(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • न्यायपालिकेची प्रतिष्ठा जपली जावी!

    २०१८ हे वर्ष भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आघात करणारे ठरत आहे. वर्षाच्या प्रारंभीच सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायमूर्तीनी माध्यमांसमोर येऊन देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेत सर्व काही ‘‘ऑलवेल’’ नसल्याची बाब समोर आणल्यानंतर न्यायदेवतेच्या प्रतिष्ठेला पहिला धक्का बसला. या धक्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता देशाच्या इतिहासात प्रथमच भारतीय सरन्यायधीशांविरुद्ध महाभियोग चालविण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे.

      April 24, 2018


  • श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १२

    वृद्धावस्थेत विविध व्याधींच्या द्वारे जीवाची होणारी दयनीय अवस्था सर्वच विचारवंतांनी चिंतनाचा विषय केलेली आहे. त्यावेळी त्याला भगवंता शिवाय कोणाचाही आधार उरत नाही. अशावेळी भगवंताची प्रार्थना करणारा तो जीव ज्या प्रकारची करुणा भाकतो त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात…..

      October 13, 2020


  • विज्ञान मराठी : विज्ञानविषयक मजकूर

    विज्ञानविषयक मजकूर छापतांना पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत बर्‍याच अडचणी येतात. सर्वमान्य पारिभाषिक शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होतो. अुदा. ‘बॉयलिंग पॉअिंट’ या अिंग्रजी शब्दास ‘अुत्कलनबिंदू’ हा सर्वमान्य शब्द आहे. फार तर ‘अुत्कलनांक’ किंवा ‘अुकळांक’ हे शब्द वापरले तरी चालण्यासारखं आहे. पण ‘बुदबुदांक’ हा शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होणार नाही. कोणताही द्रव अुकळत असतांना बुदबुद असा आवाज येतो हे खरं आहे.

      January 7, 2021


  • स्मरणगाथा : ६ 

    संधी ही क्षितीज असल्याची जाणीव होते , तेव्हाची गोष्ट !

    अर्थात पुन्हा पुन्हा लक्षात ठेवावे असे स्मरण गाथेतील अपयशाचे पान !

    ' कॉलेजमधून घरी जाताना माळनाक्यावर थांबा . मी तिथे थांबलो आहे .'

    ज्येष्ठ नाटककार प्र.ल मयेकर यांचा निरोप आला म्हणून मी काम संपल्यावर थेट माळनाक्यावर गेलो .
    प्र .ल. वाट बघत होते .

    ' आपल्याला हॉटेलवर जायचं आहे . तिथे प्रकाश बुद्धिसागर तुमची वाट बघतोय .'
    माझ्या स्कूटरवर बसता बसता ते म्हणाले आणि मी स्कूटरला किक मारायला विसरलो .

    ' दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर ?'
    मी अविश्वासाच्या नजरेतून विचारले .
    ' एवढा मोठा दिग्दर्शक माझी वाट कशाला बघेल ?'
    ' ते त्यालाच विचारा .'
    त्यांनी विषय संपवला .

    आम्ही हॉटेलवर आलो .
    रूमवर प्रकाशजी वाट बघत होते .
    ओळखदेख झाली आणि मी काही विचारायच्या आत प्रकाशजी म्हणाले ,
    ' जत्रा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली तुमची कथा मला आवडली , आपण त्याच्यावर काम सुरू करू या . त्या कथेवर मला तुमच्याकडून दोन अंकी विनोदी नाटक लिहून हवे आहे , व्यावसायिक रंगभूमीसाठी .'
    ' अहो पण ...'
    मला त्यांनी काही बोलू दिले नाही . ते आणि मयेकर माझ्या कथेवर बोलत राहिले . दोघांनीही कथा वाचली होती .

    त्यावर्षी जत्रा दीपावली अंकाच्या संपादकांचं पत्र आलं होतं . मी यापूर्वी कधी विनोदी कथा लिहिली नव्हती .
    पण त्यांच्या आग्रहाखातर कथा लिहिली होती . कीआणि अनेकांना ती आवडली होती . आणि बुद्धिसागर , मयेकर यांनाही ती आवडली होती .
    पण त्या कथेवर नाटक ?

    मी अजून धक्क्यातून बाहेर आलो नव्हतो .

    प्र ल मयेकर व्यावसायिक रंगभूमीवरचे हमखास यशस्वी नाटककार .
    आणि प्रकाश बुद्धिसागर यशस्वी अभिनेते आणि व्यावसायिक रंगभूमीवरील प्रतिभासंपन्न दिग्दर्शक . त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके मी पाहिली होती .

    हे दोघे एकत्र येण्याऐवजी मला उभं करण्यासाठी दोघे एकत्र आले होते .

    शेवटी हो ना करता करता मी नाटक लिहायला तयार झालो . त्याअनुषंगाने खूप चर्चा झाली . दोघांनी अनेक बारकावे समजून सांगितले .
    एकप्रकारे व्यावसायिक नाटककार होण्यासाठी त्यांनी माझी कार्यशाळाच घेतली .
    या काळात माझी संगीत नाटके स्पर्धेत यश मिळवू लागली होती , तो संदर्भ घेऊनच प्रकाशजी आले होते .

    त्यानंतर अनेक वेळेला भेटीगाठी झाल्या . संहितेची अनेक वेळेला संस्करणे झाली . चौथ्या वेळी मात्र त्यांना संहिता पसंत पडली . प्र ल आणि प्रकाशजी यांच्यासमोर मी नाट्यवाचन केलं . प्र ल हे मंद स्मित करून दाद देत होते . आणि प्रकाशजी एकदम गडगडाटी हास्याने दाद देत होते .
    पुढचे दोन तास मी केवळ त्यांची चर्चा ऐकत होतो .
    दिग्दर्शक म्हणून आपण काय काय करणार आहोत , कोणती ट्रीटमेंट देणार आहोत , बिटविन द लाईन्स लाफ्टर मिळवण्यासाठी काय करता येईल या आणि अशा अनेक गोष्टी ते सांगत होते . प्र ल नी दोन अंकात मिळून चार जागा अशा सांगितल्या की तिथे उडत्या चालीची चार गाणी आणखी धमाल उडवू शकणार होती .

    ' नाटकाचे नाव काय ठेवणार ? '
    प्रकाशजीनी विचारलं .
    अरे , चल उचल !
    ' असं मला सुचलंय . पण तुम्ही अनुभवी आहात , तुम्ही सांगा .'
    ते क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले ,
    ' हेच नाव परफेक्ट आहे . एकदम कॅची आहे . अरे , चल उचल ! आता मुंबईला जातो आणि सुरुवातच करतो कामाला . '

    -- आणि असंच ते भरभरून बोलत राहिले . मानधन , स्टारकास्ट , प्रॉडक्शन हाऊस ...अनेक गोष्टी .

    'खूप दिवसांनी ही दमदार संहिता हाती लागलीय , धमाल उडवून देऊ , काय ..'

    त्यांना मी एक प्रत दिली .
    ते त्या रात्री मुंबईला गेले .
    नंतर फोनवरून काही दिवस संपर्क चालू होता .
    अचानक संपर्क थांबला .
    मीसुद्धा व्यग्र होतो .
    आणि एके दिवशी प्रलं चा फोन आला .
    ' प्रकाशची बातमी समजली का ? तो आजारी आहे , त्याला चालता येत नाही , बोलता येत नाही .अर्धांगवायू झाला आहे ...'

    मला धक्काच बसला .
    अनपेक्षितपणे व्यावसायिक रंगभूमीची संधी आली होती पण ती संधी क्षितिजासारखी दूर गेली होती .

    नंतर प्रकाशजी भेटले ते रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहात . शासनातर्फे माझ्याच हस्ते त्यांचा सत्कार झाला , त्यावेळी आम्ही बोललो . ते महत्प्रयासानं शब्द उच्चारत होते . मला वाईट वाटलं .
    त्यांनासुद्धा वाईट वाटत होतं . त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहवत नव्हतं .
    पण परिस्थितीपुढं आपण हतबल आहोत हे आम्ही मान्य करून घेतलं .

    त्यानंतर त्यांनी आणि मी सुद्धा त्या नाटकासाठी प्रयत्न केले .
    पण क्षितीज कधीही हाती आलं नाही . अनेक दिग्दर्शक , निर्माते , स्थानिक संस्था , अनेक जाणकार यांच्याकडे संहिता पाठवून दिली . चर्चा केली . पण त्या संहितेला रंगमंचावरील प्रकाश कधी दिसलाच नाही .

    एखाद्या संहितेचं भागधेय असतं.
    प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही .

    पण मी नाराज नाही .
    कारण माझी संहिता दमदार आहे .
    कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे .
    दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी देणारं आहे .
    आणि ... आणि बरंच काही आहे त्या संहितेत .

    मी अजूनही पॉझिटिव्ह विचार करतोय .

    केव्हातरी अशी संधी नक्की येईल आणि रंगमंचावरून उद् घोषणा होईल ;

    "...श्रीनटेश्वर , रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करून सादर करीत आहोत दोन अंकी , धमाल विनोदी नाटक , अरे , चल उचल ! "

    आणि त्या दिवसाची मी वाट पहात आहे.

    - डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
    ८९५१९०६७०१
    -------
    स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही

      August 18, 2025


  • आजचा आरोग्य विचार – भाग पाच

    एक काळ असा होता, की पाश्चात्यांना पोट कसे भरावे याची चिंता होती. संस्कृती, संस्कार हे शब्द त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. लज्जारक्षण कसे करावे, हे त्यांना माहित नव्हते. अर्थात अजून तरी कुठे कळले आहे म्हणा ! लज्जारक्षण करण्यासाठी चांगले कपडे घालायचे असतात, हा उद्देश नाहीच आहे. शरीर आणखी आकर्षक कसे दिसेल यासाठीच आज ते कपडे घालतात. त्यातूनच रॅम्पवाॅक कॅट वाॅक, फॅशनशो आणि स्त्री शरीराचा बाजार इ. प्रकार पुढे येत गेले.

      February 5, 2018


  • “इको व्हिलेज”

    सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता शासनाने ग्रामोत्थानाचा त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेला 'इको व्हिलेज' नाव दिले असून १० हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असणार्‍या ग्रामपंचायतींना प्रत्येकी

    ३६ लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.'इको व्हिलेज' योजनेंतर्गत गावांमध्ये उच्चप्रतीच्या भौतिक व मूलभूत सुविधा तसेच दर्जेदार सामाजिक मूलभूत सोई आणि मूल्यवर्धित स्थनिक रोजगार-स्वयंरोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. • योजना राबविताना ग्रामपंचायतींनाच योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. • सुरुवातीला तीन वर्षात मिळणारा निधी कामगिरीच्या सातत्यानुसार उपलब्ध करुन दिला जाईल. • राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची ही संकल्पना असून योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ते राज्यभर दौरेही करीत आहेत. • १० हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ३० लाख रुपये (दरवर्षी दहा लाख) दिले जातील. • यापैकी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असणार्‍या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ३६ लाख रुपयांचा निधी देण्याचे शासनाने ठरविले आहे. <शासनाकडून लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी पुढीलप्रमाणे -सनाने ठरविले आहे. • १ हजार ते २ हजारापर्यंत लोकसंख्येसाठी ९ लाख (दरवर्षी ३ लाख) रुपयांचा निधी देण्याचे शासनाने ठरविले आहे.• १ हजारापर्यंत लोकसंख्या असणार्‍या ग्रामपंचायतीकरिता प्रत्येकी ६ लाख (दरवर्षी २ लाख) रुपयांचा निधी देण्याचे शासनाने ठरविले आहे. <प्राप्त होणार्‍या निधीतून ग्रामपंचायतींना करता येणारी कामे घनकचर्‍याचे शास्त्रीय व वाणिज्य व्यवस्थापन, • गावातील सांडपाण्याचे शास्त्रीय व पर्यावरण प्रवण व्यवस्थापन, • जलनि:सारण गटारी, • रस्त्यावरील सौर पथदिवे,• सार्वजनिक इमारतीत सौर ऊर्जा वापर, • सौर रस्त्यावरील सौर ऊर्जेव्दारे जल व्यवस्था, • दहन भूमी बांधकाम व त्यासाठी आवश्यक इतर सोईसुविधा पुरविणे,• स्मृती उद्यान, • ग्रामपंचासतीअंतर्गत गावे व वाडयांना जोडणारे लहान रस्ते व बांधकाम,• पांधण रस्त्यांचे बळकटीकरण करणे, • वृक्षारोपण, उद्याने • बसथांबे बांधणे • आणि मुख्यत्वे राजीव गांधी भारत निर्माण ग्राम सुविधा केंद्रामार्फत ६०.४० प्रमाण राखून लागणारा अतिरिक्त निधी आणणे. • पर्यावरणाला संतुलित राखून गावाचा विकास करणे तसेच रोजगार व स्वयंरोजगार गावकर्‍यांना उपलब्ध करुन देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.• ५० मॉयक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टिकच्या पिशव्यांवर कायम बंदीचे सातत्य राखण्यावर आणि वृक्षारोपण करुन वृक्ष जगण्यावर विशेषत: भर योजनेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. • योजनेच्या अंतलबजावणीसाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे.• ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभागी होण्यासाठी निकषांची पूर्तता केल्यानंतर आपला प्रस्ताव संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर क तील.• त्यानंतर समितीकडून ग्रामपंचायतीने निश्चित केलेले निकष पाळले काय याची जिल्हा परिषद मतदार संघनिहाय समित्या करुन तपासणी करण्यात येईल.• निकष पूर्ण करणारे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेकडे गट विकास अधिकारी पाठवतील. • प्रत्येक पंचायत समिती क्षेत्रात, शक्यतो १०००० लोकसंख्येच्या वरील ग्रामपंचायत आणि तालुका मुख्यालयी अशी ग्रामपंचायत असल्यास तिला प्राधान्य देऊन, अशी ग्रामपंचायत आदर्श पर्यावरण संतुलित समृध्दी ग्राम म्हणून विकसित करण्यासाठी निवडण्यात येईल.• अशा ग्रामपंचायतीची जबाबदारी, विशेष अधिकारी, शासकीय प्राधिकरण, सेवाभावी संस्था, सामाजिक जबाबदारी घेणारे प्रगतशील उद्योजक, लोकप्रतिनिधी हे घेतील.• ग्रामदत्तक उपअभियान स्वरुपात अशा ग्रामपंचायतीना कृतीशील मार्गदर्शन करुन ती ग्रामपंचायत इतर ग्रामपंचायतीकरीता ज्ञानवर्धन केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात येईल.• या योजनेच्या अंमलबजावणीत जी गावे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतील व ज्यातून विज्ञान, तंत्रज्ञान व्यवस्थापकीय व लोकसहभागीय अशा आदर्शकृती इतर गावांना पर्यावरण संतुलित ग्राम विकासाकरिता प्रत्यक्ष राबविण्यास प्रमाणभूत व सहाय्यभूत ठरतील त्यांचे संकलन करण्यात येईल.• अशा गावांसाठी प्रोत्साहनपर व गौरवपर पारितोषिक योजना राबविण्यात येईल.• आदर्श कृतीची माहिती होण्यासाठी अभियानातील यशस्वी गावांना इतर ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी यांच्या आदानप्रदान भेटी आयोजित करण्यात येतील. -- बातमीदार

      August 30, 2010


  • संवादाचं सुख

    परस्परांतील सूर जेव्हा संवादाच्या माधमातून जुळायला सुरुवात होते, तेव्हाच त्याच्यावर ताल देखील धरला जातो. ह्यासाठी एकमेकांचं ताळतंत्र, थोडं का होईना पण सांभाळायला लागतं. संवादाचं सुख ही ज्याची त्यानी अनुभूती घेण्याची बाब असते.

      March 23, 2022


  • पुरस्कार उदंड जाहले

    हल्ली पुरस्कारांचा महापूर आला आहे.गल्ली ते दिल्ली त्याचा सुकाळ आहे. देणारे आणि घेणारे त्यासाठी उतावीळ आहेत. बालवाडी पासून त्याची सुरुवात होते.आमच्या बंड्या भाषणात पहिला आला आहे.नाव न सांगता येणारा बंड्या स्वातंत्र्य याविषयावर बक्षिस मिळवतो.

      January 14, 2024


  • मलेरियाची अफ्रिकेतील समस्या

    मलेरिया व बर्किट लिम्फोमा - ( एक प्रकारचा कॅन्सर ) यांचा संबंध

    बर्किट लिम्फोमा हा एक प्रकारचा जबड्याच्या खालच्या बाजूचा कॅन्सर असून तो अफ्रिकेत व मुख्यतः लहान मुलांमध्ये ९ ते १२ वर्षे या वयोगटात आढळतो . आता जगातील दुसऱ्या काही भागातूनही अशा केसेस नोंदल्या गेल्या आहेत .

    प्रसिद्ध सर्जन डॉ . बर्किट व त्यांचे दोन सहकारी डॉ . क्लीफ नेल्सन व डॉ . टेड विल्यम यांनी अफ्रिकेत १० आठवड्यामध्ये १०,००० मैलाचा प्रवास केला व ५७ हॉस्पिटलस्ना प्रत्यक्ष भेट दिली . साधारण १ ९ ६० सालाच्या सुमारास हा सर्व प्रवास त्यांनी २०३५ डॉलर्स खर्चून केला . यामधून निष्कर्ष असा निघाला की बर्किट लिम्फोमाची भौगोलिक स्तरावरील उपस्थिती ही मलेरिया रोगाच्या भौगोलिक विभागातील उपस्थितीशी तंतोतंत जुळणारी होती . हा लिम्फोमा एखाद्या विषाणूमुळे होत असावा व त्यासाठी डास त्याचा वाहक असावा असे वाटत होते . विविध प्राण्यांमध्ये विषाणूंमुळे कर्करोग होतो हे सिद्ध झालेले आहे . परंतु माणसांतही विषाणू हे कर्करोग निर्माण करू शकतात हे सिद्ध झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली होती . १ ९ ६४ मध्ये Epstein व Barr यांनी या कॅन्सरच्या गाठींमधून विषाणू अलग केला .

    याठिकाणी मलेरियाचा संबंध असा आला की सतत होणाऱ्या मलेरियामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व त्यामुळे संरक्षण देणाऱ्या T. Lymphocytes निष्प्रभ ठरतात . T. Lymphocytes ची अनियंत्रित वाढ झाल्याने बर्किट लिम्फोमा होतो . तसेच मलेरियाचे परोपजीवी CIDRI नावाचे प्रथिन तयार करतात ज्यामुळे Ebstein Barr Virus वाढण्यास मदत होते . हे विषाणू T. Lymphocytes ची अनियंत्रित वाढ घडवितात व त्यामुळे लिम्फोमा होतो . या परिस्थितीत E B Virus मलेरिया व बर्किट लिम्फोमा असे संगनमत घडून येते .

    अर्थात प्रत्येक मलेरिया रुग्णाला हा कर्करोग होण्याची अजिबात शक्यता नाही .

    अफ्रिकेतील एक अनुभव

    अफ्रिकेतील काही भागात एका विशिष्ट प्रकारच्या परोपजीवांमुळे ( Onchocer ciasis , River blindness ) हा डोळ्याचा रोग होतो . त्यासाठी Ivermectin or Mectizan हे प्रभावी औषध दिले जाते . असे आढळून आले आहे की हे औषध घेतलेल्या रुग्णांना ज्यावेळी डास चावतात तेव्हा ते डास लवकर मरतात . यावरून काही शास्त्रज्ञांना असे वाटते की हे औषध माणसाला दिल्यास ते डासांसाठी मृत्यूला कारण ठरू शकेल . साधारणत : नवीनच तयार ( young ) झालेल्या डासांमध्ये मलेरियाच्या परोपजीवींची पुरेशी वाढ झालेली नसते परंतु या परोपजीवींची पूर्णपणे वाढ होऊन परिपक्व ( old ) झालेल्या डासांकडून मलेरिया रोगाचा प्रसार होण्यास जास्त मदत होते . अशा औषधाने डासांचे आर्युमान कमी केल्यास मलेरिया प्रसारावर आळा घालता येईल .

    ह्या अचाट प्रयोगात कायम स्वरुपाचे यश मिळविण्यासाठी बऱ्याच अडचणी आहेत . हे औषध सरसकट सर्वांना देणे कितपत योग्य ठरेल याबाबत शास्त्रज्ञ साशंक आहेत .

    मनुष्य घेतो गोळी -डास घेतो चावा आणि मृत्यु होतो डासाचा !
    ( From The American Journal of tropical Medicine July 2011 , Quote Indian Express -13/07/2011 )

    दुर्गंधित मोज्यांचा मलेरिया या रोगाच्या निर्मूलनासाठी होणारा उपयोग

    एखाद्या उघड्या जागेवर वापरलेल्या जुन्या मोज्यांचा ढीग करून त्यातून निघणाऱ्या दुर्गंधाकडे डास आकर्षिले जातात असे आढळून आले आहे . अशा तऱ्हेने फसवणूक करून ह्या डासांना एकत्रित केल्यानंतर त्यांच्यावर डासांसाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी रसायनाचा फवारा मारल्यास ते डास मरतात . अशा आकर्षण पद्धतीने डास एकत्रित होण्याचे प्रमाण वाढविता येते असा दावा टांझानिया इफाकारा संस्थेचे प्रमूख डॉ . फ्रेड्रॉस ओकुमु यांनी केला आहे .

    प्रगत देशात मलेरियाचे प्रमाण कमी होत आहे परंतु विकसनशील देशात हे प्रमाण वाढतच आहे . डच वैज्ञानिक डॉ . बार्ट नोल्स यांनी प्रथम वरील सिद्धांत मांडला . ते स्वतः एका काळोख्या खोलीत नग्नावस्थेत उभे राहिले व त्यांनी दाखवून दिले की डास पायाच्या वासाकडे सर्वांत जास्त आकर्षिले जातात .

    ओकुमु यांनी आठ रसायने एकत्रित करून पायमोज्यांना येणाऱ्या वासासारखे रसायन तयार केले आहे . शिवाय डासांना मारण्यास योग्य असे विषारी द्रव्यही प्रयोगशाळेत बनविले आहे . त्यांचा दावा आहे की ९ ५ टक्के डास या पद्धतीने मरतात . या संशोधनासाठी डॉ . ओकुमु यांना बिल गेट फाऊंडेशन कडून आठ लाख अमेरिकन डॉलर्सची भरघोस मदत मिळालेली आहे .

    हे रासायनिक सापळे माणसांच्या घरांच्या फार जवळ ठेवणे योग्य नाही कारण तेथे आकर्षित झालेले डास माणसांनाही चावण्याची शक्यता जास्त असेल . त्याचप्रमाणे ते मनुष्य वस्त्यांपासून फार दूर ठेवले तरी तेथे फारसे डासांचे वास्तव्य नसल्याने प्रयोग उपयोगी ठरणार नाही . आज या रासायनिक सापळ्यांची किंमत ४ ते २० डॉलर्सच्या दरम्यान आहे . मानवी जीवन वाचविण्यासाठी ही दुर्गंधीयुक्त मोज्यांची योजना कितपत यशस्वी होऊ शकेल असा प्रश्न शास्त्रज्ञांपुढे आहे .

    -डॉ. अविनाश वैद्य

      November 4, 2022


  • रताळी

    रताळे हे कंदमूळ आहे. रताळी हे एक उपवासाचे पदार्थ. तसेच रताळे हे प्रत्येक माणसाला आवडतेच. लहान मुलांना भूक लागली तर आई लागलीच दूध व साखर घालून मुलाला देतात. रताळे हे प्रत्येकासाठी अत्यंत पौष्टिक अन्न आहे. बटाट्याप्रमाणेच रतळ्याचेही उपयोग आहेत. भरपूर जीवनसत्त्वे त्याचप्रमाणे भरपूर खनिजे तसेच भरपूर प्रथिने यात आहेत. रताळ्याचा उगम कसा व कुठून झाला हे अज्ञात आहे. मात्र रताळ्यात अमेरिकेमध्ये तयार होते तसेच आफ्रिका व काही ठिकाणी दक्षिण आशियातही मिळते. मात्र फार पूर्वीपासून रताळा हे भारताला परिचित आहे. तसे बघितले तर फूड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन (एफ.ए.ओ.) यांनी सर्व जगात संवर्धन केल्याप्रमाणे संबंध जगात रताळ्याचे उत्पादन जास्त असते. चीनमध्ये जगात दुसऱ्या नंबरवर रताळ्याचे उत्पादन होते.. अगदी नवीन अमेरिकन शेतकरी डॉ. मॅथ्यू मॉरिसन याने रताळ्याचे अनेक पृथ्थकरण करून त्यातील उपयोगाकरिता पुढे आणली. रताळे ही कोणीही कुठून आणले तरी अत्यंत पौष्टीक असे जाहीर केले. याचे कारण म्हणजे रताळे कोठेही कोणत्याही हवामानात वापरता येते. आश्चर्य म्हणजे रताळी अनेक देशात निर्यातही करतात, हे विशेष.

    आता रताळी सर्वत्र उपलब्ध असल्याकारणाने रताळ्याचे अनेक प्रकार करण्यात येतात. अगदी बटाटे उकडून बटाट्याची भाजीदेखील उपवासाला चालते म्हणजे ते एक पूरक अन्न चालू शकते. रताळ्याची कापा बटाट्यासारखी तेलात अगर तुपात तळून चांगल्या लागतात. रताळे किसणीने किसून त्याची पॅटीस अथवा अनेक प्रकार उपयोग करता येतो. तसेच लहान मुलांचे अथवा ज्येष्ठ नागरिकांचे पाय दुखत असल्यास रताळ्याचा उपयोग अवश्य करता येतो. थोडक्यात रताळे हे एक चविष्ठ आणि निरनिराळ्यात प्रकारात केलेली अपूर्व देणगीच म्हणावे लागेल.

    रताळ्यात सगळे आढळते. त्यात जेजे आहे ते ते सर्वत्र मिळते.

    १०० ग्रॅम रताळ्याचा गुणधर्म खालीलप्रमाणे आहे.

    – मदन देशपांडे

      December 4, 2023