वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
एकेकाळी उल्हासनगरमधील उत्पादनांना त्यांच्या कमी किमतीमुळे फार मोठी बाजारपेठ होती. जगातल्या कुठल्याही ब्रॅंडची कुठलीही वस्तू उल्हासनगरमध्ये बनू शकते याची खात्री अनेकांना असायची. मूळ उत्पादन आणि उल्हासनगरमध्ये बनलेले उत्पादन यातला फरकही कळायचा नाही. किंमत मात्र अत्यंत कमी असायची त्यामुळे उल्हासनगरचा माल खपायचाही लवकर.
लोक गमतीने उल्हासनगरच्या मालाला Made in USA म्हणायचे. म्हणजे Made in Ullhasnagar Sindhi Association. अगदी फिलिप्सचे रेडिओ ते इतर अनेक नावाजलेल्या ब्रॅंडसच्या वस्तू उल्हासनगरमध्ये मिळायच्या. मात्र उल्हासनगरचा माल हा कायमच डुप्लिकेट म्हणून हिणवला गेला. खरंतर त्या उत्पादनांमध्येही एक ताकद होती. उल्हासनगरची ही उत्पादने त्यांच्या नावाने विकली गेली असती तर त्याचवेळी उल्हासनगरची ही बाजारपेठ स्वत:च्या आस्तित्त्वाचा ठसा उमटवू शकली असती. तसे झाले असते तर Made in Ullhasngar च्या ऐवजी हाच माल Made in India म्हणूनच विकला गेला असता. कदाचित त्यामुळे चिनी माल भारतात येण्याऐवजी इथलाच माल देशोदेशी गेला असता.
मात्र कदाचित त्यावेळच्या राज्यकर्त्यांना हे जाणवले असावे आणि त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाच्या व्यावसायिक गणितात हे बसत नसावे. नाहीतर जी मेक इन इंडियाची घोषणा पंतप्रधान मोदींनी २०१५ मध्ये केली ती इंदिरा गांधी अथवा राजीव गांधी या भारताच्या दोन महान पंतप्रधानांना करणे सहज शक्य होते. त्यांच्यात ती धमकही होती.
कालांतराने उल्हासनगरचे हे महत्त्व कमी होत गेले आणि चिनी बनावटीचा माल भारतीय बाजारपेठेत स्थिरावायला सुरुवात झाली.
आज भारतात जवळपास सर्वच क्षेत्रात चिनी बनावटीच्या वस्तूंचा सुळसुळाट झालेला आहे. कपडे, खेळणी हे तर सोडाच, पण दिवाळीतले कंदील आणि रोजच्या पूजेतील धूप, अगरबत्तीसारख्या वस्तूही यातून सुटल्या नाहीत. मुंबईत रस्तोरस्ती फूटपाथवर हा चीनी वस्तूंचा बाजार भरलेला असतो. याचे गमक हे चिनी वस्तूंच्या अत्यंत कमी किमतीत आहे.
असे म्हणतात की पश्चिमेकडच्या बाजारात काही नवे उत्पादन आले की लगेच त्याची चिनी आवृत्ती बाजारात येते. ती स्वस्त असते, पण टिकावू किंवा खरोखर उपयोगी असते असे म्हणणे धाडसाचे होईल. बहुसंख्य चिनी उत्पादनांचे आयुष्य जेमतेम सहा महिने ते एक वर्षाचे असते. यातली काही तर दुकानातून घरी घेउन गेल्याबरोबर बंद पडतात. मात्र ती उत्पादने चिनी कंपन्यांच्या नावावर विकली जातात. यामुळे चीन हा जागतिक बाजारपेठेत एक ब्रॅंड बनला.
२०१५ मध्ये प्रचंड आर्थिक मंदीच्या सावटाखाली आल्यावर. चीनने त्यांच्या मुद्रेची किंमत कमी केली. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार चीन स्वतःच्या उत्पादनांच्या किमती कमी ठेवून आर्थिक मंदीचा सामनाही करतोय आणि भारतातीलच नाही तर इतरही देशांतल्या बाजारपेठा काबिज करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे भारतीय आणि इतर देशांच्या बाजारपेठेत चीनी उत्पादने अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होतात. शेवटी गिर्हाईकाला जे स्वस्त मिळेल ते तो घेणारच. .
भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि एकूणच भारताच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मात्र दुर्दैवाने यातील गांभीर्य आपण लक्षात घेत नाही आणि दररोज चिनी माल खरेदी करुन चिनची अर्थव्यवस्था बळकट करायला एकप्रकारे मदत करतोय.
चिन हा पाकिस्तानचा मित्र असल्यामुळे पदोपदी पाकिस्तानला मदत करतो हे काही आता लपुन राहिले नाही. भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांमध्येही चिनच्या कारवाया सुरुच आहेत. एकीकडे आपले वीर जवान सीमेवर पाकिस्तानच्या कारवायांना बळी पडतात, शहिद होतात आणि आपण इकडे चिनी बनावटीच्या वस्तू राजरोसपणे रोज खरेदी करतो. आपण एकदातरी असा विचार केलाय का, की नकळत का होईना आपण आपल्या शूर शहिद जवानांचा अपमान करतोय?
भारत ही चीनची जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. चीन भारतीय बाजारपेठेत दरवर्षी करोडो रुपयांचा व्यवसाय करतोय. यातील बराचसा माल चोरीच्या मार्गाने येत असावा त्यामुळे अचूक आकडे मिळणे कठीण आहे. मात्र जाणकारांच्या मते जवळपास काही लाख कोटी रुपयांची उलाढाल चीन केवळ भारतात करतो.
सीमेवर शहिद होणार्या भारतीय जवानांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याची ही आपल्याला संधी आहे. चिनला एक संदेश देण्याचीही हीच संधी आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेवर थोडाफार तरी परिणाम करण्याची संधी आपल्याला भारतीय नागरिक म्हणून आहे. फक्त एक महिना कोणतीही चीनी बनावटीची म्हणजेच Made in China वस्तू खरेदी न करण्याचे जर भारतीयांनी ठरवलं तर ? चीनी बनावटीची कोणतीही वस्तू न विकण्याचं भारतीय व्यापार्यांनी ठरवलं तर?
बर्याचदा आपल्याकडे No TV Day आयोजित केले जातात. एकाद्या ठराविक दिवशी रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करायचा नाही असे आवाहन केले जाते.
असाच एखादा No Chinese Goods Month पाळायला काय हरकत आहे? विचार करा.. पटलं तर इतरांना पटवा. मेलवरुन, फेसबुकवरुन, WhatsApp वरुन.. कसंही !
नाही पटलं तर खाली मान घालून स्वस्थ बसून रहा. आपल्या स्वस्थ बसण्याने कदाचित येणार्या काळात आपल्याला दूधही चिनमधल्या म्हशींचं प्यायला लागेल !
-- निनाद अरविंद प्रधान
January 18, 2016
मूळची अमेरिकेची असलेली जोडी विल्यम्स हिने जेव्हा खाण कामगारांच्या समस्यांचा अभ्यास सुरू केला तेव्हा तिला खाणीमध्ये केल्या जाणाऱ्या भयानक स्फोटांचे दुष्परिणाम जाणवले. या स्फोटांमध्ये दरवर्षी जगात हजारो बळी जात असूनही प्रमुख राष्ट्रांचे त्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून जोडी विल्यम्सने ‘बॅन लॅण्डमाइन्स’ याच नावाने चळवळ सुरू केली.
November 6, 2017
जेवण करताना ही प्रार्थना नेहमी करा की, ज्याच्या शेतातून माझं जेवण येते त्यांची मुले कधीच उपाशी झोपु नयेत !
July 25, 2017
आपल्या आराध्य देवतेची स्तुती करून तिला प्रसन्न करून कृपाप्रसाद प्राप्त करणे हे कोणाही भक्ताचे उद्दिष्ट असते. स्तोत्र पठण हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रतिवादी भयंकर’ स्वामी अण्णा यांनी मुख्यत्त्वे तोडक वृत्तात (सससस) रचलेल्या या स्तोत्रात श्री व्यंकटेशाचे गुणवर्णन व स्तुती आहे. कृपा किंवा उपकार एखाद्या गोष्टीची परतफेड म्हणून किंवा कारणाविना निर्हेतुक असू शकतात. येथे याच निर्हेतुक कृपेची तसेच आपल्या हातून जे अनेक अपराध, दुष्कृत्ये घडल्रेली आहेत त्याबद्दल क्षमा मागून याचना केली आहे.
June 12, 2020
मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी २१ जून १८३२मध्ये ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. याच काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रे सुरू झाली.
November 16, 2021
या तपासामध्ये अल्ट्रासाऊंड (ध्वनीलहरी) यांचा वापर मुख्यत्वे पोटातील व स्त्रियांच्या गर्भाशय व गर्भामध्ये होणार्या रोगामध्ये होतो व ध्वनिलहरी, क्ष किरणांपेक्षा खूपच सौम्य असल्याने यांचा त्रास गर्भाला अजिबात होत नाही.
October 23, 2010
जे मिळते, जसे मिळते
December 12, 2017
फेसबुकवर आज एक पोस्ट वाचनात आली. निवृत्तीला आलेल्या एका गृहस्थांनी, निवृत्तीनंतर पत्नीसह स्वतंत्र राहण्यासाठी एक छोटा फ्लॅट घेऊन ठेवला होता. मुलाचं त्याच्या मैत्रिणीशी लग्न लावून दिल्यावर ते दोघे पती-पत्नी दोन्ही वेळच्या जेवणासाठी एकत्र येऊन नंतर आपल्या फ्लॅटमध्ये राहू लागले. त्यावर सुनेने विचारले, ‘मला सर्वजण नावं ठेवतील, माझ्या त्रासामुळे तुम्ही स्वतंत्र राहू लागलात म्हणून.
March 16, 2023
जगात अब्जावधी लोक आहेत, परंतु तरीसुद्धा एका व्यक्तीसारखी हुबेहूब दुसरी व्यक्ती असणे शक्य नाही. अगदी जुळ्या मुलांमध्ये देखील सूक्ष्मसा फरक असतोच. सांगायचे तात्पर्य, प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख असते.
August 27, 2006
एखाद्याने प्रगती करतो म्हटले की, त्याच्या हितचिंतकांपेक्षा त्याच्या शत्रूंचीच संख्या झपाट्याने वाढते. शेजारची रेषा मोठी आहे, म्हटल्यावर आपली रेषा त्याच्यापेक्षा मोठी करण्यापेक्षा त्याची रेषा आखूड कशी होईल, असा विचार करणाऱ्यांचीच संख्या आपल्याकडे खूप अधिक आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढेन, असा बाणेदारपणा आता अपवादानेच आढळतो, त्यापेक्षा एखाद्या जळूसारखे कुणाला तरी चिकटून आयुष्यभर त्याचे रत्त* शोषत बसण्यात धन्यता मानणारेच ठायी ठायी आढळतात.
July 26, 2009
Copyright © 2025 | Marathisrushti