वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्रकाशन दिनांक :- 11/04/2004
एखाद्या सरकारी खात्यात ‘सद्भावना सप्ताह’ दरम्यान जसे वातावरण असते तसे वातावरण सध्या संपूर्ण देशात दिसून येत आहे. विशेषत: राजकीय पक्षाशी संबंधित नेते आणि कार्यकर्ते चेहऱ्यावर विलक्षण माधुर्य ठेवून वावरत आहेत. अर्थात त्यामागे सद्भावनेचा भाव किती आणि स्वार्थाचा मुलामा किती, हा वेगळा विषय ठरतो.
April 11, 2004
वस्तु, पदार्थ, प्रकृती सर्वांची आवश्यकता आपल्याला आहे. त्यांचा शिवाय आपले जीवन नीरस आहे. म्हणून त्यांना ही हृदयाच्या निर्मळ भावनांनी धन्यवाद. तसेच ज्या ईश्वराने वेळोवेळी आपल्याला मदत केली. जिथे सगळ्या आशा संपल्या होत्या अशा वेळी जीवन सुखांनी भरून टाकले अश्या त्या परम सत्येला धन्यवाद करायला विसरू नका. हा धन्यवाद मंत्र सतत करत राहिले तर कधीच दुःखाची झळ आपल्याला लागू शकणार नाही.
September 17, 2021
पवार साहेबांचे आयुष्य चिमटे, कानपिचक्या, धोबीपछाड यातच गेले. मागून आलेले ममता, जयललिता, केजरीवाल, मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली पण 55 वर्षे राजकारणात असूनही पवार साहेबांना महाराष्ट्रात स्वबळावर एकहाती सत्ता मिळवता आली नाही.
आणि येड्या भक्तांना वाटतं साहेब राजकारणात काहीही घडवू शकतात.
4 वेळा मुख्यमंत्री, 15 वर्षे केन्द्रीय कृषी मंत्री राहूनसुद्धा आज जर जेल भरो करत असाल तर पवार साहेब मला एवढेच सांगा की 20 वर्षे काय केलत आपण ????
हे सरकार एक वर्षभर जलयुक्त शिवार म्हणून काय कर होतं ते काल सर्व बंधारे भरल्यावर आम्हाला समजलं..
एका पावसात सर्व बंधारे भरून गेले हो... यान्नी एका वर्षात जे केले ते तुम्हाला 15 वर्षात का नाही जमल हो...
आणि आता जेलभरो?? अहो त्यापेक्षा भुजबळ तटकरे अजित पवार रमेश कदम यांना सांगा की अक्षय ,नाना ,मकरंद यांचा आदर्श घ्यायला...
का फसवता आम्हाला साहेब...
अक्षय कुमार 90 लाख
रोहित शर्मा 5 लाख
अजिंक्य राहणे 5 लाख
लालबाग बागचा राजा 25लाख.
विठ्ठल मंदिर 1कोटी
mca - 1 कोटी
नाना पाटेकर.मकरन्द असे अनेक कलाकार मंडळी. अजून कितीतरी गणपती मंडळे हे सर्व दुष्काळी लोकांना मदत करत आहे आणि महाराष्ट्राला लूटणारे बारामतीकर काय तमाशा बघत आहे.
जास्तीत जास्त शेअर करा. बघा मग.बारामती कर 70हजार कोटी मधले 7 हजार कोटी तरी देतील.
नाही तर जेल भरो नक्की.
-- मकरंद
August 31, 2016
इंटरनेट वर सापडलेला एक अतिशय अर्थपूर्ण मेसेज ईथे सामायिक करतोय, कुणी लिहीलंय माहीत नाही पण सुंदर आहे. खरोखर वेळ काढुन वाचा
तो एक तरूण...अत्यंत हुशार... सर्वांचा लाडका...
हा मुलगा एकदा पोलिसांनी पकडला, गाड्या फोडताना... गेला तुरूंगात, लागली केस, वारी सुरू झाली कोर्टाची....
करिअर गेलं, वर्षे वाया गेलं, जामीन पण नाही, जवळ पैसे नाहीत, आयुष्यातुन उठला.....
का.....?????
का तर याला कोणीतरी कुणाच्या तरी विरोधात भडकवले... आणि...हे घडले....
हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.
पण लक्षात ठेवा...
आज जगात दोन प्रकारचे लोक आहेत...
दुसऱ्याला भडकवणारे आणि भडकणारे .....
भडकवणारे दारू विक्रेत्याप्रमाणे द्वेष विकतात...
आणि...
भडकणारे दारूप्रमाणे द्वेष पितात...
दारूची नशा लगेच उतरते, पण, द्वेशाची नशा चढत राहते...
आणि...
एक दिवस ज्याप्रमाणे दारू विकणारा बंगले बांधतो...
आणि...
दारू पिणारा भिकारी होतो...
तसे भडकवणारे मोठे होतात
आणि...
भडकलेले, बरबाद होतात...
आज आपला तंबाखू सारखा वापर करून घेतला जातोय...
यासाठी... शिवाजी महाराजांचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव घेतले जाते... त्यांच्या नावाने भडकावले जाते...
ज्याने भडकावले, त्याचा मुलगा स्टडीरूममधे...
आणि...
जे भडकले ते कस्टडी रूममधे...
ज्यांनी भडकवले त्याचा मुलगा अभ्यास करतोय...
आणि...
जे भडकले ते खडी फोडायचा अभ्यास करतेय...
ज्यानी भडकवले त्याचा पोरगा परदेशात शिकायला जातो...
आणि...
जे भडकले ते देशी प्यायला शिकतेय...
भडकवणाऱ्यांचा मुलगा फाड-फाड ईग्लिश बोलतो,
आणि...
भडकणारा, बघून घेतो, तंगडंच काढतो, नादाला लागू नको, वावर गेलं तरी पावर नाय गेली पाहिजे, असं बोलतोय...
भडकवणारे परदेशातून विमानाने भारतात येतात...
आणि....
भडकणारे...
शिवाजीनगर-
१० रूपये...१० रूपये
संभाजीनगर -
५ रूपये... ५ रूपये...
बसा ना...
ह्या बाजूला ...
त्या बाजूला ...
गाडी भरली, की
लगेच निघणार ...
१० रूपये ... ५ रूपये ...
भडकवणारे
विमानतळावर उतरतात...
भडकणारे गर्दीत घोषणा देतात...
...आमके तमके आगे बढो...
हम तुम्हारे साथ है...
बजाव.....
वन्सं मोर...
ढिंगच्यांग ढिच्यांग....
भडकवणाऱ्यांचा पोरगा पंचतारांकित हाँटालात ऐटीत बसतो...
आणि...
भडकणारे तिथं वेटर असतात...
कुठे गेली लाज...
कुठे गेला आत्मसन्मान...
छञपती शिवाजी महाराजांचे नांव घेता..
डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे नांव घेता..
पण स्वाभिमान माञ गहाण टाकलाय...
लाजाही वाटत नाही ...
अरे किती दिवस ...किती पिढ्यां....
आपल्या तरूणांना वाटत नाही कां...?
स्वतः काही तरी स्वाभिमान निर्माण करावा..
दुसऱ्याचे पाय चाटण्यापेक्षा स्वतःमधे आत्मविश्वास निर्माण करावा...
दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा स्वतः मोठं व्हावे...
दुसऱ्याच्या झाडाला पाणी घालण्यापेक्षा, स्वतः चे रोपटे लावले तर ते मोठं झाड होतं...कधी कळणार आम्हाला हे...???
आज आमच्या पोरांचा केवळ वापर करून घेतला जातोय...
कुणाच्या तरी विरोधात..भांडण करण्यासाठी ...मारामारी करण्यासाठी...
कसा होणार आमचा भारत देश महासत्ता....२१व्या शतकात आहोत.
पण आमची पोरं काय करतायेत....
वाद घालणे, भांडण करणे, मारामारी करणे...
हीच गोष्ट मनाला खटकत होती....वाईट वाटत होते...तळमळ वाटत होती...पण सांगणार कुणाला...???
एकमेकांशी वाद लावतोय, वापर करून घेतोय, स्वतःच्या पक्ष, संघटना वाढवतोय....
भावांनो,
वाद घालण्यापेक्षा स्वतःशी जर संवाद साधला तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही...
आपल्याला भडकावणाऱ्यांनी कधी स्वतःच्या मुलाला, भावाला, गाड्या फोडायला, मारामारी करायला लावले का ?
का नाही लावत...???
अरे, विचार करा...
आणि...
तरीही जर तुम्ही भडकवणाऱ्या लोकांचं ऐकत असाल तर
तुमचं भविष्य अंधारात आहे...
विचार करा...
कुणाच ऐकून का बरबाद होता...???
या लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या नोकरी, व्यावसाय, धंदा, शिक्षण, घर, संसार इ. कडे लक्ष द्या...
कोणी जर कुणा विरोधात भडकवले तर त्याला सांगा...
अगोदर स्वतःच्या मुलाला सांग...
त्याला गाड्या फोडायला लाव...
म्हणजे...
काम करायाला आम्ही आरामाला तुम्ही ...
बनवायला आम्ही खायला तुम्ही ....
रस्त्यावर आम्ही पेपरात तुम्ही ...
तुरूंगात आम्ही tv वर तुम्ही...
हे आता थांबले पाहीजे....
तरूणांनो
जागे व्हा....
दुसऱ्याला गुलाम म्हणणारे विचार करा...
आपण कुणाचे गुलाम नाही ना....???
आपला कुणी वापर करत नाही ना...???
विचार करा.
विचार पटले तर
मिञांना पाठवा.....!!!
धन्यवाद मंडळी
August 16, 2017
“प्राण” या संस्कृत शब्दाचा अर्थ जीवन असा आहे, तर “यम” म्हणजे शिस्त, नियंत्रण, नियमावली आणि पारंगतता होय. “प्राण” याचा दुसरा अर्थ श्वास असा होतो. याचे करण श्वास नसेल, तर जीवन असणार नाही. श्वसन हे शरीरातील स्वायत्त कार्य होय आणि त्याच्यावरच आपणास नियंत्रण करावयाचे असते.
November 24, 2010
"झिंगाट" च्या तालावर महापौरांसह अवघी तरुणाई थिरकली या विसर्जन मिरवणुकीच्या बातमीवरुन सुचलेला लेख. लेखक कळले नाहीत, पण सर्वानीच वाचुन विचार करावा असा.
संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली.
तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा.
समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली तेव्हा त्यांचे वय १० पेक्षाही कमी होते.
जिजाऊंनी श्री राम, कृष्णाच्या कथा सांगत घडवलेले शिवप्रभु शिवराय यांचे वय होते अवघे १४ जेव्हा त्यांनी शिवपिंडीवर स्वता:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली.
तर.. शंभु राजांनी शास्त्र आणि शस्त्रासंस्कारात भिजत "बुधभुषण" नामक ग्रंथ लिहीला तो देखील वयाच्या १६ व्या वर्षीच.
अशी कैक उदाहरणं आहेत आपल्याकडे. अगदी विष्णुगूप्त चाणक्य पासुन ते स्वामी विवेकानंद, बाळगंगाधर टिळक, सावरकरांपर्यन्त.
ह्या सगळ्यां संत पुरूषांमध्ये समान धागा हाच कि हे सगळे, धर्म आणि मातृभुमी वरील अफाट प्रेमाने झपाटलेले होते. ह्या सगळ्यांमधे प्रचंड उर्जा होती ती समाजाच्या कल्याणाची, प्रगतीची, स्वता:च्या अध्यात्मिक उन्नतीची.
आम्हाला आता ज्या वयात होशील का रानी माझ्या लेकराची आई सुचतय ना, त्याच वयात ती पिढी लिहित होती ..
इस कदर वाकिफ है,
मेरी कलम मेरे जज्बातोसे ..
मै इश्क लिखना भी चाहू,
तो भी इन्कलाब लिखा जाता है*
एकीकडे एैन तारूण्यात असं लिहिणारे भगतसिंग तर दुसरीकडे "तुझ्याशिवाय करमेना" अशा वयात १८ वर्षाची सुंदर पत्नी, ६ महिन्याचं गोंडस बाळ ह्यांना सोडून देश धर्मासाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर. आख्खी पिढीच अजब.
ह्या सगळ्यांचीच वयं जरी १५, १६ , २० असली तरी त्याची प्रोसेस काही वर्ष आधीच सुरू झाली असणार हे वेगळे सांगायलाच नको.
अशा कोणत्या मातीत ह्या व्यक्ती घडल्या असतील? नेमके कोणते संस्कार ह्यांच्या मनावर बिंबवले गेले असतील की अशा तेजस्वी विचारांची ही माणसं निर्माण होत होती?
आज अनेक शतकं उलटल्यानंतरही अशा महापुरूषांची आठवण झाली तरी शरीरावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही, मान आदराने खाली झुकते, हात आपोआप जोडले जातात. मनातले भाव जागे होतात, डोळे पाणवतात, एका वेगळ्याच आनंदाने मन अगदी भरून पावतं.
हे अशा प्रकारचे अनुभव आपल्यापैकी ब-याच जणांना कधीना कधीतरी आलेले असतात.
पण आता...
गेल्या काही दशकात ही परिस्थिती अगदीच बंद झाल्याचं जाणवतय. चांगली पीढी जन्माला येण्याचं संपलंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शाळकरी मुलं फक्त व्यसन आणि अश्लीलते कडे झुकलेली दिसते आहे.
ज्या वयात पुर्वी प्रतिभावान संत जन्माला येत होती त्या वयात आता वर्तमान काळात गावगुंड निर्माण होत आहेत. वय वर्ष १६ व्या मधील मुलं व्यभिचार आणि बलात्कारा सारख्या हिडीस प्रकारात पडलेले आढळतायत. दिल्लीतील चालत्या बस मधे घडलेला बलात्कार काय किंवा मुंबईच्या मिल परिसरातला बलात्कार काय! ही सगळी त्याचीच साक्ष. किशोरवयीन मुलं.. खुन, लफडी, मारामारीत आघाडीवर आहेत. शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना हातात सिगारेट असणं अन् तोंडात शिव्या असणं आता अभिमानाचं झालंय.
ही अशी पीढी उद्या प्रौढ होऊन कशी मुलं जन्माला घालतील आणि काय संस्कार करतील ह्याचा विचार न केलेलाच बरा.
आपले वैदिक ग्रंथ सांगतात की जर एक पिढी बरबाद झाली की पुढच्या पाच पिढ्या बरबाद होतात. मग चांगला समाज निर्माण होणारच कसा?
इंग्रजांनी आमची गुरूकूल शिक्षण पध्दती बंद केली. आणि तिथूनच आपल्या राष्ट्रीची अधोगती सुरू झाली.
सर्वात आधी आम्ही आमची भाषा विसरलो. मातृभाषेची जागा कमकुवत इंग्रजी ने घेतली. मग हळुच सुरवात झाली ती आमचा जाज्वल्य इतिहास पुसण्याची. जे जे वाईट ते ह्या मातीतलं आणि जे जे चांगलं ते फक्त परकीयांचं हे आमच्या मनावर बिंबवायला लागले. विमानाचा शोध आमचा नाही. आयुर्वेद आमचं नाही, अणुरेणु आम्हाला माहीत नाही, विज्ञान आम्हाला माहीत नाही, गुरूत्वाकर्षण, खगोलशास्त्र, भुशास्त्र, सर्जरी सगळं सगळं ह्यांच.
जर आमच्याकडे काहीच नव्हतं तर मग आमच्यावर गेली अनेक शतके इतकी आक्रमणं का?
आधी आमच्या भाषेवर, मग इतिहासावर, मग सणांवर, त्यानंतर देवदिकांवर आता देशावर. आमचा प्रत्येक सण, प्रत्येक दैवत ह्यांचं टार्गेट. ह्यातूनच जन्माला यायला लागली *fxxk yaar, टच वुड बोलणारी आणि ईशवराला नाकारणारी असुरी पिढी. पाश्चात्य शिक्षण देणा-या विद्यापीठातून (?) तयार झाले कन्हैय्या सारखे अक्कलशुन्य देशद्रोही राक्षस. आमचे संस्कार बदलले, आदर्श बदलले. जिजाऊ, राणी पद्मिनी आऊटडेटेड तर सनी लिओन, आलिया भट ह्या आत्ताच्या पिढीची आयडाॅल झाली. पाॅर्न पाहणारा सगळ्यात मोठा देश भारत झाला. कुंकू, टिकली, चुडा साडीतली आई माॅड मम्मा झाली. तीला जिन्स आणि लो बॅक टाॅप जास्त कनर्फटेबल वाटू लागला.
ह्या अधोगतीला सगळ्यात मोठा हातभार लावला तो ह्या सिनेसृष्टिने. हाताच्या बोटावर मोजणारे सिनेमे सोडले तर बाकी सगळेच "धन्यवाद" आहेत. टार्गेट आहे नुकतीच वयात आलेली किशोरवयीन पिढी.
सध्याचे चित्रपट आम्हाला शिकवतात ब्ल्यु फिल्म पाहणं गैर नाही, प्रेमात पडणं म्हणजेच उदात्तीकरण, हातात सिगरेट आणि वाईनचा ग्लास असणं स्टेट्स सिंबाॅल आहे. तुला बाॅयफ्रेंड किंवा तुला गर्लफ्रेंड नसण हे अपमानास्पद आहे.
लहान वयातलं प्रेम दाखवले की मगच राष्ट्रपती पारितोषिक मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो कि काय असा प्रश्न पडावा. असे पारितोषिक जाहिर करून शासन नेमके कोणते संस्कार घडवतय समाजावर????
ह्या नॅशनल अॅवोर्ड चा नेमका हेतु काय? ह्यातून नेमके कोणते समाजकल्याण होणार आहे? किंवा आत्ताच्या पिढिचा कोणता उत्कर्ष, उन्नती होणार आहे. ह्या असल्या पारितोषिकांमुळे समाजात जाणारा संदेश हा योग्य आहे का? की अशाच प्रकारचा समाज निर्माण होणं अपेक्षित आहे?
दोन पिढ्यांमधील फरक ठळकपणे जाणवतोय.
एक उत्कर्षाकडे जाणारी. आणि..
दुसरी अधोगतीकडे जाणारी.
संभ्रम...संभ्रम...आणि फक्त संभ्रम.
दोनच गोष्टी कळतायत....
आपला देश विदेशी शिक्षणाचं इंधन भरून, टाॅप गिअर टाकून अधोगती कडे चाललाय...
आपल्याला काय वाटते ?
September 25, 2016
भगवान श्रीविष्णूंच्या हातातील विविध आयुधांचे वर्णन केल्यानंतर प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज श्रीहरीच्या आसन स्वरूपात विराजमान असणाऱ्या भगवान श्री शेषांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
December 10, 2020
आज नवरात्रीचा रंग - गहन निळा
आजचा विषय निळ्या रंगाचे ब्ल्यूबेरी
आवळा, जांभूळ, स्ट्रॉबेरी, तुती, करवंद या बरोबरच ‘ब्ल्यूबेरी’ हे बेरीवर्गीय फळा मध्ये येते. भारतात हे फळ जास्ती वापरले जात नाही. ब्ल्यूबेरी हे पाश्चिमात्य फळ आहे. ब्ल्यूबेरीची लागवड प्रामुख्याने अमेरिकेत होते. या फळाची मूळ सुरुवात ही १९५० मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. त्यानंतर १९७० मध्ये डेव्हिड जॉन नावाच्या माणसाने याच्या बिया अमेरिकेत आणून त्याची लागवड केली. हे फळ स्कॉटलंडमध्ये 'ब्लेबेरी', नॉर्वेत 'ब्लॅबर' ओळखले जाते. विविध जाम आणि केक्समध्ये हे फळ वापरतात. निळ्या रंगांचं हे फळ चवीला मधूर असते. ब्ल्यूबेरीची पानं हिरवीगार तर फुलं घंटेच्या आकाराची असतात. त्यांचा रंग पांढरा, गुलाबी आणि लाल असतो. फळाचा रंग अर्थातच निळा असतो मात्र कच्च्या फळाचा गर हा हिरवट रंगाचा असतो. असं हे फळ दिसायला अगदी बोरासारखं असून त्यात एक लहान बी देखील असते. जेली, जॅम, मफिन्स आणि स्नॅक्समध्ये वापरतात. पाश्चिमात्य देशांमध्ये पोषक ब्ल्यूबेरी फळाला चांगली मागणी आहे. हे फळ जास्त काळ टिकते. या फळाचे औषधी उपयोगही बरेच आहेत. मेंदूच्या विकारांवर मात करून स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं. दररोज अर्धा कप ब्ल्यूबेरीचं सेवन केल्याने कर्करोगापासून संरक्षण करतं. त्वचेचा पोत सुधारते. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं. मूत्राशयाचं आरोग्य सुधारून लघवी साफ होते. उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखते त्यामुळे हृदयविकारापासून बचाव करते. यात जीवनसत्त्व ए, सी आणि ईचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम करते. डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. शरीरावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्याचं काम करते. ब्यूर्बेरी ने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या फळाचं जरूर सेवन करावं. मेंदूचे कार्य उत्तम गतीने चालण्यासाठी आणि त्याचा विकास होण्यासाठी ब्लूबेरीचा रस आरोग्यदायक ठरतो, असे संशोधन नुकतेच समोर आले आहे. त्वचा रुक्ष होण्यापासून टाळण्यासाठी ब्ल्यूबेरी खाणं उपयुक्त ठरतं.
रोझमेरी ब्लूबेरी स्मॅश
साहित्य : ७-८ ब्ल्यूबेरी, रोझमेरीचे तुरे, २ चमचे मध, २ चमचे लिंबूरस, १ कप सोडा, बर्फ.
कृती : रोझमेरीचे तुरे, ब्ल्यूबेरी आणि मध एकत्र करून नीट वाटून घ्यावे. त्यात लिंबाचा रस आणि बर्फ घालून ते एकत्र कॉकटेल शेकरमधून शेक करून घ्यावे. एका उंच पेल्यात थोडा बर्फ घालावा त्यावर हे मिश्रण ओतावे. आता यावर शीतपेय घालावे आणि रोझमेरीच्या तुऱ्यांनी सजवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
October 2, 2019
चांगले कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
November 1, 2021
चीननंतर सर्वाधिक लोकसंख्येचा देश भारत आहे. चीनला लागून आहे आणि व्यापारी संबंधांमुळे भारत-चीन प्रवासी वाहतूकही चांगलीच आहे. असे असतानाही भारतात कोरोनाग्रस्तांची इतकी कमी संख्या आहे. सावधगिरीचे उपाय काटेकोरपणे अंमलात आणणे आणि भीतीने पळत सुटणे यात फ़रक आहे.
March 28, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti