(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जागतिक पुस्तक दिवस

    आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढले आहे. ती गोष्ट सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, कंप्युटर, चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबल्यात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळेनसा झाला आहे.

      April 23, 2022


  • अपरिचित इतिहास

    अपरिचित इतिहास

    शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरी सकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एका मुघल सरदारास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंद मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले.मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तमाम लोक पकडून आणून कापले गेले. नाईकास निर्वंश केले आणि सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरे कापली गेली. त्या शिरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीत त्या वीरांची नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्ध नाही. खेमा/खेमू नाईक असा त्या नेत्याचा उल्लेख फक्त काही ठिकाणी आढळतो.

    महादेव कोळ्यांचा शिवनेरीवर संहार

    पुणे परिसरातील शिवरायांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला.

    ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला. मुघलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना पस्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.

    शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्या मुघल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.

    दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाईल.

    संदर्भग्रंथ

    • श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ६९९-७११
    • शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर, पृष्ठ ४३-४४

    © *शिवकालीन सत्य इतिहास ग्रुप*

    jiRaje.co.in/

      November 6, 2016


  • अनंत चतुर्दशी

    हे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला करतात. हे व्रत काम्य आहे. याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. गतवैभव परत मिळवण्यासाठी हे व्रत सांगितले आहे.

      September 26, 2012


  • आजचा आरोग्य विचार – भाग चौतीस

    आहारामधे फळांचा वापर करावा. आहारानंतर फळ नको किंवा आहाराऐवजी फलाहार करावा. आज जेवणानंतर फळे खायची प्रथा पडली आहे. फळे पचायला जड असतात. जे पदार्थ पचायला जड ते अग्नि प्रखर असतानाच म्हणजे भूक कमी होण्याअगोदरच संपवावे.

      March 6, 2018


  • मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ५

    ऑगस्‍ट १७६० मधील परिस्थिती मराठ्यांना दिल्‍लीपती बनण्‍यासाठी अनुकूल नव्‍हती. स्‍वारीस निघाल्‍यापासून भाऊने सर्व राजेरजवाड्यांना या स्‍वारीत मराठ्यांना येऊन मिळण्‍याविषयी पत्रे पाठवली होती. अब्‍दालीशी लढायला आल्‍यावर आणि त्‍यासाठी हिंदुस्‍थानातील राजे व नबाब यांची मदत मागितल्‍यावर आणि स्‍वतः अब्‍दालीचा यमुनेपलीकडील धोका लक्षात घेतल्‍यावर, मराठ्यांना त्‍यावेळी दिल्‍लीपती कसे होता आले असते ?

      March 13, 2019


  • छत्रपतींच्या रणनितीचा वापर करुन देशासमोरची आव्हाने कमी करा

    देशप्रेम ही केवळ सोयीने वापरण्यापुरती किंवा, पोलिसांवर, लष्करांवर सोपविलेली गोष्ट नसावी. आज आपला देश सुरक्षित आहे का? त्यासंदर्भात देशासमोर कोणती आव्हाने आहेत आणि छत्रपतींच्या रणनितीचा वापर करुन ही आव्हाने कमी करु शकतो का? याचा विचार केला पाहिजे.

      March 3, 2018


  • थोडा वेळ द्या हृदयासाठी..

    आपल्या सगळ्यांच्याच धकाधकीच्या जीवनशैलीचा मोठा परिणाम होत आहे तो आपल्या हृदयावर. म्हणूनच आपल्या हृदयासाठी आपण एकदा थांबून शांतपणे विचार करायला हवा, तोही हृदयापासून..

    हृदयविकाराचे प्रमाण भारतात झपाटय़ाने वाढत आहे. जर हे प्रमाण असेच वाढत राहिले तर २०२० मध्ये भारतात सर्वात अधिक हृदयविकाराचे रुग्ण असतील. भारतात कारोनरी आर्टरी या आजाराचे प्रमाण पूर्वी १९६० साली ४ टक्के होते आणि आता ते ११ टक्के इतके वाढले आहे. पूर्वी हा आजार वयस्कर व्यक्तीमध्येच आढळत होता. त्याचे प्रमाण ३० ते ४० वर्षे वयाच्या तरुणांमध्ये आता झपाटय़ाने वाढत आहे. उच्च रक्तदाबाचे प्रमाण १९५० साली जवळपास १ ते ३ टक्के होते, पण तेच आता १० ते ३१ टक्के इतके वाढलेले आहे. भारतात दरवर्षी लाखो हृदयविकारच्या आजाराने बळी पडतात. हे सर्व टाळण्यासाठी हा आजार का होतो, त्याची उपचारपद्धती काय आणि ते टाळण्याचे उपाय काय हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

    हृदयविकार
    हृदय हे स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. ते सतत आकुंचन-प्रसरण पावत असते. या स्नायूंना ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात, त्या रक्तवाहिन्यांना ‘कोरोनरी’ धमनी म्हणतात आणि जर या कोरोनरी धमन्यामध्ये अवरोध निर्माण झाला तर हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होऊ लागतो, त्यावेळी रुग्णाला ‘हृदयविकार’ आहे असेही म्हणतात. हृदयात रुग्णाला थोडे काम केल्यावर छातीच्या मध्यभागी दुखणे, छाती भरून येणे, डाव्या हातामध्ये दुखणे, दम लागणे, छातीमध्ये धडधड होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. या छातीतील दुखण्याला ‘अंजायना’ (हृदयशूळ) म्हणतात.

    मधुमेह असलेल्या रुग्णाला कदाचित छातीत वेदना होणार नाहीत, अशा रुग्णाला दम लागणे, थोडेच काम केल्यावर थकवा येणे, कमजोरी वाटणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. जेव्हा कोरोनरी धमनीतील अवरोध हा शंभर टक्के होतो. (१०० टक्के BLOCK) तेव्हा रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो. त्यावेळी छातीत तीव्र वेदना होणे. दरदरून घाम येणे.. भोवळ येणे.. दम लागणे.. असा त्रास होतो. कधी कधी हृदयविकारच्या तीव्र झटक्यामुळे ताबडतोब मृत्यूसुद्धा होऊ शकतो. या सर्व आजारांना हृदयविकार असे म्हणतात. हृदयविकार टाळण्यासाठी खालील बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

    * हृदयविकाराचे निदान करणे.
    * धोक्याची घटके ओळखणे.
    *धोक्याची घटके टाळण्याचा प्रयत्न करणे.
    * औषधोपचार करणे.
    * नवीन तंत्राचा उपयोग करून हृदयविकाराचा उपचार करणे.
    * अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करणे.

    हृदयविकाराचे निदान : हे सर्व टाळण्यासाठी या आजाराचे लवकर व योग्य निदान होणे आवश्यक आहे. हृदयरोगतज्ज्ञ (काíडओलॉजिस्ट) रुग्णांची संपूर्ण तपासणी केल्यानंतर हृदयाच्या काही विशिष्ट टेस्ट करायला सांगतील. त्यात ई.सी.जी, हृदयाची सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट किंवा थॅलियम यांचा समावेश होतो. या सर्व नॉन इन्वेसिव्ह टेस्ट असून यात हृदयविकाराचे निदान होण्याची शक्यता ८० ते ९० टक्के आहे, पण सर्वात महत्त्वाची व शंभर टक्के निदान करणारी गोल्ड स्टॅण्डर्ड टेस्ट आहे. ‘कोरोनरी अॅन्जिओग्राफी.’ हृदयरोगाचे निदान करण्याचे, त्याची तीव्रता, प्रमाण, विस्तार बघण्याची एकमेव तपासणी म्हणजे ‘कोरोनरी अॅन्जिओग्राफी. अत्यंत सुरक्षित, सोपी व १०० टक्के निदान देणारी तपासणी.!

    तज्ज्ञ हृदयविशारदाकडून ही तपासणी १० ते १५ मिनिटांत होते. रुग्णाच्या मांडीच्या आर्टरीमधून एक छोटीशी पोकळ नळी १.५ मि. मी. व्यासाची, हृदयाच्या कोरोनरी धमनीपर्यंत नेण्यात येते. मॉनिटरवर याचे एक्स-रे स्कॅनिंगद्वारे चित्रण चालू असते. आणि दुसऱ्या मॉनिटरवर रुग्णाचे रक्तदाब, हार्ट रेट (स्पंदन), ई. सी. जी, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण हे सर्व काही दिसत असते. तीन तासांच्या विश्रांतीनंतर रुग्णाला सुट्टी करण्यात येऊ शकते. ही प्रक्रिया एकंदरीत अत्यंत सुरक्षित असून शंभर टक्के निदान करणारी आहे.

    धोक्याचे घटक
    हृदयविकाराचे निदान झाल्यानंतर त्याचे धोक्याचे घटक ओळखणे जरुरी आहे.
    वय : वाढत्या वयानुसार हृदयविकाराचे प्रमाणसुद्धा वाढते. वयाच्या ५५ ते ६० वर्षांनंतर हे प्रमाण अधिक असते. पण आता मध्यम वयामध्येसुद्धा हे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. वाढत्या वयानुसार रक्त वाहिन्यांमध्ये कठिणीकरणाची प्रक्रिया होत असते, म्हणून हे प्रमाण वाढत्या वयानुसार वाढते.
    लिंगभेद : पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हे प्रमाण कमी असते. स्त्रियांमधील ईस्ट्रोजन नावाचा आंतरिक स्राव हा हृदयविकार टाळण्यास मदत करतो. पण जेव्हा स्त्रीची मासिक पाळी थांबते, तेव्हा या स्रावाचे प्रमाण कमी होते आणि अशा स्त्रियांत हृदयविकाराचे प्रमाण पुरुषांप्रमाणेच असू शकते.
    आनुवंशिकता : हृदयविकाराचा आजार बऱ्याच प्रमाणात आनुवंशिक आहे. आईवडिलांना हा आजार असेल तर मुलांना तो होण्याची शक्यता दाट असते.
    धूम्रपान : हा सर्वात मोठा धोक्याचा घटक आहे. तंबाखूमध्ये चार हजार धनरूप किंवा वायूरूपात असणारी रसायने असतात. कार्बन, कार्बन मोनॉक्साईड आणि निकोटीन हे पदार्थ हृदयाला हानीकारक असतात. त्यांनी रक्तदाब वाढतो. रक्तवाहिन्या कठीण होण्यास सुरुवात होते आणि रक्तवाहिन्यांतील अवरोध वाढू लागतो. हृदयाची ऑक्सिजनची आवश्यकता वाढते. निकोटीनमुळे रक्तवाहिन्यांच्या अवरोधामध्ये तडे जाऊन तेथे रक्ताच्या गुठळ्या जमा होण्यास मदत होते. त्यामुळे हार्ट अॅटॅक येऊ शकतो. धूम्रपानामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे दम लागतो. जगात जवळपास १० लाख लोक धूम्रपानामुळे दरवर्षी मरतात.
    मद्यपान : मद्यपानामुळे स्नायूंचे आजार होतात. हृदयाच्या पेशींच्या सेल्युलर पातळीवर दुष्परिणाम होऊन हृदयपेशींची कार्यक्षमता कमी होते. मद्यामुळे हृदयाची लय आणि गती बिघडू शकते.

    हृदयविकार टाळण्यासाठी
    * आहारात योग्य तो बदल करणे.
    * व्यायाम करणे.
    * योगा- मेडिटेशन करणे.
    * औषधोपचार करणे.
    *अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करणे.

    आहार
    संपूर्ण शाकाहार हा आरोग्यदायी आहे.
    रोजच्या आहारातून मिळणाऱ्या उष्मांकांपैकी १० टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी उष्मांक स्निग्ध पदार्थामधून आलेले असावेत. कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ वज्र्य करावेत. अगदी स्निग्धांशविरहित मध्ये थोडंसं कोलेस्टेरॉल असतं. संपृक्त स्निग्धांश जवळजवळ वज्र्य करावेत. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याच्या दृष्टीनं उपयुक्त असलेले कांदा, लसूण, गाजर, वांगी, सोयाबिन, स्किम्ड मिल्क, दुधाचं दही, सफरचंद इतर नेहमी आहारात ठेवावे.

    कच्चे पदार्थ शक्यतो जास्त खावे. कोबी, फ्लॉवर, गाजर, मुळा, कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, कोवळी भेंडी, पालक, मेथी, लेटय़ूस अशा भाज्या, मोडाची कडधान्ये, भिजवलेल्या डाळी, वेगवेगळी फळे भरपूर खावीत.
    चहा, कॉफीचा अतिरेक टाळावा.

    मांसाहार टाळावा. मटन-चिकन टाळावे, अंडय़ातील पिवळा भाग टाळावा. दुधाचे पदार्थ : मलई, तूप, लोणी, चीज, पनीर, मिठाई शक्यतो टाळावे. मिताहारी असावे.

    चायनीज पदार्थ, तळलेले पदार्थ, पिझ्झासारखे पदार्थ, मैद्याचा अतिरेक टाळावा.
    आहारात तंतुमय पदार्थाचे प्रमाण पुष्कळ असावे.

    मीठ आणि साखर आहारात कमी प्रमाणात वापरणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असते.
    खाल्ल्यानंतर ताबडतोब झोपू नये. थोडी शतपावली घ्यावी.

    उपवास टाळावे. सकाळी व्यवस्थित न्याहारी करावी, पण दुपारचे आणि रात्रीचे जेवण मात्र हलकेच घ्यावे. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यामध्ये योग्य अंतर ठेवावे. त्या वेळा नियमितपणे पाळणे.

    व्यायाम
    भरपूर व्यायाम करावा. भराभरा चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवावी यासारखा व्यायाम जितक्या वेळा सहन होईल तोपर्यंत करावा. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी व्यायामाचा वेळ आणि प्रकार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावा. शरीरांतर्गत ऊर्जा दीर्घकाळासाठी, पण प्रमाणशीरपणे आणि योग्य गतीने वापरली जाते त्याला एरोबिक व्यायाम असे म्हणतात. असे व्यायाम हृदयविकार टाळण्यास मदत करतात. योगासने करावीत.

    योगा-मेडिटेशन
    मानसिक आणि शारीरिक आरोग्य मिळवून देणारा उत्तम मार्ग म्हणजे योगा-मेडिटेशन. यात प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी (मेडिटेशन) आणि यम, नियम, योगासने, प्राणायाम यांचा समावेश होतो. अशांत मन शांत करण्याचा हा योग्य मार्ग आहे. या सर्व गोष्टींमुळे जीवनात उत्साह वाढू लागतो. जीवनातील नकारात्मक दृष्टिकोन बदलतो. ही भावना फार महत्त्वाची असते. यामुळे जीवनातील ताणतणाव, स्ट्रेस कमी होऊन रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

    कोरोनरी अॅन्जिओप्लास्टी
    कोरोनरी अॅन्जिओग्राफी या तपासणीमध्ये जर कोरोनरी आर्टरीला अवरोध असल्याचे निदर्शनास आले, या अवरोधाची ट्रीटमेंट म्हणजे प्रत्येक वेळी बायपास सर्जरीच करावी लागते, असे नाही. गेल्या १५ वर्षांपासून कमी त्रासदायक, कमी विच्छेदन लागणारी औषधोपचार पद्धती विकसित झाली असून तिचे नाव ‘कोरोनरी अॅन्जिओप्लास्टी’. अवरोध हा मुख्यत: चरबीनी बनलेला असल्यामुळे ह्य बलूनद्वारे दाबला जातो व आर्टरी पूर्ववत होऊ शकते. ज्या ठिकाणी आर्टरीमध्ये अवरोध आहे त्या ठिकाणी आधी बलून अॅन्जिओप्लास्टी केली जाते; त्यानंतर अवरोधाच्या आकारमानाप्रमाणे आणि रक्तवाहिनीच्या आकाराप्रमाणे स्टेंट निवडला जातो आणि बलून अॅन्जिओप्लास्टीप्रमाणेच त्या ठिकाणी स्टेंट बसवण्यात येतो. ह्य प्रक्रियेला अॅन्जिओप्लास्टी विथ स्टेंट असे म्हणतात.

    अॅन्जिओप्लास्टीचे फायदे
    अॅन्जिओप्लास्टी ही औषधोपचार पद्धती अत्यंत सुरक्षित व कमी वेळात होणारी आहे. (अर्धा तास) ह्यत कुठेही चिरफाड करण्याची आवश्यकता नसते, ना भूल देण्याची आवश्यकता असते. रुग्ण हा पूर्ण वेळ शुद्धीवर असतो, त्यामुळे जनरल अॅनेस्थेशिया देण्याचे जे धोके असतात, ते टाळता येतात. मुख्यत: वयस्कर लोकांमध्ये ही फारच उपयोगाची गोष्ट आहे. ज्यांना हृदयविकारावर सोबत बाकी आजारसुद्धा आहेत, उदा. दम्याचे विकार, किडनीचे आजार, हाडांचे आजार किंवा फार वयस्कर अशा लोकांना बायपास सर्जरीचा किंवा ४-६ तास अॅनेस्थेशियाचा त्रास होऊ शकतो अशा रुग्णांना अॅन्जिओप्लास्टी वरदान ठरू शकते. बायपास सर्जरीमध्ये लावण्यात आलेल्या ग्राफ्टमध्ये जर अवरोध निर्माण झाला तरी त्याचीसुद्धा अॅन्जिओप्लास्टी करता येते. त्याला ‘ग्राफ्ट अॅन्जिओप्लास्टी’ असे म्हणतात.

    रुग्ण फारच सिरिअस असेल, शॉकमध्ये असेल किंवा हार्ट अटॅकमुळे त्याचा रक्तदाब कमी झाला असेल अशा वेळी ज्या आर्टरीमुळे हार्ट अटॅक आला आहे, त्या आर्टरीची अॅन्जिओप्लस्टी केल्यास रुग्ण वाचू शकतो किंवा त्याचा रक्तदाब स्थिर होऊ शकतो. ज्यांना एक किंवा दोनच आर्टरीमध्ये मर्यादित अवरोध आहे त्याना अॅन्जिओप्लास्टी फार उपयोगी असते. तरुण रुग्णांवर सहसा अॅन्जिओप्लास्टी करण्यात येते. बायपास सर्जरी टाळता येत असल्यास टाळावी किंवा लांबवावी.

    बायपास सर्जरी
    जर कोरोनरी आर्टरीमध्ये अवरोधाचे प्रमाण जस्त असल्यास किंवा मुख्य कोरोनरी आर्टरीला जर अवरोध असल्यास किंवा विभाजन होणाऱ्या दोन आर्टरीच्या उगमावर जर अवरोध असल्यास बायपास सर्जरी करणे योग्य आहे.

    हृदयरोग टाळण्यासाठी
    दररोज सकाळी योग्य असा व्यायाम करावा. ह्य व्यायामाचे स्वरूप हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरकडून आखून घ्यावे. डॉक्टर रुग्णाच्या वयाप्रमाणे, वजनाप्रमाणे आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवरून त्याच्या व्यायामाचे स्वरूप ठरवतात. सकाळी उठून वेगाने चालण्याचा व्यायाम हा सर्व वयाच्या लोकांसाठी चांगला आहे.

    आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा. वजन आणि कमरेचा घेर कमी करावा. ह्यासाठी आहारात योग्य तो बदल करावा. आनंदी राहा. मानसिक शांतता व स्थैर्य याचा हृदयरोग्यांना उत्तम फायदा होतो. त्यासाठी ध्यान- धारणा, योगा ह्य गोष्टीचा उपयोग करावा. योग्य वेळी आणि शांत झोप शरीराला आवश्यक असते म्हणून रात्री ७ ते ८ तास छान झोप घ्यावी. धूम्रपान टाळा, तंबाखूचे सेवन बंद करा. मद्यपान टाळा. जेवणात मिठाचे आणि मसाल्यांच्या पदार्थाचा वापर कमी करावा. संताप, चिडचिड, वैताग, मत्सर, द्वेष, निराशा यांना सोबत वागवू नका. सामाजिक असहिष्णुता व एकाकी राहणे टाळा. आपला रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवणे, नेमाने वैद्यकीय तपासणी करा अणि डॉक्टरचा सल्ला घ्या.. तो पाळा. आहार, विहार, आचार, विचारात योग्य तो बदल करून आपलं आरोग्य आणि शरीर निरोगी ठेवा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. लोकसत्ता / डॉ. गजानन रत्नपारखी

      February 2, 2017


  • गंधर्व नाटक मंडळी’चा स्थापना दिन

    चित्रपटांच्या उदयाच्या कालखंडातही संगीत नाटकांचा प्रेक्षक कायम ठेवून सर्वोत्तम सादरीकरणाचे व्रत त्यांनी अखंड जोपासले. त्यामुळे, गंधर्व नाटक मंडळीचा दबदबा राज्यासह इतर भागांतही पसरला होता. नेपथ्य, सजावट, वेशभूषा, रंगभूषा, पात्रयोजना, साथीदार आणि त्यांची वाद्ये अशा संगीत नाटकासाठी पूरक स्वतंत्र विभागांच्या रचनेस गंधर्व नाटक मंडळीपासूनच सुरुवात झाली.

      July 5, 2021


  • जाहिरातींचे मायाजाल

    जो खोटे बोलतो तो सर्वात मोठ्याने ओरडून सांगतो, हा मानसिकतेचा नियम आहे. चोवीस तास टीव्ही व रेडिओ वर साबण, तेल, सुंदर दिसण्याची क्रीम, शीतपेय, टूथपेस्ट, यांच्या हास्यास्पद जाहिराती आपल्याला दाखवतात यातून आम्ही काय बोध घ्यावा हेच समजत नाही.

    आजकाल हिंदी चित्रपटातील हिरो शितपेयातील जाहिरातीत सुपरमॅन सुद्धा न करू शकणारे स्टंट करून दाखवतात व शेवटी शीतपेय पिताना दाखवतात, आहे कि नाही कमाल? आम्ही सामान्य लोक असली पेय पिऊन हे उद्योग खरच करू शकणार आहोत का? या पेयात अदभूत शक्ती देणारी रसायने असतात का? यातील एक तरी पेय शरीराला व पचनसंस्थेला मदत करणारे आहे का? हि आमची फसवणूक नाही का? बरं यातून सरकार कराच्या रुपात गडगंज संपत्ती मिळवते असेही नाही. यातील दोन कंपन्या परदेशी आहेत, ज्या आपल्याला मूर्ख बनवतात. कधी कधी वाटते, कदाचित आपण मूर्ख आहोच, हे लोक आपल्याला ते सिद्ध करून देतात इतकेच. तसे नसते तर ह्या कंपन्या असली कुचकामी पेय विकत आपल्या देशात कॅन्सर सारख्या फ़ोफ़ावल्या नसत्या.

    असेच उदाहरण साबणाचे व क्रीमचे आहे, मी जेव्हापासून समजायला लागले आहे, तेव्हापासून गोरेपणाच्या साबणाच्या व क्रीमच्या जाहिराती पाहतो आहे, हे जर खरे असते तर भारत सोडाच, आफ्रिका सुद्धा गोरगोमट्यांचा खंड दिसला असता असे नाही का वाटत? बरं या साबणाने अंग स्वच्छ होते असेही नाही, हा हि खोटा आभास आहे. मुळात आपल्या शरीरावर असणारे जंतू जेव्हा मेलेल्या पेशींवर ताव मारतात, त्यातून दर्प किव्वा वास येतो, या साठी कोणतेच साबण मदत करत नाही. जर अंग खरबरीत उटणे वापरून घासले तर मेलेल्या पेशी गळून जातात, व अंग स्वच्छ होते, मग हि महागडी साबणे घेण्याची गरज काय? आजकाल या विदेशी कंपन्यांना तोडीसतोड, आमचे देशी बाबा सुद्धा असली साबणे विकायला अग्रेसर झाले आहेत. यात फरक इतकाच, पैसा परदेशात जाणार नाही, पण अंग स्वच्छ होण्याचे काय?

    दात साफ करण्यासाठी नामांकित कंपनीने पूर्वी आम्हाला सांगितले कि कोळसा, मीठ याने दात खराब होतात, तीच कंपनी, जाहिरातीत, क्या आपके टूथपेस्ट में नमक है, असे म्हणणारी ललना धाडकन एका घराचा दरवाजा उघडून येऊन विचारते, असे दाखवतात, असे वागणे मुळात शोभते का? हाच माझा खरा मुद्दा आहे. असो

    काही दिवसापूर्वी मला दाढ दुखीमुळे डॉक्टरांच्याकडे जाण्याचा प्रसंग आला, त्यांनी स्पष्ट सांगितले, आक्रोड, बदाम दाताने फोडण्याच्या कला तुम्ही चुकूनसुद्धा दाखवू नका, जाहिरातीत दाखवतात ते अतिशयोक्ती असते. असे केल्याने दात तुटू शकतो, किव्वा हिरड्यांना गंभीर इजा होऊ शकते. जगातला एकही दातांचा डॉक्टर असले उद्योग करा याला संमती देणार नाही. केवळ त्यांच्या भूलथापांना आपण बळी पडावे हाच एकमेव हेतू या जाहिरातीतून असतो.

    सिनेमाला जसा सेन्सॉर बोर्ड असतो तसा या जाहिरातीसाठी नसतो का????? यांना पण जाहिरातीत स्टार( * ) करून अटी व शर्ते लागू किव्वा, जाहिरातीत दाखवलेले खरे नाही, असल्यास निव्वळ योगायोग समजावा... सारखी ओळ बंधन कारक करायला हवी.

    रोल्स रॉईस ने कधीही जाहिरात केली नाही. ज्यांच्या वस्तू उत्कृष्ठ असतात त्यांना अश्या जाहिराती करायची गरज नसतेच. लोकांना माहित होण्यासाठी, नवीन वस्तू पहिल्यांदाच बाजारात विकायला आणली असेल तर सुरवातीला ठीक आहे, पण एकदा नाव मिळवल्यावर काहीच गरज नसते. व्यर्थ पैसा जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा सर्वाना परवडेल अश्या रास्त किमतीत वस्तू विका.

    ग्राहक राजा जागा हो,

      March 20, 2017


  • श्री मीनाक्षीस्तोत्रम् – ४

    ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते प्रेतासनान्तस्थिते
    पाशोदङ्कुशचापबाणकलिते बालेन्दुचूडाञ्चिते ।
    बाले बालकुरङ्गलोलनयने बालार्ककोट्युज्ज्वले
    मुद्राराधितदैवते मुनिसुते मां पाहि मीनाम्बिके ॥ ४ ॥

    आई जगदंबेच्या दिव्य वैभवाचे वर्णन करतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते - ब्रह्म म्हणजे श्रीब्रह्मदेव, ईश म्हणजे श्रीशंकर तथा अच्युत म्हणजे श्रीविष्णू यांच्याद्वारे अखंड जिच्या चरित्राचे गायन केल्या जाते अशी.

    प्रेतासनान्तस्थिते- भगवान महाकाल निश्चल स्वरूपात स्थिर रहात असल्याने त्यांना प्रेत म्हणतात. त्या महाकालाला आसन करून त्यावर बसणारी.

    पाशोदङ्कुशचापबाणकलिते- पाश म्हणजे दोरी, उद्ङ्कुश म्हणजे वरच्या बाजूला टोक असलेला अंकुश, चाप म्हणजे धनुष्य आणि बाण अशी आयुष्य हातात धारण करणारी.

    बालेन्दुचूडाञ्चिते- बाल इंदू म्हणजे चंद्राची कोर. चुडा अर्थात केसांचा वरचा भाग. च्या मस्तकावर चंद्रकोर धारण केल्याने अतिव सुंदर दिसणारी.

    बाले- काय अंभाल स्वरूपात निरागस दिसणारी. बालकुरङ्गलोलनयने- कुरंग म्हणजे हरिण. बालक कुरंग म्हणजे हरणाचे पिल्लू. त्याच्या नेत्राप्रमाणे चंचल नेत्र असणारी. सामान्य हरणाचे नेत्र देखील चंचल असतात. लहान बालक कधी चंचल असल्याने त्याचे नेत्र तर जास्तच चंचल असतात, हा भाव. बालार्ककोट्युज्ज्वले- कोट्यावधी बालार्क अर्थात उगवत्या सूर्याप्रमाणे तेजपुंज असणारी.

    मुद्राराधितदैवते- उपासनेमध्ये हाताच्या बोटांच्या ज्या विविध रचना केल्या जातात त्यांना मुद्रा असे म्हणतात. या मुद्रांमध्ये जगदंबेच्या उपासनेत देवी मुद्रा ,योनी मुद्रा इ.चा प्रयोग केला जातो. त्या मुद्रांच्या द्वारे जिची उपासना होते अशी.

    मुनिसुते- विविध ऋषी-मुनींनी उपासना केल्यानंतर वरदान स्वरूपात आई जगदंबेने त्यांच्या आश्रमामध्ये अवतार धारण केल्याच्या अनेकानेक कथा देवीभागवत, मार्कंडेयपुराण इत्यादी ग्रंथात आलेल्या आहेत. या अवतारांच्या सापेक्ष रीतीने आई जगदंबेला मुनिसुता असे म्हटले आहे. तिला प्रार्थना आहे की,

    मां पाहि मीनाम्बिके- ही आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 28, 2020