वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी १९५१ मध्ये नेहरुवर टीका करणारे काव्य लिहिले . त्यामुळे त्याना तुरुंगात टाकले. त्याना सांगण्यात आले माफी मागा तर सुटका करतो . ते माफी मागायला तयार नव्हते . त्यामुळे त्यांची सुटका होत नव्हती. हे राजकपुरला कळले. त्याला माहिती होते की आपण पैसे दिले तर मजरूह ते घेणार नाहीत.
September 18, 2026
मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना, मला नेहेमी एक गोष्ट खटकायची. ती ही, की मुंबईतलं आजचं सर्वात महत्वाचं ‘दादर’चा उल्लेख कुठे यायचा नाही.
August 7, 2018
पुणे मुंबई प्रवास करणार्या प्रत्येकाच्या मनाचा एक कोपरा दख्खनच्या राणीने व्यापलायं. दख्खनची राणी हे बिरूद मिरविणारी मुंबई-पुणे डेक्कन क्वीन आज (१ जून २०११ रोजी) ८१ वर्षांची झाली…कोळशाच्या जागी विजेवर धावणारे इंजिन जोडण्यात आले, प्रवासी संख्येबरोबर डब्यांची संख्या वाढत गेली, रंगसंगती बदलली.. आणि दिवसेंदिवस ही दख्खनची राणी तरूणच होत गेली…
June 1, 2011
योगासनांची विविध अंगं आणि प्रकार आहेत. योगाचे अंग आणि प्रकार यामध्ये फरक आहे. प्राचीन ग्रंथामध्ये योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत. ज्ञानयोग, हठयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग हे काही योगाचे प्रकार आहेत. तसंच यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही योगाची अंगं आहेत. आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या योगासनाची सखोल माहिती
योगासनामुळे शरीर लवचिक राहतं तसंच शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी योगासनं उपयुक्त ठरतात. या योगासनाचे काही प्रमुख प्रकार आहेत. सूर्यनमस्कार, पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन, सिद्धासन, पवन मुक्तासन, सर्वागासन, पश्चिमोतानासन, शीर्षासन, श्वसन, सुखासन हे काही प्रमुख प्रकार असून त्यातला पहिला प्रकार कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत.
सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतील प्राचीन व्यायाम आहे. सूर्यनमस्काराला सवरेश्रेष्ठ आसन मानलं जातं आणि त्याचे अनेक फायदे आहेत. कोवळ्या किरणात पूर्वेला नमस्कार करून सूर्यनमस्कार घालावेत. तसंच ते शांत आणि स्वच्छ जागेत करावेत. सूर्यनमस्कार बाराही महिने करू शकता. सूर्यनमस्काराला सुरुवात करताना सुरुवातीला जमतील तेवढेच सूर्यनमस्कार घालावेत. तसेच ते अनशापोटी केलेले उत्तम. वेळेअभावी ते संध्याकाळी करायचे असतील तर त्यापूर्वी कमीत कमी दोन तास तरी खाऊ नये. सूर्यनमस्कारात बारा क्रिया असतात. त्यातील पहिली क्रिया म्हणजे प्रणामासन.
प्रणामासन प्रणामासन ही सूर्यनमस्कारातली पहिली पायरी आहे.
सरळ उभं राहावं आणि दोन्ही पाय जवळ ठेवावेत. दोन्ही हात छातीच्या मध्यभागी नमस्काराच्या स्थितीत जोडलेले असावेत. मान ताठ आणि नजर समोर असावी. पाठीचा कणा ताठ असावा. शरीर शांत ठेवून आरामशीर श्वास घ्यावा.
फायदा: मन स्थिर होण्यास मदत मिळते. शरीराचा तोल साधला जातो.
हस्तउत्तासन किंवा उध्र्वनमस्कार यात पहिल्या अवस्थेत उभं राहून मान वर करावी. पाठीचा कणा मागच्या बाजूला वाकवावा. आणि हात वर करावेत. या स्थितीत असताना श्वास आत घेतला जातो. तसंच या स्थितीतून पूर्वावस्थेत येताना पाठीच्या कणावर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
फायदा : या अवस्थेत असताना पोटावरची चरबी खेचली जाते. यामुळे तिथली चरबी कमी होण्यास मदत होते.
पादहस्तासन हस्तउत्तसानाच्या स्थितीत असताना जेव्हा श्वास आत घेतला जातो तो श्वास हळुवारपणे सोडत दोन्ही हाताचे पंजे जमिनीला पूर्णपणे टेकवावेत. यात डोकं गुडघ्याला लावावं. ज्याप्रकारे ओणवं उभं राहतो तसंच राहावं पण या स्थितीत हाताचा पंजा जमिनीला टेकलेला असतो.
फायदा : या स्थितीमुळे मेंदूपर्यंत रक्ताभिसरण होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसंच हृदय आणि फुप्फुसांची क्षमता वाढतेच पण पायांचीही ताकद वाढते. या स्थितीमुळे पोटावर आणि ओटीपोटावर दाब आल्याने स्त्रियांची मासिक पाळीसुद्धा नियमित होते. तसंच पोटावरची आणि कमरेवरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.
अश्यसंचलनासन तिसरी क्रिया केल्यानंतर आता हात जमिनीला टेकवून एक पाय मागे ताणायचा तर दुसरा पाय गुडघ्यातून वाकवायचा या अवस्थेत असताना मान किंचीत उंचवावी. पुढे ठेवलेला पाय आणि हात समांतर रेषेत नसले तरी चालतील पण पायाचा अंगठा आणि हाताचा पंजा समान रेषेत असावा.
फायदा : मूत्रसंस्था आणि प्रजननसंस्थेच्या आरोग्यासाठी ही स्थिती उपयुक्त ठरते.
अधोमुखश्वसनासन पूर्वावस्थेतून बाहेर येण्यासाठी आपले दोन्ही पाय समान रेषेत आणावे आणि हात तसेच ठेवावेत. अधोमुखश्वसनासन करताना श्वास बाहेर सोडायचा असतो. यात कमरेखालचा भाग उंचवायचा म्हणजेच इंग्रजी अक्षराच्या उलटय़ा व्ही सारखी स्थिती असते. या अवस्थेत डोकं खालच्या दिशेला असेल.
फायदा : या अवस्थेमुळे पायांचे स्नायू ताणले गेल्यामुळे स्नायू लवचिक होतात. तसंच खांदे मजबूत होतात. पायामध्ये आणि पोट-यांमध्ये गोळे येणं कमी होतं.
अष्टांग नमस्कार : मागील स्थितीतून पुढे जाण्यासाठी हातांवर योग्य प्रमाणात जोर देऊन शरीर जमिनीला टेकवावे. पाय सरळ रेषेतच ठेवून हनुवटीही जमिनीला टेकवावी.
फायदा : हात आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात आणि ताकद वाढते.
भुजंगासन यात दोन्ही हात सरळ रेषेत ठेवून जमिनीला टेकवावे व संपूर्ण शरीराचे वजन हात व पायांच्या चौडय़ांवर तोललं जाईल अशा अवस्थेत राहावं. या आसनामध्ये श्वास आत घेतला जाईल आणि मान जमेल तितकी मागे घेण्याचा प्रयत्न करावा.
फायदा : हे आसन करण्याचा फायदा म्हणजे गॅस आणि पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. तसंच फुप्फुसांची क्षमता वाढते. पाठीच्या कण्यासाठी खूप लाभदायक ठरतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 2, 2017
भाकरी मिळत नाही तर या लोकांनी ब्रेड खावा, केक खावा; रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची काय गरज आह!’ रशियाच्या झारने भाकरीसाठी आंदोलन करणाऱ्यांना सुनावलेल्या या उत्तराची इतिहासाने दखल घेतली आहे. आजही कुणी राज्यकर्ता जनतेच्या प्रश्नांकडे उर्मट दुर्लक्ष करीत असेल तर त्याला या झारची उपमा दिली जाते.
June 10, 2007
आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष झाली तरी मुंबईतील पावसळ्यात आपले ‘येरे माझ्या मागल्या’ अशी दरवर्षी स्थिती असते. सर्व संबंधितांना हुलकावण्या देत मुंबई आणि परिसरात अचानक एवढा पाऊस पडतो की सगळ्यांची तारांबळ..उडवून देतो! अर्थात याला अनेक करणे आहेत त्यातील काही आपण पुढे पाहणार आहोत. यासाठी आपल्याला जरा भूतकाळात डोकावाव लागेल.
July 6, 2015
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 19-पुष्प सातवे
पत्री पूजे मधे आणखी कोणाकोणाला मान दिला आहे तो पाहू.
माका, बेल, धोतरा, तुळस, शमी, आघाडा, डोरली वांगी, कण्हेर, रूई, अर्जुन, गोकर्ण, वड, ताड, केवडा, निर्गुंडी, इडलिंबू किंवा महाळुंग, आवळा, अशोक, दुर्वा, कदंब, ब्राह्मी, जास्वंद, गुलाब, जाई, जुई, चमेली, सायली, चाफा, इ. अनेक वनस्पतींची पाने देव आणि विशेषतः देवींसाठी सांगितलेली आहेत.
यातील काही नावे कळणार नाहीत, गुगल गुरूजींना विचारलेत तर फोटोसहीत दाखवतील.
ही सर्व पाने आपल्या अवतीभवती असतात. फक्त अज्ञानामुळे आपणाला त्याचे उपयोग माहिती असत नाहीत. पण प्रसंगी जीव वाचण्यासाठी सुद्धा काही पाने उपयोगी ठरतात.
पानफुटी किंवा घावमारी किंवा कोंबाचे पान नावाची वनस्पतीचे पान रक्तस्तंभक आहे. म्हणजे कोणत्याही अवयवातून होणारा रक्तस्राव, किंवा बाह्य आघातामुळे जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी ही पाने जादूसारखी काम करतात. जखमेच्या आकारानुसार याची दोन तीन पाने वाटून ही पानांची चटणी जखमेवर लावली असता, जखम पटकन भरून येते.
पेरूचा पाला, लाजरीचा पाला अशाच प्रकारे काम करतो. विशेषतः मुळव्याधीचे रक्त थांबवण्यासाठी पोटातून सुद्धा या पानांची चटणी खावी.
जाईचा पाने चावत राहिली तर तोंडात येणारे उष्णतेचे फोड कमी होतात.
तुळशीचे पान तर कफ विकारावर हुकुमी एक्काच आहे.
हे सर्व उपचार करताना कोणातरी वडीलधारी माणसांची मदत घ्यावीच. यासाठी ते आपल्या जवळ असावेत,( वृद्धाश्रमात नसावेत. ) अन्यथा याचे प्रमाण, वापरायची पद्धत हे सर्वच काही लिहिता सांगता येत नाही ना. यासाठी गुरू हवा. जवळपास असणाऱ्या वैद्यांना भेटून त्यांच्या सवडीनुसार निसर्गाने दिलेल्या या अमूल्य ठेव्याचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवावे. अशी अनेक मंडळी आपल्या अवतीभवती असतात, यांच्याकडून जेवढे मिळेल ते ज्ञान घेत जावे, शिकत रहावे, ज्ञानी होत रहावे.
एरंडाचे किंवा कापसाचे पान टाळूवर ठेवले असता, डोके गरम होत नाही. लहान मुलांची टाळू तेलाने भरून झाल्यावर त्यावर कापसाचे पान लावण्याची आपली परंपरा आहे. आता 'अंगाला तेल लावूच नका', असं डाॅक्टरच सांगतात, तेव्हा विषयच संपला. पण या सर्व जुन्या परंपरा कालबाह्य नक्कीच नाहीत. डाॅक्टरांना देखील माहिती आहे, की या रूढीमागील आरोग्य जरी आपल्याला माहिती नसले तरी, आपण लहानाचे मोठे झालो तेव्हा आपल्या आईने आपल्याला हे सर्व उपचार केलेले होते, फक्त हे उपचार आज आमच्या पाश्चात्य धर्तीच्या सिलॅबसमधे लिखित स्वरूपात नाही, आणि आमच्याकडे यातील आरोग्य शोधून काढायची दृष्टी नाही एवढंच.
देवाच्या नावाने का होईना पण काही वनस्पतींना आपल्या अवतीभवती जागे ठेवणाऱ्या या भारतीय रूढी परंपरंपरांना साष्टांग नमस्कार.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.06.2017
June 12, 2017
सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि कधी कधी पिगमेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तृळं निर्माण होतात. ते घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या क्रिमचा वापर केला जातो. पण, जर काही घरगुती उपाय केले तर ही वर्तुळे काही प्रमाणात कमी करता येऊ शकतात. त्यासाठी काही घरगुती उपाय चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.
टोमॅटो आणि लिंबाचा रस डोळ्यांच्या खाली लावून तो सुखल्यावर चेहरा धुवून घ्यावा. नियमित असे केल्याने डोळ्याखालची वर्तुळे हळू-हळू कमी होतात.
बदामाच्या तेलाने जवळपास २० मिनिटे डोळ्यांभोवती मसाज करावा.
पुदीन्याचा रस लावल्यानेही काळी वर्तुळे कमी होतात.
काकडीच्या किंवा बटाटयाच्या चकत्या डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्याखालील फुगीरपणा कमी होऊन तिथली त्वचा ताजीतवानी होते.
साध्या थंड टी बॅग्ज डोळ्यांभोवती ठेवा. हर्बल टी बॅग्ज वापरू नका.
व्हिटॅमिन सी, बी आणि डी यांचा आहारात समावेश करा.
याव्यतिरिक्त, पुरेशी झोप घेणे आणि ताण कमी करणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्वांचा पुरेसा समावेश असायलाच हवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
December 13, 2016
कोकणातला पाऊस हा भयंकर देखणा असतो हे अनेकांकडून ऐकलं होतं, वाचलही होतं. मी कोकणातला पाऊस तसा पाहिलाही होता. परंतू देवगडातल्या ह्या तीन-चार दिवसांच्या निवांत मुक्कामात कोकणातला पाऊस अनुभवला.।
August 3, 2016
अमृता खंडेराव यांचं हे कथासंग्रह म्हणजे विदर्भाच्या मातीतून उगम पावलेलं, चुलीवर शिजवलेलं आणि बोलीभाषेच्या फोडणीने झणझणीत झालेलं साहित्यिक जेवण आहे. हे पुस्तक वाचताना वाटतं, आपण एखाद्या खेड्यातल्या अंगणात बसलो आहोत, समोर चुलीवर भाकरी भाजतेय, आणि आजूबाजूच्या बायका आपापल्या कहाण्या सांगतायत—कधी हसवणाऱ्या, कधी डोळ्यांत पाणी आणणाऱ्या, पण नेहमीच मनात घर करणाऱ्या.
July 16, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti