वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नोटा छापणे, नाणी तयार करणे याव्यतिरिक्त देशाचे चलन अधिक सुरक्षित करणे आणि त्याद्वारे बनावट चलनाला दूर ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी असते. आपली रिझर्व्ह बँक, नोटांची प्रेस आणि नाण्यांची टांकसाळ इथून आवश्यक चलन निर्माण करून त्याची वितरण व्यवस्था करते जी सक्षम आहे.
November 21, 2022
सुट्ट्यांच्या बाबतीत जी जागरूकता, जो आग्रह सरकारी कर्मचारी दाखवितात तो आग्रह किंवा ती जागरूकता कामाच्या बाबतीतही दाखवायला पाहिजे. स्वत: सरकारी कर्मचाऱ्यांनीच पुढे होऊन, आम्हाला नकोत या सुट्ट्या असे सांगायला पाहिजे; परंतु सध्यातरी तसे होण्याची सुतराम शक्यता नाही. हे ज्या दिवशी घडेल तो दिवस निश्चितच भाग्याचा असेल आणि त्याच दिवसापासून आपला प्रवास खर्या अर्थाने महासत्तेच्या दिशेने सुरू झालेला असेल.
December 22, 2012
राज्यसभेत काश्मीरमधील चर्चेला उत्तर देताना, त्यानंतर लगेच स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचीस्थान, गिलगिट आणि बाल्टिस्तान या प्रांतांमध्ये पाकिस्तानने करत असलेल्या अत्याचाराविषयी भाष्य केले.
August 28, 2016
ग्रीनलँड हा पृथ्वीवरचा अतिउत्तरेकडचा प्रदेश आहे – उत्तर ध्रुवाजवळचा! या प्रदेशाचा उत्तरेकडचा भाग म्हणजे एक शीत मरुभूमी आहे. अत्यंत कोरडी आणि थंड हवा असणारा हा प्रदेश अगदी वैराण आहे. इथल्या जमिनीतलं पाणी हे सतत गोठलेल्या अवस्थेत असतं. इथल्या अतिप्राचीन काळातील वनस्पतींची आणि प्राण्यांची फारशी माहिती उपलब्ध नाही.
February 11, 2023

आजच्या औद्योगिक युगातली एक महत्त्वाची गरज म्हणजे कागद. लिखाणासाठी किंवा छपाईसाठी वापरला जाणारा कागद, वेष्टणासाठी वापरला जाणारा कागद, नॅपकिन म्हणून वापरला जाणारा कागद… अशा वेगवेगळ्या स्वरूपात कागदाचा वापर केला जातो. मात्र या कागदनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान, लाकडाच्या लगद्यातील काही पदार्थ वेगळे करून काढून टाकावे लागतात.
July 28, 2023
आपण रोज रात्री घेत असलेल्या निद्रेमध्ये स्वप्ने पडतात. स्वप्न म्हणजे घडलेल्या घटना, विचार यांचा जो संग्रह मेंदूमध्ये झालेला असतो तो दृश्य रुपात दिसणे. उपनिषदाप्रमाणे स्वप्न हे मनात दडून राहिलेल्या इच्छांचे प्रगटीकरण आहे.
October 11, 2025
दुसर्या महायुद्धावरील अनेक पुस्तकांच्या वाचना दरम्यान समज गैरसमज यांची ही उदाहरणे माझ्या स्मरणात राहिली. या घटना मी अगदी संक्षेपात मांडल्या आहेत. काही वेगळे समोर ठेवावे या हेतूने बॉंबची सर्वश्रृत नावे (Little boy, Fat man) न सांगता त्यांचे प्रकार सांगितले आहेत. युद्ध रम्य नक्कीच नाही, पण युद्धकथा काहीतरी विचार करण्यास वाव देतात ना? ‘दुसरे महायुद्ध’ या विषयावरील हा पहिला लेख.
March 6, 2025
उलाढाल’ या चित्रपटासाठी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे गाणे जबरदस्त हीट झाले आहे. विविध वाहिन्यांवरील संगीत स्पर्धेत सहभागी स्पर्धकांकडून तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते हमखास गायले आणि वाजवले जाते. हे गाणे स्वतः अजय गोगावले यांनी गायले असून अजय-अतुल यांच्या खास शैलीमुळे गाण्याला एक वेगळेच परिमाण मिळाले.
July 25, 2025
बाघ-इ-जिन्हा हे पाकिस्तानातील लाहोर शहरातील एक ऐतिहासिक मैदान आहे. पूर्वी हे मैदान लॉरेन्स गार्डन या नावाने ओळखले जात असे. सध्या मात्र या मैदानाच्या आसपास विविध झाडाफुलांनी बहरलेला मोठा बगिचा आहे. तो बोटॅनिकल गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे आणि शेजारी एक मशिद आहे.
August 20, 2023
ओतारू हे ऐनू वस्तीचे शहर, “ओतारू” हे नाव सुद्धा मूळचे ऐनू भाषेतुन घेण्यात आले आहे. ऐनु म्हणजे उत्तर जपानमधील एक जमात आहे. ह्या ऐनु जमातीचे लोकं साधारणपणे सध्या फक्त होक्काइदो मध्ये आढळून येतात. सांस्कृतिक पार्श्वभूमी सुद्धा बहुतेक करून उर्वरित जपानमधल्या लोकांपेक्षा वेगळी आहे. भाषा आणि संस्कृती मध्ये वेगळेपण आहे. ऐनु संस्कृती विषयक पुरावे आणि विस्तारित माहिती देणारी अनेक ठिकाणे होक्काइदो मध्ये आहेत.
June 12, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti