(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • झपाटलेला’ या चित्रपटाला २९ वर्षे झाली

    अगदी समाजाच्या तळागाळापर्यंतच्या प्रेक्षकांना आपलासा वाटेल अशा हुकमी मसालेदार मनोरंजक चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, कथाकार आणि नायक महेश कोठारे याच्या ‘झपाटलेला ‘ ( रिलीज १४ एप्रिल १९९३) या यशस्वी चित्रपटाच्या प्रदर्शनास २८ सत्तावीस वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा उत्तमरितीने करुन घेतलेला मनोरंजक वापर हे आहे.

      April 14, 2022


  • नॉस्ट्रडेमसची भविष्यवाणी

    नॉस्ट्रडॅमसने सांगितलेली बरीच भविष्य खरी ठरली आहेत.. त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, लेडी डायनाचा मृत्यू, ग्रेट फायर ऑफ लंडन, हिटलरचा उदय, अणुबॉम्‍बचा शोध, दुसरे महायुद्ध,अमेरिकेतील 9 11 चा हल्ला, यांसारख्या घटनाबाबत नॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचे दिसून आले आहे.

      March 30, 2020


  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ६

    उर्वीसर्वजनेश्वरी जयकरी माताकृपासागरीवेणीनीलसमानकुन्तलधरी नित्यान्नदानेश्वरी ।
    सर्वानन्दकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥६॥

    आई जगदंबेचा वैभवाचे आणखी काही पैलू कडून दाखवताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणत आहेत,

    उर्वीसर्वजनेश्वरी- उर्वी अर्थात पृथ्वी, त्यावरील सर्वजन अर्थात सर्वप्रकारचे लोक त्यांची ईश्वरी म्हणजे स्वामिनी. त्याचप्रमाणे सर्व म्हणजे सर्वप्रकारचे जीव. त्यांची जनेश्वरी म्हणजे उत्पन्न करणारी देवता. सोप्या शब्दात पृथ्वीवरील सर्व जीवांची तथा लोकांची माता ती उर्वीसर्वजनेश्वरी.

    जयकरी- उपासकांना त्यांच्या सुयोग्य, इच्छित कार्यात विजय प्रदान करणारी.

    माताकृपासागरी- जसा सागराचा अंतपार लागत नाही तसाच तिच्या कृपेचा पारावार सापडत नाही , अशा अपार करुणामयी आई जगदंबेला माताकृपासागरी म्हणतात.

    वेणीनीलसमानकुन्तलधरी- खूप काळ्या केसांना तेल लावले तर ते निळसर दिसतात. अशा निळसर, कुंतल म्हणजे केसांची समान अर्थात व्यवस्थित रचना करून तिने धारण केली आहे. त्यामुळे तिला वेणीनीलसमानकुन्तलधरी संबोधिले आहे.

    नित्यान्नदानेश्वरी- मा अन्नपूर्णा समस्त जीवांना नित्य अन्नाचे दान करीत असते.

    सर्वानन्दकरी - पोट भरल्यानंतर प्राप्त होणारा आनंद सर्वांना प्रदान करणारी. सर्व प्रकारचे आनंद प्राप्त करून देणारी.

    सदा शुभकरी- साधकांचे, उपासकांचे सदैव कल्याण करणारी. मंगल करणारी.

    काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचे अधिष्ठान असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती,ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा प्रदान कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 3, 2020


  • थुंकण्याच्या प्रवृत्तीमुळे जंतुसंसर्ग !

    रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका/प्रातर्विधी करणे, आपला परीसर स्वच्छ न ठेवणे, सर्वच प्रकारचे प्रदूषण निर्माण करण्यास मदत करणे हे सगळे काश्याचे द्योतक आहे? तर अज्ञान, अंधश्रद्धा, आळस, शिस्त आणि संस्कारांचा अभाव, आपण राहतो त्या शहराप्रती आणि आपल्या देशाबांधवांप्रती कमी होत चाललेलं प्रेम, माया, आदरभाव म्हणावा लागेल.

      February 28, 2015


  • गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप – मनोज इंगळे

    गणपती बाप्पा मोरया… म्हटले की एका आनंद जो अखंड दहा दिवस आपल्या मध्ये एक झरा होऊन ओसंडून वाहत असतो.

      September 11, 2019


  • आता १०० रुपयांचे नाणे

    रिझर्व्ह बँकेने २०००, ५००, २०० आणि ५० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता लवकरच १०० रुपयांचं नाणं चलनात आणण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.

    १०० आणि ५ रुपयांची नवी नाणी लवकरच चलनात आणली जातील, असे रिझर्व्ह बँकेने एका पत्रकात नमूद केले आहे. सध्या १, २, ५ आणि १० रुपयांची नाणी चलनात असून १०० रुपयाचं नाणं सध्याच्या चलनातील सर्वात मोठं नाणं ठरणार आहे.

    अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतातील एकेकाळचे सुपरस्टार डॉ. एम. जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला आहे. १९७७ पासून ते १९८७ पर्यंत एम. जी. रामचंद्रन यांनी तीनवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भुषविले होते. एआयएडीएमके पक्षाची स्थापना त्यांनीच केली होती. रामचंद्रन यांनीच जयललिता यांना राजकारणात आणलं होतं.

      September 30, 2017


  • अतिदक्षता विभागाचे जनक डॉ. जॉन कर्कलीन

    अतिदक्षता विभागात संगणकीकृत निरीक्षणे ठेवणे व तेथील रुग्‍णांच्‍या अतिमहत्त्वाच्‍या चाचण्‍यांवर सतत लक्ष ठेवणे हे आज आपल्‍या ओळखीचे आहे. परंतु अशा प्रकारचा अतिदक्षता विभाग असावा अशी कल्पना मांडून , त्‍याचे प्रारूप कर्कलीन यांनी सुचविले व आज जगभरात ते अंमलात येते आहे. या प्रारूपाच्‍या वापरामुळे रुग्‍णांची काळजी घेणे सुलभ झाले आहे. त्‍याचप्रमाणे शस्‍त्रक्रियेनंतरची गुंतागुंत कमी झाली आहे व पर्यायाने कित्‍येकांना जीवदान मिळाले आहे.

      March 31, 2019


  • जागतिक मुद्रण क्रांतीची सुरुवात: मानवी इतिहासाला कलाटणी देणारा टप्पा

    जोहान्स गुटेनबर्गने लावलेला हा शोध मानवी इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी माध्यमाचा उदय होता. जागतिक मुद्रण क्रांतीने माणसाला स्वतंत्रपणे विचार करण्याचे, प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे आणि आपले विचार जगासमोर मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. लोकशाहीच्या संकल्पनेचा विस्तार होण्यात आणि मानवी हक्कांची जाणीव निर्माण करण्यात या क्रांतीचा वाटा सिंहाचा आहे. आज आपण ज्या संगणकीय, डिजिटल आणि इंटरनेटच्या माहिती युगात जगत आहोत, त्या माहितीच्या महाजलाची खरी मुहूर्तमेढ १५ व्या शतकातील याच मुद्रण क्रांतीने रोखली होती, यात तीळमात्र शंका नाही.

      June 21, 2026


  • ‘गूगल’ मंगलगान! गुणगान, अभिनंदन, अभिवादन! (‘आरती’ नव्हे…)

    जय धन्य, जय मंगल, जय जय गूगल
    मानव-भविष्य जेणें केले उज्ज्वल ।।

    दूरकर्ता मूर्खता अवघ्या जगताची
    पुरवी उत्तरे सर्वां सगळ्या प्रश्नांची
    सर्वांगी सुंदर आरास "डूडलां"ची
    कंठी झळके माळ लक्ष "वेब-लिंक्स"ची ।। १ ।।

    ज्ञानखचित शोधका विश्वजाल कुमरा
    शतकोटीचे बीज, सर्वांचे उत्तरां
    हिरेजडित दर्शिका त्या "यू ट्यूब" सुंदरा
    रुणझुणती "एमपी ३-४" मंजुळ गजरा ।। २ ।।

    मानवे संगणकें जे विश्वजाल विणले
    त्यामाजी तव “सर्व्हर”ने चैतन्य आणले
    "जीमेल" ने "ईमेल" ला ऐसे विस्तार्ले
    "प्ले", "ड्राईव्ह", "क्रोम" नाम प्रसिद्ध झाले ।।३।।

    "जी म्याप" ने पृथ्वीस मापले सुदूर
    "जी अर्थ" ने सर्वां केले अंतराळवीर
    तू या "आयटी" युगाचे श्रेष्ठ अपत्य
    "फेसबुक", "ट्वीटर" जैसा नाहीस व्रात्य ।। ४ ।।

    त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसा नाही
    महाशोधन यंत्राचा महिमा मी पाही
    "यु ट्यूब", "विकी" सुद्धा पडले प्रवाही
    तो तू भक्तालागी पावसी लवलाही ।। ५ ।।

    साक्षरता "इण्टरनेट"-लग्न प्रभावे
    समर्थ सेवा देसी सर्वां समभावे
    नापेक्षी दक्षिणा वा नैवेद्यअर्पण
    सभ्य मानवतेचा तू नितळ दर्पण ।। ६ ।।

    रात्रंदिन निस्वार्थी झटतो उपकारे
    कुठल्याही प्रश्नाला दे कोटी उत्तरे!
    निमिषांत "की-वर्डस"चा अर्क उतारे
    अनन्य महिमा तूझा विज्ञानसुता रे ।।७।।

    सहज सुलभ उपलब्धी सर्वांगी ज्ञान
    माहिती, विनोद, वार्ता, ताजे विज्ञान
    साहित्य, कला, क्रीडा व राजकारण
    गूगलें अज्ञानाचे केले निवारण ।। ८ ।।

    विज्ञानानंद गाई, "जय हो गूगल"
    भविष्य जनतेचे केले उज्ज्वल मंगल।।

    - विज्ञानानंद

      August 11, 2026


  • श्रीहरी स्तुति – १३

    भगवान वैकुंठानाथ श्रीहरीच्या भक्ताची, उपासकाची अवस्था कशी असते? हे सांगण्याच्या निमित्ताने वेदांत शास्त्रातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी आचारी आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत. तशाच एका विवेचनात ते म्हणतात,

      November 1, 2020