(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ’पुरुष’ मराठी नाटक

    ’पुरुष’ मराठी नाटक

    आजच्या दिवशी १९८२ रोजी कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित ’पुरुष’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला होता.

    जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि मराठी रंगभूमीवर गाजलेलं 'पुरुष' हे नाटकात पुरुषी मनोवृत्ती आणि त्या मनोवृत्तीला बळी पडलेल्या एका स्त्रीची कथा पुरुष या नाटकातून मांडण्यात आली आहे. मुळातच पुरुषांमध्ये असलेला अहंकार आणि त्याला बळी पडणाऱ्या स्त्रिया यावर य़ा नाटकाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलंय. नाना पाटेकर, उषा नाडकर्णी, रिमा या दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने एके काळी हे नाटक खुपच गाजवलं होतं.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      September 22, 2021


  • श्री कनकधारा स्तोत्रम् – १०

    गीर्देवतैति गरुड़ध्वज सुंदरीति शाकम्भरीति शशिशेखर वल्लभेति।
    सृष्टि-स्थिति-प्रलय केलिषु संस्थितायै तस्यै ‍नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरूण्यै ।।१०।।

    आई आदिशक्ती परांबेचे कार्य तीन प्रकारे चालत असते. या तीन पद्धतींनाच त्रिगुण असे म्हणतात. सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या द्वारे कार्य करणाऱ्या आदिशक्तीच्या तीन रूपांना महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती असे म्हणतात.
    या तीन रूपात कार्य करणाऱ्या तीन शक्तींचे वर्णन येथे आचार्यश्री करीत आहेत.

    गीर्देवतैति- गीरा म्हणजे वाणी. त्या वाणीची देवता ती गीर्देवता. अर्थात आई सरस्वती.

    गरुड़ध्वज सुंदरीति - गरुडध्वज म्हणजे भगवान विष्णू. त्यांच्या रथाच्या ध्वजावर गरुडाचे चित्र काढलेले असते. त्यांची सुंदरी अर्थात प्रियतमा. म्हणजे आई जगदंबा महालक्ष्मी.

    शाकम्भरीति - जगदंबेचे एक नाव शाकंबरी असे आहे. कधीकाळी प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सर्व ऋषी-मुनींनी प्रार्थना केल्यामुळे आई जगदंबा प्रगट झाली. सगळ्या भक्तांच्या उदरभरणाची सोय व्हावी म्हणून तिने सर्वत्र शाक अर्थात भाज्या निर्माण केल्या. याच्या आधारे भक्तांचे भरणपोषण केल्यामुळे हे नाव रूढ झाले.

    शशिशेखर वल्लभेति- शशि म्हणजे चंद्र. त्याला शेखर म्हणजे मस्तकावर धारण करणारे. अर्थात भगवान श्री शंकर. त्यांची वल्लभा अर्थात प्रियतमा. म्हणजे देवी पार्वती.

    सृष्टि स्थिति प्रलय केलिषु संस्थितायै- या तीन स्वरूपात, त्या त्रिदेवांसह, सृष्टी निर्मिती, स्थिती अर्थात पालन आणि लय अर्थात विनाश या तीनही केली म्हणजे लीलांमध्ये आधारभूत स्वरूपात विद्यमान असणाऱ्या,

    तस्यै ‍नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरूण्यै- त्या त्रिभुवनैकगुरू अर्थात त्रैलोक्यातील सर्व श्रेष्ठ तत्व असणाऱ्या भगवान विष्णूंची तरुणी अर्थात सुंदरीला नमस्कार असो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 19, 2020


  • पॉलिसी लॅप्स झालीय ?

    काही वेळा विमा पॉलिसीचे हप्ते भरायचे राहून जातात किवा आर्थिक अडचणींमुळे ते भरता येत नाहीत. अशा वेळी पॉलिसी लॅप्स होते. लॅप्स झाल्यानंतरच्या कालावधीत विमाधारकास काही झाल्यास पॉलिसीचे फायदे मिळू शकत नाहीत. म्हणून पॉलिसी लॅप्स होऊ देऊ नये. अर्थात लॅप्स झाल्यानंतरही पॉलिसी पुन्हा सुरू करणे शक्य असते. मात्र, अशा वेळी विमा कंपनीचे काही निकष पूर्ण करावे लागतात.

      September 8, 2010


  • मूर्ख आणि शहाणे! शिका!

    समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या सुप्रसिध्द दासबोधात मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे पढतमूर्खांची म्हणजेच मूर्खपणा आणि शहाणपणा यातील फरक कळणार्‍या मुर्खांची आहेत. अशा पढतमूर्खांची विस्तृत लक्षणे रामदास स्वामींनी सांगीतली असली तरी त्यांच्या समर्थ प्रतिभेला 21व्या शतकातील मुर्खांचा वेध घेता आला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात त्यात दोष स्वामींचा नाही, केवळ रामदास स्वामीच नव्हे तर इतर कोणत्याही अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तीला मुर्खात काढण्याची प्रचंड क्षमता 21व्या शतकातील भरतखंड निवासी लोकांमध्ये आहे. अधिक स्पष्ट सांगायचे तर 17व्या शतकात दासबोधाची रचना करणाऱ्या रामदास स्वामींना 21व्या शतकात भरतवर्षात सरकार नामक एक विचित्र यंत्रणा उभी होईल आणि मूर्खपणाच्या व्याख्याच ही यंत्रणा बदलून टाकेल, अशी शक्यता वाटण्याचे काहीच कारण नव्हते. तशी पुसटशी शंका जरी त्यांना आली असती तर त्यांनी आपली पढतमूर्खांची इतर सर्व लक्षणे बाद करीत केवळ, ‘तो येक महामूर्ख, जो असे प्रामाणिक’ हेच एक लक्षण कायम ठेवले असते.

      October 6, 2002


  • अलीकडे

    अलीकडे,<!--
    काळ्या पाषाणखंडाचा <!--
    मला हेवा वाटू लागलाय<!--
    कारण-<!--
    पाषाणाला ह्र्दय नसते-<!--
    विदीर्ण व्हायची भीती नसते,<!--
    पाषाणाला मेंदू नसतो-<!--
    सडून जायची काळजी नसते...<!--
    अलीकडे,<!--
    अग्नीचाही मला <!--
    हेवा वाटू लागलाय<!--
    कारण-<!--
    अग्नीला स्वत:चे घर नसते-<!--
    जळून जायचे भय नसते,<!--
    अग्नीला स्वत:चा देह नसतो-<!--
    राख व्हायची चिंता नसते...<!--
    अलीकडे-<!--<!--

    -- विष्णू गोपाळ वडेर

      December 27, 2011


  • नवरत्नमालिका – ४

    भूरिभारधरकुण्डलीन्द्रमणिबद्धभूवलयपीठिकां
    वारिराशिमणिमेखलावलयवह्निमण्डलशरीरिणीम् ।
    वारिसारवहकुण्डलां गगनशेखरीं च परमात्मिकां
    चारुचन्द्ररविलोचनां मनसि भावयामि परदेवताम् ॥ ४॥

    आई जगदंबेच्या अतीविराट विश्वरूपाचे इथे वर्णन साकारण्यात आले आहे. विश्वातील अतीव वैभवशाली पंचमहाभूते ही जणूकाही आई जगदंबेची अवयव वा आभूषणे आहेत असे अतिभव्यतम वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात,

    भूरिभारधरकुण्डलीन्द्रमणिबद्धभूवलयपीठिकां- भूरी म्हणजे प्रचंड. भार अर्थात वजन. सगळ्यात जास्त वजन कशाचे? तर या पृथ्वीचे. त्याला जो धारण करतो तो भूरीभारधर. कोण? तर कुंडलीद्र. कुंडली म्हणजे वेटोळा. वेटोळा घालून बसणारा प्राणी म्हणजे साप. त्या सर्व सापांचा इंद्र अर्थात राजा म्हणजे भगवान श्री शेषनाग.

    त्याच्या मस्तकावर असणाऱ्या मण्याप्रमाणे असणारी पृथ्वी. भूवलय. ती पृथ्वी ही जिचे पदपीठ अर्थात पाय ठेवण्याचे आसन आहे अशी.
    वारिराशिमणिमेखलावलय- वारी म्हणजे पाणी. ज्याची राशी म्हणजे साठा.सगळ्यात मोठी जलराशी समुद्र. तो समुद्र हीच जणू आई जगदंबेची मेखला, कंबरपट्टा आहे. कंबर पट्टा सतत हलत राहतो. तसा समुद्रही लाटांच्या स्वरूपात हलत राहतो. पण कंबर पट्टा कधी जागा सोडत नाही. तसा समुद्र आपल्या जागी स्थिर असतो. त्यामुळे त्याला कंबरपट्टा म्हटले आहे.
    वह्निमण्डलशरीरिणीम् - या विश्वातील सकल वह्निमंडळ अर्थात तेजस्वी गोष्टी या आईच्या शरीर दृश्य स्वरूप आहेत. जेथे जेथे तेज आहे तेथे आईचे प्रगटीकरण आहे असा अर्थ.
    वारिसारवहकुण्डलां- वारी म्हणजे पाणी. त्याचे सार म्हणजे भरलेला साठा. असा पाण्याचा साठा म्हणजे ढग वाहून नेतो तो वारा आईची कुंडले आहेत.
    त्याची हालचाल तेथे गृहीत आहे.
    गगनशेखरीं- गगन म्हणजे आकाश हेच जिचे शिखर म्हणजे मस्तक आहे अशी.
    परमात्मिकां- परब्रह्मस्वरूपिणी.
    चारुचन्द्ररविलोचनां- चंद्र आणि रवी म्हणजे सूर्य हेच जी चारू म्हणजे अत्यंत सुंदर नेत्र आहेत अशा,

    मनसि भावयामि परदेवताम् - परम देवता आदिशक्तीचे मी मनाने ध्यान करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 18, 2020


  • शांती एकांबरम – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

    शांती एकांबरम ह्या  भारताच्या आर्थिक उद्योगातील सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक आहेत. प्रगतीला चालना देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे बँकांची  प्रचंड वाढ झाली आहे. एकांबरम ह्या  डिजिटल बँकिंग सेवा सुरू करणे, नवीन बाजारपेठांमध्ये बँकांचा  विस्तार करणे आणि ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उपायांचा परिचय यासह अनेक धोरणात्मक उपक्रमांमध्ये  एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

      September 11, 2025


  • स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सागरी सुरक्षेची समिक्षा

    मुरुड तालुक्यातील आठ जण संशयास्पदरीत्या फिरताना ०८ /०८ /२०१५ ला आढळून आले आहेत. हे सर्व जणवेळास्ते, वावडुंगी आणि सायगाव परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आले आहे. याबाबत जिल्ह्य़ात सर्वत्र नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

      August 14, 2015


  • घसा खवखवणे आणि दुखणे

    घसा दुखणे ही एक नेहमी आढळणारी तक्रार आहे. खाज सुटल्यासारखे खवखवणे आणि घशात खूप वेदना जाणवणे या दोन टोकांत कमी-जास्त प्रमाणात त्रास होतो. घशातून मेंदूकडे संवेदना नेणाऱ्या मज्जातंतूच्या शिरा (नववी आणि दहावी क्रेनियल नर्व्ह) याच कानातूनही संवेदना मेंदूत नेतात. त्यामुळे घशाच्या आजारात अनेकदा कानही दुखवतो आहे, अशी रुग्णाला भावना येते. जिवाणू अगर विषाणूजन्य दाह, इजा होणे, ऍलर्जी, घशाचा कॅन्सर, शरीराचे काही अन्य आजार, शस्त्रक्रिया किंवा तपासण्यानंतर घसा दुखतो. तोंड उघडे ठेवून श्वाचस घेतला गेला तर घशाचे अस्तर कोरडे पडते. खूप मोठ्याने बोलण्याने स्वरयंत्रणेवर ताण पडतो. अतिरेकी मद्यपान, नाकाघशातून धूर जाणे किंवा अमोनियासारखा वायू घशात जाणे यामुळेसुद्धा घसा दुखू लागतो. घसा दुखण्याची कारणे अनेक. घसा दुखण्याचे एक नेहमी आढळणारे कारण म्हणजे ऍलर्जिक ऱ्हायनायटिस. हा त्रास विशिष्ट ऋतुमानात अथवा वर्षभर होत राहू शकतो. घसा दुखतो व नाक चोंदते. नाकातून पातळ द्राव वाहतो. नाकाच्या मागून घशात स्राव उतरतो. झटके आल्याप्रमाणे शिंकांच्या एकामागोमाग फैरी येतात. वास येत नाही. कपाळ व कानशिलांच्या वरचा भाग दुखू लागतो. डोळे, नाक व घसा येथे खाज सुटते. डोळे लाल होतात. पापण्या सुजतात. हा आजार फुलांच्या परागांना, बुरशीच्या गोलकांना, धुळीला, प्राण्यांच्या त्वचेवरील खवल्यांना झालेल्या ऍलर्जीमुळे होतो. ऍलर्जीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करून त्यावर उपचार करता येतो; परंतु, यामुळे सर्वांनाच फायदा होईल असे नाही.

    काही औषधांत अँटि-ऍलर्जिक रेणू असतात, त्यांनी गॅस्ट्रो इसोफेजियल टीफ्क्ललस डिसीझ या विकारात अन्ननलिका आणि जठर यांतील झडप कमजोर होते. परिणामी जठरातील पाचकरस अन्ननलिकेतून घशापर्यंत येतात. या पाचक रसात हायड्रोक्लोजरिक ऍसिडचे प्रमाण बरेच असते. स्वरयंत्रणेचा दाह होतो. आवाज बसतो. अशा व्यक्तींमध्ये स्वरयंत्रणेवरील कूर्चाही सुजणे आणि रुग्णाला आपल्या घशात "गाठ‘ असण्याची भावना येऊ लागते. ग्लॉसोफॅटिंजियल न्यूरालनिया या आजारात घशाच्या एकाच बाजूला चमक आल्यासारखी किंवा कापल्यासारखी वेदना येते. सहसा गिळताना किंवा जांभई देताना हा त्रास अधिक तीव्रतेने जाणवतो. ही वेदना कानापर्यंत जाणवू शकते. हर्पीन सिंप्लेक्सा नावाच्या विषाणूने सहसा नाक व वरचा ओठ येथे फोड येतात (ज्वर उतणे). हा विषाणू कधी कधी घशातही फोड निर्माण करतो. जीभ, घसा, हिरड्या यावर श्वासाला दुर्गंधी सुटते. लाळ खूप येऊ लागते. भूक लागत नाही. अंगात बराच ताप भरतो. इन्फ्लुएंझाच्या आजाराची सुरवात घसा दुखण्याने होते. इन्फेक्शहस मोनोन्यूक्लीीओसिस या आजारात घसा दुखतो. मानेत गाठी येतात. ताप जात-येत राहतो. एपस्टाईत बार नावाच्या विषाणूने तो येतो. आजारी व्यक्तीच्या लाळेतून हा विषाणू परिसरात पसरतो. प्लीहा वाढते. वाढलेली प्लीहा ठिसूळ असते. तुलनेने क्षुल्लक मार लागल्याने ही वाढलेली प्लीहा फुटते व प्राणघातक रक्तस्राव होतो. जिभेच्या, घशाच्या, स्वरयंत्रणेच्या कॅन्सरमुळेदेखील घसा दुखतो. घसा दुखतो अशी तक्रार असणाऱ्या प्रत्येक रुग्णाची काळजीपूर्वक कसोशीने तपासणी होणे आवश्येक आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- सकाळ / डॉ. ह. वि. सरदेसाई

      January 13, 2017


  • लंडनचा पासपोर्ट

    माणसांना काही तरी छंद असतोच. काहींना क्रिकेट बघण्याचा छंद असतो, काहींना सिनेमा बघण्याचा, नाटकाचा, काहींना लिखाणाचा तर वाचनाचा छंद असतो. काहींना टीव्ही बघण्याचा तर काहींना तासन् तास मोबाईलवर खेळण्याचा छंद असतो. मला देखिल वाचण्याचा व लिहिण्याचा छंद आहे. तसेच माझे पती ‘टॉनिक’ अंकाचे संपादक मानकरकाका यांना भारतातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा खूप छंद होता.

      May 7, 2023