(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पक्षीपरिचय ११

      September 29, 2015


  • धार्मिक संस्कृतीच्या खुणा

    भारत माझा देश आहे व माझे देशावर प्रेम आहे. दक्षिणेतील कन्याकुमारी पासून उत्तरेतील हिमालयातील काराकोरम पर्वत रांगातील नयनरम्य काश्मीर – हिमाचल व उत्तराखंडचे बर्फाच्छादीत सौंदर्य- पश्चिमेस समुद्रात बुडालेली द्वारका व ईशान्य भारताच्या सात भगिनी ! चारी बाजूंनी विखुरलेल्या वैविध्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्याबरोबरच येथे असलेल्या हजारो धार्मिक स्थळांचेही गारुड भारतीय मनावर पसरले आहे. हे सर्व अनुभवायचे असेल.

      April 9, 2023


  • आज ७ ऑगस्ट – नागपंचमी

    आज ७ ऑगस्ट, नागपंचमी

    1. नाग/साप कधीही दूध पीत नाही, कारण तो सस्तन प्राणी नाही.

    2. नाग जिभेने वास घेतो, त्यामुळे तो सारखी जीभ बाहेर कडून आसपास असणाऱ्या प्राण्यांचा अंदाज घेतो.

    3. नाग पूर्ण मांसाहारी प्राणी आहे, तो इतर प्राण्यांची अंडी, किंवा लहान प्राणी, जसे उंदीर, बेडूक, सारडा यांना खातो.

    4. त्याची स्मरण शक्ती अतिशय अल्प असते, त्या मुळे सिनेमात दाखवतात तसे नागीण बदला घेत नाही.

    5. शक्यतो हा प्राणी मनुष्याला घाबरतो व लपून राहण्याचा किव्वा पळून जाण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही घाबरू नका.

    6. नाग कंपनाने (vibrations) सुद्धा जवळपास कोणी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. गुरखा म्हणून रात्री काठी वाजवतो, साप व नागाला दूर जाण्यासाठी प्रोत्साहित करतो.

    7. नागाला कान नसतात, तसेच त्याची नजर तीक्ष्ण नसते.

    8. नागाने 1 बेडूक किव्वा उंदीर खाल्यास त्याला किमान 15 दिवस अन्नाची गरज नसते.

    9. नागपंचमीला त्याच्या डोक्यावर हळद किव्वा कुंकू टाकू नका, यामुळे त्याला इजा होऊ शकते.

    10. नागाला पुंगीचा आवाज ऐकू येत नाही, गारुडी पुंगी हलवतो, म्हणून नाग ते पाहून झडप घेऊन चावण्यासाठी स्वतः हलतो, ज्याला काही मूर्ख लोक डोलणे समजतात.

    थोडक्यात सांगायचे तर हा सण बंद करावा, किव्वा त्या दिवशी सर्व शाळेत सर्प घराण्यातील जीवांची मुलांना माहिती द्यावी ज्यामुळे त्यांच्यातील भीती व गैर समज दूर होण्यास मदत होईल. 21 व्या शतकात आलो आहोत याचे भान ठेवा, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको.

    आपणास कोणीही नाग सापाचे खेळ दाखवताना दिसल्यास पोलिसांना खबर द्या, त्याच्या जवळचे प्राणी जप्त करा, आणि सुजाण नागरिक आहेत हे उदाहरण देऊन सिद्ध करा.

    We were country of snake charmers, now we are country of mouse charmers. Lets now work hard to rule world with mouse in hand.

    पूर्ण लेख वाचल्या बद्दल, आभारी आहे

    -- विजय लिमये
    9326040204

      August 7, 2016


  • मुंबईतील पृथ्वी थिएटर

    पृथ्वी थिएटरची स्थापना झाल्यानंतर सादर झालेल्या पहिल्या नाटकांमध्ये गो. पु. देशपांडे लिखित उध्वस्त धर्मशाळा या नाटकाच्या हिंदी रुपांतरणाचा समावेश होता. त्यामध्ये नासीरुद्दीन शाह, ओम पुरी, बेंजामिन गिलानी यांनी काम केले होते.

      November 5, 2021


  • देवदारू

    ।। सुराग्रजाय नम: देवदारूपत्रं समर्पयामि।।

    हिमालयात अथवा अतिशीत वातावरणात अतिशय उंच वाढणारा हा वृक्ष आहे.हा कोनाकृती वृक्ष असून त्वचा उभ्या रेषा युक्त असून आडव्या दिशेने फाटलेली असते.पाने हिरवी,लांब,निमुळती,टोकदार ३-५ वर्षे टिकतात.फुले हिरवट पिवळी,गुच्छ युक्त स्त्री व पुरुष बीज एकाच वृक्षावर उगवते.फळ १०-१२ सेंमी लांब,८-१० सेंमी रूंद पिकल्यावर काळ्या रंगाचे व आत १ सेंमी लांबीचे त्रिकोण भुरकट रंगाचे बी असते.हे वृक्ष ६०० वर्षे जगते.

    ह्याचे उपयुक्तांग आहे काण्डसार व तेल.
    आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:
    ह्याची चव कडू असून हे उष्ण गुणाचे असते तसेच हल्का व स्निग्ध असतो.हा कफवात नाशक व पित्तकर असतो.

    आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
    १)देवदार व्रणातील स्त्राव व दुर्गंध नष्ट करायला उपयोगी आहे.

    २)देवदारूचा लेप पोटावर लावला असता अडलेला वात पुढे सरतो.

    ३)आंत्रातील कृमी नष्ट करायला देवदारू उपयुक्त आहे.

    ४)सुजेवर देवदारूचा लेप फायदेशीर ठरतो.

    ५)दमा,सर्दी,खोकला ह्यात देवदारूचा चांगला उपयोग होतो.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 11, 2017


  • प्रेरणा

    “प्रेरणा”मग ती कशी कां असेना, अंतिम परिणाम ‘आत्मविश्वास’ हाच असायला हवा. म्हणतात नं, “स्वत:वर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते.”

      June 20, 2021


  • आभामंडळाचे विज्ञान व विठ्ठल मंदिर

    मुंबईच्या दोन मित्रांनी पंढरपूरला जाऊन एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला व पंढरपूरला पोहचले.

    मंदीराजवळ आल्यावर दिसले की तिथे प्रचंड गर्दी, रांगाच्या-रांगा लागल्या होत्या. पहिला मित्र लगेच गर्दीतून कसे आत घूसता येईल त्यावर विचार करायला लागला व त्याप्रमाणे त्याने वाट काढत , स्वत:चे पैशांचे पाकीट सांभाळत, गर्दीतल्या लोकांची बोलणी खात, लोकांच्या हाताचे कोपरे व पायांचे ढोपरे झेलत कसा बसा कोणावर ओरडत मुर्तिसमोर पोहचला. एक क्षण मुर्तिसमोर नजरानजर होत नाही तर दुसऱ्याने त्याला जवळजवळ ढकलले आणि त्याचा परतीचा प्रवास तसाच सुरु झाला व दुसऱ्या मित्राजवळ आला, तो मित्र उभा होता तेथेच वारंवार जमिनीवर साष्टांग नमस्कार घालत होता व पुन्हा डोळे मिटून शांतपणे कळसाकडे बघत होता. मध्येच दोन्ही हात आकाशाकडे वर करून काही प्रार्थना करत होता.

    ह्या यात्रेचा लाभ खरा कोणाला झाला तर बरेच अभ्यासू वृत्तीचे लोक म्हणतील की, ज्या मित्राने मुर्तीचे दर्शन घेतले नाही त्याला झाला.

    हो हे अगदी खरे आहे. यासाठी आभामंडळाचे विज्ञान हा विषय समजवून घ्यावा लागेल. अतिप्राचीन काळी म्हणजे सुमारे 25 सहस्त्र वर्षांपुर्वी आपल्या ऋषीमुनींनी मानवी देहाचे व विश्वाचे रहस्य लिहून ठेवले आहे. विश्वाच्या उत्पत्ती मध्ये प्रचंड ऊर्जेचा स्फोट झाला व याचे तापमान थंड होताना दृश्यमान ग्रह व तारे जन्माला आले. परंतू या विश्वात उर्जातरंगाचे अस्तित्व आहे. त्यापैकी आपल्याला क्ष किरणे, सोनोग्राफी, मायक्रोव्हेव, रेडिओ, टेलिव्हिजन, मोबाईल फोन ह्या उर्जातरंगांचा आपण अभ्यास केल्यामुळे ह्या गोष्टी आपण दैनंदिन व्यवहारात वापरतो. त्याचे घातक परिणाम आपल्याला माहित आहे. आपण सुध्दा या उर्जातरंगांचा एक भाग आहोत. आपल्या भोवतीसुध्दा उर्जातरंग आहे. आपल्या भोवतीच्या प्रत्येक गोष्टीची उर्जाकंपन आपल्या अस्तित्वाचा स्तर ठरवित असतात. क्वांटम फिजिक्स म्हणजे विश्व चैतन्य अत्यंत सुक्ष्म थरावर कार्य करते. Electron पेक्षा 1/4 सुक्ष्म कण म्हणजे Quantas, Leptons, Subatomic Particles अशी त्यांची नावे आहेत. यथे सजातीय धृव आकर्षित होतात, विजातीय धृव वेगळे होतात. ऋण किंवा नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती आकर्षित होतात, हे समजते.

    आपल्याकडील सर्व देव देवता या ऊर्जा स्त्रोताचा एक भाग आहे. परंतू सगुण भक्ती सोपी असल्यामुळे ह्या उर्जेच्या स्त्रोतांना नाव मिळाली आहेत.

    आपल्याला दृश्यमान असलेले शरीर हे अन्नमय कोष असून प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोष हे अदृश्य किंवा सूक्ष्म देहाचे घटक आहेत. हे सुक्ष्म शरीर आपले भौतिक शरीर चालवते. म्हणून सुक्ष्म देहाचा अभ्यास हा आरोग्याचा तसेच अध्यात्मिक प्रगतीचा अभ्यास समजला जातो. सूक्ष्म देहामुळे आपल्या स्थूल / भौतीक / इंद्रिय देह अन्नमय कोषाशी वाढ व नियंत्रण होते. आपल्या मानसिक, भावनिक, आणि अध्यात्मिक प्रगतीसाठी हा कारणीभूत असतो आणि अंतराळातील सूक्ष्म लोकांशी -सूक्ष्म सृष्टीशी हा देह सतत संपर्कात असतो. ह्या सुक्ष्म शरीरावर वैश्वीक उर्जेचा सतत परिणाम होत असतो. या सूक्ष्मदेहांभोवती एक तेजोवलय आहे. पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी प्रवास करताना त्यांच्याभोवती असलेल्या जनसमुदयातील व्यक्तींना त्यांच्या डोक्याभोवती दिव्य तेजोवलय दिसत असे. ह्यांच्यातील काही चित्रकार, मुर्तिकार यांनी आपल्या कलेतून ते साकार केले आहे. म्हणून आजही प्राचीन मुर्तिभोवती देव-देवता, संत, सद्गुरु ह्यांच्याभोवती तेजोवलय दाखविण्यात येते.

    आपण सुध्दा ह्या वैश्वीक ऊर्जेचे घटक आहोत आणि ह्या ऊर्जातरंगाचा परिणाम आपल्या सूक्ष्मदेहातील 7 प्रमुख चक्र व 72,000 नाड्यांमार्फत होत असतो. गाढ झोपेत किंवा ध्यानामध्ये जेव्हा आपले मन निर्मन अवस्थेत असते तेव्हा ही उर्जा आपली आदल्या दिवशीची झीज भरून काढते व आपण फ्रेश होतो. परंतू अति वैचारिक, भावनिक परिस्थितीमध्ये ही उर्जा ग्रहण करता येत नाही. आपला दुसरा दिवस त्रासलेला जातो. ह्याचा परिणाम म्हणून ही उर्जा ऊर्जा वाहक नाड्यांमधून नीट प्रवाही होत नाही. आपल्या अवयवांना नीट कार्यशक्ती मिळत नाही. त्यांच्या कार्यात दोष निर्माण होतो व आपल्याला रोगाची लागण झाली असे गृहीत धरले जाते.

    चांगल्या विचारांची उर्जा सकारात्मक........

    गेली 300 वर्ष रशिया, जर्मनी आणि युके मध्ये यावर खूप अभ्यास सुरु आहे. यातील सी डब्लू लेडबीटर, सर गीटचेल, अॅनी बेझंट, किर्लीऑन यांनी या विषयावर पूस्तके लिहिली आहे. परदेशातील यापैकी काहींनी भारतातल्या गुहेमध्ये राहणाऱ्या ऋषींबरोबर संपर्क साधून हा विषय संस्कृत मधून समजून घेतला व आपल्या देशात जाऊन त्यांच्या भाषेत ग्रंथातून हा विषय मांडला, त्यामुळे तेथील अनेक शास्त्रज्ञ या विषयाकडे आकर्षित झाले.

    डॉ. किरली ऑन यांनी 1949 चे सुमारास किरलीअन फोटोग्राफी शोधून काढली. सर हॅरि ओल्डफिल्ड यांनी 1979 मध्ये पॉलीकॉनस्ट्रास्ट इन्टरफेरन्स फोटोग्राफीचा (PIP) विकास केला. शरीराच्या चुंबकीय ऊर्जेमुळे शुध्द पांढऱ्या प्रकाशाचे पृथ:करण होऊन विविध रंगांच्या छटा बघण्याची ही प्रणाली आहे. PIP फोटोग्राफीने हे सिध्द केले आहे की कोणताही रोग शरीरात कुठे आहे हे दिसण्यापूर्वी तो आभामंडळावर स्पष्ट दिसतो. आजार हे शरीराला पुरवल्या जाणाऱ्या ऊर्जेच्या असंतुलनामुळे झालेले असतात. दुर्लक्षित आजाराचे रुपांतर मोठ्या व्याधीत होते.

    डॉ. अनुप देव, ठाणे 

      November 28, 2015


  • भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

    बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. बदाम हे आरोग्यासाठी उत्तम आहे. भिजवलेले बदाम तर सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला बदाम भिजवून खाणं आवडत नसेल, तर तुमचा विचार बदला. कारण नुसतं बदाम खाण्यापेक्षा ते भिजवून खाण्याचे फायदे अनेक आहेत.

    बदाम भिजवून खाण्याचे फायदे

    बदामावरील टरफलं काढून खाणं हे फायद्याचं आहे. बदामाच्या टरफलांमध्ये टॅनिन नावाचं तत्व असतं. त्यामुळे टरफलासह बदाम खाल्याने बदामाची पूर्ण पोषकतत्त्वं शरिरात जात नाहीत.

    *बदाम भिजवून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

    *याशिवाय वजन घटवण्यासाठीही भिजवलेले बदाम फायदेशीर ठरू शकतात.

    *भिजवलेल्या बदामांमुळे सौंदर्य टिकवण्यात, चेहऱ्यावर सुरकुत्या न पडू देण्यास, तसंच चेहरा टवटवीत दिसण्यास मदत होते.

    *भिजवलेल्या बदामांमध्ये ‘ब17’ जीवनसत्त्व आणि फॉलिक असिड असल्यामुळे कॅन्सरचा धोका दूर ठेवण्यास मदत होते.

    -- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन

      May 18, 2017


  • प्रेम – love

    तरुण मुले खास करून विद्यार्थी जेंव्हा प्रेमात असतात, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न हमेशा खटकत असतो: काय करावे ते समजत नाही . तर कोणता निर्णय घ्यायचा हो ? कि नाही ?…!

      April 28, 2024


  • श्री गणेश अवतारलीला १० – श्री पंचकन्यापती गणेश

    भगवान ब्रह्मदेवांनी सरस्वती, श्री विष्णूंनी पुष्टी, श्री शंकरांनी योगिनी, देवी आदिशक्तीने मोहिनी आणि भगवान श्री सूर्यांनी संजीवनी नामक कन्येला निर्माण करून आपल्या या कन्या भगवान गणेशांना समर्पित केल्या. या पाच कन्यांशी विवाह केल्याने श्रीगणेशांना पंचकन्यापती गणेश म्हणतात.

      September 11, 2019