वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सन २०१० छत्तीसगढ मधील बस्तर गावात ७६ जवानांची जाळून केलेली क्रूर हत्या ! ही एक सत्य घटना!! आपल्या वाचनात आलीच असेल . छत्तीसगढ मधील एका साध्या इमारतीत सी आर पी एफ चे जवान विश्रांती घेत आहेत .
December 31, 2024
(०१.०४.२०१६)
मार्च २७, २०१६ च्या लोकसत्तामधील श्री. शेषराव मोरे यांच्या, धर्मनिरपेक्षतेबद्दलच्या भाषणाची बातमी; तसेच ३० मार्चच्या ‘लोकमानस’मधील श्री. राजीव जोशी यांचें त्यावरील मत, व १ एप्रिलच्या ‘लोकमानस’मधील श्री. भालचंद्र कवळीकर यांची त्या मतावरील प्रतिक्रिया, हे सर्व वाचलें. त्यांत बरेच मुद्दे चर्चिलेले आहेत. सर्वांचा परामर्ष घेण्याचा माझा हेतू नाहीं. पण, त्यातील फक्त, १) स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या ; व २) धर्मनिरपेक्षता ; या, एकमेकांशी संल्लग्न असलेल्या दोन गोष्टीबद्दल मी इथे कांही माहिती पुढे ठेवीत आहे.
थोडक्यात सांगायचे म्हणजे, सिन्धुसागरापासून ते सिन्धु नदीपर्यंत पसरलेल्या भूभागाला जे लोक भारतभूमी समजतात, आणि या भूमीला पितृभूमी व पुण्यभूमी मानतात, ते सर्व लोक हिंदू आहेत.
धोडेसे धर्मनिरपेक्षतेबाबत.
पाश्चिमात्यांनी १९ व्या शतकात, ‘धर्म’ म्हणजे ‘रिलिजन’ (Religion) असा अर्थ गृहीत धरला. भारतीयांच्या ‘धर्म’ या संकल्पनेचच्या विस्तृततेची त्यांना कल्पनाच नव्हती. परंतु, धर्म या शब्दाचा अर्थ खरें तर ‘रिलिजन’हून फार व्यापक आहे. शरीरधर्म, शेजारधर्म, पुत्रधर्म, कुलधर्म, युगधर्म, मानवधर्म, कर्मधर्मसंयोग, अशा अनेक शब्दांतून ही गोष्ट स्पष्ट होते. ‘धर्म’ या संकल्पनेचे महत्वपूर्ण विश्लेषण कुणाला समजून घ्यायचें असेल तर त्यांनी, ख्यातकीर्त विचारवंत श्री. नरहर कुरुंदकर यांचा, ‘शिवराज्याभिषेक त्रिशतकमहोत्सवा’च्या समयींच्या ग्रंथात लिहिलेला लेख वाचावा. ‘धर्मा’चे विविध अर्थ कोणते हें कुरुंदकरांनी विशद केलें आहे, आणि, शिवाजी महाराज कुठल्या अर्थाने धार्मिक होते व कुठल्या अर्थाने धर्मनिरपेक्ष होते, याचा ऊहापोह कुरुंदकरांनी तेथे केलेला आहे.
- सुभाष स. नाईक.
सांताक्रुझ (प.), मुंबई.
M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in.
website : www.subhashsnaik.com
April 21, 2016
सारा उंचसखल भाग असल्यामुळे ठिकठिकाणहून वहात येणार्या पाण्याने रस्त्याच्या दोहोबाजूस ओहोळ झालेले असतात. ते पाणी वाहून, बर्याच ठिकाणी रस्त्याची सोबत करत, दोन्ही बाजूंना खोलगट पन्हाळी तयार झालेल्या असतात. पावसात त्यातून डोंगरावरचे तांबडे मातकट पाणी वहात असते. इतर वेळेला पन्हाळीत ओल टिकून रहाते. त्या ओल्या मातीत, गवताच्या साथीनं रामबाण उगवलेले असतात. रंगीबेरंगी फुलं, गवताची डुलणारी पाती, रामबाणाचे जागोजागी उगवलेले पेव आणि त्यांवरची असंख्य फुलपाखरं, किडे, चतुर यांनी, रस्त्याकडेच्या या पन्हाळी नुसत्या गजबजून गेलेल्या असतात.
रस्त्याकडेच्या घरांपुढे लोक आपापल्या बागांमधे काम करताना दिसायला लागतात. विविध प्रकारच्या फुलांचे ताटवे बागांची शोभा वाढवायला लागतात. एप्रिल मे हा tulip फुलांचा सिझन. अनेक घरांपुढे ट्युलीपच्या रंगी बेरंगी फुलांची पखरण झालेली दिसते. Daffodils देखील खूप दिसतात. थंडी कमी झाल्यामुळे लोकं घराबाहेर अधिक पडायला लागतात. चांगलं ऊन पडलं असलं तर जॉगिंग करायला, सायकलिंग करायला बाहेर पडलेले लोक दिसतात. पण इथे सायकलिंग म्हणजे आपल्यासारखं पायजम्यामधेच सायकलवर टांग मारली असा प्रकार नसतो. सायकल चालवणार ते देखील हेल्मेट, टाइट शॉर्टस्, गॉगल्स, पाण्याची बाटली, शूज असा सरंजाम हवाच! संध्याकाळी रस्त्याकडेच्या ग्राउंड्सवर कुठे कुठे गावातल्या मुलांचा बेसबॉलचा खेळ रंगात आलेला असतो. त्यांचे आई, वडील गाड्या, पिकअप ट्रक्स पार्क करून गप्पा मारत उभे असतात.
शेतांत आधीच्या हंगामात कापलेल्या मक्याचे खुंट तसेच राहिलेले असतात. ते हारीने उभे असलेले खुंट, सुकून पिवळे पडलेले असतात. त्या सुकलेल्या खुंटांच्या मधली सगळी जमीन पावसाच्या आगमनासरशी हिरव्या तणांनी, गवताने भरून जाते. मे च्या सुरवातीस नांगरणी सुरू होते. शेतांतून ट्रॅक्टर्स फिरताना दिसायला लागतात. काळीभोर माती पुन्हा नवीन बीज स्वीकारण्यासाठी उतावीळ होऊन जाते. नांगरलेली काळीभोर शेतं आणि चराऊ गवताची हिरवीगार कुरणं असा संमिश्र बाज माळरानांवर पसरतो. कुरणांत गवत पुरेसं वाढलं की गायींना आणि वासरांना बाहेर चरायला सोडलं जातं. टेकड्यांच्या हिरव्यागार उतारांवर काळ्या पांढर्या गायींचे कळप अधाश्यासारखे चरू लागतात.
जूनच्या मध्यापर्यंत पेरणी संपून मक्याच्या रोपांची टोकं मातीतून वर यायला लागलेली असतात. दिवस चांगलाच मोठा झालेला असतो. रात्री ९-९॥ वाजता देखील चांगला प्रकाश असतो. सूर्य मावळून गेला तरी मावळतीचं आकाश चांगलंच प्रकाशमान असतं. सूर्याचा परावर्तित प्रकाश आसमंतात भरून राहिलेला असतो. कधी कधी रात्री लॅबमधून परत येताना पूर्वेकडे चंद्र उगवत असतो आणि मावळतीला बुडालेली सूर्याची किरणं अजून आपला प्रभाव सोडायला तयार नसतात.
सूचिपर्णी वृक्ष जरी वर्षभर हिरवेगार दिसत असले तरी निरखून बघितल्यावर त्यांच्यावर देखील वसंताचा हात फिरल्याचं जाणवतं. ज्युनीपरच्या हिरव्यागार फांद्यांमधून पोपटी रंगाचे नाजुक बड्स उगवलेले दिसतात. सारं झाड या पोपटी बड्सनी भरून जातं आणि एखाद्या ख्रिसमस ट्री वर रंगीत दिव्यांच्या माळा लावाव्यात तसं वाटायला लागतं. झाडाच्या जुन्या सुया गर्द शेवाळी रंगाच्या असतात. या सुयांच्या टोकाला निळसर हिरव्या रंगाच्या नव्या सुया वसंतात येतात त्यामुळे सारं झाड ही दोन रंगांची रंगसंगती अंगावर वागवतं - झाडांच्या बुंध्यांजवळचा फांद्यांचा रंग गर्द शेवाळी तर परीघाजवळ फांद्यांचा रंग निळसर हिरवा!
जुलै ते सप्टेंबर म्हणजे उन्हाळा, मोठे दिवस, बर्यापैकी सूर्यप्रकाश, मधून मधून पडणारा पाऊस, हिरव्या रंगाचं एकछत्री साम्राज्य! पशु, पक्षी, किटक, फुलपाखरं सार्यांची लगबग जाणवण्या इतपत वाढलेली. रान आता सहस्र कंठांनी बोलायला लागलेलं असतं. दिवसा मधमाश्या आणि फुलपाखरं आणि रात्रीच्या वेळी काजवे (fire flies) भरपूर दिसतात.
ओढ्यांच्या काठांवर झाडाझुडपांची गर्दी झालेली असते. झाडांच्या सावल्यांनी पाणी झाकोळून गेलेलं असतं. बालकवी ठोंबरे यांच्या कवितेतल्या औदुंबरासारखी काही झाडं जळात पाय सोडून बसलेली असतात. जुन्या मोडून पडलेल्या फांद्या ओढ्यातल्या दगडांत, चिखलात रुतून बसलेल्या असतात, आणि त्यांची वेडीवाकडी धडं पाण्याबाहेर डोकावत असतात. अशाच एखाद्या ओढ्यात, वरच्या झाडांची सावली शोधून, एखादी बदकीण आपला पोरवडा सांभाळत, किडे शोधत पाण्यात डुबक्या मारत असते.
August 7, 2015
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला , पण गोवा, दीव, दमण हे विभाग पोर्तुगीजांच्या अमलाखाली राहिले होते. गोवामुक्तीचे स्वप्न अखेर साकार करण्यासाठी शेकडो लढाऊ स्त्री-पुरुष सत्यागहींना आपले प्राण गमवावे लागले. हा लढा खरोखरच अभूतपूर्व असाच होता.
June 18, 2022
१९ जानेवारी १९५६ मध्ये भारतातील आयुर्विम्याचे राष्ट्रीयकरण झाले. राष्ट्रीयकरणाच्यावेळी भारतामध्ये जवळ जवळ १५४ भारतीय विमा कंपन्या, १६ अभारतीय कंपन्या आणि ७५ दूरदर्शी कार्यरत होत्या. राष्ट्रीयकरण दोन टप्प्यांमध्ये साध्य करण्यात आले, सुरवातीला कंपन्यांचे व्यवस्थापन अध्यादेशाच्या साधनाने ताब्यात घेण्यात आले, आणि नंतर सर्वसमावेशक विधेयकाच्या साधनाने मालकी सुद्धा.
भारतीय संसदेने १९ जुन १९५६ रोजी आयुर्विमा महामंडळ अधिनियम पारित केला, आणी भारतीय आयुर्विमा महामंडळ १ सप्टेंबर १९५६ रोजी आयुर्विम्याचा सर्वदूर अधिक व्यापक प्रसार करण्याच्या हेतूने विशेषकरून देशाच्या ग्रामीण भागातील सर्व विमायोग्य व्यक्तींपर्यंत पोचण्यासाठी, त्यांना पुरेसे आर्थिक संरक्षण योग्य किमतीत पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आले एल.आय.सी.ची १९५६ मध्ये तीच्या कार्पोरेट कार्यालयां व्यतिरिक्त ५ प्रादेशिक कार्यालये, ३३ विभागीय कार्यालये आणि २१२ शाखा कार्यालये होती. पॉलिसी चालू असण्याच्या काळात आयुर्विमा करार दीर्घकालीन करार असल्याने तीच्या विविध सेवांच्या गरजा पुढील वर्षांमध्ये कार्यविस्तार करण्यसाठी आणि प्रत्येक जिल्हा मुख्यालयामध्ये एक शाखा कार्यालय ठेवण्यासाठी भासू लागल्या. एल.आय.सी.ची पुनर्रचना करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर नविन शाखा कार्यालये उघडण्यात आली. पुनर्रचनेचा एक परिणाम म्हणून सेवा देण्याची कार्ये शाखा कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आणि शाखा या लेखा युनिटस करण्यात आल्या.
महामंडळाच्या कामगिरीने हे अद्भुत कार्य केले. हे फक्त सन १९५७ मध्ये २०० कोटी रूपयांपासून महामंडळाने वर्ष १९६९-७० मध्ये ओलांडलेल्या १००० कोटींच्या नविन व्यवसायावरून लक्षात येते आणि एल.आय.सी.ला नविन व्यवसायाचे २००० कोटींचे उद्दिष्ट पार करावयाला पुढील १० वर्ष लागली. परंतू ऐंशीच्या सुरवातीला घडत असलेल्या पुनर्रचनेमुळे, वर्ष १९८५-८६ पर्यंत एल.आय.सी.ने आधीच नविन पॉलिसींवरील ७०००सम एशुअर्ड चा आकडा पार केला होता.
आज एल.आय.सी.ची २०४८ संपूर्ण संगणकीकरण केलेली शाखा कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, ८ प्रादेशिक कार्यालये, १३८१ उपग्रह कार्यालये आणि कार्पोरेट कार्यालयांसहीत कार्यरत आहे.
एल.आय.सी.च्या वाईड एरीआ नेटवर्कने ११३ विभागीय कार्यालये व्यापली आहेत आणि मेट्रो एरीआ नेटवर्कच्या मार्फत सर्व शाखा जोडण्यात आल्या आहेत. काही निवडक शहरांमध्ये ऑनलाईन विम्याचे हप्ते गोळाकरण्याची सोय देऊ करण्यासाठी एल.आय.सी.ने काही बॅंका आणि सेवापुरवठादारांशी संधान साधलेले आहे. ग्राहकांच्या सोईसाठी एल.आय.सी.ची इसीएस आणि एटीएम मार्फत विमाहप्ता भरणा सोय ही अतिरिक्त आहे.
ऑनलाईन किऑस्क आणि आयव्हीआरएसच्या खेरीज मुंबई, अहमदाबाद, बंगळूरू, दिल्ली, पुणे आणि इतर अनेक शहरांमध्ये माहिती केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. पॉलिसीधारकांना त्यांच्या सहज प्रवेश पुरवण्याच्या हेतूने एल.आय.सी.ने उपग्रह संपर्क कार्यालये सुरू केलेली आहेत. उपग्रह कार्यालये छोटीशी, आटोपशीर आणि ग्राहकाला अधिक जवळची असतात. भारतीय विम्याच्या उदारीकरणाच्या परिस्थीतीत सुद्धा एल.आय.सी. नविन वाढीच्या दिशेने वेगाने स्वत:चीच मागील सर्व रेकॉर्ड मोडत कार्यक्रमण करताना आघाडीवर आहे.
एल.आय.सी.ने ब्रिटन, फिजी, नेपाळ, श्रीलंका आदी देशांमध्ये कारभार सुरू केला. तसेच विमा क्षेत्राबरोबरच पेन्शन, गृहकर्जे, म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड, वित्त उत्पादनांचे वितरण आदी क्षेत्रात एल.आय.सी. काम करीत आहे. आत्तापर्यंत एल.आय.सी.ने अनेक मैलाचे टप्पे ओलांडले आहेत आणि आयुर्विमा उद्योगाच्या दृष्टीकोनातून अभूतपूर्व कामगिरीचे अनेक मानबिंदू प्रस्थापीत केलेले आहेत. हा तोच हेतू ज्याने आमच्या पूर्वजांना विमा या देशात प्रत्यक्षात आणण्यासाठी, आम्हाला एल.आय.सी.मध्ये हा संरक्षणाचा निरोप घेऊन सुरक्षेचा दिवा शक्यतितक्या घरांमध्ये लावण्यासाठी आणि लोकांना त्यांच्या कुटुंबांसाठी सुरक्षा प्रदान करण्यात मदत करण्यासाठी प्रेरणा दिली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 19, 2017
तुमचे तेजोवलय ही तुमची पर्सनल सिग्नेचर म्हणता येईल. जो माणूस आंधळा आणि बहिरा आहे, तो सुद्धा त्याच्या जवळ येणाऱ्या इतर लोकांचे अस्तित्व बरोब्बर ओळखतो.. सांगू शकाल , कसे..? कारण, देवाने दिलेल्या पंचेंद्रियां पैकी जेव्हा एखादे काम करत नाही तिथे बाकीची वइंद्रिये अतिसंवेदनशील होतात. ही लोकं इतरांचे अस्तित्व त्यांच्या तेजोवलयावरून ओळखतात. प्रत्येक माणसाकडे तेजोवलय बघायची, ते ओळखायची, त्याचा अर्थ जाणून घ्यायची जन्मजात क्षमता आहे. फक्त ती विकसित करावी लागते.
July 21, 2017
मलेरियाच्या परोपजीवांच्या पूर्वजांचा जन्म पृथ्वीतलावर काही लाख वर्षांपूर्वी झाला असावा. Molecular Genetics च्या आधारे असे सिद्ध झाले आहे की यांचे पूर्वज हे एकपेशीय होते व ते पाण्यातील मणके नसलेल्या किड्यांच्या शरीरात वाढत असत.
November 13, 2018
फणस हा आरोग्यदायी आहे ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे आपल्याकडे फणस हा फक्त चवीसाठी आणि भुकेसाठी खाल्ला जातो, मात्र खरंतर फणसात जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब-6 आणि जीवनसत्त्व क ची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. जीवनसत्त्व ‘अ’ हे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर असते. जीवनसत्त्व ब6 हे मेंदूच्या विकासासाठी पोषक असते आणि जीवनसत्त्व क हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
July 4, 2021
सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता शासनाने ग्रामोत्थानाचा त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेला 'इको व्हिलेज' नाव दिले असून १० हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असणार्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी
३६ लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.'इको व्हिलेज' योजनेंतर्गत गावांमध्ये उच्चप्रतीच्या भौतिक व मूलभूत सुविधा तसेच दर्जेदार सामाजिक मूलभूत सोई आणि मूल्यवर्धित स्थनिक रोजगार-स्वयंरोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. • योजना राबविताना ग्रामपंचायतींनाच योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. • सुरुवातीला तीन वर्षात मिळणारा निधी कामगिरीच्या सातत्यानुसार उपलब्ध करुन दिला जाईल. • राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची ही संकल्पना असून योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ते राज्यभर दौरेही करीत आहेत. • १० हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ३० लाख रुपये (दरवर्षी दहा लाख) दिले जातील. • यापैकी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असणार्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ३६ लाख रुपयांचा निधी देण्याचे शासनाने ठरविले आहे. <शासनाकडून लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी पुढीलप्रमाणे -सनाने ठरविले आहे. • १ हजार ते २ हजारापर्यंत लोकसंख्येसाठी ९ लाख (दरवर्षी ३ लाख) रुपयांचा निधी देण्याचे शासनाने ठरविले आहे.• १ हजारापर्यंत लोकसंख्या असणार्या ग्रामपंचायतीकरिता प्रत्येकी ६ लाख (दरवर्षी २ लाख) रुपयांचा निधी देण्याचे शासनाने ठरविले आहे. <प्राप्त होणार्या निधीतून ग्रामपंचायतींना करता येणारी कामे घनकचर्याचे शास्त्रीय व वाणिज्य व्यवस्थापन, • गावातील सांडपाण्याचे शास्त्रीय व पर्यावरण प्रवण व्यवस्थापन, • जलनि:सारण गटारी, • रस्त्यावरील सौर पथदिवे,• सार्वजनिक इमारतीत सौर ऊर्जा वापर, • सौर रस्त्यावरील सौर ऊर्जेव्दारे जल व्यवस्था, • दहन भूमी बांधकाम व त्यासाठी आवश्यक इतर सोईसुविधा पुरविणे,• स्मृती उद्यान, • ग्रामपंचासतीअंतर्गत गावे व वाडयांना जोडणारे लहान रस्ते व बांधकाम,• पांधण रस्त्यांचे बळकटीकरण करणे, • वृक्षारोपण, उद्याने • बसथांबे बांधणे • आणि मुख्यत्वे राजीव गांधी भारत निर्माण ग्राम सुविधा केंद्रामार्फत ६०.४० प्रमाण राखून लागणारा अतिरिक्त निधी आणणे. • पर्यावरणाला संतुलित राखून गावाचा विकास करणे तसेच रोजगार व स्वयंरोजगार गावकर्यांना उपलब्ध करुन देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.• ५० मॉयक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टिकच्या पिशव्यांवर कायम बंदीचे सातत्य राखण्यावर आणि वृक्षारोपण करुन वृक्ष जगण्यावर विशेषत: भर योजनेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. • योजनेच्या अंतलबजावणीसाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे.• ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभागी होण्यासाठी निकषांची पूर्तता केल्यानंतर आपला प्रस्ताव संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर क तील.• त्यानंतर समितीकडून ग्रामपंचायतीने निश्चित केलेले निकष पाळले काय याची जिल्हा परिषद मतदार संघनिहाय समित्या करुन तपासणी करण्यात येईल.• निकष पूर्ण करणारे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेकडे गट विकास अधिकारी पाठवतील. • प्रत्येक पंचायत समिती क्षेत्रात, शक्यतो १०००० लोकसंख्येच्या वरील ग्रामपंचायत आणि तालुका मुख्यालयी अशी ग्रामपंचायत असल्यास तिला प्राधान्य देऊन, अशी ग्रामपंचायत आदर्श पर्यावरण संतुलित समृध्दी ग्राम म्हणून विकसित करण्यासाठी निवडण्यात येईल.• अशा ग्रामपंचायतीची जबाबदारी, विशेष अधिकारी, शासकीय प्राधिकरण, सेवाभावी संस्था, सामाजिक जबाबदारी घेणारे प्रगतशील उद्योजक, लोकप्रतिनिधी हे घेतील.• ग्रामदत्तक उपअभियान स्वरुपात अशा ग्रामपंचायतीना कृतीशील मार्गदर्शन करुन ती ग्रामपंचायत इतर ग्रामपंचायतीकरीता ज्ञानवर्धन केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात येईल.• या योजनेच्या अंमलबजावणीत जी गावे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतील व ज्यातून विज्ञान, तंत्रज्ञान व्यवस्थापकीय व लोकसहभागीय अशा आदर्शकृती इतर गावांना पर्यावरण संतुलित ग्राम विकासाकरिता प्रत्यक्ष राबविण्यास प्रमाणभूत व सहाय्यभूत ठरतील त्यांचे संकलन करण्यात येईल.• अशा गावांसाठी प्रोत्साहनपर व गौरवपर पारितोषिक योजना राबविण्यात येईल.• आदर्श कृतीची माहिती होण्यासाठी अभियानातील यशस्वी गावांना इतर ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी यांच्या आदानप्रदान भेटी आयोजित करण्यात येतील. -- बातमीदार
August 30, 2010
साधारणत: ७०-८० च्या दशकात जेव्हा टेलिफोनचं संभाषण सर्वांच्या आवाक्यात आलं त्यावेळी पीं.सी.ओ. बुथच्या बाहेर किंवा बुथ नसेल तरी पण स्वकीयांबरोबर बोलण्यासाठी रीघ लागायची, हे चित्र शनिवारी रात्री आणि रविवारच्या दिवशी हमखासपहायला मिळायचं
October 19, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti