(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सर्वसामान्यांचा जीवनोत्सव

    सोलापुरात असताना आधी “रजनीगंधा ” आणि नंतर ” छोटी सी बात ” पाहिला. मध्यम वर्गीय प्रमुख पात्रे – विद्या आणि अमोल ! बसने प्रवास वगैरे करणारे, कपडेलत्तेही आपल्यासारखे . धर्मेंद्र आणि हेमाच्या सिनेमाला (आपल्यासारख्या आवडीने) जाणारे आणि त्यांच्या जागी स्वतःला कल्पणारे.

      June 13, 2022


  • मूर्तीभंजकांची परंपरा…

    मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला आणि मुठा नदीत तो फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे. राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. संभाजी ब्रिगेडने याआधी दादाजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. त्यावर बरीच चर्चा रंगली होती. आता पुन्हा ब्रिगेड चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजी ब्रिगेडने राजकीय पक्ष स्थापन केला आहे. काही महिन्यांमध्ये पुणे महापालिका निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिेगेडने हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. कारण काही असो. कृती निषेधार्ह आहे.

    मुळात मूर्तीभंजनाची परंपरा अरबस्तानातून आली आहे. जे आपल्याला पटत नाही, जे आपले नाही किंवा ज्यांचे आपण विरोधक आहोत (जे आपले विरोधक आहेत, असा अर्थ नव्हे) ते ते सर्व नष्ट झाले पाहिजे अशी ही धारणा आहे. अरबस्तानातून आलेल्या आक्रमकांनी भारतातील मंदिरे पाडली, मुर्त्या फोडल्या, ग्रंथ जाळून टाकले. ही त्यांची परंपरा आहे. कारण त्यांना चर्चा अमान्य आहे. ख्रिस्ती साहित्यातील एक कथा वाचली होती (कोणत्या पुस्तकात किंवा नियतकालिकात ते आठवत नाही). अरबस्तानातील काही आक्रमक ख्रिस्त्यांच्या देशात गेले. तेथील एका चर्चवर त्यांनी आक्रमण केले व फादरला विचारले की "सांग कोणाचा ग्रंथ महान आहे, तुझा की आमचा? जर तू म्हणालास, तुझा ग्रंथ महान आहे तर आम्ही तुला मारुन टाकू आणि जर तू म्हणालास, आमचा ग्रंथ महान आहे, मग तू आमचा ग्रंथ शिरोधार्थ न मानता तुझा ग्रंथ शिरोधार्थ मानलास म्हणून तुला मारुन टाकू". ही मूर्तीभंजकांची मानसिकता आहे. त्यांना चर्चा नकोय, त्यांना केवळ भंजन करायचे आहे. जो आपल्या विचारांचा नाही त्याच्या विचारांचा आदर करण्याची परंपरा त्यांच्यात नाही. ती परंपरा हिंदूंमध्ये आहे. म्हणूनच आपलं मस्तक गौतम बुद्ध आणि महावीर जैन यांसारख्या महापुरुषांसमोरही आपसुक झुकलं जातं. ही भारतीय परंपरा आहे. भारतीय परंपरा तोडण्यावर भर देणारी नसून जोडण्यावर आणि उभारण्यावर भर देणारी आहे. म्हणून आपल्यात मूर्त्या घडवल्या जातात. श्रद्धेचा विषय सोडा. परंतु मूर्ती घडवणे ही कलाकृती आहे. त्या कलेचा आणि कलाकाराचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे.

    १८९६ रोजी चापेकर बंधूंनी व्हिक्टोरिया राणीचा पुतळा विटंबित केला होता. परंतु त्यामागची भावना उदात्त होती. त्या काळी इंग्रजांचे शासन होते आणि आपल्या कृतीतून इंग्रजांच्या साम्राज्याविषयीचा राग व्यक्त करायचा होता. तसेच इंग्रजांना दाखवून द्यायचे होते की भारतीय तरुण तुमच्या क्रूर शासनाविरोधात पेटून उठले आहेत. या भावनेने चापेकर बंधूंनी राणीच्या पुतळ्याला काळे फासले. ते राज्यच आपले नव्हते. आता लोकशाही आहे. कोणतेही सरकार असले तरी आपले भारतीयांचे राज्य आहे. स्वा. सावरकरांनी इंग्रजांचा निषेध म्हणून विदेशी कपड्यांची होळी टिळकांच्या नेतृत्वाखाली केली. हा सुद्धा चीड व्यक्त करण्याचा मार्ग आहे. कारण आपल्या देशात परकीयांचे राज्य होते आणि ते राज्य उलथवून टाकणे हे कोणत्याही देशभक्ताचे परमकर्तव्यच होते. पुढे अशीच होळी गांधीजींनी केली. ती खुप गाजली देखिल. सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते असलेले सावरकर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतः म्हणाले की आता पुढे क्रांती ही बंदूकीच्या गोळीने नव्हे तर मतदानाच्या पेटीत आपले मत टाकून करायची आहे. हे लोकशाहीचे महत्व सावरकरांनी सांगितले आहे. त्याच सावरकरांच्या अंदमानातील काव्यपंक्ती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी खोडल्या होत्या. त्यामुळे कॉंग्रेस आणि अय्यर सुद्धा मूर्तीभंजकांच्या परंपरेत अगदी शोभून दिसतात. ही मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. संभाजी ब्रिगेड ही त्या मानसिकतेची अनुयायी आहे. चर्चा करण्यापेक्षा भांडण, तंटे करायचे, मारामार्‍या, तोडफोड करायची. कारण असे केल्याने कोणाला उत्तर देणे बंधनकारक राहत नाही आणि त्यांची कृती सुद्धा पूर्ण होते. संभाजी महाराजांची बदनामी केली असे ब्रिगेड म्हणत आहे, त्या ब्रिगेडला गोविदाग्रंजांनी शिवरायांचा रचलेला सुंदर पाळणा माहित नसावाच. असो

    १९१० च्या सुमारास लिहिलेले राजसंन्यास हे नाटक कोणाच्याही लक्षात नव्हते. वादासाठी मान्य केले की गडकरींनी संभाजी महाराजांचा अपमान केला. पण त्याचा आता काय संबंध? हा वाद उपटून काढण्याला काहीच अर्थ नाही. राम गणेश गडकरींना हे जग सोडून जवळ जवळ ९८ वर्षे झालीत. त्या नाटकाचा प्रयोगही आता होत नाही. त्यात ते अपूर्ण राहिलेले नाटक आणि जर निषेध करायचाच होता, तर त्यावर सविस्तर लेख लिहून लोकांचे प्रबोधन करता आले असते. मुळात प्रबोधन या शब्दाचीच एलर्जी ह्यांना असावी. कारण प्रबोधन करण्याआधी स्वतःला बोध व्हाया लागतो. असो.
    माझे फेसबुकवरील मित्र डॉ. सुबोध नाईक यांनी लिहिलेल्या माहितीनुसार, १९३७ मध्ये मुंबई प्रांताच्या विधानसभेत शिवाजी महाराज युगपुरुष नव्हते असे कॉंग्रेसने सांगितले होते. मग आता गोविंदाग्रजांची मूर्ती हटवणारे ब्रिगेडी कॉंग्रेसचे काय करतील? नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुक पेजवर म्हटले की "संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नाही.. ज्या मर्द मराठ्यांनी केलं त्यांना सलाम" मग आता नितेशरावांचे वडील ज्या कॉंग्रेसमध्ये आहेत, त्या कॉंग्रेसने शिवरायांचा अपमान केला होता. या विरोधात मराठाचा अभिमान वगैरे बाळगणारे नितेशराव कोणती कार्यवाई करणार आहेत? आपल्या वडीलांना राजांचा अपमान करणार्‍या कॉंग्रेसचा राजीनामा देण्यास भाग पाडतील का? पण असे काही होणार नाही. कारण ह्यांचा पंथ आणि परंपरा मूर्तीभंजनाची आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता या सर्व गोष्टी तोंडी लावण्यापुरत्या आहेत. हे जरी भारतीय असले तरी ही मानसिकता भारतीय नाही. ही वाळवंटाची मानसिकता आहे. ती वाळवंटातून आलेली आहे आणि नतद्रष्टांनी पोसली आहे. संभाजी ब्रिगेडच्या त्या कार्यकर्त्यांना अटक होईलही. पण ही गलिच्छ मानसिकता, ही राक्षसी परंपरा कशी आणि कधी नष्ट होणार? मुळात ती नष्ट होण्याच्या मार्गातच आहे. कारण सज्जन आता जागरुक होत आहेत. त्यामुळे दुर्जनांची कोंडी होत आहे. गोविंदाग्रजांचा पुतळा हटवला या कृतीला प्रत्यूत्तर म्हणून गोविंदाग्रजांचे सहित्य अधिक वाचले आणि खपले जाईल ही आशा आणि खात्री मला आहे. गोविंदग्रजांनी त्यांच्या कवितेत "भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा" असं म्हटलंय. पण बुद्धी नसलेले काही जीव महाराष्ट्रात राहतात हे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे. तर अरबस्तानातील मूर्तीभंजनाची परंपरा चलवणार्‍या भारतीय ब्रिगेड्यांचे मी एक कलाकार म्हणून निषेध करतो आणि त्यांनी कितीही मूर्त्या फोडल्या तरी आम्ही विचारांची लढाई विचारांनीच आणि लोकशाही मार्गानेच लढणार, अशी प्रतिज्ञा घेतो. २३ जानेवारी रोजी राम गणेश गडकरींची पुण्यतिथी आहे. आपण सर्व साहित्यप्रेमींनी आपापल्या भागात आणि आपापल्या क्षमतेने ही पुण्यतिथी जागवायला हवी. या दिनानिमित्त गडकरींचे स्मरण करुया, त्यांचे साहित्य वाचूया, विकत घेऊया, साहित्य वाटप करुया किंवा त्यांची नाटके सादर करुया. आपल्याला जे शक्य होईल ते करुया. या भ्याड कृतीचा, या मूर्तीभंजनाच्या परंपरेचा निषेध करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

    लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

      January 4, 2017


  • सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley) एक अजब रसायन

    अमेरिकेतील स्यान फ्रान्सिस्को ( San Francisco ) ते स्यान ओजे ( San Jose ) या ८० मैलांच्या पाट्याला ' बे अरिया' ( Bay Area ) असे म्हणतात. हाच एरिया अख्या जगामध्ये ' सिलिकॉन व्ह्याली' म्हणून ओळखला जातो. कॉम्पुटर, हार्ड वेअर, सोफ्ट वेअर ( Soft Ware ) आणि आय. टी. इंडस्ट्रीची ही मक्का म्हणून ओळखली जाते.या खेत्रातील १५० प्रमुख कंपन्यांची मुख्यालये ( Head Quarters ) याच भागात आहेत. यामध्ये इंटेल (Intel ), Apple , गुगल ( Google ), याहू (yahoo ), Oracle , सिस्को ( Cisco ), एच. पी. ( H.P. ),सन मायक्रो ( Sun Micro ), फेसबुक ( Face book ), Twitter , यु ट्यूब ( You Tube ), या प्रमुख कंपन्या आहेत. IBM, डेल (Dell), Microsoft या प्रमुख कंपन्या या भागातील नाहीत. पण या भागाचे महत्व ओळखून व या भागात आपला प्रेझेन्स असावा म्हणून या कंपन्यांनी सिलिकॉन व्ह्याली मध्ये आपली ऑफिसेस थाटली आहेत.

    सिलिकॉन व्ह्याली हे एक अजब रसायन आहे. उद्योग व्यवसायातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी येथे घडत असतात.अनेक नवीन उत्पादनाबरोबरच अनेक नवीन कल्पना, नवीन विचार, नवीन परंपरा यांचा जन्म येथे होत असतो.

    पहिली गोष्ट म्हणजे येथील बहुतेक प्रमुख कंपन्यांचे संस्थापक हे शाळा- कॉलेजमधील ड्रोप आउट झालेले किंवा शिक्षण पूर्ण न केलेले आहेत. त्यातील बहुतेक जण गरीब- मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेले आहेत. बहुतेक जणांना उद्योग व्यवसायाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. असे असूनही आज ही मंडळी प्रसिध्धीच्या झोतात आहेत. यातील कित्येक जणांची नावे जगातील अब्जाधीश व्यक्तींच्या यादीत झळकली आहेत. बहुतेकांनी अगदी तरुण वयातच हे यश संपादन केले आहे. खालील यादी बघा.

    बिल गेट्स ( Bill Gates ) :- हार्वर्ड मधला ड्रोप औट. Microsoft ची स्थापना. श्रीमंत क्र. २. संपत्ती ५६ अब्ज डॉलर्स म्हणजे २४७५ अब्ज रुपये. वय ५५ वर्षे.

    लेरी अलीसन ( Larry Ellison ) :- युनिवर्सिटी ऑफ इलिनॉय ( Illinois ) आणि युनिवर्सिटी ऑफ शिकागो ( Chicago ) मधून ड्रोप औट. Oracle ची स्थापना. श्रीमंत क्र.५. संपत्ती ३९.५ अब्ज डॉलर्स म्हणजे १७७५ अब्ज रुपये. वय ६६

    स्टीव जॉब्स ( Steve Jobs ) :- रीड कोलेज ( Reed College Portland ) मधून ड्रोप औट. Apple ची स्थापना. श्रीमंत क्र.११०. संपत्ती ८.३ अब्ज डॉलर्स म्हणजे ३८२.५ अब्ज रुपये. वय ५६.

    मार्क झुकेरबर्ग( Mark Zuckerberg ) :- हार्वर्ड मधून ड्रोप औट. Face book ची स्थापना. श्रीमंत क्र.५२. संपत्ती १३.५ अब्ज डॉलर्स म्हणजे ६०७.५ अब्ज रुपये. वय २७

    जेरी यांग ( Jerry Yang ) आणि डेव्हिड फिलो ( David Filo ):- दोघेही Stanford युनिवर्सिटी मध्ये पी. एच डी. करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Yahoo ची स्थापना.

    जेरी यांग( Jerry Yang )-श्रीमंत क्र.९३८. संपत्ती १.३ अब्ज डॉलर्स म्हणजे ५८.५ अब्ज रुपये. वय ४२.

    डेव्हिड फिलो ( David Filo )- श्रीमंत क्र.८७९. संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स म्हणजे ६३ अब्ज रुपये. वय ४५

    सर्जी ब्रिन ( Sergey Brin ) आणि ल्यारी पेग ( Larry Page ) :- दोघेही Stanford मध्ये पी. एच डी करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Google ची स्थापना

    सर्जी ब्रिन ( Sergy Brin )- श्रीमंत क्र.२४. संपत्ती १९.८ अब्ज डॉलर्स म्हणजे ८९१ अब्ज रुपये. वय ३८.

    ल्यारी पेग ( Larry Peg )- श्रीमंत क्र.२४. संपत्ती १९.८ अब्ज डॉलर्स म्हणजे ८९१ अब्ज रुपये. वय ३७

    दुसरी गोष्ट म्हणजे यातील बहुतेक कंपन्या या अत्यल्प भांडवलावर, ग्यारेजेस मध्ये सुरु केलेले अती अल्प लघु उद्योग ( Very Small Scale Industry ) आहेत. आज याच कंपन्यांचे रुपांतर जगातील मोठ्या, प्रतीष्टीठ, दर्जेदार आणि बलाढ्य कंपन्यांमध्ये झाले आहे. बीझिनेससाठी शाळा कॉलेजमधील शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असतेच असे नाही. तुमच्याकडे जर चांगला बिझिनेस प्लान किंवा कल्पना असेल तर शाळा कोलेजच्या शिक्षणात वेळ घालविण्यात काही अर्थ नाही. कारण हे शिक्षण जरूर भासल्यास तुम्ही नंतर केव्हाही पूर्ण करू शकता. अशी येथील विचार धारा आहे.

    माणसाच्या क्वालिफिकेशन, डिग्री, परीक्षेतील मार्क, टक्केवारी, ग्रेड या पेक्षा त्याचा ' Talent ' महत्वाचा! त्याच्या 'पास्ट पर्फोर्मंस ' ( Past Performance ) पेक्षा तो 'फ्युचर 'मध्ये काय करू शकतो हे महत्वाचे. त्याची traditional पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करायची कुवत किती हे महत्वाचे. त्याला किती नवीन कल्पना सुचू शकतात हे महत्वाचे. सिलीकोन व्ह्यालीमधील बोझीनेस हा पाया आहे. म्हणूनच हा भाग जगातील Technology व Talent चा हब ( Hub ) म्हणून ओळखला जातो.

    परंतु तेथील बिझिनेस या एवढ्याच क्वालिफिकेशन वर यशस्वी झालेले नाहीत. वरील लोकांमध्ये आहे तो धृढ आत्मविश्वास. स्वतःच्या क्षमतेवर आणि कर्तुत्वावर असलेला पूर्ण विश्वास! आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा आपले उत्पादन/ कल्पना/ आयडिया जास्त चांगली आहे या विषयी असलेली अतूट श्रद्धा! आणि कांहीतरी वेगळे, 'हटके', नवीन करण्याची प्रबळ इच्छा आणि तळमळ. या मुळेच हे बिझिनेस एवढे मोठे होऊ शकले.

    माणसाच्या Talent वर त्याला प्रगतीची संधी देणारा हा भाग आहे. या मध्ये जात, पात, लिंग भेद, कातडीचा रंग या गोष्टी आड येवू नयेत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे अख्या जगातले Talented तरुण सिलीकोन व्ह्यालीकडे आकर्षित झाले नसतील तरच नवल! आज सिलीकोन व्हालीमध्ये जेवढे फोरीन वर्कर्स काम करतात तेवढे जगात कुठेच आढळून येत नाहीत. तसेच त्यांच्या जेवढी विविधता दिसून येते तेवढी जगात दुसरीकडे कोठेच आढळून येणार नाही. या मध्ये हेस्प्यानिक ( म्हणजे mexico तून आलेले व Spanish मातृ भाषा असलेले ) लोक सर्वात जास्त आहेत. त्यानंतर आशियाई लोकांची संख्या आहे. यामध्ये चीनी आणि भारतीय लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर जपानी, कोरियन, तैवानीज, Vietnam मधून आलेले लोक, फिलिपिनो यांची संख्या आहे. त्यानंतर इतर देशातून आलेल्या लोकांची संख्या आहे. आज सिलिकॉन व्ह्यालीमधील ४६ % लोकसंख्या परदेशातून आलेल्या लोकांची आहे. त्या मुळे तेथे खऱ्या अर्थाने जागतिक संस्कृतीचे दर्शन घडते. तसेच भारतातील अनेक राज्यातील लोक तेथे गेले आहेत. त्यामुळे तेथे मिनी भारत दर्शन घडते.

    व्यवस्थापन क्षेत्रात या विभागावे अनेक नवीन कल्पना अमलात आणल्या, अनेक नवीन पायंडे पडले. येथे अगदी वेगळ्या प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे लक्षात आल्यावर मुलाखतीच्या तंत्रामध्ये ( Interview Techniques ) अमुलाग्र बदल करण्यात आले. हल्ली मुलाखतीमध्ये कोडी ( Puzzles ) विचारण्याची पध्धत बर्याच ठिकाणी अवलंबली जाते. त्याची सुरवात येथूनच झाली. उत्तम मनुष्यबळ पुरविण्याचे काम शाळा, कॉलेजेस आणि Universities करत असतात हे ध्यानात आल्यामुळे तेथील कंपन्यांनी शिक्षण संस्थांबरोबर घनिष्ट संबंध पहिल्यापासूनच ठेवले आहेत. Stanford हि जगप्रसिध्ध University याच भागात आहे. ही खाजगी University जगातील नम.१ ची सर्वोत्तम University समजली जाते. याचे बजेट हे अनेक राष्ट्रांच्या बजेट पेक्षा जास्त असते. SUSJ (State University of San Jose), University of Santa Clara तसेच बर्कले येथील University या चार प्रमुख Universities या भागात आहेत

    येथील CEOs नी बॉस या कल्पनेमधेच अमुलाग्र बदल घडवून आणले. कंपनीचा बॉस हा नेहमी सुटा-बुटातच असला पाहिजे. त्याला भली मोठी केबिन असायला पाहिजे. त्याच्या भोवती सेक्रेटरींची टीम असायला हवी अशी जी परंपरा होती ती पार मोडीत काढली. कंपनीचा बॉस हा सुध्धा कंपनीतील इतर साध्या सुध्या वर्कर सारखाच असावा. त्याने पण इतरांसारखेच हॉल मध्ये बसून काम करावे. त्याला केबिन, सेक्रेटरी असा थाट नसावा. तसेच त्याचे कपडे पण सर्व साधारण माणसांसारखे साधे व क्याजुअल असावेत असा नवीन पायंडा पडला.

    छोट्या स्टार्ट अप कंपनीचे रुपांतर जगातल्या मोठ्या कंपनीत कसे करता येते हे सिलीकोन व्ह्यालीने दाखवून दिले आहे. श्रीमंतीचे वाटप कसे करता येते. व्यवस्थापन क्षेत्रात किती नवीन कल्पना राबविता येऊ शकतात हे सिलीकोन व्ह्यालीने दाखवून दिले आहे. आज सिलीकोन व्ह्यालीमधील कंपन्या जेवढा रेवेन्यु निर्माण करतात तेवढा जगात दुसरीकडे कोठेच निर्माण होत नाही.

    आज भारतीय लीकांना अमेरिकेमध्ये जी इज्जत, प्रतिष्ठा, सन्मान आणि गौरव मिळतो आहे त्यामध्ये सिलिकॉन व्यालीचे योगदान फार मोठे आहे. आज तेथे हजारो भारतीय तरुण अभियंते आणि तंत्रज्ञ तेथील सर्वच कंपन्यांमध्ये उत्तम काम करीत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये अनेक भारीतीय उच्च पदावर काम करीत आहेत. यामध्ये मराठी लोकांची पण संख्या लक्षणीय आहे. आपण सुध्धा उच्च दर्जाचे काम उत्तम पणे करू शकतो असा आत्मविश्वास भारतीयांमध्ये जागृत करण्याचे फार मोठे काम सिलिकॉन व्हालीने केले आहे.

    भारतीय, विशेषतः मराठी तरुणांना यातून बरेच काही शिकता येण्यासारखे आहे.

    आज भारताची जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने घोड दौड चालू आहे. याचा अर्थ आज जागतिक स्तरावर उद्योग व्यवसाय सुरु करण्याची संधी भारतीय तरुणांपुढे चालून आली आहे. मराठी तरुण तरुणींनी या सुवर्ण संधीचा फायदा उठवावा. ज्याप्रमाणे पेशव्यांच्या काळात मराठी झेंडा अटकेपार( जे आता पाकिस्तानात आहे) नेला होता. त्याप्रमाणे उद्योग vyavasayachya nimittane मराठी झेंडा अमेरिका ते new ziland paryant akhya jagat phadakawa. तसेच यापुढे मराठी समजताच बिल गेट्स आणि मार्क झुकेरबर्ग निर्माण व्हावेत हीच शुभेच्छा!

    उल्हास हरी जोशी
    June 8, 2011 at 11:53 am

      June 8, 2011


  • घरगुती शाम्पू – सर्व प्रकारच्या केसांसाठी

    1.एक लिंबू घ्या अर्धे कापा. त्यातील बिया काढून टाका....लिंबू मिक्सर मधून ग्राइंड करून घ्या...
    एक काकडी घ्या आणी कट करा...मिक्सर मधून ग्राइंड करा....लिंबू आणि काकडी ची पेस्ट मिक्स करा....केस थोडे ओले करा....केसांना ही पेस्ट लावा...सगळीकडे लावा मुळांना....केसांना वरून..10 मिनिटे ठेवा नंतर फक्त पाण्याने धुवा

    केस ड्राय असतील तर काकडीचे प्रमाण थोडे जास्ती घ्या. जर केस तेलकट असतील तर लिंबाचे प्रमाण वाढवा...केस नॉर्मल असतील तर वरती सांगितलेले प्रमाण योग्य आहे

    2. रिठा आवळा आणि शिकेकाई प्रत्येकी 100 ग्राम आणा....जिथे आयुर्वेदिक गोष्टी मिळतात अश्या दुकानातून मिळतील.....त्यात 2 लिटर पाणी मिक्स करा आणि रात्रभर भिजवा....सकाळी 11 किंवा 12 वाजे पर्यंत भिजू द्या.....नंतर पावभाजीचे स्मॅशर घ्या स्मॅश करा....रिठा मध्ये बिया असतील त्या टाकू नका त्या ही पाण्यात राहू देत

    नंतर पातेले गॅस वर ठेवा....पाणी पूर्ण बॉईल होऊ द्या....बॉईल होताना वरती फेस येईल.....तो रिठ्या मुळे येतो....नीट बॉईल झाले की गॅस बंद करा....परत पावभाजीचे स्मॅशर घ्या आणि नीट स्मॅश करा....थोडे थंड होऊ द्या....प्लास्टिकचे मोठे गाळणे घ्या.....हे मिश्रण 2 वेळा गाळ.... कोणत्याही बाटलीत भरा....हे 2 महिने टिकते...हा उत्तम शाम्पू आहे आठवड्यातून 2 वेळा याने केस धुवा....केसांचे गळणेही कमी होईल आणि केस वाढू लागतील

    3. एक कप पाणी घ्या त्यात दोन चमचे गहू, एक चमचा मेथी दाणे, 2 चमचे त्रिफळा चूर्ण( जर त्रिफळा चूर्ण नाही मिळाले तर त्रिफळा टॅबलेट मिळतात मार्केट मध्ये त्याची पावडर करून वापरू शकता. त्यात 20 ग्राम रिठा टाका जास्ती बनवायचे असेल तर हे प्रमाण वाढवू शकतात
    हे सगळे पाण्यात नीट मिक्स करा....झाकून ठेवा रात्र भर भिजवा.....सकाळी गाळून घ्या....बाटलीत भरा..…शाम्पू तयार आहे....आठवड्यातून 2 वेळा वापरा..... हेअर फॉल थांबतो केसही वाढू लागतात

    4. पाणी बेकिंग सोडा आणि व्हाइट व्हिनेगर चा शाम्पू
    बेकिंग सोडा आणी पाणी 1:3 ratio मध्ये घ्या....काचेचे बाउल घ्या नीट मिक्स करा हे मिश्रण केस थोडे ओले करून apply करा....मुळांशी केसांना वरून सगळी कडे लावा मसाज करा 2 ते 3 मिनिटे आणि गरम पाण्याने धुवा. मसाज हलका करा.

    नंतर व्हाइट व्हिनेगर आणि पाणी 1:4 प्रमाणात घ्या व मिक्स करा. धुतलेल्या केसांवरून पाणी नीट जाऊ द्या नंतर व्हाइट व्हिनेगर व पाणी याचे मिश्रण केसांना लावा 4-5 मिनिटे ठेवा व गरम पाण्याने वॉश करा
    ह्या शाम्पू ने केस वाढू लागतील आणि शाईन ही करतील....

    -- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन

      May 17, 2017


  • मालदीवमधे चीनच्या हालचालीवर नजर ठेवण्याची गरज

    भारताने तूर्त मालदीववर कठोर निर्बंध घालून तेथे लवकरात लवकर निवडणुका होतील याकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून तेथील लोकशाही जिवंत राहू शकेल. चीन व पाकिस्तान यासारख्या शत्रूंची तेथील उपस्थिती आपल्याला घातक ठरेल. त्यामुळे परराष्ट्र नीती हे आव्हान ठरते आहे. मालदीवमधील परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवत भारत सावधगिरीने पावले टाकील यात शंका नाही.

      March 10, 2018


  • ऑक्टोबर २६ – बकरा केन आणि कैदी हॅरी

    न्यूझीलंडच्या केन रुदरफोर्डचा जन्म. केनच्या कसोटी कारकिर्दीची सुरवात वाईट झाली. पहिल्या महायुद्धादरम्यान कैदी म्हणून पकडल्या गेलेल्या एकमेव कसोटीवीराचा जन्म.

      October 29, 2010


  • मेनका गांघींचे भूतदयेचे नाटक

    हिवाळा चरमसीमेवर पोहोचला आहे. थंडीचा कडाका सुरु आहे. दूरवरच्या रशियातील सैबेरियन पक्षी स्थलांतर करुन दिल्लीपासून अकोल्याजवळच्या कापशीपर्यंत पोहोचले आहेत.

      December 23, 2007


  • अशी चिकमोत्याची माळ

    लोकसंगीताचा वापर करण्यात आलेली हिंदी आणि मराठी चित्रपटातील अनेक गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. लोकसंगीताचा ठेका हाच मुळात रसिकांचे, पाय थिकरवणारा असतो. अंगात उत्साह सळसळतो आणि आपली पावले आपोआपच जागेवर थिरकायला लागतात. लोकसंगीताच्या ठेक्यावरील अशाच एका गाण्याने गेल्या काही वर्षांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

      July 4, 2025


  • २०१० चे दशक: ‘शीला विरुद्ध मुन्नी’चे युद्ध आणि बेली डान्सची नवी क्रांती

    २०१० चे दशक हे बॉलिवूडमधील आयटम सांग्सच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि सर्वात स्पर्धात्मक दशक मानले जाते. या दशकात गाण्यांच्या लोकप्रियतेवरून दोन मोठ्या अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये उघड स्पर्धा पाहायला मिळाली.

      August 28, 2026


  • मुंबईचा संक्षिप्त राजकीय इतिहास

    नुकताच काही निमित्ताने छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर, आझाद मैदानात असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इमारतीत जाण्याचा योग आला. ज्येष्ठ पत्रकार श्री. कुमार कदम यांच्या सोबत इमारतीचा फेरफटका मारताना सहज म्हणून इमारतीच्या गच्चीवर गेलो.

      June 21, 2016