वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते.
October 24, 2011
बऱ्याच वेळेला पेपरचं पान उघडलं की कोणाच्या तरी अचानक मृत्यूची बातमी आपलं लक्ष वेधून घेते. इतक्या लहान वयात असं कसं झालं? नुकतंच लग्न झालं होतं. लहान मुलं देखील आहेत, आता त्यांचं कसं होणार? यासारख्या विचारांनी त्याच्या कुटुंबियांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सहानुभूतीची भावना निर्माण होते. त्याच्या जागी आपणही असू शकतो या जाणिवेने एक थंड शिरशिरी डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला अक्षरशः थिजवून जाते. एखाद्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर घरी परत येऊ का? असा अपशकुनी विचारही मनात येऊन जातो. नेमका काय हा प्रकार आहे?
June 2, 2019
आयुष्य मर्म किंवा तत्त्व, त्याचा अर्थ कधी कधी खाच खळगे व कठीण परिस्थितीला सामोरे गेल्यावर उलगडत जातो. नेमकं जीवनातील महत्त्व आणि त्याचा शोध म्हणजे “७२ मैल-एक प्रवास” हा सिनेमा आहे.
August 19, 2013
कणखर आवाज, बोलके डोळे, ग्रामीण भाषा, साधी वेशभूषा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आई मुलांचे नातेसंबंध साकारताना, त्यांनी दादांना कधी गावरान शिव्या देखील दिल्या तर कधी त्या हळव्या झाल्या. पूर्वीच्या चित्रपटातील, आईची प्रतिमा बदलून टाकणाऱ्या रत्नमाला, खाजगी जीवनातही स्वतःच्या मुलाविषयी संवेदनशील होत्या.
June 27, 2022
प्रकाशितात्मतत्वक- साधकांच्या आत्मतत्वाला प्रकाशित करणारे. त्यावर पडलेला मायेचा मळ दूर करणारे.
अशा भगवान गणाधिपांना मी वंदन करतो.
January 24, 2020
भगवान श्रीरामचंद्रांनी लंकेवर चढाई करण्यापूर्वी सेतुबंधासाठी आणि लंका विजयासाठी विशेष अनुष्ठान स्वरूपात ज्या स्थानाची निर्मिती केली ते लोकोत्तर स्थान म्हणजे श्रीक्षेत्र रामेश्वर.
September 13, 2020
हल्लीचा जो hot topic आहे तो म्हणजे गणेशोत्सव कुणी साजरा करायला सुरुवात केली…?? एक- दोन पुस्तकात श्री. भाऊ रंगारी यांचा उल्लेख मिळतो की श्री. भाऊ रंगारी यांनी सुरुवात केली तर काही इंग्रजी लेखकांच्या पुस्तकात श्री. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाची सुरुवात केली असे लिहिलेले आढळून येते. इथे जर पाहायला गेलो तर श्री. भाऊ रंगारी यांचा असा उद्देश कुठेही दिसत नाही की या उत्सवाला लोकचळवळीचे स्वरूप द्यायचे म्हणून त्यामुळे फार फार तर घरातल्या गणपतीला दारात आणून बसवला असे या कृतीचे वर्णन करता येईल.
August 29, 2017
व्याधिक्षमत्व म्हणजे शरीराची व्याधीपासून संरक्षण करण्याची शरीराची क्षमता . यालाच Immunity किंवा प्रतिकारशक्ती आपण म्हणू शकतो . एखादा आजार होऊ नये म्हणून शरीर स्वाभाविकपणे नैसर्गिक तत्त्वांनुसार स्वतःची काळजी घेत असते .
November 15, 2022
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः कालो जगदभक्षकः ।
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला विद्युच्चलं जीवितं
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना ॥१५॥
या नश्वर जगातून वाचवण्यासाठी ईश्वर असणाऱ्या भगवंताला आचार्य श्री प्रार्थना करीत आहेत. ते सांगतात,
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं - पहा! हे आयुष्य रोज कमी कमी होत चालले आहे. वास्तविक आयुष्यातील एक दिवस कमी होणे म्हणजे ईश्वरी सेवेची एक संधी नष्ट होणे आहे. वाढत्या वयासोबत ही जाणीव वाढली नाही, तर वाढ नेमकी कशाची?
याति क्षयं यौवनं- तारुण्य लयाला जात आहे. पर्यायाने क्षमता नष्ट होत आहेत.
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः - एकदा गेलेला दिवस कधीही परत येत नाही. शेवटी पश्चातापच करावा लागेल.
कालो जगदभक्षकः - काळ हा संपूर्ण विश्वाचे भक्षण करणारा आहे. त्याच्या तावडीतून आजपर्यंत कोणी सुटला नाही. आपणही सुटण्याची शक्यता नाही.
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला - ज्या पैशाच्या आधारावर आपण स्वतःला सुरक्षित समजतो तो पैसा पाण्यावरच्या तरंगा प्रमाणे चंचल आहे. कधी, कुठून आणि कसा निघून जाईल सांगता येत नाही. या जगातील मोठमोठी साम्राज्ये, राजसत्ता नष्ट झाल्या मग माझ्या पैशाचा पाड तो किती?
विद्युच्चलं जीवितं - विजे प्रमाणे जीवन चपल आहे. विजे प्रमाणेच त्याला धरून ठेवता येत नाही. अनेकदा ते धक्केच देते.
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना - त्यामुळे शरण आलेल्या माझे, हे शरण देणाऱ्या भगवंता आता आपणच रक्षण करा.
या जगात आपल्या शिवाय सर्व नश्वर आहे. त्यामुळे मी आपल्याला शरण आलो आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
August 3, 2020
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 24-दीपं दर्शयामी-भाग एक
जो स्वतःच दीपक आहे, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो दुसऱ्यांना योग्य मार्गाने नेतो, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो मार्गदर्शक आहे, त्यालाच मार्ग सांगण्या सारखे आहे. मग देवाला दिवा का दाखवायचा ?
सातच्या आत घरात नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला, त्यात एक सुंदर संवाद आहे. " आमच्याकडे कापसाची शेतं लावली आहेत, आणि घरात तेल जास्ती झालंय म्हणून नाही दिवा लावत आपण. तर जे अनाकलनीय आहे, ते तुझ्या दिव्यत्वाच्या प्रकाशानं उजळून जाऊ दे ! अज्ञानाचा जो अंधःकार आमच्या मनात आहे, तो तुझ्या प्रकाशाने निघून जाऊ दे, अशी प्रार्थना असते दिव्याकडे ! "
आपल्याकडे अजून तरी देवघर नावाचा, कोनाडा का होईना, शिल्लक असलेल्या जागेत थोडी जागा राखीव ठेवलेली असते. त्यात रात्री मधेच उठल्यानंतर आपल्याला दिसावे, म्हणून देवाच्या डोक्यावर एक दिवा टांगून ठेवलेला असतो. इलेक्ट्रीक झिरोचा किंवा आता एलईडीचा ! न जाणो रात्री देव आलाच तर ? म्हणून म्हणायचं दिवा लावला देवापाशी......
जे जे देवासाठी ते ते देहासाठी, असा विषय आपण बघत असल्याने या दिव्याचा देहरक्षणासाठी काय उपयोग आहे ? बरं हे इलेक्ट्रीकचे दिवे आत्ताचे ! त्यापूर्वी काय होते ? तेलाचे दिवे आणि तूपाचे निरांजन. काय एवढा फरक आहे इलेक्ट्रीकच्या दिव्यात आणि तेल तूपाच्या दिव्यात ?
आता हेच पहा ना, रस्त्यावर रात्रभर जळणारे जे हायमास्क दिवे आहेत, त्यावर किती छोटे छोटे किटक पिंगा घालत असतात ? पिंगाच तो. नुसते गोल गोल फिरत राहायचे. काम काही नाही. फायदा शून्य.
या किटकांना प्रकाशाचे प्रचंड आकर्षण असते. जिथे प्रकाश दिसेल तिथे अक्षरशः झडप घालतात. झोकून देतात. हा निसर्गाचा नियम आहे. पतंगाला ओढ प्रकाशाची. हे छोटे छोटे किटक घरात आले तर नुसता उच्छाद असतो. डोक्यात, कानात, डोळ्यात, नाकात, टीव्ही च्या स्क्रीनवर, ट्यूबलाईटवर, बेडवर, पिण्याच्या पाण्यात, आमटी भाजीत, जेवणाच्या ताटातसुद्धा ! काही केल्या जात नाहीत. आला असेल अनुभव प्रत्येकाला कधी ना कधीतरी ! ह. हेच तर मला सांगायचंय. हे किटक या दिव्यांवर मस्त खेळत असतात. आणि आपल्याला छान खेळवत असतात.
या किटकांचा त्रास घालवण्यासाठी एक जालीम उपाय आहे. देवापुढे दिवा लावणे. हा दिवा इलेक्ट्रीकचा नको. तेलाचा किंवा तुपाचा हवा. काय होईल ? या दिव्याच्या पेटत्या ज्योतीकडे हे क्षुद्र किटक आकर्षित होतात. आणि या ज्योतीत जळून जातात. चक्क मरतात. हा निसर्ग आहे. किटक मरणे ही चांगली गोष्ट झाली ना. नाहीतर त्यांचा बल्बवर चाललेला पिंगा बघत रहाण्या पलीकडे आपण काही करू शकत नाही.
जे आपण करू शकत नाही, ते छोटी पेटती पणती करते. उपद्रवी किटकांना मारते. कायमचे !
जसे हे काही उपद्रवी किटक डोळ्यांना दिसतात, तसे काही सूक्ष्म जीवही असतात, जे डोळ्यांनाही दिसत नाहीत, ते सूक्ष्म जीव देखील या पेणत्या पणतीच्या ज्योतीवर जणुकाही आत्महत्याच करतात. काम तमाम ! वातावरण शुद्ध ! निर्जंतुक !
दिवा देवासाठी, आरोग्य आपल्यासाठी !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.06.2017
June 17, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti