(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महाकवी कालिदास दिवस

    कालिदास काय नव्हता ! त्याच्या साहित्याचं दर्शन घेतलं तर आपल्याला जाणवतं की कालिदास कवी तर होताच… पण तो चित्रकारही होता…एक वैज्ञानिकही होता, एक समाजशास्त्रज्ञही होता. एवढचं नव्हे तर एक मानसशास्त्रज्ञही होता….

      June 30, 2022


  • बारा ज्योतिर्लिंगे – श्री ओंकारेश्वर

    राजा उदय दिप्ताने तिथेच शिलेलेखावर संस्कृत स्तोत्रे कोरली. महारानी अहिल्याबाईंनी कोटीलिंगावर्चनाची पूजेची प्रथा येथे सुरु केली.

      August 13, 2013


  • मोक्षा रॉय

    मोक्षा रॉय यांना जगातील सर्वात तरुण वकील होण्याचा मान नुकताच मिळाला आहे. पुरस्कार मानवी जीवनाला चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देतात. पुस्तके वाचून अनेकांनी पुरस्कार मिळवले आहेत; पण पुस्तकांच्यापलीकडे जाऊनही त्याबद्दलही पुरस्कार मिळतात. आपलं भवताल आपल्याला घडवतं, बिघडवतं. आपल्या सभोवतालच्या गोष्टींची दखल घेतली नाही, तर आपलं अस्तित्वच धोक्यात येतं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरडी कोसळणे, पूर येणे या घटना वारंवार घडत आहेत, तरीही सामूहिक जनजागृती होत नाही. मनातली जागृतीच असंख्य जणांना वाचवू शकते. शिक्षणाने मनात जाणीवजागृती निर्माण व्हायला हवी. शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करून माहिती लक्षात ठेवणं नाही. आपल्या शिक्षणामुळे आपलं व समाजाचं कल्याण कसं होईल? हा मनात विचार शिक्षणामुळे रुजायला हवा. मूल्यांची रुजवणूक पुस्तकातली मूल्यं पाठ करून होत नाही, तर त्यासंबंधीची जाणीव झाल्याने ती आपल्यात रुजतात.

      June 2, 2026


  • आम्ही कंगाल का?

    प्रकाशन दिनांक :- 04/01/2004

    सध्या संपूर्ण जग समस्यांचे माहेरघर बनले आहे, यावर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही. आपल्या देशाच्या संदर्भात तर हे विधान कायम सिद्ध आहे. खरं तर मानवाच्या विकासाला या समस्याच कारणीभूत ठरल्या आहेत.

      January 4, 2004


  • ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ भाग 3

    नालंदा विद्यापीठात १५०० गुरु आणि वेगवेगळे अभ्यासक्रम करणारे  ८५०० विद्यार्थी रहात असत. दिवसाला १०० चर्चासत्र व वादविवाद होत  असत. एका गुरूच्या हाताखाली सात ते आठ विद्यार्थी असत. गुरु प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देत असत.

      August 7, 2023


  • रंग चिकित्सा – भाग २

    रंग चिकित्सा’ किंवा ‘रंगोपचार’ हा उपचार इतका आश्वासक आहे की संबंधिताला अनुभव हा येतोच येतो. रंगज्ञान हे प्रत्येक जीवात्म्याला असतेच. रंगज्ञानाची प्रक्रिया पाहिली तर आपल्या डोळ्यांच्या रचनेत, रेटिनाच्या आतल्या बाजूस असंख्य कोन्स आणि रॉडस असतात. दंडगोल आणि शंकूच्या आकारामधील या घटकांना विशिष्ट रंगाचे ज्ञान असते.  उदाहरणार्थ लाल रंग हा ठराविक कोन्स वा रॉडस ना असतो. प्रत्येक रंग दिसणे या क्रियेसाठी ते ते स्वतंत्र कोन वा रॉडस असतात.

      August 20, 2018


  • दादर, मुंबई येथील ‘धी गिरगांव पंचे डेपो प्रायव्हेट लिमिटेड’

    मुंबईतील मराठी माणसांच्या उद्योग-व्यवसायात ९० वर्षांची परंपरा असलेले “दि गिरगाव पंचे डेपो प्रा. लि.” हे दुकान अग्रभागी आहे. मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात असलेल्या या दुकानात मराठी माणूस खरेदीसाठी दूरदूरच्या ठिकाणांहून येतो.

    देवीच्या साड्या हे “गिरगाव पंचे डेपो”चे खास वैशिष्ट्य. याचबरोबर इतरही सूती कपडे, खासकरुन मराठी ग्राहक आणि कुटुंबांमध्ये वापरले जाणारे कपडे यांच्या व्यवसायात “गिरगाव पंचे डेपो” अग्रस्थानी आहे.

    Founder of the girgaon panche depot९० वर्षांपूर्वी, १९२६ मध्ये स्वर्गिय महादेव यशवंत कुलकर्णी यांनी या उद्योगाची सुरुवात केली. खरंतर त्यापूर्वीपासूनच त्यांनी कोकणातून पंचे वगैरे वस्तू आणून घरोघरी विकण्याचा व्यवसाय सुरु केला होताच. त्याचीच पुढची पायरी म्हणजे सुरुवातील गिरगावात आणि नंतर एका वर्षात, १९२७ मध्ये दादर येथे त्यांनी दुकान थाटले.

    त्यानंतर त्यांचे चिरंजीव अरविंद महादेव कुलकर्णी यांनी दुकानाची जबाबदारी सांभाळली. ते महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष होते. सध्या श्री रमाकांत अरविंद कुलकर्णी हे या दुकानाची धुरा सांभाळत आहेत. या कामात त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अर्चना यांची साथ आहे.

    आता कुलकर्णी कुटुंबाच्या सदिच्छा व स्वराज या चौथ्या पिढीने या व्यवसायात पदार्पण केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेल्या या पिढीने आता या उद्योगाला ऑनलाईन जगात आणण्यासाठी पाऊल उचलले आहे. लवकरंच “गिरगाव पंचे डेपो”मधील विविध वस्तू ऑनलाईन शॉपींगच्या माध्यमातून घरबसल्या मागवण्याची सोय सुरु होणार आहे.

    “देवीच्या साड्यां”नी कुलकर्णींच्या व्यवसायाला भरभराट आणली. त्यामुळे ऑनलाईन व्यवसायाची सुरुवात देवीच्याच साड्या नवरात्रीनिमित्त ग्राहकांपर्यंत पोहोचवून करण्याचा त्यांचा निर्णय अगदी योग्यच आहे.

    मराठी ग्राहकाने ज्याप्रमाणे कुलकर्णींच्या तीन पिढ्यांवर प्रेम केले आणि त्यांना साथ दिली तशीच साथ या नव्या पिढीलाही मिळेल याबद्दल रमाकांत आणि अर्चना कुलकर्णींच्या मनात अजिबात संदेह नाही.

    <!--घटस्थापनेच्या शूभमुहुर्तावर देवीच्या साड्यांची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे. सर्व साड्यांसाठी घरपोच डिलिव्हरी सेवा मुंबई आणि ठाणे विभागात उपलब्ध. डिलिव्हरी चार्जेस - रु.७०/- प्रति साडी. डिलिव्हरी ३ दिवसात मिळेल रंगाच्या निवडीसाठी फोनवरुन संपर्क साधावा व त्यानंतर ऑनलाईन लिंकवर जाऊन पैेसे भरावेत. आपला पत्ता आणि फोन नंबर आमच्याकडे इ-मेलने पाठवावा. पैसे भरण्यासाठी येथे क्लिक करा [supsystic-tables id='1'] [supsystic-tables id='2'] -->
    पत्ता - ३५४, एन सी केळकर मार्ग, दादर, मुंबई ४०००२८
    फोन - 9869007736
    इ-मेल - ramakantarchana@gmail.com

      September 29, 2016


  • ममता’ ….. रहें ना रहें हम, महका करेंगे ….

    सिनेमावर कितीही लिहिता येईल ….. हे काही परीक्षण वगैरे अजिबात नाहीये ….. सिनेमा बघितल्यावर मनाला जसं वाटलं ते तसंच्या तसं लिहिलंय …. मला सुचित्रा सेनने खूप भुरळ घातली ….तिच्यातल्या वेगळ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने …. माझ्यातल्या लेन्समनला तर खूपच ….. मला तिचे फोटो काढायला खूप आवडलं असतं …. अर्थात ही आता नुसतीच कल्पना ….. तिच्यावर मात्र कधीतरी खास लिहिणार आहे ….. खूप वाचलंय मी हा सिमेना बघितल्यावर …. त्या साठी एखादे वेळेस कोलकात्याला जाईनही … बघू ….

      June 29, 2019


  • अमेरिका अमेरिका

    अमेरिका अमेरिका

    सिअँटल एक मोठं शहर..समुद्रकिना-यावरचं…बेलेव्ह्यु सिअँटलचंच उपनगर…पण दोन्ही ठिकाणच्या चलनवलनात बराच फरक…अगदी पुण्याच्या गंज पेठेत आणि बाणेर -औंध मधे आहे तसाच… हिरव्यागार टेकड्या टेकड्यांवर वसलेलं…हे एक नितांत सुंदर टुमदार शहर….मोकळे ढाकळे रस्ते.. विकएंडमुळे रस्त्यांवर रहदारी कमी..सुट्टीच्या दिवशी मुंबईच्या फोर्ट भागात असतं तसं…

      May 15, 2019


  • ऐतिहासिक अमृतांजन पूल आजच्या दिवशी पाडला

    ऐतिहासिक अमृतांजन पूल आजच्या दिवशी पाडला

    इंग्रजांनी मुंबई-पुण्यात पाय रोवल्यावर १८३० मध्ये बोरघाटातून खोपोली आणि खंडाळा यांना जोडणारा रस्ता काढला.‌ त्यावेळी स्थानिक धनगर शिंगरोबाच्या मदतीने नागफणी समोरच्या पर्वतरांगेतून खिंड काढण्यात आली. एकावेळी जेमतेम एक वाहन जाऊ शकेल, एवढी अरुंद अशी ही खिंड होती. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची केंद्रे जोडणाऱ्या या रस्त्याने १८३०पासून वाहतूक सुरू झाली, तेव्हा इंग्रजांनी या खिंडीत एक कोनशिला बसवली.

      April 5, 2022