वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पूर्वी दंडात घालण्याच्या दागिन्यात अंगद व केयूर हे दोन दागिने प्रमुख असत. हे अलंकार रत्नजडित सुवर्णाचे असत. यांतल्या काहींचा आकार वेलींसारखा व काहींचा मकरासारखा असून वरची बाजू टोकदार असे. काहीच्या दोन्ही तोंडास सिंहाचे मस्तकही घडविलेले असत .
March 6, 2024
उत्तम आरोग्याची सूत्रे :
स्वास्थ्याच्या दृष्टीने अन्नाप्रमाणेच पाणीसुद्धा केव्हा, किती आणि कसे प्यावे याला फार महत्व आहे, कारण पाणी अन्नपचन, अभिसरण, मल-मूत्रविसर्जन, श्वसन इत्यादी शरीर क्रियांसाठी आवश्यक असते.
पाण्यामुळे शरीराचे तापमान घामाद्वारे नियंत्रित होते, शरीराला टवटवी येते, शौचास साफ होते. लघवी साफ होते म्हणून मुतखडा किंवा इतर मूत्ररोग होत नाहीत.
पाणी कॅलरीविरहित असल्यामुळे लठ्ठ व्यक्तींनी भरपूर पाणी प्यायला हवे. त्यांनी जेवणाच्या अगोदर ग्लासभर पाणी प्यावे त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटेल आणि जेवणात थोडे अन्नाचे प्रमाण कमी होईल.
पाणी पचायलादेखील शरीराला वेळ लागतो म्हणून फ्रीजमधून काढलेले पाणी ताबडतोब पिऊ नये. असे थंड पाणी पचण्यासाठी ५/६ तास वेळ लागतो. शरीराला त्या पाण्याचे तापमान शरीराच्या तापमानाबरोबर आणायला नाहक ऊर्जा खर्च करावी लागते.
कोमट पाणी दीड ते दोन तासात पचते आणि उकळून थंड केलेले पाणी दोन ते अडीच तासात पचते म्हणून असे पाणी केव्हाही हितावह असते.
सकाळी पाण्याबरोबर चमचाभर लिंबाचा रस आणि दोन चमचे मध घेतल्यास लठ्ठपणा कमी होतो.
दिवदभरातून कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी प्यावे, उन्हाळ्यात पाच ते सहा लिटर प्यायला हरकत नाही. उषःपान सोडून एकावेळी मात्र केव्हाही ग्लासभरच पाणी प्यावे.
जेवणानंतर पाणी पिऊ नये, त्यामुळे पाचक स्त्राव पातळ होऊन त्याची तीव्रता कमी होते. परिणामतः अन्नाचे पचन चांगले होत नाही. जेवणानंतर एक ते दीड तासांनी ग्लासभर पाणी जरूर प्यावे.
सर्दी झाल्यावर थंड पाण्याऐवजी गरम पाणी थोडे थोडे प्यावे, अॅसिडिटीचा त्रास असेल तर जेवणाच्या अर्धा तास अगोदर कपभर गरम पाणी प्यावे.
टॉप टीप :
एक लिटर स्वच्छ पाणी २०० मि.लि. राहील इतके उकळावे. याला आरोग्यजल असे म्हणतात. हे पचायला खूप हलके व अग्निवर्धक असते. सर्दी, खोकला, ताप, पोटाचे-पचनाचे विकार असणार्यांसाठी हे फार चांगले असते.
जेवणाची वेळ, मात्रा व पद्धती :
आपण काय खावे हे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे ते केव्हा खावे, किती खावे आणि कोणत्या पद्धतीने खावे यालाही आहे.
भूक लागली खावे हा नियम असला तरी जेवणाच्या वेळा जर निश्चित करून घेतल्या तर साधारणपणे त्या वेळी भूक लागतेच; मात्र मधल्या काळात काही अकरबकर खाऊ नये.
कितीही व्यस्त असलात तरी ठरावीक वेळीच रोज भोजन करण्याचे लाभ अधिक आहेत. आपल्या सोईनुसार सकाळी १० ते १२ व संध्याकाळी ६ ते ८ या वेळात दिवसातून दोन वेळाच जेवावे. वेळी-अवेळी जेवल्यास पोटाचे विकार होतात. रात्रीचे जेवण शक्यतोवर झोपण्याच्या तीन तास अगोदर घ्यावे.
जेवताना चिंता, कामाबद्दलचे विचार बाजूला ठेवून मन प्रसन्न ठेवावे व जास्त बोलू नये. जेवणासाठी कमीत कमी १५ ते २० मिनिटे वेळ द्यावा, घाईत जेवू नये.
जेवणानंतर तीन ते चार तासापर्यंत काहीही खाऊ नये, पाणी मात्र भरपूर प्यावे. अन्न खूप स्वादिष्ट आहे म्हणून प्रमाणाबाहेर खाऊ नये. भुकेपेक्षा नेहमी दोन घास कमीच खावे. अन्न पोषणासाठी खावे, केवळ
स्वादासाठी नाही.
अन्न खूप चावून खावे म्हणजे अधिक लाळ त्यात मिसळली जाईल, ज्यामुळे अन्न पचन तर चांगले होईलच; पण तृप्तीही प्राप्त होईल व तणावमुक्तीही होईल.
गाजर, मुळा, काकडी, टमाटर, कांदा हे पदार्थ कच्चेच खावेत तसेच मोड आलेले धान्यही कच्चेच खावे. जे कच्चे खाता येईल ते शिजवून खाऊ नये व जे भाजून किंवा शिजवून खाता येईल ते तळून खाऊ नये.
लहान मुलांनी तीन-चार वेळा खायला हरकत नाही; पण इतरांनी फक्त दोन वेळाच जेवावे. साठीनंतर एक वेळ जेवण व एक वेळ फलाहार घ्यावा व अठवड्यातून एक दिवस फक्त लिंबू पाण्यावर उपवास करावा.
सकाळी उठल्याबरोबर भरपेट जेवण किंवा हेवी नाश्ता घेऊ नये. रात्री झोपल्यामुळे भोजन पचनात काही कसर राहून जाते, ती पूर्ण करण्यासाठी पोटाला काही वेळ मिळायला हवा.
अर्धे पोट अन्नासाठी, पाव पाण्यासाठी व राहिलेले पाव हवेसाठी मोकळे ठेवावे तेव्हा चलन-वलन चांगले होते आणि अन्न चांगले पचते. मिक्सर पूर्ण भरल्यावर जसा फिरत नाही, अर्धा खाली ठेवावा लागतो तेच तत्त्व पोटालाही लागू होते.
टॉप टीप :
अन्न हे परब्रह्म स्वरूप व ईश्वराचा प्रसाद समजून प्रसन्नता व आदर भावनेतून ग्रहण केल्यास अधिक तृप्ती व आनंद प्राप्त होतो.
January 3, 2015
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
Hot & cold food list
सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
लिंबू - उष्ण
कांदा - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो - उष्ण
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
वांगे - उष्ण
भेंडी - उष्ण
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊस - उष्ण
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर - उष्ण
हळद - उष्ण
कॉफी - थंड
दूध / दही / तूप / ताक / तांदूळ - थंड
उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो .
आयुर्वेदातून संकलन
March 2, 2017
सर्वपित्रीत तृप्त झालेले पितर कोजागिरी ते अष्टमी या काळात पवित्र होऊन कराष्टमीपासून ध्रुवाकडे मार्गस्थ होतात. त्यांना मार्गदर्शनासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून सूर्यास्तानंतर एक प्रहारानंतर ते सुर्योदयापर्यंत घराबाहेर आकाश दिशेने एक तेलदिवा जळता ठेवतात तोच आकाशदीप.
पृथ्वीपासून ध्रुवापर्यंतचे अंतर कापायला आत्म्यांना दहा दिवस लागतात. सतत प्रकाशाने त्यांचे मार्गक्रमण सुकर व्हावे यासाठी या दिवसापासून दिपोत्सवास (दिपावली) प्रारंभ होतो.
October 30, 2016
Cloud Computing and Enterprising क्षेत्रातील जगातील सर्वात मोठया अमेरिकास्थित कंपनी Oracle चा "Oracle Open World" हा सर्वात मोठा आणि जागतिकदृष्ट्या मानाचा कार्यक्रम नुकताच सन्फ्रान्सिस्को येथे पार पडला.
तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक मान्यवरांना या परिषदेत आपले विचार मांडण्यासाठी बोलावण्यात येते.
"आमचे वक्ते हे भविष्याला नवा आकार देणारे लोक आहेत" अशी शेखी मिरवत Oracle या कार्यक्रमासाठी आपले वक्ते निवडते. आणि या वेळी प्रथमच एका भारतीय नेत्याला त्यात आमंत्रित करण्यात आले, त्या क्षेत्रातील धुरंधरांसमोर आपले मत मांडण्यासाठी !
ते नेतेे - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस.
त्या जगाशी तसे पाहता अर्थाअर्थी संबंध नसलेल्या नेत्यास मिळालेले आमंत्रण ही भारत व मुख्यत्वे महाराष्ट्रासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे.
त्या परिषदेचा हा लेखाजोखा -
१९ सप्टेंबर ला अमेरिकन वेळेनुसार सुमारे सकाळी नऊ वाजता परिषद सुरु झाली. मुख्यमंत्र्यांच्याआधी काही वक्त्यांनी आपली मते मांडली. त्यानंतर Oracle च्या CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅट्झ मंचावर आल्या. पुढच्या वक्त्याविषयी बोलायला त्यांनी सुरुवात केली, तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावर आदर झलकत होता.
"मी फेब्रुवारी महिन्यात Make In India Week च्या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले, तेव्हा तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे त्यांचे प्रामाणिक प्रयत्न पाहून भारावून गेले" असे त्या सांगत होत्या. अत्यंत आदर आणि कौतुकाने..
आणि शेवटी सगळे शब्द गुंडाळून , "आता काही क्षणांतच आपल्याला CM यांना ऐकायला मिळेल आणि खरोखर सांगते, मी फारच excited आहे " असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना मंचावर आमंत्रित केले.
माननीय मुख्यमंत्री व्यासपीठावर येण्याआधी महाराष्ट्र सरकारच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी व व्हिजन वर एका लघुपटाद्वारे दृष्टिक्षेप टाकण्यात आला. "आपले सरकार" या app च्या माध्यमातून सर्व शासकीय सेवा एका छताखाली आणण्याच्या प्रयत्नाचे विवरण केल्या गेले. 'People First' या सरकारच्या तत्त्वाचाही उल्लेख करण्यात आला.
तद्नंतर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मंचावर आले, तेच एक वेगळा आत्मविश्वास घेऊन. सर्वप्रथम त्यांनी आपले ठेवणीतले मोहक हास्य करत CEO सॅफ्रा यांचे आभार मानले आणि मग "Brothers and Sisters" - "बंधू आणि भगिनींनो" म्हणत आपल्या भाषणास सुरुवात केली.
आणि त्यानंतर " येथे जमलेल्या सर्व मान्यवरांकडे पाहता, मी क्षणभर विचारात पडलो, की मी येथे का आलो आहे?" अशा जबरी वाक्याने आपले विचार मांडण्यास प्रारंभ केला.
"भारत हा महत्त्वाकांक्षी युवांचा देश आहे. युवा पिढीच भारताची खरी ताकद आहे आणि आता ती योग्य वेळ आली आहे की आम्ही या पिढीस विकासाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून द्याव्यात, आता अधिक वाट पाहण्यात अर्थ नाही" असे बोलून त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला.
Cloud Computing and Big Data Analytics या क्लिष्ट तंत्रज्ञानाचा वापर केल्यास महाराष्ट्रातील तरुणाई व खेड्याखेड्यांवर कसा प्रभाव पडेल, सरकारात अधिकाधिक कार्यक्षमता व पारदर्शिता कशी प्रस्थापित होईल हे सर्व सांगतानाच "तंत्रज्ञान हे तटस्थ असते. ते लिंग, व्यक्ती किंवा कुठल्याही अन्य निकषाआधारे भेदभाव करत नाही." हे अत्यंत प्रगल्भ विधान त्यांनी केले.
"आम्हाला एक प्रतिक्रियाशील, पारदर्शक सरकार प्रस्थापित करायचे आहे, जे तंत्रज्ञानाद्वारे साध्य केल्या जाईल."
"आम्हाला बदल घडवून आणायचा आहे. असा बदल, की राज्याचा प्रत्येक नागरिक सरकारचा भाग असेल आणि आपला सहभागही नोंदवेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने Oracle आमचे हे स्वप्न पूर्ण करेल."
असे सांगत त्यांनी तिथे उपस्थित अन्य मान्यवरांनाही महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर CEO सॅफ्रा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत Oracle च्या सहभागाबद्दल त्यांचे काय मत आहे असा प्रश्न केला.
तेव्हा "आपण एका अशा काळात राहतो जिथे आपण जो विचार करतो, तंत्रज्ञान ते प्रत्यक्षात आणते. आणि अशा प्रकारे माझ्या राज्याच्या हर एक, शहरी किंवा अगदी दूरस्थ ग्रामीण भागातील नागरिकाला माझ्या सरकारशी जोडता यावे, एवढीच माझी Oracle कडून अपेक्षा आहे." हे अत्यंत दूरदर्शी आणि भावनिक विधान त्यांनी केले.
त्याचबरोबर "कोणत्याही परिवर्तनाच्या प्रक्रियेत राजकीय नेतृत्व हे केवळ कल्पनानिर्मितीचे काम करते, तर तंत्रज्ञ ती कल्पना प्रत्यक्षात साकारतात."
असे सांगत त्यांनी Oracle च्या भावी योगदानाचे महत्त्वही अधोरेखित केले.
आणि इतकेच नव्हे तर, MOU signing आधी सॅफ्रा यांना महाराष्ट्र सरकारच्या 'तंत्रज्ञान सल्लागार' मंडळात सहभागी होण्याची विनंती करत मुख्यमंत्र्यांनी आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. CEO सॅफ्रा कॅट्झ यांनी तसे बोलूनही दाखवले.
एकूणच यंदाची Oracle Open World Conference म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी देखील आश्चर्याचा एक गोड, सुखद व आश्वासक असा धक्का होती.
माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची देहबोली, लहेजा, आत्मविश्वास, आणि एकूणच त्यांचे Mannerism स्वतःच हे सगळे काही स्पष्ट करते. जागतिक पटलावर वावरतांना स्वतःला कशा प्रकारे Present करावं हे त्यांना अगदी बरोबर समजतं.
कदाचित अतिशयोक्तीही वाटेल, पण या एकाच परिषदेतून त्यांनी, ते एक जागतिक नेते होण्याच्या पात्रतेचे आहेत अन त्या दिशेने त्यांची वाटचालही योग्यरित्या चालू आहे हे दाखवून दिलंय.
Oracle सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीकडून एवढा आदर व कौतुक प्राप्त करणे, अगदी उच्चविद्याविभूषित तंत्रज्ञांसोबत इतकं लिलया वावरणे, आणि ओघाने भारताची व मुख्यत्त्वे महाराष्ट्र राज्याची शान वाढवणे व त्याचबरोबर विकासासाठी नवनवे व समकालीन उपाय शोधून ते राबवणे,
या साऱ्या गोष्टी श्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या उज्ज्वल व नेत्रदीपक भवितव्याची नांदीच आहेत..
September 28, 2016
मानवाला मानवपण मिळण्यास महत्वाचे कारण ठरली ती भाषा. जगभरात देशानुरूप वेश, संस्कृती व भाषा विकसित झाल्या. संपर्कमाध्यमानुसार भाषेत बदल होत गेले. शब्दमर्यादा पाळता-पाळता त्याचे कालमर्यादेत रुपांतर झाले. वेळ नाही या कारणाने लांब वाक्य, चार-पाच शब्दांचे समुह यांच्या जागी संक्षिप्त रूपे आली. ‘एक चित्र हजार शब्दांच्या बरोबर असते’ या उक्तिनुसार आता चित्रांची चलती आहे. आता ‘इमोजी’ मान्यता पावली आहे. वाक्यरचना, व्याकरण, भावना व्यक्त करणार्या शब्दांची निवड मागे पडू लागली आहे. सांकेतिक प्रणाली रूढ होते आहे.
June 14, 2020
वैदिक कालखंडापासून भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये स्त्रियांचे स्थान महत्वपूर्ण आहे.वैदिक काळातील स्त्रिया शिक्षित असत आणि त्याजोडीने त्या कुटुंबातील त्यांच्या जबाबदा-याही पार पाडत असत. धार्मिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग असे.विश्वावरा आत्रेयी हिचा वैदिक साहित्यात यज्ञकर्त्री असा उल्लेख या दृष्टीने महत्वाचा ठरतो.
January 19, 2019
बरोब्बर अकरा वर्षांपूर्वीची म्हणजे २०१२ सालची गोष्ट. लोकसत्ता दिवाळी अंकासाठी सहाय्यक संपादक प्रवीण दीक्षित यांचा फोन आला, एक काळ गाजवलेले काही स्टार नंतर ‘पडद्याआड’ झाले. ते सध्या नेमके काय करताहेत, कुठे आहेत याबाबत अनेकांना कुतूहल आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे राखी! तिची मुलाखत हवीय…
January 26, 2024
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिमिअरला राजकपूर व कृष्णाकपूर आले होते. चित्रपट पाहिल्यावर राजकपूर एकदम गप्प झाला. काही बोलेना. घरी आल्यावर कृष्णाकपूरने गप्प राहण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला “हाच तो चित्रपट आहे जो मला बनवायचा आहे” म्हणजे आवाराच्या देश विदेशातील तुफान यशानंतरही त्याला या चित्रपटाबद्दल इतका आदर होता.
September 3, 2022
कोटीराङ्गदरत्नकुण्डलधरे कोदण्डबाणाञ्चिते ।
शिञ्जन्नूपुरपादसारसमणीश्रीपादुकालंकृते
मद्दारिद्र्यभुजंगगारुडखगे मां पाहि मीनाम्बिके ॥ ३॥
आई जगदंबेचे अद्भुत वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
कोटीराङ्गदरत्न- कोटी अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे, अत्यंत मौल्यवान रत्नांनी घडविलेले अंगद म्हणजे बाजूबंद,
कुण्डलधरे- कुंडलांना धारण करणाऱ्या, कोदण्डबाणाञ्चिते- कोदंड अर्थात धनुष्य. हे भगवान विष्णूंच्या धनुष्याचे नाव. दंड अर्थात सत्ता. अधिकार. ज्यावर कोणाचाही दंड चालत नाही ते कोदंड. आई जगदंबेची देखील क्षमता तशीच असल्याने तिच्या हातातील धनुष्याला ही कोदंड म्हटले आहे.
हे कोदंड आणि बाण धारण करणाऱ्या,
कोकाकार- कोका अर्थात पांढऱ्या कमळाच्या उमलण्यास सिद्ध असणाऱ्या टपोऱ्या कळीप्रमाणे आकार असणाऱ्या,
कुचद्वयो- स्तन युगुलावर,
परिलसत्प्रालम्बहाराञ्चिते- रुळणाऱ्या मोत्यांच्या माळांनी अत्यंत सुंदर दिसणाऱ्या,
शिञ्जन्नूपुर- मनोहरी किंकिंण करणाऱ्या पैजणरूपी,
पादसारस- सारस पक्षी जसा कमळावर बसून आवाज करतो तशी ती पैंजणे चरण कमला वर ध्वनी करीत आहेत अशी,
मणीश्रीपादुकालंकृते- रत्नजडित सौंदर्याने संपन्न खडावा चरणात धारण करणाऱ्या, रत्न आणि सोने यांचे पैंजण देखील राणी शिवाय कोणाला वापरण्याची परवानगी नाही. संपूर्ण विश्वाची महाराणी असणारी आई जगदंबा पैंजणच नव्हे तर खडावा देखील रत्नजडित वापरते
आई जगदंबेच्या अद्वितीय वैभवाचे वर्णन करताना आचार्यश्री एका वेगळ्याच भूमिकेला आपल्यासमोर ठेवतात. येथे त्यांनी वापरलेली उपमा अत्यंत मनोज्ञ आहे. आचार्य श्री म्हणतात,
मद्दारिद्र्यभुजंगगारुडखगे - माझ्या दारिद्र्य रुपी सर्पा करिता गरुड रुपी पक्षी असणाऱ्या, अर्थात जसे गरुडाला पाहताच सर्प पळून जातो तसेच तिच्या दर्शनाने संपूर्ण दारिद्र्य लुप्त होते अशा सकल दारिद्र्य विनाशिनी,
मां पाहि मीनाम्बिक- हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 27, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti