(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री महाकवि वाल्मिकी

    नमन माझे आद्यकवीला । रामायण ग्रंथ रचित्याला ।।
    प्रतिभावंत कवि अवतरला । ह्या जगती ।।१।।

    रामायणासारखा ग्रंथ । श्रेष्ठत्व मिळे ह्या जगांत ।।
    अप्रतीम ते काव्य होत । कवि श्री वाल्मिकीचे ।।२।।

    महाकवि वाल्मिकी । जीवन ज्याचे सार्थकीं ।।
    प्रभूचरणीं अर्पित मस्तकी । इतिहास घडविला ।।३।।

    सरस्वति प्रसन्न झाली । लेखणीतून अवतरली ।।
    महान काव्य रचना झाली । वाल्मीकीकडून ।।४।।

    कमळ उपजे चिखलांत । तैसा हिरा कोळशात ।।
    अज्ञानासी ज्ञानी बनवित हिच लिला प्रभूची ।।५।।

    वाल्याचा वाल्मिकी झाला । अज्ञानाचा ज्ञानी बनला ।।
    विश्वामध्ये महाकवी ठरला । कथा त्याची ऐकावी ।।६।।

    वाल्या कोळ्याची कथा । बनत असे जीवन गाथा ।।
    आदर्श त्याचा चित्तीं ठेवता । सर्व जनांनी ।।७।।

    वाल्याकोळी होता क्रूर । छंद त्याचा लूटमार ।।
    चालवित असे परिवार । दुसऱ्याच्या धनावरी ।।८।।

    चोरी लबाडी हा धंदा । खून करी तो अनेकदा ।।
    पर धनावरी नजर सदा । वाल्याची असे ।।९।।

    त्राही करूनी सोडिले । सर्वासी दु:ख दिले ।।
    निर्दयतेनें दुसऱ्यांसी छळले । वाल्या कोळ्याने ।।१०।।

    नारद मुनींची स्वारी । जात असता रस्त्यावरी ।।
    वाट तयांची रोखूनी धरी । वाल्या कोळी ।।११।।

    मागू लागला खंडणी । वाट त्याची अडवूनी ।।
    चकीत झाले नारदमुनी । वाल्याकडे बघती ।।१२।।

    नारायण नाम मुखी । होत आसे सदा सुखी ।।
    थांबविता हरीनाम एकाएकी । नारद विचारी ।।१३।।

    असूनी गरीब ब्राह्मण । नसे मजजवळी धन ।।
    टाळ चिपळ्या नि नारायण । हीच माझी संपत्ती ।। १४ ।।

    प्रभूची भक्ती । हीच माझी शक्ती ।।
    कसे देवू धनाती । नारद बोलले ।। १५।।

    वाल्यासी हवे धन । काय त्यासी जाण ।।
    कसे ओळखी ते महान । तत्त्वज्ञान जिवनाचे ।।१६।।

    नारद पुसतां वाल्याला । कां ठेविसी लोभ धनाचा ।।
    करित असे पाप कर्माला । मिळविण्या ते धन ।। १७ ।।

    धनामाजी सुख समजसी । लुटूनी ते स्वकीयांस वाटसी ।।
    आनंदी तयांनी करिसी । पर धनाने ।।१८।।

    सुखाचे सारे सोबती । परि पाप तूंच भोगती ।।
    कुणी न देई संगती । तुझ्या कुकर्मात ।।१९।।

    धनाजवळी सारे जमती । दु:खामध्ये साथ न देती ।।
    सर्व स्वार्थी आसती । सगे सोयरे ।।२०।।

    पुण्याचे असती वाटेकरी । पाप पडते तुझ्याच पदरीं ।।
    हीच असे रीत खरी । जीवनाची ।।२१।।

    तुझ्या कर्माचे फळ । भोगसी येतां वेळ ।।
    दु:खमय वाटे तो काळ । विचार करावा मनीं ।। २२।।

    कुणी न असती नाते गोते । मित्रमंडळीहि दूर जाती ।।
    वाटेकरी नसती पापा तें । तुझ्या कर्माच्या ।। २३ ।।

    मानव जन्म मिळाला । कां दवडिसी आयुष्याला ।।
    सोडूनी घ्यावे लोभाला । प्रभूसी शरण जावे ।। २४।।

    धनी न व्हावे पापाचे । सार्थक करावे जीवनाचे ।।
    स्मरण ठेवावे प्रभूचे । अविरत ।। २५।।

    विवेक जागृत ठेवावा । अज्ञानाचा पडदा फाडावा ।।
    ज्ञानाग्री प्रज्वलित करावा । हेच सार्थक जीवनाचे ।। २६।।

    अंतर्यांमी करावा विचार । उघडावे ज्ञान भांडार ।।
    विचारांना द्यावा आकार । स्मरण करूनी प्रभूचे ।। २७ ।।

    विवेकाच्या गोष्टी चार । वाल्याच्या बिंबती मनावर ।।
    नारदासी करी नमस्कार । गुरू समजूनी ।।२८ ।।

    पश्चाताप झाला मनी । आयुधे दिली टाकूनी ।।
    शरण जाई वाकूनी । नारदा समोरी ।।

    अंधकार नष्ट झाला । अंतर्यामी प्रकाश पडला ।।
    जागृती झाली मनाला । वाल्याच्या ।। ३० ।।

    नारदासी वंदन केले । गूरुमंत्र देण्या विनविले ।।
    आशीर्वाद तयाचे मागितले । वाल्या कोळ्यांनी ।। ३१।।

    रामनाम मुखे घ्यावे । चिंतन त्याचे करावे ।।
    अंतर्मनी भक्ती ठेवावे । श्री रामाची ।।३२ ।।

    वाल्यास उपदेश देवूनी । नारद गेले निघूनी ।।
    ज्ञानाचा अग्नी पेटूनी । वाल्याचे चित्ती ।। ३३।।

    राम नामाचा जप । घेऊन करावे तप ।।
    पेटवावा ज्ञानदीप । हाच उपदेश नारदाचा ।।३४ ।।

    तपश्चर्या करण्यासी । बैसला झाडापासी ।।
    जपे राम नामासी । मनोभावे ।। ३५।।

    राम नामाचा जप सतत । देहाचे भान जात ।।
    पाला-पाचोळा जमत । शरीराभोवती ।।३६।।

    पाला पाचोळा वर । मातीचे पडती थर ।।
    वारूळाचा मिळे आकार । वाल्या देहा भोवती ।।३७।।

    मातीचे ढीग जमूनी । देह जाय झाकूनी ।।
    परी नाम मुखे घेवूनी । भक्ती केली प्रभूची ।।३८।।

    परत नारद जात असता । स्तब्ध झाले राम नाम ऐकता ।।
    वारूळातूनी राम नाम येतां । चकीत झाले ।।३९।।

    दूर सारतां माती । आंत वाल्यासी बघती ।।
    आश्चर्य चकीत होती । नारदमुनी ।।४०।।

    वाल्यासी बघती ध्यानस्त । डोळे नी मुख बंदीस्त ।।
    झाला देह रामनामस्थ । रोम रोम हुंकार देयी ।।४१।।

    रामनामाचा हुंकार । देवू लागले शरीर ।।
    कवच राम नामाचे वर । रक्षण करी देहाचे ।।४२।।

    झाला वाल्या राममय । तपसामर्थ्य महान होय ।।
    आशिर्वादूनी नारद जाय । वाल्यासी ।।४३।।

    अपूर्व इच्छाशक्ती । जागृत झाली प्रभू भक्ती।।
    रात्र-दिनी नाम घेती । मनोभावे ।। ४४।।

    नामाचा महिमा आगाळा । भक्तीची साथ मिळता त्याला ।।
    पाशानही लागती तरंगण्याला । पाण्यावरी ।। ४५।।

    प्रभू नामाचे मोठेपण । तपोबल त्यासी मिळोन ।।
    जात असे उद्धरून । आपल्या जीवनी ।। ४६।।

    पाहूनी त्याची भक्ती । राम नामाची शक्ती ।।
    प्रभू आशीर्वाद देती । वाल्या कोळ्यास ।। ४७।।

    सत्य आणि तप । प्रज्वलित करी ज्ञानदिप ।।
    अज्ञानाचा होई लोप । ज्ञानाग्री पेटतां ।। ४८।।

    प्रसन्न झाली सरस्वती । त्याचे चित्ती ज्ञान देती ।।
    अंतर्मयी प्रकाश पाडती । वाल्याच्या ।। ४९।।

    करविता धनी । आसे तो कुणी ।।
    घ्यावे तुम्ही जाणोनी । हीच प्रभूची लिला ।। ५०।।

    ***

    ऐके दिनी सकाळी । जात वाल्मीकी अंघोळी ।।
    क्रौंच पक्षाची जोडगोळी । बघे झाडावरी ।। ५१।।

    रास क्रीडा बघून । आनंदले मन ।।
    जात असे विसरून । स्वत:सी ।।५२।।

    क्रौंच पक्षावर । मारीला तो तीर ।।
    समजोनी शिकार । एका पारध्याने ।।५३।।

    लागता तीर माथी । तत् क्षणी पडला धरतीं ।।
    गतप्राण होवून जाती । एक क्रोंच पक्षी ।।५४।।

    आनंदी पक्षी होते । एक गमवी प्राणाते ।।
    विरह मिळे दुसऱ्याते । विचित्र झाली घटना ।।५५।।

    सारे अघटित घडले । दु:खाश्रू नयनी आले ।।
    चित्त भावनावश झाले । वाल्मीकीचे ।।५६।।

    शब्द पडले मुखातूनी । भावनेस आकार देवूनी ।।
    काव्यमय वाक्य होवूनी । प्रथम कविता जन्मली ।।५७।।

    शारदा अवतरली काव्यातून । वाल्मीकेच्या वाणीतून ।।
    आद्य कवी त्यास बनवून । मान मिळे ।।५८।।

    ( कवी वाल्मीकीचे प्रथम शब्द मा निषाद प्रतिष्ठां त्वमगत: शाश्वती समा: ।। यत्क्रौंच मिथुनादेकमवधी : काम मोहितम ।।
    अर्थ – निर्दय पारध्या । त्या सुखी क्रौंच पक्षाला मारून त्याच्या स्त्रिला विपत्तीत लोटलेस, या पातकाबद्दल तू शंभर वर्षे नरक यातना भोगशील .)

    चेतना जागृत झाल्या । विचार लहरी उमटल्या ।।
    लेखणीतून वाहू लागल्या । वाल्याच्या ।।५९।।

    विचारांचा धबधबा । झेप घेता नभा ।।
    बनूनी एक प्रतीभा । महाकाव्य झाले ।।६०।।

    ज्ञानाची गंगोत्री । पावन करी धरत्री ।।
    सागर त्याचा बनती । रामायण रूपे ।।६१।।

    महाकाव्य रामायण । वाल्मीकीचे अपूर्व देण ।।
    हेच खरे त्याचे धन । मिळविले असे ।। ६२ ।।

    वाल्याचा वाल्मीकी झाला । महाकवी मान मिळविला ।।
    लोखंडाचे सोने बनला । परिसामुळे ।।६३।।

    शुद्र आणि लहान । तोही मिळवितो मोठेपण ।।
    इच्छा शक्ती महान । पाहीजे तेथे ।।६४।।

    मार्ग सदाचे असती । परी अज्ञानाने न दिसती ।।
    विवेक ज्ञानाची संगती । ध्येय देयी गाठूनी ।।६५।।

    तुमचा गुरू अंतरमनी । त्यास घ्यावे समजोनी ।।
    का शोधता बाहेरूनी । वाया जाई आयुष्य ।।६६।।

    वाल्मीकी ऋषींचे काव्य । रामायण ग्रंथ दिव्य ।।
    प्रतीभा ती भव्य । स्फूर्ती देयी सर्वांना ।।६७।।

    रामायण ग्रंथ थोर । आदर्श जीवनाचे सार ।।
    सार्थकी आयुष्याचे द्वार । तुम्ही उघडावे ।।६८।।

    ।। शुभं-भवतु ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    १०- ३११०८३

      January 14, 2018


  • क्रिकेटपटू अब्बास अली बेग

    मुंबईमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना ब्रेबॉर्न स्टेडियम मध्ये सुरु होता . ऑस्ट्रलियन संघामध्ये अॅलन डेव्हिड्सन , रे लिंडवॉल ,रिची बेनॉ सारखे जबरदस्त खेळाडू होते. अब्बास अली बेग त्यांचा जुना साथीदार नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्याबरोबर खेळण्यास आले तेव्हा दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १३३ धावा केल्या त्यामध्येअब्बास अली बेग यांच्या ५० धावा होत्या.

      September 13, 2021


  • भाव उत्पादनखर्चावर की…?

    भारतीय अर्थव्यवस्था सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. आधुनिक विकासाचे स्वप्न भारताला खुणावत आहे त्या स्वप्नाकडे आपली दमदार वाटचाल सुरू आहे. भावी महासत्ता म्हणून भारताला आता ओळखले जात आहे.

      January 8, 2006


  • मंगेश मुंबईकर घोगरे

    ‘फॉर्च्युन’ मासिकाच्या ’40 Under 40′ ह्या सर्वोत्तम उद्योजकांच्या यादीतही मंगेश यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामधील ‘Speaking Tree’ ह्या स्तंभासाठीही लिखाण केले आहे.मंगेश घोगरे यांना लहानपणापासूनच शब्दकोड्यांचे वेड होते. ते शाळेतही वर्गात बसून शब्दकोडी सोडवत असत.

      June 19, 2025


  • आली दिवाळी..

    गणपती गेल्यानंतर वेध लागतात ते नवरात्राचे व त्यानंतर येणाऱ्या दसरा दिवाळीचे..दुकाने नविन कपड्यांनी सजू लागतात, सेल सुरू होतात..वर्तमानपत्रांत इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाड्यांच्या मोठमोठ्या जाहीराती प्रसिद्ध होऊ लागतात अन् चाहुल लागते ती दिवाळीची..आणि दिवाळी म्हटलं की हटकून आठवतं ते अजरामर बालगीत– “दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी”

      October 12, 2017


  • गोपाष्टमी – कार्तिक शुभा

    कार्तिक शुक्ल अष्टमीला हे नांव आहे. सकाळी गाईंना स्नान घालून त्यांची पूजा करावी.

      October 1, 2023


  • जन्मजात हृदरोग

    खरे पाहिले असता हृदय हा एक स्पंदक (पंप) नसून एका आवरणांमध्ये गुंडाळलेला डावा व उजवा असे दोन स्पंदक आहेत.

    ते एका पडद्याने विभागलेले असतात त्यामुळे त्यातील रक्त एकमेकांत मिसळत नाही. या प्रत्येक स्पंदकामध्ये दोन कप्पे असतात. डावा स्पंदक शरीरामध्ये शुद्ध रक्त पसरतो व सर्व अवयवांना रक्ताद्वारे प्राणवायू व इतर पोषक द्रव्ये पुरवितो. उजवा स्पंदक सर्व शरीरातून आलेले अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी फुप्फुसाकडे पाठवितो. फुप्फुसांमध्ये प्राणवायू व कार्बनडायॉक्साइड या वायूंची अदलाबदल होऊन रक्त परत शुद्ध बनते आणि हृदयाच्या डाव्या कप्प्यांत परत येते.

    याप्रमाणे रक्ताभिसरण एकाच दिशेने चालू ठेवण्यासाठी दोन कप्प्यांमध्ये एक झडप असते. ती फक्त एकाच दिशेने उघडते. ज्या वेळी हृदयविकार अर्भकाच्या जन्मापासून असतो त्या वेळी त्यास 'जन्मजात रोग' म्हणतात. यात डाव्या व उजव्या कप्प्यांना विभागणाऱ्या पडद्यांतील छिद्र, रक्तवाहिन्यांची चुकीची जोडणी, चिकटलेल्या झडपा किंवा तत्सम रोगांचा समावेश होतो. 'निळसर अर्भक' ब्ल्यू बेबी हा याच रोगाचा एक प्रकार होय, तसेच वारंवार सर्दी होणे, शरीराची वाढ खुंटणे वगैरे लक्षणेही दिसतात. यात जवळजवळ सर्व रुग्णामध्ये औषधोपचार व निरनिराळ्या शस्त्रक्रियांद्वारे हृदयाची कार्यक्षमता पूर्ववत केली जाते. आता तर शस्त्रक्रियेशिवाय अगदी लहान अर्भकातही ही छिद्रे बंद केली जातात. जर नाडीचा वेग कमी असेल तर पेसमेकरच्या मदतीने तो वाढविता येतो आणि शेवटचा उपाय म्हणून हृदयरोपणही करता येते. अशा तऱ्हेने लहान मुलांना पुढील आयुष्य चांगल्या तऱ्हेने जगणे शक्य होते.

    -डॉ. पुरुषोत्तम अ. काळे
    मराठी विज्ञान परिषद

      July 10, 2023


  • मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण

    गुलाबाच्या झाडावरील काटे मोजत बसण्यापेक्षा त्याची सुंदर फुले मोजा. जो काटे मोजत राहतो त्यांच्यासाठी फुलेही काटेच बनतात. असं असतं आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचं. तुम्ही जसा विचार करता तसेच घडता.

    रतन टाटा यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. ‘लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही; पण त्याचा स्वत:चा गंजच त्याला नष्ट करू शकतो.’ तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही; पण त्याच्याच मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो. नष्ट होण्याऐवजी श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न आपण का बरे करू नये? चला श्रेष्ठ आणि सर्वश्रेष्ठ कसं बनायचं याचा विचार आपण करू.

    ‘कॅशियस क्ले’ म्हणजेच जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा मुहम्मद अली. बारा वर्षांचा असताना पासून त्याने आपल्या कोटावर छोटीशी प्लेट लावली. ‘मी सर्वश्रेष्ठ आहे’ असे त्यावर कोरलेले होते. आपण अजिंक्य आहोत, हे तो वेडीवाकडी गाणी गाऊन चारचौघात जाहीरपणे बोलून दाखवायचा. त्याचं ते ब्रीदवाक्य होतं. कधीकधी त्याला हारही पत्करावी लागायची पण तो तीनवेळा जगातला अजिंक्य हेवीवेट मुष्टियोद्धा ठरला. चमत्काराप्रमाणे भासणा-या सगळ्या लोकविलक्षण यशाचं मूळ त्या व्यक्तीच्या सकारात्मक विचारात असतं.

    जे मागतात शक्ती,
    आभाळ पेलण्याची
    देते त्यास आई,
    उंची हिमालयाची

    मी हे करू शकतो, असा ठाम विश्वास बाळगला व आपल्यात आत्मविश्वासाची शक्ती जागृत केली तर आभाळाएवढी संकटं जरी आली तरी विश्वास बाळगा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. असा सकारात्मक दृष्टिकोन मात्र असावा लागेल.

    डेल कारनेगी नावाच्या एका विद्वानाने सकारात्मक दृष्टिकोनाला व्यक्तिमत्त्वाचा आत्माच म्हटले आहे. कारनेगी म्हणतात, यशात ३० टक्के परिश्रम व ७० टक्के दृष्टिकोन यांचा वाटा असतो.

    त्याच्याही खूप वर्षे अगोदर तुकोबांनी सांगितले आहे- ‘मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण’ म्हणजेच सकारात्मक विचार ठेवा व प्रथम आपण आपलीच ओळख करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपली क्षमता, आपल्यातले प्लस पॉर्इंट, मायनस पॉर्इंट जाणून घ्यावे व त्यास सकारात्मकतेची झालर जोडावी म्हणजे आपण यश मिळवू शकतो.

    संत कबीर आपल्या दोह्यातून आपणास सांगतात-
    अपने अपने चोर को,
    सब कोय डारै मार
    मेरा चोर मुझको मिलै,
    सरबस डारू वार
    ‘अपने आप को पहचानिए’ असेही हिंदीत म्हटले जाते.

    व्यक्तिमत्त्व हे त्यावरून घडते. अशा विचारांचे मनन, चिंतन, वाचन माणसाने सातत्याने करावे. हे फारच उपयुक्त ठरते. त्यामुळे स्वत:ची ओळख होते. आपणास सहज इतरांविषयी विचारले की आपण भरभरून त्याच्या गुण-दोषांची थैली उघडतो; पण स्वत:विषयी काही विचारलं तर मात्र बोलण्यास कचरतो. स्वरूप ओळखा असे संत सांगतात. ज्यांना स्वरूप कळाले त्यांनीच जगावर राज्य केले अन् तेच आजही करताहेत.

    संत कबीर दोह्यात आपणास हेच सांगतात- जगातले सर्वच आपापल्या शत्रूंना मारून टाकतात. मात्र पकडले न जाणारे मन मला मिळाले तर मी त्याला मारणार तर नाहीच उलट माझे सर्वस्व त्याला अर्पण करेन, त्यांच्याशी मैत्री करेन. स्वत:ची ओळख होण्यासाठी स्वत:चे मन, प्रवृत्ती, कल, सवयी यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे. एकदा का हा अभ्यास झाला म्हणजे गुण-दोष दिसतात. दोष कमी करत गेलो की मग गुण वाढीस लागतात. आपण काय करतो, का करतो, त्याचे काय परिणाम होणार हे कळते. त्यावेळी आपले मन सापडते.

    ‘तोरा मन दर्पण कहलाये’ असं दर्पणासमान मन आपणास सारे काही दाखवते. मग काय हा अल्लाऊद्दीनचा दिवा असलेलं आपलं मन हवं ते मिळवून देतं व आयुष्यातल्या अडचणी, संकटे, दु:ख यावर उपाय सापडतो व आपल्या आयुष्याला आकार मिळतो.
    आपल्याही आसपास सकारात्मक विचार करून आपल्या स्वत:च्या आयुष्याला, दुस-याच्या आयुष्यालाही आकार देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारी व्यक्तिमत्त्वे आढळतात. फक्त उघड्या डोळ्यांनी त्यांना अनुभवण्याची गरज असते.

    जसा कुंभार ओल्या मातीला आकार देत असतो, प्रसंगी तो धपाटाही देतो व आधारही.
    थोडक्यात सांगायचं तर अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन एक भ्रम आहे. वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे. अशा या व्यक्तिमत्त्वापासून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या !

    कुसुमाग्रज कवितेतून सांगतात-
    कुंभारासारखा गुरू
    नाही रे जगात
    वरूनी घालतो धपाटा,
    आतुनी आधाराचा हात.

    -- दीपक गायकवाड

      August 17, 2017


  • मुबलकापासून (abundance) असंग्रहाकडे (minimalistic) धाव !

    आवश्यक असेल तेवढेच जतन करायचे आणि हातातील अनावश्यक साठ्याचा त्याग करायचा. गरजा किमान करीत स्वतःला शक्य तितके छाटत जायचे. तरीही मस्त जगता येते,याची पूर्वी घेतलेली अनुभूती पुन्हा घ्यायची.

      January 14, 2023


  • परफेक्ट बॉस कोण ?

    खरं तर एखाद्या ठिकाणी स्त्री बॉस असली तर त्यात एवढं मोठं काय? असा प्रश्न काही जणांना पडेल. पण त्यांची संख्या केवळ 20 टक्के असेल, बाकी 80 टक्के वर्गाला हा बदल फारसा रुचत नाही. त्यातही पुरुषांची संख्या अधिक ! कारण स्त्रियांवर हक्क गाजवणं ही कल्पना मनाला चिकटलेली असते. आता त्यांच्या हाताखाली काम करायचं म्हणजे… पण अपरिहार्यतेच्या दृष्टिकोनातून त्याला ‘अंजाम’ दिला जातो.

      October 14, 2018