(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वंश

    वंशाला दिवा हवा, अर्थात पणती सुद्धा आपलाच वंश आहे हे आम भारतीयाला समजायला अजून जितकी शतके लागणार तितकी शतके स्त्रीभ्रूण हत्या होत राहणार. आपल्या देशात अजूनही असा मोठा वर्ग आहे जो चितेला अग्नी देण्यासाठी मुलगाच पाहिजे या बुरसटलेल्या विचारांचा आहे. यात अशिक्षित, गरीब, निम्न मध्यम वर्गातील लोक अश्या विचारांचे आहेत हे प्रकर्षाने जाणवते, किंबहुना असे म्हणू शकतो कि, हा लेख ज्या लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही असे हे लोक आहेत.

    ज्या लोकांना भ्रूण हत्येची भीती वाटते असे लोक अश्या पणत्याना उकिरड्यावर फेकतात, अथवा अनाथ आश्रमामध्ये रवानगी करतात, किव्वा घरात पणत्यांची आरास तयार करतात. आता इतक्या पणत्या घरात आल्यावर त्यांच्या उजेडात हा वंशाचा दिवा कोणते दिवे लावणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

    यातील बहुतेक पणत्या पिताश्री घाटावर जाईपर्यंत सासरी जात नाहीत, कदाचित त्या न जाण्यामुळेच चिंतेने हाय खाऊन पिता यमाच्या दरबाराकडे प्रस्थान करतो, आणी या वंशाच्या दिव्याला अग्नी देण्याचे दिव्य कर्तव्य बजावावे लागते.

    खऱ्या अर्थाने कथा इथे सुरु होते, मागे राहिलेल्या कुटुंबाची बाप जिवंत असताना सुरु झालेली ससेहोलपट वेग धरू लागते. मुली सासरी न जाता वडिलांचा अर्धवट संसार आपल्या माऊलीकडे व या दिव्याकडे पहात स्वतःच्या खांद्यावर घेऊन नशिबाला दोष देतात.

    आजच्या जगात पणत्या काय कमी सक्षम आहेत का? त्या सर्व ठिकाणी खांद्याला खांदा भिडवून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहेत, मग त्या काय अग्नी देण्यासारखी क्रिया करू शकत नाहीत? आजकाल वर्तमानपत्रात मुलीनी आपल्या वडिलांना अग्नी दिला, अश्या बातम्या वारंवार छापून येत आहेत, हे समाज परिवर्तनाचे सुंदर उदाहरण आहे, यालाच आपण धर्म मानला पाहिजे. मुक्ता दाभोळकर, पंकजा मुंडे, यांच्या सारख्या असंख्य मुलींनी समाजविरोध पत्करून आपल्या पित्याला अग्नी दिला, यांनी २१व्या शतकातील आदर्श प्रथा सुरु केली असे वाटत नाही का? या महिलांचा आदर्श समाजाने सशर्त स्वीकृत केला पाहिजे, आणि अश्या मुक्ता, पंकजा प्रत्येक घरात जन्माला आल्या पाहिजेत.

    ज्या काळात अग्नी देऊन अंत्यविधी करण्याची प्रथा अस्तित्वात आली, त्या काळी कुटुंब नियोजन प्रथा अस्तित्वात नव्हती, पाच ते आठ अपत्य असणे हेच कुटुंब नियोजन मानले जात असे, त्यामुळे त्यात किमान एक मुलगा जन्माला येतच असे. एकंदरीत, त्या काळी मुली, व बायका घराबाहेर फारश्या जात नसत, त्यामुळे मुलगे अग्नी देण्याचे काम बजावत असत, यात कोणताही कर्मकांडाच्या भाग नाही, तर ही एक सर्वसामान्य रूढी होती.

    केवळ अग्नी देण्यासाठी मुलगा पाहिजे असे म्हणून सर्व घरावर देशोधडीला लागण्याची पाळी येऊ देऊ नका असे या लेखाद्वारे सांगण्याची वेळ आली आहे, त्याच बरोबर हे हि सांगणे अपरिहार्य आहे कि, अश्या बऱ्याच प्रथा आपण मागे सोडून दिल्या आहेत, हे एकविसाव्या शतकातील लोकांनी विसरायला नको.

    हे लक्षात राहूद्या स्थल-काल-परत्वे ज्या मुळे निसर्गाला हानी पोहोचत आहे, अश्या पौराणिक प्रथा व परंपरा मोडीत निघाल्या पाहिजेत तसेच नवीन लोकहित प्रथा अस्तित्वात आल्या पाहिजेत, तरच लोक धर्माकडे आदराने पाहतील. धर्म म्हणजेच रूढी परंपरा काळानुसार तयार करून त्या नुसार जगणे, यात काही रूढी हजारो वर्षांपूर्वी योग्य असतील, पण आज त्यांची गरज नाही, तर त्या एक तर सोडून द्याव्यात, किव्वा त्यात काळानुसार बदल करावा.

    डार्विन ने सांगितल्याप्रमाणे उत्क्रांती हा निसर्गाचा नियम आहे, यात जो सक्षम आहे तोच जिवंत राहतो आणी सक्षम तोच असतो जो आपल्यात निरंतर बदल घडवितो. धर्मातही आज उत्क्रांतीची नितांत गरज आहे, अन्यथा कर्मठ, अघोरी धर्म डायनासोर सारखे लुप्त होण्यास वेळ लागणार नाही.

    धन्यवाद
    विजय लिमये (9326040204)

      September 26, 2016


  • बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांची अवस्था

    नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील तरतुदीनुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मीयांना भारतात १२ ऐवजी ६ वर्षे वास्तव्य केल्यानंतर भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. ‘या देशातील अल्पसंख्यकांना जाण्यासाठी भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही म्हणुन हे जरुरी होते.

      December 3, 2019


  • श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग ४

    अकिंचनार्तिमार्जनं चिरंतनोक्तिभाजनं !पुरारिपूर्वनंदनं सुरारिगर्वचर्वणम् !!
    प्रपञ्चनाशभीषणं धनंजयादिभूषणं !
    कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् !!४!!

    अकिंचनार्तिमार्जन- किंचन म्हणजे थोडेसे, अल्प, किंचित. ते देखील त्यांच्याजवळ नाही ते अकिंचन. व्यवहारातील सुखाची, आनंदाची थोडीही साधने ज्यांच्याजवळ नाहीत ते अकिंचन. अध्यात्मिक भूमिकेतून ज्यांच्याजवळ साधना, उपासना नाही ते अकिंचन. त्यांनीदेखील प्रार्थना केल्यावर त्यांची आर्तता म्हणजे दुःख दूर करतात ते अकिंचनार्तिमार्जन.

    चिरंतनोक्तिभाजन- चिरंतन अर्थात शाश्वत, अक्षय, अविनाशी. उक्ती अर्थात वचन. जे शाश्वत वचन, चिरंतन कथन ते चिरंतनोक्ती.

    अशी आहेत वेद,शास्त्र उपनिषदे. त्यात संगीतलेले ज्ञान शाश्वत आहे. त्यांचे कथन चिरंतन आहे.

    अशा वेद,शास्त्रांचे भाजन अर्थात वर्ण्य विषय, सांगण्याचा मूळ सिद्धांत ते चिरंतनोक्तिभाजन.

    पुरारिपूर्वनंदन- पुर म्हणजे नगर. ज्याच्याजवळ तीन पुर होते तो त्रिपुर. त्या त्रिपुरासुराचे शत्रू म्हणजे भगवान शंकर हे पुरारी.

    त्यांचे पूर्वनंदन अर्थात मोठे चिरंजीव. श्रेष्ठ चिरंजीव. हा सामान्य अर्थ. तर भगवान शंकरांच्या देखील पूर्वी विद्यमान असणारे आनंदतत्व हा अधिक सुंदर अर्थ. हे आनंद तत्व, हा आत्माच पुत्र रुपात प्रगट होतो असे शास्त्र सांगते.

    सुरारिगर्वचर्वण- सुर म्हणजे देवता. त्यांचे अरी म्हणजे शत्रू अर्थात दैत्य. त्या सगळ्या राक्षसांच्या गर्वाचा जे चावून चोथा करतात, अर्थात तो गर्व पूर्णपणे नष्ट करून टाकतात ते सुरारिगर्वचर्वण.

    प्रपञ्चनाशभीषण- जे या भीषण प्रपंचाचा विनाश करतात किंवा जे या प्रपंचातील भीषणत्वाचा विनाश करतात त्यांना प्रपञ्चनाशभीषण असे म्हणतात.

    धनंजयादिभूषण- आपल्या शरीरात प्राण, अपान इत्यादी मुख्य वायू सह नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे पाच उपप्राण असतात. यापैकी धनंजय हा मस्तकात रहात असून तो कधीही शरीर सोडत नाही. त्या धनंजयाला भूषण करणारे ते धनंजयादिभूषण. अर्थात यांच्या कृपेने या शरीरात चैतन्य तत्व शेवटपर्यंत स्थिर राहते ते धनंजयादिभूषण.

    कपोलदानवारण- हा शब्द गजमस्तकाशी संबंधित आहे. हत्तीच्या सोंडेवर समोर जे अलंकृत कापड सोडतात त्याला कपोलदान असे म्हणतात. ते धारण केलेला वारण म्हणजे हत्ती.

    असा सजवलेला हत्ती हे सर्वोच्च समृद्धीचे प्रतीक आहे.भगवान गणेश अशा सर्वोच्च वैभवाने अलंकृत असल्याने त्यांचे नाव आहे कपोलदानवारण.

    पुराणवारण- वारण शब्दाचा आणखी एक अर्थ आहे अदृश्य. पुराण वारण याचा अर्थ पुराणांमध्ये अदृष्य स्वरूपात असणारे. कोणत्याही ग्रंथात शब्द हे दृश्य असतात तर अर्थ अदृश्य असतात. सगळ्या पुराणांचा अंतिम अर्थ, अंतिम कथनीयतत्व, अंतिम सिद्धांत ते पुराणवारण.

    अशा भगवान गणेशांची मी भजन करतो, आराधना करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      January 4, 2020


  • कोल्हापूरची अंबाबाई

    श्री महालक्ष्मी देवीच्या नित्य निवासाने पुनित झालेले महाराष्ट्रातील महाक्षेत्र करवीर वा कोल्हापूर या नावाने ओळखले जाते. हे क्षेत्र प्राचीन शक्तिपीठ असून पुराणमताप्रमाणे याला १०८ कल्पे झाली आहेत. अठरा पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, देवीभागवत, हरिवंशपुराण, स्कंदपुराण आणि मार्कंडेय पुराणात करवीर क्षेत्राचा उल्लेख सापडतो.

      June 10, 2025


  • जुन्या मराठी पंगतीतील श्लोक आणि मजेदार गाणी ( भाग २ )

    महाराष्ट्रामध्ये विविध कारणांसाठी एकत्र जेवणावळींची खूप जुनी प्रथा आणि जेवण सुरु असतांना देवाचे आणि सुसंगत विषयांवरील संस्कृत किंवा मराठी श्लोक म्हणणे, त्यातील वैविध्य याबद्दल मी या आधीच्या भागात लिहिलेले आपण वाचले असेलच. तेथे म्हटला जाणारा अर्ज आपण पहिला तशी एक निमंत्रण पत्रिका ( त्यावेळी कुंकुम पत्रिका, कुंकोत्री, कंकोत्री इत्यादी म्हटले जाई ) देखील असायची. चि. सौ. कां. जिलेबीबाई हिचा शुभविवाह चि. मठ्ठेराव यांचेशी .... इत्यादी मजकूर असे.

    महाराष्ट्राचे महाकवी, आधुनिक वाल्मिकी कै. ग. दि. माडगूळकर यांनी जेवणातील ५० हुन अधिक पदार्थ आणि भाज्यांचा उल्लेख करून एक कविता रचली होती. त्यांनी वापरलेली विशेषणेही खासच आहेत. अनेक कार्यक्रमात सुप्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे ही कविता उत्तम उच्चारांसह तोंडपाठ म्हणत असत . ही कविता खाली देत आहे.
    -मकरंद करंदीकर.

    ।। काय वाढले पानावरती ।।

    काय वाढले पानावरती,
    ऐकून घ्यावा थाट संप्रती,
    धवल लवण हे पुढे वाढले,
    मेतकूट मग पिवळे सजले
    आले लोणचे बहु मुरलेले,
    आणि लिंबू रसरसलेले,
    किसून आवळे मधुर केले,
    कृष्णा काठचे वांगे आणले,
    खमंग त्याचे भरित केले,
    निरनिराळे चटके नटले,
    चटण्यांचे बहु नवे मासले,
    संमेलनची त्यांचे भरले,
    मिरची खोबरे ती सह ओले,
    तीळ भाजूनी त्यात वाटले,
    कवठ गुळाचे मिलन झाले,
    पंचामृत त्या जवळी आले,
    वास तयांचे हवेत भरले,
    अंतरी अण्णा अधीर जाहले!
    भिजल्या डाळी नंतर आल्या,
    काही वाटल्या काही मोकळ्या,
    काही वाटुन सुरेख तळल्या,
    कोशिंबिरी च्या ओळी जमल्या,
    शुभ्र काकड्या होत्या किसल्या,
    मुळा कोवळा मिरच्या ओल्या,
    केळी कापून चकल्या केल्या,
    चिरुन पेरुच्या फोडी सजल्या,
    एकरूप त्या दह्यात झाल्या,
    भाज्या आल्या आळू-घोसाळी,
    रान कारली वांगी काळी,
    सुरण तोंडली आणि पडवळी,
    चुका चाकवत मेथी कवळी,
    चंदन बटवा भेंडी कवळी,
    फणस कोवळा हिरवी केळी,
    काजुगरांची गोडी निराळी,
    दुधी भोपळा आणि रताळी,
    किती प्रकारे वेगवेगळी,
    फेण्या, पापड्या आणि सांडगे,
    कुणी आणुनी वाढी वेगे,
    गव्हल्या नकुल्या धवल मालत्या,
    खिरी तयांच्या शोभत होत्या,
    शेवयांच्या खिरी वाटल्या,
    आमट्यांनी मग वाट्या भरल्या,
    सार गोडसे रातंब्याचे,
    भरले प्याले मधुर कढीचे,
    कणीदार बहू तूप सुगंधी,
    भात वाढण्या थोडा अवधी ....

    .... महाकवी ग दि माडगुळकर.

      October 23, 2017


  • लहान मुलांवरील हृदयशस्त्रक्रियेचे जनक डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक

    लहान मुलांमध्‍ये जन्‍मतः असलेल्‍या हृदयातील दोषावर काम करून ते दूर करण्‍यासाठी एक प्रणाली विकसित करून अनेकांना जीवनदान देणारे डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक विसाव्‍या शतकातील अग्रगण्‍य  शल्‍यविशारद होते. शल्‍यचिकित्‍सेतील भरीव कामगिरीसाठी कित्‍येकवेळा नोबेल पारितोषिकासाठी त्‍यांच्‍या नावाची शिफारस करण्‍यात आली. १९५० सालापर्यंत ब्‍लॅलॉकनी जन्‍मतः असलेला हृदयातील दोष दूर करणार्‍या एक हजारपेक्षा जास्‍त शस्‍त्रक्रिया केल्‍या.

      April 20, 2019


  • श्री शारदा भुजंगप्रयात – भाग ४

    भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् – अशा माझ्या सर्वश्रेष्ठ आई शारदेचे मी भजन करतो.

      January 31, 2020


  • निक वुजिसिक

    माणसाला अवयव नाही चालवत तर मन त्याला चालवतं.अवयव शरीरांचे असतात पण मन त्यांना नियंत्रित करतं. शरीराचे अवयव तक्तात पण मनाचे अवयव ज्याचे मजबूत असतात तो थकत नाही इतिहास घडवतो. जीवनात अनेक निराशेचे प्रसंग तुम्हाला निराश करतात, थांबवतात, पुढे जाण्यापासून परावृत्त करतात.

      July 14, 2025


  • बांग्लादेशी घुसखोरी निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज

    चार-पाच दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी मालेगाव येथे पाच हत्यारबंद बांग्लादेशी अतिरेक्यांना पकडले. अर्थातच या अतिरेक्यांचा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्याचा डाव होता. गेल्या तीन-चार महिन्यात अनेक बांग्लादेशी अतिरेक्यांना पकडण्यात आले होते.

      October 9, 2014


  • बनावट नोटांचा सुळसुळाट पाकिस्तान / चीन कडुन एक नवीन प्रकरचा दहशतवाद

    सध्या १२ लाख कोटी रुपयांचे बनावट चलन भारतीय अर्थव्यवस्थेत घुसले असल्याचा एक अंदाज आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार, बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून चार लाख बनावट नोटा उघडकीस आल्या. २०००-२००१ मध्ये दहा लाखांत तीन बनावट नोटा, असे प्रमाण होते, ते दहा लाखांत आठ इतके वाढले आहे. 

      January 30, 2014