(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • खरेच संपतोय नक्षलवाद

    नक्षलवादाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असताना मोहिमेतील अधिकार्‍यांनी नक्षलवाद्यांचा प्रभाव संपत असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन केले असता या दाव्यात तथ्य नसल्याचे दिसते. नक्षलवाद फोफावण्याची अनेक कारणे आहेत आणि तो संपवायचा असेल तर या कारणांचे उत्तर शोधले पाहिजे. तसे केले तरच नक्षलवाद संपतोय की वाढतोय हे लक्षात येईल.

      October 7, 2010


  • विश्वकर्मा शिल्पकार : वैदिक कालखंड

    वेदकालीन शिल्पकार समाज शोधण्यासाठी वैदिक वाङमयाव्यतिरिक्त अन्य मार्ग नाही. सिंधू संस्कृतीचा कालखंडही साधारण वैदिक काळाच्या जवळपासचाच गृहित धरल्या जातो. त्यामुळे उत्खननातील पुरावेही शिल्पकारांची माहिती पुरवितात परंतु उत्खननातून उपलब्ध झालेली माहिती वैदिक समाजजिवनाचीच आहे, याबाबत निर्णायक मत अजूनपर्यंत तरी कोणी देऊ शकलेले नाही. काही समान तथ्यांचा केवळ आधार घेतला जातो. प्रस्तुत लेखकाने प्रचलीत धारणांचाच आधार घेऊन वेदकालीन विश्वकर्मा समाजाची स्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

      February 4, 2026


  • मंत्रपुष्पांजली

    खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन

    मंत्रपुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती पुढीलप्रमाणे :

    (या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल.)
    प्रत्येक श्लोक व श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणेः

    श्लोक - १ यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन्
    तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव:

    अर्थ - देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.

    श्लोक २ ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः

    अर्थ - आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची) पूर्ति प्रदान करो.

    श्लोक ३ (प्रथमार्ध) ओम स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं।

    अर्थ - आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.

    श्लोक ३ (द्वितियार्थ)
    समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात्। पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति।

    अर्थ - आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.

    श्लोक ४ तदप्येषः श्लोकोभिगीतो। मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति।।

    अर्थ - या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.

    संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारीही विश्वप्रार्थना. अंतीम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपपंथ विविध असतील परंतु सर्वांचा उद्देश एक, सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या सर्वांना समान संधी असलेले, सर्वहितकारी राज्य तेव्हांच शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णु समरस एकात्मतेची भावना असेल.

      September 6, 2016


  • जागतिक मोटरसायकल डे

    या मोटरसायकलचे वजन ५० किलो असून याचा टॉप स्पीड ४५ किलोमीटर प्रति तास होता. ही मोटरसायकल म्युनिक जर्मनी मध्ये बनवली गेली होती.

      June 21, 2022


  • ताम्र शेंगी

    हा मोठा वृक्ष असतो. हल्ली रस्त्याचे कडेनी बरीच ही झाडे लावलेली असतात. ह्याला एप्रिल, मे, जून व नंतर नोव्हेंबर,डिसेंबर मधे सोनेरी पिवळ्या रंगाची फुले येतात. रस्त्यावर फुलांचा सडा पडतो, रस्ता पिवळा होतो. अख्खे फुल खाली पडते. फुल नाजूक असते फुलाच्या पाकळ्या पिवळ्या असून देठाला विटकरी रंग असतो. ह्या फुलाचा रक्ताभिसरणावर उपयोग होतो असे माझे संशोधनात आले.

    2005मधे मला एकदा चक्कर आली म्हणून बी पी बघितले. 85--150 होते. म्हणून ह्या फुलांचा प्रयोग केला. ह्याची 15-20 फुले रात्रभर ग्लासभर पाण्यात ठेवली. सकाळी फुलं बाजूला करून ते पाणी अर्धी अर्धी वाटी चार वेळा घेतले. दुसरे दिवशी बी पी नाॅर्मल होते.

    माझे सासूबाईंना सकाळी सहा वाजता उठताना चक्कर येत होती. उठून बसता येत नव्हते. (आॅगस्ट 2006). म्हणून बी पी पाहीले. ते 140--240 इतके होते. सुदैवाने ताम्र शेंगीचे पाणी तयार होते. त्याचे डोस तासातासानी दिले. आठ वाजता चक्कर कमी झाली. व त्या उठल्या. ह्या आधी मी डाॅ.तांबेना फोन केला होता त्यानी एक गोळीचे नाव सांगितले. व दुपारी एक वाजता बी पी घेऊन सांगा. असे सांगितले दहा वाजता केमिस्टचे दुकान उघडते. तो पर्यंत सासूबाई कामाला लागल्या. त्यानी गोळी नको सांगितले. डाॅ. तांबेनी सांगितले होते म्हणून एक वाजता बीपी पाहीले तर 90--140 होते. नंतर दोन दिवसात ताम्रशेंगीचे पाणी देऊन बी पी नाॅर्मल आले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. साधे रस्त्यावर पायदळी तुडवले जाणारे फुल निसर्गाने किती औषधी बनविले आहे. डाॅक्टरला सहा वाजता बोलावले असते तर अँब्यूलंस करून ICUत चार दिवस ठेवले असते.

    आमचे शेजारी राहणारे श्री. गायधनी (वय 70चे पुढे ) याचे बीपी 100--200 झाले म्हणून डाॅ.नी त्याना अॅडमीट होण्यास सांगितले. त्यांची अॅडमीट होणयाची इच्छा नव्हती. त्यांना मी माझेकडील ताम्रशेंगीचे पाणी दिले तीन डोस अर्ध्या, अर्ध्या तासानी दिल्यावर ते शांत झोपले. सकाळी दोन डोस घेतल्यावर बीपी बघीतले ते 85--140 होते

    वरील अनुभव अचानक वाढलेल्या बीपीचे आहेत. परंतु ज्यांचे बीपी कायम हाय असते अशांना मी फुले सुकवून पावडर करून रोज अर्धा चमचा पाण्या बरोबर घेण्यास सांगितले. ज्यांनी केले त्याचे बीपी महीना भरात नाॅर्मलवर आले.

    ताम्रशेंगी फुलांचे पाणी करणे---एका ग्लासभर पाण्यात 15ते20 फुले रात्रभर किंवा 8--10 तास ठेवावीत.नंतर पाणी गाळून 50 मिलीचा एक डोस असे आवशकते नुसार 4ते 6 डोस घ्यावेत

    ताम्रशेंगीच्या फुलांची पावडर करणे--पिशवीभर फुले सावलीत चांगली सुकवावीत.नंतर मिक्सर मधे घालून पावडर करावी. रोज सकाळ संध्याकाळ अर्धा,अर्धा चमचा पाण्याबरोबर घ्यावी.

    अरविंद जोशी B.Sc.
    गौरव अपार्टमेंट,विश्वमेडीसिन मागे, सनसिटी रस्ता, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे

    फोटो पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा
    https://drive.google.com/file/d/0B_d0-zthRBc1ZEJQVXhMeXhtZVU/view?usp=drivesdk

      September 9, 2017


  • बकवास नियोजनातील फोलपणा

    गेल्या आठवड्यात पावसाने वऱ्हाडाचा तुरळक भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढले. मुंबई आणि कोकण या किनारपट्टीवरील प्रदेशात तर पावसाने विनाशकारी तांडवनृत्य केले. गेल्या 140 वर्षांचा विक्रम मोडणाऱ्या पावसाने मुंबईचे तथाकथित सौंदर्य पार धुऊन काढले.

      July 31, 2005


  • आंजर्ले गावचे कड्यावरील गणपतीचे मंदिर

    आंजर्ले हे गाव दापोली तालुक्यात (जि. रत्नागिरी) समुद्रकिनारी वसले आहे. गावाला जोडणारी वाहतूक व्यवस्था परिपूर्ण असून आंजर्ले – वेसवी – मंडणगड-मुंबई त्याचप्रमाणे आंजर्ले – दापोली व तेथून मुंबई- पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी असे रस्ते आहेत.

      July 12, 2025


  • मलेरिया विरुद्ध औषधे व त्यांचा इतिहास

    मलेरिया व औषधे

    मनुष्य जातीला मलेरिया सदृश तापाने २५०० ते ३००० वर्षांपासून पछाडल्याचे दाखले आहेत . हा रोग कशा पद्धतीने होतो ह्याचे गूढ उकलण्यास १ ९ वे शतक उजाडावे लागले ; परंतु त्या आधी या तापावर प्रभावी औषधे वापरल्याच्या नोंदी आहेत .

    २००० वर्षांपूर्वी चीनमध्ये अशा तापावर चॅगशॅन ( डिकोरा फेरीफ्युगा ) वनस्पतीचे चूर्ण वापरीत असत . १२ व्या शतकापासून पुढे चीनमध्ये Artemisia Anuya ( क्विंघासो ) या वनस्पतीचा उपयोग ताप उतरविण्यासाठी केला जात असे . परंतु नेहमीच्या चीनी पद्धतीनुसार अर्थातच हे औषध जगापासून पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आले होते ते अगदी थेट १ ९ ८० सालापर्यंत ! आजमितीला बनणारे Artesunate हे याच वनस्पतीपासून बनविले जाणारे एक प्रभावी औषध आहे .

    १७ व्या शतकात दक्षिण अमेरिकेतील स्पेनच्या व्हाईसरॉयच्या पत्नीला झालेला मलेरिया सदृश ताप तेथील एका वनस्पतीच्या सालीच्या अर्कामुळे बरा झाला . त्यावेळी या वनस्पतीला स्थानिक लोक तापाची झाडे ( Fever Tree ) म्हणून ओळखीत . या झाडांचा शास्त्रीय अभ्यास करून त्यांना सिंकोना ( व्हाईसरॉयच्या पत्नीचे स्पेनमधील गाव ) हे गावाचे नाव देण्यात आले .

    तसे पाहाता पेरु व त्यांचा शेजारी बोलेव्हिया या देशांमधील क्युचुआ हे इंडियन जमातीचे लोक या सिंकोना झाडाचा उपयोग शेकडो वर्षांपासून ताप उतरविण्यासाठी करीतच होते. तापाबरोबर येणारी हुडहुडी या झाडाच्या रसाने नाहिशी होते व तापही उतरतो याचे ज्ञान त्यांना फार पूर्वीपासून होते . इंडियन जमातीचे लोक ह्या झाडाच्या खोडाची बारीक पावडर वाईनबरोबर मिसळून ती पिण्यास देत ; ज्या अनुभवातून त्याचा मलेरिया प्रतिबंधकारक उपयोग लक्षात आला होता . या जेसूट बार्क ( झाडाची साल ) पावडरचे महत्त्व पेरु मध्ये एवढे वाढले की त्याची मौल्यवान वस्तूंमध्ये गणना होऊ लागली . या झाडाची आयात युरोपात होऊ लागली . इंग्लंडच्या राजाने ही मौल्यवान भेट रोमच्या राजाला दिली . त्यासुमारास इटलीत पोपसकट अनेक मान्यवर व्यक्तींना मलेरिया सदृश तापाने ग्रासलेले होते . फ्रेंच संशोधक पियारे आणि जोसेफ यांनी सिंकोना पासून निघणाऱ्या पावडरचे रासायनिक पृथ : करण केले व १ ९ २० मध्ये त्याला क्विनिन हे नाव देण्यात आले . क्विनिन हा शब्द पेरु भाषेतून क्युचुआ ( इंका ) सिंकोना बार्क व त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन ते क्विना क्विना अथवा पवित्र बार्क ( बार्क म्हणजे झाडाची साल ) या नावाने ओळखले जाऊ लागले .

    युरोपियन वसाहती स्थापन करणाऱ्यांनी आपल्याबरोबर क्विनिन अफ्रिकेत नेले . त्यामुळे तेथील स्थानिक लोकांची मलेरियातून मुक्तता होऊ लागली व यामुळे या वसाहतकारांचा अफ्रिकेत चांगला जम बसला . या झाडाचे महत्त्व ओळखून पेरु मधील सरकारने सिंकोनाचे बी युरोपात निर्यात करण्यास बंदी घातली . एका डच व्यापाऱ्याने सिंकोनाच्या बिया पळवून त्याची लागवड जावा बेटांमध्ये केली , जेथे त्यांचे साम्राज्य होते . अशा रीतीने डचांनी संपूर्णपणे सिंकोना बाजारपेठ आपल्या ताब्यात घेतली . पुढे जवळजवळ १०० वर्षांनंतर दुसरे महायुद्ध सुरू झाले . जावा बेटांवर जपान्यांनी कबजा केला . सिंकोना पावडर युरोपात येणे बंद पडले . हॉलंडमध्ये जो काही साठा होता तो जर्मनांच्या ताब्यात गेला . त्यामुळे युरोपियनांची कोंडी झाली . अमेरिकेने कोस्टो रीका या बेटांवर सिंकोना वाढविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही . या सर्व अनर्थामुळे अमेरिका व युरोप या दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांना दुसऱ्या महायुद्धात क्विनिन न मिळाल्याने त्यांचे हजारो सैनिक मलेरियामुळे मृत्युमुखी पडले . जपानच्या हाती जावा बेटावरील सिंकोना झाडे होती परंतु त्यापासून क्विनिन तयार करण्याकडे तेथील जपान्यांनी बरोबर लक्ष न दिल्याने त्यांचेही हजारो सैनिक या औषधा अभावी मृत्यु पावले .

    महायुद्ध संपले आणि अमेरिकन संशोधकांनी क्विनिनचे उत्पादन प्रयोगशाळेत रासायनिक पद्धतीने केल्यामुळे टनांमध्ये हे उत्पादन होऊ लागले . होमिओपॅथीचा जनक असलेला सॅम्युअल हॅनेमान एकदा ' मलेरियावरील उपचार ' या लॅटिन पुस्तकाचे भाषांतर करीत असताना एका विधानाने त्याचे लक्ष वेधून घेतले . ' सिंकोना बार्क या वनस्पतीमधील क्विनिन या घटकाच्या कडवट गुणधर्मामुळे मलेरिया बरा होतो ' अशा आशयाचे ते वाक्य होते . यापेक्षा अधिक कडू असलेले परंतु मलेरियासाठी प्रभावी नसलेले अनेक औषधी पदार्थ हॅनेमानला ठाऊक होते . सिंकोना बार्कमध्ये नेमके काय रसायन आहे हे शोधण्यासाठी त्याने एक धाडसी प्रयोग केला . त्याने स्वतःच सिंकोना बार्क घेऊन बघितले . काही डोस घेतल्यावर त्याला काही लक्षणे मलेरिया सदृश दिसू लागली . उदाहरणार्थ थंडी वाजून हुडहुडी भरून ताप , डोकेदुखी , अंगदुखी अशक्तपणा वगैरे . डोस बंद केल्यावर ही लक्षणे लगेच नाहिशी होत . त्यांच्या लक्षात आले की सिंकोना बार्क मध्ये मलेरिया सारखी लक्षणे उत्पन्न करण्याची क्षमता आहे . म्हणूनच ते मलेरियावरील औषध आहे . मलेरियाची लक्षणे असलेल्या तापाच्या अनेक रुग्णांना हॅनेमानने सिंकोना बार्कचे अल्प डोस देऊन बरे केले . होमिओपॅथीच्या सिद्धान्ताप्रमाणे उपचाराचे रसायन अतिशय अल्प प्रमाणात दिल्यास रुग्ण बरा होतो .

    अशा तऱ्हेने १६३० पासून १९४० सालापर्यंत क्विनिन या एकमेव औषधाने मलेरिया विरुद्ध टक्कर दिली . आजही काही वेळा त्याचा विचार केला जातो . १ ९ ०० ते १ ९ १० या काळात Atomic lodine अथवा Nascent reacting lodine या पासून बनलेले बेसेलिन हे औषध मलेरियावरील रामबाण औषध म्हणून युरोपात उदयास आले होते . या औषधावर भारतातील एक नावाजलेले शास्त्रज्ञ डॉ . शंकर आबाजी भिसे ( जन्म १८६७ मुंबई ) यांनी बरेच संशोधन केले होते . ब्रम्ही तेलाचा उपयोग करुन lodine चे प्रमाण वाढवून त्यांनी Bhise's Medicine for Malaria तयार केले होते . ज्याला पुढे १ ९ २० मध्ये अमेरिकेत पेटंट मिळाले होते . तसेच खाणीमधून मिळणारे गंधकमिश्रित पाणी व काही विशिष्ट समुद्र वनस्पतींचे मिश्रण डॉ . भिसे यांनी तयार केले होते , ज्याचा ॲमेझॉन खोऱ्यातील मलेरिया विरुद्ध यशस्वीपणे उपयोग केला गेला होता . पुढे मेक्सिकोमध्ये या मिश्रणाचे इंन्जेक्शन बनविण्यात आले होते . क्विनिन पेक्षा ही औषधे जास्त प्रभावी ठरली होती .

    Edgar Caye नावाच्या डॉक्टरने अशा तऱ्हेच्या औषधांचा मलेरिया विरुद्ध वापर केलेला होता . अशा तऱ्हेच्या अभ्यासाला Holistic Medicine म्हणतात . Caye हे त्याचे जनक होते .

    जगातील दर ५० मलेरियाच्या रुग्णांपैकी एक रुग्ण हा अजूनही गावठी वनस्पतीपासून निघणारे औषध वापरतो . झाडांच्या विविध प्रकारच्या जवळपास १४० फॅमिली मधील १२०० निरनिराळ्या तऱ्हेच्या झाडांपासून तयार होणारी औषधे मलेरिया विरुद्ध जगभर वापरली जातात .

    १ ९ ४३ मध्ये एका जर्मन औषध कंपनीने क्लोरोक्वीन हे पूर्णत : रासायनिक द्रव्ये वापरून औषध तयार केले . पुढे १० ते १५ वर्षे या एकमेव औषधाने मुसंडी मारली . परंतु त्याच्या बेसुमार वापरामुळे P. Falaciparum विरुद्ध त्याची परिणामकारकता कमी होऊ लागली .
    १९६० मध्ये थायलंड , कंबोडिया येथे Falciparum परोपजीवांचा Resistant strain मिळाला , ज्याला क्लोरोक्वीन रेझिस्टंट असेही म्हणतात . या विशिष्ट परोपजीवांचा पुढे दक्षिणपूर्व आशियात प्रसार झाला .

    १९७३ मध्ये आसाममधील कार्बी अँगलाँग जिल्ह्यात या क्लोरोक्वीन रेझिस्टंट स्ट्रेनचे
    (Chloroquin Resistant strain ) अस्तित्व लक्षात आले .

    १९५० सालापासून दर दशकात नवीन औषधांची भर पडत आहे . आजमितीला खालील औषधे मलेरियाकरिता उपलब्ध आहेत .

    औषधांची यादी व त्याच्यासमोर ती कोणत्या Brand Name ने बाजारात उपलब्ध आहेत ह्यांची नावे दिलेली आहेत . औषधे बनविणाऱ्या अनेक कंपन्या असल्याने सर्वच्या सर्व ब्रँड नेम देणे शक्य नाही . ही औषधे बाजारात गोळ्या , द्रवरूप डोस अथवा इंन्जेक्शन या स्वरूपात मिळतात .

    Generic Name Brand Name
    1 ) Quinine Cinkona , Kunen , Malgo 300 ,
    Quinarsol , Quinine

    2 ) Chloroquine Lariago , Chloroquine
    phosphate , Emquin , Rimoquin, Resochin

    3 ) Amodiaquine Basoquin, Camoquin

    4 ) Primaquine Malirid

    5 ) Proquanil

    6 ) Mepacrine

    7 ) Artesunate Falcigo, Larinate, RTsun (combikit)

    8 ) Bulaquine Aablaquin

    9 ) Mefloquine Confal, Facital, Mefax, Mefloc

    10 ) Artemether Larither, Paluther

    11 ) Pyrimethamine Croydoxin, Loridox, Rimodar
    and Sulphodoxine

    12 ) A - B Arteether Duther, Reether

    13 ) Doxycycline

    14 ) Erythromycin

    अशा प्रभावी औषधांमधून योग्य औषध निवडणे , ती औषधे गोळ्या , इन्जेक्शन , द्रवरूप डोस वा शिरेमार्फत देणे तसेच दोन निरनिराळ्या गटांची औषधे एकत्रित Combination Therapy देणे , हे सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ठरविणे अत्यंत आवश्यक आहे काही औषधांमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात . या सर्व विषयाची व्याप्ती फार मोठी असल्याने यासंबंधी अधिक विवेचन केलेले नाही . इतकी प्रभावी औषधे हाती असताना सुद्धा काही वेळा ताप आटोक्यात येत नाही . त्यातील काही समस्यांचा आढावा येथे घेतला आहे .

    १ ) औषधांना प्रतिसाद न देणारे परोपजीवी ( Resistant strains of parasites ) व्यवस्थितपणे औषधांचा डोस देऊन सुद्धा जिवंत राहतात व त्यांची वाढ रोखण्यात अपयश येते . एका विशिष्ट मर्यादेच्या वर औषधांचा डोस वाढविणे शक्य नसते . परोपजीवांच्या जनुकात होणारा बदल , व बदललेल्या जनुकांची अमर्याद होणारी वाढ याचबरोबर परोपजीवांमधील औषधांना प्रतिसाद देण्याची नकारात्मकता यामुळे औषधांची मारकता कमी होताना दिसते .

    २ ) उलटणारा मलेरियाचा ताप हा शरीरात प्रथम शिरलेल्या परोपजीवांमुळेच होत असतो याचे मुख्य कारण असे की सर्व परोपजीवी रक्तातून नाहिसे झालेले नसतात . यासाठी औषधांचा अपुरा डोस अथवा त्यांचा अपुरा पडणारा प्रभाव कारणीभूत होतो . वारंवार येणारा मलेरियाचा ताप व परत परत डास चावल्याने होणारा मलेरिया या दोन्ही गोष्टी उलटणाऱ्या तापापेक्षा भिन्न आहेत .

    ३ ) परोपजीवांच्या एकूण संख्येमध्ये औषधाला दाद न देणाऱ्या परोपजीवांचे प्रमाण किती आहे व त्यांची एकत्रितपणे रोग पसरविण्याची क्षमता किती आहे , या परोपजीवांमधील गुणधर्माला Selection Pressure असे संबोधिले जाते . दाद न देणाऱ्या परोपजीवांची संख्या जेव्हा दाद देणाऱ्या परोपजीवांच्या संख्येपेक्षा जास्त असेल तर Selection Pressure जास्त आहे असे मानतात . मलेरिया विरुद्ध वापरल्या जाणाऱ्या औषधांचा परिणाम कमी होण्याकडे , अथवा परिणाम मुळीच न होण्याकडे जात असलेला कल ( Trend of Resistance to various drugs ) गेल्या पन्नास वर्षात अनेक औषधांच्या संदर्भात चालूच आहे . या Resistance ( प्रतिकार शक्ती ) प्रक्रियेत खंड पडलेला नाही हे लक्षात आलेले आहे . या मागे अनेक कारणे आहेत .

    गरज नसताना सरसकट प्रत्येक ताप मलेरिया समजून नवीन गटाची विविध औषधे वापरण्याकडे दिवसें दिवस कल वाढतो आहे . त्याचबरोबर रक्ताची परोपजीवांसाठी केलेली तपासणी नकारात्मक ( Negative ) असताना औषधे द्यावीत का नाहीत ठरविणे तितकेच कठीण आहे . प्रयोगशाळेच्या रक्त तपासणीची गुणवत्ता ( Quality Control ) चांगली राखणे तितकेच महत्त्वाचे ठरते . या जटील प्रश्नांचा गुंता सोडविणे काही वेळा फार कठीण असते .

    जगातील काही गरीब देशांत कमी दर्जाची औषधे मिळत असल्याने रोग आटोक्यात येत नाही . अशा तऱ्हेच्या बनावट औषधे बनविणाऱ्या अनेक बोगस कंपन्या ही त्या देशांची डोकेदुखी आहे.

    कुपोषणाने ग्रासलेल्या व AIDS झालेल्या रुग्णात मलेरियाचे परोपजीवी जास्त काळ ठाण मांडून बसतात . त्यामुळे औषधयोजना निराळी करावी लागते . Plasmodium Vivax झालेल्या रुग्णांना काही महिन्यांनंतर परत मलेरिया होण्याचा संभव असतो . त्याकरिता Primaquin या औषधाचा १५ दिवसांचा कोर्स घेण्याची गरज असते . परंतु हे औषध चालू करण्यापूर्वी रक्तातील G.6 PD ( Glucose 6 Phosphate dehydrogenase ) ह्या Enzyme ( विकर ) ची तपासणी करणे आवश्यक आहे . या Enzyme चे रक्तातील प्रमाण फार कमी असेल वा पूर्णपणे त्याचा अभाव असेल तर हे औषध देणे धोकादायक ठरते . पारशी सिंधी व काही मराठी पोटजातीतील काही लोकांमध्ये या Enzyme चा अभाव आढळतो .

    मलेरिया प्रतिबंधक औषध उपचार

    Drug Prophylaxis : जगामध्ये ज्या देशात मलेरिया अजिबात नाही अशा भागातील प्रवासी जेव्हा मलेरिया ग्रस्त देशात प्रवासास जातात , त्यावेळी त्या देशात पोहोचण्याच्या आधीपासून ते पुन्हा स्वत : च्या देशात परत आल्यानंतर काही दिवसांपर्यंत इतका काळ त्यांना मलेरिया प्रतिबंधक औषधे घेणे गरजेचे असते , या औषधपद्धतीला Chemoprophylaxis or Drug Prophylaxis असे म्हणतात .

    मलेरिया ग्रस्त १०० देशांना जगभरातून १२५ दशलक्ष लोक प्रतिवर्षी भेट देत असतात . त्यापैकी ३०,००० लोकांना मलेरिया होतो . यासाठी कोणत्या देशातून प्रवास करताना कोणती औषधे घ्यावीत यासंबंधीत तक्ता W.H.O. तर्फे प्रसिद्ध होत असतो . काळाप्रमाणे औषधे बदलत असतात , त्यांची प्रवाश्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे .

    ज्या देशांमध्ये मलेरिया कायमचा ठाण मांडून बसलेला आहे , तेथील लोकांनी अशी प्रतिबंधक औषधे घेतल्याने मलेरियावर प्रतिबंधकता येत नाही . परंतु काही तज्ञांच्या मते यापैकी काही औषधे बराच काळ घेतल्यास उपयोग होण्याची शक्यता असते . तरीसुद्धा गर्भवती स्त्रियांनी अशी औषधे घ्यावीत का हे त्यांच्या तज्ञ डॉक्टरने ठरवावे कारण औषधाचा गर्भावर कोणता परिणाम होईल किंवा नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे . अशी औषधे घेण्याने १०० टक्के प्रतिबंधता मिळेलच अशी खात्री नाही . अखेरीस मलेरियावरील लसीचा पर्याय हाच उपयोगी ठरेल अशी आशा वाटते .

    आयुर्वेदिक औषधोपचार व मलेरिया

    आयुर्वेदात ज्वराचा अभ्यास फार पुरातन कालापासून केला जात असे . ज्वराची मुदत व हुडहुडीचे प्रमाण यावरून ज्वराचे तीन प्रकार मानलेले आहेत . रोज येणारा ताप , तिसऱ्या व चौथ्या दिवशी येणारा ताप यानुसार येणाऱ्या ज्वराप्रमाणे औषधे ठरविली जात . तापाच्या प्रथम अवस्थेत भूक न लागणे , अंगमोडी , जिभेवर जमा होणारा पांढरा थर अशी लक्षणे असताना पूर्ण लंघन करावे , त्यामुळे प्रतिबंधकारक शक्ती वाढण्यास मदत होते . मलेरिया व तत्सम आजारात अनेक वनस्पतींपासून बनविलेले काढे , मात्रा , पावडरी वापरल्या जात .

    सध्या प्रचलित असणारी औषधे आहेत . १ ) सुदर्शन गानवटी २ ) पंचतिकता घानवटी ३ ) नारायण ज्वरअंकुश ४ ) पिवली वर्धमान रसायन ५ ) Alstronine

    अमेरिकेतील वॉल्टर रीड आर्मी संशोधन संस्थेत २०,००० वनस्पतींपासून बनविल्या जाणाऱ्या अर्कावर गेली १० वर्षे मलेरिया परोपजीवांपासून होणाऱ्या तापावर संशोधन चालू आहे . त्यातील २६ औषधे निवडलेली असून त्यांचा वापर करण्याबाबत प्रयत्न चालू आहेत . यामधील Alstonia Scholaris वनस्पतीपासून तयार केलेल्या औषधात मलेरिया परोपजीवांविरुद्ध चांगले गुण असल्याचे लक्षात आले आहे . वनस्पतींपासून तयार केली जाणारी औषधे कमी किमतीत मिळण्याची शक्यता असल्याने गरीब देशात त्यांचा भरपूर उपयोग करता येईल . परंतु अजून ही औषधे बाजारपेठेत येण्यास बऱ्याच निकषांची गरज आहे .

      October 28, 2022


  • छपाईत रंगीत छायाचित्र थोडे हलल्यासारखे का वाटते?

    रंगीत चित्र किंवा छायाचित्र हे मूळ चार रंगात छापले जाते. प्रथम छायाचित्र स्कॅनर उपकरणावर लावून ते संगणकावर घेतले जाते. पूर्ण पानातल्या चारपैकी प्रत्येक रंगाचा भाग निरनिराळा केला जातो. उदाहरणार्थ पान क्र. एकवरील लाल शीर्षक, जाहिरातीमधील लाल रंगाचा भाग, एखादे केशरी रंगाचे फूल असेल तर त्यातला पिवळ्या रंगाचा हिस्सा न घेता लाल रंग वगैरीची प्रतिमा, काळया रंगातली प्रामुख्याने मजकुरातली अक्षरे, छायाचित्रातल्या काळ्या रंगाचा हिस्सा घेऊन या प्रमाणे चार रंगाच्या चार प्रतिमा तयार करण्याला रंग विभागणी करणे म्हणतात.

      May 27, 2023


  • बूस्ट’ चे सिक्रेट

    काही वर्षांपूर्वीची गोष्ट. भल्या सकाळी सहाच्या सुमारास आमच्या घराची बेल वाजली. घरी सर्वांची नीजानीज झाली होती. रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघणे आणि मग सकाळी उजाडेपर्यंत ताणून देणे हा आमच्या घरचा शिरस्ता. पहाटे दूधवाल्याने झोपमोड करु नये म्हणून आमच्या दाराला पिशवी बांधलेली असते. या पिशवीतले पैसे दूधवाल्याने न्यायचे आणि पिशवीत दूधाच्या पिशव्या ठेवायच्या. एवढया सकाळी दरवाजात कोण उपटल असा विचार करत मी चरफडत दार उघडलं. बघतो तो समोर कुणी पोसवदा मुलगी उभी. “कचराऽऽ” ती केकाटली. इथे मी हैराण.

      August 18, 2024