(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • काय आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य?

    1972 चा काळ अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांचा होता. त्या वेळी त्यांची दृष्टी पडली माऊलींच्या समाधी वर, संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली त्यावेळी झालेली सविस्तर घटना थोर शास्त्रज्ञ आर एन शुक्ल यांनी सांगितली ती अशी...

    त्यावेळी वारकरी सांप्रदायाची थोर व्यक्ती ह.भ.प मामासाहेब दांडेकर हे होते त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला आळंदीची समाधी उखडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मुलन चे लोक येत आहेत, त्यांचे असे म्हणणे आहे कीजर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या
    शरीरातील हाडे तरी सापडतील. मामासाहेबां समोर खुप मोठा प्रश्न पडला होता यांना रोखायचे कसे त्यावेळी शुक्ल साहेब यांनी मामासाहेबांना सांगितले
    माऊली पाहुन घेतील.

    दुसरा दिवस उजाडला सकाळीच दोन अडिचशे माणसांचा ट्रक पुण्याहुन आळंदीला जाणार आहेत असे समजल्या वर त्यांच्या अगोदर मामासाहेब दांडेकर व शास्त्रज्ञ शुक्ल साहेब आळंदीला पोहचले होते.

    शुक्ल साहेबांनी सोबत तीन मीटर्स घेतले होते. त्यातला एक होता गीगरम्यूलर काऊंटर त्यात एक्सरे अल्फा, गॅमा, बीटा नावाचे जे किरण किंवा उर्जा असते ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाहीत हे शोधून काढु शकतो. ते मीटरवर दाखवले जाते. त्याला गीगरम्यूलर स्किंटीलेशन काऊंटर असे नाव आहे.

    तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी पासून सहा फुट अंतरावर ठेवला.

    दुसरा मीटर ज्याला थर्मिस्टर बोलोमीटर म्हणतात. तो घेतला होता. त्याने अल्ट्राव्हायोलेट इन्फारेड आहेत की नाही हे पहाता येते. तो ही मीटर समाधी जवळ ठेवला.

    तिसरा फ्रिक्केन्सी मीटर रडार हा मीटरही त्या ठिकाणी ठेवला.

    तोपर्यंत अंधश्रद्धावाली मंडळी डाॅक्टर, दोन तीन इंग्लीश माणसे, घोषणा देतच मंदिरा पर्यंत पोहचली.

    सर्व जमावाला दाराजवळच मामांनी थांबवले आणि सांगितले समाधी बद्दल आम्ही जे सांगतो तो प्रयोग करा. आणि मग तुमचे काम करा.

    तो पर्यंत शुक्ल साहेबांनी समाधी झाकण्यासाठी तीन वेष्टणे आणली होती. एक जस्ताचे, एक पितळेचे आणी एक लोखंडाचे.

    शुक्ल साहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले या ठिकाणी तीन मीटर्सही ठेवले आहेत.समाधी वर एकेक झाकण टाकून मीटरवर काय दिसते ते पाहावयाचे आहे. तुम्ही पहाल त्यावेळी आम्ही येथे थांबणार नाही. बाहेर थांबू.

    त्यांच्यातील दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना गाभा-यात घेतले आणि त्यांना माहिती देऊन मामा व शुक्ल साहेब गाभा-याबाहेर निघुन आले. आम्ही सांगितल्या प्रमाणे त्यांनी प्रयोग करून पाहिला.

    लोखंडी, पितळी, जस्ताचे आवरण काढल्यावर एकच ठराविक रिडींग मीटर दाखवायचे. आत कोणी नसल्याने काटा हलविण्याचा प्रश्न चनाही. त्या लोकांन पैकी कोणी मीटरला हात लावत नव्हते मग काटा रिडींग का दाखवीत आहे. रिडींग दाखविणारे चैतन्य स्फुरणस्पंदने कोठून येत आहेत असा गहन प्रश्न अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांना पडला. यामध्ये कसलाच जादुटोणा हातचलाखी नव्हती हे त्यांच्या लक्षात आले.

    शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखविल्यावर त्यांच्या लक्षात आले संजीवन समाधी म्हणजे काय? हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चित पणे चैतन्य आहे. उर्जा आहे, स्पंदने आहेत,म्हणून च त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. चैतन्य दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व असते. क्ष किरण दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. तसेच संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहेच त्यांचे अस्तित्व मनुष्यच काय विज्ञान सुद्धानाकारू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाने सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम दुर झाल्या नंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्याला समाधी च्या दर्शनाला येवु लागली. तीन परदेशी नागरिकां पैकी एकाने स्वताला आळंदीला वाहून घेतले. पुन्हा कधीच कुणी माऊलींवर आक्षेप घेण्याचे धाडस केले नाही.

    वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यु ह.भ.प. मामासाहेब दांडेकरांनी आलेल्या सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या सदस्यांना पुन्हा एकदा संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन सांगताना म्हणाले एखाद्या साधु संत संजीवन समाधी घेतो, तेव्हा योगशास्त्राप्रमाणे तोपंचमहाभूतात्मक होतो. शरीर पृथ्वी आप तेज वायु आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा तो संजीवन समाधीत उतरतो तेव्हा तो सजग असतो. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते. निर्देही होते याचा अर्थ त्याच्या शरीरातील पृथ्वी आप तेज वायु हे जे भाग असतात ते बाहेरच्या ब्रम्हांडातील पृथ्वी आप तेज वायु आकाश यात एकरूप होऊन जातात. त्यामुळे समाधी च्या जागी काहीही शिल्लक रहात नाही.

    -- संजीव थोरात.
    पुणे

      July 9, 2017


  • पडे-झडे माल वाढे

    आज कालच्या आया मुलांच्याबद्दल अतीदक्ष असतात, त्या मुळे मुले छोटे छोटे निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहेत. उदाहरण द्यायचे तर सातवी आठवीतील मुलांना सुद्धा आया आज हात धरून रास्ता ओलांडून देतात, त्यात मुलगी असेल तर विचारूच नका. हायवे, किव्वा अती वर्दळीचा रस्ता मी समजू शकतो, पण लहान रस्त्यावर सुद्धा हीच स्थिती दिसते. हि स्थिती साधारण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, व श्रीमंत घरात प्रामुख्याने दिसत आहे.

    मी माझ्या मुलीच्या मैत्रिणीला तिचे नाव स्वराली ठेऊ, तिच्या घरी सोडण्यासाठी गेलो, गाडी घराच्या विरुद्ध बाजूला उभी केली असता, गाडीतून उतरून रस्ता ओलांडणे तिला जमत न्हवते. रस्ता ओलांडण्यासाठी तिला जवळपास 5-7 मिनिटे लागली. निरीक्षण करताना असे दिसले कि येणाऱ्या दोन चाकी व चार चाकी गाडीचा तिला अंदाज येत न्हवता. दूरवर गाडी असतानाही केवळ येणारी गाडी किती सेकंदात इथे पोहोचेल हा अंदाज न ठरवता आल्यामुळे ती बावचळून आहे त्याच जागी उभी राहिली.

    एकुलती एक असल्यामुळे तिची आई तिला खूप जपते, इतके कि, सायकल सुद्धा बिल्डिंगच्या आवारात फिरवायची, तसेच स्वरालीला साधे खरचटलेले सुद्धा आईला चालत नाही, लगेच डॉक्टरकडे घेऊन जाते, या मुळे स्वराली सायकलवरून पडली, किव्वा घरात तिला थोडे हि लागले तरी, जोरजोरात रडते, कारण सहनशीलतेचा अभाव उत्पन्न झाला आहे. पायात काटा गेला, बोटात सुई, किव्वा टाचणी टोचली, हातापायाला खरचटले आणि जरासे रक्त दिसले तरी घरचे वातावरण गंभीर होते. आपण हि पिढी पंगू तर करत नाही ना? याचा विचार करा.

    लहानपणी मुले खेळताना पडली पाहिजेत, त्यातून त्यांना सहनशीलता येते, वेदनेचा दाह शमवण्याची सवय होते तसेच संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. नाजूक मुले भविष्यात नाऊमेद , किव्वा अपयशी होण्याची शक्यता अधिक. संघर्ष शक्ती कमी राहिल्यास भित्रेपणा वाढतो, याचे पर्यावसन म्हणजे पराधीन, परावलंबी जीवन जगण्याची वेळ येते, तसेच धाडसी निर्णय घेताना मन कचरते.

    आजकालच्या मुलांना झाडावर चढून फळे काढता येत नाहीत, घरातील माळ्यावर ठेवलेली वस्तू सुद्धा काढायला घाबरतात, उंच जागी चढताना आईच्या कडून धीर मिळत नाही तर पडशील, घसरशील, तुला जमणार नाही, उतर कुणालातरी बोलावून करूया, असे शब्द ऐकायला मिळतात. या मुलांच्या आया, आणि बाप मुले मोठी झाली तरी मुलांच्या शाळेची बॅग शाळेला जाणाऱ्या रिक्षा किव्वा वॅन मध्ये पोहोचवून देतात, हे पाहिल्यावर मुलांची कीव येते. सत्तरी ओलांडलेल्या आई वडिलांनी मुलांना संघर्ष शिकवला, तीच मुले आपल्या मुलांना तसा संघर्ष का शिकवत नाहीत याचे नवल वाटते. अशाने नवीन पिढी कमजोर, कर्तृत्वहीन होईल, याची भीती या आई वडिलांना का वाटत नाही याचे आश्चर्य वाटते. पालकांनो तुमचे विचार बदला, आपल्या वडीलधाऱ्यांनी नेहेमी सांगितले आहे, पडे-झडे माल वाढे, हे खरोखरीच सत्य आहे.

    -- विजय लिमये
    9326040204

      July 30, 2016


  • आंतरराष्ट्रीय डावऱ्या लोकांचा दिवस

    आंतरराष्ट्रीय डावऱ्या लोकांचा दिवस

    आज दिनांक १३ ऑगस्ट. परदेशात हा दिवस खास डावऱ्या म्हणजे डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांसाठी साजरा केला जातो. ह्या दिवसाला ‘इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे’ म्हणून संबोधलं जातं. काय विशेष असतं लेफ्टी लोकांमध्ये? पूर्ण जगात ह्यांची संख्या किती आहे? डावरी प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोण? ह्या संदर्भात आपण ह्या लेखात माहिती घेऊ.

      August 13, 2020


  • युरोप मधील सिबलिंग डे

    असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने सिबलिंग डे साजरा करण्याची कल्पना दिली. यासाठी त्यांनी सिबलिंग फाऊंडेशनची स्थापना केली, ज्याला अमेरिकन कॉंग्रेसने एकमताने मान्य दिली. यानंतर दरवर्षी १० एप्रिल रोजी सिबलिंग डे साजरा करण्यास सुरुवात झाली.असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने आपल्या वडिलांचे बालपणात मृत्यू पावलेल्या एलन आणि लिस्ट या भावंडांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली.

      May 31, 2022


  • सुसंगती..

    आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर कधीच विश्वास बसला नसता की,  अनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जवळची असतात…

      August 26, 2019


  • वर्‍हाडी मराठी – पुणेरी मराठी डिक्शनरी

    महााष्ट्रात अनेक ोलीभाषा आहेत. त्यातल्याच पुणेरी आणि वर्‍हाडी यांच्यातला हा मेीर संवाद

      July 9, 2017


  • बाबाजी, उल्लूचें

    तर साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे, आमच्या ऑफिसमधला संपतराव नऊ महिन्याची पोटुशी बायको (स्वतःची) घेऊन दवाखान्यात जाताना मला भेटला. संपत खरंतर देव माणूस, तीन पोरींचा बाप, तुटपुंज्या पगारात पण अगदी सदानंदी. पण घरच्यांच्या  ‘पोराच्या’ नादापायी हे दवाखान्याचे खेटे घालतोय. मला त्याची कीव आली. मी  अगदी चालत चालत सहज बोललॊ “संपतराव, ह्या वेळी नक्की पुत्रप्राप्ती आहे. बिनघोर राहा”. हे ऐकून संपतराव आणि परिवार जाम खुश झाले  आणि माझ्या हातात पेढा देण्याचा तेवढ बाकी ठेवून छान हसले.

      November 24, 2019


  • बाळक्रीडा अभंग क्र.३९

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      September 19, 2018


  • नक्कीचं उजाडेल..!

    आपण अनेक शंकासुराच्या काटेरी कुंपणातुन गेलो आहोतचं, पण थोडे आपले बोल असत्याच्या चौकातून सत्याच्या मार्गाकडे रममाण झाले तर थोडं लवकर नक्कीच उजाडेल…!

      April 26, 2020


  • श्रीहरी स्तुति – ६

    भगवान श्रीहरींच्या स्तुतीच्या निमित्ताने भगवंताच्या साक्षात्काराचे विविध मार्ग आचार्य श्री आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत.

      October 24, 2020