वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
औषधाचे गुणधर्म जपून ती टिकावू व्हावीत, त्यांचा शरीरात योग्य ठिकाणी परिणाम व्हावा व ती सुलभतेने घेताही यावीत यासाठी औषधे वेगवेगळ्या रुपात बनविली जातात. व (पातळ) औषधे, गोळ्या, कॅप्सूल, इंजेक्शन, त्वचेवर लावायची औषधे, हुंगायची औषधे, अशी बहुरुपी औषधे आज आपण वापरतो. यातील बहुतांशी औषधे ही शरीरांतर्गत जाऊन रक्तात शोषली जातात व ईप्सित स्थळी (टारगेट ऑर्गन) जाऊन परिणाम करतात.
June 20, 2023
करंज हा सदाहरित वृक्ष भारतात सर्वत्र आढळून येतो. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘पोंगॅमिया पिन्नाटा’ असे आहे. सर्व प्रकारच्या हवामानात याची वाढ होते. काळी चिकणमाती अथवा जांभ्या जमिनीत याची वाढ चांगली होते. हा पश्चिम घाटातील मूळ रहिवासी असून ब्रह्मदेश, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे.
May 2, 2024
“आज सर्व सुजाण नागरिकांनी या लोकप्रतिनिधींना आपला देश, किंवा आपले राज्य कसे चालवलं पाहिजे ? कुठल्या तत्वावर चाललं पाहिजे ? याच विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरण आणि ते पूर्ण करण्यासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा करून ते सत्यात उतरवणं म्हणजे खर जागृत राजकारण होय.”
June 27, 2023
चॉकलेट किंवा त्याचा कच्चा माल असणाऱ्या कोकोचेउगमस्थान कोणते, हा एक कुतूहलाचा विषय आहे. कारण, हा विषय फक्त चॉकलेट या पदार्थाशी निगडित नसून तो मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीशीही संबंधित आहे. त्यामुळे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना अधिकाधिक जुन्या चॉकलेटचा किंवा कोकोच्या वापराचा शोध घेण्यात मोठे स्वारस्य आहे. याच संशोधनातून मिळालेली ही माहिती…
September 3, 2023

ह्याची वृक्षावर चढणार वेल असते.पाने १२-१५ सेंमी लांब व तीक्ष्णाग्र असतात.फुल लहान एकलिंगी व गुच्छात उगवते.फळ गोल मिरी प्रमाणे दिसते.पण ते गुळगुळीत व तांबूस रंगाचे व ६-८ मिमी व्यासाचे असते.त्याला वर एक छोटा देठ असतो व ते सुगंधी असून तोंडात धरले असता गार वाटते.
ह्याचे उपयुक्त अंग आहे फळ व तेल.कंकोळ चवीला तिखट,कडू असते व हे उष्ण गुणाचे असून हल्के रूक्ष व तीक्ष्ण असते.हे कफ व वातशामक असते.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)सुज व वेदना युक्त अवयवांवर कंकोळचा लेप करतात.
२)मुखरोगात कंकोळाचे फळ चघळायला देतात.
३)जखमेवर कंकोळाचे तेल लावतात.
४)कंकोळाने घामामुळे येणारी दुर्गंध नष्ट होते.
५)बायकांच्या मासिक पाळीच्या तक्रारीत कंकोळ उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️Dr Swati Anvekar
February 9, 2018
रशियाच्या पश्चिमेला असणाऱ्या, काळ्या समुद्राच्या परिसरातील टॅमान द्वीपकल्पावरील डोंगराळ भागात, पॅराटेथिस जलाशयाचे कालानुरूप पुरावे खडकांतील थरांच्या स्वरूपात व्यवस्थित टिकून राहिले आहेत. डॅन व्हॅलेंटिन पाल्कू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टॅमान येथील डोंगराळ जमिनीतले, पृष्ठभागापासून सुमारे पाचशे मीटर खोलीपर्यंतच्या खडकांचे, जवळपास साडेतीनशे थरांतले सुमारे सातशे नमुने गोळा केले.
December 23, 2021
सजीव, त्यांची पुनरुत्पादन यंत्रणा आणि त्यांचा जन्म, या विषयी विचार करता करता काही कवितां स्फुरल्या. त्यापैकी काही येथे देत आहे. कारण त्या, माझ्या … आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांताशी संबंधीत आहेत.
माझा जन्म.....
माझा जन्म हा ….
माझ्या आअीबाबांचा निर्णय होता.
या पृथ्वीवर ….
जन्म घेण्याशिवाय
मला
दुसरा पर्यायच नव्हता ....
प्रत्येक सजीवाच्या बाबतीत हे अगदी खरं आहे. नराचा शुक्राणू आणि मादीचं पक्व बीजांड यांचं संयोग झाला म्हणजे अपत्य पिढीच्या सजीवाचा गर्भपिंड निर्माण होतो, मादीच्या गर्भाशयात त्याची वाढ होते आणि प्रजातीनुसार, ठरलेल्या काळानंतर, अपत्य पिढीचा अेक सजीव, मादीच्या शरीराबाहेर येअून, या पृथ्वीवर स्वतंत्रपणं जगू लागतो. यात, अपत्य पिढीच्या सजीवाला काहीही पर्याय नसतो. निसर्गनियमानुसार त्याचा जन्म होतो.
वनस्पतींच्या बाबतीतही हे खरं आहे. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचा संयोग होअून, फुलातून, त्या प्रजातीचं फळ निर्माण होत.
जनक पिढीचा जन्मही याच प्रकारानं झालेला असतो. त्यांना तरी कोणता पर्याय होता? त्यांच्या आअीबाबांनी त्यांना जन्माला घालून या पृथ्वीवर आणलं होतं. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म ……
ही साखळी अशीच चालू होती.
मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे.
आता कवितेचं दुसरं कडवं वाचा.
बाबांचा शुक्राणू...
त्यांच्या मातापित्यांच्या ....
अनेक पूर्वपिढ्यांतील ....
आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आला ...
आअीचं बीजांड ...
तिच्या मातापित्यांच्या .....
अनेक पूर्वपिढ्यांतील ....
आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आलं ...
बाबांचा शुक्राणू ... आअीचं बीजांड
....माझा जन्म
आणि …
आअीबाबांच्या आनुवंशिक तत्वाचा ....
पुनर्जन्म..
मागच्या अनेक पिढ्यातून माझ्या पिढीपर्यंत अेक चेतना संक्रमीत होत आली हे ही विज्ञानीय सत्य आहे.
सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.
गजानन वामनाचार्य
शनिवारचा सत्संग - 2
शनिवार 3 डिसेंबर 2016
December 3, 2016
मनाची सबलता म्हणजे आपल्या मनातल्या विचारांचा भक्कमपणा. आपल्या मनाचे निरोगी स्वास्थ्य….
June 28, 2020

प्रत्येक सजीवाला त्याचे गुणधर्म हे त्याच्या पेशींतील जनुकांच्या रचनेनुसार प्राप्त होतात. जनुक म्हणजे सजीवाच्या पेशीतल्या डीएनए रेणूंतल्या विशिष्ट रासायनिक रचना. पेशींतील जनुकांच्या संपूर्ण माहितीला, सजीवाचा ‘जनुकीय आराखडा’ म्हटलं जातं. सजीवाच्या जनुकीय आराखड्यात विविध कारणांनी कालानुरूप बदल होत जातात. हे जनुकीय बदल त्या सजीवाच्या स्वरूपात बदल घडवून, त्या सजीवाच्या उत्क्रांतीला कारणीभूत ठरतात. आज अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या जनुकीय आराखड्यांची प्राचीन काळातील सजीवांच्या जनुकीय आराखड्यांशी तुलना करून त्या सजीवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करता येतो.
April 28, 2022
श्रावण आला की मला आमच्या लहानपणीच्या अनेक गमतीशीर आठवणी नजरसमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे श्रावणी. आता तो काळ गेला. मुळात किती लोक जानवे घालतात हाच संशोधनाचा विषय. श्रावणी करणारेही कुणी आढळत नाही. आताच्या पिढीतील मुलांच्या आनंद मिळवण्याच्या विविध गोष्टी बघीतल्या तर आमचे आनंद मिळवण्याचे मार्ग किती साधे आणी सोपे होते हे पाहून आजही मन आनंदाने भरून जाते.
August 13, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti