(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतरत्न, दादासाहेब फाळके आणि वाद

    भारतात अनेक पुरस्कार सोहळे पार पडतात, मग त्यावर अनेक दिवस चर्चा रंगतात, नामांकनं कोणाला मिळाली आहेत, विजेते कोण? वगैरे; पण जर का पुरस्कार किंवा सन्मान राष्ट्रीय पातळीवरील असे, तर त्याविषयी अनेकांना आत्मियता वाटते तर अनेकांचा हिरमोड होतो आणि मग थेट पुरस्कार निवड समितीवर आरोपांच्या फैरी झडतात.

      June 19, 2013


  • महान श्रीकृष्णभक्त प्रल्हाद महाराजांची दिव्य शिकवण

    मानवी आयुष्याचे गणित लक्षात घेऊन भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यातच खरे शहाणपण आहे. यासाठी वेळ न दवडता अभी नही तो कभी नही हे सूत्र ध्यानात ठेवावे.

      December 27, 2010


  • मनाचे श्लोक – १६१ ते १७०

    अहंतागुणे सर्वही दुःख होते | मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते |
    सुखी राहता सर्वही सूख आहे | अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे ||161||

    अहंतागुणे नीति सांडी विवेकी | अनीतीबळे श्र्लाघ्यता सर्व लोकी |
    परी अंतरी सर्वही साक्ष येते | पःमाणांतरे बुेि सांडूनि जाते ||162||

    देहेबुेिचा निश्र्चयो दृढ झाला | देहातीत ते हीत सांडीत गेला |
    देहेबुेि ते आत्मबुेि करावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||163||

    मने कल्पिला वीषयो सोडवावा | मने देव निर्गूण तो वोळखावा |
    मने कल्पिता कल्पना ते सरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||164||

    देहादीक पःपंच हा चिंतियेला | परी अंतरी लोभ निश्र्चीत ठेला |
    हरीचिंतने मुक्तिकांता वरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||165||

    अहंकार विस्तारला या देहाचा | स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा |
    बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||166||

    बरा निश्र्चयो शाश्र्वताचा करावा | म्हणे दास संदेह तो विसरावा |
    घडीने घडी सार्थकाची करावी | सदा संगती सज्ज्नाची धरावी ||167||

    करी वृत्ति जो संत तो संत तो संत जाणा | दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा |
    उपाधी देहेबुेिते वाढवीते | परी सज्जना केवि बाधू शके ते ||168||

    नसे अंत आनंत संता पुसावा | अहंकार विस्तार हा नीरसावा |
    गुणेविण निर्गूण तो आठवावा | देहेबुेिचा आठवो नाठवावा ||169||

    देहेबुेि हे ज्ञानबोधे त्यजावी | विवेके तये वस्तुची भेट घ्यावी |
    तदाकार हे वृत्ति नाही स्वभावें | म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे ||170||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      January 22, 2016


  • आत्मनिर्भर व्हायचं आहे ? तर मग त्या करता . . .

    आधी कोविडची साथ; त्या नंतर सीमे वर चीनची आगळिक; संतापलेल्या भारतीयांनी चीनी वस्तूं वर बहिष्कार टाकण्या करता दिलेली हांक; आणि शेवटी झालेली जाणीव की आपली अर्थ व्यवस्था चीन मधून आयात केलेल्या वस्तूंवर येवढी अवलंबून आहे की आपण फार काही वस्तूं वर बहिष्कार टाकूच शकत नाही. या सर्व घडामोडींच्या निमित्ताने काही मुद्दे अधोरेखित झाले आहेत, व त्याची नोंद आत्ताच घेणे गरजेचे आहे. कारण एकदा का सीमे वर परत शांतता झाली, कोविड संक्रमण आटोक्यात आले, की हे मुद्दे आपल्या करता महत्वाचे राहणार नाहीत.

      July 24, 2020


  • अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ३

    आमच्यासारखंच आणखीन एक कुटुंब, गुर्जरांच्या घरी येऊन डेरे दाखल झालं होतं. माधवराव आणि नलिनीबाई देशमुख हे साधारण पन्नास पंचावन्नच्या आसपासचं जोडपं आणि नितीन व निकीता ही त्यांची मुलं. देशमुख कुटुंबदेखील आमच्यासारखंच नवशिकं! त्यांचा देखील हा थॅंक्सगिव्हींगचा पहिलाच सेल. गुर्जरांनी तीन चार वर्ष अमेरिकेत काढली असल्यामुळे ते अनुभवी झाले होते. त्यामुळे ओघानेच नेतृत्वाची जबाबदारी अनुपमाकडे आली. “प्लॅनिंग पक्कं पाहिजे” तिने अनुभवाचे बोल ऐकवले.

    आम्ही सगळेजण fliers बघण्यात गर्क झालो होतो. मोठमोठया स्टोअर्सचे तर सात आठ पानी fliers होते. त्यात चपलांपासून लॅपटॉप पर्यंत आणि बार्बी डॉल पासून बेडरूम मधल्या फर्निचर पर्यंत, सार्‍या गोष्टींच्या रंगीबेरंगी आकर्षक जाहिराती होत्या. काय बघू आणि काय नको ते समजेनासं झालं होतं. शेवटी मी चक्क एका कागदावर वेगवेगळ्या स्टोअर्सची यादी केली, त्यांच्यापुढे ते ऑफर करत असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या DVD – VCR players ची मॉडेल्स, त्यांच्या किंमती, त्या प्रत्येकाचा rebate, rebate वजा करता येणारी रक्कम असं एक मोठं कोष्टक तयार केलं. एक दीड तासाची मेहनत झाली पण निदान काय घ्यायचं आहे, हे तरी नक्की झालं.

    गुर्जरांच्या दिवाणखान्याला एखाद्या युद्धकालीन नियंत्रण कक्षाचे (war office) स्वरूप आले होते. वर्तमानपत्रांचा आणि fliers चा पसारा, त्यात आपल्याला हवे असलेले नेमके पान शोधण्यासाठी प्रत्येकाची चाललेली धडपड, आरडा ओरडा, कॅलक्युलेटरवर किंमती व rebates चे कॅलक्युलेशन, असा सगळा गोंधळ चालला होता. “अगं बाई, तू कॅलक्युलेशन करू नकोस. चुकीचं कॅलक्युलेशन करशील आणि आपण भलतंच मॉडेल घेऊन येऊ”. “एवढं काही येता जाता माझं मॅथेमॅटिक्स काढायला नकोय” असे खटकेबाज प्रेमळ संवाद सुरू होते.

    तासा दीडतासाच्या धुमश्चक्री नंतर, आमचे DVD – VCR player चे मॉडेल ठरले. कोणत्या स्टोअर मधून, कोणते मॉडेल, किती किंमतीला, वगैरे तपशील पक्के झाले. एवढयात अनुपमाने गुगली टाकला, “तुम्ही DVD –VCR player चे एकत्रित मॉडेल बघताय मग दोघांची वेगवेगळी मॉडेल्स का बघत नाही? ” झालं! परत मारामारी सुरू ! मग मी DVD players ची मॉडेल्स आणि मृणालने VCR players ची मॉडेल्स बघायला सुरुवात केली. पण शेवटी हा खटाटोप कामी आला. कारण DVD players आणि VCR players वेगवेगळे घेतले तर त्यांची किंमत DVD-VCR players च्या मॉडेल्स पेक्षा कमी होती. प्रत्यक्ष युद्धावर जाण्यापूर्वीच आपली व्यूह रचना यशस्वी होतेय हे बघून आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या.

    देशमुख कुटुंब मात्र अजूनही भांबावलेलंच होतं. नक्की काय घ्यावं याचा त्यांचा विचार काही पक्का होत नव्हता, आणि आता तर एवढया जाहिराती आणि fliers पाहून ते आणखीनच चक्रावून गेले होते. “बघा बघा जरा त्यांच्याकडे, शिका काही तरी व्यवस्थितपणा ” नलिनीबाई माधवरावांना बोलल्या. “अगं त्यांचं काय, ते ठरवूनच आले होते DVD-VCR player घ्यायचं म्हणून, इथे येऊन त्यांना फक्त मॉडेल निवडायचं होतं. तुझं कुठे काय घ्यायचंय ते ठरतंय काय? पन्नास गोष्टीत जीव अडकलेला तुझा ”. शेवटी बर्‍याच हाणामारीनंतर देशमुख कुटुंबाची देखील यादी तयार झाली.

    रात्री जेवणं झाल्यावर पुढच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली. पहिल्यांदा कोण कोण जाणार हे ठरवायला हवं होतं. श्रीयुत गुर्जरांना एवढया पहाटे थंडीत कुडकुडत खरेदीला जाण्यात इंटरेस्ट नव्हता म्हणून आणि आमचा मुलगा सिद्धार्थ लहान म्हणून, त्या दोघांनी घरीच झोपून रहायचं असं ठरवलं. मग किती गाडया न्यायच्या आणि कोण कोणाबरोबर कोणाच्या गाडीतून कुठे जाणार याचं प्लॅनिंग सुरू झालं. नशीबाने दुकानं एकमेकांपासून फार लांब लांब नव्हती. परंतु विकत घ्यायच्या वस्तू बर्‍याच होत्या आणि त्या वेगवेगळ्या दुकानांतून घ्यायच्या होत्या. त्यामुळे कोणी किती वाजतां कोणत्या दुकानाच्या रांगेत उभे रहायचं, तिथलं शॉपिंग संपलं की पुढे कुठच्या दुकानात जायचं वगैरे बारकावे भरपूर होते.

    “आपण बाबांना एका दुकानाच्या रांगेत उभं करू आणि आपण पुढच्या दुकानात जाऊ” देशमुखांच्या कन्येनं सुचवून बघितलं. “तुझ्या बाबांना आणि एकटं ? झालं कल्याण! त्यांना ख्रिसमस येईपर्यंत एक देखील वस्तू मिळायची नाही. नुसते गोल गोल फिरत राहतील दुकानभर.” नलिनीबाईंनी तो प्रस्ताव तात्काळ हाणून पाडला. मग मी, माधवराव आणि त्यांचा मुलगा, आम्ही एकत्र एके ठिकाणी जावे आणि सर्व बायकांनी एका ठिकाणी जावे, असा एक विचार पुढे आला. पण तीन चार जणांनी एकाच रांगेत उभं राहण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहणं अधिक शहाणपणाचं आहे असं अनुपमाचं मत पडलं. अर्थात तिच्या मताला अनुभवाचं वजन असल्यामुळे ते लगेच मान्यही झालं. शेवटी मी आणि माधवराव एके ठिकाणी आणि बाकी सर्वजण दुसर्‍या दोन ठिकाणी विखरून उभं राहण्याचा प्लॅन सर्वांनुमते संमत झाला.

    – डॉ. संजीव चौबळ

      March 26, 2016


  • तोंडाच्या स्वच्छतेसाठी माउथवॉश

    बराच वेळ तोंड बंद असेल, जसे प्रवासात किंवा सतत काहीतरी खाण्याची सवय असेल तर तोंडातील जिवाणूंची संख्या वाढते आणि तोंडाला दुर्गंधी येते. पाणी कमी पिणे, दातांच्या हिरड्यांचा समस्या, जंतूसंसर्ग अशा अनेक कारणांमुळे तोंडाला दुर्गंधी शकते. अशा येऊ व्यक्तींबरोबर संवाद साधताना ही समस्या जास्त भेडसावते. मौखिक आरोग्य चांगले राहण्यासाठी, मुख्यतः तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी माउथवॉशचा उपयोग केला जातो. टूथपेस्ट आणि माउथवॉशमध्ये असणारी रसायने वेगवेगळी असतात. काही रसायने दोन्ही उत्पादनांत आढळतात. माउथवॉश चूळ भरण्यासाठी वापरली जातात, ज्यामुळे तोंडातील जिवाणू नाहीसे होतात. तोंडातील जिवाणूंमुळे तोंडाला दुर्गंधी येते. श्वासाला उत्साहवर्धक ताजेपणा येण्यासाठी मिंटसारखे फ्लेवर (स्वाद) माउथवॉशमध्ये वापरले जातात.

    माउथवॉशमध्ये अल्कोहोल, क्लोरहेक्झाडाईन ग्लुकोनेट, थायमॉल, सिटाईलपायरीडिनियम क्लोराईड, हेक्झेटिडीन, ट्रायक्लोसन यांतील काही जिवाणूनाशक रसायने वापरलेली असतात. काही माउथवॉशमध्ये फ्लोराईड वापरलेले असते. जिवाणूरोधक रसायनांव्यतिरिक्त स्वाद आणि सुगंधासाठी युकॅलेप्टल, मेंथॉल, मिथाईल सॅलिसिलेट यांचा वापर केला जातो आणि माउथवॉशमधील गोडवा सोडिअम सॅकरीन या रसायनामुळे येतो. माउथवॉशमध्ये जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून प्रिझरव्हेटिव्हचा वापर केला जातो. सोडियम बेंझोएट हे रसायन प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरतात.

    तोंडाची स्वच्छता आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी गुळणी करून स्वच्छता करणे ही पद्धत पूर्वीपासून प्रचलित आहे. हिरड्या फुटण्यावर, हिरड्या आकुंचन करण्यासाठी तुरटीच्या गुळण्या करीत असत. तुरटी म्हणजे अॅल्युमिनियम सल्फेट. माउथवॉशमधील रसायने जंतूनाशकाचे कार्य करतात, हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांमध्ये वेदना होणे यासाठी उपाय म्हणून माउथवॉशचा वापर उपयोगी ठरतो. माउथवॉशने दातात अडकलेले अन्नपदार्थाचे कण काही प्रमाणात निघू शकतात, पण टूथपेस्टच्या साहाय्याने टूथब्रशने दातात अडकलेले अन्नपदार्थांचे कण चांगल्या प्रकारे निघतात.

    ताज्या श्वासासाठी माउथवॉश वापरायला काहीच हरकत नाही. मौखिक आरोग्य चांगले राहिले तर दातांच्या समस्या उद्भवणार नाहीत. माउथवॉश वापरलात तरी टूथब्रश वापरून टूथपेस्टने दातांची चांगली स्वच्छता करणे आवश्यकच आहे.

      May 9, 2023


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २५

    यदा यातनादेहसंदेहवाही
    भवेदात्मदेहे न मोहो महान्मे |
    तदा काशशीतांशुसंकाशमीश
    स्मरारे वपुस्ते नमस्ते स्मराणि ‖ २५ ‖

    मानवाच्या अंतिम अवस्थेचे विविधांगी वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज त्यातील एकेका पैलूला आपल्यासमोर ठेवत आहेत.
    येथे देहासक्ती बद्दल बोलताना आचार्य श्री म्हणतात,

    यदा - ज्यावेळी, अर्थात जेव्हा माझा अंत समय येऊन पोहोचलेला असेल त्यावेळी,
    यातनादेह- आचार्यश्रींनी योजिलेला हा शब्द किती अद्वितीय आहे.
    ते आपल्या शरीराला यातना देह म्हणत आहेत. अर्थात या देहात जीवाला असंख्य यातनाच भोगाव्या लागतात.
    ऊन, वारा, पाऊस इत्यादी बाह्य आणि कामक्रोधादी आंतरिक यातनांनी हा देह सतत ग्रस्त आहे.
    संदेहवाही - संदेह धारण करील. म्हणजे असा हा देह आता टिकेल की नाही? याचा संदेह स्वतः त्या जीवाला आणि जमलेल्या सगळ्यांना वाटेल त्यावेळी.
    यातनादेह हा शब्द शास्त्रात आणखी एका अर्थाने वापरतात. यमलोकांमध्ये किंवा स्वर्गामध्ये गेल्यानंतर केलेल्या पाप-पुण्याच्या फळांना भोगण्यासाठी जे देह प्राप्त होतात. त्यांना भोगदेह म्हणतात.
    पापाचा विचार आधी येत असल्याने नरकातील देहाचा विचार केला. त्याला यातना देहच म्हणतात.
    तो देह मिळण्याची संभावना तयार होईल अर्थात मृत्यूची वेळ येईल तेव्हा,
    भवेदात्मदेहे न मोहो महान्मे - मला माझ्या या देहाच्या बाबतीत अत्यंत बळकट आसणारा मोह होऊ नये. अर्थात मी यामध्ये अडकू नये.
    तदा - त्यावेळी,
    काश - काश नावाचे पुष्प,
    शीतांशु - ज्याची अंशु म्हणजे किरणे शीत आहेत असा, चंद्र.
    संकाशम्- समान पांढरेशुभ्र असणारे,
    ईश - हे भगवान शंकरा !
    स्मरारे - हे कामदेव विनाशका,
    वपुस्ते नमस्ते स्मराणि- हे भगवंता मी त्या आपल्या चंद्रधवल शरीराचे स्मरण करो. आपल्याला वंदन असो

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 4, 2020


  • अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – २

    कोलंबसने १४९२ साली अमेरिकेचा मार्ग शोधल्यापासून, युरोपमधे या नवीन जगाविषयीचे कुतूहल चाळवले गेले होते. युरोपातल्या त्या काळच्या धार्मिक आणि सरंजामशाही वातावरणाला सामान्य जनता विटली होती. कर्मठ परंपरांनी धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी झाली होती. सरंजामशाहीमुळे, मुठभर गर्भश्रीमंतांच्या हातात सार्‍या जमिनीची मालकी एकवटली होती आणि उरलेली जनता कष्टाच्या व दारिद्र्याच्या ओझ्याखाली पिचत होती. त्यामुळे एका सर्वस्वी नव्या अशा जगाचे दरवाजे अचानक उघडल्यावर, जुन्या जोखडातून सुटका करून घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी लोक धावले नसते तरच नवल !

    युरोपातून नवीन जगात येताना हे लोक आपल्याबरोबर परंपरा, धार्मिक रुढी, रीतिरिवाज, कायदेकानून यांच्याच बरोबर, नवीन जमिनीचा ध्यास देखील घेऊन आले. नवीन जगामध्ये जमीन मिळवणं हा एक जगण्याचा महामंत्रच झाला. जमिनीच्या आधारे लोकांना एक उपजीवीकेचे साधन मिळाले तसेच त्यायोगे त्यांना संपत्तीसाधन करता येऊ लागलं. येवढेच नव्हे तर जमिनीच्या मालकी हक्काद्वारे सामाजिक जीवनाची वरची पायरी गाठता येऊ लागली. युरोपातल्या रीतिरिवाज आणि कायदेकानूनांच्या आधारे, जमिनीच्या मालकी हक्कानुसार, लोकांना अनेक सामाजिक हक्क मिळू लागले. अनेकदा जमिनीच्या मालकी हक्कानुसार पुरुषांना मतदानाचा हक्क मिळू लागला.

    युरोपातून येऊन वसाहती करून राहिलेल्या रहिवाशांचा शेतीव्यवसायाकडे कल होता. त्यामुळे जमीन वाटपाला महत्व आले होते. त्यावेळी जमीन मिळवण्याचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात होते आणि एकंदरीतच, युरोपपेक्षा या नवीन जगात जमीन मिळवणे सोपे होते. जमिनीवर मालकी हक्क सांगण्यासाठी जमिनीचे सर्वेक्षण व नोंद करणारी सर्वमान्य पद्धत असणे आवश्यक होते. सुरवातीच्या जमिनीच्या सर्वेक्षणाच्या पद्धती फारच ढोबळ होत्या. केवळ नदी, ओढे, झाडांच्या आधारे केलेल्या जमीन सर्वेक्षणात खूप त्रुटी असायच्या आणि जमीन वाटपाचे पर्यवसान भांडणात आणि कोर्टातल्या खटल्यात होणं ही नित्याची बाब होती.

    १७७६ सालच्या अमेरिकेन क्रांतीमुळे जमीन वाटपाच्या पद्धतीला आणखी वेगळंच वळण मिळालं. पश्चिमेला प्रचंड मोठी जमीन नव्यानेच उपलब्ध झाली होती. ही जमीन केंद्रीय सरकारच्या अखत्यारीतील असल्यामुळे, १७८५ साली एक कायदा करुन, सरकारने जमीन सर्वेक्षणाची नवी पद्धत रूढ केली. चौकडीच्या (grid) स्वरूपात जमिनीची वाटणी करावी आणि प्रत्येक गावाच्या वाटणीला ३६ तुकडे यावेत, अशी साधारण योजना मंजूर झाली. सुरवातीला या कायद्यानुसार कमीत कमी ६४० एकराचा जमिनीचा तुकडा, एकरी १ डॉलर या भावाने लिलावात विकला जावा, अशी तजवीज होती. परंतु कमीत कमी ६४० एकर जमिनीचा तुकडा विकण्याच्या अटीमुळे, ही जमीन बर्‍याच सामान्य शेतकर्‍यांच्या आवाक्या बाहेरची होती. परंतु धनाढय मंडळी मात्र सरकारवर दबाव आणून, एकरी १ डॉलर पेक्षा देखील कमी दराने मोठमोठे जमिनीचे तुकडे मिळवून गिळंकृत करू लागली.

    त्यावेळी अमेरिकन राजकारणात, Federalist आणि Anti-Federalist असे दोन पक्ष होते. Federalist पक्षाच्या मते, जमिनीचा भाव अधिक असणे महत्वाचे होते. त्यामुळे सरकारी तिजोरीत पैशाची भर पडण्यास मदत झाली असती. तसेच जमिनीचे छोटे छोटे तुकडे करण्यापेक्षा, थोड्याच पण धनाढ्य लोकांच्या हातात जमिनीचे मालकी हक्क एकवटणे सोईस्कर ठरले असते. या उलट Anti-Federalist पक्षाच्या मतानुसार, अमेरिकन समाज शेती प्रधान राहील अशी अपेक्षा होती. त्यामुळे थोडयाशाच श्रीमंतांच्या हातात जमिनीचे हक्क एकवटण्यापेक्षा, अनेक छोटया किंवा मध्यम शेतकर्‍यांच्या हातात जमिनीची मालकी असणे महत्वाचे होते. या विचार सरणी प्रमाणे, जमिनीच्या किंमती सामान्य माणसाला परवडतील अशा असणे जरूरीचे होते.

    पुढे सरकारने जमीन वाटपासंदर्भात बरेच प्रयोग करून पाहिले. जमीन विकत घेण्यासाठी कर्जाची सोय केली, कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रफळाची अट, ६४० एकरांवरून ८० एकरांपर्यंत खाली आणली आणि जमिनीचा दर एकरी १ डॉलर वरून २ डॉलरपर्यंत वाढवून बघितला.

    १८६१ ते १८६५ च्या अमेरिकन यादवी युद्धामुळे राज्या राज्यांमधले ताण तणाव अधिक उघडपणे दृष्टीस पडू लागले. पश्चिमेकडे होणारा विस्तार, देशाची आर्थिक घडी आणि गुलामगिरी या प्रश्नांवर, उत्तरेकडच्या औद्योगिक आणि दक्षिणेच्या शेतीप्रधान राज्यांमधे युद्धाला तोंड फुटले. दक्षिणेकडची राज्ये फुटून निघाल्यामुळे देशाच्या राजकारणात मोठाच बदल झाला. सरकारने पश्चिमेकडच्या विकासासंदर्भात आणि जमिनीच्या वाटपासंदर्भात अधिक उदारमतवादी धोरण स्विकारले. परिणामस्वरूप, १८६२ साली Homestead Act पास झाला. या कायद्यानुसार कोणाही घरचा २१ वर्षांहून अधिक वयाचा पुरुष अथवा स्त्री, १६० एकर जमिनीवर पूर्णपणे विनामूल्य हक्क सांगू लागला. अट एवढीच की त्या जमिनीवर त्या शेतकर्‍याने कमीत कमी ५ वर्षे रहावे आणि तिथे झाडं तोडून जमीन साफ करणे, जमिनीची मशागत करून ती शेतीलायक करणे, घर आणि जनावरांसाठी गोठे बांधणे, अशा सुधारणा कराव्यात. जर जमिनीवर अधिक लवकर हक्क प्रस्थापित करायचा असेल, तर ६ महिन्या नंतर एकरी १.२५ डॉलर एवढी रक्कम भरली, की काम झाले !

    पुढे देखील, १९ व्या शतकाच्या उरलेल्या दशकांमधे, सरकारने विविध कायदे सुधारणा करून जमिनीचे वाटप चालूच ठेवले. १८७३ च्या Timber Culture Act नुसार, शेतकर्‍यांना ४० एकर जमिनीवर झाडे लावण्याच्या मोबदल्यात १६० एकर जमीन मोफत मिळू लागली. जसजसं पश्चिमेला जावं, तसतशी जमीन अधिकाधिक रुक्ष होत गेली होती. त्यामुळे तिथल्या जमिनीसाठी वेगळे कायदेकानून असणे जरूरी होते. १८७७ सालच्या Desert Lands Act नुसार, शेतकर्‍यांना एकरी १.२५ डॉलरच्या भावाने, ६४० एकर जमीन मिळत होती. अट इतकीच, की त्यांनी तीन वर्षांत तेथे जलसिंचनाची व्यवस्था करावी. Homestead Act मुळे विविध प्रकारचे लोक जमिनी घेण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी जमिनीचा वापर वेगवेळ्या कारणांसाठी केला. परंतु इतर Acts मुळे, शक्यतो मोठया प्रमाणावर जमिनी विकत घेऊन, त्यांचा वापर चराऊ कुरणांसारखा करण्याचा उद्योग मोठया प्रमाणावर सुरू झाला.

    १९०२ सालच्या Reclamation Act नुसार मोठमोठे जलसिंचनाचे प्रकल्प सुरू करण्यावर भर देण्यात आला. याचं फलस्वरूप म्हणून पश्चिमेकडच्या रुक्ष जमिनीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. या कायद्यानुसार, त्या भागात जमिनीचा ताबा घेतलेल्या लोकांचाच पैसा १० वर्षांपर्यंत वापरून, सरकारने ह्या जलसिंचनाच्या प्रकल्पांना हातभार लागेल, अशी योजना केली होती. या कायद्यामुळे, विसाव्या शतकातल्या सरकारच्या जमीन वाटपाच्या धोरणातील बदलाची नांदी झाली.

    या नवीन धोरणानुसार, शेतकर्‍यांना केवळ जमिनीचे वाटप न करता, त्या जमिनीचा त्यांना अधिकाधिक उपयोग कसा करता येईल, यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला. पुढे १९३४ च्या Taylor Grazing Act नुसार Homesteading ची प्रथा पूर्णपणे बंद झाली. यामुळे देशाच्या जमिनीवर खाजगी लोकांचा मालकी हक्क वाढला आणि त्या जमिनींवर यशस्वी होण्यासाठी लोकांना अधिकाधिक संधी मिळतील याची काळजी घेण्यासाठी सरकार अधिकाधिक कटीबद्ध झाले.

    अमेरिकन वेस्ट म्हटलं की सर्वसाधारण वेस्टर्न चित्रपटांनी दाखवल्याप्रमाणे, घोडदौड करून तुफान गोळीबार करणार्‍या काऊबॉइजचं चित्र आपल्या डोळ्यां समोर तरळून जातं. परंतु खरा इतिहास काही इतका रंजक किंवा आकर्षक नाही. चित्रपटांनी रंगवलेल्या भव्यदिव्य काल्पनिकतेपेक्षा वास्तव अगदीच साधेसुधे व रूक्ष होते. अफाट आणि अविकसित अशा “वेस्ट़”ला काबुत आणण्याचे काम खरं तर तीन साध्या सुधारणांनी केलं – नांगराचा लोखंडी फाळ, काटेरी तार आणि इकडून तिकडे सहज नेण्यासारखी पवनचक्की.

    प्रेअरीवरचे गवत म्हणजे उंच सळसळणारे. पण या गवताची मुळे खूप लांबवर पसरून जमिनीला घट्ट पकडून राहणारी. त्यामुळे प्रेअरीवरची जमीन खोदायची म्हटली की या मुळांनी जखडून ठेवलेल्या घट्ट जमिनीशी झटापट करावी लागायची. १९ व्या शतकाच्या सुरवातीचे नांगरांचे लाकडी फाळ, ही टणक जमीन आणि त्यातला गवताच्या मुळांचा गुंता, यांच्याशी टक्कर घेता घेता मोडून पडायचे. किंवा अगदीच नांगर मोडला नाही तर ही जमीन नांगराण्यासाठी चक्क आठ दहा बैल लावावे लागायचे. १८३७ साली जॉन डीर या माणसाने लोखंडाचा मोठा सुबक असा फाळ बनवला आणि प्रेअरीवरची जमीन अमेरिकन शेतकर्‍यांच्या कह्यात आली.

    चहूदिशांना अफाट पसरलेल्या या जमिनीवर गाई, गुरं काबूत ठेवायची, म्हणजे एक दिव्यच असायचं. पूर्वेकडच्या किनारपट्टीसारखी इथे प्रेअरीवर जंगले नव्हती, किंबहुना एकंदरीत झाडांचीच कमतरता, त्यामुळे लाकडाची कुंपणं घालणं शक्य नव्हतं. मग १८७४ साली, जोसेफ ग्लीडन नावाच्या माणसाने लोखंडाच्या तारेला, तारेचेच छोटे छोटे टोकदार तुकडे जोडून काटेरी तार तयार केली. त्या काळी या काटेरी तारेचे वर्णन मोठं समर्पकपणे “हवेपेक्षा वजनाला हलकी, व्हिस्कीपेक्षा ताकदवान आणि मातीपेक्षा स्वस्त” असं करण्यात आलं होतं. यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी या तारेने जनावरांच्या चराऊ कुरणांना कुंपण घालण्याचं काम चोख बजावून मोठीच मोलाची कामगिरी बजावली.

    तिसरी महत्वाची सुधारणा म्हणजे हलक्या पवनचक्क्या. या साध्या पवनचक्क्या, लाकडी खांबांनी केलेल्या ३०-४० फूट उंचीच्या चौकटीवर उभ्या रहायच्या. प्रेअरीच्या मोकळ्या आकाशाखालचा भणाणता वारा या पवनचक्क्या गरगरा फिरवत रहायचा. त्यांच्या सहाय्याने, जमिनीत जागो जागी खणलेल्या बोअर वेल्स (विहिरी) मधून काढलेल्या पाण्यावर शेकडो, हजारो एकरांवर शेती भाती पिकू लागली. सुमारे १९३० पर्यंत या पवनचक्क्या म्हणजे प्रेअरीवरच्या प्रत्येक फार्मचं जणू अविभाज्य भागच झाला होता. पुढे मग विजेवर चालणार्‍या मोटारींनी या पवनचक्क्यांची जागा घेतली. परंतु अजूनही बर्‍याच ठिकाणी या जुन्या छोटया पवनचक्क्या फार्मवर शोभेसाठी किंवा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जपून ठेवलेल्या आढळतात.

      August 20, 2015


  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ३

    योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मैकनिष्ठाकरीचन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी ।
    सर्वैश्वर्यकरी तप:फलकरी काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥३॥

    आई अन्नपूर्णेच्या कृपेने साधकाला कोणकोणते लाभ होतात, ते सांगण्याच्या हेतूने आचार्यश्री त्याच विशेषणांचा रूपात आईचे वर्णन करीत आहेत.

    योगानन्दकरी- आई जगदंबा साधकांना योगाचा आनंद प्रदान करते. कर्म, भक्ती, ज्ञान हे विविध योग शेवटी शरीरात राहूनच करावे लागतात. ते शरीर अन्नपूर्णेच्या कृपेने चालते. पर्यायाने या सर्व योगांचा आनंद तीच प्रदान करते. रिपुक्षयकरी- रिपू अर्थात शत्रूंचा नाश करणारी. शास्त्रात आळसालाच शरीरातील सगळ्यात मोठा शत्रू म्हटले आहे. अन्न भक्षणातून उत्साह येतो. आळस निघून जातो. पर्यायाने या महाशत्रूचा ती विनाश करते. धर्मैकनिष्ठाकरी- धर्मावर साधकाची अविचल एक निष्ठा निर्माण करणारी.

    चन्द्रार्कानलभासमानलहरी- चंद्र, अर्क म्हणजे सूर्य, अनल म्हणजे अग्नी, त्यांची भा म्हणजे तेज. त्याच्या समान जिच्या तेजो मंडळातील लहरी आहेत अशी.

    त्रैलोक्यरक्षाकरी- स्वर्ग मृत्यु आणि पाताळ या तीनही लोकांचे रक्षण करणारी.

    सर्वैश्वर्यकरी- साधकांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करणारी.

    तप:फलकरी - त्यांच्या तपाचे फळ प्रदान करणारी. काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- हे सकल कृपेचा आधार असणाऱ्या माते अन्नपूर्ण! मला ज्ञान भक्ती वैराग्य रूपी भिक्षा प्रदान कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      February 29, 2020


  • श्री आनंद लहरी – भाग १६

    या श्लोकात आचार्यश्रींची प्रतिभा एका वेगळ्याच विषयाला स्पर्श करते. आरंभीच्या तीन ओळीत भगवान शंकरांचे वर्णन आहे. हे वर्णन काहीसे नकारात्मक म्हणता येईल. मात्र त्या नकारात्मकतेच्या आधारे आचार्यश्री चौथ्या ओळीत आई जगदंबेचे वैभव स्पष्ट करीत आहेत.

      February 20, 2020