(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कपिकच्छू/खाजकुहिली

    कपिकच्छू/खाजकुहिली

    पुर्वीच्या काळी खोडकर विद्यार्थी वर्गात ह्याच्या शेंगा वरील लव बाकावर अथवा शिक्षकांच्या खुर्चीवर घालून मुलांच्या व शिक्षकांच्या नाकी नऊ आणत अशी हि खाजकुहिली.जिच्या शेंगेवरील लवंगेचा स्पर्श जर अंगास झाल्यास भयंकर खाज सुटते.
    ह्याचा वर्षायू वेल असून पाने ७-१३ सेंमी लांब,त्रिदलीय असून पानांवर बारीक लव असते.फुल १५-३० सेंमी लांब व मंजिरी स्वरूप असते.फुले वांगी निळ्या रंगाची असतात.फळ शेंगेच्या स्वरूपात ५-१० सेंमी लांब व १ सेंमी रूंद असते ह्याच्या कडा वाकड्या असून शेंगेवरील दाट लव असते.प्रत्येक शेंगेत ५-६ धुरकट व चपट्या बिया असतात.बीज मज्जा पांढरी असते.

    ह्याचे उपयुक्तांग बीज,मुळ व रोम असून कपिकच्छू चवीला गोड,कडू असून थंड गुणाची व जड व स्निग्ध असते.हे गोड,जड व स्निग्ध असून वातनाशक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)फलरोम क्षोभ उत्पन्न करून कृमिनाशक कार्य करतात म्हणून फल रोम हे गुळ,मध व लोण्यासह मिसळून देतात व त्यानंतर रेचक औषध दिले जाते ज्यामुळे कृमी मरून पडतात.

    २)कपिकच्छू बीज शुक्रवृद्धि करते म्हणून नपुंसकत्वात हे उपयुक्त आहे.

    ३)कपिकच्छू मुळ हे आर्तवजनन असल्याने मासिकपाळीच्या तक्रारींवर उपयुक्त आहे.

    ४)कृशता व अशक्तपणा ह्यात कपिकच्छू बीज उपयोगी आहे

    ५)गोड चव व थंड असल्याने बाळंतीणीमध्ये स्तन्यवृद्धि करण्यास कपिकच्छू बीज उपयुक्त आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©Dr Swati Anvekar

      January 15, 2018


  • अभ्यासपूर्ण भाषणांचे महत्त्व संपले

    जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात संसद सर्वोच्च स्थानी आहे. संसदेचे पावित्र्य राखण्याचे काम खासदारांनी करणे अपेक्षित असते. आजवर अनेक संसदपटूंनी अभ्यासपूर्ण भाषणांनी जनतेचे आणि देशासमोरील महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लावले आहेत.

      April 28, 2024


  • श्री गणेशस्तोत्र

    श्री गणेशस्तोत्र

    श्री गजाननाच्या पूजेत श्रीगणेशस्तोत्राचे स्थान मोठे आहे. नारदमुनींनी रचलेले हे स्तोत्र मराठीतही भाषांतरीत झाले आहे.

    श्रीगणेशाय नम । नारद उवाच ।

    प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
    भक्तावासं स्मरेनित्यं आयुःकामार्थसिेये ।। 1।।

    प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
    तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवत्रं चतुर्थकम् ।। 2।।

    लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
    सप्तमं विघ्नराजेन्दं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।। 3।।

    नवमं भालचन्दं च दशमं तु विनायकम् ।
    एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।। 4।।

    द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य पठेन्नर ।
    न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभुः ।। 5।।

    विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
    पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ।। 6।।

    जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
    संवत्सरेण सिद्धीं च लभते नात्र संशय ।। 7।।

    अष्टेभ्यो ब्राह्म्णेभ्यश्च लिखित्वा य समर्पयेत् ।
    तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत ।। 8।।

    ।। इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं गणेशस्तोत्रं संपूर्णम् ।।

      August 26, 2014


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग चार

    आपण खातोय त्या पदार्थाचे ज्ञान इंद्रियांना अगोदर होते. शब्द, स्पर्श, रूप, रस गंध या तन्मात्रा द्वारे, पृथ्वी आप तेज वायु आणि आकाश महाभूतांची आहारातील अनुभूती निर्गुण आत्म्यापर्यंत, चंचल मनामार्फत नेली जाते. आणि जी अनुभूती येते तिला "समाधान" म्हणतात. जेवताना हे समाधान मिळाले पाहिजे. नाहीतर "माझ्या श्योन्याला खाल्लेले अंगालाच लागत नाही" अशा तक्रारी सांगणाऱ्या अनेक माता असतात.

    खाताना लक्ष अन्य गोष्टीमधे असणे, म्हणजे जसे, टीव्ही पहाणे, मोबाईलवर बोलणे किंवा चॅटींग, गोष्टीचे पुस्तक वाचणे, अभ्यास करत करत जेवणे, वृत्तपत्र वाचणे, वायफळ गप्पागोष्टी करणे, पटत नसलेल्या मुद्द्यांवर जेवताना भांडणे, लक्ष जेवणामधे नसणे, स्वतःच्याच विचारात असणे, किंवा दुसऱ्यांच्या विचारात असणे, लक्ष जेवणात असले तरी जेवणातले दोष दिसणे, आवडीचे पदार्थ अति खाणे, नको असतील त्यांची चव सुद्धा न पहाणे, एकाच पद्धतीचे, एकाच चवीचे जेवण घेणे इ. दोष आहेत, आणि रुग्णाला तपासल्यानंतर अनेक शारीरिक दोष देखील वैद्यांना समजतात. ज्यांचा संबंध खाल्लेले अन्न, अंगाला न लागण्याशी आहे. हे बालक पालकांनी लक्षात ठेवावे. याला म्हणतात, इंद्रियगम्य ज्ञान !

    मग कितीही बॅलन्स डाएट द्या, काहीही उपयोग होत नाही.
    बदाम अक्रोड हे पदार्थ पचायला जड असतात. ते अशा मुलांनाच द्यावेत, ज्यांना नारळ, शेंगदाणे, तीळ, काजूगर कधी मिळतच नाहीत. आणि ज्यांची भूक खूप जास्ती आहे. नाहीतर हेच पदार्थ पौष्टिक म्हणून कितीही खाल्ले तरी अजीर्ण होण्याशिवाय काही होणार नाही.

    काय खातोय यापेक्षा कसं पचवू शकतोय हे जास्त महत्त्वाचे! मनापासून खाल्लं, आनंद निर्माण करत खाल्लं तरच पचते. रडत रडत, ताटातल्या अन्नाला नावे ठेवत, नाक मुरडत, चिडत चिडत, जेवलो तर आतील अवयव आणि इंद्रिये यांचे संतुलन बिघडते.

    बाहेरील परिस्थिती जर बिघडलेली असेल तर आत कितीही भूक असेल तरी जेवण जात नाही. भले साग्रसंगीत पंचपक्वान्नाचे ताट समोर आहे, पण बाजूच्याच घरात एका कोणाचा मृत्यु झालाय तर जेवण जाईल ? घरात भांडण सुरू आहे तर जेवण जाईल ? काही रागाने भरलेलं ताट कोणी भिरकावून दिलं तर जेवण जाईल ?
    आणि जबरदस्ती करून जेवलात तर ते नीट पचेल असे वाटतेय ?

    नुसते अन्न गिळले म्हणजे सर्व धातु तयार होतात असे नाही. म्हणून पालक आणि बीट खाल्ला म्हणजे रक्त वाढेलच असं नाही आणि आवळाज्युस प्याला तर कॅल्शियम वाढेल असंही नाही.

    बाहेरील शक्तीपेक्षा, आतली इंद्रियांची ताकद जास्ती काम करणारी असते, हे लक्षात घ्यावे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    19.03.2017

      March 19, 2017


  • ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८

    ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८

    २६ नोव्हेंबर २००८ ला  मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात आले. नॅशनल सिक्युरिटी गार्ड  (एनएसजी) दिल्लीवरून विमानाने ११६३ किलोमीटरचे अंतर पार करून २७ नोव्हेंबर २००८ ला सकाळी तीन वाजता’ मुंबईत पोहचले. एनएसजीच्या ऑपरेशनमध्ये एकूण आठ दहशतवादी मारले गेले. एनएसजीचे दोन कमांडो ठार झाले तर १८ जण जखमी झाले.

      November 15, 2018


  • याला जीवन ऐसे नाव भाग ८

    संदर्भ - वाग्भट तृष्णा चिकित्सा अध्याय

    तहान हा जेव्हा रोग होतो, तेव्हा हा रोग कमी होण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. ही तहान पण तीन प्रकारची लागते. वाताची, पित्ताची, आणि कफाची. त्यातील सूक्ष्म फरक वैद्यांच्या लक्षात येतो. यासाठी वैद्यांच्या अनुभवाचा आणि ग्रंथोक्त ज्ञानाचा फायदा घ्यावा. पण सर्वसाधारणपणे पाणी पिऊनदेखील जर तहान शमली नाही तर काय करावे, ते उपाय पाहूया.

    जांभळाची किंवा आंब्याची कोवळी पाने चघळून खाल्ली असता, अति तहान कमी होते.
    सर्व प्रकारची तहान कमी होण्यासाठी पावसाचे वरच्यावर धरलेले पाणी मध घालून प्यावे अथवा मातीचे ढेकूळ किंवा कौल किंवा वाळू तापवून पाण्यात विझवून ते पाणी गाळून साखर घालून प्यावे किंवा दर्भ नावाचे गवत पाण्यात टाकून ते पाणी प्यावे.
    लाह्यांचे पीठ करून साखर आणि मध घालून खीर करून प्यावी.
    साळीच्या लाहयांची कण्हेरी करून प्यावी.
    थंड पाण्याने स्नान करून, थंड गुणाच्या औषधांनी शिजवलेल्या दुधाबरोबर मध साखर घालून जेवावे.
    किंचीत आंबट आणि मीठ घालून मुगडाळीचे तुपाची फोडणी देऊन केलेले कढण जेवणात ठेवावे.
    दुधापासून दही ताक लोणी बनवून काढलेल्या तुपाचे सहा थेंब नित्य नियमाने दोन्ही नाकपुड्यात घालावे.

    याबरोबरच मनाची प्रसन्नता राखावी. नदी, तलाव, डोह अशा शांत थंड जागी जावे. किंवा त्याचे कल्पनाचित्र तयार करून त्यात रमावे.

    जेणेकरून तहान शमली जाईल. असे काही शारीरिक आणि मानसिक उपाय करावे. पण उगाचच पाणी पिऊ नये.

    काही ठिकाणी युक्ती वापरून लेपन चिकित्सा करता येते. जायफळ, वेखंड, हळद अशा उष्ण औषधींचा लेप थंड पाण्यातून केला असता, दोषांचे पाचन होऊन तृषा कमी होते. किंवा काही वेळा उसाचा रस मध वेखंड अशा औषधी पिऊन उलटी करून टाकल्याने देखील तहान कमी होते.

    पाणी सुद्धा पचावे लागते, ते पचण्यासाठी त्यात औषधी घालून पाणी प्यावे. कोणत्याही संस्काराशिवाय पाणी पिणे हे मधुमेह, रक्तदाबवृद्धी सारख्या आजाराचे कारण ठरू शकते.

    आयुर्वेदाचे माहेरघर केरळमधे हाॅटेलमधले पाणी देखील मुस्ता, चंदन, सुंठ घालून उकळवून दिले जाते. केरळमधे आयुर्वेद दैनंदिन जीवनात पाण्यातदेखील कसा मुरवलाय, हे हाॅटेलच्या या उदाहरणावरून लक्षात घ्यावे.

    नैसर्गिकरित्या लागलेली तहान साध्या पाण्याने कमी होते. पण साध्या पाण्याने तहान कमी झाली नाही तर असे औषधी पाणी प्यावे. सर्वसाधारणपणे मधुमेहात अशी तहान लागते. ही तहान कमी होण्यासाठी साध्या पाण्याऐवजी औषधी पाणी प्यावे. म्हणजे पाण्यापासून वाढणारा क्लेद, म्हणजे चिकटपणा कमी होऊन तहान कमी होते आणि साखरदेखील नियंत्रणात रहाते.

    म्हणजेच लागलेली तहान, काही वेळा औषधांनी पण कमी करावी लागते, प्रत्येक वेळी ही तहान फक्त पाण्यानेच भागते, असा गैरसमज नसावा.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    15.12.2016

      December 15, 2016


  • ‘स्ट्रीट माईम’च्या प्रचारासाठी..

    जनजागृतीसाठी पथनाटय़ाचा वापर करतात हे साऱ्यांनाच माहीत आहे, मात्र परदेशात प्रसिद्ध असलेला स्ट्रीट माईम हा कलाप्रकार भारतात फार कमी प्रसिद्ध आहे. माईमचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरता माईम आर्ट अॅण्ड कल्चर या संस्थेच्या तरुणांनी पाऊल उचललं आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला या तरुणांनी सीएसटी, मरिनड्राईव्ह आणि कुलाबा अशा ठिकाणी स्ट्रीट माईम सादर केलं. त्यांच्या कलेविषयी थोडसं.

    lead1एकांकिका, नाटक अशा कलेतून पुढे आलेले अनेक कलाकार आपल्याला माहीत आहेत. अशाच प्रकारातला एक कलाप्रकार म्हणजे ‘माईम.’ शब्दांचा वापर न करता, चेह-याचा हावभाव करत एखादी कला लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे माईम. युरोप, अमेरिका, सिक्कीम अशा ठिकाणी हा माईम प्रकार प्रचंड चालतो. स्ट्रीट माईमलाही परदेशात प्रचंड मागणी आहे. आपल्याकडे पटनाथ्य सादर करून जनजागृती केली जाते. भारतातही स्ट्रीट माईमचा प्रकार रुजावा याकरता काही तरुण प्रयत्न करत आहेत.

    नववर्षाच्या पूर्व संध्येला सीएसटी, मरिन ड्राईव्ह, कुलाबा अशा ठिकाणी काही तरुण स्ट्रीट माईम करताना दिसले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी या तरुणांनी स्ट्रीट माईमचं आयोजन केलं होतं. स्वप्नील गटवे, प्रमोद गुतूकडे, कुणाल काटे, सुयोग आंब्रे, प्रणय फडतरे, सागर चव्हाण आणि दीप नाईक या तरुणांनी कुणाल मोतलिंग याच्या मार्गदर्शनाखाली या स्ट्रीट माईमला सुरुवात केली आहे. सुरुवातीला कॉमेडी अॅक्ट सादर केल्यावर मुंबई पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांनी ‘सलाम मुंबई पोलीस’ यावर आधारित कलाकृती सादर केली.

    माईम आर्ट अॅण्ड कल्चरलचा संचालक कुणाल मोतलिंग म्हणतो की, ‘परदेशात स्ट्रीट माईमला प्रचंड मागणी आहे. मात्र आपल्या देशात स्ट्रीट माईमचा म्हणावा तेवढा प्रसार झालेला नाही. आपल्या हावभावने लोकांपर्यंत एखादा विषय नेणं फार अवघड काम असतं, जे माईममध्ये होतं. भारतातही माईम संस्कृती रुजावी, याकरता आम्ही स्ट्रीट माईम अॅक्टचा उपयोग करायचं ठरवलं.’

    एकांकिका, नाटक अशा कलेशी खरा संबंध जडतो तो महाविद्यालयातून. आज प्रत्येक महाविद्यालयात स्वंतत्र सांस्कृतिक विभाग आहे. कला क्षेत्रात पदार्पण करू पाहणा-या विद्यार्थ्यांना या सांस्कृतिक विभागाचा खूप फायदा होतो. मात्र आजही अनेक कॉलेजमध्ये माईम या क्षेत्राला हवा तेवढा वाव मिळालेला नाही. शिवाय माईमच्या स्पर्धाही खूप कमी प्रमाणात भरवल्या जातात. त्यामुळे माईम आर्ट अॅण्ड कल्चर या संस्थेतील तरुण मंडळी माईमचा प्रचार करण्यासाठी पुढे आली आहेत.

    २२ मार्च रोजी जागतिक माईम दिवस साजरा केला जातो. माईम या कलाप्रकाराचा प्रचार व्हावा याकरता माईम आर्ट अॅण्ड कल्चर या संस्थेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात इच्छुक कलाकारांनी सहभागी होऊन त्यांची माईम कला सादर करायची आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी २२ सप्टेंबर रोजीही असाच एक कार्यक्रम आयोजित केला जातो. या दोन्ही कार्यक्रमांना अनेक इच्छुक कलाकार सहभागी होत असतात. अशाच कार्यक्रमांमुळे माईमला कलाप्रकाराला चालना मिळेल, असं या संस्थेतील तरुणांना वाटतं.

    माईम आर्टिस्ट असलेला कुणाल मोतलिंग सांगतो, एका शाळेत माईम आर्ट शिकवतो. शिवाय अनेक माईम स्पर्धामध्ये परीक्षकांचं कामही करतो. इतरांना शिकवता शिकवता त्यालाही खूप शिकायला मिळतं असं तो सांगतो. माईम आणि स्ट्रीट माईम कलाप्रकाराचा भारतभर प्रचार व्हावा यासाठी या तरुणांनी उचलेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पदच म्हणावं लागेल.

    स्नेहा कोलते
    Sneha Kolte
    snehagkolte.sk@gmail.com

      February 16, 2017


  • ‘जावा’ने घडवलेली आठवणींची सफर – पूर्वार्ध

    ‘जावा’ने घडवलेली आठवणींची सफर – पूर्वार्ध

    कशावरुन कधी काय आठवेल त्याचा नेम नाही. तसंच झालं. ‘लोकसत्ते’त एक बातमी पाहिली. महिन्द्र कंपनी ‘जावा’ मोटरसायकल ‘पुन्हा’ बाजारात आणणार, ही ती बातमी. ही बातमी वाचली आणि मन एकदम मागे गेलं. मोटरसायकल शिकण्यासाठी केलेली धडपड, माझ्या आयुष्यात आलेल्या मित्रांच्याच जावा/येझदी व इतर मोटरसायकल्स-स्कुटर्स, त्यांनी मला दिलेला आणि अजुनही मनात भरून राहिलेला अवर्णणीय आनंद इत्यादींच्या मनातल्या त्या सर्व आठवणी जिवंत झाल्या

      November 29, 2018


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १५

    भगवान श्रीविष्णूंच्या चरणतलाचे वर्णन केल्यानंतर आता आचार्यश्री त्या चरणाला असणाऱ्या अनुपमेय अंगुलींचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,

      December 18, 2020


  • श्री शारदा भुजंगप्रयात – भाग ३

    आई जगदंबेने आपल्या ललाम अर्थात कपाळावर कुंकुमाची चंद्रकोर रेखाटली आहे. त्यामुळे तिला ललामाङ्कफाला असे म्हणतात.

      January 30, 2020