(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • असामान्य व्यक्ती – डॉ. स्टीफन हॉकिंग

    १६४२ मधे गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच वर्षी न्यूटन जन्मला. ज्या तारखेला (८ जानेवारी) गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच तारखेला हॉकिंग जन्मला, ३०० वर्षाच्या अंतराने १९४२ मधे. हॉकिंग याचा उल्लेख योगायोग असाच करतात. जे विश्वाच्या उत्पत्तीचा शोध घेत आहेत ते अशा घटनांना नियमात कसे बसवतील?

      March 14, 2019


  • अर्थाने समर्थ होण्याचा स्वार्थ

    अर्थाने समर्थ होण्याचा स्वार्थ

    ख्रिस्त पूर्व काळात विकसित झालेल्या सिंधू खोऱ्यातील सभ्यतेमध्ये प्रगत आणि भरभराटीची आर्थिक व्यवस्था होती. सिंधू खोऱ्यातील लोक शेती, पाळीव प्राणी, तांबे, कांस्य आणि कथील यापासून अवजारे आणि शस्त्रे बनवत तसेच मध्यपूर्वेतील काही देशांशी व्यापारही करत.

      December 26, 2022


  • एरंड

    एरंड

    बऱ्याच घरामध्ये पुर्वीपार पासून आठ दिवसातून एकदा पोट साफ करायला एरंड तेल घेण्याची प्रथाच आहे जणू.चला तर आज आपण ह्या एरंडाची थोडक्यात ओळख करून घेउयात.

    ह्याचे २-६ मीटर उंचीचे गुल्म असते,पाने रूंद व खंडीत कडा युक्त असून हाताच्या बोटां प्रमाणे हे पान भासते.ह्याला येणारी फुले एकलिंगी असतात.तर फळ कच्चे असताना हिरवे मऊ व काटे असलेले असते.ह्यात दोन कप्पे असतात.ह्याचे बी द्विदल असते.तर मुळ वरच्या भागात जाड व टोकाला निमुळती होत जाते.

    ह्याचे उपयुक्तांग आहे पाने,बीज,तेल व मुळ.ह्याची चव गोड,कडू,तिखट असून हे उष्ण गुणाचे असते.तसेच हे स्निग्ध,तीक्ष्ण,सुक्ष्म,जड असते.एरंड वातकफनाशक आहे.

    आता आपण ह्याचे उपयोग पाहू:

    १)सुज आलेल्या भागावर एरंडाची पाने गरम करून बांधतात.

    २)पोटदुखीत एरंड मुळाचा काढा हिंग व सैंधव घालून देतात.

    ३)आमवातामध्ये एरंड तेल सुंठीच्या काढ्यासोबत देतात.

    ४)बाळंतीणीस अंगावर दुध सुटायला एरंड तेलाचा अभ्यंग करतात.

    ५)पोट फुगले असल्यास एरंडाची पाने व बियांची चटणी गरम करून पोटावर बांधतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 24, 2017


  • सुबाभूळ लागवड – फायदे प्रचंड

    पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुबाभूळ निश्चितच फायद्याची आहे.

      November 6, 2016


  • डोकेदुखीवर मात कशी कराल

    सर्दीनंतर सर्वात सामान्य त्रास म्हणजे डोकेदुखीचा… डोकेदुखी नक्की कशामुळे होते हे नक्की सांगता येत नसले तरी त्यावर घरच्या घरी उपाय करता येतात. काही प्रकारची डोकेदुखी जेवण न घेतल्याने, स्नायूंचा ताण यांच्यामुळेही होते आणि तिच्यावरचा औषधोपचार घरीच केला जाऊ शकतो. परंतु, काही प्रकारची डोकेदुखी गंभीर बाबींशी संबंधित असू शकते आणि त्यामध्ये वैद्यकीय मदतीची गरज भासते.

      August 22, 2019


  • तुझको न भूल पायेंगे..

    मुंबई शहराची ओळख एकेकाळी गेटवे आॅफ इंडिया, व्हीटी, चर्चगेट, राणीचा बाग, फ्लोरा फाऊंटन, चौपाटी एवढीच नव्हती तर काळी पिवळी टॅक्सीने देखील होती…. १९६४ पासून मुंबईत सर्वत्र धावणारी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी, ३० आॅक्टोबर २३ पासून बंद झाली..

      December 24, 2023


  • काही नवीन मोबाईल म्हणी—

    मी अजूनही मोबाईल फोन वापरत नाही.मोबाईल या विषयावर आता उलटसुलट बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. ती एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे यात वादच नाही. पण तरी मी अजूनही मोबाईल वापरीत नाही आणि त्यामुळे माझे फारसे काही अडतही नाही.

    पण माल याचे फायदे असे की प्रवासात एखादे पुस्तक वाचू शकतो. मित्र असला आणि त्याचा मोबाईल मध्येच नाही वाजला तर कितीही वेळ गप्पा मारू शकतो.प्रवासात आजूबाजूला किती सुधारणा झाल्या आहेत, किती विविध प्रकारचे सहप्रवासी आहेत,फेरीवाले आणि निरनिराळी माणसे कशी वागतात अशा अनेक गोष्टींचा आस्वाद घेत घेत माझा प्रवास पूर्ण होतो.अगदी झोप जरी लागली तरी फोन वाजला म्हणून किंवा वाजला नसेल ना या भीतीने मला जाग येत नाही. मस्त ताणून देता येते.कितीतरी गंमती … सगळ्याच देत येत नाहीत.

    पण मित्र,नातेवाईक, सहप्रवासी यंच्या मोबाईल वापरातील वैविध्यातून मला सुचलेल्या काही नवीन मोबाईल म्हणी---

    १) स्वामी तिन्ही जगाचा , चार्जरविना भिकारी
    २) बुडत्या बँटरीला , चार्जरचा आधार
    ३) चेहेऱ्यातच नाही तर सेल्फीत कुठून येणार ?
    ४) नाय ते app आणि डोक्याला ताप
    ५) फोन वितभर आणि एक्सेसरीज हातभर
    ६) आला मेसेज, केला फॉरवर्ड
    ७) एक न धड आणि भाराभर चार्जर
    ८) खाली मुंडी आणि contact धुंडी
    ९) मुंबईचा पाउस आणि मोबाईलवरचा DP, कधी बदलेल सांगता येत नाही
    १०) बायकोचा नसेलना म्हणून सतत स्क्रीन बघतो आणि म्हणे बायकोला कोण भितो !

    -- मकरंद करंदीकर.

      April 26, 2017


  • जागतिक रेबीज दिवस

    रेबीजग्रस्त कुत्रा, मांजर चावल्यानंतर सर्वसाधारणपणे २० ते ३० दिवसात रोगाची लक्षणे दिसतात. परंतू काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्ष लागतात.

      September 28, 2021


  • लसूण खाण्याचे फायदे

    सर्वसाधारणपणे लसणीचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी, एखाद्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी, किंवा चटणी बनविण्यासाठी केला जातो. एखादी बेचव भाजी केवळ लसूण त्यामध्ये घातल्याने किती चविष्ट बनते ! पण केवळ खाद्यपदार्थांची चव वाढविण्याखेरीज ही लसूण अजून किती तरी प्रकारे उपयोगाला येते.

      June 21, 2019


  • माहिती अधिकार बळकट होतोय

    भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढ्याला बळ प्राप्त व्हावे या उद्देशाने माहिती अधिकार कायद्याचा आग्रह धरण्यात आला. हा कायदा अस्तित्वात येताच विविध प्रकारे मिळवलेल्या माहितीद्वारे भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. असे असताना माहिती मिळवणार्‍यांवर दबाव आणण्याचे, मारहाण करण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र, याला जनताच प्रखर विरोध करेल आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाची नवी पहाट पहायला मिळेल असे वाटते.

      January 10, 2011