(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री सिद्धिविनायक मुळ रहस्य व श्रीस्वामी समर्थांचा संबंध

    अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे.

      January 25, 2018


  • मर्यादा आणि क्षमता!

    समाजात वावरताना आपल्याला बरेचदा असे आढळून येते की, काही लोकांमध्ये प्रचंड क्षमता असूनही ते आपल्या क्षमतेला योग्य न्याय देऊ न शकल्याने गरिबीत किंवा अडचणीत दिवस काढत असतात, तर काही लोकांच्या वकुबाला बऱ्याच मर्यादा असूनही ते आपल्या क्षमतांचा योग्य उपयोग करून यशस्वी जीवन जगत असतात. विचारसरणीतील किंवा दृठिकोनातील फरकामुळेच हा भेद निर्माण झालेला असतो. ‘ग्लास अर्धा भरला आहे’ आणि ‘ग्लास अर्धा रिकामा आहे’ या दोन वैचारिक दृठिकोनांत सर्वसामान्य लोकांची विभागणी करता येईल.

      March 26, 2006


  • दिशा – पालकत्वाची

    तसं पाहिलं तर रोहनला लहान मुलांची खूप आवड. “त्याच्या धाकट्या भावालाही त्याने अगदी प्रेमाने वाढवलं. मला सांभाळण्यासाठी काही वेगळं करायला लागलंच नाही!” असं त्याची आई सगळ्यांना अगदी आनंदाने सांगते. पण रोहनचं लग्नंच झालं नाही तर मग मुलं तर दूरच! धाकटा भाऊ मात्र आताशा लग्न करून अमेरिकेत स्थिरावला होता. त्यामुळे रोहनची आईला सदोदित चिंता भेडसावत रहायची. त्यावर तो आईला नेहमी म्हणायचा, “लग्न काय मुलं जन्माला घालायची म्हणूनच करतात का? सहचारी हवी म्हणून करतात. लग्न होईल तेव्हा होईल तू काळजी नको करू.

      April 26, 2023


  • मराठीतील भाषांतरे-रूपांतरे आणि दुर्गा भागवत

    दुर्गा भागवतांच्या संशोधनाचे मुख्य क्षेत्र लोकसाहित्याचे. मराठीत भाषांतरित झालेल्या लोकसाहित्याबद्दल दुर्गाबाईंच्या खूप तक्रारी होत्या. मराठीत उत्तम अनुवादकांची वाण तेंव्हाही होतीच. भाषांतरावरून भाषांतरे करणे, संक्षिप्त रुपांतरे करणे, रूपांतर करताना मूळ नावे, स्थळे, घटना इत्यादी बदलून टाकण्याची भ्रष्ट प्रथा महाराष्ट्रात पडली त्याविषयी दुर्गाबाई नाखूष होत्या. या नाखुषीतून त्यांनी आगरकरांच्या हॅम्लेटलाही सोडले नाही.

      April 28, 2024


  • कानकून परिषद अनिर्णित

    कानकूनची आंतरराष्ट्रीय हवामान बदल परिषद कोणतेही महत्त्वाचे निर्णय न घेताच संपली. मात्र, क्योटो कराराची मुदत 2012 पर्यंत आहे. त्या मुदतीत तरी विकसित आणि अविकसनशिल देशांनी आपल्यातील मतभेद कमी करून व्यापक भूमिकेतून क्योटो कराराच्या जागी नवा मसुदा आणला पाहिजे. त्यातही अमेरिका सर्वात जास्त प्रदूषण करत असल्याने तिच्यावर अधिक जबाबदारी आहे.

      December 17, 2010


  • बॅरोमीटर

    हवामान अंदाज वर्तवताना हवेच्या दाबावर वातावरणातील बदल काही प्रमाणात अवलंबून असतात जर हवेचा दाब जास्त असेल तर सगळे काही सुरळीत असते पणदाब कमी होत गेला, की वातावरणात ओलसरपणा येतो.

      October 12, 2023


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग नऊ

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंधरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    आप्त म्हणजे जाणकार.
    ही जाणकार मंडळी सांगतात, तान्ह्या बाळांना अंगाला तेल लावावे, कानानाकात तेल घालावे, ताळु भरावी, हाता पायाला तेल चोळावे.
    प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी लहान मुलांना दिवसातून दोन वेळा तेल लावणे, तेल लावल्यावर बाहेरचा वारा लागू न देण्यासाठी त्यांना मऊ कपड्यात गुंडाळून ठेवणे, डोक्यावरची ताळु भरण्यासाठी ब्रह्ररंध्राच्या दिशेत चारही बाजूने तेल लावणे, वर कापसाचे वा विड्याचे पान ठेवून त्यावर टोपरे बांधणे इ. सर्व गोष्टी पूर्वी केल्या जायच्या. पण आज या सर्व गोष्टी कालबाह्य, अंधश्रद्धा म्हणून उपेक्षित झाल्या आहेत.

    त्यातल्या त्यात एक बरे आहे," हे असले नको ते उद्योग अजिबात करू नका" म्हणून सांगणाऱ्या भारतातील पाश्चात्य शिक्षणाने प्रभावीत झालेल्या तज्ञ डाॅक्टर मंडळींना त्यांच्या लहानपणी हे सर्व ( नको उद्योग ) केले होते, त्या आप्त आया आणि बाया अजूनही पुरावा म्हणून हयात आहेत.

    लहान मुलांच्या अंगाला तेल लावणे ही एक कला आहे. हे शिक्षण जगातले सोडूनच द्या, भारतात देखील अजूनही कोणत्याही आयुर्वेद महाविद्यालयात दिले जात नाही. हे ज्ञान देण्यासाठी आपल्याकडे या ज्ञानाने समृद्ध असलेल्या आप्तांची संख्या सुदैवाने चांगली आहे.

    जसे, आता उत्तम गुणांच्या, मूळ भारतीय बियांणाचे वाण संपत आलेले आहे, तसे या भारतीय परंपराचे ज्ञान जपून शिल्लक ठेवण्यासाठी या आप्त मंडळींची आवश्यकता आहे. ही मंडळी कदाचित निरक्षर अंगठेबहाद्दर असतील, कदाचित सही सुद्धा करता येत नसेल, त्यांना कदाचित आपण करत असलेल्या कृतीमागील शास्त्र काय आहे, हे शास्त्रीय वैज्ञानिक भाषेत सांगता येणार नाही. पण त्यांच्या राकट हातातील ही हळुवार कला जपणे आणि जोपासणे, त्याला संरक्षित करणे, संवर्धीत करणे हे भावी सुदृढ बलवान भारताला आवश्यक आहे.

    आरोग्याशी संबंधित असलेल्या या अशा प्रत्येक गोष्टीमागे दडलेले शास्त्र, वैज्ञानिक दृष्टीने समाजासमोर आणणे आणि पुनर्स्थापित करणे ही काळाची गरज आहे.

    ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.....
    ......संपूर्ण भारत निरोगी होण्यासाठी, आप्त बनत चाललेल्या वैद्य म्हणवून घेणाऱ्या, अंगी सुप्त गुण असलेल्या गुणवान वैद्यांची देखील !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०४.०८.२०१७

      August 4, 2017


  • जपानी सामुराई महिला-इटागाकी, हात्सू-जो, मियाजिनो आणि टोरा गोझेन

    गजा पानमधील कॅमेलॉट सरदारांच्या फार पूर्वीच सामुराईंनी खानदानी लढवय्यांच्या वर्गाची एक श्रेणी निर्माण केलेली होती. सामुराई पंथात वा श्रेणीत समाविष्ट होण्यासाठी माणूस धष्टपुष्ट असणे, शिस्तबद्ध असणे आणि निर्भय असणे अत्यावश्यक होते.

      January 16, 2024


  • निरंजन – भाग ३८ – “सा विद्या या विमुक्तये”

    रोग, दुःख, क्रोध, पाप, बेरोजगारी, अभाव, दारिद्र्य, अज्ञान आणि गैरवर्तन यांसारख्या काळोखातुन म्हणजेच अनेक बंधनातून मुक्त करते, प्रकाशाची दिशा दर्शवते, तीच खरी विद्या…विद्या ही मानवाच्या प्रवृत्तीमध्ये बदल घडवते. मानवाला उच्च दर्जाची वर्तणूक शिकवते.

      December 10, 2020


  • याला जीवन ऐसे नाव भाग २५

    पाणी शुद्धीकरण भाग पाच

    पाणी शुद्ध करण्यासाठी आणखी एक पद्धत शाळेत शिकवली गेलीय, जी एकदम साधी सोपी आहे.

    त्यातील मुळ कल्पना लक्षात घेतली की, आपल्याला हवे बदल त्यात करता येतील.
    एका छोटे छिद्र असलेले मडके घेऊन त्या छिद्रावर एक तलम मलमलचे कापड आतल्या बाजूला ठेवावे. त्या मडक्यात चार इंच वाळू भरावी. त्यावर कोळसे टाकावेत. त्यावर माठे गुळगुळीत दगड भरावेत. वरून हळुवार पाणी ओतावे. मोठी अशुद्धी कोळशात अडकते. छोटी अशुद्धी वाळूच्या कणामधे अडकते. त्याहून छोटी अशुद्धी कापडात अडकते. आणि नंतर छिद्रांतून पाणी ठिपकू लागते. जे शुद्ध स्वरूपात मिळते. दररोज कापड स्वच्छ धुवुन घ्यावे.

    याच यंत्रामधे थोडा बदल असाही करता येतो. दोन मडकी एकावर एक ठेवून वरील मडक्याच्या तळाला छोटे छिद्र करावे आणि सर्व सामग्री घालावी. खालील मडक्यात पाणी जमा होते.

    हेच तत्व वाॅटर फिल्टर्स मधे वापरले जाते. वेगवेगळी मटेरीयल वापरून काही अडथळे (कांड्या ) निर्माण केले जातात, जेणेकरून पाण्यातील अशुद्धी त्यात अडकत जाईल. काही दिवसानी हया कांड्या बदलाव्या लागतात.
    काही फिल्टर्स मधे इलेक्ट्रॉनिक रचना वापरली जाते. पण सर्वात उत्तम उपाय म्हणजे पाणी उकळून घेणे.

    पाणी किती उकळले म्हणजे त्यातील अशुद्धी दूर होईल ?
    आजचे विज्ञान सांगते किमान चाळीस मिनीटे पाणी उकळत राहिले तरच त्यातील अशुद्धी जाते. काही जंतु असे असतात, की ते पाण्याचे तापमान जसे वाढत जाते तसे स्वतःभोवती एक कवच तयार करतात आणि उकळत्या पाण्यात चक्क खेळतात. हे छुपे रूस्तम चाळीस मिनीटापर्यंत जिवंत राहू शकतात नंतर मात्र ते मरतात.

    पाण्याचा एक सोळांश काढा करणे, हा नक्कीच चांगला उपाय आहे. कोणत्याही वाॅटर फिल्टर मधले पाणी सोळा लीटर घेऊन ते एक लीटर उरेपर्यंत आटवावे.

    केवळ उकळले तरी पुरत नाही. पुनः ते गाळावेही लागतेच. कारण उकळल्यामुळे त्यातील अविद्राव्य घटक तळाला बसतात आणि ते प्रत्यक्षात दिसतात. ते गाळल्याशिवाय दूर होतच नाहीत.

    एक सोळांश उकळणे राहिले दूरच, किमान अष्टावशेष तरी राहूदेत, किंवा चतुर्थांश तरी आटवा, किंवा दोनाचे एक तरी करा, किमान उकळा तरी. यापैकी काहीही एक करा, पण करा.

    नाहीतर तुमची पचन क्षमता एवढी वाढवा की, रोगाचे जंतु तुम्ही प्रत्यक्ष गिळलेत, तरी ते तुमच्या अग्निने सर्व भस्म करून टाकू शकाल.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    01.01.2017

      January 1, 2017