वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दि. ३० मेला १२वी एचएससी बोर्डाचा निकाल लागला. त्या अगोदर काही दिवस आयसीएसई बोर्डाचा निर्णय आला व त्याही अगोदर काही दिवस सीबीएसई बोर्डाचा रिझल्ट लागला. एकाच १२वीचे तिन तिन वेगळे रिझल्ट तिन वेगवेगळ्या दिवशी लागले.
June 1, 2017
श्रीरामाचा अवतार
दुष्टांचा करण्या संहार
जन्म घेतला पृथ्वीवर
परमेश्वरानी ||१||
रामासी लाभले मोठेपण
तयाठायीं तन मन धन
अर्पिती सर्व भक्तजन
प्रेमभरे ||२||
थोर ग्रंथ रामायण
त्यातील जन्मकथा निवडून
करीत असे अर्पण
तुमचेसाठीं ||३||
लंकाधीपती रावण
होता शिवभक्त महान
उन्मत्त झाला वर पावून
त्रास देई सर्वाना ||४||
युद्ध केले स्वर्गासी
बंदी केले देवांसी
छळूं लागला तयांसी
दुष्टपणानें ||५||
रावणाच्या त्रासा पोटीं
देवांच्या मुक्तीसाठीं
अवतार घेई जगत् जेठी
श्रीराम जन्म घेऊनी ||६||
आयोध्येचा दशरथ राजा
आनंदी होती प्रजा
सुखी बघण्यात मजा
त्यास वाटे ||७||
एक दुःख होते त्यास
पुत्राविना जात दिवस
पुत्र प्राप्त करण्यास
प्रयत्न केले बहूत ||८||
राजा जाई वशिष्ठ गुरु कडे
घालूनी त्यास साकडे
पुत्राविना वंश न वाढे
मार्ग सुचवावा ||९||
वशिष्ठ गुरु सुचविती
यज्ञ करण्या सांगती
पुत्रकामेष्टी यज्ञ महती
आगीच असे ||१०||
गुरुंचा आशिर्वाद घेऊनी
राजा निघाला तेथून
संकल्प केला दशरथांनी
पुत्रकामेष्टी यज्ञाचा ||११||
श्रृंगऋषी महान
होते तप सामर्थवान
विनवितसे जाऊन
त्यांचे आश्रमी ||१२||
पाद्यपुजा त्यांची करुनी
भक्तिभावे विनवूनी
यज्ञासाठीं पाचारण करुनी
तयासी बोलावले ||१३||
मंडव घातला भला
यज्ञाचा भव्य सोहळा
ऋषीगण ब्राह्मण सगळा
यज्ञासी जमती ||१४||
यज्ञांत आवाहन केले
सर्व देव निमंत्रिले
हविर्भाव सर्वासी दिले
श्रृंगऋषीनें ||१५||
स्पष्ट मंत्रोपचार म्हणून
सर्व ऋषी एकसूर धरुन
अग्नीसी टाकती हवन
राजा दशरथ ||१६||
प्रसन्न झाली यज्ञदेवता
पायस कलश हातीं देता
समान भाग राण्यांस वाटता
पुत्र प्राप्त होई ||१७||
दशरथाच्या राण्या तीन
कौसल्या सुमित्रा नि कैकयी लहान
आनंदी झाल्या पायस बघून
यज्ञाचा प्रसाद ||१८||
कैकयी बसली रुसून
पट्टराणी मी लहान असूनी
प्रथम भाग कौसलेस देवून
अपमान माझा होई ||१९||
प्रसाद घेवूनी बैसली
मनीं विचार करुं लागली
तत् क्षणी एक घार आली
प्रसाद जाई घेऊन ||२०||
सर्वजण होती चकीत
कांही समजण्याचे आंत
एक भाग घार नेत
आकाशी उडाली ||२१||
कैकयी झाली दुःखी
शब्द निघेना मुखी
प्रसंग ओडावला एकाएकीं
तिचेवर ||२२||
आपल्या प्रसादातील भाग
देवून कैकयीस सांग
सोडून द्यावा तुझा राग
विनवितसे दोन्ही राण्या ||२३||
चैत्रशुद्ध नवमीला
राम जन्म झाला
कौसल्या मातेला
आनंद होई त्रिभुवनी ||२४||
सुमित्रेचा लक्ष्मण
कैकयीस भरत शत्रुघ्न
चार पुत्र मिळून
पितृत्व दिले दशरथासी ||२५||
आदर्श जीवन जगला
पितृआज्ञे वनवास सोसला
मारिले दुष्ट रावणाला
यशस्वी केले रामराज्य ||२६||
रामाचा महीमा थोर
परमेश्वराचा तो अवतार
भक्तांचा करी उद्धार
त्याचे आशिर्वादे ||२७||
एक पत्नी, वचनी, बाणी
सत्य आणि प्रेमळ वाणी
अद्वितीय गुणांच्या खाणी
रामासी ठरवी पुरुषोत्तम ||२८||
रामाचे जीवन भव्य
आदर्शमय ते काव्य
दाखवोनी जगाला दिव्य
ठाव घेई सर्वा मना ||२९||
रामनामी मोठेपण
जाईल तो उद्धरुन
संकटे जात निघून
आठवण येता त्याची ||३०||
रामरक्षा स्तोत्र पठण
करी तुमचे देह रक्षण
नित्य नियमें वाचन
मनोभावें ||३१||
" शुभं भवतु "
डॉ. भगवान नागापूरकर
५-०१११८३
January 4, 2018
१)शरद ऋतुमध्ये शरीरात पित्त वाढते त्यामुळे ह्या ऋतूत तुप सेवन करावे.
२)उन्हाळ्याच्या दिवसात रात्री तुपाचे सेवन केल्यास फायदा होतो.
३)हिवाळयात तुप दिवसा सेवन करणे चांगले.
४)जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तूप जेवणा सोबत घ्यावे.
५)अजीर्णाचा त्रास असताना तुप सेवन करू नये.
६)तुपाचा वापर करत असताना नियमीत गरम पाणीच वापरावे.
तुप कोणी खाऊ नये:
स्थूल मेदस्वीव्यक्ती,आमवात,भुकनसणे,
अजीर्ण,जुलाब व कफाचे विकार असल्यास तुप सेवन करू नये.
तूपसेवनाचाअतिरेक केल्यास,मळमळ,
उल्टी,जुलाब व शरीरात अवास्तव चरबी वाढणे अशा तक्रारी उद्भवू शकतात.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 24, 2017
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
Hot & cold food list
सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
लिंबू - उष्ण
कांदा - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो - उष्ण
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
वांगे - उष्ण
भेंडी - उष्ण
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊस - उष्ण
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर - उष्ण
हळद - उष्ण
कॉफी - थंड
दूध / दही / तूप / ताक / तांदूळ - थंड
उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो .
आयुर्वेदातून संकलन
March 2, 2017
हाडांच्या डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला तर्हेतर्हेचे एक्स-रे काढायला सांगितले जाते. यामध्ये फ्रॅक्चर असल्यास त्या-त्या भागांचे एक्स-रे येतात. परंतु पडल्यावर रुग्ण परस्पर चांगल्या एक्स-रे क्लिनिकमध्ये त्वरित जाऊनही हे एक्स-रे काढू शकतो. डॉक्टरांच्या चिठ्ठीसाठी अडून न राहता क्ष-किरण तज्ञाला दाखवून योग्य एक्स-रे होऊ शकतात. परंतु दुसरी दुखणी उदा.- सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासाठी शक्यतो हाडांच्या डॉक्टरकडून आधी तपासून घ्यावे व मगच एक्स-रे काढावे.
September 14, 2010
‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ सारखी गावागावातल्या भिंतींवर ‘शोले न पाहिलेली अभागी व्यक्ती कळवा आणि लाख रुपये मिळवा’ अशी जाहिरात दिल्यास जाहिरातीला शून्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता शेकडा शंभर टक्के आहे.
March 3, 2025
बाभळीच्या झाडावरील वसंत बापट यांची ‘बाभूळ झाड’ कविता खूप गाजली. महाराष्ट्राच्या अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचा शेवट या कवितेने केला आहे. बाभळीच्या कणखरपणाचे वर्णन ही कविता इतक्या चपखलपणे करते की अनेकांना रांगड्या बापाचे दर्शन होते. कणखर मनाने, आपले दु:ख आपल्या मनात ठेवत, कुटुंबाची बारा महिने काळजी घेणारा बाप या कवितेत वर्णन केला आहे.
September 23, 2022
मधुमेहींनुसार हा विकार कर्करोगापेक्षा धोकादायक आहे. या विकाराने तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकत नाही. ज्यांनी आपले आयुष्य चपाती, पराठा, आमटी आणि भात खाण्यात घालवले आहे, ते अचानक काहीच खाऊ शकत नाहीत. आयुष्यात झालेल्या या नव्या बदलांमुळे खूप मानसिक समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरासाठी काही पदार्थ न खाणे हेच योग्य आहे, हे स्वीकारण्यास वेळ लागतो. कारण त्यांचे स्वादुपिंड इन्सुनिलची निर्मिती करणे थांबवते. शरीरात केवळ ग्लुकोज (शर्करा) तयार होत असल्याने अनेक समस्या उद्भवतात. आपण या लक्षणांना मधुमेह असे म्हणतो. मूळात स्वादुपिंडामधून होणारा स्त्राव हा यकृतातर्फे नियंत्रित केला जातो, म्हणूनच मधुमेह हा यकृताचा विकार आहे. असे काही पदार्थ आहेत, जे यकृताच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणतात. कडीपत्त्यामध्ये खूप चांगले गुणधर्म असतात. दिवसातून तीनवेळा कडीपत्त्याची ४-५ पाने खाल्ली तर यकृताच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते. सकाळी उठल्यावर अर्धा चमचा तुळशीच्या बिया, मोड आलेली कडधान्ये, दही आणि तूप खाल्याने यकृत अधिक कार्यक्षम होते. मधुमेहींनी साखर, दूध, प्रिझर्व्हेटिव्हज (पदार्थ नासू नयेत, यासाठी घालण्याचा पदार्थ) आणि अधिक मेद असलेले पदार्थ टाळावेत. मधुमेही भात, बटाटा आणि केळे इत्यादी खाऊ शकतात, असे शेकडो गैरसमज मधुमेहींच्या आहाराबद्दल आहेत. पण हे पदार्थ योग्यवेळी आणि योग्य संयोगासह खाल्ले तरच चालू शकतात. सुमारे तीन तासांची भूक भागेल, असा आरोग्यदायी न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण आहार मधुमेहींनी घ्यावा. क्रॅशन डाएट (लवकर परिणाम मिळविण्यासाठी केलेले आहार नियोजन) करू नका, कारण ते जास्त अपायकारक ठरू शकेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मधुमेहींसाठी पाककृती
गव्हाच्या दलियाचा उपमा
साहित्य- २ वाट्या दलिया, १ वाटी खोवलेला नारळ, मीठ, १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, १ बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टी. स्पू. गरम मसाला, २ हिरव्या मिरच्या, ४-५ लसणाच्या पाकळ्या आणि १ टी. स्पू. साखर.
कृती - हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट बनवावी. दलियामध्ये चार वाट्या पाणी, मीठ-मिरची लसूण पेस्ट, गरम मसाला आणि साखर घालावी. हा दलिया कुकरमध्ये शिजवून घ्यावा. शिजल्यावर दलियात खोवलेलं नारळ आणि थोडं पाणी टाकून तो वाफवून घ्यावा. दलियाचा उपमा वाढताना त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मशरूम बार्ली रिसोटो
साहित्य- १ कप भिजवेलेली बार्ली, १ टीस्पून ऑलिव्ह तेल,१ चिरलेला कांदा,१/२ कप चिरलेली लीक (कांद्यासारखी फळभाजी), १ लवंग, बारीक तुकडे केलेली लसूण,काही स्प्रिग्स रोसमेरी पाने,काही स्प्रिग्स थीम पाने, ३ कप भाज्यांचे स्टॉक (पनीर पाणी), १ टीस्पून चिली फ्लेक्स,टोबॅस्को सॉसचा एक डॅश, स्वादानुसार मीठ आणि काळी मिरी पावडर.
कृती:- जाड तळ असलेल्या कढईत ऑलिव्ह तेल तापत ठेवा. त्यात कांदा, लसूण, लिक्स घालून परतवा. त्यानंतर त्यात मशरूम घालून व्यवस्थित परतवा. आता त्यात बार्ली आणि स्टॉक घालून व्यवस्थित मिश्रण करा. कढई झाकून ठेवून हे मिश्रण सुमारे १० मिनिटे शिजू द्या. अधूनमधून पळी फिरवा. आवश्यकता असल्यास थोडा अजून स्टॉक घाला. बार्ली शिजल्यावर त्यात टोबॅस्को, परमेसन (एक प्रकारचे पनीर), चिली फ्लेक्स, रोझमेरी, थाइम, मीठ आणि काळी मिरी घाला. त्याचे व्यवस्थित मिश्रण करा आणि त्यावर लसणाची पात घालून वाढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
लिंबू आणि कोथिंबीरीचे सूप
साहित्य- स्टॉकसाठी लेमन ग्रासचे दोन तीन धुतलेले तुकडे, उभ्या चिरलेल्या 1-2 लाल मिरच्या, इतर घटक- १/४ कप गाजराचे काप, १/४ कप मशरूमचे काप, १/४ कप बारीक चिरलेला कोबी, २ चिरलेल्या कांद्याच्या पाती,मीठ आणि काळी मिरी पावडर स्वादानुसार.
कृती:- लेमन ग्रास आणि मिरच्या ३ कप पाण्यात टाकून १५ मिनिटे उकळू द्या. हे मिश्रण गाळून बाजूला ठेवून द्या. थोडेसे पाणी घालून कांद्याची पात परतवून घ्या. त्यात कोबी, मशरूम आणि गाजर घालून 2 मिनिटे शिजवा. त्यात स्टॉक ओतून भाज्या मऊ होईपर्यंत उकळा. त्याच्यासोबत मीठ, काळी मिरी पावडर आणि लिंबू देऊन कोमट स्थितीत वाढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कोबीचे रोल
साहित्य- कोबीची ५-६ पाने,एक कप बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, फरस्बी, फ्लॉवर, मटार),अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप टोमॅटोची ग्रेव्ही, २५ ग्रॅम पनीर/ मोड आलेली कडधान्ये, २ टीस्पून तेल,मीठ आणि मिरी पावडर स्वादानुसार.
कृती:- पाण्यात मीठ टाकून कोबीची पाने १ मिनिटापर्यंत शिजवून घ्या. पाणी पूर्ण काढून टाका.
तेल तापवा. काही सेकंद कांदा परतवा. त्यात हिरव्या मिरच्या घालून पुन्हा एकदा काही सेकंद परतवा. त्यात भाज्या, मोड आलेली कडधान्ये, मीठ आणि मिरी पावडर घाला. भाज्यांचे हे मिश्रण कोबीच्या कोबीच्या प्रत्येक पानावर ठेवा, वरून थोडीशी टोमॅटोची ग्रेव्ही घाला. प्रत्येक पान गुंडाळून घ्या आणि ते तूप लावलेल्या बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. शिल्लक राहिलेली टोमॅटो ग्रेव्ही उकळून घ्या आणि ती रोल्सवर ओता.. ओव्हनमध्ये 225 अंश सेल्सिअस तापमानावर 10 मिनिटे ठेवा आणि गरगरम खायला द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
राजगिरा डोसा
घटक - रात्रभर भिजवून ठेवलेला 1/2 कप राजगिरा, १/२ कप चणा डाळ ४-६ तास भिजवलेली, १-२ हिरव्या मिरच्या, बारीक तुकडे केलेल्या (आवश्यकता असल्यास) स्वादानुसार मीठ, दीड टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,शिजविण्यासाठी तेल.
कृती:- राजगिरा, चणाडाळ, हिरव्या मिरच्या आणि मीठ एकत्र करून त्याचे मिक्सरमध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून मिश्रण करून घ्यावे. ते बाऊलमध्ये काढून त्यात कोथिंबीर घालावी आणि व्यवस्थित मिसळून घेऊन, डोसा घालण्यासाठी योग्य असे मिश्रण तयार करावे.
नॉन स्टिक तव्यावर पातळ डोसे घालावेत. हिरवी चटणी आणि सांबार यांच्यासह ते खायला द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
May 5, 2017
साद येता माहेरची.. याद ही वृंदावनाची… कानी गाज घुंगराची… मन जाई माहेरी ।।१।।
November 18, 2019
लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 3
लॅबच्या रिपोर्टच्या मागील बाजूला एक वाक्य अजून छापलेले असते.
Individual laboratory investigations are never conclusive, but should be used along with other relevant clinical examinations to achieve final dignosis.
त्याचा भावार्थ असा की, आम्ही दिलेले हे तपासणीचे रिपोर्ट हे कदापि अंतिम निदान असत नाही. रुग्ण जी लक्षणे सांगत असतो, त्यातील लक्षणाबरोबर हा रिपोर्ट अभ्यासून पहावा. आणि त्यानंतरच अंतिम निदान करावे.
याचा दुसरा सरळ अर्थ असा होतो, जिवंत रुग्ण जी लक्षणे सांगतोय ती, निर्जीव यंत्र सांगत असलेल्या रिपोर्टपेक्षा, जास्त महत्वाची असतात. कोणत्याही यंत्रावर पूर्णपणे विसंबून राहू नका. अहो साधा वजन काटाच घ्या ना, चार वजन काट्यावरचे आपलेच वजन वेगवेगळे येते. रेल्वे स्टेशनवरच्या चकाकत्या मशीनमधले वजन वेगळे, बस स्टॅन्ड वरचे वेगळे, रेल्वेच्या ब्रीजवरील एक रूपयातले वजन वेगळे, दवाखान्यातले वेगळे, जीम मधल्या काट्यावरचे वेगळे. असे का होते ? प्रत्येक मशीनमधले हे तांत्रिक दोष असतात. कुणाची स्प्रिंग जुनी असते तर कुणाचा सेल संपत आलेला असतो, कुणाचा बॅलन्स गेलेला असतो, तर कुणाचा पाया पक्का नसतो.
पण वजन करणाऱ्याचं काय ? त्याचं वजन तर बदलत रहातं ना !
यंत्र जेवढं मोठं तेवढी त्यातली गुंतागुंत जास्त.
बरं हे कोण सांगतंय तर, ज्या लॅबमधे आपण तपासणीसाठी जातो, त्या लॅबला असलेली कायदेशीर बंधने सांगत आहेत. जर चुकुन कोणी या दिलेल्या रिपोर्टविरोधात कोर्टात तक्रार वगैरे करायला जाणार असेल तर, त्याचाही काही उपयोग होणार नाही. कारण 'कंडीशन ऑफ रिपोर्टींग'मध्ये आणखी एक वाक्य लिहिलेले असते.
"This medical dignostic report is not valid for medico legal purposes."
आहे ना गंमत ?
आश्चर्य वाटण्यासारखे आणखी एक विधान त्यावर लिहिलेले आढळते...
It is presumed that....
हे गृहीत धरले आहे, (काय? )
The test performed on the specimen belongs to the patients name or identified.
की, हा रिपोर्ट त्याचा आहे, ज्याचे नाव त्या सॅपलच्या बाटलीवर लिहिलेले आहे, ( म्हणजे त्याचेच असावे, असे वाटते. ) नक्की सांगता येणार नाही, की ते रिपोर्ट त्याचेच असतील.
दिलेल्या रिपोर्टमधे एवढी संदिग्धता का ? एवढासुद्धा विश्वास ठेवायचा नाही का ?
मग विश्वास नेमका कोणत्या यंत्रावर ठेवावा ?
समर्थ म्हणतात,
"या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही"
हे यंत्र ज्याने निर्माण केले, तो परमात्मा
आणि ज्याच्याकडे शरीर, मन इंद्रियांसह, सांभाळायला दिले, तो अंतस्थ आत्मा, यांच्यावरच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.02.2017
February 17, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti