वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अपारंपरिक पद्धतीत सौरऊर्जा, पवनऊर्जा, सागरीऊर्जा, भूऊर्जा इत्यादींचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो. यातील बहुतेक पद्धती या प्रदूषणापासून मुक्त आहेत.
June 15, 2023
“रामप्रसाद की तेरहवीं” पाहिला. काही दिवस आधी अशा कथेवर आलेला समांतर ” पग्लाईट (PAGGLAIT) पाहिला होता. एक मृत्यू आणि त्याभोवती तेरा दिवस मनाविरुद्ध फिरणारे कुटुंबीय, नातेवाईक ! त्यांच्यातील दऱ्या, वरवरची मलमपट्टी, अंतर्गत धुसफूस आणि अशा कर्मकांडात रस नसलेली (पण जबरदस्तीने ओढून आणलेली) नवी पिढी. मग ते तेरा दिवस जुनेपुराणे हिशेब चुकते करण्याकडे कल. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला “तेच तेच ” सांगणे, तोंडाला पदर धरून.
May 13, 2021
गेल्या काही दिवसांपासून न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराची चर्चा मोठ्या प्रमाणात गाजते आहे. कधी न्यायमूर्तींनी आपली संपत्ती घोषित करण्यावरून तर कधी एखाद्या न्यायमूर्तींकडे बेहिशेबी संपत्ती असल्याचे आरोप होतात. या बातम्यांमुळे जनमत बिघडत असतानाच देशाचे माजी कायदेमंत्री अनेक न्यायाधिश भ्रष्ट असल्याची माहिती देऊन प्रतिज्ञापत्र दाखल करतात, तेव्हा एकूणच व्यवस्थेला हादरा बसल्याशिवाय राहत नाही.
September 27, 2010
प्रत्येक प्रदेशाची आपली एक ओळख असते. ही ओळख त्या प्रदेशाचे भौगोलिक स्वरूप, तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती, लोकांचे राहणीमान आणि अर्थातच काही वैशिष्ट्यांमुळे निर्माण होत असते. अर्थात प्रत्येकवेळी ही ओळख चांगली आणि कायमस्वरूपी असेलच असे नाही.
May 20, 2007
अतिदक्षता विभागात संगणकीकृत निरीक्षणे ठेवणे व तेथील रुग्णांच्या अतिमहत्त्वाच्या चाचण्यांवर सतत लक्ष ठेवणे हे आज आपल्या ओळखीचे आहे. परंतु अशा प्रकारचा अतिदक्षता विभाग असावा अशी कल्पना मांडून , त्याचे प्रारूप कर्कलीन यांनी सुचविले व आज जगभरात ते अंमलात येते आहे. या प्रारूपाच्या वापरामुळे रुग्णांची काळजी घेणे सुलभ झाले आहे. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत कमी झाली आहे व पर्यायाने कित्येकांना जीवदान मिळाले आहे.
March 31, 2019
अल् कायदा भारतात दहशतवादी कारवायांच्या मदतीने इस्लामिक राज्य उभे करण्याच्या तयारीत आहे, याची कल्पना ‘ब्रेकिंग इंडिया’ या पुस्तकाचे लेखक राजीव मल्होत्रा यांनी शेकडो पुराव्यानिशी ४ वर्षांपूर्वीच दिली होती. देशात जेहादी दहशतवादी, माओवादी यांनी परस्परांना मदत करून आपल्याला योग्य अशी भूमी वाटून घेतली आहे, असे त्यांनी पुस्तकात नमूद केले होते.
October 6, 2014
ठाणे जिल्ह्याची पत्रकारिता ही तब्बल दिडशे वर्षांची जुनी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ठाणे जिल्ह्याचे पहिले ज्ञात मराठी साप्ताहिक म्हणून ‘अरुणोदय’ वृत्तपत्राचा उल्लेख करावा लागेल. स्वातंत्र्य मिळण्याच्या ८१ वर्ष आधी आणि मुंबईत मराठी वृत्तपत्रांची सुरुवात झाल्यानंतर जवळपास ३४ वर्षांनी ठाणे शहरात पहिले वृत्तपत्र सुरू झाले. काशिनाथ विष्णू फडके यांनी हे पत्र सुरू केले. २२ जुलै १८६६ रोजी पहिला अंक प्रसिद्ध झाला.
March 20, 2022
ताठ बस. पोक काढू नकोस. बसल्यावर पाठीचा मणका ताठ हवा.'
'अरे असा काय चालतोस पोक्या सारखा? जरा छाती पुढे काढून चाल.'
'साधं जेवता येत नाही तुला. चार नव्हे पाच बोटांनी घास घे.'
'पुस्तकाला पाय लागला तर नमस्कार करावा,इतकी पण तुला अक्कल नाही?'
वरील वाक्ये कुणी कुणास म्हंटली असतील?
हे काही वेगळं सांगायची गरज नाही.
मुलांवर उपदेशांच्या सतत फैरी झाडणारे लढाऊ पालक तुम्हीही पाहिले असतील. पण..... असा उपदेशांचा आणि सूचनांचा सतत गोळीबार केल्याने मुले सुधारण्याऐवजी
जायबंदीच होतात.
उपदेशाचा आणि सूचनांचा अतिरेक झाला की त्याबाबतीत मुले कोडगी होतात. त्यांना त्याचे काहीच वाटेनासे होते.
'मोठ्या माणसांनी केलेली निरर्थक बडबड' इतकीच किंमत मुलांच्या लेखी त्याला उरते.
ह्यामुळेच मुलांच्या वर्तनात टिकाऊ स्वरुपाचा अपेक्षित बदल होणे,केवळ अशक्यच होते.
मुलांशी बोलताना,त्यांना विश्वासात घेऊन बोलावं. त्यांना काय जमू शकतं ह्याची त्यांना जाणीव करून द्यावी.
ह्यामुळे मुलांच्या वर्तनात होणारा बदल हा त्यांच्या स्वेच्छेने होतो आणि म्हणूनच तो कायमस्वरुपी राहतो!
.......................................
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पालकांसाठी गृहपाठ : आजूबाजूला मुले नसताना आरशासमोर ऊभे राहा. आरशात दिसणाऱ्या शहाण्या व्यक्तीला वरील उपदेश खटाखटा ऐकवा.
आता त्याला कसं वाटतं विचारा?
तरीही... आरशातला माणूस आनंदी वाटला तरच घरातल्या मुलांना हे सर्व ऐकविण्याची हिंमत करा!!
अन्यथा..............!
'चांगल्या पालकांना आरशातल्या माणसात, दिसतं मूल!' ही चिनी म्हण लक्षात ठेवा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-- राजीव तांबे
February 13, 2016
स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात ‘एक संपन्न प्रांत’म्हणून बिहारची ओळख होती. देशाच्या साखरेच्या उत्पादनाचा २५ टक्के वाटा, तांदूळ, गव्हाचे २९ टक्के उत्पादन होते. फळ-फळावळांचा ५० टक्के उत्पादनाचा वाटा बिहारचा ! ताग, कापड, तंबाखू उत्पादन करणारा गंगेच्या खोऱ्यातील प्रांत होता.
March 22, 2022
आपल्या भोवती जी ‘हवा ‘ आहे ती अनेक वायूंचे मिश्रण असते हे त्याने सर्वात प्रथम मांडल होत . त्यानं त्यासाठी खास ‘गॅस’ हे नाव वायूला सुचवलं होतं. त्यातही त्याने पुढे बरं संशोधन केलं होतं.हेल्मोटरच्या या संशोधन जीवनात त्याने जी बायोकेमिस्ट्रीची सुरुवात केली होती. ती नंतरच्या काळात अनेकांनी पुढे नेली. ती आजही पुढे सुरू आहे !
August 1, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti