(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रक्तरंजित आघातातून उभे राहिलेले पवित्र स्थान – सोरटी सोमनाथ

    सोरटी सोमनाथच्या मंदिराचा रक्तरन्जीत इतिहास आणि आता उभे असलेले मंदीर भारताचे गौरव स्थान आहे. प्रत्येक भारतीयांनी अवश्य भेट द्यावी असे पर्यटन स्थळ आहे. एखादे धार्मिक स्थान हजारो वर्षे अनेक स्वाऱ्यामध्ये नेस्तनाबूत होते, परंतु त्यानंतर प्रत्येक वेळा फिनिक्स पक्षासारखे राखेतून उभे राहते असे एकमेव स्थान आहे सोरटी सोमनाथ. सौराष्ट्राच्या पश्चिम किनारयावर वेरावळ पासून २० किमी वर वसलेल्या, बारा ज्योतिर्लिंगांमधील प्रथम क्रमांकावर असलेल्या या स्थानाचा इतिहास रक्तरंजित आहे.

      December 22, 2018


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सत्तावीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग दोन !

    यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण.....

    आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. विश्वाची सर्व एनर्जी, उर्जा आपण जेव्हा आपल्या मनापासून स्विकारतो, तेव्हा ही आनंदाची अनुभूती आपल्याला येत असते.

    आपण जसा विचार करतो, तसं आरोग्य आपणाला मिळत असतं. कोणत्याही रोगाची बीजे ही आपल्याच मनामधे असतात. ती विश्वमनाशी जोडली गेली की, तीच स्पंदने पुनः आपल्यापाशी येतात.

    आपल्या उपनिषदांमधे हेच सांगितले आहे. ब्रह्मांडामधे प्रचंड शक्ती आहे. ब्रह्मांडातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी दास बनून येऊ शकतात. हे विश्व मला सतत मदत करत आहे. मला माझ्या प्रत्येक कार्यात ही शक्ती सूक्ष्म रूपात मदत करत आहे. माझ्या सर्व गरजा विश्वमनाकडून पुरवल्या जात आहेत. हे विश्व खूप सामर्थ्यशाली आहे, त्यामुळे माझ्या सर्व योग्य गरजा विश्वमनाकडून सहज पूर्ण होणाऱ्या आहेत. त्याच्यासाठी या गरजा म्हणजे किस झाड की पत्ती !

    फक्त योग्य शब्दात, योग्य वेळी त्या मागितल्या पाहिजेत. त्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आहेत, असा विश्वास पाहिजे, या आनंदात सतत राहिलो तर त्या मिळतातच !

    वास्तुशास्त्रामधे पण हेच सांगितलेले आहे. वास्तु कायम "तथास्तु" म्हणत असतो. घरात कायम सकारात्मक स्पंदने असतील तर कोणतीही प्रबळ अनिष्ट शक्ती कोणताही त्रास देऊ शकत नाही. निसर्गाचे हे नियम, ही स्पंदने, ही उर्जा घेण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. असा सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे.

    माझ्या आजोबांना डायबेटीस होता, वडीलांना पण होता, आता मलाही तो होणार आहे, असा विचार जर मनात प्रबळ होत गेला तर, कितीही पथ्य पाळले तरी डायबेटीस तुम्हाला शोधत तुमच्याकडे येणारच. हाच निसर्गाचा नियम आहे.

    मग विचारांची स्पंदने जर सकारात्मक ठेवली तर विश्वमना पर्यंत पोचणारा परिणाम सकारात्मकच असणार ! म्हणजेच काहीही झाले तरी मला डायबेटीस होणार नाही, वाढलेल्या साखरेचा मला काहीही त्रास होणार नाही, अशी स्पंदने जर निसर्गामधे प्रक्षेपित केली तर तीच स्पंदने जास्त ताकद घेऊन पुनः आपल्याचकडे परत येतात आणि रोगापासून हवे असलेले संरक्षक कवच आपणाला मिळत असते. यालाच आजच्या भाषेत प्रतिकारशक्ती म्हणतात.

    राॅन्डा बर्न यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे, द सिक्रेट नावाचं. या पुस्तकात हेच रहस्य सांगितलेलं आहे. आपण जो विचार करतो, तो एवढा सकारात्मक करा की विश्वमनाशी तो जोडला जाईल.

    रोन्डा बर्न यांचे नाव एवढ्यासाठीच घेतले की आपली मानसिकताच अशी बनली आहे, की पाश्चात्य तज्ञ जे सांगतात, तेच अंतिम सत्य. जणुकाही आकाशातूनच पडले आहे, आपल्या पराभूत भारतीय मानसिकतेचा तो परिणाम आहे, इतकंच. बाकी विशेष नाही.
    सो बी पाॅझिटीव्ह, नेचर हियर्स यु !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    07.05.2017

      May 7, 2017


  • सुदृढ आजारपण!

    प्रकाशन दिनांक :- 07/11/2004

    एका शहरात अनेक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या माणसाने आपल्या एकुलत्या एका मुलाला डॉक्टर बनविले. खाजगी मेडिकल कॉलेजचे डोनेशन, फी वगैरे सर्व 40-50 लाख खर्च झाला. बापाच्या इच्छेनुसार मुलगा डॉक्टर झाला.

      November 7, 2004


  • माझं कोकण

    आता 'माझं कोकण' पुढे कसं असेल? त्याचं काय होईल? माहित नाही.

    दरवर्षी फेरी मारताना, प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या खुणा एकेक करत हरवत जात आहेत हे निश्चित.
    माणसं बदलली आणि कोकण पालटत चाललंय.
    तरीदेखील आपल्या पिढीने जे 'कोकण' बघितलंय, ते पुढच्या पिढीला बघायला मिळेल का?
    'कोकण' म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं,
    तेच चित्र नवीन पिढीसमोर साकारलं जाईल का हे माहिती नाही.
    पण तसं नसेल तर ते चित्र साकारण्याचा एक अल्पसा प्रयत्न.

    'कोकण' म्हणजे कौलारू घर, स्वच्छ अंगण, तुळस व तिला आधार देणारा दिवा.

    'कोकण' म्हणजे गोठा, साठवून ठेवलेलं गवत आणि गाईच्या भोवती पिंगा घालत असलेलं तिचं वासरू.

    'कोकण' म्हणजे बाहेरची पडवी, झोपाळा, त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या.

    'कोकण' म्हणजे माजघर, एका कोपऱ्यात पडलेलं जातं, आजीने सारवलेली चूल, फुंकून ओलसर झालेला कारभारणीचा चेहरा.

    'कोकण' म्हणजे देव, महापुरुष, वेतोबा, रवळनाथ, सातमाई, सातेरी, गिरोबा, रामेश्वर, कुणकेश्वर, सागरेश्वर.

    'कोकण' म्हणजे कौलारू देवळे, घुमत असलेला गुरव, रोखून बघत असलेले मानाचे दगड.

    'कोकण' म्हणजे गर्द देवराई, त्यात नाहीशी होणारी देवाची वाट आणि वेशीवर दिलेला नारळ.

    'कोकण' म्हणजे घुमत असलेले ढोल, येणारं निशाण, त्याला तोरण बांधण्यासाठी घरातल्यांची घाई.

    'कोकण' म्हणजे देवचार, त्याच्या चपलांचा आवाज, मनात असलेली भीती, वाडवडिलांची पुण्याई.

    'कोकण' म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळीची झाडं.

    'कोकण' म्हणजे पतेरा, बकुळीचा धुंद वास, करवंदाची घनदाट जाळी आणि कण्हेरीची फुलं.

    'कोकण' म्हणजे सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी आणि मोरी माश्याचं कालवण.

    'कोकण' म्हणजे चुलीवर भाजला जात असलेला बांगडा, भाकरी, आणि कांद्या-गोलम्याचा ठेचा.

    'कोकण' म्हणजे उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या आठळा आणि फणसा-केळफुलाची भाजी.

    'कोकण' म्हणजे भात, कैरी घातलेली डाळ, घावणे आणि वाटप घातलेली उसळ.

    'कोकण' म्हणजे तळलेली सांडगी, कांडलेली पिठी, सुकत असलेली आंब्याची साठ आणि मुरत असलेलं लोणचं.

    'कोकण' म्हणजे नदीला आलेला पूर, मुसळधार पाऊस आणि कोपऱ्यात पुढे सरकत असलेला नांगर.

    'कोकण' म्हणजे पेप्सी खात जाणारी पोरं, डांबरी रस्ता, पत्र्याचा पूल आणि खालून वाहणारा व्हाळ.

    'कोकण' म्हणजे लाल डब्याची एस्.टी., धुरळा आणि नातवांची वाट बघत स्टॉपवर उभे असलेले आजोबा.

    'कोकण' म्हणजे महापुरुषाची पूजा, वडा, भात, उसळ आणि लाऊडस्पीकर.

    'कोकण' म्हणजे गणपती, मंडपी, सजावट, मोदक, उसळ आणि डबलबाऱ्या.

    'कोकण' म्हणजे दिवाळी, फोडलेलं कारीट, करंज्या आणि उंच निघून जात असलेले कंदिल.

    'कोकण' म्हणजे होळी, गोडाचं जेवण, गाडलेला खांब, केलेली शिकार आणि मारलेल्या बोंबा.

    'कोकण' म्हणजे पाटीवर काढलेली सरस्वती, शाळेत नेलेल्या काकड्या, उदबत्त्या आणि पोरांचं भजन.

    'कोकण' म्हणजे गावच्या ग्रामदेवतांच्या जत्रा, पूजा, शिरा, मुखवटे, फुगे आणि खाजं.

    'कोकण' म्हणजे नांदी, तबल्यावर पडलेली थाप, धर्मराजाची एन्ट्री आणि दशावताराची समृद्ध कला.

    'कोकण' म्हणजे समुद्रावरचं, देवळातलं, पिंपळाखालचं, मळ्यातलं क्रिकेट आणि 'टुर्लामेंट'.

    'कोकण' म्हणजे समुद्र, किनारा, नाठाळ वारा, ती गाज आणि दूरवर गेलेली गलबतं.

    'कोकण' म्हणजे चकवणारे मासे, लागलेली रापण, ओढणारे तांडेल आणि बघ्यांचा हा गलका.

    'कोकण' म्हणजे सर्जेकोटची जेटी, चमचमणाऱ्या माश्यांचा लिलाव, दमून परत आलेल्या होड्या.

    'कोकण' म्हणजे संपलेली सुट्टी, परत जायची तयारी, जड झालेला चाकरमान्याचा पाय आणि सगळ्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी.

    'कोकण' म्हणजे खूप काही सांगू पाहणारा, पूर्ण न उलगडणारा, कसलाच अंत नसलेला असा काशीविश्वेश्वराचा एक डाव....

      June 7, 2017


  • इंद्रिये अवयव आणि आहार – भाग एक

    आपल्या पचनाचा प्रत्येक इंद्रियांशी संबंध असतो. पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि मन यांचा पचनाशी कसा संबंध असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

    या सगळ्यांमधे महत्त्वाचे आहे, मन ! मनामार्फत अनुभूती येत असते. जर हे मनच जागेवर नसेल, तर आपण काय खातोय, त्याची चव कशी असणार, हे अनुभवले नाही, तर त्याचा होणारा परिणाम वेगवेगळा होणार.

    जेवताना, खाताना टीव्ही बंद असावा, असे जेव्हा वारंवार आई ओरडते, तेव्हा नेमके काय बदल होतात, जे पचन बिघडवतात ? हे समजून घेतले तर जेवताना लक्ष जेवणातच राहील. जसे शिकवताना लक्ष शिक्षकांकडे असेल तरच शिकवलेले डोक्यात जाते, नाहीतर इकडून तिकडे शब्द धावत सुटतात. त्याचा अर्थ मनामार्फत इंद्रियापर्यंत पोचतच नाही.

    रसग्रहण नावाचा शब्द साहित्य क्षेत्रात वापरला जातो. तो मुळात आहारशास्त्रातील आहे. गोड, आंबट, खारट, तिखट,कडू आणि तुरट या सहा रसांचे ग्रहण कधी होईल, जर माझे मन जाग्यावर म्हणजे जेवताना, जेवणाच्या ताटावर असेल तर. वेळ मिळेल तसे मी जेवून घेतो, मी डबा खातो, कामात गुंतलो तर लागलेली भूक लक्षात सुद्धा येत नाही, काही वेळा कधी पोट भरलंय, हे पण कळत नाही. अशी अवस्था असणाऱ्यांनी जरा सावध रहायला हवे, कारण यांचे पचन हमखास बिघडते. आणि हीच छोटी छोटी कारणे पुढे काट्याचा नायटा करतात.

    जेवणाचा डबा न्यावा लागणं ही गरज आहे, कोणी हौस म्हणून डबा नेत नाही. शाळेची सहल हा या हौसेला अपवाद असायचा. सहलीला न्यायच्या डब्याची गंमत काही औरच असायची....
    आता यातून आनंद मिळवत जेवलो तर खाल्लेल्याचं पचन होणार. नाहीतर अगदी प्रेमळ बायकोच्या हातचा, प्रेमानं बनवून दिलेला, डबा जर मनापासून खाल्ला नाही तर पचन पूर्ण होणार नाही.

    डबा कसा खाल्ला तर आनंद जास्त मिळेल? विचार करून पहा. काही कारणाने कामावरून, जेवणाच्या वेळीच घरी आलोय, सकाळी भरून दिलेला डबा सोबत आहे, तर तो डबा आपण कसा खाऊ ? तर नेहेमी जेवतो ते ताट समोर घेऊ, डब्यातले जे काही एक दोन जिन्नस असतील, ते ताटात वाढून घेऊन जेवायला सुरवात करू. आणि छान शांतपणे जेवू. डबा तोच आहे. आपणच वाढून घ्यायचा आहे, पण ताटात वाढून घेऊन जेवलो तर मिळणारा आनंद वेगळा असतो.

    म्हणजे डब्यातल्या डब्यात जेवणे, आणि ताटात वाढून जेवणे यात फरक आहे. ताटात वाढून जेवण्यात जे समाधान मिळते, ते डब्यातल्या डब्यात बुचकून खाण्यात मिळत नाही.

    अर्थात काही भगिनीना, डबा खाणं हे तेवढंच आनंददायी वाटतं.
    रोजच्या रांधा वाढा... या चक्रातून सुटका तर मिळते तिला ! उरलं सुरलं काढून ठेवणे नाही, ओटा टेबल पुसायला नको, पुढची आवराआवर करावी लागत नाही....

    रोज डबा खाण्याची जागा जरी घर नसली, तरी डब्यातील सर्व पदार्थ ताटात वाढून जेवण्यातला आनंद तर आपण घेऊ शकतो ?

    एका ताटाचा तर प्रश्न आहे, तेवढे एक ताट काम करतो तिथे ठेवून द्यायचे की झाले. तेवढेच समाधान !!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.03.2017

      March 16, 2017


  • श्रीमुद्गलपुराण – ६

    राक्षसांच्या या सर्व वरदाना नंतरही त्यांची शक्ती भगवान गणेशां समोर चालत नाही. या कथा भागातून पुराणकार आपल्याला सांगत आहेत की मोरया पंचमहाभूतांच्या, त्रिगुणाच्या, मन-वाणीच्या अतीत आहेत. पर्यायाने या बाह्य सुखाच्या दुःखाच्या अतीत आहेत. ते शाश्वत आनंद स्वरुप आहेत.आपल्यालाही तो चिरंतन आनंद मिळवायचा असेल तर त्यांची उपासना हाच मार्ग आहे. त्यासाठीचा सर्वाधिक सुंदर मार्ग आहे मुद्गल पुराण.

      September 7, 2019


  • बालाकोट सर्जिकल स्ट्राईक

    १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्यांनी पाकिस्तानाच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्यही बिथरलं. त्यांना प्रत्युत्तर देण्याची संधीही भारताने दिली नाही. ग्वालियरपासून उड्डाण घेतलेले भारतीय वायूसेनेचे १६ मिराज २००० ही लढाऊ विमाने मध्यरात्री साडेतीन वाजता पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत घुसली. या विमानाने बालाकोट भागात बॉम्ब हल्ले चढवले. जैशच्या दहशतवादी तळांना टार्गेट केले गेले. यात अनेक दहशतवादी ठार झाले.

      February 26, 2022


  • द गॉडफादर’ चित्रपटाची ५० वर्षे

    द गॉडफादर ही कादंबरी लिहिलेल्या पुझोचा साहित्यिक प्रवास पुढे सुरु राहिला असला तरी त्याला गॉडफादरने जितकी प्रसिध्दी मिळवून दिली तशी ती त्याच्या अन्य कुठल्या साहित्यकृतीने दिली नाही. गॉडफादरच्या तिन्ही भागांना वेगवेगळ्या क्षेत्रात ऑस्कर मिळाले आहेत.

      March 14, 2022


  • कोकिळेचे मनोगत !

    उन्हाची काहिली सुरु झाली,

    वसंताची चाहूल पक्षांना लागली !

    झाडं पालवीने हिरवीगार झाली,

    रंगीबेरंगी फुलाने बहरली !

    वसंतात तू सुंदर गातोस,

    गाणे ऐकून कावळा लाजतो !

    हाकुठला गायक, म्हणतो कावळा

    नओळखण्याइतपत मी काय बावळा !

    इंग्रज देश सोडून गेले,

    तुझी आठवण नाही विसरले !

    कवी वुड्सवर्थ आणि किपलिंगनी

    प्रेमाने तुझ्यावर काव्ये लिहिली !

    तू कुहूकुहूने आसमंत भरतोस,

    माझी प्रेमाने विनवणी करतोस !

    मीही तेवढीच महा बेरकी,

    ऐकून न ऐकल्यासारखे करी !

    कुहूकुहूने माझी फसगत होते,

    अशीच मोबाईलची रिंगटोन वाजते !

    वाटते काहीतरी रोमँटिक कर,

    मला फेसबुकवरून प्रपोज कर !

    न लागे तुझी गोड कुहूकुहू,

    आंबे पिकती रसायनाने हळूहळू !

    आता कळलेना तुला सगळे,

    आताशा आंब्याला मोहर येतनाही कुहूकुहूने !

    मी वेडी मंजुळ कुहूकुहूची वाट बघते,

    तुझ्यावर जीव आवळून टाकते !

    जगदीश पटवर्धन

      April 29, 2015


  • सायकल चालवा – कॅन्सर आणि हृदय रोग टाळा

    सायकलींग एक साधा आणि सोपा असा व्यायामाचा प्रकार असून ज्याने शरीराच्या सर्व मांसपेशींची योग्य प्रमाणात हालचाल होते. त्यामुळे आपले शरीर कोणतेही काम करण्यासाठी सदैव तत्पर राहते. पण सायकल चालवण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत ते आपण आज जाणून घेऊयात.

      April 17, 2019