वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे सेनेत सहभागी करण्यात आली आहेत.
October 8, 2021
पूर्वी ‘ईस्ट इंडिया कंपनी ने भारत लुटला. त्याविरोधात आपण लढलो. स्वातंत्र्यानंतर देशी उद्योगांनीही भारताची खरं तर अशीच लूट केली; पण ते ‘स्वदेशी’ उद्योग म्हणून आपण उगीचच त्यांना पावित्र्य बहाल केलं. ‘खा-उ- जा’ धोरणाअंतर्गत पुन्हा विदेशी उद्योग आले, नि त्यांनी लूटच चालू केली.
July 6, 2022
बांगला देशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृती प्रीत्यर्थ हा दिवस युनोस्को तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
February 29, 2024
चित्रपटसंस्कृती ही सातत्याने विकसित होणारी प्रक्रिया आहे. चित्रपट क्षेत्रातील बदल, त्यातील नवे प्रवाह, नवे तंत्रज्ञान, नवे व्यासपीठ या साऱ्याचा मोठा परिणाम चित्रपट संस्कृतीवर होत असतो. तो यापूर्वी होत आला आहे आणि यापुढेही होत राहील. चित्रपटसंस्कृतीतील महत्त्वाच्या बदलांचे माझ्या चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर केलेले हे विचारमंथन…
January 23, 2024
1) बाल गणेश ( गणपती ) —
सोनेरी रंगसंगतीचा हा श्री गणेश बालका समान आहे. हातात के ळ , आंबा , उस आणि फणस आहे .ही सर्व फळे हेच दर्शवितात की आपली पृथ्वी किती समृद्ध आणि विपुल आहे. गणेश आपल्या सोंडे ने आपले प्रिय असलेले मोदक खात आहे.
September 4, 2014
पोटात दुखणे, गुदद्वारा (अॅनस) जवळ खाज येणे ही सामान्य लक्षण वाटू शकतात. परंतू ही सारी ‘हर्निया’ या आजाराची लक्षणं असू शकतात. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास त्यातील गुंतागुंत अधिक वाढू शकते. काही शस्त्रक्रिया, लठ्ठपणा,बद्धकोष्ठता, कमजोर स्नायू यामुळे हर्निया जडू शकतो. प्रामुख्याने पुरूषांमध्ये आढळणार्या् या आजारावर शस्त्रक्रियेने वाढलेला भाग किंवा स्क्रिन काढणे हाच उपाय उपलब्ध आहे. म्हणूनच वेळीच ओळखा हर्नियाची खालील लक्षणं
पोटाजवळ किंवा गुदद्वाराजवळ फुगवटा आल्यासारखे वाटल्यास तात्काळ डॉक्टरकडे जा.
मांडीजवळ किंवा गुद्द्वाराजवळ खाज येणे ही हर्नियामधील सुरवातीच्या ट्प्प्यातील लक्षण आहे. त्यामुळे ही लक्षण दुर्लक्षित न करता वेळीच उपचार केल्यास हर्निया रोखण्यास मदत होते. मलविसर्जनाच्या वेळेस रक्त पडणे किंवा त्या भागाजवळ ताण येत असल्यास वेळीच लक्ष द्या. यासोबतच मळ्मळणे किंवा उलट्या होणे ही हर्नियाची लक्षण आहेत. हायएटल हर्निया ( hiatal hernia) हा पोटाच्या वरच्या बाजूला होतो. यामध्ये पित्त होणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणं आढळतात.
बेंबी, मांडी, गुदद्वाराजवळ वेदनादायी फुगवटा जाणवत असल्यास ते हर्नियाचे लक्षण आहे.
तीव्र बद्धकोष्ठतेच्या त्रासासोबत मलविसर्जनातून रक्त जाणे हे पोटाजवळील हर्नियाचे लक्षण आहे. अशावेळेस उठता-बसताना ताण आल्याने तेथील स्क्रीन अधिक वाढू शकते.
झोपल्यावर पोटाजवळचा फुगवटा जाणवत नाही मात्र उभे राहिल्यावर किंवा पोटावर दाब दिसल्यास पुन्हा जाणवणे हे दुर्लक्षित करू नका. त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हर्नियाचे विविध प्रकार आढळतात मात्र त्याची लक्षणं ही सारखीच असतात. फार उशीर न केल्यास वाढणारा फुगवटा कमी करणे शक्य आहे. त्यामुळे आजाराबाबत अधिक भीती बाळगून किंवा शरम वाटून हा आजार लपवू नका. यामुळे भविष्यात त्यातील गुंतागुंत अधिक वाढत जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 5, 2017
देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरीवामा स्वादुपयोधरा प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी ।
भक्ताभीष्टकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥८॥
देवी- देव शब्दांमध्ये संस्कृतचा द्यू धातू आहे. त्याचा अर्थ चमकणे, दिव्यत्वाने उजळणे, इतरांना चमकवणे. असे करतात ते देव. त्याचा स्त्रीलिंगी शब्द देवी. अर्थात अत्यंत उज्ज्वल असणारी. सकल विश्वाला तेजस्वी करणारी.
सर्वविचित्ररत्नरचिता- अनेक सौंदर्यपूर्ण रत्नांनी युक्त असे अलंकार धारण करणारी.
दाक्षायणी- देवी पार्वती पूर्वजन्मात सती होती. तिचा तो अवतार दक्ष प्रजापतीच्या घरी झाला होता. त्या स्वरूपात दक्षांची कन्या म्हणून दाक्षायणी.तिने स्वतःला दक्ष यज्ञात जाळून घेतल्यानंतर पुढे ती पार्वती रुपात जन्माला आली.
सुन्दरी- लोकोत्तर सौंदर्याने युक्त असणारी.
वामा- वामा शब्दाचा अर्थ देखील सौंदर्यवती असाच आहे. वाम म्हणजे डावा. जी आपल्या सौंदर्याने सगळ्यां सौंदर्यवतींना डावीकडे सरकवते अर्थात् गौण ठरवते अशी.
स्वादुपयोधरा - स्वादु अर्थात अत्यंत गोड. पय म्हणजे दूध. आपल्या मातृत्व रूपात अत्यंत मधुर दूग्ध धारण करणारी.
प्रियकरी- भक्तांचे साधकांचे सर्वांगाने प्रिय करणारी.
सौभाग्यमाहेश्वरी - सकल प्रकारच्या सौभाग्याची सर्वश्रेष्ठ स्वामिनी असणारी.
भक्ताभीष्टकरी- भक्तांना अपेक्षित वर प्रदान करणारी.
सदा शुभकरी- साधकांचे,उपासकांचे सदैव कल्याण करणारी. मंगलदायीनी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचा आधार असणाऱ्या हेमा ते अन्नपूर्ण मला भक्ती ज्ञान आणि वैराग्य स्वरूप भिक्षा प्रदान कर.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 5, 2020
एप्रिल १७, २०१६ च्या लोकसत्ता-लोकरंग मधील मंगला आठलेकर यांचा ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल काय ?’ हा स्त्रियांच्या मंदिर-प्रवेशासंबंधीचा लेख वाचला ; व ८ मे, २०१६ च्या लोकरंगमधल्या. त्या लेखावरील प्रतिक्रियाही वाचल्या. आठलेकरांचा लेख उत्तम आहे. मात्र, आठलेकरांचा लेखातील कांहीं विचार वाचून सखेद आश्चर्य वाटलें. तेंच प्रतिक्रियांचेंही. या विषयावर अधिक-खोलवर विचार व्हायला हवा होता, असें मला वाटतें.
आठलेकरांच्या कांहीं वाक्यांना (statements) दुजोरा द्यायलाच हवा. उदा. ‘स्त्रीची दुय्यमता या धर्मशास्त्रांनी वारंवार अधोरेखित केली’ ; ‘लिंगभेदावर आधारित असलेल्या व्यवस्थेला निग्रहानें नकार दिलाच पाहिजे’. अशा स्टेटमेंट्स बद्दल त्यांच्याशी मतभेद असण्याचें कारणच नाहीं. प्रश्न आहे तो, त्यांनी मंदिरप्रवेशाच्या बाबीचा जो अर्थ लावला आहे, त्याबद्दल. मात्र, कांहीं मतभेद असले तरी, मी त्यांना ‘पुरुषधार्जिणी’ असें अभिधान देणार नाहीं.
पुढे जाण्यापूर्वी मी हें स्पष्ट करूं इच्छितो की, मी कर्मकांड मानीत नाहीं, तसेच मी निधर्मी व बेसिकली निरीश्वरवादी आहे, आणि मी स्त्री-पुरुष समानता मानतो. हें स्पष्ट करायचें कारण म्हणजे, मला देव-धर्म-पुजारी वगैरेंची बाजू मांडायची नाहीं , किंवा पुरोगामी-प्रतिगामी या वादातही शिरायचें नाहीं. थोडक्यात म्हणजे, ‘आय् हॅव नो पर्सनल ऍक्स टु ग्राइंड’ . तसेच, हेंही स्पष्ट करायला हवें की, आठलेकर यांनी उल्लेखलेल्या तृप्ती देसाई व केवडकर यांच्याविषयी, त्यांच्या विविध विषयांवरील मतांविषयी, आणि त्यांच्या आपसातील-संबंधांविषयी मला कांहींही माहिती नाहीं. त्याचप्रमाणें, इलेक्ट्रॉनिक मीडियांसंबंधी कांहींही मतप्रदर्शन मला करायचें नाहीं. अशा गोष्टींमध्ये शिरल्यास, मूळ मुद्दा बाजूलाच पडेल. त्यामुळे त्या सगळ्यात न शिरतां, मी सरळ, आणि केवळ, मूलभूत मुद्यालाच स्पर्श करत आहे.
आपण हें ध्यानात ठेवायला हवें की, शनि-शिंगणायुर हें फक्त, एक ‘पूजास्थळ’ आहे ; पण तिथें आहे तशीच स्थिती त्र्यंबकेश्वर, साबरीमाला , हाजी अली वगैरे अनेक ठिकाणीही होती व आहे. अहो, हिंदूधर्मात, एखादी पूजा जर जोडप्यानें करायची असेल, व पत्नी तिथें नसेल, तर पती तिच्या स्थानीं ‘सुपारी’ किंवा अन्य कांहींतरी ठेवून पूजा करूं शकतो (जसें, उत्तररामचरित्रात, रामानें , सीतेची मूर्ती ठेवून केलेलें आहे) . पण हा,अधिकार स्त्रीला नाहीं. मुस्लिमांमध्ये, पुरुष तीनदा ‘तलाक’ असें म्हणून ( हल्ली तर ई-मेल पाठवूनही) पत्नीला डायव्होर्स देऊं शकतो, पण अर्थातच, हा हक्क पत्नीला उपलब्ध नाहीं. खरें तर, स्त्रियांना मंदिर-प्रवेशाचा अधिकार मिळण्याचा मूळ प्रश्न, धर्माशी संबंधित नसून स्री-पुरुष-समानतेशी निगडित आहे. मंदिरात किंवा त्याच्या गर्भागारात प्रवेश मिळण्यासाठी लढणें, किंवा हाजी-अली दर्ग्यात प्रवेशासाठी झगडणें, म्हणजे स्त्री-पुरुष-समानतेसाठी झगडणें . मान्य आहे, अशा अनेक बाबी आहेत, जिथें समानतेसाठी लढा द्यायला हवा . तसा, अनेक-अंगीं, अनेक-पदरी लढा चालूच आहे, असें मला वाटतें. एके काळी, ‘तथाकथित- प्रगत’, अशा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्येसुद्धां महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यासाठी महिलांना लढा द्यावाच लागला. १९३० च्या सुमारास त्यांना तो हक्क प्राप्त झाला. महाराष्ट्रात, स्त्री-शिक्षणासाठी महात्मा फुले, महर्षि कर्वे यांना लढा द्यावा लागला. हल्लीहल्लीच, टेनिसच्या क्षेत्रात, ग्रँड-स्लॅम स्पर्धांमध्ये स्त्रियांना मिळणारी बक्षिसाची रक्कन ही पुरुषांएवढी असायला हवी, या समानतेसाठी, मार्टिना नव्हरातिलोव्हानें लावून धरलें. हाही स्त्री-पुरुष-समानतेच्या लढ्याचाच एक भाग आहे. तसेंच, मंदिरप्रवेश हाही या समानतेच्या लढ्याचा एक भागच आहे. आणि, आपण तसेंच त्याच्याकडे पहायला हवें.
मंदिरप्रवेशासाठी लढणें या गोष्टीचा, ‘देव मानणें’ किंवा ‘धर्म मानणे’ आवश्यक आहे , असें नाहीं. साने गुरुजी हे समाजवादी होते. ही सर्व मंडळी निरीश्वरवादी, निधर्मी असतात. तरीही, साने गुरुजींनी १९४८-१९४९ च्या सुमारास, पंढरपुरच्या विठ्ठल-मंदिरात हरिजनांना (दलितांना) प्रवेश मिळावा म्हणुन लडा दिला, प्राणांतिक उपोषणही केलें. स्पष्ट आहे की, त्यांचा हा लढा सामाजिक-असमानतेशी निगडित होता. आठलेकर यांच्या, ‘हा हक्क नव्हता म्हणून स्त्रिया आयुष्यातल्या कोणत्या मोठ्या संधीपासून वंचित राहिल्या आहेत?’ ; ‘गाभार्यात प्रवेश हवा या मागणीत कोणती धर्मसुधारणा आहे?’ , या स्टेटमेंटस् ‘मिसप्लेस्ड’ आहेत, हें साने गुरुजींच्या उदाहरणावरून स्पष्ट आहे. त्यावर अधिक टिप्पणी करायची आवश्यकता नाहीं.
वैदिक काळात स्त्रियांना यज्ञ करण्याचाही अधिकार होता. त्या काळानंतर, शतकानुशतकें स्त्री पुरुषांमध्ये असमानताच होती, व तें अयोग्यच आहे. मध्य-युगात तर ती दरी भयानकच होती. पण १९ व्या – २०व्या शतकात स्त्री-पुरुष-समानतेच्या हक्कासाठी लढाईची ठिणगी पडली, आणि ती आतां, भिन्नभिन्न ठिकाणीं, विविध प्रश्नांच्या माध्यमांमधून, अनेक अंगांनी, प्रस्फुटित होत आहे ; मग तो लढा मंदिरप्रवेशाचा असो, लोकसभेत किती टक्के जागा स्त्रियांसाठी रिझर्व असाव्यात हा असो, मुलींच्या शिक्षणाचा असो, स्त्री-भ्रूणहत्येचा असो, सुनांवर अत्याचाराचा व सुनांना जाळण्याचा असो, ‘खटना’ ( female circumcision) चा असो, ‘Right to Pee’ चा असो, विनयभंगाचा असो, ‘मॅरिटल रेऽप’ चा असो, तलाकचा असो, पोटगीचा असो, हँडिकॅप्ड व चॅलेंज्ड स्त्रियांच्या संरक्षणाचा असो, किंवा अन्य कांहीं असो. प्रत्येक मुद्दयावर लढा हा व्हायलाच हवा, आणि सुजाण नागरिकांनी त्याला पाठिंबा द्यायलाच हवा. समाजात दुसरे अनेक प्रॉबलेम्स आहेत, म्हणून एखाद्या मुद्दयवर लढा द्यायचा नाहीं, असें शक्य आहे काय ? साने गुरूजींना नक्कीच माहीत होते की विठ्ठल-मंदिरात प्रवेशासाठी लढा देऊन दलितांचे आर्थिक प्रश्न कांहीं संपणार नव्हते. पण, जिथे-जिथें असमानता आहे, तिथें-तिथें लढा द्यायला हवा, या भावनेनेंच त्यांनी विठ्ठलमंदिराचा लढा दिला. ते तो लढा जिंकले ; स्त्रियाही पूजास्थळांचे कांहीं लढे जिंकत आहेत, कांहीं नाही. पण, असेंच असतें. कांहीं कांहीं लढे जिंकले जातात, कांहीं हरले जातात ( उदा. १८५७ चें स्वतंत्र्ययुद्ध). पण ठिणगी पडली की, तिच्या शॉर्ट-टर्म परिणामांबरोबरच, दूरगामी परिणामही असतात, आणि त्यांचाही विचार व्हायला हवा. तरच अशा लढ्यांचें महत्व अधोरेखित होईल. साथ देतां आली तर उत्तमच ; पण तें जमत नसल्यास, किमान, ‘आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ इतपत तरी सपोर्ट करायला हरकत नसावी.
- सुभाष स. नाईक
सांताक्रूझ, मुंबई
M- 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
May 8, 2016
थोड्या वेळापूर्वी ” आंटीने वाजविली घंटी ” हा चित्रपट टीव्ही वर लागला होता. १९८८-८९ ला आम्ही इस्लामपूरला असताना एक स्थानिक दिग्दर्शक श्री दिनेश साखरे (ते एका शाळेत शिक्षकही होते) यांनी हा चित्रपट काढला. निळूभाऊ, अलका कुबल, लक्ष्मीकांत बेर्डे , आशा पाटील अशी तगडी स्टारकास्ट. त्याच्या तीन आठवणी –
July 10, 2021
देशाच्या विकासासाठी एक जादूची कांडी सत्ताधाऱ्यांना गवसली आहे आणि ती म्हणजे ‘सेझ’! सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्राच्या माध्यमातून देशाचे चित्र आमुलाठा बदलण्याचे स्वप्न सरकार दरबारी पाहिले जात आहे. भांडवलदारांना औद्योगिक क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्राची तरतूद सरकारने केली आहे.
June 17, 2009
Copyright © 2025 | Marathisrushti