नव्हे, तर विदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे डोके चालवित आहे आणि त्यातूनच देशविघातक धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. अन्यथा “गरिबी हटाओ” या नार्‍याऐवजी “अमीर बनो” असा नारा काँगे्रसने दिला असता.

      April 9, 2012


  • नोटबंदीनंतरच्या गावगप्पा

    येथे फक्त ज्या वैध नोटा बॅंकेत परत आल्यात त्याचाच विचार केला आहे. ज्या नोटा वैध नव्हत्या व बॅंकेत आल्या नाहीत त्याचा विचार केलेला नाही. अशा नोटांची संख्या ही कोणत्याही वेळी १० टक्के पेक्षा जास्त होती हेही विसरून चालणार नाही.

      September 4, 2018


  • नवरात्र व मार्केटिंग फंडे

    काही वर्षांपूर्वी “डे “संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा “गिफ्ट वस्तुंच्या कंपन्या व ग्रिटिंग कार्ड कंपन्या ” आपल्या देशात आल्या तेव्हापासून हे “डे “च खूऴ डोक्यात शिरलय. चॉकलेट डे,वेलेंटाईन डे, रोज डे वगैरे. या दिवसांत करोडोंची उलाढाल या कंपन्या करताहेत. आज अशी अवस्था आहे कि मुलांना गणपती, गोकुळाष्टमी कधी आहे हे सांगाव लागते पण हे “डे ” मात्र ते पक्के लक्षात ठेवतात.

      September 28, 2019


  • जोर का धक्का जोर से

    महागाईचा दर आणि चलनाचे मूल्य या दोन गोष्टींचे परिणाम नेहमीच सामाजिक आणि आर्थिक असतात . त्यांची कारणे मात्र अनेकदा राजकीय असतात . त्यामुळे त्याबाबतची उपाययोजना ही बहुतेकदा राजकीयच असावी लागते . या मालिकेतील अस्खलित उदाहरण म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून ५०० आणि १००० रुपयांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या चलनी नोटा रद्द करण्याचा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला निर्णय .

    हा निर्णय अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे हे निर्विवाद . मात्र एकीकडे सध्या अस्तित्वात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून बंद करत असतानाच दुसरीकडे ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा १० नोव्हेंबर २०१६ पासून सुरु करण्याचा निर्णय तसा गन्मतीचा वाटतो . हे उच्च मूल्यांच्या नोटा बंद करणे असे न होता अस्तित्वात असलेल्या नोटा बदलणे असा होतो . राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत काळ्या पैशाला आळा घालायचा असेल तर दर दहा वर्षांनी चलनी नोटा बदलल्या पाहिजेत असा विचार अनेक दशकान्पूर्वी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला होता . उच्च मूल्यांच्या नोटा रद्द कराव्यात असा मुद्दा अर्थक्रान्ती गेली अनेक वर्षे मांडत आहे . विद्यमान सरकारचा प्रस्तुत निर्णय या दोन गोष्टीचा संगम वाटतो .

    अर्थातच या स्वरूपाच्या निर्णयांचा ( ज्याला अर्थशास्त्रीय परिभाषेत Demonetisation असे म्हणतात ) राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला फायदे असतातच . आणि यापैकी कोणताही निर्णय घेण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ति लागते . आणि ती हिम्मत मोदी सरकारने दाखवली . त्यासाठी या निर्णयाशी संबंधित सर्वच निश्चितच अभिनन्दनास पात्र आहेत .

    अशा पध्दतीने एखाद्या मूल्याच्या चलनी नोटा रद्द करण्याचा हा प्रसंग स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासात पहिल्यांदा घडत नाहीये . एकदा रद्द केलेल्या मूल्याच्या चलनी नोटा पुन्हा चलनात आणण्याचाही प्रकार याआधी घडला आहे . पण त्याबाबत माहिती पंतप्रधानानी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून देण्याचा प्रकार मात्र अनोखा आहे . प्रामुख्याने आर्थिक असणाऱ्या या निर्णयांची सांगड एकीकडे राष्ट्रप्रेम आणि दुसरीकडे दहशतवाद याच्याशी घालणे आणि या राष्ट्र - कार्यात तुमच्या - माझ्यासारखे सर्वसामान्य भारतीय नागरिक असा हातभार लावू शकतात असा भावनिक स्पर्श त्या रुक्ष आर्थिक आणि कर्तव्य - कठोर संरक्षणत्मक निर्णयाला देणे हे तर अफलातूनच . " सबका साथ , सबका विकास " चे अजूनही एक वेगळे स्वरूप म्हणा ना !

    आज हा निर्णय का घ्यावा लागला याचे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थखाते आणि आपल्या देशाची मध्यवर्ती बँक " भारतीय रिझर्व बँक " ( RBI ) यांनी दिले आहे . त्यानुसार २०११ ते २०१६ या पाच वर्षांच्या काळात आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था ३० टक्के विस्तारली ; मात्र याच काळात चलनी नोटांच्या प्रमाणात मात्र ४० टक्के वाढ झाली . त्यापैकी ५०० रुपयांच्या नोटांच्या संख्येत ७६ टक्के तर १००० रुपयांच्या नोटांमधे १०९ टक्के वाढ झाली . आजमितिला सर्वसामान्य नागरिकांकडे असणाऱ्या चलनी नोटांच्या रकमेचे प्रमाण सुमारे १६ , ९८ , ५४० कोटी रुपये आहे आणि त्यापैकी अंदाजे ८८ टक्के भाग ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमधे आहे . साधारणतः पाव भाग ( सुमारे २५ टक्के ) अर्थकारण काळया स्वरूपाचे असते असे मानले तरी अंदाज येऊ शकतो . तसेच नवीन नोटा निर्माण करण्याच्या सरकारी प्रक्रियेत , रिझर्व बँकेच्या नोटा - निर्मितीत कोणतीही संरक्षणात्मक गडबड झाली नसली तरी दहशतवादाला पाठबळ पुरवण्यात सहभागी असलेले बनावट नोटा आणि इतर गैरमार्ग अवलंबत असतील तर त्याला आळा घालणे हाही उद्देश या निर्णयामधे आहेच .

    हा लेख तुम्ही वाचेपर्यन्त ९ नोव्हेंबर ला देशातील सगळ्या बँका आणि ९ व १० नोव्हेंबर २०१६ ला सर्वच बंद होती हा इतिहास झाला असेल . ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा तुमच्या हातात असतील . ८ नोव्हेंबर पर्यंत आपल्या जवळ असणाऱ्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी रांगा लावून झाल्या असतील . पैसे भरायला कमाल मर्यादा नसली तरी काढायला चेक मागे जास्तीत जास्त १०००० रुपये आणि आठवड्यात खात्यातून जास्तीत जास्त २०००० रुपयेच काढता येतील हे ऐकून झाल असेल . २४ नोव्हेंबर २०१६ पर्यंत हे बंधन असेल . नंतर हे प्रमाण वाढत जाईल . आपल्या जवळच्या या जुन्या नोटा ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत जमा करता येतील आणि ते करताना ओळख - पत्र द्यावे लागेल हेही तोंडपाठ झाले असेल . पण अशा ओळखपत्र प्रत सही करून देताना सरकार ने सांगितले नसले तरी त्यावर तुम्ही तुमच्या खात्यात पैसे भरण्यासाठी ते सही करून देत आहात असा त्यावर तुमच्या तपशीलवार उल्लेख करायला बिलकूल विसरू नका . त्यामुळे त्या ओळखपत्र दुरुपयोग टाळण्यासाठी मदत होईल .

    हा झाला या निर्णयाचा एक भाग . तितकाच तो काळाच्या ओघात ज्या पध्दतीने अंमलात आणला गेला तेही आवर्जून लक्षात घेण्याजोगी बाब आहे . या निर्णयाने काळा पैसा उजेडात येईल आणि नव्याने काळा पैसा निर्माण होण्यास काही प्रमाणात तरी पायबन्द बसेल असे सांगण्यात येत आहे . एक तत्व म्हणून ते बरोबरच आहे . पण गेल्या ६० - ७० वर्षांत काळया पैशाबाबत ज्या काही उपाय - योजना आपल्या देशात राबवल्या गेल्या , त्यांचा अनुभव फारसा सुखद नाही . अगदी याआधीच्या demonetisation निर्णयानीही अपेक्षित प्रमाणात परिणाम दिलेले नाहीत . याचे महत्वाचे कारण म्हणजे काळा पैसा एका रात्रीत जन्माला येत नाही . तसेच तो अनेकविध क्षेत्रात अनेकविध कारणांनी निर्माण होतो , होत राहतो . शिक्षण , जमीन - जुमला , ग्रुहनिर्माण , सोने आणि गुंतवणूक , राजकारण अशी अनेक क्षेत्रे त्याची कारण ही आहेत आणि परिणामही .
    हे लक्षात घेत याबाबतचे सुटे धागे , सुटी टोके विद्यमान सरकारने कशी बांधत नेली हे बघणे नक्कीच उदबोधक ठरेल . त्याद्रुश्तिने या सरकारच्या गेल्या तीन अर्थसन्कल्पान्चा नीट विचार व्हावा . ( याचा उहापोह मी माझ्या भाषणात गेल्या तीन वर्षांत वारंवार केला आहे . ) . काळा पैसा हा भाजपा च्या लोकसभा निवडणुका जाहिरनाम्यात एक मुद्दा होता . देशाबाहेरचे काळे धन हा मोठा मुद्दा . आधी जन - धन योजनेतून अनेकांना बेंकिंग जाळ्यात आणले गेले . या खात्यांची सांगड आधारशी घालून ओळख परेड झाली . आयकर विवरण पत्रात ( Income Tax Returns ) आधार कार्ड नम्बर , प्रॉपर्टी , वाहने असे तपशील सुरु केले गेले . क्रेडिट व डेबिट कार्डचा वाढता वापर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्वच आर्थिक माहितीचा यथायोग्य सक्रिय वापर अशी ही श्रुन्खला आहे . त्याचबरोबर काळा पैसा जाहीर करण्याबाबत वेळोवेळी केली गेलेली आवाहने ही विसरून चालणार नाही . तसेच २६ मे २०१४ रोजी सत्तारुढ झाल्यावर विविध देशांशी असणारे राजनैतिक संबंध वाढवण्यात देण्यात आलेला भरा आता देशाबाहेर असणारी माहिती आणि पैसा हुडकण्याचा मार्ग सोपा करेल .

    ५०० आणि १००० रुपयांच्या आधी अस्तित्वात असलेल्या नोटा रद्द करण्याचा निर्णय ज्या पध्दतीने घेतला गेला , जाहीर केला गेला आणि अंमलात आणला गेला हे पाहिले तर एक मजेदार विचार सहजच मनात आला की दरवर्षी जर उत्तर प्रदेश , गुजराथ सारख्या महत्वाच्या राज्यांच्या विधान - सभांच्या निवडणुका होत राहिल्या तर किती क्रांतिकारी , धाडसी , महत्वाकांक्षी आर्थिक निर्णय किती सातत्याने घेतले जातील ! . गन्मतीचा भाग सोडून देऊ . कारण तसे पाहिले तर आपल्या देशात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होतंच असतात .

    पण या निर्णयाबाबतची स्थिति लक्षात घेता आर्थिक क्षेत्रात येणाऱ्या काळात , निदान नजीकच्या भविष्यात काय आणि कसे महत्वपूर्ण बदल होतील हे बघणे उपयोगाचे ठरेल . असा विचार करत असताना मला वाटणारे काही मुद्दे खालीलप्रमाणे :

    १ . सेवा आणि वस्तू कर ( GST ) ची अंमलबजावणी १ जानेवारी २०१८ पासून सुरु होईल .
    २ . सरकारी आर्थिक वर्ष सध्याच्या एप्रिल ते मार्च ऐवजी जानेवारी ते डिसेंबर असे होईल .
    ३ . वरील दोन्ही गोष्टी किंवा प्रामुख्याने दुसरी गोष्ट झाली तर नंतरच्या काळात वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पन्धरवद्यात सादर होईल .
    ४ . बँकामधील वाढते व्यवहार प्रमाण वाढत राहिले तर बँक खात्यातील व्यवहार हा कर - आकारणीचा , निदान काही प्रमाणात तरी , पाया बनेल .

    माननीय पंतप्रधानाना एक नम्र विनंती . . . आम्ही सर्वसामान्य नागरिक आमच एकमेव घरकुल घेताना मेटाकुटीला येतो . त्यासाठी द्यावे लागणार काळे धन द्यायच म्हणजे आमच पांढर् धन काळे म्हणून देतो . त्यामुळे तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमच्या कष्टातून , आधीच कर कापून , हाती आलेल्या पैशातून , घरखर्चासाथि बाजूस ठेवलेला पैसा ३१ डिसेम्बर २०१६ पर्यंत बँकेत जमा करण्यासाठी रांगेत उभे असताना यातली काही गुन्हेगार धेन्डे तुरुंगात गेलेली आणि त्यांची मालमत्ता जप्त झालेली पाहायला मिळाली तर नक्कीच आमचाही हुरुप वाढेल .

    जोर का धक्का जोर से हैं भाई . .

    -- चंद्रशेखर टिळक
    १० नोव्हेंबर २०१६ .

    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ .
    राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) .
    पिन . . . ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    EMail : tilakc@nsdl.co.in

      November 13, 2016


  • कवी, गीतकार प्रवीण दवणे

    अनेक कविता प्रवीण दवणे यांनी लिहिल्या दुर्देवाने का सुदैवाने तो कुठल्याही कंपूत सामील झाला नाही हे महत्वाचे . आजही त्याचा कार्यक्रम झाला की तो तिथून निघतो , नंतरचा अंक नसतो , म्हणून संयोजकांना तो परवडतो. पाकीट घेतले, झोळी घेतली की निघाला इतका प्रक्टिकल . कार्यक्रम झाला आता ‘ बसू ‘ हा सर्वमान्य प्रकार त्याच्या आयुष्यात नाही , कारण तो कधीच स्वतःला ‘ संपवणारी ‘ कामे करत नाही . तो तसे करत नाही म्हणून तो आजही भरपूर लिहितो, टीकाकार काहीही बोलो त्याला काहीही फरक पडत नाही , फरक टीकाकार यांनाच पडतो कारण त्याच्यावर जळण्यातच त्यांची शक्ती खर्च होते.

      April 6, 2021


  • चहा घेणार का?

    पुणेकरांवरती विनोद करताना त्यांच्या या प्रश्नाला सगळेच हसून दाद देतात. मात्र बुद्धीवादी पुणेकराचा हा प्रश्र्न एकशे एक टक्के बरोबरच आहे. म्हणजे या प्रश्नातून तो अनेक शक्यतांचं समाधान करुन घेतो.

      January 24, 2023


  • जागतिक आनंद दिवस

    आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे. १४९ देशांच्या यादीत भारताला १३९ क्रमांक मिळालाय. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत.

      March 20, 2022