वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
द.अफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर अर्थिक मंदिची लाट आली होती.
प्रत्येक व्यवसायीकाचा धंदा जेम तेम चालत होता.
आशाच एका लाँजिंग with बोर्डिंग असलेल्या हाँटेल मध्ये बाहेर देशाचा एक व्यापारी आला....
त्याने हाँटेल मँनेजरकडे १००डाँलरची नोट दिली व सांगितले की मला मुक्कामाला एक छान खोली पाहिजे....
हाँटेल मँनेजरने वेटरला सांगितले की साहेबाना रुम दाखवून आण पसंत पडली तर साहीत्य घेवून जा....
परदेशी पाहूणा रुम बघायला गेला.....
मधल्या वेळेत मँनेजरने १०० डाँलरची नोट घेतली व बेकरी वाल्याचे पैशे चूकते केले....
बेकरीवाल्याचा धंदा जेमतेमच चालत होता .
तो खूश झाला. त्याने त्या १००डाँलर्सची नोट घेतली व किराणा दुकणदाराची उधारी चूकती केली.....
किराणा दुकाणदाराला आनंद झाला.
फार दिवसापासून कामवाल्या बाईचे पैशे देता न आल्यामुळे ती कामावर येत नव्हती....
तो लगेच तिच्याकडे गेला .१०० डाँलर्सची नोट कामवाल्या बाईला दिली व सांगितले की आजपासून रोज कामावर येत जा...
बिचारीचा आनंद गगनात मावेना.फार दिवसापासून तिला काम नव्हते .जवळ पैशे नव्हते...
ती उधार उसनवार करुन कसा तरी संसाराचा गाडा चालवत होती....
१०० डाँलर्स मिळाल्यामुळे तिला आनंद झाला....
ती तात्काळ ते पैसे घेवून हाँटेल मालकाकडे गेली....
जो खूपच चांगला ,दयाळू व मदतगार होता. तिला पैशांची गरज होती तेव्हा त्याने तिला १००डाँलर्स उसनवार दिले होते...
त्या बाईने हाँटेल मालकाचे पैशे परत केले. व आभार मानून निघून गेली.....
तितक्यात त्या परदेशी पाहूण्याला खोली पसंद न पडल्यामुळे तो मँनेजरकडे आला व १००डाँलर्सची नोट घेवून निघून गेला....
अर्ध्या एक तासा साठी १०० डाँलर्स बाजारात चलन रुपाने फिरले.
प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिक पार पाडली...
त्यामुळे हाँटेल मालक ,बेकरीवाला,किराणा दुकाणदार,कामवाली बाई प्रत्येकाचे देणे घेणे फिटले व पुन्हा ते व्यवसाय करु लागले...
आपल्याजवळ जी संपत्ती असते त्या संपत्तीचे आपण मालक नसून विश्वस्त असतो....
प्रत्येकजणांनी कथेतील माणसा प्रमाणे वर्तणूक केली तर विजय मल्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. .....
नेहमी पैसा फिरता ठेवा.
त्यावर अनेक जणाचे संसार चालतात. जीवन जगण्यासाठी त्याचा वापर करा,
फक्त त्याच्यासाठी जगू नका.....
November 16, 2016
मला आतून पक्के माहित होते की अतृप्त आत्मे , शनी महाराज वगैरे मला त्रास देत नाहीयेत तर माझे विचार आणि वर्तन माझ्या अधःपतनास जवाबदार होते , मात्र हे मला उघडपणे मान्य करणे कठीण जात होते . माझा दिवसातील जास्तीत जास्त वेळ गांजा पिणे , वाचन आणि मित्रांबरोबर टिवल्याबावल्या करण्यात जात असे, त्याच काळात ‘ श्रीमद्भगवद्गीता ‘ जशी आहे तशी वाचनात आली ,
January 25, 2020
नोकरी करताना वेळ नाही हे पालुपद फक्त स्वत:च्या संदर्भात, बाकी इतरांसाठी धावतपळत ती सगळी कामं करतच असते. एवढंच कशाला, नोकरी करून निवृत्त झाल्यावरसुद्धा ती घरातली सारी कामं स्वत:वर ओढून घेते. इतकी वर्ष माझं तसं घराकडे दुर्लक्षच झालं म्हणत पोळ्या करणा:या बाईला सुटी देते. आपण आहे ना काम करायला, मग कशाला पैसे खर्च करा म्हणत कामच करते. स्वत:वर पैसे खर्च करण्याआधी दहादा विचार करते. स्वत:च्या ‘फिटनेस’साठी तर एक पैसा खर्च करायलाही तयार होत नाही. ती विचार करते, त्यापेक्षा मी घरात थोडं जास्त काम करेन. भाजी आणायला गेल्यावर थोडं जास्त चालायला जाईन. पण हे एवढंच करून ती फिट राहू शकत नाही. त्यासाठी रोज वेगळा वेळ काढून व्यायामच करायला हवा. आणि स्वत:कडे अजिबात दुर्लक्ष न करता स्वत:साठी वेळ काढायलाच हवा.
May 28, 2022
“आज आसपास पाहता असे आढळून येते की बहुतांश लोक कुठल्याना कुठल्या तणावामुळे त्रस्त आहेत. या सततच्या तणावामुळे नाना प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय शोधीत असतो. काही वेळा हे उपाय व्यवहार्य वाटत नाहीत म्हणून सोडून दिले जातात. मी सुद्धा या अनुभवातून गेलो आहे. बरीच वर्षे असा त्रास मी पण सहन केला.
August 19, 2026
मी पेशाने पशुवैद्यक (Veterinary doctor) आहे. मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून १९८६ साली, ‘पशुप्रजनन’ शास्त्रामधे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून, बरीच वर्षं गुजरातमधे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) ह्या प्रसिद्ध संस्थेच्या, ‘गाई म्हशींमधे कृत्रिम गर्भारोपण’ (Embryo Transfer), ह्या प्रकल्पावर डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करत होतो. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची मनापासून इच्छा होती, पण प्रयत्न करूनही योग जमत नव्हता. शेवटी २००० सालच्या अखेरीस, युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट मधे Ph.D. करण्यासाठी संधी मिळाली. डॉ. जेरी यॅंग सारखा, ‘क्लोनिंग’च्या क्षेत्रातला नावाजलेला संशोधक, गाईड म्हणून मिळत होता आणि असिस्टंटशिप द्यायलाही तयार होता. अशी संधी परत मिळणार नव्हती. घरच्यांच पाठबळ होतं. मी नोकरीचा राजीनामा दिला आणि ४ जानेवारी २००१ ला, वयाच्या चक्क अडतिसाव्या वर्षी, Ph.D. करण्यासाठी अमेरिकेत येऊन दाखल झालो.
पहिली सेमीस्टर झाल्यावर, माझ्या संशोधन प्रकल्पासाठी, डॉ यॅंगने मला आयोवा राज्यातल्या, ‘गायींमधे कृत्रिम गर्भधारणा’ करण्याच्या क्षेत्रातल्या, अमेरिकेतील सर्वात मोठया कंपनीत पाठवायचा निर्णय घेतला. अमेरिकेतील बहुतेक भारतीय, पूर्व किंवा पश्चिम किनारपट्टी किंवा दक्षिणेकडच्या मोठमोठया शहरांत रहात असल्यामुळे,‘आयोवा’ म्हटल्यावर त्यांना नकाशाचा आधार घ्यावा लागतो. पूर्व/पश्चिम किनारपट्टीवरच्या प्रगत राज्यांच्या आणि मोठमोठ्या शहरांच्या तुलनेत, अमेरिकेच्या मध्य भागातील (midwest) राज्ये, ही कमी प्रगत आहेत. दक्षिणेला टेक्सास राज्याच्या निमुळत्या मुठीसारख्या (pan handle) भागापासून, उत्तरेला कॅनडापर्यंत आणि पश्चिमेला रॉकी पर्वतराजीपासून पूर्वेकडे इंडियाना राज्याच्या सीमेपर्यंत, अमेरिकेचा प्रचंड मोठा भाग सपाटसा आहे. यात अमेरिकेच्या सोळा राज्यांचा आणि कॅनडाच्या तीन प्रॉव्हीन्सेसचा समावेश होतो. १४९२ साली जेंव्हा कोलंबसची गलबतं या नवीन जगाच्या किनार्यावर येऊन थडकली, तेंव्हा युरोपियनांना अनभिज्ञ अशा अमेरिका या प्रचंड भूखंडाचा एक तृतीयांश भाग (सुमारे १० लाख चौरस मैल) -आजचा ‘मिडवेस्ट’ - कुरणांनी आच्छादलेला होता.
अमेरिकेचं भौगोलिक वैविध्य असं आहे की तिच्या पूर्वेकडच्या निम्या भागाकडे बघून, पश्चिमेकडच्या उरलेल्या निम्या भूभागाची अजिबात कल्पना येत नाही. इंडियाना राज्यामधून आपण पश्चिमेकडे जाऊ लागलो की विस्कॉनसीन, मिनेसोटा, इलिनॉय, आयोवा, मिसुरी, अर्कान्सास ही दक्षिणोत्तर पसरलेली राज्ये लागतात. यांचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे, उंच सळसळणार्या गवताळ कुरणांनी आच्छादलेल्या, सर्वदूर पसरलेल्या छोटेखानी टेकडया. हा भूभाग म्हणजे ‘प्रेअरी’. एकेकाळच्या उंच सळसळणार्या गवताची जागा, आता तशाच उंच मक्याच्या पिकाने घेतली आहे. त्यामुळे प्रेअरीचं आताचं स्वरूप म्हणजे मका आणि सोयाबीनच्या पिकांनी भरलेली शेतं आणि त्यात मधे मधे विखुरलेले गायी आणि डुकरांचे फार्मस्. अशाप्रकारे मका, सोयाबीन, गो-पालन आणि वराह-पालन ह्या चार मजबूत खांबांवर प्रेअरीचा सारा भूभाग तोललेला आहे.
इथून आणखी पश्चिमेकडे सरकावं आणि नॉर्थ डकोटा, साउथ डकोटा, नेब्रास्का, कान्सास, ओक्लाहोमा आणि टेक्सास अशी पुढची, उत्तर दक्षिण पसरलेली राज्यांची फळी लागते. या राज्यांचा पूर्वेकडील साधारण एक तृतीयांश भाग देखील प्रेअरीमधेच मोडतो. या सार्या राज्यांतून, १०० अक्षांश उत्तर दक्षिण जातं आणि या नैसर्गिक भौगोलिक सीमेपाशी, अचानक भूभागात बदल जाणवायला लागतो. या अक्षांशापासून जसजसं पश्चिमेकडे जावं तसतशा छोटेखानी टेकड्या नाहीशा होतात आणि जमीन सपाट होत जाते. सळसळत्या गवताची जागा खुरट्या गवताने घेतली जाते. या राज्यांचा पश्चिमेकडचा भाग आणि त्याही पलीकडची मॉंटेना, वायोमींग, कोलोरॅडो, न्यू-मेक्सिको ही राज्ये म्हणजे ‘ग्रेट प्लेन्स’. पूर्वी या भागात बायसनचे क्षितीजापर्यंत पसरलेले कळप असायचे. आता तिथे मुख्यत्वे बीफ गायींचे मोठमोठे चराऊ रॅंचेस आहेत. त्यामुळे ‘प्रेअरी’च्या भागात मुख्यत्वे शेती आणि ग्रेट प्लेन्सच्या भागात मुख्यत्वे ‘चराऊ कुरणे’ अशी सध्याची विभागणी दिसून येते.
बदलणार्या भूभागानुसार केवळ शेती / पशूपालनाच्या पद्धतीत फरक पडतो असं नाही. जसजसं आपण अधिक पश्चिमेकडे जावं, तसतशा counties (जिल्हे) मोठ्या होत जातात, रस्ते अधिक सरळसोट होत जातात, गावं तुरळक होत जातात. गावकर्यांच्या टोप्यांकडे बघून देखील थोडाफार अंदाज बांधता येतो. शेतकरी साधारणपणे शेतकी अवजारांच्या कंपन्यांच्या किंवा जनावरांच्या breeding कंपन्यांच्या बेसबॉल कॅप्स वापरतात. मोठमोठ्या कुरणांचे मालक (ranchers) बहुदा काउबॉय हॅट्स वापरतात. साधारण १०० अक्षांशाच्या आसपास सुरू झालेल्या या अमर्याद सपाट जमिनीचा चढ, पश्चिमेकडे दर मैलामागे १० फुटांनी वाढायला लागतो तो थेट रॉकी पर्वतराजी सुरू होईपर्यंत.
अमेरिकेच्या अतिप्रगत अशा पूर्व आणि पश्चिम किनार्यावरच्या लोकांच्या दृष्टीने, हा सारा भूभाग म्हणजे फक्त विमानात बसून, माना वाकड्या करून खिडक्यांतून खाली बघून पाहाण्यापुरता. त्याच्यावरून ३०,००० फूटांवरून उडत जायचं म्हणून त्याला कुत्सितपणे ‘Fly over country’ असं म्हटलं जातं. उगाच नाही आयोवा किंवा मिडवेस्ट म्हटलं, की इतर अमेरिकन लोकं नाकं मुरडत ! मुंबईच्या खार, पार्ल्याच्या किंवा पुण्याच्या डेक्कन, कर्वे रोडच्या लोकांना इचलकरंजी, वीटा किंवा बुलढाण्याचं नाव ऐकून कसं वाटतं, साधारण तसंच बाकी अमेरिकन्सना मिडवेस्टबद्दल वाटतं.
आयोवाच्या उत्तर पश्चिम कोपर्यात, ‘सू सेंटर’ नावाचं एक छोटंस गाव आहे. बर्याचशा नकाशांत त्याचं नामोनिशाणही नसतं. उच्चाराप्रमाणे स्पेलिंग लिहिताना हमखास चुकायला होतं. खरं स्पेलींग आहे Sioux. गोर्या लोकांनी अमेरिकेचा कब्जा घेण्यापूर्वी, या भागात Sioux जमातीचे रेड इंडियन लोकं रहात होते. त्यावरून या सर्व भागाला (आयोवाचा उत्तर-पश्चिम भाग, मिनेसोटाचा थोडासा दक्षिण भाग आणि साउथ डाकोटा राज्याचा दक्षिण-पूर्व भाग) Sioux land म्हणतात. त्यामुळे या भागात सू सेंटर, सू सिटी, सू फॉल्स, सू रॅपीड्स अशी बरीच गावं / शहरं आहेत. या भागातून वहाणार्या नदीचे नाव देखील big Sioux river असंच आहे. तर अशा या सू सेंटरची वस्ती आहे केवळ सहा हजार. पण या छोट्याशा गावात, गायींमधे कृत्रिम गर्भधारणा आणि तत्सम क्षेत्रामधे संशोधन व काम करणारी, Trans Ova Genetics नावाची, अमेरिकेतील सर्वात मोठी कंपनी आहे. माझ्या प्रकल्पाच्या कामाच्या निमित्ताने, मी या कंपनीत २००१ च्या जुलै महिन्यात दाखल झालो. माझ्य़ा पाठोपाठ दोन आठवडयात, माझी बायको मृणालिनी आणि आमचा ६ वर्षांचा मुलगा सिद्धार्थ, मुंबईहून सरळ सू सेंटरला आले; आणि बघता बघता, १४ दशलक्ष लोकवस्तीच्या मुंबई शहरात आयुष्य काढलेलं, एक मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंब, अमेरिकेच्या मध्यावर, गाईगुरांच्या कुरणांमधे आणि मक्या-सोयाबीनच्या शेतांमधे, सहा हजार लोकवस्तीच्या एका खेडेवजा गावकुसाचं रहिवासी झालं.
June 29, 2015
स्वातंत्र्याचा लढा व स्वदेशी चळवळ हा विषय समजून घेताना इ.स. १८५० च्या पूर्वी देखील जे स्थानिक उठाव झाले त्याचीही पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागल्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केले. यात शेतकरी, कारागीर, आदिवासी, वन्य जमाती, साधू, फकीर, सैनिक अशा विविध गटांनी हे उठाव केल्याचे दिसून येते.
November 27, 2023

अंटार्क्टिका खंडावरच्या जमिनीचा मोठा भाग बर्फानं व्यापला आहे. या बर्फाच्या थराखाली पाण्याचे अनेक ‘तलाव’ अस्तित्वात असल्याचं, यापूर्वीच्या संशोधनातून दिसून आलं आहे. हे तलाव बर्फाच्या तळाशी, पृष्ठभागापासून दोन ते चार किलोमीटर खोलीवर वसले आहेत. यातले काही तलाव एकमेकांना जोडले आहेत.
December 3, 2022
एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात.
खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की,
"लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत".
नवरा म्हणतो साबण संपला असेल.
दुसर्या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की,
"लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत"
कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील.
नवरा फक्त ऐकून घेतो. असे रोजच चालते.
एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहुन बायको नवर्याला म्हणते
"अहो ऐकलंत का?
समोरच्या वहिनी सुधारल्या.
त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते.
आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत"
तेवढयात नवरा बोलतो
"राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या.
काचा आतून आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात.
समोरचे रोजच कपडे स्वच्छ धुवत होते.
परंतु आपल्या खिडकीच्या काचा खराब असल्यामुळे त्यांची कपडे तुला खराब दिसत होती.
समोरचे नाही आपणच सुधारलोय.
आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवून आपण दुसर्या कडे पाहिले पाहिजे.
नेहमी नजर चांगली ठेवा,
जग खुप सुंदर आहे...
" विचार " असे मांडा की, तुमच्या विचारांवर कुणीतरी "विचार"केलाच पाहिजे
?
October 17, 2016
महात्मा ज्योतीराव फुले म्हणजे ज्योतीराव गोविंदराव गोर्हे. गावात कुलकर्ण्याच्या वादामुळे गोर्हे कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कटगूण गाव सोडून पुण्यात धनकवडीला स्थायिक झाली. ते पुण्यात फुलांचा व्यवसाय करू लागले. त्यावरून त्यांचे आडनाव फुले असे रूढ झाले असावे.
October 13, 2020
मकर संक्रान्ति साजरी करतांना, आपण १४ जानेवारी १७६१ ला लढल्या गेलेल्या पानिपतच्या तिसर्या लढाईची आठवण विसरूं या नको.
January 17, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti