वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ,समर्थशिवाय शिवाजी ला कोण विचारेल? असे एकेरी वक्त्यव्य राजे शिवाजी बद्दल कुणी माथेफिरूने केलं नसून राज्याचे घटनात्मक पदावर बसलेली व मागील काही वर्षां पासून महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जेष्ठांचे अनादर करणारे महामहिम राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी केले.
November 20, 2022
माँनीटरच्या म्हणण्यानुसार जे प्रामाणिक पणे आत्मपरीक्षण करतात त्यांच्या मनात ..आत्मग्लानी ..अपराधीपणा ..अशा भावना निर्माण होणे स्वाभाविक होते ..मी येथे उपचारांसाठी दाखल होताना अश्या सगळ्या प्रक्रियांना सामोरे जावे लागेल याचा विचार देखील केला नव्हता ..व्यसनमुक्तीचे उपचार म्हणजे मला काही दिवस शारीरिक त्रासासाठी गोळ्या औषधे देतील ..मग व्यसन करणे कसे वाईट आहे हे समजावून सांगतील इतकेच वाटले होते ..परंतु इथे केवळ व्यसनमुक्तीच नव्हे तर एका विस्कळीत झालेल्या व्यक्तिमत्वाला पुन्हा आकार देण्याचे काम सुरु झाले होते ..शरीरातून दारू लवकर निघून जाते मात्र मनातून निघून जायला खूप वेळ लागतो ..कारण मनातील दारूच्या सेवनाशी निगडीत असलेल्या भावना इतक्या सहज सहजी निघून जात नाहीत ..त्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाचे संपूर्ण आकलन ..परीक्षण ..करणे गरजेचे आहे ..ते झाले की मनाच्या साफसफाईचे काम सुरु होते .. नंतर केलेली स्वच्छता नियमित टिकवून ठेवणे आलेच ..नाहीतर दारू अथवा व्यसन हा अतिशय खुनशी शत्रू आहे ..तो आपल्या बेसावध होण्याची वाट पाहत रहातो ..पुन्हा पुन्हा हल्ला करू शकतो ..मला हे पूर्णपणे पटले ..पूर्वी घरी देखील अनेकदा मी दारू सोडली होती ..एकदोन महिन्यातच माझा निश्चय डळमळीत होऊन पिणे पुन्हा पुन्हा सुरु झाले होते ..कायमची व्यसनमुक्ती मिळवण्यासाठी स्वतःवर कष्ट घेण्याची गरज होतो मला ...नाश्ता करून झाल्यावर मी वार्डात मित्रांशी गप्पा मारत बसलेलो असताना माॅनिटरने मला एक पाकीट आणून दिले... पाकीट उघडेच होते ..म्हणाला विजयभाऊ जरा वाचा हे सगळे ..मी पाकीट घेवून त्यातील कागदाची घडी काढली ..उघडून पहिले तर वर प्रिय असे लिहिलेले होते ...एका कोपर्यात जावून बसलो वाचत ..
प्रिय ,
परवा मी भेटीला आले असताना तुम्ही घरी घेवून जाण्यासाठी जो हट्ट केला त्यामूळे मी खूप व्यथित झाले आहे ..शेवटी तर तुम्ही घटस्फोटाची धमकी दिलीत मला ..इतकी का मी वाईट आहे ? आपल्या नव-याने व्यसनमुक्त असावे ही अपेक्षा ठेवणे हीच माझी चूक आहे का ? जर तुम्हाला असे वाटत असेल की मी आयुष्यातून निघून गेल्यावर तुम्ही व्यसनमुमुक्त राहू शकाल..तर मी खरोखरच तुमच्या आयुष्यातून निघून जाईन ..तुमच्या व्यसनमुक्तीसाठी मी वाट्टेल तो त्याग करायला तयार आहे ..
मला माहित आहे की तुम्ही रोज पिवून घरी आलात की मी कटकट करते ..आदळआपट करते ..म्हणून तुम्हाला माझा राग येतो ..पण त्यामागे तुमचा जीव सुरक्षित व्हावा हीच भावना असते माझी ..लग्न झाल्यावर अगदी सुरुवातीपासूनच मी तुमच्या पिण्याबद्दल माझी नाराजी व्यक्त करतेय हे आवडत नसेल तुम्हाला कदाचित ..परंतु आपण नेहमी आसपास होणार्या घटना वाचत असतो पाहत असतो ..त्यातून दारू एका संसाराचे कसे वाटोळे करते हे माहित असूनही तुम्ही अहंकाराने मला काही होणार नाही असेल म्हणता तेव्हा खरोखर तुमच्या बुद्धीची कीव येते मला ..वर्तमान पत्रातील व्यसनाशी संबंधित वाईट बातम्या वाचल्या की खरोखर माझ्या काळजाचा थरकाप होतो ..दारूच्या नशेत खून ..दारूच्या नशेत बलात्कार ..दारूच्या नशेत अपघात ..दारुड्या बापाचा मुलाने खून केला ..विषारी दारूने मृत्यू ..दारूमुळे कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या ..अश्या प्रकारच्या बातमीचा मथळा मला अवस्थ करतो ..तुमची काळजी वाटते सतत ..
तुम्हाला खरे वाटणार नाही कदाचित पण तुमच्या आणि आपल्या संसाराच्या काळजीने अनेक रात्री मी जागी असते ..बाजूला तुम्ही नशेत चूर झोपलेले असताना मी जागीच आहे ..डोळ्याला डोळा नाही हे तुम्हाला कधी जाणवले नसेल ..मुले देखील हल्ली तुमच्या दारूबद्दल माझ्याकडे नाराजी व्यक्त करतात ..बाबा असे का वागतात हे विचारतात मला ? काय उत्तर देवू मी त्यांना ..किती दिवस बाबा औषध घेतात हे खोटे सांगू त्यांना ..मुले तुम्ही घरी असलात कि अत्यंत असुरक्षित असतात हे तुम्हाला जाणवत नाही का ? घरात फालतू बडबड ..शिव्या देणे ..मुलांसमोर शोभते का तुम्हाला ? माझे वागणे चुकत असेल तर तुम्ही मला तसे स्पष्ट सांगा ..मी तुम्हाला हवा तसा बदल करेन माझ्या वर्तनात ..तुम्ही कितीही भांडले माझ्याशी ..माझ्या माहेरच्या उद्धार केलात ..मला शिव्या दिल्यात ..मूर्ख ..बेअक्कल ..बावळट म्हंटले तरी चालेल ..मी सहन करीन सगळे ..मात्र तुमचे दारू पिणे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होतेय ..
माझ्या मनात आजकाल आत्महत्येचे विचार येतात हे मी तुम्हाला प्रथमच सांगते आहे ..पराभवाची भावना मला सतत घेरून असते ..माझ्या संसाराची किती किती स्वप्ने सजवली होती मी . गरिबीत ..दारिद्र्यात देखील आनंदाने संसार करायला तयार होते ..तुम्ही अर्धपोटी ठेवले असतेत तरी चालले असते मला ..आम्हा मुलींना लहानपणापासून हे तडजोड करायला ..संसार आहे तसा स्वीकारायला शिकवले जाते ..पण तुमच्या दारूबाबत मात्र मला तडजोड करता येत नाहीय ..हा माझा पराभवच आहे ..तुमच्या व्यसनमुक्तीसाठी मी उपास केले ..नवस केले ..रोज देवाजवळ तुम्ही आणि आपला संसार सुरक्षित राहावा म्हणून मी प्रार्थना करत असते ..तुमचा देव धर्मावर विश्वास नाहीय म्हणून तुम्हाला न सांगता माझे हे उद्योग सुरु असतात ..दारूच्या नशेत तुम्ही मला अनेकदा घर सोडून कायमची निघून जा ..तोंड काळे कर ..असे म्हणत असता तुम्ही नशेत असे बोलता म्हणून मी दुर्लक्ष करते त्याकडे ..परंतु परवा पहिल्यांदाच दारू न पिता तुम्ही घटस्फोट घेईन अशी धमकी दिलीत मला ..हे माझ्या मनाला फार लागून राहिले आहे ..
तुमच्या भल्यासाठीच मी तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे ...तुम्ही बरे व्हावे म्हणूनच हे चालले आहे हे तुम्हाला समजत नाहीय का ? योग्य वेळी मी येथील सरांच्या सल्ल्याने तुम्हाला घरी घेवून येईन ..मी अगदी थोडी पितो ..असे तुम्ही अनेक वर्षांपासून म्हणत आला आहात ..मात्र आता तुमचे पिणे हाताबाहेर गेलेय हे तुम्हाला वाटत नाही का ? असो ..हे पत्र वाचून तुम्हाला माझा राग येईल कदाचित ..मला क्षमा करा.
सदैव तुमची
अलका
पत्र वाचताना माझा हात थरथरत होता ..डोळ्यातून अश्रू ओघळले ..!
( बाकी पुढील भागात )
-- तुषार पांडुरंग नातू
" मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५
June 21, 2020
ज्या ग्रंथींचा स्राव नलिकेशिवाय थेट रक्तात उतरतो अशा ग्रंथी अंतःस्रावी ग्रंथी, शरीराचे सर्व व्यवहार नियंत्रित करणाऱ्या या ग्रंथी बारा प्रकारच्या असतात. याचे सर्व कार्य रासायनिक संकेतावर शीघ्रतेने चालते. १) पियुषी ऊर्फ पोषग्रंथी (पिच्युइटरी) कवटीच्या आतील खालच्या भागात जतूक अस्थीच्या खड्यासारख्या भागात अधोअभिवाहीमस्तिषक केंद्राखाली (हायपोथॅलॅमस) ही ग्रंथी असते.
June 15, 2023
चित्रपट बघितल्या बघितल्या शक्यतो मी त्यांवर लगेच व्यक्त होत नाही, कारण त्याला टिपिकल ” परीक्षणाचा ” वास येतो. मी सावकाश आतमध्ये मुरवत, त्यांवर माझे आकलन/भाष्य व्यक्त करीत असतो. मात्र आज हा अपवाद ! शक्यतो आकलनाचा सूर लावतोय. ” श्वास “, ” दिठी “, ” अस्तु ” यांनी गाठलेली उंची आणि जगभरातील चित्ररसिकांना ज्या मराठीतील चित्रकृतींची नोंद घ्यावीच लागेल या माळेतील “पांघरूण ” हा चित्रपट आहे.
February 25, 2022
एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत.
December 3, 2021
खरं तर ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव’साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात ‘नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार’ हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी ‘नभी चंद्रमा धवल पौर्णिमा’ हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर’ हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं.
June 22, 2026
भारतीय आहार पद्धतीमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्याबरोबरच यात उत्तम औषधी गुणधर्म आढळतात. म्हणून अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. एक नजर टाकुयात कांदा खाण्याच्या फायद्यावर...
कांदा हा थंड असल्याने जर तुमच्या हातावर जळहळ होत असेल तर त्या जागेवर कांदा लावा.
जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर दररोज सकाळी दोन चमचे कांद्याचा रस प्या.
जर एखादा किडा तुमच्या शरिरावर चावला असेल तर त्यावर लगेच कांद्याने घासा. याने तुम्हाला लवकर आराम मिळेल.
सर्दी आणि घशातली खवखव दूर करण्यासाठी नेहमी कांद्याचा रस प्यावा.
जर तुम्हाला कुत्र्याने चावले असेल तर त्या जखमेवर कांदा कापून मधात मिक्स करून लावा. त्याने विषाचा प्रभाव कमी होतो.
कांदा खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास सहजरित्या दूर केला जाऊ शकतो.
मासिक पाळीदरम्यान पोट दुखत असेल किंवा पाळी अनियमित असेल तर कांद्याचं सेवन करावं.
कांदा खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित केला जाऊ शकते. शिवाय कोलेस्ट्रॉलही नियंत्रित ठेवता येतो.
ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे. त्यांच्यासाठी कांदा रामबाण आहे. दररोज कांदा खाल्ल्याने हृदयाचे आजारांचा धोका कमी होतो.
मुलांना अतिसार झाल्यास कांदा बारीक करून त्यांच्या नाभिवर लावा किंवा कपड्यात बांधून पोटावर लावा.
कांद्याच्या सेवनाने चांगली झोप येते आणि कॅलरी बर्न होण्यासही कांद्याची मदत होते.
तणाव कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात कांद्याचा वापर करावा.
मधुमेहग्रस्त लोकांनी तसेच ज्यांचे केस गळतात त्यांनी कांदा खावा.
कांदा खाल्ल्याने शुक्राणू संख्या आणि गुणवत्ता वाढते.
April 22, 2017
एकदा सदगुरु आणि देव असे दोघे एका शिष्याच्या घरी येतात तेव्हा शिष्य पहिल्यांदा देवांच्या पायाजवळ नमस्कार करायला जातो, देव त्याला म्हणतात , "तु पहिले सदगुरूंना नमस्कार केला पाहिजेस".
जेव्हा शिष्य हा सदगुरूंच्या पायापाशी जातो तेव्हा सदगुरु म्हणतात "मी देवाला तुझ्या घरी आणले आहे त्यामुळे पहिला देवाला नमस्कार कर."
शिष्य परत देवाच्या चरणाजवळ येतो, तेव्हा देव म्हणतो "तुझ्या सदगुरुंनी देवाला तुझ्या आयुष्यात आणले आहे, त्यांनी माझा लाडका भक्त होण्याचा मार्ग तुला सांगितला त्यामुळं पहिला सदगुरूंच्या चरणांपाशी जा."
जेव्हा भक्त सदगुरूंच्या चरणांजवळ जातो तेव्हा सदगुरु म्हणतात, मी तुला फक्त भक्तीचा मार्ग सांगितला *पण् देवाने तुला निर्माण केलय,नाही कां ?त्या मुळे जा आणि पहिला देवाच्या चरणाशी नतमस्तक हो. त्यानंतर तो भक्त देवाच्या चरणाजवळ गेला तेव्हा देव म्हणाले थांब हे सगळं बरोबर आहे . पण आता मी तुला देवाची आणि गुरूंची प्रमुख तत्व सांगणार आहे.
देवाच्या तत्वात - : माझ्या कडे न्याय व्यवस्था आहे. जर कां तु चांगलं कार्य केलंस तर तुला त्याचं चांगलंच फळ मिळेल, चांगलं आयुष्य मिळेल आणि मुक्ति मिळेल.
पण जर कां तु वाईट कर्म केलीस तर तुला तर त्याचे वाईटच फळ मिळेल. तुला शिक्षा होईल . तु या मायाजालात अडकशील आणि त्यात बुडुन जाशील आणि तुझा आत्मा संघर्ष करीत राहील.
आता तुला गुरूंची तत्वे सांगतो. : जेव्हा तुम्ही सदगुरुकडे जाता तेव्हा ती प्रेमळ शांत मूर्ति असते. तुम्ही कसेही असाल, कसेही वागत असाल तुमची कर्मे कशीही असली तरीही ते आपल्या शिष्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेतात. ते आपल्या शिष्याला शुद्ध करतात आणि मग माझ्या चरणाशी आणतात.
त्यामुळे सदगुरु कधीही कोणालाही स्वतःहून आपल्या पासून दूर लोटत नाहीत. तर उलट ते आपल्या शिष्यात हिऱ्या प्रमाणे पैलू पाडतात त्याला शुद्ध करून मग माझ्या चरणाशी आणतात.
त्या मुळे मी नेहमी पृथ्वीवर सदगुरूच्या रूपातच येतो.
June 14, 2017
येवले – औरंगाबाद मार्गावर, म्हणजे येवल्या पासून तेरा मैलावर कोटम हे गांव असून, या ठिकाणी “महालक्ष्मी”, “महासरस्वती” व “महाकाली” या तीन देवींची मंदिरं आहेत.
October 5, 2013
विषय अर्थातच नुकत्याच लागलेल्या इयत्ता १० वी किंवा एसएससीच्या निकालाचा आहे. या विषयावर गेल्या पाच-सहा दिवसांत इतकं उलट-सुलट लिहीलं, बोललं गेलंय, की आता त्याचा कंटाळा येऊ लागलाय. खरी मेख इथंच आहे, आपल्याला कंटाळा किंवा आनंद अगदी तत्परतेने वाटतो पण अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीवर ‘असं का व्हावं’ असा शांतपणे विचार करावासा वाटत नाही.
June 22, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti