(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • देवपूजेतील साधन – नारळ

    देवपूजेतील साधन – नारळ

    श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. नारळ या फळाला भारतीय संस्क़ृतीमध्ये अन्ययसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

    शुभ कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी नारळ फोडण्याचा कुळाचार प्रामुख्याने हिंदू धर्मात दिसून येतो. तांब्याच्या कलशावर आंब्याच्या पानांमधये नारळ ठेवून त्याची पूजा वास्तुशांतीचे वेळी केली जाते. सुवासिनींची ओटी नारळाने भरतात. मान्यवरांचा व कलावंतांचा सत्कार करताना नारळ दिला जातो. देवापु़ढे अक्षता देताना विड्याच्या पानावर नारळ ठेवतात. विशेष म्हणजे देवघरात ठेवलेले नारळ शुभकार्याचे प्रतीक आहे.

    याशिवाय कोकणवासियांना नारळ अतिशय प्रिय असून सागराने आपल्यावर कृपा करावी म्हणून ते सोन्याचाही नारळ त्याला अर्पण करतात. नारळाचे पाणी औषधी असून ते सेवन केले असता बध्दकोष्ठ नाहीसा होतो. देवाला जो नैवेद्य दाखविला जातो त्यातही नारळाच्रा खोबर्‍याचे विविध प्रकार असतात. उदाहरणार्थ गणेशाला आवडणारे मोदक.

    विविध प्रकारच्या भाज्यांमध्येही नारळ किसून घालतात ज्यामुळे भाज्या चवदार होतात. नारळाच्या करवंटीपासूनही अनेक वस्तू बनवतात.

      January 5, 2016


  • नक्षलवादाचे पितृत्व सरकारकडेच!

    1857 च्या उठावाला ब्रिटिशांनी ‘बंड’ संबोधून चिरडले. भारतीयांसाठी ती क्रांती होती. सरकारच्या जुलमी कारभाराविरुद्ध पुकारलेला तो एल्गार होता.

      July 9, 2006


  • भावयुक्त उपासनेला नियमित स्थान

    आपल्या उत्पन्नाचा १०% भाग अलग काढून चांगल्या कार्यासाठी, सत्कर्मासाठी आपण वापरावा आणि ज्यानं आपल्याला हे जीवन, ही सुखं दिलीत त्या भगवंताचे आभार मानावेत. सर्व लोक आपल्या जीवनात भावयुक्त उपासनेला नियमित स्थान देवोत हीच त्या जगताच्या पालन करत्या चरणी प्रार्थना करतो…..

      March 8, 2020


  • इच्छा मरण नाण्याच्या दोन बाजू !

    पृथ्वीच्या जन्मापासून आजतागायत कित्येक जीव जन्माला आले काही विकसीत झाले काही जीवांचे शारिरीक व मानसिक त्या त्या काळानुरूप स्थित्यंतर झाले तर काही नामशेष झाले. उदा.डायनासोर वगैरे. परंतू मानव हा असा एकच प्राणी पृथ्वीवर आहे ज्यात काही फारसा शारिरीक व मानसिक बदल झाला नाही (अपवादात्मक कलीयुगातील मानव अतिशहाणा झालाय) युगानूरू त्याच्या वयोमर्यादेत नक्कीच बदल झाला. सत्युगात ऋषीमुनी हजारो वर्ष जगत होते पण आजच्या कलीयुगात मानवाची वयोमर्यादा सरासरी ६५ ते ७० आहे.

      March 8, 2011


  • ध्येय, भूमिका आणि संपर्क

    मी आता सेवानिवृत्त झालो आहे. पुष्कळदा माझे एकेकाळचे सहकारी माझ्या घरी गप्पा मारायला येतात. अश्याच एका प्रसंगी माझा सहकारी निलय (तो बंगाली असल्यामुळे, ह्या शब्दाचा उच्चार आम्ही निलोय असा करतो) माझ्या घरी आला आणि काही इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने मला विचारले, “सर रोल,गोल आणि कम्युनिकेशन या गोष्टींची आमच्यासारख्या जुनिअर सहकाऱ्याना समजण्याची उपयुक्तता किती आहे ह्याबाबतीत तुमचे काही अनुभव सांगाल का?”

      June 14, 2026


  • शिक्षण क्षेत्रातील दुकानदारी बंद करा !

    सरकारने प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले असले तरी ते देण्यासाठी शाळांचे आणि अन्य सुविधांचे जाळे सरकार उभे करू शकणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. सरकारने या मुलांना शिक्षणाचा हक्क कायद्याने बहाल केला असेल तर त्या हक्काचे जतन करण्याची जबाबदारीदेखील सरकारने घ्यायला हवी. सरकार आपल्या स्तरावर ही जबाबदारी उचलू शकत नाही, हे स्पष्टच आहे आणि म्हणूनच खासगी शिक्षण संस्थांना अनुदान देऊन शाळा स्थापन करण्याची परवानगी सरकार देत असते.

      April 30, 2012


  • आम्हा नित्य दिवाळी

    अशिक्षित ग्राहकाला ‘सिस्टम बंध है’, ‘कनेक्टीव्हीटी नही है’, ‘अकाऊंट इनऑपरेटीव्ह हो गया’, एखादी गोष्ट ऍक्टिव्हेट करून घे असे सांगण्यापेक्षा ‘थोडी देर के लिये मशीन बंद है, बहोत दिनसे इस्तेमाल नही किया इसलिये खाता अभी रुका हुवा है’ वगैरे ‘त्यांच्या’ भाषेत सांगितल्या तर त्या सोप्या वाटतात. बँकेचे नियम कार्यपद्धती युक्तीने मांडाव्या लागतात. 

      April 17, 2023


  • विदर्भ !!!!

    अतिशय हृदयस्पर्शी कविता आहे हि !! मी विदर्भात खूप फिरलो आहे .कित्तेक एकर जमिनीचा मालक सुद्धा वीज आणि पाणी नसल्याने विपन्न अवस्थेत आहे.शेतात विहीर आहे पण विहिरीवर बसवलेल्या पंपावर विजेची जोडणी मिळत नाही. ज्यांच्या कडे पंपाला विजेची जोडणी आहे त्यांना वीज मिळण्यासाठी रात्रभर शेतात जागे राहावे लागते.रात्री फक्त ३ तास पंप चालतो ते सुद्धा मध्य रात्रीनंतर कधीतरी . वीज चालू करण्याची वेळ अनेक वेळा बदलतात.शेतकरी हतबल झाला आहे.जमिनीचा कस चांगला आहे पण सर्व निसर्गाच्या लहरीवर आवलंबून . सर्वच राजकीय पक्षांचे हे अपयश आहे . सरकार लक्ष देत नाही.ठेकेदार ,व्यापारी लुबाडतात.बियाणे सुद्धा बोगस आणि भेसळ असलेले विकले जातेय. जे काय उत्पन्न मिळतंय त्याला भाव मिळत नाही. कधी कधी एकरी ५००० सुद्धा पदरात पडत नाहीत.अस्मानी आणि सुलतानी या दोन्ही संकटांनी विदर्भातील शेतकरी गांजला आहे.हि कविता त्याच परिस्थितीची परिणीती आहे.

    जयश्री खाडीलकर पांडे यांनी फेसबुकवर २ जानेवारी २०१६ रोजी पोस्ट केलेली ही कविता वाचाच !

    "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो "

    चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो
    काळ्या आईच्या पोटात खुडलेला कोवळा गर्भ दाखवतो
    चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो ।।11।।

    कोरडा डोळा , कोरडी विहीर
    कोरड्या राजकारण्यांचे ,कोरडे संदर्भ दाखवतो
    "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।2।।

    वावरात शेतकऱ्याची सत्ता नाही,
    विहिरीत पाण्याचा पत्ता नाही,
    पाच वर्षा पासुन, कनेक्शन साठी केलेला अर्ज दाखवतो
    "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।3।।

    या वर्षी वावरात, पिकांची शाळाच नाही डवरली,
    कि निसर्गानं वावराची, फी च नाही भरली,
    अनुपस्थित पिकांचा, सुनसान वर्ग दाखवतो
    "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।4।।

    बिजवाई घेतली तं,खताची असते उधारी
    पोराला शिकोलं तं ,पोरगी राह्यते कोरी
    दुःखाचा तं उकळा रोज ,सुख वर्ज्य दाखवतो
    "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।5।।

    असे उसने आयुष्य जगण्याचा, फायदा तरी काय,
    एंड्रिन च्या दुकानाकडे , आपोआप वळतात मग पाय,
    जहर खाण्यासाठीही ,काढलेलं कर्ज दाखवतो
    चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो ।।6।।

    योजना नको सांत्वन नको ,नकोच करू हाऊस
    देवा तू फक्त वेळेवर, पाडत जा पाऊस
    माझ्या डोळ्यात लपवलेला मग, निसर्ग दाखवतो
    "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।7।।

    -- चिंतामणी कारखानीस

      January 2, 2016


  • सागरी सुरक्षेत गुणात्मक सुधारणांची गरज

    १७ मे २०१५ला समुद्रात नौदलाच्या बोटीवरून खोल समुद्रामध्ये मच्छिमारांच्या बोटीवरील गोळीबारात सुशांत लुजी (२४) हा खलाशी जखमी झाला .त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘खरिस्ताएल’ या बोटीवरील मच्छिमार बेकायदेशिररित्या समुद्रात टाकलेली जाळी ओढण्याचे काम करीत होते.ओएनजीसी ओइल प्लॅट फॉर्म जवळ रात्रीच्या वेळेस प्रखर लाइट असल्यामुळे जास्त मासे मिळतात.सुरक्षा रक्षकांनी मच्छिमारांना हटकले. नंतर हवेत गोळीबार करण्यात आला.

      May 28, 2015


  • जिंकला तो पैसा !! हरला तो विचार आणि विकास !!!

    मराठी भाषा हळूहळू महानगरपालिकेच्या कारभरातून वगळण्यात येईल आणि तिची जागा हिंदी घेईल आणि मग मुंबई सुद्धा अलगद केंद्रशासित केली जाईल आणि तुला मुम्बई बाहेर घालवले जाईल. त्यावेळेस सुद्धा मराठी माणूस झोपलेला असेल जसा तो आता झोपलाय.

      May 16, 2019