वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

मगर ही चार पायांवर चालते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण, दोन पायांवर चालणाऱ्या मगरी तुम्हाला माहीत आहेत का? अशा मगरी अस्तित्वात होत्या. परंतु अलीकडच्या काळात नव्हे, तर अकरा ते बारा कोटी वर्षांपूर्वी – ज्या काळात डायनोसॉरचं राज्य होतं त्याकाळात.
February 15, 2022
पशुं वेत्सि चेन्मां तमेवाधिरूढः
कलंकीति वा मूर्ध्नि धत्से तमेव |
द्विजिह्वः पुनः सोऽपि ते कंठभूषा
त्वदंगीकृताः शर्व सर्वेऽपि धन्याः ‖ १२ ‖
कोणत्याही परिस्थितीत आपण माझा स्वीकार करावा. अशी जणू काही भगवान शंकरांना गळ घालताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज एका वेगळ्याच पद्धतीचा वापर करीत आहेत.
ते म्हणतात भगवंता कदाचित आपल्याला योग्य वाटत नसेल. पण ज्या ज्या कारणांनी मी योग्य नाही असे वाटते त्या गोष्टींनाही आपण पावन करीत असता. जसे,
पशुं वेत्सि चेन्मां- आपण मला पशु समजत असाल, अर्थात कोणत्याही प्रकारची साधना, उपासना न करणारा जड जीव समजत असाल, तर
तमेवाधिरूढः- आपण त्यावर बसता. आपला नंदी असाच पशू नाही का?
त्या पशूच्या उद्धार केला तसाच माझाही उद्धार करा.
अन्य अवगुणांचेही असेच साधर्म्य दाखवतांना आचार्य श्री म्हणतात,
कलंकीति वा - माझ्या पाप कृतींमुळे मी कलंकित आहे असे वाटत असेल तर,
मूर्ध्नि धत्से तमेव - तसा डाग असणाऱ्या चंद्राला आपणच डोक्यावर धारण करता.
द्विजिह्वः पुनः- माझ्या बोलण्यात आणि वागण्यात वेगळेपणा आहे म्हणून मी दुतोंड्या आहे असे आपल्याला वाटत असेल तर,
सोऽपि ते कंठभूषा- तशा दोन जिभा असणारा नागराज आपल्या कंठाचे भूषण आहे.
त्वदंगीकृताः
शर्व सर्वेऽपि धन्याः - हे शर्व अर्थात शरणागतांच्या दुःखाची हिंसा करणाऱ्या हे भगवंता, तू अंगीकार केलेली प्रत्येक गोष्ट धन्य होते. अन्य समयी क्षुद्र असणाऱ्या अशा सर्व गोष्टींनाही विश्ववंद्यत्व प्राप्त होते.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 21, 2020
मकरसंक्रांतीला पूर्वी अनेकजण शुभेच्छा पत्रे पाठवीत असत.त्याला “भेटकार्ड” म्हटले जाई. वर एखादे फुलाचे चित्र, आत हलव्याचे ८ / १० दाणे असलेले कागदी पाकीट आणि ” तिळगुळ घ्या, गोड बोला. मकरसंक्रांतीचे अभिष्टचिंतन !” असा मोजकाच मजकूर असे. आता ते जवळपास बंदच झाले आहे.
January 19, 2018


काही मराठी आडनावे इतकी विचित्र आणि लाजिरवाणी असतात की, ती, त्या कुटुंबांनी का स्वीकारली, कोणत्या कारणामुळे रूढ झाली आणि पिढ्यानपिढ्या कशी वापरात ठेवली हे फार मोठे गूढ आहे. अशी आडनावे धारण करून समाजात वावरणार्या मुला-मुलींना विशेषतः विद्यार्थी/विद्यार्थीनींना आणि लेकी-सुनांना टीका, निंदा, हेटाळणी आणि टिंगल यांना सतत तोंड द्यावे लागते, मनस्ताप सहन करावा लागतो अशी अडचणीची आडनावे बदलण्याची आवश्यकता आहे. ती आडनावे बदलून घ्यावीशी वाटण्याची प्रेरणा समाजात रुजली पाहिजे. समाजासाठी आडनाव धारण करून, समाजात वावरावयाचे असल्याने, विक्षिप्त आडनावे हा सामाजिक कलंक आहे असे मी मानतो आणि तो पुसण्यासाठी, धुवून काढण्यासाठी पुरोगामी बदलत्या दृष्टीकोनातून उपाय योजायला हवेत, प्रयत्न करायला हवेत. कायदेशीररित्या नावात/आडनावांत बदल करून घेणे हा प्रमुख आणि प्रभावी उपाय आहे.
February 25, 2018
एग अल्युमिनियम, गम डीप एच, वॉटर डीप एच, पीएस फ्लेटस,सीटीपी इत्यादी पद्धतींनी फ्लेटस तयार करता येते. ह्यापैकी काही ठिकाणी वॉटर डीप एच ही पद्धत लहान फ्लेट्स बनविण्यासाठी वापरतात. बाकी पद्धतींपैकी फक्त पीएस फ्लेट्स व सीटीपी आता वर्तमानपत्रात वापरल्या जातात.
May 26, 2023
१९८६ साली इस्लामपूरला आल्यावर, ति. दादांना (कविवर्य सुधांशू) यांना कळविले. पुन्हा १९८७ पासून आम्ही उभयता औदुंबरला साहित्य संमेलनाला जायला सुरुवात केली.
January 10, 2023
जस्त (Zinc) हा एक निळसर-पांढरा, हलकासा ठिसूळ आणि गंजरोधक रासायनिक धातू आहे, झिंक म्हणजे जस्त हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याची रासायनिक संज्ञा (Zn) आहे. त्याचा अणुक्रमांक ३0 आहे. जस्त (Zinc) हा आवर्त सारणीतील एक संक्रमण धातू (Transition Metal) किंवा रासायनिक मूलद्रव्य आहे.
September 28, 2026
आपल्याजवळ काय नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे, त्याचा आपण आपल्या विकासाठी कसा वापर करू शकतो हे उचित ठरणार नाही का? एक पर्यटनस्थळ निर्माण करणे म्हणजे किमान 100 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे होय. हा झाला प्रत्यक्ष रोजगार. यापेक्षाही अप्रत्यक्ष रोजगार तर अमाप असतो.
April 21, 2023
सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?
हा प्रश्न एकदा मला पडला. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा विचारांची गाडी सूर्यास्तापाशी येऊन थांबली.
वो हुआ कुछ इस प्रकार...
एकदा समुद्रकिनारी फिरताना, पंधरा वीस कावळे काहीतरी "फिस्ट" चा आनंद मजेत घेत होते. जवळ जाऊन बघितले तर तो एक मेलेला कुत्रा होता. खूप घाणेरडा वास येत होता. बहुतेक तीन चार दिवसापूर्वी मेलेला असावा. किडे पण पडले होते. पण कावळ्यांसाठी ती दावतच होती. निरीक्षणाअंती असे दिसले, सर्वजण मजेत तो मेलेला, कुजलेला कुत्रा खात होते. म्हणजे अस्वच्छ, शिळे, नासलेले, कुजलेले खाऊ नये, हे पथ्य ते पाळत नव्हते. तरीही ते निरोगी दिसत होते. कारण त्यांचा नेहेमीचा आहार पण असलाच असतो. पण सगळे अगदी एकाच आकाराचे दिसत होते. एकही बारीक नाही, एकही जाड नाही.
असे का ? असे स्वतःलाच विचारले, तेव्हा असे लक्षात आले की, कावळे सूर्योदयापुर्वी उठतात, खायला सुरवात करतात, कोणत्याही प्रकारचे पथ्य न पाळता खातात. कोणताही विचार न करता खातात, खाऊन झाल्यावर सुद्धा विचार करत नाहीत, की मी हे का खाल्ले ? हे असे खाऊन सुद्धा सगळे पचवतात. आणि त्यांच्या अंगावर चरबीचा अंशही शिल्लक रहात नाही !
कसा राहील आणि कशाला त्या कावळ्यांचा आकार बदलेल? जर खाल्लेलं सर्व अन्न पचवायला पुरेसा वेळ दिला तर !
कावळ्यांची सूर्योदयाला काव काव सुरू होते ती अगदी सूर्यास्त होईपर्यंत ! मग कावळ्यांच्या पोटात कितीही कावळे ओरडले तरीही...
त्यानंतर खाव खाव अजिबात नाही. अपवादाला पण नाही.
हे सगळे कावळे असे का वागतात, असा प्रश्न स्वतःला विचारल्यावर लक्षात आले, की कावळ्यांच्या शाळेत फक्त त्याचीच सत्ता चालते. त्याचाच नियम सर्वत्र पाळला जातो. त्याच्या शब्दाबाहेर कोणीही जात नाही.
सगळे कावळे फक्त त्याचेच ऐकतात. फक्त कावळेच नाही तर चिमण्या, पोपट, कबूतर आणि सर्व पशुपक्षी हाच एकमेव वैश्विक नियम पाळतात, सुर्योदय ते सुर्यास्त खायचे आणि सुर्यास्त ते सुर्योदय खाल्लेलं पचवायचे !
त्यानेच सांगितले आहे ना, "अहं वैश्वानरो भूत्वां..... " मीच तो जाठराग्नि आहे. तुम्ही चारही प्रकारचे अन्न खाल्लेत तरी ते पचवायचे काम माझे आहे.अन्न खाण्याची जबाबदारी तुमची आणि पचविण्याची चिंता तुम्ही करू नका, ती जबाबदारी पूर्णतः माझी. फक्त प्रत्येक वेळी एकच नियम पाळा, जो वैश्विक नियम मी आखून दिला आहे. तो म्हणजे सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत मनसोक्त खावे. आणि नंतर सुर्यास्त ते सुर्योदय या वेळी खाल्लेलं पचवायला वेळ द्यावा.
या सुर्यास्ताच्या वेळेला येऊन थांबल्यानंतर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले........
सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.02.2017
February 28, 2017
शेतीक्षेत्रातील अनिश्चिततेवर तसेच आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी शेतकर्यांना कर्जाचा आधार घ्यावा लागतो. त्यादृष्टीने पीककर्ज महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर या वर्षी राज्यात पीककर्ज वाटपाचे मोठे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शिवाय यंदाच्या खरीप हंगामात पीककर्जाची रक्कम २० टक्क्यांनी वाढवून मिळणार आहे. याबरोबरच घेतलेले आणखी काही निर्णय शेतकर्यांसाठी दिलासादायक ठरणार आहेत.
June 24, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti