वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अनेन स्तवेनादरादंबिकेशं
परां भक्तिमासाद्य यं ये नमंति |
मृतौ निर्भयास्ते जनास्तं भजंते
हृदंभोजमध्ये सदासीनमीशम् ‖ ३९ ‖
आता स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती सादर करावीत अशा स्वरूपातील या दोन श्लोकांमध्ये आचार्य श्री प्रस्तुत स्तोत्राच्या पठना चे लाभ व्यक्त करीत आहेत.
आरंभीच्या दोन चरणात या स्तोत्राचा पठनाची पद्धती मांडताना आचार्यश्री म्हणतात,
अनेन स्तवेनादरादंबिकेशं - या स्तवनाच्या द्वारे ची आदरपूर्वक भगवान श्री अंबिकेशांचे स्तवन करतात,
परां भक्तिमासाद्य यं ये नमंति - परम भक्तीने युक्त होऊन जे त्यांना नमस्कार करतात.
अर्थात स्तोत्राचे पठन हे आदरपूर्वक आणि भक्तिपूर्वक असावे हे आचार्य श्री अधोरेखित करीत आहेत. तो केवळ उपचार नसावा किंवा स्वार्थ नसावा हे त्यात गृहीत आहे.
अशा सांगितलेल्या मार्गाने या स्तोत्राचे पाठ करतात त्यांना मिळणारी दोन अद्वितीय लाभ सांगतांना आचार्य म्हणतात,
मृतौ निर्भयास्ते- ते निर्भयपणे मृत्यूला सामोरे जातात. जनास्तं भजंते- लोक त्यांची उपासना करतात.
यात त्याच्या स्वतःच्या जीवनाचे कल्याण होते हे त्याच्या निर्भय मृत्यूतून वर्णन केले. सोबतच तो इतरांच्या जीवनाचे कल्याण करतो. त्यांनाही शिव मार्गाला लावतो हे दुसऱ्या उल्लेखात आचार्य स्पष्ट करीत आहेत.
यासाठी जीवनाचे साफल्य कशात आहे? हे सांगताना आचार्य म्हणतात,
हृदंभोजमध्ये सदासीनमीशम् - सदैव आपल्या हृदयकमळात निवास करणाऱ्या भगवान शंकरांचे स्मरण करावे.
तोच आपल्या परम कल्याणाचा मार्ग आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 18, 2020
लक्षात असे येत आहे, की दररोज जेवताना मनात एकच विचार असतो,
हा घास मी चुकीचा तर घेत नाही ना ?
याने माझे काही नुकसान तर होणार नाही ना ?
मी आहाराचा कोणता नियम चुकवत तर नाही ना ?
एवढे नियम पाळूनही ही दररोजची औषधे काही कमी होत नाहीत.
एवढी औषधे खायची तर जेवायचे तरी कशाला ?
मी एवढे नियम पाळतो, पण माझा काहीच फायदा होत नाहीये.
September 3, 2016
आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे असे वर्णन आहे. बुद्ध चरित्रात गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत होते याच्या कथा आहेत.
September 21, 2023
गुरुगीतेमध्ये महेशानी अंबेला सांगितले, “जीवीत तेही समर्पिजे” म्हणजे सर्वस्व जो तुझा जीवात्मा आहे तो देखील तू अर्पण कर. काही शिल्लक ठेऊ नकोस. “जीवात्मा अर्पण केलास कि शिवात्मा प्रगट होणे म्हणजे आत्मज्ञान प्रगत होणे. गुरुगीतेत सांगितल्याप्रमाणे मी तू रहीत होणे म्हणजेच जीवात्मा अविनाशाप्रत अर्पण करणे.
September 16, 2011
अमेरिकेचं आधुनिक, शहरी, चंगळवादी रूप डोळ्यांसमोर आणलं की त्यात धार्मिकतेला फारसा वाव असेल असं वाटत नाही. झगमगते शॉपिंग मॉल्स, अत्याधुनिक गाड्या, हॉलिवूड आणि वॉलस्ट्रीट, फास्ट फूड आणि जंक फूड, टीन प्रेग्ननसीज आणि सर्रास होणारे घटस्फोट, शस्त्रबळावर जगभर चाललेली पुंडगिरी या सगळ्यात येशु ख्रिस्ताला कुठे जागा असेल का असा प्रश्न मनात येतो.
अमेरिकेत येईपर्यंत ख्रिश्चन धर्माबद्दल आणि त्यातल्या विविध पंथ / प्रवाहांबद्दल माझं सामान्यज्ञान यथातथाच होतं. भारतात असताना कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट अशा दोन ढोबळ नावांखाली सारा ख्रिश्चन धर्म विभागला जायचा. खाली केरळात, सिरियन ख्रिश्चन असा काही प्रकार असल्याचं ऐकून माहीत होतं. अमेरिकेत बहुतांश लोक ख्रिश्चन असतील एवढीच कल्पना होती आणि अत्याधुनिकता आणि प्रागतिकतेच्या शिखरावर असलेल्या या देशात, येशु ख्रिस्तापुढे गुडघे टेकायला लोकांना फारशी फुरसद मिळत असेल, असं वाटलं नव्हतं. किंबहुना व्हॅलेंटाईन डे, इस्टर आणि हॅलोवीन सारख्या पूर्णपणे व्यापारी (बाजारू) पद्धतीने साजर्या होणार्या दिवसांप्रमाणे, ख्रिसमसचे देखील सॅंटाक्लॉज हेच मुख्य आकर्षण असेल आणि येशु आपला नावापुरता हजेरी लावून जात असेल, अशी माझी समजूत होती.
अमेरिकेत आलो आणि कनेक्टिकटच्या हार्टफोर्ड शहरातून बस पकडून, स्टोर्स या निमग्रामीण भागातल्या, छोट्याश्या गावातल्या, युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकटच्या कॅंपसमधे जाऊन पोहोचलो. बसमधून उतरताच पहिली गोष्ट नजरेत पडली ती म्हणजे कॅंपस्च्या मधेच असलेलं पांढरं शुभ्र चर्च. स्टोर्स हे कनेक्टिकटच्या साधारण मध्यवर्ती भागातलं एक युनिव्हर्सिटी टाऊन. लॅंड ग्रॅंट युनिव्हर्सिटी (Land Grant University) असल्यामुळे, सरकार कडून मिळालेली ग्रामीण भागातली भरपूर जमीन. त्यावर १८८७ साली सुरू झालेल्या एका छोट्या शेतकी कॉलेजचे वाढत वाढत आज एक मोठे अद्ययावत विद्यापीठ झाले आहे. स्टोर्स गावाची वस्ती २५-३० हजार. बहुतेक सगळे विद्यापीठातील विद्यार्थी, प्रोफेसर्स किंवा इतर कर्मचारी वर्ग. कॅंपसच्या मधून जाणारा यु.एस. १९५ हा मोठा वहाता रस्ता. त्याच्या एका बाजूस मुख्य कॅंपस आणि बहुतेक सारी डिपार्टमेंट्स. रस्त्याच्या दुसर्या बाजूला आमचं शेतकी कॉलेज. शेती, पशुपालन, नैसर्गिक साधन संपत्ती वगैरे विषयांचा समावेष असल्यामुळे शेतकी कॉलेजला, विद्यापीठातील इतर कॉलेजेस पासून थोडं वेगळं आणि दूरच ठेवलं होतं. त्यात जनावरांचे फार्मस्, शेती अवजारांच्या शेड्स, ग्रीन हाऊसेस, घोडेस्वारीसाठी राखीव मैदान वगैरे गोष्टींमुळे एका बाजूचा थोडासा टेकड्यांचा आणि झाडाझुडपांनी आच्छादलेला, असा मोठा विभाग शेतकी कॉलेजच्या वाट्याला आला होता.
शेतकी कॉलेजच्या पुढ्यातूनच यु.एस. १९५ हा मोठा रस्ता जायचा आणि कॉलेजच्या कोपर्यावरच हे जुनं पण सुंदरसं चर्च होतं. दिवसभरात कधीतरी त्याचा गंभीर घंटानाद ऐकू यायचा आणि शनिवार, रविवारी लॅबमधे किंवा फार्मवर जाताना, ऑर्गनचे सूर कानावर पडायचे. रविवारी सकाळी विद्यापीठाच्या पोलीस दलातील एखादा पोलीस ऑफिसर चर्चच्या समोर आपली लाल निळ्या दिव्यांची गाडी लावून उभा रहायचा आणि येणार्या जाणार्या गाड्या हाताने थांबवून, चर्चमधे जाणार्या लोकांना रस्ता ओलांडायला मदत करायचा. आमच्या कॉलेजच्या मागच्या टेकडीवर गायांना चरायला सोडायचे. त्या टेकडीवर जाऊन बसलं की सारा कॅंपस दिसायचा. त्यात जुन्या व्हिक्टोरियन शैलीमधल्या सुबक आणि देखण्या बैठ्या इमारतींमधे दूरवरचा गॅम्पेल पॅव्हेलियन (UCONN चं Indoor Basketball Stadium) आणि पुढयातला चर्चचा पांढरा शुभ्र कळस उठून दिसायचे.
युनिव्हर्सिटीच्या कॅंपसमधलं पांढरं देखणं चर्च हे न्यू इंग्लंडमधल्या चर्चेसचा एक नमुना होतं. न्यू इंग्लंडमधील (अमेरिकेच्या ईशान्य भागातली राज्ये) बरीचशी, विशेषत: छोट्या गावांतील चर्चेस एका विशिष्ट धाटणीची होती. पांढरा स्वच्छ रंग, निमुळतं होत जाणारं शिखर, एखाद्या ग्रीक शैलीतल्या इमारतीसारखे चर्चच्या प्रवेशद्वारापाशी असणारे पांढरे उंचच उंच खांब, एखादा छोटासा बेल टॉवर आणि त्यात असणारी घंटा. ही सारी चर्चेस तशी छोटीशीच. लहान गावातल्या आणि आसपासच्या वस्त्यांवरच्या थोड्याफार लोकांना पुरतील अशी.
-- डॉ. संजीव चौबळ
April 20, 2016
हर्निया हा सहज आढळणारा आजार आहे. तो सगळ्या वयोगटांमध्ये व स्त्री-पुरुष अशा दोन्हींतही दिसतो. हर्निया म्हणजे आपल्या पोटाचे स्नायू कमजोर होतात, पोटात काहीशी पोकळी निर्माण होते आणि पोटातील आतडी बाहेर येऊन फुगा निर्माण करतात. मोठे आतडे किंवा लहान आतडे हर्नियाच्या पिशवीत ओढ लागणे, फुगा दिसणे, फुगा कमी-जास्त होणे, पोट फुगणे यांसारखी लक्षणे दिसतात.ही लक्षणे हळूहळू किंवा अचानक दिसतात. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रमाणात दुखत असते. काही लोकांना वाटते, की पोटात काहीतरी फुटले आहे किंवा काहीतरी वेगळ्या दिशेने जात आहे. आणखी काही लक्षणे अशी -अशक्तपणा जाणवणे, पोटात आग होणे, दुखणे.पोटातील फुगा, जांघेत दिसतो. मात्र खोकला काढल्यावर किंवा झोपल्यावर तो दिसत नाही.काहीतरी जडान्न खाल्ल्यानंतर खोकला आला तर दुखते.पोटातील कुठल्याही भागात हर्निया होऊ शकतो, पण सगळ्यात जास्त हर्निया जांघेत दिसतो.
हर्नियाचे तीन प्रकार आहेत -१) जांघेतील हर्निया, २) बेंबीतील हर्निया, ३) शस्त्रक्रियेनंतर होणारा हर्निया.
हर्नियामध्ये घ्यावयाची काळजी - शरीराला कमीत कमी ताण द्यावा. कारण तेवढ्यानेही पोटात दुखून अस्वस्थता वाढते. ऑपरेशनमुळे हा त्रास कमी होतो. ट्रिटमेंट न दिल्यास हर्निया वाढू शकतो व एक वैद्यकीय आणीबाणी निर्माण होऊ शकते. वर्षानुवर्षे साधा वाटणारा हर्निया अचानक आतडे अडकल्यामुळे ऐनवेळी जिवाला धोका उत्पन्न करू शकतो. हर्निया हा अचानक मोठा होऊ शकतो किंवा अडकू शकतो आणि त्यात अडकलेल्या आतड्याचे गॅंग्रीन होऊ शकते. अशा वेळी त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यावाचून इलाज नसतो.
हर्निया कसा बरा करतात?
हर्निया बरा करण्याचे वेगवेगळे प्रकार वापरता येतात. १) टेन्शन रिपेअर, २) टेन्शन फ्री रिपेअर, ३) दुर्बिणीतून टेन्शन फ्री उपचार. रुग्णांसाठी सगळ्यात चांगली पद्धत कुठली आहे, ज्या पद्धतीच्या वापरानंतर शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला त्रास होणार नाही, हे डॉक्टयर ठरवतात. आधुनिक शस्त्रक्रियेत साधी भूल दिली जाते. शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन दिवस रुग्णालयात राहावे लागते आणि आठवड्याच्या आत कामावर रुजू होणे शक्यध होते. अत्याधुनिक थ्रीडी मेश पद्धतीमुळे हे सर्व सहज शक्ये झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ:- डॉ. जयश्री तोडकर
January 7, 2017
मराठी किती संपन्न भाषा आहे पहा. एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न :
"दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए"
या वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करा.
वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे..,
विद्यार्थी-१ (पुणे)
ह्रदयाचे तुकडे तुकडे करुन गालावर खळीसह चालती झाली...
विद्यार्थी-२ (नाशिक)
ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी...!
विद्यार्थी ३ (मुंबई)
दिल ब्रेक करुन वर नुस्ती एक स्माईली सेंड करुन परतीची लोकल पकडलीस...!
विद्यार्थी-४ (अकोला)
मनाचा बुकना बुकना करून दात ईचकुन निंगुन गेली
विद्यार्थी-५ (अमरावती)
कलिजाचे मार कुटके कुटके केले माह्या, अन दातकाड काहाडत कुठं चाल्ली वं !
विद्यार्थी-६ (यवतमाळ)
निरे तुकळे केलेना हिर्दयाचे, न वरुन जाता जाता बत्तिशी दाखुन राह्यली..आं !!
विद्यार्थी-७ (वाशिम)
कायजाच्या पार चिंध्या करून टाकल्या माहया, अन हेंबाडथुत्री दातकड विचकत जाऊन राहाली भैताड़ लेकाची
विद्यार्थी-८ (बुलढाना)
लांग चिथडे करुन माया कायजाचे वरुन लय दातं इचकून रहाली तु तं.. आन चाल्लि लगे..
विद्यार्थी ९ (वर्धा)
बाप्पा !! पार चिटोरे चिटोरे केले पोट्टिन कायजाचे अन बगा कशी जाऊन रायली फिदिफिदी हासंत
विद्यार्थी १० (नागपूर)
दिलची बोटी बोटी करुन गालात हासत हासत च्याल्ली न बे ...
विद्यार्थी ११ (धुळे)
काळीज ना तुकडा तुकडा करी सन गाल गाल मा हसी सन तरफडली बेरड !
विद्यार्थी १२(लातूर) :
आरं बाबो, अगुदर तर काळजाची पार वाट लावली ! वरनं माज्याकड बगुन दाताड इचकत निगुन गेली, च्या मायला...!
विद्यार्थी १३ (मालवण) :
मेली अवदीसा नायथयली...,
तेचा त्वांडार शिरापडली ती...,
तेच्या आवशिक खाली कोल्यान...,
माझा काळीज नांगरुन.., खिदळत - खिदळत वाटेक लागला ता अक्कर माशी प्वार...!!!
विद्यार्थी १४ ( चिपळूण ) :
जल्ला कनाखाली जालपोल केलीव नी कालजाचं पानी पलवलनं नं तीनं ...आनी फारकन पलाली
February 6, 2017
डॉ. कविता पवन लड्डा, लातूर, महाराष्ट्र. यांचे द्वारे महत्वपुर्ण माहीती खास तुमच्यासाठी.
शुक्रवारी श्राध्द पक्ष संपून एक तारखेपासून घट स्थापना होऊन नवरात्रीचा प्रारंभ होत आहे. भगवती आदिशक्तीची पुजा संपुर्ण देशात आपापल्या रितीप्रमाणे मांडली जाते. कित्येक लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करुन आपली भक्ती व्यक्त करतात. उपवासाच्या निमित्ताने वजन कमी करण्याचे यंदा व्रत घेऊ या , यंदा शक्तीच्या उपासनेत उर्जा खर्ची घालू या. आपण उपवास तर करतो आणि मग दिवसभर काय खातो तर कुठे साबुदाणा, शेंगदाणा, बटाटा, रताळी असे पिष्टमय पदार्थ. बाद करा हे सर्व पदार्थ आपल्या आहारातून ! नवरात्रीच्या उपवासाची एक नविन संकल्पना रुजवू या. सर्वात आधी संकल्प करा मला माझे वजन या नवरात्रीत कमी करायाचेच आहे.
नवस आरोग्याचा - पुढे दिलेली माहिती ही आमच्या नावासहित अधिकाधिक ग्रुपपर्यंत पोचवा, जेणेकरून संपुर्ण देशातील आई भवानीच्या भक्तांना याचा योग्य लाभ मिळेल. डॉ. कविता पवन लड्डा, लातूर --महाराष्ट्र.
उपवासाच्या निमित्ताने का होईना लठ्ठपणा कमी करण्याची सुरुवात करणार . दस-याला घालायला जे नवीन कपडे निवडले आहेत ते थोडे आधिच्या नंबरचे निवडा, दस-याला मी ते घालणारच. अर्थात त्या कपडयात मी फिट बसेल असा मनाशी निर्धार करा. त्यासाठी करावा लागेल व्यायाम. तुम्ही विचार कराल आधीच उपवास अजून कुठे व्यायाम करुन थकवा उद्भवू दयायाचा. पण मनातून हा गैरसमज काढून टाका, की व्यायामाने थकवा येणार आहे. योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास थकवा न येता दिवसभराचे काम करण्यास उत्साह येतो, आपला स्टॅमिना वाढतो, शिवाय वजन कमी होते, पण अजून एक विचार मनात येणार की देवीच्या भजन पुजनात मध्येच कशाला व्यायामाचा अडथळा, तर नाही आपण भक्तीच्याच मार्गाने व्यायामाचा अवलंब करणार आहोत. तुम्हाला रोज 60 ते 90 मिनिटे व्यायाम करायचा आहे. त्यासाठी....
1) देवीच्या मंदीराला संपुर्ण 108 प्रदक्षिणा घाला.
2) देवीला लोटांगण घालून 11 ते 21 नमस्कार घाला.
3) देवीच्या मंदीराला जाण्यासाठी पायी जाण्याचा पर्याय निवडा, पण दुरचे मंदिर निवडा.
4) आपण केलेल्या चुकांची उठ-बशा करुन देवीला क्षमा मागा.
5) आपले कान हाताने धरून 50 ते 100 उडया जागच्या जागी मारा.
6) उशीरा रात्री जागून, नाचून - नाचून भजनात दंग व्हा किंवा गरबाच्या कार्यक्रमात सक्रियपणे सामिल व्हा.
याशिवाय जमल्यास नियमितपणे 45 मि. चालण्याचा व्यायाम करावा.
जमतील ना साधे सोपे हे व्यायामाचे पर्याय !
वरील दिलेले व्यायाम प्रकार सर्वसाधारणपणे सर्वांना चालतात. तरी योग्य लाभ प्राप्त होण्यासाठी व वैयक्तिक रित्या कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी 9326511681 या व्हाटस्अॅप नंबरवर चौकशी करू शकता....जर आपण कुठल्याही व्याधीने ग्रस्त असाल किंवा वयोवृध्द असल्यास सर्व व्यायाम प्रकार आपणास चालणार नाही, त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा परामर्श आवश्यक होय किंवा वरील मोबाईल नंबरवर मेसेज करावे.
यासोबत खाण्यापिण्याचे वेळापत्रक देखील सांभाळांयचे आहे. या नवरात्रीला आपल्याला खायचे आहे, भरपुर फळे, दुध, ताक आणि राजगीरा.
खाण्या पिण्याचा दिनक्रम योग्य तरहेने होण्यासाठी दहा दिवसाचा एक वेळापत्रक बनवून घेऊ ...
** दररोज सकाळी उठल्याबरोबर १ ग्लास गरम गरम पाणी फुंकुन फुंकुन प्यावे.
** नंतर बिना साखरेचे विलायची युक्त दुध किंवा कमी साखरेचा चहा.
* रोज नाश्ता करण्यापुर्वी धणे पाणी ,ओवा पाणी किंवा जिरा पाणी अवश्य घ्यावे. हयामुळे पचन व्यवस्थित होते, व शरीरातील विषाक्त द्रव्यांचे ज्वलन होण्यास मदत होते. * फळे नेहमी ताजी घ्यावीत व फ्रिजमधली गार नको . तसेच फळावंर काळया मि-याची पुड आठवणीने टाकावी.
** धणे पाणी ,ओवा पाणी किंवा जिरा पाणी बनविण्याची कृती :-- दोन चमचे अर्धवट कुटलेले धणे किंवा ओवा किंवा जिरे घ्यावे. एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजू दयावे. व सकाळी चांगले मसळून - गाळून प्यावे.
दिनांकः 1 ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 10-15 खिसमिस व 4 बदाम
दुपारी 12 ते 2 2 संत्री
दुपारी 2 ते 5 1-2 ग्लास ताक
संध्या 6 ते 8 राजगीरा पोळी भेंडीची भाजी
दिनांकः २ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 आक्रोड1-2 व 1-2 जर्दाळू
दुपारी 12 ते 2 2 मोसंबी
दुपारी 2 ते 5 ताक
संध्या 6 ते 8 राजगीरा थालीपिठ व कढी
दिनांकः ३ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 1 उकडलेला बटाटा
दुपारी 12 ते 2 अननस
दुपारी 2 ते 5 ताक
संध्या 6 ते 8 काकडी कोशिंबीर व राजगीरा चपाती
दिनांकः ४ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 6 बदाम व 20 चारोळी
दुपारी 12 ते 2 टरबुज
दुपारी 2 ते 5 ताक
संध्या 6 ते 8 राजगिरा लाही व दुध
दिनांकः ५ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 4 खारीक व 4 बदाम
दुपारी 12 ते 2 पपई
दुपारी 2 ते 5 ताक
संध्या 6 ते 8 राजगीरा चपाती व गोल भोपळयाची भाजी
दिनांकः ६ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 20 मनुक्के 4 अंजीर
दुपारी 12 ते 2 डाळिंब
दुपारी 2 ते 5 नारळ पाणी
संध्या 6 ते 8 2 ते 4 राजगीरा लाडू
दिनांकः ७ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 भाजलेले शेंगदाणे व गुळ
दुपारी 12 ते 2 तूपात परतलेले तालमखाणे
दुपारी 2 ते 5 नारळ पाणी
संध्या 6 ते 8 राजगीरा चपाती व राजगीरापानांची भाजी
दिनांकः ८ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 कॉफी व राजगीरा बिस्कीट
दुपारी 12 ते 2 कोथीबिंरीचा रस
दुपारी 2 ते 5 नारळ पाणी/ताक
संध्या 6 ते 8 राजगीरा पिठाचा उपमा
दिनांकः ९ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 एक वाटी घट्ट दही व मध 2चमचा
दुपारी 12 ते 2 उसाचा रस
दुपारी 2 ते 5 ताक/नारळपाणी
संध्या 6 ते 8 राजगीरा पोळी व काकडीची भाजी
दिनांकः १० ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 ओल्या नारळाचा खिस
दुपारी 12 ते 2 सफरचंद
दुपारी 2 ते 5 ताक/नारळपाणी
संध्या 6 ते 8 राजगीरा पोळी व कच्च्या पपईची कोशिबीर
** दिवस भरात अधुन मधुन बिना साखरेचे लिंबु पाणी प्यावे.
** दररोज रात्री झोपताना १ ग्लास गरम गरम पाणी फुंकुन फुंकुन प्यावे.
अशा प्रकारे नवरात्रीचे दहा दिवस हा आहारक्रम आपणास ठेवायचा आहे, जेणे करुन नक्कीच आई भवानी आपणास पावेल. हा आहार घेताना लक्षात घ्या, रोज वेगळया पदार्थांची निवड आपण केली आहे, त्यामुळे सर्व प्रकारची जिवनसत्वे आपल्या शरीरात जातील व आपणास कुठल्याही प्रकारे उपवासाने अशक्तपणा येणार नाही, राजगीरा हा पदार्थ मात्र दररोज वापरायचा आहे, कारण राजगीरा हे धान्य पचावयास खुप हल्के आहे, याने पोट तर भरते मात्र वजन वाढत नाही शिवाय या मध्ये भरपूर मात्रेत कॅल्शियमचे प्रमाण आहे. राजगीरा धान्य बाजारातून आणून स्वच्छ करुन घरी त्याच्या लाहया फोडाव्यात . गरम झालेल्या कडाई मध्ये थोडे थोडे राजगीरा टाकत जावे व हलवित राहावे, क्षणार्धात लाहया फुटतात. तसे तसे त्या बाजुला काढा हयाच लाहया मिक्सर मधून काढल्यास पीठ तयार होते याचीच आपण पोळी करुन घ्यावयाची आहे. यात शाबूदाना वा भगरीचे पीठ कालविण्याची आवश्यकता नाही
* कुठल्याही प्रकारे साखरेचा वापर करु नका.
* खूप खूप वेळ उपाशी राहु नका. थोडया थोडया अंतराने आपण खात राहायचे आहे. कारण आपण ऐकलेच असेल भुके पेट भजन ना होये, म्हणून आधी पोटोबा मग विठोबा ! * फळांचे मिल्कशेक करु नका, शक्यतो सर्व पदार्थ या काळात घरी तयार करून घेतलेले खावे.
* दुस-या दिवशी काय खायचे आहे त्याची तयारी आदल्या दिवशी करा, म्हणजे वेळेवर फजिती नको.
* गंभीर आजारांनी ग्रस्त, मधुमेही रुग्णांनी उपवास करु नये.
तर आशा आहे तुम्हाला हा उपवासाचा वेळापत्रक आवडेल व तुम्ही भक्तीभावाने याचा अवलंब कराल तर मग बोला अंबे आईचा उदो उदो !!! जय माता दी।
डॉ. सौ. कविता पवन लड्डा
आयुर्वेदाचार्य
लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय
लड्डा स्किन अॅण्ड हेल्थ केअर सेटंर
गर्भसंस्कार केंद्र, लातूर.
मो. 09326511681
*वजन कमी करण्यासाठी ०९३२६५११६८१ या व्हॉट्सएप नंबर वर अवश्य मेसेज करा....
आमच्या चिकित्सालयात लठ्ठ रूग्णांचे वजन कमी करण्याचे कार्य नियमितपणे व खूप प्रभावी ढंगाने यशस्वी रित्या चालते. मागच्या वर्षी याच वेळापत्रकाच्या मदतीने अनेक जणांनी खूप चांगल्या प्रकारे आपले वजन कमी केले.
आणि हो आपला अभिप्राय देण्यास नका विसरू !
October 1, 2016
१ जानेवारी २०१० ला ‘कुतूहल’ या सदराची जबाबदारी ‘समन्वयक’ म्हणून माझ्याकडे आली. माझ्या अगोदरच्या समन्वयकांनी या सदराला उच्च स्वरूप आणले होते त्यामुळे माझी जबाबदारी वाढली होती. वयाच्या ७८ व्या वर्षी वर्षभर सोमवार ते शनिवार सदर सातत्याने चालविण्याची जबाबदारी स्वीकारताना तेही माझ्या वैद्यकीय व्यवसाय व इंडस्ट्रियल अॅटॅचमेण्टस् सांभाळून- जरा विचार करावा लागला; पण प्रकृतीने उत्तम साथ दिली.
April 9, 2023
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना रोखण्यासाठी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली. सरकार म्हणते त्याप्रमाणे पॅकेजची प्रभावी अंमलबजावणीदेखील सुरू झाली. परिणाम काय झाला तर शेतकरी आत्महत्येच्या बातम्या पूर्वी आठवड्यातून तीनचार दिवस उमटायच्या त्या आता दररोज उमटू लागल्या.
May 14, 2006
Copyright © 2025 | Marathisrushti