वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गीर्देवतैति गरुड़ध्वज सुंदरीति शाकम्भरीति शशिशेखर वल्लभेति।
सृष्टि-स्थिति-प्रलय केलिषु संस्थितायै तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरूण्यै ।।१०।।
आई आदिशक्ती परांबेचे कार्य तीन प्रकारे चालत असते. या तीन पद्धतींनाच त्रिगुण असे म्हणतात. सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या द्वारे कार्य करणाऱ्या आदिशक्तीच्या तीन रूपांना महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती असे म्हणतात.
या तीन रूपात कार्य करणाऱ्या तीन शक्तींचे वर्णन येथे आचार्यश्री करीत आहेत.
गीर्देवतैति- गीरा म्हणजे वाणी. त्या वाणीची देवता ती गीर्देवता. अर्थात आई सरस्वती.
गरुड़ध्वज सुंदरीति - गरुडध्वज म्हणजे भगवान विष्णू. त्यांच्या रथाच्या ध्वजावर गरुडाचे चित्र काढलेले असते. त्यांची सुंदरी अर्थात प्रियतमा. म्हणजे आई जगदंबा महालक्ष्मी.
शाकम्भरीति - जगदंबेचे एक नाव शाकंबरी असे आहे. कधीकाळी प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सर्व ऋषी-मुनींनी प्रार्थना केल्यामुळे आई जगदंबा प्रगट झाली. सगळ्या भक्तांच्या उदरभरणाची सोय व्हावी म्हणून तिने सर्वत्र शाक अर्थात भाज्या निर्माण केल्या. याच्या आधारे भक्तांचे भरणपोषण केल्यामुळे हे नाव रूढ झाले.
शशिशेखर वल्लभेति- शशि म्हणजे चंद्र. त्याला शेखर म्हणजे मस्तकावर धारण करणारे. अर्थात भगवान श्री शंकर. त्यांची वल्लभा अर्थात प्रियतमा. म्हणजे देवी पार्वती.
सृष्टि स्थिति प्रलय केलिषु संस्थितायै- या तीन स्वरूपात, त्या त्रिदेवांसह, सृष्टी निर्मिती, स्थिती अर्थात पालन आणि लय अर्थात विनाश या तीनही केली म्हणजे लीलांमध्ये आधारभूत स्वरूपात विद्यमान असणाऱ्या,
तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरूण्यै- त्या त्रिभुवनैकगुरू अर्थात त्रैलोक्यातील सर्व श्रेष्ठ तत्व असणाऱ्या भगवान विष्णूंची तरुणी अर्थात सुंदरीला नमस्कार असो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 19, 2020
….. अर्थात सामूहिक अध्यात्मिक उपासनेने कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो! आत्ताच म्हणजे संध्याकाळी नेहमी प्रमाणे ७.२५ ला दिवे लावण्याचा वेळी आम्ही घरातील सगळे (सुट्टीच्या निमित्ताने) परवचा म्हणायला बसलो, किती तरी वर्षांनी असा योग जुळून आला.
April 22, 2020
वनस्पती अभ्यासकांच्या दृष्टीने वृक्षाचे वय हे अत्यंत महत्त्वाचे असते. वृक्षाचे वय हा फक्त एखाद्याच्या कुतूहलापुरता मर्यादित विषय नसून, सदर वृक्षाने वातावरणातले कोणते बदल अनुभवले आहेत, याचेही ते निदर्शक असते. वृक्षाचे वय काढण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात त्याचा आढावा घेणारा, तसेच आज अस्तित्वात असलेल्या विविध प्राचीन वृक्षांची ओळख करून देणारा हा लेख…
February 20, 2024
शेगावच्या श्री गजानन महाराजांना दत्तगुरु आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते. त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे अवतारही मानले जातात. गजाजन महाराजांच्या जन्माविषयी तशी कोणालाच खरी माहिती नाही. त्यांचा जन्म कधी झाला असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे समाधानकारक उत्तर मिळणार आहे. कारण त्यांचा जन्म हा न उलगडलेलं कोडं आहे. पण असं म्हणतात की इंग्रजी दिनदर्शिके प्रमाणे २३ फेब्रुवारी १८७८ मध्ये ज्यांना शेगावात पहिल्यांदा पाहिले गेले होते. हिंदू पंचांगानुसार, या माघ महिन्यातील कृष्ण पक्ष सप्तमी होती. त्यामुळे तिथी प्रमाणे आज त्यांचा प्रगट दिन आहे. त्यामुळे आज तिथी नुसार आलेल्या प्रगट दिनाला आज शेगावात मोठा प्रगटोत्सव दिन साजरा केला जातो. या दिवशी श्री गजानन महाराजांची पालखी मिरवणूक काढली जाते आणि त्यांच्या पादुकांच्या पूजन केले जाते.
असे म्हणतात की ज्या दिवशी ते दिसले तेव्हा ते १८ वर्षांचे होते. त्या वेळी ते शेगावातील देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती.
महाराजांना झुणका भाकरी सोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या , पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडार्याबसाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.
शेगावचे संत गजानन महाराज हे नेहमी मधून-मधून ‘गण गणगणात बोते’असा मंत्र म्हणत असत. एका शिष्याने महाराजांना त्याचा अर्थ विचारला. गजानन महाराज म्हणाले,‘पहिला ‘गण’ म्हणजे जीव किंवा जीवात्मा, दुसरा ‘गण’ शब्द म्हणजे शिव किंवा शिवात्मा आणि तिसरा शब्द ‘गणात’ म्हणजे ‘हृदयात ‘बोते’ म्हणजे पहा, बघा. ‘गण गण गणात बोते’, याचा अर्थ ‘हे जीवा, स्वतःच्या हृदयात शिवाला, परमेश्वराला बघ असा होतो.
महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये. गजानन महाराजांची शिकवण आजही अनेक लोक आत्मसात करतात.
February 23, 2022
पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्याच चेंडूवर बळी मिळविणार्या गोलंदाजांची यादी :
December 6, 2010
Specialization चं पुढचं पाऊल म्हणजे फार्म्स, एकाच प्रकारच्या जनावरांचे, त्यांच्या जन्मापासून ते कत्तलखान्यात जाईपर्यंत संगोपन करण्याऐवजी, त्या संपूर्ण प्रक्रियेतला केवळ एखादाच टप्पा करतात. त्यामुळे वय किंवा वजनाच्या एकेका टप्प्यानुसार, या वाढणार्या जनावरांची रवानगी वेगवेगळ्या specialized फार्मसवर केली जाते. डेअरी फार्म्सवर हा प्रकार कमी दिसतो. बहुतेक डेअरी फार्म्सवर स्वत:च्या फार्मवर पैदा झालेल्या कालवडी वाढवल्या जातात, भविष्यकालीन गायी म्हणून त्यांची काळजी घेतली जाते. बहुतेक डेअरी फार्म्सवर स्वत:पुरतं थोडंफार तरी धान्य स्वत:च्या जमिनीवर उगवलं जातं आणि फार्मवरचं दूध किंवा निरुपयोगी जनावरं विकायचं काम देखील स्वत:च केलं जातं. परंतु बीफ, वराहपालन आणि पोल्ट्रीच्या व्यवसायात मात्र, जनावरांच्या/पक्षांच्या वाढीच्या/वयाच्या टप्प्यानुसार, वेगवेगळ्या फार्म्सवर केलं जाणारं संगोपन, ही अगदी नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे एखाद्या फॅक्टरीतल्या conveyor belt वरून सरकणार्या मालाप्रमाणे, ही जनावरे एका फार्मवरून दुसर्या फार्मवर पाठवली जातात.
जस जसे फार्म्स मोठे होऊ लागतात आणि त्यांची उत्पादकता वाढू लागते, तसंतसं त्यांचा दर एकका (unit) मागचा उत्पादन खर्च कमी होऊ लागतो. त्यामुळे मोठ्या फार्म्सना अधिक मोठं होण्यासाठी उत्तेजनच मिळतं. या उलट, लहान फार्म्स या मोठ्या फार्म्सच्या तुलनेत आपला उत्पादन खर्च तेवढा कमी करू शकत नाहीत. ही आर्थिक विषमता वाढतच जाते आणि मग छोट्या फार्म्सना एक तर या उद्योगातून बाहेर पडावं लागतं किंवा एखाद्या खास वैशिष्ट्य असलेल्या मार्केट (niche market) चा शोध घ्यावा लागतो. असाच एक जाणवण्यासारखा फरक म्हणजे, जरी बहुतांशी फार्म्स कौटुंबिक मालकी हक्काचे असले तरी, वाढत जाणार्या फार्म्सच्या आकारमानामुळे आणि तरूण पिढी शेती/ पशुपालनापासून दुरावत चालल्यामुळे, फार्म्सवर काम करण्यासाठी घरातील माणसांऐवजी पैसे देऊन बाहेरून मदत घेणं वाढत चाललं आहे.
एकंदरीत पशुसंवर्धनाच्या क्षेत्राला एका मोठ्या जाळ्याचं (network) रूप येत चाललं आहे. “एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ” हे ब्रीदवाक्य इथे लागू पडल्यासारखं वाटतं. पूर्णपणे स्वावलंबी फार्मची संकल्पना मागे पडून, परस्परांना पूरक असे फार्म्स, एकमेकांच्या सहाय्याने आपापल्या वाटणीचा कार्यभाग पार पाडताना दिसतात. जनावरांसाठी धान्य उगवणारे फार्म्स, पशूखाद्य बनवणार्या कंपन्या, जनावरांची ने आण करणार्या ट्रक्सच्या कंपन्या, वेगवेगळ्या वयोगटातील जनावरांचे संगोपन करण्यात विशिष्ट नैपुण्य मिळवलेले फार्म्स, जनावरांची विक्री - लिलाव करणारी केंद्रे, कत्तलखाने, या सार्यांचे पाय एकमेकात गुंतलेले असतात. फार्म्सच्या वाढलेल्या आकारामुळे प्रत्येक घटकाची जबाबदारी आणि आर्थिक गुंतवणूक देखील खूपच मोठी असते. त्यामुळे एकंदर सारा कारभार परस्परांमधल्या स्नेहसंबंधांपेक्षा, रुक्ष आणि कोरड्या करार मदारांवर (contracts and agreements) आधारलेला असतो.
डॉ. संजीव चौबळ
November 18, 2015
नॉस्ट्रडॅमसने सांगितलेली बरीच भविष्य खरी ठरली आहेत.. त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, लेडी डायनाचा मृत्यू, ग्रेट फायर ऑफ लंडन, हिटलरचा उदय, अणुबॉम्बचा शोध, दुसरे महायुद्ध,अमेरिकेतील 9 11 चा हल्ला, यांसारख्या घटनाबाबत नॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचे दिसून आले आहे.
March 30, 2020
आपणास माहिती आहेच ना कोणत्याही स्पर्धात्मक खेळात जय व पराजय ह्यातील अंतर अगदीच नगण्य असते. ....छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास महत्वाच्या मुख्य गोष्टींमधे फरक जाणवतो. ....आहाराच्या शास्त्राकडे लक्क्ष्य देणे कोणत्याही खेळात निर्णायक ठरू शकते. ....तुमच्या कामगिरीत स्पर्धात्मक आव्हाने झेलण्यास आहार शास्त्र महत्वाची भूमिका बजावते
दर वर्षी 5 मे हा जागतिक धावपटू (Athletic) दिन म्हणून साजरा केला जातो. आव्हान टिकवून धरण्यासाठी फिटनेस, स्टॅमिना आणि चांगले प्रशिक्षण धावपटूंसाठी अत्यंत महत्वाचे आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी तुमची कामगिरी खालावू शकतात. पण तुम्ही खाण्या पिण्याच्या सवयीची योग्य ती काळजी घेतल्यास तुमची कामगिरी उंचावण्यासाठी ते मोलाची मदत करतात
प्रत्येक खेळात आहाराचे/खाण्याचं एक वेगळेच तंत्र आहे आणि हे खाण्या चे तंत्र तुम्हीं व्यायाम किती काळ करता ह्या वर अवलंबून असते. जर व्यायाम हा 45 मिनीटांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला तुमच्या खाण्या पिण्याकडे लक्ष्य देणे गरजेचे असते. खेळामुळे येणारा थकवा कमी करण्यासाठी आहार आणि पाणी महत्वाची भूमिका बजावतात. जितका खुराक योग्य व चांगला तितका तुमचा परफॉर्मन्स चांगला तसेच तुमचा फिटनेस आणि skills जास्तीतजास्त उंची वर नेऊन ठेवण्यात ते मोलाची मदत करतात पण खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी तुमचा खेळ तर बिघडतोच पण तुमचा शारिरीक दुखापतीचा संभवही वाढतो, वजनावरही त्याचा परिणाम होतो. एवढेच नव्हे तर खेळामुळे गेलेली एनर्जी परत मिळवण्यातही कमतरता येते.
खेळाडूना अन्नघटकांची आणि द्रवपदार्थांची गरज ही त्याच वयाच्या इतर व्यक्तींपेक्षा जास्त असते. योग्य वेळी योग्य अन्नघटक घेणे (nutrient timing) हे अत्यंत महत्वाचे आहे ज्याचा असर तुमच्या परफॉर्मन्स वर होतो. खेळापुर्वी खेळामध्ये आणि खेळानंतर योग्य अन्नघटकांचे सेवन केल्यास तुमच्या परफॉर्मन्स ची पातळी उंचावण्यासाठी ते मोलाची मदत करतात
धावपटूंसाठी कोणकोणते अन्नघटक महत्वाचे
Fluid (द्रवपदार्थ) - शरीरातील फक्त 2% पाण्याची पातळी खालावली तर तुमचा परफॉर्मन्स 15 ते 30% पर्यंत कमी होऊ शकतो म्हणून fluids वर लक्ष द्या
एनर्जी - तुमचं वजन योग्य राखण्य एवढेच एनर्जी चे सेवन करावे. 45 मिनीटांपेक्षा व्यायाम जास्त असल्यास तुम्हाला एनर्जी व इलेकट्रोलाईट घेणे आवश्यक असते
कारबोहैड्रेट - carbohydrate = sports performance. कोणत्या प्रकारचे कारबोहैड्रेट किती प्रमाणात घ्यावयाचे हे तुमच्या व्यायामाच्या प्रकारावर, व्यायाम करण्याची वेळ, तुमचे सध्या चे वजन, आणि ते तुम्ही कोणत्या वेळी घेता ह्या वर अवलंबून असते.
फॅट - व्यायाम करताना किंवा खेळामध्ये तळकट आणि अति तेलाच्या पदार्थांचे सेवन त्रासदायक ठरू शकते ज्यामुळे तुमचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो. पण हीच फॅट तुम्ही योग्य प्रकारची, योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतली तर तुमची कामगिरी उंचावण्यासाठी ते मदतीचा हात देऊ शकतात तसेच तुमचे आरोग्य ही सुधारण्यास ही ते उपयोगी पडतील.
कॅल्शियम - मुली, तरूण स्त्री धावपटूंसाठी जास्तीच्या ट्रेनिंगमुळे मासिकपाळीसाठी आवश्यक असणाऱ्या हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे त्याचा मासिकपाळी वर परिणाम होतो, तसेच वेळेच्या आधी irreversible osteoporosis होऊ शकतो. तर पुरुष धावपटूंमध्ये testosterone ची कमतरता झाल्यामुळे osteoporosis होऊ शकतो.
लोह (iron) - अती शारीरिक व्यायामामुळे लोह ह्या खनिजाची कमतरता होऊ शकते आणि कमतकमतरतेमुळे रक्तक्षय (अनिमीया)चा धोका निर्माण होऊ शकतो
मॅग्नेशियम - मॅग्नेशियमच्या तातपुरत्या कमतरतेमुळे थकायला लवकर होण, मळमळणे, तसेच muscle cramps चा धोका वाढू शकतो तर क्राॅनीक कमतरतेमुळे रक्तक्षय आणि ओस्टीओपोरोसिसचा धोका वाढतो.
पोटॅशियम - थकवा, muscle cramps कमी करण्यासाठी मदत करतात
Selenium - रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि फ्री रेडिकल चा धोका कमी करण्यास मदत करतात
सोडियम - घामाद्वारे शरीरातील सोडियम चे प्रमाण कमी होते. रक्तातील सोडियम चे प्रमाण कमी होते ज्यामुळे muscle cramps चा धोका वाढतो. 5 तासापेक्षा जास्त व्यायाम केल्यास आणि तो उष्ण हवामानात केल्यास रक्तातील सोडियम ची पातळी खूप कमी होऊ शकते जी जीवनाला घातक ठरू शकते
Zinc - स्नायूंच्या नुतनिकरणासाठी आणि अन्नातील उर्जेचा शरीराला आवश्यक असणाऱ्या उर्जेत रुपांतरीत करण्यासाठी आवश्यक आणि कमतरतेमुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होते ज्यामुळे छोटे मोठे आजार होऊ शकतात
May 11, 2015
९६४-६५ मध्ये ग्रेग चॅपल यांनी सात आठवड्यामध्ये १० शतके केली. शाळेच्या एका सामन्यामध्ये त्यांनी व्दिशतक केले आणि अँशले वूडकॉक यांच्याबरोबर पहिल्या विकेटसाठी स्कॉट कॉलेज विरुद्ध ३०० धावांची भागीदारी केली.
August 16, 2021
१० डिसेंबरला मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सुत्रधार डेव्हिड हेडलीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी त्याने शिक्षा माफ झाली तर माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे कोर्टात सांगितले.
January 2, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti