वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हा नाथपंथी डवरी गोसावी समाज अतिशय मवाळ आहे.. गावोगावी फिरून भिक्षुकी करून पोटाची खळगी भरणे एवढाच उद्योग त्यांना ठाऊक.. शिक्षणाच्या बाबतीतहि मागास असलेला हा समाज आधुनिकतेच्या मुख्य प्रवाहापासुन बरेच अंतर लांब आहे.. त्यामुळे या समाजाचे एकिकरन तर लांबच परंतु या समाजाचा कधिहि आपल्या मागण्यांसाठी कुठला मोर्चा अथवा समाजास हानी पोहचेल असे कार्य घडत नाहि..
November 8, 2018
हिंदू धर्म संस्कृतीला लाभलेलं देणं म्हणजेच हिंदू धर्मातील सणवार पण हेच सणवार कधी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर कधी बंधुत्व आणि प्रेमाचं प्रकटीकरण करण्यासाठी साजरे केले जातात. श्रावणातल्या सणासुदीची रीघ आणि गणेशोत्सवाची धामधूम संपली की, आपल्या पूर्वजांची आठवण काढणारा हा पितृ पंधरवडयाचा कालावधी सुरू होतो. हा पितृपक्षाचा काळ, त्यात केलं जाणारं पूर्वजांचं शास्त्रोक्त स्मरण, पितृपक्षाच्या अखेरच्या दिनी येणारी सर्वपित्री अमावस्या आणि तिचं महत्त्व यावर टाकलेला हा प्रकाशझोत. संतांच्या द़ष्टीतून श्राद्ध म्हणजे काय, तसेच या पक्षातील विविध तिथीवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख आहे.
September 23, 2017
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सोळा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आप्त म्हणजे ज्याला आपली निरपेक्ष काळजी आहे.
अशी अनेक मंडळी आपल्या आसपास असतात, ज्यांना आपली काळजी वाटते. पण ही माणसे कधीच समाजासमोर येत नसतात. पडद्यामागून आशीर्वाद देण्याचे काम करत असतात.
अशा मंडळींना संत असे म्हणतात. यांनी त्यांचे चांगले विचार स्वतःमध्ये एवढे रूजवलेले असतात, की त्यांच्या संपर्कात जे येतील, त्यांनाही चांगला विचार करणे भाग पडते. या संपर्काला सत्संग म्हणतात.
यांना ओळखायचे कसे ? हे आपल्या सान्निध्यात आले की, यांची वंदावी पाऊले..., ...तोची दिवाळी दसरा, असे आपल्याला वाटले पाहिजे ते संत.
ग्रंथकार असे म्हणतात, की सतत यांच्या सेवेत राहिले म्हणजे आरोग्य मिळते. यासाठी आप्त-उपसेवित असा शब्द शास्त्रकार वापरतात.
सेवा असोत वा उपसेवा म्हणजे इथे कुणाचे पाय चेपणे, त्यांच्या घरची बाजाररहाटादि कामे करणे, त्यांची सतत चमचेगिरी करणे नव्हे, ही असली कामे तर राजकारणी लोकांचे फंटर देखील करत असतात. किंवा पेड सर्व्हंटदेखील करत असतात. सेवा या शब्दाचा त्याहीपेक्षा वेगळा अर्थ इथे अपेक्षित आहे.
आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या अशा संत लोकांमधील आप्त असण्याचे गुण शोधणे, आणि सतत ते गुण आपल्या अंगी आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे म्हणजे सेवा.
संत म्हणजे प्रत्येक वेळी भगवे कपडे, गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, कमंडलू घेतलेले, सर्वसंग परित्याग केलेले, घर दार सोडून, बायको मुलांना टाकून, हरिहरि करत असतात असे नाही. तर अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, तिन्ही लोक. ऐसी मती जयाची स्थिर असे सज्जन लोक हे पण आप्तच असतात.
अशी मंडळी प्रसिध्दीपरान्मुख असतात. आतून बाहेरून वेगळे नसतात. सतत सकारात्मक विचारात असतात. त्यांचे विचार त्रिकालाबाधीत स्थिर असतात, बोलणे कमी आणि कृती जास्त असते.
बाह्यलक्षणावरून यांना ओळखता येत नाही. त्यासाठी तशीच संतदृष्टी असावी लागते. तरच ते आपल्या आत प्रकट होतात. आणि चांगले विचार करायला लावतात. कारण ते आपले असतात. आप्त असतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०५.०८.२०१७
August 5, 2017
श्रीमत्सुन्दरनायकीं भयहरां ज्ञानप्रदां निर्मलां
श्यामाभां कमलासनार्चितपदां नारायणस्यानुजाम् ।
वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां नानाविधामम्बिकां
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ४॥
श्रीमत्सुन्दरनायकीं- मदुराई येथे असणाऱ्या मीनाक्षी मंदिरामध्ये भगवान श्रीशंकरांचे श्रीनटराज स्वरूप विद्यमान आहे. या स्वरूपाला तेथे श्री सुंदरेश्वर असे म्हणतात. त्या श्रीमान भगवान सुंदरेश्वरांची नायिका देवी श्री मीनाक्षी श्रीमत्सुन्दरनायकी स्वरूपात वंदिली जाते.
भयहरां - भक्तांच्या भीतीचे हरण करणारी. सगळ्यात मोठी भीती असते मृत्यूची. आई जगदंबेच्या कृपेने मोक्ष प्राप्त होत असल्याने ही भीतीच नष्ट होते.
ज्ञानप्रदां- या मोक्षाला कारण असणारे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्रदान करणारी.
निर्मलां- शुद्ध चैतन्यस्वरूपिणी, माया मल विरहित अशी.
श्यामाभां- आपल्या अत्यंत तेजस्वी सावळ्या वर्णाने आकर्षक दिसणारी. कमलासनार्चितपदां- कमळावर बसणाऱ्या भगवान ब्रह्मदेवांनी चरणकमलांची उपासना केली आहे अशी. नारायणस्यानुजाम् - भगवान श्री नारायण अर्थात श्री विष्णूंची लहान भगिनी.
वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां- वीणा, वेणू म्हणजे बासरी आणि मृदंग इत्यादी वाद्यांच्या ध्वनींचा रसिकत्वाने आस्वाद घेणारी.
यात वीणा हे तंतुवाद्य, बासरी हे वातवाद्य तर मृदंग हे चर्मवाद्य. अर्थात या तीनही प्रकारांमुळे परिपूर्ण होणारे संगीत.
नानाविधामम्बिकां- अनेक रुपांमध्ये नटून विश्व निर्माण करणाऱ्या,
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् - कारुण्याचा जणू काही महासागर असणाऱ्या आई जगदंबा मीनाक्षीला मी सतत वंदन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 13, 2020
स्नान म्हणजे शरीराची शुद्धी करणे. सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ नये. जितके महत्त्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्त्व हे स्नानाला आहे. अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेला झाली पाहिजे.
December 15, 2022
लेखक पत्रकार, आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात ते मराठी निवेदक, मुंबई दूरदर्शन कार्यक्रम विभागात ३४ वर्षे सेवा केल्यानंतर साहाय्यक संचालक (कार्यक्रम) भारतीय कार्यक्रम प्रसारण सेवा (आय.बी.पी.एस.) केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय, या पदावरून निवृत्त असून सध्या प्रसारण माध्यम तज्ञ/सल्लागार आहेत.
July 5, 2022
अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्यासाठी ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विमानतळ ते स्टेडियम या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या हजारो लोकांनी तसेच मोटेरा स्टेडियमच्या आत असलेल्या लाखांवर लोकांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. या भेटीमुळे ट्रम्प हे दुसर्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर भारताला त्याचा खूप फायदा मिळू शकतो. अमेरिकेत थोडेथोडके नाही तर 40 लाख भारतीय आहेत. या अनिवासी भारतीयांच्या मदतीने भारताचे हितसंबंध ट्रम्प यांच्या कार्यकाळात जपले जाऊ शकतात.
February 27, 2020
ह्याचा १७-२० मीटर उंच मोठा डेरेदार वृक्ष असतो.ह्याची पाने संयुक्त,गुळगुळीत व लोम युक्त असतात.पत्रके रूंद असतात व पत्रकांच्या ४-८ जोड्या असतात.फुले पिवळसर पांढरी सुगंधी व नाजूक असतात.फळ १५-३० सेंमी लांब व १.५-३ सेंमी रूंद चपट्या शेवगा असतात.बिया चपट्या,गोल,धुरकट असतात.हिवाळ्यात पाने गळतात.
ह्याची चव तुरट,कडू,गोड असून गुणाने उष्ण असते.ह्याचा प्रभाव विषनाशक आहे.तसेच हा हल्का,व तीक्ष्ण असतो.हा त्रिदोषघ्न अाहे.
चला आता आपण शिरीषाचे औषधी गुणधर्म जाणून घेऊयात:
१)सुज आलेल्या भागावर शिरीष बी चा लेप करावा.
२)दातांच्या रोगामध्ये शिरीषाचा सालीचा काढा गुळण्या करायला उपयुक्त आहे.
३)दम्याच्या रोगात शिरीष फुलांचा रस मध व पिंपळी चुर्ण घालून देतात.
४)ज्या बायकांच्या अंगावर पांढरे जाते त्यांना शिरीष सालीचे चुर्ण समभाग गाईच्या तुपामधून देतात.
५)शिरिष सालीचा काढा त्वचारोगामध्ये स्त्राव कमी करायला उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 16, 2017
लवण रसाचा युक्तीने वापर केला तर तो प्रिझरवेटीव्ह म्हणून वापरता येतो. म्हणून तर लोणच्यामधे मीठ जास्त घालतात.
मीठाला कधीही कीड लागत नाही. हा त्याचा एक चांगला गुण. मीठाप्रमाणेच खायचा चुना देखील कीटनाशक आहे.
मीठातील हा गुण ओळखून मासे टिकवण्यासाठी, सुकवण्यासाठी मीठाचा वापर होतो. कैरी, लिंबू मिरच्या टिकवण्यासाठी सुद्धा मीठच वापरले जाते.
कोकणात कच्च्या फणसाचे गरे मीठ लावून वाळवतात. काही ठिकाणी हे असे मीठ लावलेले कच्चे गरे नीट गुंडाळून, मातीच्या मडक्यात जमिनीत पुरूनही ठेवतात. ते कुसत नाहीत किंवा किडत नाहीत. आणि आवश्यक वाटतील तेव्हा बाहेर काढून, धुवुन भाजी करतात.
दररोज दात घासण्यासाठी लवणरस हा निषिध्द सांगितला आहे. त्याने दात जास्त क्षरण पावतात, म्हणजे झिजतात, पण युक्ती वापरली तर किडलेल्या दातांपासून मुक्ती मिळते. किडलेल्या दाढांमधे मीठाचा दाणा धरून ठेवल्यास किड मरते.
कशी ?
घरात कोबी अथवा फ्लाॅवर किंवा तत्सम भाजी आणली, तर त्यात लपलेली किड दिसत नाही. ती बाहेर यावी यासाठी सुगृहिणीला, हा फ्लाॅवर मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचा असतो, हे सांगावे लागत नाही, किंवा शिकण्यासाठी शाळेत जावे लागले नाही. फ्लाॅवर मीठाच्या पाण्यात बुडवला की लपलेली कीड आपोआप बाहेर येते, तशी दाढेत लपलेली कीडदेखील आठवड्यातून एकदा मीठाच्या पाण्याचा कवल धरला की झाले काम ! मीठाची गुळणी धरून बसणे म्हणजे कवल. ( कवल टीप यापूर्वी झाली आहे. )
म्हणजे आजच्या भाषेत मीठ जंतुनाशक झाले ना !
कोबी, पालक, पडवळ, दोडका अश्या काही भाज्यामधे मीठ नैसर्गिकरित्या जास्तच आहे. त्या शिजवताना मीठ जरा कमीच घालावे लागते. या भाज्या शिजल्यानंतर आळतात, हे सुगृहिणीला कळते.
मीठ जास्त झाले तर पोटात ढवळत रहाते. म्हणून उलटी नीट होण्यासाठी मीठाचे पाणी प्याले तर उलटी छान होते.
छान होते ? किळसवाण्या उलटीमधे छान होण्यासारखे काय आहे ? ते उलटी करणाऱ्यांना विचारावे, म्हणजे समजेल.
पोटात आतड्यांना चिकटलेला चिक्कट आम सोडवण्यासाठी हे लवणजल वापरले जाते.
ताप कमी होण्यासाठी मीठाच्या पाण्याच्या घड्या डोक्यावर ठेवतात, हा प्रथमोपचार तर सर्वांनाच माहिती आहे.
आणि कुठेतरी लचकून मुरगळून सूज आली, तर गरम पाण्यात मीठ टाकून शेक घेणे हा उपाय पण घरातील ज्येष्ठ नागरीकांना माहिती आहे. शरीरातील पाणी बाहेरून स्वतःकडे शोषून घेणे, या मीठातील गुणामुळे सूज आणि वेदना कमी करण्यासाठी मीठ बाहेरूनच वापरले जाते.
उलट्या जुलाब होत असतील तर मीठ साखर पाण्याचा जगजाहीर उपाय आहेच. पण तो आयुर्वेद मतानुसार सरसकट वापरू नये, अग्नि मंद होतो. यासाठी वैद्य मत जरूर घ्यावे.
केस गळणाऱ्या केसमधे मीठ जरा जपूनच वापरावे, नाहीतर गाॅनकेस व्हायला वेळ लागणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
06.11.2016
November 6, 2016
मुळात आयुष्य म्हणजे जगणं असतं का? आता हा फार जटील, गुंतागुंतीचा प्रश्न असला तरी हे जीवन जटील नाहीच. मग का आपण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच हरवून बसतो? का आयुष्यभर इतरांशी तुलना करत… त्यांचं वैभव, त्यांची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो..?
August 22, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti