वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
स्वीडनमध्ये २२ एप्रिल २०१३ रोजी घडलेली एक गंमतीदार घटना सांगायला हवी.
यादिवशी, सकाळी साडेदहाच्या सुमारास स्कँडिनव्हिस्का एन्सकील्डा बँकेच्या स्टॉकहोम परिसरातल्या एका शाखेत एक दरोडेखोर शिरला. त्याने हातातले पिस्तूलवजा हत्यार उंचावले आणि बँक कर्मचाऱ्यांना रक्कम देण्यासाठी धमकावले, पण स्वीडनमधील ती बँक शाखा पूर्णपणे कॅशलेस असल्याने तिथे लुटायला एक छदामही नव्हता.
हे जेव्हा त्या दरोडेखोराला बँक अधिकाऱ्यांनी सांगितले, तेव्हा तो गांगरला आणि त्याने अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की कॅश असलेली बँक कुठे आहे?
या प्रसंगाचे वर्णन तंत्रज्ञानविषयक सुप्रसिद्ध नियतकालिक ‘वायर्ड’ने रंगवून दिले आहे. ‘वायर्ड’ शेवटी म्हणतो की, त्या दरोडेखोराला कॅश मिळेल, अशी फारशी संधी जवळपास कुठेही नव्हती. कारण स्वीडनमधील १ हजार ६०० बँक शाखांपैकी ९०० शाखांमध्ये एक दमडीही कॅश नसते. त्या शाखांमध्ये रोख रक्कम स्वीकारलीही जात नाही.
आपल्याकडे जशी रिझर्व्ह बँक आहे, तशी स्वीडनमध्ये रिक्स बँक (रिस्क नव्हे) आहे. ती स्वीडिश संसदेच्या कायद्यानुसार चालते. तिने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार स्वीडनमध्ये गेल्या वर्षी जेवढी पेमेंटस केली गेली, त्यापैकी फक्त २ टक्के पेमेंटस रोखीने (क्रोना हे त्यांचे चलन आहे) झाली. ९८ टक्के पेमेंटस जिथे कॅशलेस पद्धतीने होतात, त्या देशात पाकीटमार, रोख रक्कम लुटणारे दरोडेखोर कसे असतील? खोटे चलन वापरून दहशतवादी कृत्ये तिथे कशी होऊ शकतील? प्रत्येक व्यवहाराचा माग प्रगत तंत्रज्ञानामुळे काही क्षणात काढता येत असल्याने, बेकायदेशीर शस्त्रांचा व्यवहार सहजासहजी कसा होऊ शकेल?
कॅशलेस संस्कृती स्वीकारलेल्या समाजात दहशतवाद, दरोडे, चोरी, खोट्या नोटांचे व्यवहार, आर्थिक गुन्हे यावर आपोआप नियंत्रण येत असल्याने, कॅशलेस संस्कृती ही देशातील सामाजिक स्वास्थ्यासाठीही एक वरदान ठरत जाते, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे.
November 29, 2016
शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली असता काही मुलभूत फरक आपणाला दिसले. अगदीच एकदोन अपवाद सोडले तर कोणीही प्राणी निसर्गदत्त नियम मोडत नाहीत, असे लक्षात येते.
या दोन प्रकारात माणूस कुठे बसतो ? हा प्रश्न आहे.
काही जण समजत होते, माणूस शाकाहारी.
काही जण समजत होते, माणूस मांसाहारी. काही मध्यम मार्गी मिश्राहारी या प्रकाराला चिकटून होते. पण "त्याच्या" नियमानुसार, ना माणूस शाकाहारी ना मांसाहारी ना मिश्राहारी.
मिश्राहारी ही अगदी सोयीस्कर पळवाट झाली.
म्हणजे उपवासाच्या दिवशी फळाहार पण करायचा आणि वडे भजी पण खायची. तसे झाले.
त्याच्या डिक्शनरीमधे मिश्राहारी हा हायब्रीड शब्दच नाही.
माणसाची वैशिष्ट्ये बघूया. म्हणजे त्याला अपेक्षित असलेले माणसाचे नियम आपोआप समजून येतील. .
शाकाहारी प्रमाणेच पाणी ओठानेच पितो, जीभेने चाटत बसत नाही.
समुहाने शांतपणे एकमेकांवर डूक न धरता जेवतो.
रोज आंघोळ करतो. पाण्याची आवड आहे.
अंगाला घाम येतो आणि शरीराचे तापमान संतुलीत ठेवायला मदतच होते.
जेवताना अगदी सावकाश जेवतो. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे वचावचा किंवा शाकाहारी प्राण्यांप्रमाणे भराभरा जेवत नाही.
खाल्लेले अन्न पुनः पचनासाठी परत तोंडात आणत नाही. रवंथ करीत नाही.
तोंडातील लाळेचे रासायनिक पृथक्करण केले असता, शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांपेक्षा वेगळे दिसते. आतड्यांची रचना, लांबी पण वेगळीच असते.
मांसाहारी प्रमाणे माणसाची नखे आत बाहेर करता येत नाही. शाकाहारी प्रमाणे स्थिर आहेत. धारदार टोकदार नाहीत. त्यामुळे नखांनी शिकार करता येत नाही.
शिकार करण्यासाठी वेगळ्या साधनांचा वापर करावा लागतो. एवढेच नव्हे तर समोरचे मांस खाण्यासाठी भाजणे, जाळणे, तळणे, शिजवणे इ.इ. वेगळ्या संस्काराची आवश्यकता पडते. खाण्यासाठी सुद्धा काटे चमचे सुऱ्या घेऊन जणुकाही लुटुपुटुचे आभासी युद्ध करावे लागते.
शिवाजी महाराजांना अफजल्ल्याचे पोट फाडण्यासाठी वेगळी वाघनखे वापरावी लागली, आणि हिरण्यकश्यपूला ठार मारण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताना देखील सिंहनखे धारण करावी लागली. त्यासाठी मानवरूप सोडून नरसिंह अवतार घ्यावा लागला. पण भगवंतांनी पण नियम नाही मोडला.
इथे प्रत्येकाचे नियम वेगळे. ज्याला जो नियम घालून दिला आहे, तोच नियम प्रत्येकाने पाळावा.
आणि नियम मोडला तर शिक्षा ही होणारच.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
1.10.2016
October 1, 2016
मागील भागात, मी इथल्या भारतीय वंशाच्या समाजातील पुरुषाबद्दल थोडे लिहिले. खर तर, इथल्या भारतीय लोकांच्यात “न्यूनगंड” प्रचंड प्रमाणात आहे. तो त्याच्याशी बोलताना सतत जाणवत असतो. कुठल्याही विषयात, आपल्याला प्रचंड माहित अथवा ज्ञान आहे, असा ते फार चलाखीने भास निर्माण करू शकतात.
August 22, 2018
पहिल्या माळेला आजच्या बुधवारी सर्वसाधारणपणे निळे वस्र, साडी वगैरे पेहराव हा निळ्या रंगाचा असतो. बुधवार या वाराचा आणि बुधब्रहस्पतींचा आवडता रंग निळा आहे. म्हणून आज भाविकांनीही निळ्या रंगांचे कपडे परिधान केलेत तर त्या देवतेच्या चैतन्यापर्यंत पोहोचण्यास “बायपास” मिळतो.
October 10, 2018
श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफल प्रसूत्यै रत्यै नमोऽस्तु रमणीय गुणार्णवायै। शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतानायै पुष्टयै नमोऽस्तु पुरूषोत्तम वल्लभायै।।११।।
विविध रूपामध्ये भक्त कल्याणाचे कार्य करणाऱ्या श्रीमहालक्ष्मीच्या चार विविध रूपांचे वर्णन आचार्यश्री येथे करीत आहेत. श्रुती, रती, शक्ती आणि पुष्टी अशा चार रूपात आई जगदंबेचे कार्य चालते. त्यांना वंदन करतांना आचार्यश्री त्यांच्या कार्याचे स्वरूपही स्पष्ट करीत आहेत.
श्रुत्यै नमोऽस्तु- आईच्या श्रुती स्वरूपाला नमस्कार असो. जी,
शुभकर्मफल प्रसूत्यै- शुभ कर्माचे फळ निर्माण करते.
शुभ, पवित्र, पुण्यदायक कार्याचे मार्गदर्शन वेदात, शास्त्रात दिलेले असते. याच कारणाने वेदाला श्रुती म्हणतात.
रत्यै नमोऽस्तु- जगदंबेच्या रती स्वरूपाला नमस्कार असो. रती म्हणजे आवड. मानवाला कशाची आवड असावी? तर रमणीय गुणार्णवायै- रमणीय अर्थात आनंददायक. गुणार्णव म्हणजे गुणांचा सागर. तशी अपार गुणसागर असणारी आई महालक्ष्मी भक्तांच्या मनात रती रूपात कार्य करते.
शक्त्यै नमोऽस्तु- आईच्या शक्ती स्वरूपाला नमस्कार असो. जी शतपत्रनिकेतानायै- शतपत्र अर्थाची शेकडो पाकळ्यांचे कमळ. त्यामध्ये निवास करणारी. एवढं जसे महालक्ष्मीच्या रूपाचे आहे तसेच मूल बुद्धी स्वरूपाचे आहे. मानवी मेंदू मध्ये असणाऱ्या सहस्त्रार चक्रात निवास करणाऱ्या आदिशक्तीचे ते वर्णन आहे.
पुष्टयै नमोऽस्तु- भगवती पुष्टीला वंदन असो.जी
पुरूषोत्तम वल्लभायै- भगवान पुरुषोत्तम अर्थात श्रीविष्णूंची वल्लभा अर्थात प्रियतमा आहे.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 20, 2020
ग्लूटेन फ्री डायट हे नाव आता आपल्याला नवीन राहिलेले नाही. तरीही ज्यांना याविषयी माहिती नसेल त्यांच्यासाठी थोड्क्यात सांगतो. ग्लूटेन हे गहू, जव आणि नाचणी यांसारख्या धान्यांत सापडणारे एक प्रोटीन असते. काहीजणांना ते न पचल्याने अनेक त्रास होतात; पैकी सगळ्यात मोठा त्रास म्हणजे Celiac disease. या रोगात ग्लूटेनयुक्त पदार्थ न पचल्याने लहान आतड्यांना इजा पोहचणे, अंगावर रॅशेस येणे वगैरे लक्षणं दिसतात. परिस्थिती गंभीर झाल्यास लहान आतड्यांच्या कर्करोगाचीदेखील शक्यता असते असे सांगितले जाते.
आधुनिक शास्त्रात यावर इलाज म्हणून जन्माला आलेली संकल्पना म्हणजे ग्लूटेन फ्री डायट. अर्थात ज्या पदार्थांत ग्लूटेन आहे ते टाळणे आणि त्याचे पर्याय शोधणे. थोड्क्यात; आहारातून गहू, जव इत्यादि गोष्टी हद्दपार करणे. आता या ग्लूटेन फ्री डायटबाबत आयुर्वेदाचा दृष्टिकोन जाणून घेऊ.
१. एखादा पदार्थ पचत नसल्यास तो टाळणे हा मार्ग नसून तो कसा पचेल यावर विचार करणे हे अधिक योग्य ठरते. थोड्क्यात आयुर्वेदानुसार सांगण्यात आलेला 'अग्निविचार' हा याठिकाणी महत्वाचा आहे.
२. ग्लूटेन फ्री डायटच्या दुष्परिणामांतील सर्वात प्रमुख म्हणजे पोषणमूल्यांची कमतरता आहे असे आधुनिक आहारशास्त्रच सांगते. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.
३. ग्लूटेनची समस्या प्रामुख्याने ब्रेडसारख्या बेकरी उत्पादनांत मोठी असून त्यामागे किण्वीकरण प्रक्रियेचा मोठा हात आहे हे लक्षात घेणे महत्वाचे. भारतासारख्या देशातील पोळी/चपाती, दलिया यांसारख्या गव्हाच्या पदार्थांना तोच न्याय लावणे योग्य होणार नाही. याकरताच मी शीर्षकात 'गवगवा' हा शब्द वापरला. ग्लूटेन फ्री डायट ही संकल्पना सध्या आपल्या देशात जोमाने रुजू पाहत आहे. हे चित्र समाधानकारक नक्कीच नाही.
४. ज्यांना पोळी/चपाती पचायला जड जाते त्यांनी ग्लूटेन फ्री डायटच्या मागे न लागता भाकरी वा थेट निखारे अथवा गॅस बर्नरवर भाजलेले फुलके यांचा आहारात समावेश करावा. तसेच जेवताना पिण्यासाठी गरम पाणी वापरावे.
५. आयुर्वेदीय उपचार आणि आहारातील नाममात्र पथ्ये यांच्या सहाय्याने 'ग्लूटेन फ्री डायट' पासून 'फ्री' राहण्यास मदत होते. त्यामुळे चपाती पचत नाही म्हणून लगेच आपल्याला ग्लूटेन फ्री डायटच हवे असा गैरसमज करून घेऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. आयुर्वेदाने गहू हे धान्य 'संधानकर' म्हणजे शरीराला जोडणारे/ बळकटी देणारे सांगितले आहे. पंजाबसारख्या प्रचुर मात्रेत गहू पिकवणाऱ्या राज्यातील नागरिकांची शरीरयष्टी याची साक्षच नाही का? त्यामुळे एखाद्या संकल्पनेमागे वाहवत जाऊन उत्तम पोषक अन्न खाण्याच्या आनंदाला मुकू नका!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
December 1, 2016
१६२० साली इंग्लडमधले १०२ प्रवासी नवीन भूखंडाच्या शोधात बोटीनं निघाले होते. पण वारा, अपुरा अन्नाचा साठा, आजारपण यामुळे अर्ध्याधिक लोक मृत्युमुखी पडले. प्रवासात जे लोक वाचले त्यांना ‘नेटिव्ह अमेरिकन्स’ लोकांनी खूप मदत केली.त्यांचे आभार मानण्यासाठी या नवीन लोकांनी त्यांना जंगी मेजवानी दिली.
November 25, 2021

शिवमहिम्न स्तोत्र – भाग ४ मराठी अर्थासह
महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः ।
अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम् ।।३५।।
मराठी- सदाशिव सोडून दुसरा (कोणीही श्रेष्ठ) देव नाही. महिम्न स्तोत्राहून अन्य (कोणतेही श्रेष्ठ) स्तुतीस्तोत्र नाही. अघोर मंत्राहून दुसरा श्रेष्ठ मंत्र नाही. गुरू (शिव) पेक्षा श्रेष्ठ असे दुसरे तत्त्व नाही.
सर्वश्रेष्ठ शिव स्थानी, श्रेष्ठ स्तोत्र महिम्न से ।
अघोरापरि ना मंत्र, श्रेष्ठ तत्त्व गुरू असे ॥ ३५ ॥
टीप- शैव उपासकांमध्ये – ‘ॐ अघोरेभ्योऽथ घोरेभ्यः घोर घोरतरेभ्यः सर्वतः सर्व सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्यः’ हा अघोर मंत्र प्रचलित आहे. काही अभ्यासकांच्या मते ‘ ॐ नमः शिवाय ’ हा अघोर मंत्र आहे.
दीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः।
महिम्नः स्तवपाठस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।।३६।।
मराठी- (गुरूंकडून) घेतलेला उपदेश, (केलेला) दानधर्म, शरीर कष्टवून केलेली तपस्या, तीर्थयात्रा, अभ्यासातून मिळवलेले ज्ञान, होमा हवन इत्यादी कर्मे ह्या सार्या गोष्टी महिम्न स्तोत्र पाठाच्या सोळाव्या कलेच्याही योग्यतेच्या नाहीत.
तपस्या दान वा तीर्थे होम अभ्यास कर्मही ।
पासंगा न पुरे पाठा महिम्नाच्या कलेसही ॥ ३६ ॥
टीप- कला म्हणजे एक सोळांश भाग. चंद्राच्या प्रतिपदा ते पौर्णिमा अशा १५ आणि सोळावी अमावास्या.
कुसुमदशननामा सर्वगन्धर्वराजः
शिशुशशधरमौलेर्देवदेवस्य दासः।
स खलु निजमहिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात्
स्तवनमिदमकार्षी दिव्यदिव्यं महिम्नः ।। ३७।।
मराठी- ज्याच्या मस्तकी बालचंद्र आहे असा देवांचा देव शंकर. गंधर्वांचा राजा पुष्पदंत त्याचा दास (होता). खरोखर, त्याच्या (शंकराच्या) क्रोधाने (तो पुष्पदंत राजा) आपल्या अधिकारपदापासून पिटाळला गेला. तेव्हा त्याने या अत्यंत दिव्य स्तोत्राची रचना केली.
सुरगण-गवयांचा भूप त्या पुष्पदंता
शशिशिखर शिवाचा क्रोध हो चूक होता ।
नृपपद हटवीले स्थान गेले तयाचे
रचुन शिवमहिम्ना धन्य तो दिव्य साचे ॥ ३७ ॥
सुरवरमुनिपूज्यं स्वर्गमोक्षैकहेतुं
पठति यदि मनुष्यः प्राञ्जलिर्नान्यचेताः ।
व्रजति शिवसमीपं किन्नरैः स्तूयमानः
स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम् ।। ३८।।
मराठी- जो कोणी मनुष्य हात जोडून आणि एकाग्र चित्त होऊन स्वर्ग आणि मोक्षाचे एकमेव साधन असलेले, पुष्पदंताने रचलेले, स्वर्ग आणि मोक्षाचे अमोघ साधन असलेले हे स्तोत्र पठण करतो, तर किन्नरांकडून स्तुती केला गेलेला तो शिवाच्या जवळ पोचतो.
सुर-मुनि स्तुति चाले, लाभती स्वर्ग-मुक्ती
कर मन जुळवोनी भक्त जे स्तोत्र गाती ।
हयमुख स्तुति गाती, शंभु सन्नीध नेती (हयमुख- घोड्यासारखे तोंड असणारे, तुंबरु, किन्नर)
शिव स्तुति रचली ही भक्तिनें पुष्पदंती ॥ ३८ ॥
आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्वभाषितम् ।
अनौपम्यं मनोहारि शिवमीश्वरवर्णनम् ॥ ३९ ॥
मराठी- असे हे गंधर्वाने रचलेले (सुरुवातीपासून) शेवटपर्यंत पावन, अनुपम, आनंददायी, शंकराच्या वर्णनाचे स्तोत्र पूर्ण झाले.
पूर्ण झाली स्तुती रम्य, सुरगायक गातसे ।
अतुल्य शिवरूपाचे त्यात वर्णन जे असे ॥ ३९ ॥
त्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः ।
अर्पिता तेन देवेशः प्रीयतां मे सदाशिवः ।।४०।।
मराठी- ही अशी शब्दरूपी पूजा (मी) भगवान शंकराच्या पायावर वाहिली आहे. या पूजेने तो महेश माझ्यावर संतुष्ट होवो.
शब्दांची ही अशी पूजा वाहिली मी शिवापदी
तेणे संतुष्ट होवो तो भूतनाथ मजप्रती ॥ ४० ॥
तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर ।
यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः ॥४१॥
मराठी- हे शंकरा, तुझे खरे स्वरूप मला ठाऊक नाही. तू कसा आहेस (हेही ठाऊक नाही). तुझे स्वरूप जसे आहे, तशाच तुझ्या रूपाला माझा पुनः पुनः नमस्कार !
तुझे रूप नसे ठावे, कसा आहेस शंकरा ।
आहेस तुजला जैसा, प्रणाम मम साजरा ॥ ४१ ॥
एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः।
सर्वपापविनिर्मुक्तः शिवलोके महीयते ॥४२॥
मराठी- जो मनुष्य दिवसातून एकदा, दोनदा वा तीनदा या स्तोत्राचे पठण करील तो सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोकात महान होईल.
एकदा दोनदा किंवा तीनदा स्तोत्र गायने ।
शिवलोकी थोर होई, पापनाशार्थ कारणे ॥ ४२ ॥
श्रीपुष्पदन्त-मुखपङ्कज-निर्गतेन
स्तोत्रेण किल्विषहरेण हरप्रियेण।
कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन
सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेशः ।।४३।।
मराठी- – श्री पुष्पदंताच्या मुखकमलातून निघालेले, पापांचा नाश करणारे व शिवाला प्रिय असणारे हे स्तोत्र जो मुखोद्गत करून एकाग्र चित्ताने पठण करील, त्यावर भूताधिपती महादेव प्रसन्न होईल.
श्रीपुष्पदंत वदनांबुज दिव्य गीता
जे दोष नाश करिते, प्रिय भूतनाथा ।
गाती मुखोद्गत तसे प्रतिबद्ध चित्ता
त्यासी प्रसन्न शिवशंकर मुक्तिदाता ॥ ४३ ॥
इति शिवमहिम्न स्तोत्रम् ।
*************************
-- धनंजय बोरकर.
(९८३३०७७०९१)
August 25, 2022
ती दूरचित्रवाणीवर एक जाहिरात आजकाल दाखविली जाते. एरवी या जाहिराती फारशा कल्पक असतात असं नाही. काही तर हास्यास्पदच असतात. पण ही मात्र विचार करायला लावणारी आहे. कोणाच्या तरी नावाचा जयघोष करत लोकांचा एक समूह एका तरुणाकडे येतो. त्यातलाच काळा चष्मा घातलेला एक मध्यमवयीन माणूस पुढं होतो. त्याच्या चेहर्यावर एक प्रकारचा मग्रूर आत्मविश्वास आहे.
April 21, 2011
साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते.
साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...
(१) -- साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला!
(२) -- गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.
(३) -- साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
(४) -- साखरेमुळे शरीराचे वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.
(५) -- साखर ही रक्तदाब वाढवते.
(६) -- साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.
(७) -- साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.
(८)-- साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेवीस हानीकारक रसायने वापरली जातात.
(९)-- साखर ही मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.
(१०) -- साखर हे पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.
(११) -- साखर ही शरीरातील ट्राइ ग्लिसराइड वाढवते.
(१२) -- साखर हे पेरेलिसिसचा झटका अथवा लकवा होण्याचे एक मुख्य कारण आहे.
(१३) कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर करणे सुरू करा.
वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.
April 10, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti