(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्वाध्याय

    उपनिषदातील अनुशासनात ज्या अनेक आज्ञा केल्या आहेत त्यातील एक आहे ‘स्वाध्यायान्मा प्रमदः म्हणजे स्वाध्यायात प्रमाद ‘होऊ नये. यथास्थित स्वाध्याय घडावा यासाठी काही व्रतांचे आचरणही त्यात आलेले आहे. ऋत स्वाध्याय प्रवचने, सत्यं स्वाध्याय प्रवचने – इत्यादी, थोडक्यात सदाचरण, सत्यनिष्ठा, संयमित जीवन इत्यादींनी स्वाध्याय संपन्न असावा.

      April 30, 2024


  • विचारी बना

    शहरं स्मार्ट असून उपयोग नाही, तर शहरवासी स्मार्ट असावे लागतात. रस्ते व वाह्न स्मार्ट असली तरी ते वापरणारेही स्मार्ट असले पाहिजेत. तसच आहे गॅजेट्सचं. फोन स्मार्ट नसतो, तर तो वापरणारा स्मार्ट असावा लागतो. विचार प्रगल्भ करा. आपली गरज आहे वैचारिक श्रीमंतीची. तेव्हा ‘विचारी बना’ हा आपल्या सर्वांसाठी मंत्र आहे.

      March 7, 2019


  • जातीला लाथ? शक्य आहे, गरज आहे थोड्याश्या हिंमतीची

    आपण भारतीय, आपली इच्छा असो वा नसो, कुठल्या ना कुठल्या जातीशी संबंधीत असतोच. नव्हे ती आपली नकोशी असलेली आयडेंटीटीच आहे. आपण बहुतेक सर्वचजण जातीव्यवस्थेला नांवं ठेवतो, टिका करतो, प्रसंगी रस्त्यावरही उतरतो, पण वेळ येताच गपचूप जातीच्या आधारावर मिळणारे फायदे घेण्यातही सर्वात पुढे असतो.

      June 16, 2017


  • तंत्रविश्व – भाग ८ : उत्पन्नाचा पर्यायी स्रोत – शेअर मार्केट

    2020 आणि 2021 ही दोन वर्षे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरतील अशी वर्षे असणार आहेत.कोरोनाचे थैमान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विविध क्षेत्रातील अभूतपूर्व बदलाचे परिणाम अजून काही महिने तरी जाणतील असे चित्र आहे. समाजातील उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना याचे परिणाम फारसे जाणवले नाहीत ,परंतु मध्यमवर्गीय आणि हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला कोणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी उत्पन्नाचा दुसरा स्रोत म्हणून शेअर मार्केट करू पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.कुणी आर्थिक गरजेपोटी तर कोणी केवळ मित्र करतो म्हणून तर काही जण केवळ trend आहे म्हणून शेअर मार्केटमध्ये प्रवेश करतात. अशा वेळी योग्य मार्गदर्शन न घेतल्यामुळे किंवा अभ्यास अभावी फायद्यापेक्षा नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते.

    कोणतीही गोष्ट शिकण्याची एक विशिष्ट पद्धत असते, त्या पद्धतीने ती गोष्ट समजून घेऊन त्याचा व्यवस्थित अभ्यास केल्याने ती गोष्ट करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो, गरज असते योग्य मार्गदर्शन घेण्याची! येथे योग्य हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे कारण केवळ दोन-चार युट्यूब व्हिडिओ पाहून किंवा एक दोन लेख वाचून तुम्ही लगेच ट्रेडिंग करायला लागलात तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. अशावेळी शेअर मार्केट विषयी परिपूर्ण माहिती घेऊन त्याच्यातील धोके जाणून घेऊन या मार्गाचा अवलंब केल्यास इच्छित उत्पन्न मिळवता येते, अन्यथा अतिआत्मविश्वास विनाशाकडे घेऊन जातो.

    तुम्हीदेखील शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर पुढील काही मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

    1. बेसिक गोष्टी शिकणे

    मित्रांनो कोणत्याही गोष्टी 2 लेवल मध्ये शिकायच्या असतात, पहिली बेसिक लेवल असते तर दुसरी आडव्हान्स किंवा एक्सपर्ट लेवल असते.त्यांना आपण टप्पे देखील म्हणू शकतो. या गोष्टी शेअर मार्केट बाबतीत देखील लागू होतात. शेअर मार्केट मध्ये प्रवेश करू इच्छिणार्‍या कोणत्याही व्यक्तीला सुरुवातीला शेअर मार्केट विषयी प्राथमिक माहिती घेणे अतिशय आवश्यक ठरते, ही बेसिक लेव्हल पूर्ण केल्यानंतरच तुम्ही आत्मविश्वासपूर्वक ट्रेडिंग करू शकता. बेसिक लेवल एकदा क्लियर झाल्यानंतर आणि तुम्ही ट्रेडिंग करून आल्यानंतर आपोआपच तुम्ही ऍडव्हान्स लेवल देखील पूर्ण कराल.

    बेसिक गोष्टींमध्ये शेअर मार्केटची प्राथमिक ओळख, शेअर मार्केट विषयी सर्व संकल्पना, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विविध पद्धती, प्रत्येक पद्धतीचे फायदे तोटे, तांत्रिक बाबी यांसारख्या गोष्टी तपशीलवार समजून घेणे गरजेचे असते.

    शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी विविध स्रोत सध्या उपलब्ध आहेत, पुस्तके, ऑनलाईन कोर्स, यूट्यूब व्हिडिओ, विविध लेख, वेबसाईट अशा संमिश्र स्रोतांचा वापर बेसिक शिकण्यासाठी करणे योग्य ठरते.त्यामुळे माहितीची सत्यता देखील तपासता येते आणि शिकलेल्या संकल्पना अधिक पक्क्या होतील.

    2.पेपर ट्रेडिंग अथवा सिम्युलेटर ॲपचा वापर

    मित्रानो शेअर मार्केट विषयी बेसिक गोष्टी शिकल्यानंतर त्याची प्रात्यक्षिके देखील करणे गरजेचे असते,अशा वेळी प्रत्यक्ष अकाउंट काढून लगेच ट्रेडिंग करणे कदाचित नुकसानकारक ठरू शकते अशावेळी काही दिवस पेपर ट्रेडिंग करणे योग्य ठरते. म्हणजे सध्या आपण ट्रेडिंग करत आहोत असे गृहीत धरून इच्छुक शेअरची खरेदी आणि योग्य वेळी विक्री प्रत्यक्षात न करता केवळ पेपरवर करणे आणि त्याद्वारे नफ्या तोट्याचा हिशोब करणे यास पेपर ट्रेडिंग असे म्हणतात. अशा पद्धतीने थोडे दिवस प्रॅक्टीस करणे गरजेचे असते.

    सध्या मार्केटमध्ये ट्रेडिंग सिम्युलेटर ॲप देखील आलेले आहेत त्याचा वापर करुन तुम्ही प्रत्यक्ष ट्रेडिंग केल्यासारखे सर्व गोष्टी करू शकता. ज्यामध्ये प्रत्यक्षात आपले पैसे इन्व्हेस्ट केलेले नसतात. उदाहरणार्थ मनी कंट्रोल ॲप.

    पेपर ट्रेडिंग किंवा सिम्युलेटर ॲप्स वापरण्याचा सराव केल्यामुळे दोन फायदे होतात, एक म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले नसल्यामुळे ट्रेडिंग मध्ये तुमचे नुकसान झाले तरी प्रत्यक्षात एक रुपया देखील जात नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला कशा पद्धतीने फायदा तोटा होऊ शकेल याचा एक अंदाज तुम्हाला येतो म्हणजे जो अनुभव तुम्ही काही पैसे घालवल्यानंतर मिळवला असता तो पूर्णपणे मोफत मिळवू शकता.

    अशा पद्धतीने ट्रेडिंग करण्याचा काही महिने सराव केल्यानंतर तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल तुम्हाला स्वतःच्या काही स्ट्रॅटेजी ठरवता येतील कोणत्या पद्धतीने ट्रेडिंग करावे हे ठरवता येईल. त्यासाठी या पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

    3.गुंतवणूक करावयाची रक्कम

    शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही बेसिक गोष्टी शिकून घेतल्या, काही महीने प्रात्यक्षिक देखील केले त्यानंतर मुख्य तिसरा टप्पा प्रत्यक्षात गुंतवणूक करण्याचा येतो. अशा वेळी दोन प्रश्न निर्माण होतात.

    -शेअर मार्केट मध्ये किती रक्कम गुंतवावी?

    -गुंतवणूक कशी असावी?

    साधारणपणे शेअर मार्केट विषयी गोष्टी शिकताना तुम्ही या गोष्टी देखील समजून घेणे गरजेचे असते.कारण प्रत्यक्षात ट्रेडिंग करण्यास सुरुवात करताना वरील प्रश्न निर्माण होतात.शेअर मार्केटमध्ये किती रक्कम गुंतवावी याची काही मर्यादा नसते ते तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते आणि व्यक्तीपरत्वे ते बदलते. तुमचा दैनंदिन खर्च भागवून ,भविष्यकालीन येणाऱ्या समस्यांचा आणि गरजांचा विचार करून थोडीबहुत बँकेत शिल्लक रक्कम ठेवून उरलेल्या अतिरिक्त रकमेचा वापर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी करू शकता. उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसताना किंवा कर्ज काढून कधीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. उत्पन्नाचा एक पर्यायी स्रोत म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले पाहिजे.

    शेअर मार्केट मध्ये किती रक्कम गुंतवावी याच्या नंतर अधिक महत्त्वाचा प्रश्न असतो ही गुंतवणूक कशी असावी ?आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार त्वरित, मध्यम व दीर्घकालीन असे परतावा देणारे तीनही पर्याय येथे उपलब्ध असतात. तुम्हाला उपलब्ध असणाऱ्या वेळेनुसार यातील योग्य पर्यायाची निवड करणे गरजेचे असते.

    4.अपेक्षा कमी आणि संयम जास्त असणे गरजेचे

    गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपैकी सर्वोत्कृष्ट पर्याय शेअर मार्केट असला तरी याद्वारे प्रत्येक व्यक्तीला मिळणारा परतावा मात्र वेगळा असतो, कारण प्रत्येकाचे ज्ञान, ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आणि एक्सपर्ट लेवल यामध्ये फरक असतो.

    त्यामुळे सुरुवातीला अपेक्षा कमी ठेवणे आणि थोडाफार संयम ठेवणे गरजेचे असते.

    तुमच्या परिचित एखाद्या व्यक्तीस तुमच्या एवढीच गुंतवणूक करून कदाचित तुमच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळाले असतील किंवा मिळतील, अशावेळी तुम्ही संयमी राहणे गरजेचे आहे. त्याच्याशी तुमची तुलना न करता आपण ठरवलेली एक निर्धारित रक्कम कशी मिळवता येईल हे पाहणे गरजेचे असते. त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करून वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून पाहणे गरजेचे असते.

    शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हे चार टप्पे समजून घेतले तर गुंतवणुकीच्या इतर पर्यायांच्या तुलनेत तुम्हाला नक्कीच जास्त रिटर्न शेअर मार्केटद्वारे मिळतील.त्याकरिता सुरुवातीला संयम ठेवून आणि अपेक्षा कमी ठेवून तुम्ही काम केल्यास तुम्हाला यश नक्की मिळेल.

    -- विजयकुमार काशिनाथ पाटील

      August 18, 2021


  • शहरी माणसाच्या नजरेतून… नागपूर येथील दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन ….

    प्रती,

    श्री. गंगाधर मुटे,

    कार्याध्याक्ष अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन,

    नमस्कार,

    दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन दिनांक २०-२१ फेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे अतिशय झोकात आणि उत्साहात पार पडले ह्यात शंकाच नाही. तुमचे, तसेच सर्व सहकाऱ्यांचे मी रविंद्र कामठे हार्दिक अभिनंदन आणि करावे तितके कौतुक थोडे आहे. सर्वांची नावे घेणे योग्य नसल्यामुळे माझा हा अभिप्राय सर्वांपर्यंत पोहचवावा ही अपेक्षा.

    हा सलग दुसरा साहित्य सोहळा म्हणजे शेतकरीवर्गासाठी व सर्वसामन्य माणसासाठी शेतकरी साहित्याची एक पर्वणीच होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

    माझ्यासारख्या शहरी माणसाच्या नजरेतून... हे मराठी शेतकरी साहित्य संमेलन....

    जेष्ठ साहित्यिक, जेष्ठ पत्रकार आणि शेतीतज्ञ ह्यांची अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि उद्घाटक लाभणे ह्यातच ह्या संमेलनाचे यश दिसून येते. मान्यवरांनी ह्या निमित्ताने मांडलेले विचार अतिशय प्रगल्भ होते व सर्वसामन्य माणसाला विचार करायला लावणारे तर होतेच तसेच अतिशय मार्गदर्शक असे होते.

    ह्या संमेलनात – आपण प्रकाशित केलेली पुस्तके – मा. शरद जोशी विशेषांक “शेतकऱ्यांचा सूर्य”, गंगाधर मुटे लिखित काव्यसंग्रह – “नागपुरी तडका”, व प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रह – “कणसातील माणसं”, हे सर्वसामान्य माणसासाठी साहित्यक मेजवानीच म्हणावे लागेल. शेतकरी साहित्य चळवळीच्या अथक परिश्रमाचे झालेले हे चीजच आहे. संमेलनाचे बोधचिन्ह – नांगराच्या फाळाला लावलेली लेखणी त्याचेच हे फलित आहे असे मला जाणवले.

    ह्या संमेलनाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे, आपण आयोजित केलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील परिसंवाद हे होत. उदा. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण | मराठी साहित्यावर शेतकरी चळवळीचा प्रभाव | शेतकरी आत्महत्या; कारणे व उपाय | शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून | शेतीसाहित्यातील ग्रामीण स्त्रीचे स्थान. सर्वच परिसंवाद उल्लेखनीय झाले. वक्ते, विचारवंत तसेच त्या त्या विषयातील तज्ञांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न, सरकारचे धोरण, निसर्गाचे कालचक्र, शेतकऱ्यांचे अर्थकारण, त्यावर चालणारे राजकारण, विविध कारणे मीमांसा, उपाय व सर्वात कळीचा विषय म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ह्यावर झालेली चर्चा अगदी संयुक्तिक तर होतीच पण मार्गदर्शक होती व पुढील वाटचालीस प्रेरक अशीच होती.

    शेतीकरी गझल मुशायरा आणि शेतीकरी कवी संमेलन ... हा प्रयोग म्हणजे मनोरंजांतून विचार मंथन असाच वाटला. एका पेक्षा एक उत्तोमोत्तम गझलांचे व कवितांचे सादरीकरण, शेतकरी ह्या विषयवरील साहित्याने घेतलेली दखल खूप काही सांगून जाते. प्रचलित कवी आणि नवोदित कवी ह्याची अतिशय उत्तम सांगड आपण ह्या निमित्ताने घालून एक नवीन पायंडा घालून दिलात त्यासाठी आपले आभार. भविष्यात शेतकरी दुर्लक्षित राहणार नाही ह्याची ग्वाही ही कवी मंडळी देऊन जातात, कारण आजवरचा सिद्धांत आहे की काव्यात जी ताकद आहे ती कुढल्याही शस्त्रात नाही.

    “तुला कसला नवरा हवा” ही नाटिका तर मनोरंजांतून उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घालणारी होती. शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, त्यांच्यावर चाललेले राजकारण आणि शेतकऱ्यांच्या भावी पिढ्यांच्या मनातली तळमळ ज्या प्रगल्भतेने व्यक्त केली गेली त्या सर्व कलाकारांचे, दिग्दर्शकाचे आणि लेखाचे मन:पूर्वक अभिनंदन. एक अभिनव असा हा प्रयोग. अतिशय संयुंक्तिक वातावरणात आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक आणि आभार.

    आपण मला ह्या संमेलनास आमंत्रित करून जो काही मान-सन्मान दिलात, तसेच मला शेतकरी कवी संमेलनात माझी “हक्क जगण्याचे वंचित होते” ही कविता सादर करण्याची संधी व त्या कवितेस आंतरजाल स्पर्धेत – पद्यकविता सदरात –मानपत्र देऊन पुरस्कृत केलेत आणि माझ्या सहा कविता आपण “कणसातील माणसं, ह्या प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट करून मला साहित्यिक प्रतिष्ठा देऊन उपकृत केलेत, ह्या साठी मी आपला खूप खूप आभारी व ऋणी आहे.

    मला स्वत:ला हे संमेलन खूप काही देऊन आणि शिकवून गेले. खूप सारे शेतकरी, साहित्यिक आणि कवी मित्र मिळाले व शेतकरी साहित्य चळवळीशी स्नेह्बद्ध होऊन धन्य जाहलो.

    खासकरून मुटेसर मला तुमचा खूप अभिमान आहे. मी तुमचे फार कौतुक करतो आहे असे वाटेल पण त्याला इलाज नाही. तुमच्या सारख्या एक शेतकऱ्याने अशी एक साहित्य चळवळ चालवावी आणि भल्या भल्यांना तोंडात बोटे घालयला लावेल अशी त्याची योजना, आखणी, नियोजन व संमेलन, सलग दुसऱ्यांदा घडवून सहज यशस्वी करून दाखवावे ह्याला तोड नाही. निंदक तर असावेतच पण समर्थकही असले की पुढील कार्यास नवे बळ आणि प्रोत्छान मिळते असे मला वाटते. दोन दिवस फक्त शेती, शेतकरी आणि शेतकऱ्यांचे विषय आजवर आयुष्यात कधी अनुभवलेच नव्हते, ते ह्या शेतकरी साहित्य संमेलनामुळे अनुभवले आणि कृतकृत्य झालो. जसा आपला एक घास सीमेवरील जवानांसाठी अडतो तसाच आपल्या ह्या शेतकरी बांधवांसाठीही अडला पाहिजे ह्याची जाणीव प्रकर्षाने आज मला झाली. हीच ह्या संमेलनाची फलश्रुती आहे.

    शेतकरी साहित्य चळवळीच्या पुढील वाटचालीस माझ्या अनंत शुभेछ्या.

    -- रविंद्र कामठे, पुणे.

    भ्रमणध्वनी +९८२२४०४३३३०. ravindrakamthe@gmail.com

      March 1, 2016


  • मोठ्ठा धडा

    मी कुर्ला शाखेत असतानाचा एक किस्सा.. मी नुकतीच बँकेत लागले होते, प्रोबेशन काळात संपात सहभागी होता येत नाही…अश्याच एका संपाच्या दिवशी मी, कॅशियर आणि एक वरिष्ठ अधिकारी एवढेच लोक उपस्थित होतो. फक्त रोख रकमेचे व्यवहार चालू होते म्हणून तुरळक गर्दी होती, ह्या शाखेत एक पेट्रोल पंपाचे खाते होते.

      April 9, 2023


  • आयुर्वेदातील नॅनोटेक्नोलॉजी

    आयुर्वेद हे जगातील सर्वात पुरातन असे भारतीय वैद्यक शास्त्र आहे. ह्या लहानशा लेखातून त्यातील औषधीकरणाचा मौलिक विषय नव्या स्वरुपात वाचा.

      October 13, 2014


  • अडचणीचे `हिंदुत्व’

    हा लेख `हिंदुत्व’ याबद्दल लिहिला आहे

      May 22, 2013


  • श्रीकृष्ण जन्म कहाणी, माझ्या नजरेतून

    आपण आपल्या लहानपणापासून कृष्णजन्म कहाणी बऱ्याच वेळेस ऐकली आहे, सिनेमा, नाटकातून सुद्धा पाहिलेली आहे, काही ठिकाणी बरेच प्रश्न अनुत्तरीत वाटले, त्याचा विचार करून काही कड्या जुळवण्याचा प्रयत्न केला आहे.

    माझाही श्रीकृष्णाबद्दल तितकाच आदर आहे जितका आपण सर्वांचा आहे, तसेच या लेखातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.

    कंसराजा आपल्या लाडक्या बहिणीचे लग्न वासुदेव सोबत लावतो, व खूप आनंदात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढतो, त्या वेळेस आकाशवाणी होते कि देवकीचा आठवा पुत्र तुझ्या मृत्यूस कारणीभूत होईल. तत्काळ मिरवणूक थांबऊन कंस देवकी- वासुदेवाला काळ कोठडीत बंद करतो तिथून त्यांचा यातनामय प्रवास सुरु होतो. कदाचित कंसाला भास झाला असावा, त्याला त्याने आकाशवाणी समजली असावी, यातून तो मनोरुग्ण असावा अशी शंका येते. बरेच एकहाती सत्ता असलेले राज्यकर्ते असाच काहीसा विचार करून जनतेची पिळवणूक करतात हे आपण विसाव्या शतकातही अनुभवले आहे.

    देवकी-वासुदेवाला कालकोठडीत ठेऊन येणाऱ्या काही वर्षात त्यांची पहिली सात मुले मारल्यामुळे दोघेही खूप व्यथित झाले होते, अश्या परिस्थितीत आठव्याची चाहूल लागली, त्यामुळे त्यांच्या मनात अजुनच कोलाहल सुरु झाले, कारण सात जणांना मारल्याच्या दहशतीमुळे देवकी मानसिक तणावाखाली होती, आणि कंस आठवे मुलही मरणार यात शंका न्हवती अश्या परिस्थितीत तिला अन्न गोड लागत न्हवते, या मुळे ती अतिशय कृश झाली होती, तसेच सात मुलांना जन्म दिल्यामुळे सहजिकच शरीर खूप खंगले होते. कालकोठडीत जिथे सुर्य किरण सुद्धा पोहोचत नाहीत तिथे जवळपास १० वर्ष (कमीतकमी) काढल्यामुळे तिच्यात ड जीवनसत्वाची कमतरता झाली होती. या सर्व कारणामुळे देवकीने आठव्या महिन्यात मुलास जन्म दिला. वैद्यकीय परिभाषेत सांगायचे तर (premature delivery) झाली. सर्वसाधारणपणे बालके जन्मानंतर रडतात, जर रडले नाही तर त्याला रडवण्यात येते, याचे प्रमुख कारण मुलाला आईच्या गर्भात नाळेतून (placenta) प्राणवायू मिळतो, बाळ बाहेर आल्यावर नाळ कापल्यामुळे बाळाला नाकाने श्वास घ्यावा लागतो. जर बाळ रडले नाही तर फुफ्फुसे (lungs) आपले काम सुरु करत नाहीत, म्हणून डॉक्टर वेळ पडली तर चिमटा काढून बाळाला रडवतात, नाहीतर डॉक्टरवर रडण्याची पाळी येते. श्रीकृष्ण जन्मानंतर रडला नाही हे पुस्तकात लिहिलेले आहे, याचा अर्थ ते मुल मृत (still baby) अवस्थेत जन्माला आले असे म्हणू शकतो.

    वरील सर्व कारणामुळे गर्भात व्यवस्थित पोषण झाले नसल्यामुळे, आणि प्राणवायू कमी मिळाल्यामुळे बाळ निळा रंग (cyanosis) घेऊन जन्माला आले. आठव्या महिन्यात जन्म झालेली अशी बरीच मूले मी पहिली आहेत ज्यांच्यात ही लक्षणे दिसतात. साधारण अश्यामुलांच्यात कमरेखालचा (कुल्ले, मांड्या) तसेच पाठीचा भाग निळा दिसतो. या बाळातही असेच झाले असणार, अर्थात त्या काळात विज्ञान फार प्रगत नसल्यामुळे प्राणवायू कमतरतेमुळे निळे मूल जन्माला आले हे समजले नाही. लोकांनी त्याला दैवी देणगी समजली. पुढे चित्रकारांनी संपूर्ण शरीर निळे दाखऊन दैवी चमत्कार भासवला. आजही लोक गणपती दुध पितो म्हणून देवळात रांगा लावतात, तर त्या काळाबद्दल न बोललेलेच बरे. म्हणूनच बाळकृष्ण निळा दाखवला जातो, तसेच मोठेपणीचा कृष्ण निळा दाखवला जात नाही, याचे कारण या मुलांच्यात वाढत्या वयासोबत भरपूर प्रमाणात प्राणवायू मिळाल्यामुळे चामडीचा हा निळा रंग निघून जाऊन नैसर्गिक रंग येतो.

    वर सांगितल्याप्रमाणे हे मृत बाळ जन्माला आल्यामुळे रडले नाही आणि त्याचा जन्म झाला हे देवकी आणि वासुदेव शिवाय कुणालाही समजले नाही. वसुदेवाने हि गोष्ट जेव्हा जेलरला सांगितली, तेव्हा जेलर प्रचंड तणावाखाली आला. त्याला काय करायचे हे प्रथम दर्शनी सुचले नाही, परंतु त्वरित निर्णय घेणे जरुरी होते. मेलेलं मुल जन्माला आले आहे हे कंस कधीही मान्य करणार नाही, हे नक्की, उलटा कंस जेलर व वसुदेवानी संगनमत करून जिवंत मुल बाहेर पाठवून मेलेलं मुल त्याला दाखवले हे समजून सर्वाना मृत्यूदंडाची शिक्षा देणार यात शंका न्हवती. याच कारणामुळे जेलरने व वसुदेवाने संगनमत करून मेलेलं मुल बाहेर नेऊन जिवंत मुल त्या ठिकाणी ठेवायचा निर्णय घेतला. हि गोष्ट अत्यंत गुप्तपणे ठरवल्यामुळे पहारेकऱ्याना समजूद्यावयाचे न्हवते, यासाठी एकच उपाय होता, त्या प्रमाणे सर्व पहारेकऱ्याना रात्रीच्या पेयात झोपेचे औषध मिसळून दिले, ज्यामुळे सर्व शिपाईवर्ग झोपी गेला, व जेलरने सर्व दारे उघडून वासुदेवाला मुक्त केले, अट हि कि त्याने ताबडतोब नदी पार करून गोकुळात जाऊन हे मुल टाकून त्या जागी दुसरे मुल आणायचे. ठरल्या प्रमाणे वासुदेव नदी ओलांडून गोकुळात गेला, व तिथे चांगला वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे हे मुल जिवंत झाले, पुढे हेच मुल कृष्ण म्हणून प्रसिद्ध झाले, असो, अश्या गोष्टी आजही आपण पेपर मध्ये वाचतो. मीही बरेच वेळेस वाचले आहे कि मृत मुलाला पुरण्यासाठी घेऊन जातात व अचानक स्मशानात मुल रडू लागते.

    कथेत सांगितल्या प्रमाणे वसुदेवाने गावातील एका मुलीला सोबत आणून कंसासमोर पेश केले. त्याला एखादा मुलगा मिळाला असता, परंतु कुणीही आपला मुलगा त्याला दिला नाही म्हणून मुलीवर समाधान मानून तो तिला घेऊन आला. जेलरने परत वासुदेवाला बंदी करून सर्व दरवाजांना कुलुपे घातली, या नंतर सर्व पहारेकऱ्याना जागे करण्यात आले. पुढे जेव्हा कंसाला हे समजले तेव्हा जेलर व सर्व पहारेकऱ्यानी झोप लागल्याची कबुली देऊन व हा दैवी चमत्कार भासवून स्वतःची मृत्यूदंडातून सुटका करून घेतली.

    बऱ्याच वेळेस लेखकाला दोन गोष्टींची सांगड घालता आली नाही कि तो काहीतरी चमत्कार दाखवुन आपली कहाणी पूर्ण करतो, इथेही त्याला हे समजले नाही म्हणून चमत्कार दर्शवून कथा पूर्ण केली असे जाणवते.

    -- विजय लिमये

      December 13, 2016


  • अंध कफी दहावीमध्ये अव्वल

    पुस्तकांच्या धड्यामधूनच आपल्याला धडा मिळतो असं नाही, तर प्रत्यक्ष जीवनात असे अनेक प्रसंग आहेत जे आपल्याला धडा शिकवतात. पुस्तकाबाहेर अवतीभवती आपल्याला अशा काही घटना दृष्टिक्षेपात येतात ज्या आपल्याला प्रेरणा देऊन जातात, आपल्यात नवचैतन्य जागवून जातात, नैराश्याचे मळभ झटकून टाकतात. नुसते डोळे उघडे ठेवून चालत नाही, तर निरीक्षण शक्ती आपल्याला जी दिली आहे तिचा वापर करून वैचारिक क्षेत्रात प्रवेश करता यायला हवा. विचार करता यायला हवा. आपल्यामधील वैचारिक दारिद्र्यच आपल्याला स्वतःतून उमलू देत नाही, स्वतःची उन्नती करू देत नाही. एखादी यशोगाथा झाली की ती इतिहासाचा भाग बनते; पण असं होता कामा नये. एका यशोगाथेतून दुसरी यशोगाथा जन्म घ्यायला हवी, तरच यशोगाथेची परंपरा चालू राहाते. प्रत्येकाच्या आयुष्यात नैराश्याचे मळभ येतातच; पण या नैराश्येच्या गर्तेत आपण संपलो असं माणसं समजू लागले तर ती पुन्हा उभारी घेत नाहीत. मग अवतीभवती अशा काही घटना मनातले मळभ झटकून टाकतात आणि आपणही का नाही उभारी घेऊ शकत? या विचाराने भारावून जातात.

      June 11, 2026