(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अफझलखानाचा वध – भाग १

    अफझलखानाचा वध – भाग १

    शिवराजांचा विजयरथ चौखूर उधळतच होता. त्यामुळे आता शिवाजीला रोखलाच पाहिजे असे आवाहन केले की, कोण रोखेल या शिवाजीला..? पण कोणीच तयार होईना.. तेवढ्यात एक सरदार उठला आणि बोलला “मै….! मै लाऊंगा.. शिवाजीको.. ! जिंदा या मुर्दा …!” सारा दरबार सुन्न झाला.., त्याचे नाव “अफझलखान” खरेतर ‘अफझल’ ही पदवी आहे त्याचे खरे नाव होते ‘अब्दुल्लाखान भटारी’

      September 20, 2017


  • कल्याणवृष्टिस्तव – ३

    ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्तिब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः ।
    एकः स एव जननि स्थिरसिद्धिरास्तॆ
    यः पादयॊस्तव सकृत्प्रणतिं करॊति ॥ ३ ॥

    आई जगदंबेचे वैभव सांगतांना आचार्य श्री येथे एका वेगळ्याच गोष्टीचा उपयोग करीत आहेत. आरंभीच्या दोन चरणात ते म्हणतात,

    ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्ति

    ब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः-
    इथे प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ पाहण्यापेक्षा या सगळ्याचा एकत्रित भावार्थ पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.

    कृत-त्रेता -द्वापार- कली ही चार युगे एक हजार वेळा झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस अर्थात एक कल्प होतो. असे भगवान ब्रह्मदेवांचे आयुर्मान शंभर वर्ष असते.
    ब्रह्मदेव इत्यादिक सर्व देवता, अशा कालगणनेच्या आरंभी निर्माण होतात आणि त्या काल मर्यादेनंतर त्यांचाही लय होतो.

    अर्थात या सगळ्यांना उत्पत्ती आणि नाश आहे त्यामुळे आचार्य त्यांना ईशत्वनामकलुष अर्थात नावापुरतेच ईश्वर, शाश्वत नसलेले, असे म्हणत आहेत.
    कति वा न सन्ति- अर्थात् कितीतरी आहेतच ना? असे म्हणत, अशा स्वरूपात स्वतःला ईश्वर म्हणणारे ब्रह्मदेवां सारखे कितीतरी देव आहेतच ना? असे आचार्य म्हणताहेत.
    अर्थात अशा कितीतरी देवता या परमसत्य, चिरंतन नाहीत हे सांगून ते म्हणतात,

    एकः स एव जननि स्थिरसिद्धिरास्तॆ- हे आई या जगामध्ये कायम सिद्धी संपन्न तो एकच आहे,

    यः पादयॊस्तव सकृत्प्रणतिं करॊति- ज्याने एकदा तुझ्या चरणी वंदन केले आहे.

    अर्थात बाकी देवता शाश्वत नसल्याने त्यांच्याद्वारे मिळणारी वरदाने देखील तशीच अशाश्वत आहेत. आई फक्त तुझ्या चरणाशी आला तोच शाश्वत सुख प्राप्त करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 14, 2020


  • मराठी टक्का घसरतोय!

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. विलासरावजी देशमुख यांनी परवा एका पब्लिक स्कूलच्या भूमिपूजन समारंभात महाराष्ट्रात मराठी टक्का घसरतोय अशी खंत बोलून दाखविली. पूर्वी केवळ मंत्रालयातील अधिकाऱ्यांचीच नावे अमराठी होती, आता तर चक्क मंत्र्यांच्या नावाच्या पाट्यादेखील अमराठी आडनावाने सजू लागल्या आहेत, असे काहीसे ते बोलले.

      April 17, 2005


  • अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ४

    अमेरिकेतल्या आमच्या ग्रामीण/निमग्रामीण भागातल्या वास्तव्यात आणि पाळीव/वन्य प्राण्यांच्या सहवासात मला अनेकदा कुमाऊंच्या जीम कॉर्बेटची किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या भानु शिरधनकर, मारूती चितमपल्ली किंवा व्यंकटेश माडगुळकरांच्या वन्यप्राणी जीवनावरील लिखाणाची आठवण यायची. वाटायचं, एखादा शेतकरी अंगणात येऊन सांगू लागेल, “दादानु, डुकरांनी लई वात आणलाय. उसाची लई नासाडी चालवलीय पघा. सांजच्याला बांधावर बसुया बंदुक घेऊन. एखादा डुक्कर मारलात तर पोरं खुष होतील. सागुती खायाला नाही मिळाली लई दिसांत”. किंवा एखादा खेडूत धापा टाकत येईल आणि म्हणेल, “सायेब, सखा पाटलाच्या मळ्यात अस्सल जातिवंत जनावर निघालय म्हंत्यात. चार बाप्ये काठ्या, भाले घेऊन उभे ठाकलेयात. चला बिगी बिगी बंदुक घेऊन. अंधार पडायच्या आत बार टाकता आला तर बघा”.

    आपलं मराठी मातीतलं किंवा भारतातलं वन्य प्राणीजीवन त्यामानाने फारच वैविध्यपूर्ण, रोमांचक आणि मौल्यवान आहे. त्यामानाने कमी वैविध्यपूर्ण परंतु मुबलक आणि संवर्धित अशा अमेरिकन वन्य प्राणीजीवनाबद्दल हे विवेचन.

    अमेरिकेत हरणं फार. ‘व्हाईट टेल डीअर’ आणि ‘म्यूल डीअर’ या दोन प्रामुख्याने आढळणार्‍या आणि एकमेकांशी काहीसे साधर्म्य असणार्‍या जाती. यातील व्हाईट टेल डीअर हे कॅनडाच्या दक्षिणेपासून मध्य अमेरिकेच्या पश्चिमेकडील राज्यांतील रुख्या सुख्या माळरानांवर व वाळवंटी भागात अधिक दिसते. व्हाईट टेल डीअरचा शेपटीच्या खालचा पुठ्ठ्याचा भाग पांढरा असतो, आणि घाबरल्यावर किंवा धावताना ती शेपटी उभारून आणि आपला पांढरा पृष्ठभाग दाखवत सैरावैरा पळत सुटतात. ऑक्टोबर ते डिसेंबर हा त्यांचा माजावर येण्याचा काळ असतो. एप्रिल – मे मधे एक-दोन पिल्ले जन्मतात. त्यावेळी बर्फ वितळून जमीन हिरवी गार झालेली असते. माळरानं, शेतं, चराऊ कुरणं लुसलुशीत ताज्या गवताने भरून गेलेली असतात. दोन तीन माद्या आणि दोन तीन पिल्लांचे छोटे छोटे कळप अनेकदा दृष्टीस पडतात.

    आज घडीला व्हाईट टेल डीअरची संख्या १४० ते २०० लाख (14 to 20 millions) असावी असा अंदाज आहे. अमेरिकेत बर्‍याचशा पूर्वेकडच्या राज्यांमधे ह्या हरणांच्या संख्येने कळस गाठला आहे आणि दिवसेंदिवस ती मनुष्यवस्तीच्या अधिकाधिक जवळ सरकू लागली आहेत. ग्रामीण-निमग्रामीण भागात, छोट्या छोट्या गावांमधे बरीचशी मनुष्यवस्ती ही शेतांत, माळरानांत, टेकड्यांच्या उतरणीवर, गच्च झाडी आणि शेतजमिनीच्या सीमारेषेवर अशी असते. त्यामुळे हरणांसाठी हा सारा परिसर म्हणजे जणू एक प्रचंड मोठं असं चराऊ कुरण असतं. हरणांनी रस्त्यावर येणं, घरांच्या पुढच्या मागच्या परसदारात चरत चरत येणं, घरांच्या बागांमधील फुलझाडं, पाले भाज्या यांची नासधूस करणं हे नित्याचंच. त्यामुळे शहरी माणसाला जसं हरणांचं अप्रूप वाटतं आणि हरणांकडे जसं तो एक निरुपद्रवी, प्रेमळ आणि देखणं जनावर म्हणून पहातो तसं गावाकडचा माणूस पहात नाही. त्याच्या दृष्टीने हरीण म्हणजे, रस्त्यांवर गाड्यांच्या पुढे कडमडून अपघात घडवणारं, शेतांची नासाडी करणारं, परसदारीच्या बागा उध्वस्त करणारं, असं एक उपद्रवी जनावर असतं.

    हरणांचे नैसर्गिक भक्षक (predators) म्हणजे लांडगे, बॉब कॅट्स, माउंटन लायन्स आणि कायोटी. परंतु शहरी वातावरणाच्या (urbanization) आक्रमणापुढे या भक्षकांचा प्रभाव कमी होत चालला आहे. याचा परिणाम हरिणांची संख्या बेसुमार वाढण्यामधे झाला आहे. त्यामुळे हरिणांची संख्या काबूत ठेवण्याचा एक मार्ग म्हणून हरणांची शिकार कायदेशीर करण्यात आली आहे. पण सारा प्रकार अगदी पद्धतशीर आणि कायदेकानुनानुसार चालणारा. प्रत्येक राज्याचे ‘वन आणि वन्यप्राणी विभाग’ (Park and wildlife department) किंवा ‘मासे आणि वन्यप्राणी विभाग’ (Fish and game department) शिकारीचा काळ ठरवून देते. तेवढ्या त्या ठरावीक काळामधेच फक्त शिकारीची परवानगी असते. प्रत्येक शिकार्‍याला दरवर्षीच्या शिकारीच्या सीझनसाठी परमीट घ्यावे लागते. त्यात देखील प्रत्येक प्रकारच्या बंदुकीच्या (मझल लोडर, शॉट गन, डबल बॅरल वगैरे) तसेच धनुष्यबाणाने करण्याच्या शिकारीचा ठरवून दिलेला कालावधी वेगवेगळा.

    धनुष्यबाणाने शिकार करणारे म्हणजे शौकीन लोक; बाकी बहुतेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका वापरणारे. प्रत्येकाने किती हरणं मारायची याच्यावर बंधन. शिंगाड्या नरांची शिकार म्हणजे मोठी मानाची. त्यांच्या शिंगांच्या टोकांवरून (८ टोकं, १२ टोकं वगैरे) शिकारीची प्रत ‘उंचावणार’. जानेवारी फेब्रुवारीच्या सुमारास नरांची शिंग गळून पडतात आणि दुरून नर मादी मधला फरक ओळखणं कठीण होतं. मे जूनमधे शिंग पुन्हा उगवायला लागतात. बहुतेक राज्यांमधे प्रत्येक शिकार्‍यास एकाच शिंगांड्या नराची शिकार करता येते. माद्या मात्र दोन-तीन मारता येतात. प्रत्येक ठिकाणचे नियम देखील निराळे. कुठे शिकारी कुत्र्यांचा वापर करण्यावर बंदी, तर कुठे विजेरीचा प्रकाश टाकून जनावरांचे डोळे दिपवून त्यांची शिकार करण्यावर बंदी. बर्‍याच ठिकाणी, सूर्योदयापूर्वी अर्ध्या तासापासून सूर्यास्तानंतर अर्धा तासापर्यंतच, शिकारीचा खेळ खेळण्याची परवानगी असते.

    क्रमशः ....

    -- डॉ. संजीव चौबळ

      October 20, 2016


  • पाषाणभेद

    पाषाणभेद चवीला तुरट,कडू असून थंड गुणाची व हल्की स्निग्ध व तीक्ष्ण असते.हि त्रिदोष शामक असून प्रभावाने अश्मरीभेदन आहे.ह्याचे उपयुक्त अंग मुळ आहे.

      April 2, 2018


  • जागतिक सरडा दिवस

    अरे किती रंग बदलशील? एखादा सरडा पण तुझ्यापेक्षा कमी रंग बदलत असेल , असं बोलून आपण सरड्याला बदनाम करतो. वास्तविक पाहता सरडा आपला रंग वेगवेगळ्या कारणांसाठी बदलतो. त्याला अनेक नैसर्गिक व विज्ञानातील कारणं आहेत.

      August 14, 2020


  • नेपाळमध्ये करोना धोका : भारताने सतर्क होण्याची गरज

    भारत-नेपाळ सीमेवर सीमा सुरक्षा बल हे अर्ध सैनिक दल तैनात आहे आणि या सीमेवरून रोज लाखो नेपाळी नागरिक भारतात आणि हजारो भारतीय नागरिक हे नेपाळ मधे हालचाल करतात. म्हणूनच सीमा सुरक्षा बलाने सतर्क होऊन या नेपाळ मधून येणाऱ्या सगळ्या नागरिकांची करोना  टेस्ट करणे गरजेचे आहे. कारण नेपाळ मध्ये चीन मधुन वेगवेगळ्या कारणाकरता येणार्या चिनी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.

      April 2, 2020


  • सामाजिक अर्थकारण आणि आर्थिक समाजकारण

    सुरवातीलाच मला काही गोष्टी स्पष्ट करू देत . त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे या लेखात व्यक्त झालेली सर्वच मते ही माझी वैयक्तिक मते आहेत.

    दूसरी गोष्ट म्हणजे मी भारतीय जनता पक्षाचा मतदार होतो , मतदार आहे आणि मरेपर्यन्त मी त्या आणि फक्त त्याच पक्षाचा मतदार राहीन.
    कारण तुमच्या - माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस निवडणुकीत मतदान करताना प्रश्न निवडत नसतो तर आपल्या वतीने तत्कालीन प्रश्नांवर उत्तरे कोण शोधेल हे निवडत असतो . ( कारण परिस्थितिने आपल्यावर प्रश्न लादलेलेच असतात . ते निवडण्याची आपल्याला मुभाच नसते . )

    तिसरी गोष्ट म्हणजे आणि तरीही या विषयाकडे आपण सगळ्यांनीच आपली स्वतःची राजकीय रंगसंगती आणि सामाजिक बांधिलकी सोडून पाहाणयाची नितांत आवश्यकता आहे . केवळ हाच नव्हे तर एकंदरीतच सर्वच आर्थिक विषय तसेच बघण्याजोगे असतात . कारण जेंव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात बाजारात कोणतीही वस्तू विकत आणायला जातो , तेंव्हा त्या वस्तूचा विक्रेता सर्वात आधी आपण कोणत्या पक्षाचे मतदार आहोत हे विचारत नाही . तसेच एकाच वेळेला एकाच वस्तूचे वेगवेगळ्या पक्षाच्या मतदारांना वेगवेगळे भाव सांगत नाही . निदान अजून तरी तसे जाहीरपणे तरी आपल्या देशात होत नाही . याचाच अर्थ असा की अजूनतरी अर्थकारण हे राजकारणाच्या " पल्याड " शिल्लक आहे .

    हो . मी " निश्चलिकरण " ( आपल्या सोप्या मराठी मधे सांगायचे तर DEMONITISATION ) या सध्याच्या बहुचर्चित विषया बाबत लिहीत आहे . ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री हा निर्णय जाहीर झाल्यापासून या विषयाची चर्चा जोरात सुरू आहे . आणि तशी ती होणे साहजिकच आहे . कारण आपल्या देशातील यच्ययावत एकूण एक नागरिकांवर त्याचा परिणाम झाला आहे . समर्थकांचा आभिनिवेश आणि विरोधकांचा प्रति - आभिनिवेश यात हा मूळ विषयच वाहून जात आहे . संसदेचे हिवाळी अधिवेशन वाहून गेले तसे . आणि म्हणून जरा सगळेच राजकारण बाजूस ठेवण्याची मी आपणां सर्वांना विनंती केली .

    DEMONETISATION चा असा विचार करत असताना मुळात ही संकल्पना नीट समजून घेणे आवश्यक आहे . कारण ही " नोटाबंदी " नाही . ही " नोटाकोंडी " नाही . हा " आर्थिक सर्जिकल स्ट्राइक " नाहीँ . असलीच तर , ही फार फार तर " नोटाबदली " आहे . याचा विचार करत असताना मला एक गन्मतीचा विचार सुचत आहे . अलीकडेच करण जौहरचा " ऐ दिल है मुश्किल " हा सिनेमा प्रदर्शित झाला . ( बरोब्बर . . तोच सिनेमा . . जो पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे वादग्रस्त झाला होता ). त्यात सिनेमाचा नायक रणबीर कपूर ची पहिली मैत्रीण अनुश्का शर्मा असते . ती त्याला सोडून गेल्यावर सिनेमात रणबीर ची ऐश्वर्या राय मैत्रीण होते . काही कारणाने ऐश्वर्या ही रणबीर ला सोडून जाते . ऐश्वर्याने रणबीरला सोडल्यावर अनुश्का शर्मा पुन्हा रणबीरची मैत्रीण होते असे त्या सिनेमात दाखवले आहे . त्या सिनेमाच्या कथानुकानुसार कालांतराने CANCER च्या दुखण्यात अनुश्का दगावते . आणि रणबीर जवळ कोणीच उरत नाही . पण आधी अनुश्का असते तेंव्हा ऐश्वर्या नसते . जेंव्हा ऐश्वर्या असते तेंव्हा अनुश्का नसते . जेंव्हा नंतर पुन्हा अनुश्का असते तेंव्हा ऐश्वर्या नसते . अगदी हेच म्हणजे DEMONOTISATION . ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री पर्यंत आपल्या देशाच्या अर्थकारणात ५०० आणि १००० रुपयांच्या ज्या नोटा चलनात होत्या , त्यांची कायदेशीर मान्यता ८ नोव्हेंबर च्या मध्यरात्री पासून काढून घेण्यात आली . नंतर २००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या . ('कोणाच्या हातात आल्या हा मुद्दा वेगळा ). त्यानंतर ५०० रुपयांच्या नवीन नोटा हळूहळू चलनात आणण्यात आल्या . यथावकाश त्याही सर्वसामान्य जनतेला मिळतील . कारण आता ५०० रुपयांच्या नोटांच्या छपाई कडे जास्तीत जास्त लक्ष पुरवण्यात येत असल्याचे वरिष्ठ सरकारी आधिकार्यानी अलीकडेच जाहीर केले आहे . ( म्हणजे आधी लक्ष कुठं होते असे माझ्यासारखे पामर कसे विचारणार ? ). १००० रुपयांच्या नवीन नोटा अजूनतरी चलनात आलेल्या नाहीत . त्या येणार का आणि आल्यातर केंव्हा येणार हे काही आजमितिलातरी ( हा लेख लिहीत असेपर्यंत तरी जाहीर झालेले नाही . ) पण अलीकडेच चलनात आणलेल्या २००० रुपयांच्या नोटा रद्द होणार अशी चर्चा SOCIAL MEDIA मधे सुरू झाली आहे . त्या व्रुत्ताचा ना स्वीकार सरकारी सुत्रानी आजपर्यंत केला आहे ; ना त्याचे खंडन त्यांनी आजपर्यंत केले आहे . पण २००० रुपयांच्या नोटा नजीकच्या भविष्यात तरी लगेचच रद्द होण्याची शक्यता बेताचीच वाटते . आता यातली कोणती नोट म्हणजे अनुश्का , कोणती नोट म्हणजे ऐश्वर्या आणि आपण नागरिक म्हणजे या सिनेमातील रणबीर की अजूनच कोणीतरी हे ज्याचे त्यानेच ठरवलेलं बरं ! हे सारे काही म्हणजे DEMONITISATION .

    या विषयाची चर्चा करताना अनेकजण ( मुद्दामून की नकळत कोण जाणे )'DEMONITISATION आणि DEVALUATION यांची सांगड घालत आहेत . या दोन शब्दांच्या स्पेलिंगची पहिली दोन आद्याक्षरे एक आहेत हे त्यातले पहिले साम्य .

    या दोन्ही गोष्टीचा संबंध देशाच्या चलनाशी असतो हे या दोन गोष्टीतले दुसरे साम्य .

    याबाबतचा निर्णय त्या त्या देशाचे सरकार जाणीवपूर्वक , काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून घेतात , घेत असतात हे या दोन गोष्टीतले तिसरे साम्य .

    या दोन्ही गोष्टींचा अल्पकालीन - मध्यमकालीन - दीर्घकालीन असा परिणाम असतो आणि अनेकदा तो वेगवेगळा किंवा परस्पर - विरोधी असू शकतो हे या दोन गोष्टीतले चौथे साम्य .

    DEMONITISATION आणि DEVALUATION या दोन्ही गोष्टींचे परिणाम आर्थिक - सामाजिक - राजकीय असले तरी हा निर्णय प्रामुख्याने राजकीय स्वरूपाचा असतो हे या दोन गोष्टीतले पाचवे साम्य .त्यामुळे १९७१ सालीच वानछू समितीने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारला असा सल्ला दिला होता , किंवा अर्थक्रान्ती चळवळ चालवणारया मंडळीनी त्यावेळी पंतप्रधान असणाऱ्या डॉ . मनमोहनसिंग यांना हाच सल्ला दिला होता ; पण त्या दोन्ही सरकारनी तो त्या - त्या वेळी अंमलात आणला नाही ; आता मात्र नरेंद्र मोदी सरकारने तो अंमलात आणला अशा मुद्द्यावर याबाबतची चर्चा रंगतदार झाली तरी त्याला फारसा काही अर्थ नसतो . कारण जे व्हायचे होंते ते तेंव्हाच होऊन गेले . आता त्याला फारसा अर्थ उरला नाही . कारण हा निर्णय त्या त्या नेत्याच्या त्या त्या वेळेच्या परिस्थितीचे मुल्यमापन काय आणि कसे आहे यावर जास्त अवलंबून असते . त्यात राजकीय वाचनाच्या किंवा राजकीय समजाँचा जास्त भाग आहे . त्याला राजकीय क्षमता किंवा राजकीय इच्छा - शक्तिच्या मोजपत्तीवर तपासून पाहाने फारसे योग्य ठरत नाही .
    अशी अनेक साम्यस्थळ जरी या दोन गोष्टीत असली तरी या DEMONITISATION आणि DEVALUATION या दोन गोष्टीत काही महत्वाचे फरकही आहेत . त्यामुळे यांची सांगड घालणे राजकीय द्रुष्टीने सोयीचे वाटले तरी या विषयावर ते अन्यायकारक ठरेल .

    या दोन गोष्टीतला सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे DEVALUATION हे आपल्या देशाच्या चलनाचे दुसऱ्या देशाच्या चलनाच्या तुलनेत काय असावे याबाबतचे मुल्यमापन आणि त्यानुसारचा निर्णय असतो . आपल्या देशाचे जागतिक व्यापारातील स्थान , आयात - निर्यातीचे स्वरूप आणि प्रमाण , आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि दबाव , परकीय चलनाचा उपलब्ध साठा , परकीय कर्ज आणि त्यावरील व्याजाचे प्रमाण अशा घटकांवर चलनाच्या अवमूल्यनाचा निर्णय अवलंबून असतो .

    निशच्लिकरण ( DEMONITISATION )"हा निर्णय मात्र प्रामुख्याने देशांतर्गत आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो . कारण अवमूल्यन हा निर्णय दोन वेगवेगळ्या देशांच्या दोन वेगवेगळ्या चलनान्च्या आप - आपसातील परिवर्तनिय दराशी संबंधित आहे ; तर निश्चलीकरण हे पूर्णपणे आणि फक्त त्या त्या देशाच्या चलनापुरेसे मर्यादित असते . त्याचा भर जागतिक व्यापारापेक्शा देशांतर्गत व्यवहारांवर जास्त असतो . आणि त्यामुळेच या निर्णयांची शहानिशा ताबडतोब सुरु होते . जशी आत्ता होत आहे .

    अशा पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी करण्यात आलेली घोषणा आणि त्याचे आजपर्यंत जाणवलेले परिणाम असा विचार करत असताना असे वाटते कि हा निर्णय अतिशय योग्य आहे . तो आणि तसा निर्णय घेण्याची वेळ ही अतिशय योग्यच आहे . मात्र या निर्णयांची अंमलबजावणी चिंताजनक आहे . झाले त्यापेक्षा कितीतरी चांगल्या प्रकारे याची अंमलबजावणी करता येणे नक्कीच शक्य होते . त्यातून मोदी सरकार निर्णय घेण्यास सक्षम आहे ; पण अंमलबजावणीत गडबड होते असा संकेत ( सिग्नल अशा अर्थाने ) गेल्यास " म्हातारी मेल्याचे दुःख नाही , पण काळ सोकावतो आहे " अशी गत होणे आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेस परवडणारे नाही . अंमलबजावणीतील त्रुटीना आपण सारेच सामोरे गेलो आहोत आणि त्यामुळे त्याबाबत अजून काही लिहून जखमान्वरची नुकतीच धरू लागलेली खपली पुन्हा काढत नाही . त्याऐवजी या निर्णयांची योग्यता आणि त्याची वेळ याची चर्चा केली तर !

    देशांतर्गत अर्थव्यवस्थेत वाढणारी महागाई हे या निर्णयामागचे एक कारण आहे . गेल्या ५ वर्षात आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढली त्यापेक्षा कितीतरी जास्त वेगाने अर्थव्यवस्थेत चलनाचे प्रमाण वाढले . त्यातून Too much money chasing too little goods अशी परिस्थिती निर्माण झाली . या निर्णयाने त्याला आळा बसेल अशी अपेक्षा आहे . अर्थातच त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेकविध उपाय - योजनातील ही एक आहे . एकमेव नाही . आणि " पी हळद , हो गोरी " अशी तर नाहीच ना

    महागाईचा दर आणि चलनाचे मूल्य या दोन गोष्टींचे परिणाम नेहमीच सामाजिक आणि आर्थिक असतात . त्यांची कारणे मात्र अनेकदा राजकीय असतात . त्यामुळे त्याबाबतची उपाययोजना ही बहुतेकदा राजकीयच असावी लागते . या मालिकेतील अस्खलित उदाहरण म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून ५०० आणि १००० रुपयांच्यातेंव्हा अस्तित्वात असलेल्या चलनी नोटा रद्द करण्याचा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला निर्णय .

    अशा पध्दतीने एखाद्या मूल्याच्या चलनी नोटा रद्द करण्याचा हा प्रसंग स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासात पहिल्यांदा घडत नाहीये . एकदा रद्द केलेल्या मूल्याच्या चलनी नोटा पुन्हा चलनात आणण्याचाही प्रकार याआधी घडला आहे . पण त्याबाबत माहिती पंतप्रधानानी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून देण्याचा प्रकार मात्र अनोखा आहे . प्रामुख्याने आर्थिक असणाऱ्या या निर्णयांची सांगड एकीकडे राष्ट्रप्रेम आणि दुसरीकडे दहशतवाद याच्याशी घालणे आणि या राष्ट्र - कार्यात तुमच्या - माझ्यासारखे सर्वसामान्य भारतीय नागरिक असा हातभार लावू शकतात असा भावनिक स्पर्श त्या रुक्ष आर्थिक आणि कर्तव्य - कठोर संरक्षणत्मक निर्णयाला देणे हे तर अफलातूनच . " सबका साथ , सबका विकास " चे अजूनही एक वेगळे स्वरूप म्हणा ना !

    आज हा निर्णय का घ्यावा लागला याचे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थखाते आणि आपल्या देशाची मध्यवर्ती बँक " भारतीय रिझर्व बँक " ( RBI ) यांनी दिले आहे . त्यानुसार २०११ ते २०१६ या पाच वर्षांच्या काळात आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था ३० टक्के विस्तारली ; मात्र याच काळात चलनी नोटांच्या प्रमाणात मात्र ४० टक्के वाढ झाली . त्यापैकी ५०० रुपयांच्या नोटांच्या संख्येत ७६ टक्के तर १००० रुपयांच्या नोटांमधे १०९ टक्के वाढ झाली . आजमितिला सर्वसामान्य नागरिकांकडे असणाऱ्या चलनी नोटांच्या रकमेचे प्रमाण सुमारे १६ , ९८ , ५४० कोटी रुपये आहे आणि त्यापैकी अंदाजे ८८ टक्के भाग ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमधे आहे . साधारणतः पाव भाग ( सुमारे २५ टक्के ) अर्थकारण काळया स्वरूपाचे असते असे मानले तरी अंदाज येऊ शकतो . तसेच नवीन नोटा निर्माण करण्याच्या सरकारी प्रक्रियेत , रिझर्व बँकेच्या नोटा - निर्मितीत कोणतीही संरक्षणात्मक गडबड झाली नसली तरी दहशतवादाला पाठबळ पुरवण्यात सहभागी असलेले बनावट नोटा आणि इतर गैरमार्ग अवलंबत असतील तर त्याला आळा घालणे हाही उद्देश या निर्णयामधे आहेच .

    या निर्णयाने काळा पैसा उजेडात येईल आणि नव्याने काळा पैसा निर्माण होण्यास काही प्रमाणात तरी पायबन्द बसेल असे सांगण्यात येत आहे . एक तत्व म्हणून ते बरोबरच आहे . पण गेल्या ६० - ७० वर्षांत काळया पैशाबाबत ज्या काही उपाय - योजना आपल्या देशात राबवल्या गेल्या , त्यांचा अनुभव फारसा सुखद नाही . अगदी याआधीच्या demonetisation निर्णयानीही अपेक्षित प्रमाणात परिणाम दिलेले नाहीत . याचे महत्वाचे कारण म्हणजे काळा पैसा एका रात्रीत जन्माला येत नाही . तसेच तो अनेकविध क्षेत्रात अनेकविध कारणांनी निर्माण होतो , होत राहतो . शिक्षण , जमीन - जुमला , ग्रुहनिर्माण , सोने आणि गुंतवणूक , राजकारण अशी अनेक क्षेत्रे त्याची कारण ही आहेत आणि परिणामही .

    हे लक्षात घेत याबाबतचे सुटे धागे , सुटी टोके विद्यमान सरकारने कशी बांधत नेली हे बघणे नक्कीच उदबोधक ठरेल . त्याद्रुश्तिने या सरकारच्या गेल्या तीन अर्थसन्कल्पान्चा नीट विचार व्हावा . ( याचा उहापोह मी माझ्या भाषणात गेल्या तीन वर्षांत वारंवार केला आहे . ) . काळा पैसा हा भाजपा च्या लोकसभा निवडणुका जाहिरनाम्यात एक मुद्दा होता . देशाबाहेरचे काळे धन हा मोठा मुद्दा . आधी जन - धन योजनेतून अनेकांना बेंकिंग जाळ्यात आणले गेले . या खात्यांची सांगड आधारशी घालून ओळख परेड झाली . आयकर विवरण पत्रात ( Income Tax Returns ) आधार कार्ड नम्बर , प्रॉपर्टी , वाहने असे तपशील सुरु केले गेले . क्रेडिट व डेबिट कार्डचा वाढता वापर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्वच आर्थिक माहितीचा यथायोग्य सक्रिय वापर अशी ही श्रुन्खला आहे . त्याचबरोबर काळा पैसा जाहीर करण्याबाबत वेळोवेळी केली गेलेली आवाहने ही विसरून चालणार नाही . तसेच २६ मे २०१४ रोजी सत्तारुढ झाल्यावर विविध देशांशी असणारे राजनैतिक संबंध वाढवण्यात देण्यात आलेला भरा आता देशाबाहेर असणारी माहिती आणि पैसा हुडकण्याचा मार्ग सोपा करेल.

    ५०० आणि १००० रुपयांच्या आधी अस्तित्वात असलेल्या नोटा रद्द करण्याचा निर्णय ज्या पध्दतीने घेतला गेला , जाहीर केला गेला आणि अंमलात आणला गेला हे पाहिले तर एक मजेदार विचार सहजच मनात आला की दरवर्षी जर उत्तर प्रदेश , गुजराथ सारख्या महत्वाच्या राज्यांच्या विधान - सभांच्या निवडणुका होत राहिल्या तर किती क्रांतिकारी , धाडसी , महत्वाकांक्षी आर्थिक निर्णय किती सातत्याने घेतले जातील ! . गन्मतीचा भाग सोडून देऊ . कारण तसे पाहिले तर आपल्या देशात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होतंच असतात .

    पण या निर्णयाबाबतची स्थिति लक्षात घेता आर्थिक क्षेत्रात येणाऱ्या काळात , निदान नजीकच्या भविष्यात काय आणि कसे महत्वपूर्ण बदल होतील हे बघणे उपयोगाचे ठरेल . असा विचार करत असताना मला वाटणारे काही मुद्दे खालीलप्रमाणे :

    १ . सेवा आणि वस्तू कर ( GST ) ची अंमलबजावणी १जुलाइ किंवा सप्टेंबर पासून सुरु होईल .
    २ . सरकारी आर्थिक वर्ष सध्याच्या एप्रिल ते मार्च ऐवजी जानेवारी ते डिसेंबर असे होईल .
    ३ . वरील दोन्ही गोष्टी किंवा प्रामुख्याने दुसरी गोष्ट झाली तर नंतरच्या काळात वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पन्धरवद्यात सादर होईल .
    ४ . बँकामधील वाढते व्यवहार प्रमाण वाढत राहिले तर बँक खात्यातील व्यवहार हा कर - आकारणीचा , निदान काही प्रमाणात तरी , पाया बनेल .

    माननीय पंतप्रधानाना एक नम्र विनंती . . . आम्ही सर्वसामान्य नागरिक आमच एकमेव घरकुल घेताना मेटाकुटीला येतो . त्यासाठी द्यावे लागणार काळे धन द्यायच म्हणजे आमच पांढर् धन काळे म्हणून देतो . त्यामुळे तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमच्या कष्टातून , आधीच कर कापून , हाती आलेल्या पैशातून , घरखर्चासाथि बाजूस ठेवलेला पैसा ३१ डिसेम्बर २०१६ पर्यंत बँकेत जमा करण्यासाठी रांगेत उभे असताना यातली काही गुन्हेगार धेन्डे तुरुंगात गेलेली आणि त्यांची मालमत्ता जप्त झालेली पाहायला मिळाली तर नक्कीच आमचाही हुरुप वाढेल .

    -- चंद्रशेखर टिळक

    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ .
    राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) .
    पिन . . . ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    एमेल . . . tilakc@nsdl.co.in

    १७ डिसेंबर २०१६

      December 21, 2016


  • गुडघे कधीही बदलू नका

    गुडघे बदलणार्‍यांसाठी एक सुखद बातमी..... ही पोस्ट नाॅयडा येथील एका डाॅक्टरने टाकली आहे त्याचे मराठीकरण करून पाठवित आहे....

    गुडघे कधीही बदलू नका. प्राकृतिक चिकीत्सा केंद्र..

    साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे.

    त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे (कृत्रिम गुडघे) असे डाॅक्टरांकडून सुचविले जाते.

    जे लोक श्रीमंत आहेत त्यांना हा इलाज परवडतो, त्याची कारणे फक्त श्रीमंती असेही नाही, कित्येक वेळा हा खर्च विमा कंपनीकडून वसुलतात. पण सामान्यांचे, मध्यमवर्गीयांचे काय?

    अनेक वेळा कुणीतरी सांगितले म्हणून हे लोक अशा महागड्या उपचारासाठी कर्ज काढून तयार होतात.
    परीणाम.... अपयश!

    निसर्गाची किमया अशी की त्याने प्रत्येकाला दोन गुडघे दिले ते त्याच्या आयुष्यभर पुरावे म्हणून; पण आपणच त्याची आयुष्यभर काळजी न घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवते.

    बरं हे कृत्रिम गुडघे बसविल्यामुळे २-३ वर्षे बरे वाटते आणि पुन्हा हरीदासाची कथा मूळ पदावर.

    यावर एक भारतीय निसर्ग उपचार पद्धती आहे. जिचा लाभ लाखो गुडघादुखीने त्रस्त व जे भलीमोठ्ठी रक्कम खरंच करू शकत नाहीत त्यांच्यासाठी.....

    शहरात नाही पण खेडोपाडी न लावता कोणत्याही प्रकारचा लागवड खर्च न करता सहजपणे उगवणारी व आपणा सर्वांना परिचित असलेली बाभूळ या दुखण्यावरचा सोपा उपाय आहे.

    अमेरिकेत हे झाड नाही. नाहीतर आतापर्यंत त्यांनी हर्बल नावाखाली हे औषध आपल्याला देऊन करोडो रूपयांचा चुना लावला असता. असो, या बाभळीच्या शेंगा वाळवून त्याचे चूर्ण तयार करून रोज सकाळी एक चमचा थोड्या कोमट पाण्याबरोबर घ्या. २-३ महिन्यात गुडघेदुखी गायब. औषध जवळपास फुकट आणि लाखो रूपयांची बचत. आहे की नाही गंमत....

    -- सागर मराठे यांनी `आरोग्यदूत ७' या WhatsApp ग्रुपवर टाकलेली पोस्ट

    - मूळ लेखक
    डाॅ.पवन कुमार (नॅचरोपॅथी)
    ग्रेटर नाॅयडा
    ?07838037030

      November 21, 2016


  • चिकाटी

    आजचे आपले जगणे इतके गतिशील झाले आहे की प्रत्येक गोष्ट लवकर हवी. झटपट मॅगी, फास्ट नेटवर्क, रातोरात श्रीमंती.. .. अश्या अनेक गोष्टी आपण बघतो त्यामुळे काही मिळवण्यासाठी परिश्रम, चिकाटी, जिद्द हवी हे आता विसरत चालले आहेत. शालेय जीवनामध्ये value education दिले जाते पण practical जीवनात मात्र काही दिसून येत नाही. इमानदारी, चिकाटी, जिद्द, प्रामाणिक हे सर्व फक्त कथा कादंबऱ्या मध्येच वाचायला मिळतं.

      November 5, 2021