वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गेली तीन दशके कार्यरत असलेल्या हबल अंतराळ दुर्बिणीची, जेम्स वेब अंतराळ दुर्बीण वारसदार ठरणार आहे. सहा टन वजनाच्या या दुर्बिणीचा आरसा हबल अंतराळ दुर्बिणीच्या आरशाप्रमाणे एकसंध नसून, तो एकूण अठरा छोट्या आरशांपासून तयार केला गेलेला आहे.
June 19, 2026
गेली ७० वर्षे या ‘कलम ३७०’ मुळे भारतातील इतर कुठलेही कारखाने, उद्योगपती, उद्योजक काश्मीरमध्ये जाऊन आर्थिक व्यवहार, उद्योग-व्यवसाय करू शकत नव्हते. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जो प्रचंड निधी केंद्र सरकारकडून दिला जात असे, त्याचा दुरूपयोग केला जायचा. एखादा प्रकल्प महाराष्ट्रात १० लाखांमध्ये बांधला जात असेल, तर तो जम्मू-काश्मीरमध्ये अनेक पटीने जास्त पैसे खर्च करून तयार केला जायचा. ९० टक्के पैसे हे काश्मीरमधील २५० कुटुंबाच्या खिशात जात होता. त्यामध्ये राजकीय पक्ष, तेथील काही उद्योजक आणि हुर्रियत कॉन्फरन्ससारखे समर्थक होते.
August 18, 2019
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीदरम्यान काय भूमिका घेतील याबद्दल सर्वांनाच कुतुहल होते. या दौर्यात ओबामा यांनी भारताभिमुख भूमिका घेतली तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीतील भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा देऊन त्यांनी खूष केले; परंतु जाता-जाता भारताने इराणच्या अणुकार्यक्रमाला तसेच म्यानमारमधील मानवी हक्कांच्या पायमल्लीला विरोध करावा असे सुचवून स्वत:चे हित साधले.
November 10, 2010
जेन गुडाल (Jane Goodall) या लंडनवासी तरुणीने आफ्रिकेच्या जंगलात जाऊन तेथील चिंपाझी माकडांचे दीर्घकाळ जवळून निरीक्षण केले. काही चिंपाझींशी तिने मैत्री केली. त्यांची बारशी करून त्यांना तिने नावे ठेवली. त्यांच्या जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने त्यांच्या सहवासात राहून तिने अभ्यास केला. आपल्या निरीक्षणांनी मानववंशशास्त्रात कायमस्वरुपाची मोलाची भर घातली.
April 6, 2023
हि गोष्ट आहे १९६२ च्या चीनशी झालेल्या युद्धात, लडाखच्या रेझान्ग्ला खिंडीत शूर भारतीय सैनिकांनी केलेल्या, एका लढाईची. ही लढाई चुशुल जवळच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये लढली गेली.
February 16, 2024

आजच्या औद्योगिक युगातली एक महत्त्वाची गरज म्हणजे कागद. लिखाणासाठी किंवा छपाईसाठी वापरला जाणारा कागद, वेष्टणासाठी वापरला जाणारा कागद, नॅपकिन म्हणून वापरला जाणारा कागद… अशा वेगवेगळ्या स्वरूपात कागदाचा वापर केला जातो. मात्र या कागदनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान, लाकडाच्या लगद्यातील काही पदार्थ वेगळे करून काढून टाकावे लागतात.
July 28, 2023
भारतातल्या नामवंत आर्ट्स स्कूल्सपैकी विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीचं आणि प्रथम पसंतीचं आर्ट कॉलेज म्हणजे ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’. ड्रॉइंग, पेंटिंग, शिल्पकला अशा विविध प्रकारच्या कलांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न असतं ते म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ऍडमिशन मिळवणं. इथे ऍडमिशन घेण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात.
March 2, 2025
शिवरायांनी एक पुल बांधला होता माहिती आहे का..?????
प्रतापगडाच्या पायथ्याशी "पार्वतीपुर" नावाचे एक गाव आहे नंतर त्यांचे "पार"असे नाव पडले. पार गावाजवळ शिवरायांनी एक पुल बांधून घेतला होता,त्याच खणखणीत नि योजनापूर्व केलेले बांधकाम अजूनही शाबूत आहे.
८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा.
कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ मीटर लांब,८ मीटर रुंद असा भक्कम दगडी पुल निर्माण केलेला आहे.पुलाला असणाऱ्या पाच अधारांवर पुलाच्या चार कमानी तयार झाल्या आहेत, त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते. पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने पुलाच्या कमानींना धोका पोहचु नये म्हणून कमानी मधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो. हे सारेच बांधकाम चुन्यात केलेले आहे.
सुमारे साडेतीनशेवर्षां नंतरही हा पुल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे, दगडांच्या फटीमध्ये साधे झाडही उगवलेले नाही पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभर उंचीचा ३० सेमी / १ फूटी दगडी कठडा आहे.
पाण्याचा प्रवाहाचा तडाखा सोसत, पाणी झिरपण्याच्या धोक्यावर मात करत, काही शतके देखभाल न करावी लागणं हेच त्या भक्कम बांधकामाचे वैशिष्ट्य आहे.
August 7, 2016
नौदल दिनाच्या निमित्ताने नौदलाच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावाही घेतला जातो. यंदाच्या नौदल दिनावर मात्र १३ ऑगस्ट रोजी मुंबईत ‘आय.एन.एस. सिंधुरक्षक’ या पाणबुडीला झालेल्या अपघाताचे सावट आहे. या अपघातात नौदलाला ही पाणबुडी आणि त्यावरील १८ नौसैनिक गमवावे लागले होते. सध्या भारताच्या नौदलात ‘सिंधु’ वर्गातील (रशियन किलो वर्ग) एकूण दहा पाणबुड्या कार्यरत आहेत.
December 13, 2013
श्री गणेश हे महाराष्ट्राचं सर्वात लाडके दैवत. भारतातील जे पुराणोक्त २१ गणपती आहेत. त्यापैकी १७ गणपती एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशभरातील गणपती मंदिरांची संख्या लाखोंच्या संख्येने आहे. दिवसेंदिवस गणेशभक्तांची संख्या वाढतच आहे. गणपतीचे नुसते नाव जरी घेतले तरी चार हातांच्या गोंडस मूर्तीचे रूप चटकन नजरेसमोर येते.
September 18, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti