(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मला कळलेले श्री गुरूदेव दत्त

    ‘डिजिटल’ हा शब्द आला, की त्याला जोडून ‘डाटा’ हा शब्द येतोच. ‘डिजिटल’ पद्धतीने साठा केलेल्या ज्ञानाला किंवा माहितीला ‘डाटा’ म्हणतात हे आता बहुतेक सर्वांनाच कळतं. ह्या ‘DATA’तच मला ‘DAT(T)A’ दिसतो. Data आणि Datta यातील साम्य मला हेच सांगते, की ‘दत्त’ म्हणजे ‘ज्ञान’..!

      December 5, 2017


  • मोरया माझा – २ : श्रीगणेशांना हत्तीचे मस्तक कसे ?

    हेच ज्यांचे आनन ते गजानन. आनन म्हणजे तो़ड अर्थात ओळख. म्हणजे निर्गुण निराकार अनादि-अनंत परब्रम्ह हीच ज्यांची ओळख आहे त्यांना गजानन असे म्हणतात. “गजमस्तक” चा हाच अर्थ असतो.

      September 3, 2019


  • कानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

    कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.

    आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो.

    तबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला - दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.

    पथ्यपाणी विचार –

    ओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.

    सोपा घरगुती उपचार –

    हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.

    कानाचे यंत्र –

    कानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे. कान यंत्र घेण्यापूर्वी हा कान मंत्र समजून घेतला तर इंद्रियाची जपणूक होईल.

    डॉ. संतोष जळूकर
    संचालक, अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई
    दूरध्वनी - +917208777773
    ईमेल – drjalukar@akshaypharma.com

      July 9, 2016


  • वायुगळती

    २००३ सालची गोष्ट आहे. मेक्सिको शहरावर पिंगट रंगाच्या धुक्याचा दाट ” थर पसरला होता. त्यामुळे शहरातल्या २ कोटी लोकांचे डोळे चुरचुरायला लागले, घशापाशी जळजळ झाली. बरेच दिवस तेथील प्रदूषणं-नियंत्रकांना हा उपद्रव नेहमीप्रमाणे मोटारकारच्या धुरांड्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होतोय असे वाटले.

      February 18, 2023


  • रेल्वेची अद्भुत, रंजक दुनिया

    रेल्वेच्या संबंधातील विषयांची व्याप्ती फारच मोठी आहे. इतिहास,  रेल्वे बांधणी, विविध मार्ग, गाड्या, प्लॅटफॉर्मस,  वेटिंग रुम्स,  स्टेशनांच्या इमारती, तांत्रिक माहिती….  खरंतर या जंत्रीला शेवटच नाही,  या सर्वांमधून मिळणारी माहिती शोभादर्शकातून म्हणजेच  `कॅलिडोस्कोप’ मधून दिसणाऱ्या रंगीत काचेच्या तुकड्यांच्या क्षणचित्रांसारखी रंजक आहे.

      October 30, 2018


  • श्रीहरि स्तुति – १०

    तत्त्वज्ञानाची मांडणी करत असताना आचार्य श्री पुढील पुढील टप्प्यांचा विचार आपल्या समोर उलगडून दाखवत आहेत.

      October 28, 2020


  • कार्यमग्न’ (बिझी) आहात असे दाखवू नका !

    मनाशी जस्ट विचार करा- दिलेल्या दिवसातील (किंवा मोफत मिळालेल्या दिवसातील) प्रत्येक क्षणाचा आपण हिशेब ठेवतो कां? नसल्यास कां नाही, याचाही विचार करा.

      July 7, 2022


  • जेवणाची बैठक कोणती ?भाग ५

    जमिनीवर जेवायला बसायचे काही फायदे नावाचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. तेच परत लिहिण्यात वेळ आणि जागा घालवित नाही.

    वास्तुतज्ञ सांगतात म्हणून नव्हे, पण वैद्यकीय तज्ञ सांगतात, म्हणून मलविसर्जनाची वास्तु देखील बदलण्यासाठी आता धडपड सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे.

    मल विसर्जन करताना पोटावर योग्य तो ताण निर्माण करणार् या स्क्वॅटींग व्यायामावर आज परदेशात संशोधन चालले आहे.

    पाश्चात्य लोकांच्या उंचीला साजेशी म्हणजे कमोडवर बसल्यावर सहजपणे पाय टेकतील अशी उंच कमोडची भांडी त्यानी बनवली. पण त्याच उंचीची भांडी, भारतातही बनवली जाऊ लागली. कमोडवर बसल्यावर, जमिनीला पाय टेकतच नसल्याने, कितीतरी भारतीयांना अक्षरशः लोंबकळत बसावे लागते, हे सत्य आहे. पाश्चात्य अनुकरणाची आणखी किती लाचारी करायची ?
    असो. ! पाय जमिनीवर, जमिनीला टेकलेले हवेत हे महत्वाचे.
    ( हो ! माझ्या काॅम्प्लेक्स मधील चिकित्सालयात, मी तपासणीकक्षातील जमिन शेण मातीचीच ठेवली आहे. आणि तपासणीसाठी बैठकपण भारतीयच ठेवली आहे. मस्त खाली बसून रूग्णांना तपासतो. त्यात लाज कसली ? ) मनापासून ठरवलं तर काहीच अशक्य नाही.

    दुसरा काही पर्यायच नसेल,आणि जिथे जेवायला टेबलखुर्चीचाच वापर करायचा असेल, तिथे न लाजता, खुशाल खुर्चीवर मांडी ठोकून बसावे.

    कोणत्याही खुर्चीवर बसल्यावर पाय अधांतरी रहाता नयेत. टेकलेलेच हवेत. नाहीतर पुढे पाठीला बाक येणे, पीआयडी, चकती सरकणे, असे प्रकार सुरू होतात. हे व्यवहारात दिसते. म्हणून तर पुर्वीच्या मुख्याध्यापकांच्या लाकडी खुर्चीखाली पाय टेकायला, पायपेटीला असते तशी तिरपी फळी ठोकलेली असायची. आता ती पण गेली........
    ........आणि कंबरेला बांधून ठेवणारे बेल्ट मात्र आले.

    जेवताना पण या गोष्टीचे भान हवे.
    पायांना भक्कम आधार हवा,
    पोट आणि ताटात सुरक्षित अंतर ठेवा
    हे वाक्य विसरले जाऊ नये की झाले.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    21.09.2016

      September 21, 2016


  • अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग ५

    आपल्या शेताचं कौतुक, आपल्या ट्रॅक्टरचं कौतुक, आपल्या जुन्या मोडक्या गंजलेल्या पिकअप ट्रकचं कौतुक, हे सगळं ऐकलं की अगदी आपल्याकडच्या

    जुन्या गाण्यांची आठवण होते. त्यात इथे गाण्याचे व्हिडिओज असतात. टी.व्ही.वर कंट्री म्युझिकचा स्वतंत्र चॅनल असतो. त्यामुळे त्याच्यावर लोकप्रिय

    गाण्यांचे व्हिडिओज पाहिले की गाण्यातल्या शब्दांना वेगळाच अर्थ येतो. त्यातली शेतं, माळरानं, छोटी गावं, गावातले लोक पाहिले, की हे सगळं

    आपल्या आजूबाजूचंच आहे हे पटकन उमगतं. कदाचित शहरात राहणार्‍यांना ते इतकं अपील होणार नाही. पण आमच्यासारख्या गावाकडेच राहणार्‍यांना

    त्याचा संदर्भ चटकन जाणवतो आणि भावतो. मग ती गाणी ऐकताना आणि टी.व्ही.वर बघताना, आपल्या जुन्या मराठी चित्रपटांतील गाणी आठवायला

    लागतात. शेतातल्या मोटेचं पाणी काढणारा कामकरी, आपल्या ढवळ्या पवळ्या खिल्लारी बैलांच्या पाठीवर मायेने हात फिरवणारा शेतकरी, बैलगाडीत

    बसून आठवड्याच्या बाजाराला निघालेलं कुटुंब, जात्यावर दळण दळणारी वयस्कर आई किंवा आजी, सोप्यावर झोपाळ्यावर बसून सुपारी कातरणारे

    आजोबा, पहाटेला मंदिरात चाललेली काकड आरती, अशी सगळी आपल्याच आयुष्यातली, आसपास पाहिलेली किंवा सिनेमात जिवंत झालेली दृष्यं

    डोळ्यांसमोर गर्दी करू लागतात. विस्मृतीच्या पडद्याआड गेलेले जुने प्रसंग, शब्द, स्पर्श, चवी पुन्हा जिवंत होतात.

    आपल्या ‘रेड नेक’ पणाचं कौतुक करायचं म्हणजे थोडी शहरवासियांबरोबर तुलना आलीच. मग आम्ही आपले कसे साधे आहोत, आम्हाला काही

    brand name च्या वस्तू मोठमोठ्या आलिशान दुकानांतून घ्याव्या लागत नाहीत, आम्ही कसे दिवसभर उन्हा तान्हात राबत असतो, आमचे छंद

    कसे रगेल, रंगेल आणि मर्दानी आहेत, हे वर्णन प्रामुख्याने येतं. त्यात गावाकडची माणसं म्हणजे हट्टी कट्टी. मग शहरी चाकरमान्यांच्या

    जीवनशैलीचा, त्यांच्या नाजूकपणाचा उपहासानं उल्लेख करणं ओघाने आलंच. शहरी बाबू चकचकीत बूट घालून, झकपक कपडे करून, सुबकशा गाडीत

    बसून भले मोठ्या अद्ययावत इमारतीमधे कामासाठी जात असेल पण त्याला गवताचे भारे उचलून ट्रकवर टाकता येतील का? किंवा एखाद्या नाठाळ

    खोंडाला दोरीचा फास टाकून जेरबंद करता येईल का? किंवा लाकडाचे मोठाले ओंडके फोडून शेकोटीसाठी ढलप्यांची रास करता येईल का? अशी

    आव्हानात्मक तुलना असते. आणि मग त्यातूनच, एकंदरीत शहरी स्त्रियांना देखील आमच्यासारखे गावरान मर्दानी पुरुषच जास्त आवडतात असं सूचित

    केलं जातं.

    कंट्री म्युझिकमधे राहून राहून येणारा दुसरा विषय म्हणजे धार्मिकता. तसे गावाकडले लोक शहरवासियांपेक्षा अधिक धार्मिक, जुन्या वळणाचे, रूढी

    परंपरा जपणारे, अगदीच कर्मठ नसले तरी बरेचसे सनातनी मताचे. त्यामुळे चर्चचा आयुष्यावर मोठाच प्रभाव. त्यातून चर्च म्हणजे नुसतं ठेवणीतले

    कपडे घालून रविवारी किंवा प्रसंगवशात डोकं झुकवायला जाण्याचं ठिकाण एवढंच नाही. गावाकडल्या लोकांच्या आयुष्यात चर्च म्हणजे जीवनाचं एक

    अविभाज्य अंग. चर्चचं अस्तित्व दैनंदिन जीवनाला सर्वस्वी व्यापून उरलेलं. ‘आम्ही गाववाले आणि आमची एक ओळख म्हणजे चर्चचं आमच्या

    जीवनात असलेलं स्थान’, एवढाच उल्लेख करून कंट्री म्युझिक थांबत नाही. कंट्री म्युझिकच्या सुरावटीतून व्यक्त होताना, चर्च हे केवळ दैनंदिन,

    सामाजिक नित्यकर्मांचं स्थान न रहाता ते अधिक गहिरं होत जातं. येशुचं बलिदान, त्याची करुणादायी मूर्ती, त्याच्या पायाशी शरण जाता सर्व पापांतून

    मिळणारी मुक्ती, या सार्‍यांवरची नितांत श्रद्धा कंट्री म्युझिकमधे पाझरत असते.

    -- डॉ. संजीव चौबळ

      July 18, 2016


  • मुंबई-पुणे: रेल्वे प्रवास

    १८५३ मध्ये मुंबई ठाणे रेल्वे सेवा सुरू झाली तरी पुणं गाठणं कठीणच होतं. याचं कारण होतं, मधला अजस्र खंडाळा घाट. त्या काळात बग्गीतून किंवा घोड्यावर बसून मुंबई-पुणे प्रवास ३-४ दिवसांत पुरा केला जाई. सन १८३१ मध्ये मुंबई-पुणे पत्रं पाठविण्याची पोस्टाची सोय होती. या प्रवासास ४८ ते ७२ तास लागत. घोडे व बैलगाड्यांच्या मदतीनं भारतभर पत्रे पाठविण्याची सोय असे. त्यांना काही महिने लागत.

    हळूहळू मुंबई ते कंपोली (खोपोली) व पुणे ते खंडाळा अशी रेल्वेसेवा सुरू झाली. मधला घाटाचा प्रवास तहूने केला जात असे. या संपूर्ण प्रवासाचं भाडं असं होतं.

    • पुणे ते खंडाळा १० ।। आणे
    • खंडाळा ते खोपोली, तट्टू १२ आणे
    • खोपोली ते मुंबई १८ आणे

    हा प्रवास म्हणजे एक दिव्यच असे. यावर एक आर्याही प्रसिद्ध झाली होती.
    १४ जून १८५८ मध्ये पुण्यातील 'ज्ञानप्रकाश' अंकात मुंबई पुणे आगगाडीच्या प्रवासाविषयी एक बातमी छापण्यात आली होती. ती बातमी अशी होती: 'आमचे वाचणारास आगीच्या गाडीचा रस्ता पुण्यापासून खंडाळ्यापर्यंत सुरू होणार या विषयी आशा देता देता आम्ही थकलो व आमचे लिहिणे वाचतांना कंटाळा आला असेल असे वाटते, परंतु आज रोजी आगीची गाडी पुण्याहून खंडाळ्यापर्यंत सुरू होणार आहे. अद्यापि दर, दाम यांचे जाहिरनामे, वगैरे काही एक व्यवस्थेचा प्रकार प्रसिद्धीस आला नाही, पण पुण्याहून आगीची गाडी सकाळी साडेसहा वाजता व सायंकाळी साडेतीन वाजता निघत जाईल येवढे मात्र तूर्त कळले आहे.'

    'चाऊ चाऊ' या पुस्तकाच्या लेखिका लेडी फॉक्लंड यांनी लिहिले आहे, 'पुण्यातील एका प्रवाशाने कंपनीला लिहिले, की हिंदू सोडता इतर धर्मांच्या व्यक्तींन शिवाशिवीच्या भीतीमुळे मी गाडीत बसू शकत नाही, आपल्यासाठी गाडीत १..ळे बसण्याची व्यवस्था करावी.' रेल्वेने या मागणीचा साफ इन्कार केला; तेव्हापासूनच रेल्वेत जातपातीला मुठमाती मिळाली.'

    खंडाळा घाटाची यशस्वी बांधणी १८७५ पर्यंत पूर्ण होऊन, १८८० पासून मुंबई-पुणे धुराची गाडी ८ तासांत हे अंतर कापू लागली. हा प्रवास देशातील सर्वोत्कृष्ट प्रवासातील एक म्हणून मानला जाऊ लागला . भारतीय रेल्वे इतिहासातील बांधलेला ' सर्वांत अवघड मार्ग ' म्हणून या मार्गाची जगात प्रसिद्धी झाली . थोड्याच वर्षांत रेल्वेची डेक्कन क्वीन ( दख्खनची राणी ) ही गाडी या मार्गावर दिमाखात धावू लागली . कवि वसंत बापटांनी यावर ' दख्खनची राणी ' ही सुरेख कविता लिहिली . नुकतेच दख्खनच्या राणीने ८७ व्या वर्षांत पर्दापण केलं . चित्तरंजन कारखान्यात बनलेलं इलेक्ट्रिक इंजिन ' लोकमान्य ' नावाने डेक्कन क्वीनला लागत असे . संपूर्ण दक्षिण भारत मुंबईशी या रेल्वेमार्गांनं जोडला गेला . आज या मार्गावर १०० ते १२५ प्रवासीगाड्यांची २४ तास ये जा चालू असते . आता हे अंतर इंटरसिटी एक्सप्रेस फक्त पावणे तीन तासात पार करते . थोड्याच वर्षांत एका तासाच्या आत हे अंतर कापले जाण्याकरता महत्त्वाकांक्षी योजना आखलेल्या आहेत . भारतीय रेल्वेच्या इतिहासात हा मार्ग म्हणजे मानाचा मुकुट आहे.

    -–डॉ. अविनाश वैद्य

      November 9, 2022