वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
साधारणतः १९९७ च्या सुमारास माझी एका मोठया कारखान्याच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली. तो कारखाना इलेक्ट्रिक बल्ब आणि ट्यूब लाईट याची निर्मिती करत असे. कारखाना वर्षाचे सर्व ३६५ दिवस दिवसरात्र चालू असे. हा कारखाना कळवा – बेलापूर औद्योदिक पट्टयात [industrial belt] होता.
June 23, 2026
खरंतर लहानपणीच्या खूपशा आठवणी प्रत्येकाला आयुष्यभर पुरतात . त्यात कसा आनंद घ्यायचा ? किंवा त्यातून काय शिकायचे ? हे प्रत्येकाच्या आपापल्या स्वभावावर अवलंबून असते .खूप साऱ्या खूप छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानता येतो .म्हणजे तुम्ही म्हणाल, ‘ हे अल्पसंतुष्ट आहेत काय ? आपल्याला आवडत नाही .
June 5, 2023
विरञ्चिविष्णुवन्दितं विरूपलोचनस्तुतं!
गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया !!
निरंतरं सुरासुरै: सपुत्रवामलोचनै:!
महामखेष्टकर्मसु स्मृतं भजामि तुन्दिलम् !!४!!
गाणपत्य संप्रदायाने आग्रहाने प्रतिपादित केलेल्या, भगवान गणेशांच्या सर्वपूज्य, सर्वादिपूज्य, परब्रह्म स्वरूपाला जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज नेमक्या शब्दात व्यक्त करीत आहेत.
आपल्या डोक्यातील श्री गणेशांच्या शिवपुत्र, पार्वतीनंदन या भूमिकेला फाटा देणारा हा श्लोक. मग काय आहे श्रीगणेशांचे नेमके स्वरूप?
विरञ्चिविष्णुवन्दित- विरंची अर्थात भगवान ब्रह्मदेव. विष्णु,भगवान श्रीहरी. यांनी वंदन केलेले ते विरञ्चिविष्णुवन्दित.
विरूपलोचनस्तुत- भगवान शंकरांना त्रिनेत्रधारी म्हणतात. हा तिसरा डोळा हे त्यांचे विशेष रूप आहे. त्यामुळे त्यांना विरूपलोचन असे म्हणतात. ते भगवान शंकर ज्यांची स्तुती करतात ते श्री गणेश
विरूपलोचनस्तुत होत.
गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया - भगवान श्रीगणेशांकडे पाहण्याची दृष्टीच आमूलाग्र बदलून टाकणारी ही ओळ. भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, गिरीश अर्थात भगवान शंकर. त्यांना दर्शनाची इच्छा झाल्यामुळे देवी पार्वतीने ज्यांना प्रगट केले आहे असे आहेत श्री गणेश.ते शिवपुत्र नाहीत. केवळ पार्वतीनंदन नाहीत. त्या दोघांनाही वंदनीय आहेत. त्यांना दर्शनाची इच्छा होते त्यावेळी प्रार्थना करून ते ज्यांना प्रगट करतात ते मोरया आहेत, "गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया ". निरंतर अर्थात सातत्यपूर्णरीत्या, नेहमी.
सुरासुर अर्थात देव आणि दैत्य देखील.
सपुत्रवामलोचनै:- सपुत्र अर्थात मुलाबाळांसह, वामलोचना अर्थात स्त्री.पत्नी.
महामखेष्टकर्मसु- मख म्हणजे यज्ञ. महामख अर्थात सर्व महत्वाची कार्ये.सर्व कार्ये यज्ञस्वरूप असावीत हा भाव. इष्टकर्म अर्थात अपेक्षित गोष्टींच्या प्राप्तीसाठी केलेले कर्म.
सगळ्यांचा एकत्रित अर्थ करता, देव आणि दैत्य देखील आपल्या अपेक्षित कामाला पूर्ण करण्यासाठी यज्ञ करताना, आरंभी विघ्न विनाशासाठी ज्यांचे स्मरण करतात असे.
तुंदिल- धष्टपुष्ट, गुबगुबीत. अशी देहयष्टी असणाऱ्या त्या भगवान गणेशांचे मी स्मरण करतो.
January 10, 2020
३ मे हा दिवस प्रेस स्वातंत्र्य दिन किंवा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन (‘प्रेस फ्रिडम डे’) म्हणून साजरा केला जातो.
May 3, 2021
देशात आज पर्यंत लाखो गुन्हे झाले, मग त्या तुलनेत पोलिसांनी किती जणांचे एन्काऊंटर केले..? टक्केवारीत आकडा उलगडला तर ते प्रमाण 0.01 च्या आसपास येईल. गुन्हा करूनसुद्धा न्यायालयातून निर्दोष सुटणाऱ्यांचं प्रमाण काढलं तर तो आकडा ‘आभाळा’ एवढा भासेल. Extra judicial killing ला माझा पाठिंबा आहे असं बिलकुल नाही, मी फक्त मिडियापुढं बडबडणाऱ्या बुद्धिवंतांच्या सत्येतला विरोधाभास दाखवतोय.
December 9, 2019
या प्रत्येक लेख मालेत सर्व लोकांना समजतील असे पंचवीस सोपे व शक्यतो प्रसिद्ध संस्कृत श्लोक देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संस्कृत श्लोक क्लिष्ट नसतात, अर्थ समजण्यास सोपे असतात.
May 4, 2023
सध्या अवती-भवती सातत्याने घडणा-या विविध प्रकारच्या विकृत घटनांनी माणसाला माणसाचीच भीती वाटावी, अशी स्थिती निर्माण केली आहे. २०१२ मध्ये दिल्लीत निर्भया हत्याकांड घडले, त्यानंतर कोपर्डी, कठुवा, उन्नाव आणि आता हैदराबाद मध्ये एका पशूचिकित्सक डॉक्टर युवतीवर सामुहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ‘अमानुष’, ’अमानवी’, ’माणुसकीला काळिमा फासणारी’ हे शब्द सुद्धा जिथे तोकडे पडतील, अशा या घटनांचा जितका निषेध केला जावा तितका कमीच! मानवी रुपात फिरणारी अशी हिंस्त्र जनावरे बघितली की माणसाला खरंच ‘माणूसपण’ ही संज्ञा वापरावी का? असा प्रश्न निर्माण होतो.
December 3, 2019

प्रा. सारा सिगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनानं, ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात असण्यासंबंधीच्या निकषांना वेगळंच वळण दिलं. हायड्रोजनयुक्त वातावरण असलेले ग्रहही जीवसृष्टीसाठी योग्य असू शकण्याची शक्यता या संशोधनावरून दिसून आली. विश्व हे नव्वद टक्के हायड्रोजननं भरलेलं असल्यानं, पृथ्वीपेक्षा आकारानं मोठ्या असणाऱ्या अनेक ग्रहांवर हायड्रोजनयुक्त वातावरण असण्याची शक्यता बरीच आहे.
February 1, 2022
अखेर ९ सप्टेंबर १९४८ रोजी मंत्रिमंडळाने सैन्याच्या ऑपरेशन पोलोला परवानगी दिली. ज्यांनी निजामाचे अत्याचार पाहिले त्यांच्यासाठी ऑपरेशन पोलो म्हणजे स्वातंत्र्यसूर्यच होता.निजामाच्या कचाट्यातून हैदराबाद संस्थान मुक्त झाल्यानंतर संस्थानात काही वेळ लष्करी प्रशासन होते.
September 22, 2018
आरोग्य किंवा आधुनिक युवा पिढीच्या भाषेत म्हणायचे तर हेल्थ किंवा फिटनेस कसा राखावा याचे शेकडो मार्ग वेळोवेळी सांगितले जात असतात. व्यायाम आणि आहार याचे त्यात अन्यन्यसाधारण महत्त्व असते. आहारात काय खावे, किती, कसे, कधी खावे याचीही माहिती सतत दिली जात असते. फळांचे आहारातील महत्त्व आपण सर्वजण जाणत असतोच. मात्र आजकाल फळांच्या किमती सर्वसामान्यांचा आवाक्याबाहेर जात आहेत. फळामधला हेल्थसाठी फायदेशीर असणारा स्वस्त व मस्त पर्याय आजपर्यंत दुर्लक्षिला गेला आहे. हे फळ आहे, बारमाही कुठेही मिळणारा पेरू.
पेरू विकले जातात ते विविध प्रकारात. म्हणजे कच्चे, अर्धवट पिकलेले आणि पूर्ण पिकलेले. आरोग्यासाठी पेरू खाताना मात्र तो पिकताच लगोलग खाल्ला गेला पाहिजे. या अल्पमोली फळांत अनेक जीवनसत्त्वे, क्षार, खनिजे आहेत आणि अनेक व्याधींवर नियंत्रण आणण्यासाठी पेरूचे सेवन उपयुक्त ठरते असे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे.
पेरू खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. एका केळ्यात जितके पोटॅशियम मिळते तितकेच ते पेरूतूनही मिळते. हे पोटॅशियम सोडियमचे दुष्परिणाम कमी करते आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. पेरू रक्तातील कोलेस्टोरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो व त्यामुळे रक्त दाट होत नाही. पेरूमुळे रक्तात शोषल्या जाणारया साखरेचे प्रमाण कमी होते शिवाय त्यात फायबर किवा तंतूंचे प्रमाण चांगले असल्याने मधुमेहींना पेरू उपयुक्त ठरतो. संशोधनात असे आढळले आहे की १०० ग्रॅम पेरूमध्ये फायबरचे प्रमाण ५.४ ग्रॅम असते व त्यामुळे टाईप दोनचा मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.
अँटी ऑक्सिडंट म्हणून ओळखल्या जाणऱ्या सी व्हिटॅमिन किंवा क जीवनसत्वाचे प्रमाण पेरूत संत्र्याच्या चौपट असते.त्यामुळे पेरूचे नियमित सेवन कर्करोगाची शक्यता कमी करते. पेरूत आयोडिन नाही. तरीही त्यात कॉपर असल्याने पेरू थायरॉईडचे कार्य सुरळीत करण्यास मदतगार ठरतो. कॉपरमुळे हार्मोनचे उत्पादन, शोषण यथोयोग्य होते. पेरूतील मँगनीझ एन्झाईम अॅक्टीव्हेटर (संप्रेरके) म्हणून काम करते.थायमिन, बायोटिन, अॅस्कॉर्बिन अॅसिड चे प्रमाण यथोयोग्य राहते.
पेरू बी ग्रुप व्हिटॅमिनने परिपूर्ण आहे. व्हीटॅमन बी३ जे रक्तप्रवाह सुरळीत ठेवते व मेंदूचे कार्य चांगले राखते त्याचबरोबर बी ६ हे नर्व्हजसाठी उपयुकत आहे ते पेरूतून मिळते. गरोदरपणातील प्रॉब्लेम पेरूच्या सेवनाने कमी करता येतात. म्हणजे पेरूतील फोलेट वंधत्व दूर करते. डोळ्याचे आजार किवा व्याधी दूर करण्यासाठीही पेरू खावा. यातील अे व्हिटॅमिन दृष्टी सुधारण्यास मदत करते. त्वचेसाठीही पेरू उपयुक्त आहे. कारण यात असलेले ई व्हीटॅमिन त्वचेचे पोषण करण्यास मदत करते. गुलाबी पेरूत टोमॅटोच्या दुप्पट लायकोपेन असते ते त्वचेचे सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून रक्षण करते. प्रोस्टेट कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठीही पेरू उपयुक्त आहे.
पेरूची पानेही औषधी गुणधर्माची आहेत. पानांचा रस सर्दी, कफ, श्वासनलिकेचे आजार व घशातील बॅक्टेरियाचा संसर्ग कमी करण्यास उपयुक्त असून पाण्यात ही पाने उकळून केलेले काढा साखरेसह प्यायल्याने हे विकार आटोक्यात येतात असेही संशोधनातून सिद्ध झाले आहे.
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
December 28, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti