वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
खाणीतला कोळसा कितीही उगाळला तरी काळाच राहतो, हे भौतिक सत्य आहे; परंतु समाजातील वरून पांढरे दिसणारे हे बगळे सत्याच्या कसोटीवर घासले गेले, तर आतून इतके काळे असू शकतात, हे सत्य कोणत्या परिभाषेत मांडायचे?
September 26, 2012
नात्यांनी,जवळीकेने आजकाल चकीत व्हायला होतं – जी नाती कधी रुजतच नाहीत, ती जवळ आल्यावर धसकल्यासारखं होतं आणि दूर गेली की सुस्कारा सोडल्यासारखं हायसं वाटतं.
May 5, 2022
प्राचीन काळापासून मानव शहर वसवत आलाय..बरीशी जागा, आजूबाजूला पाण्याची सोय बघायची आणि वसती करायची हा पुरातन परिपाठ आहे..प्राचीन हरप्पा किंवा मोहोन्जादारो शहर असतील किंवा अगदी आता-आता पर्यंत वसलेली शहर असोत, अगदी याच पद्धतीने त्यांची निर्मिती झाली आहे.
November 11, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा
विज्ञान शाप की वरदान-भाग तीन
यंत्रांची निर्मिती ही टेक्नाॅलाॅजीची म्हणजे तंत्रज्ञानाची देणगी आहे की विज्ञानाची या वादात अडकून न पडता, आज या नवनवीन साधनांमुळे पूर्वीचा होणारा व्यायाम बंद झालाय, हे तरी मान्य करावेच लागेल. जाते, पाटा वरवंटा आता कोकलून सांगितले तरी शहरातील बायका काही या वस्तु परत वापरणारच नाहीत. परंतु भारतातील सत्तर टक्के जनता अजूनही ग्रामीण भागात राहाते आहे. भारतातील जवळपास पन्नास टक्के ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान अजूनही पोचलेले नाही.
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात स्वाईन फ्लु सारखे साथीचे रोग वेगाने पसरतात. हे आपण पहातोच आहोत. जेव्हा शहरातील एखाद्या बऱ्या न होणाऱ्या रूग्णाला, डाॅक्टर खेड्यामधे हवापालट करण्यासाठी जायला सांगतात.
शहरीकरणाचे वारे न लागलेल्या अशा एखाद्या खेड्यातील घरात एसी नसला तरी आरोग्य दडलेले असते.
अशी खेडीदेखील आता दुर्मिळ होत चालली आहेत. प्रत्येक गावामधे टाळू न शकणारी मोबाईलची रेडीएशन्स पोचलेली आहेत. कर्करोगाला निमंत्रण देणारी कोल्ड्रींक्स पोचलेली आहेत. ही पण वस्तुस्थिती आहे.
या सर्व परिस्थितीत आपण स्वतःला कसे सावरायचे आणि पुढील पिढीला कसे आवरायचे हाच प्रश्न आहे. एका बाजूने रासायनिक खतांचा मारा असलेले अन्नधान्य आम्हाला विकत घेऊन खावे लागते आहे तर दुसऱ्या बाजूने अशा खतांशिवाय आम्हाला पैसा मिळत नाही, असे सांगणारा, कर्जबाजारी शेतकरी आहे.
एका बाजूने डाॅक्टर चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खा, फळे खा, असे सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूने रासायनिक द्रव्यांमधे बुडवून काढलेली फळे, सांडपाण्यावर पोसवलेल्या पालेभाज्याच उपलब्ध आहेत.
औषधांशिवाय कसे जगता येईल हे सांगणारा आयुर्वेद एका बाजुला आहे तर औषधांशिवाय तुम्हाला जगताच येणार नाही, हे सांगणारी वैद्यकीय प्रणालीचा प्रचंड प्रभाव सरकारवर आणि जनमानसात आहे.
एका बाजूने नैसर्गिक जीवनशैली तर दुसऱ्या बाजूने कृत्रिमपणे आधुनिकतेचा बाज घेतलेली झगमगीत लाईफस्टाईल.
एका बाजूने भारत तर दुसऱ्या बाजूने इंडिया, हा वाद सुरूच राहणार आहे.
एका बाजुला आधुनिकीकरण, विज्ञान तंत्रज्ञान तर दुसऱ्या बाजुला निसर्गातील सहज ज्ञान.
एका बाजूने औषधे घेत घेत केवळ आयुष्य वाढवणे तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने जीवन जगणे.
पाकिस्तानशी खेळायचे असेल तर आम्ही स्वतःला हिंदुस्थानी समजतो, इतर देशाविरूद्ध मात्र इंडिया खेळतो. तर आयपीएल मधे सर्वधर्मसमभावाचे भूत डोक्यावर नाचवीत गळ्यात गळे घालून मिरवतो.......
या परिस्थितीमधे स्वतःला कसे जगवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
पुढे धोका आहे, हे समजून उमजून तसेच हट्टाने पुढे जायचेच असेल तर कोणी कोणाला अडवणार नाही, पण आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या या घोड्याला जोपर्यंत भारतीय आध्यात्मिक दृष्टीचा लगाम नसेल तर विनाश अटळ आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.05.2017
May 25, 2017
दिवसेंदिवस पर्जन्याचे प्रमाण कमी होत आहे तसेच भूगर्भीय जलसाठ्याचे प्रमाणही कमी होत आहे. अशा स्थितीत शेती हा व्यवसाय जुगार बनत चालला आहे. कमी पाण्यावरही उत्पादन देणारे पिक म्हणजे शेवगा होय . कमी पाणी तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे पिक शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते.
October 28, 2015
दिवाळी बाजार पेठावर चीनी आक्रमण थांबवा. MADE IN CHINA वस्तू अजिबात खरेदी करू नका
October 18, 2016
काही दिवसांपूर्वी गौरी गणपतीसाठी आईकडे गेले होते. या वर्षी, मी गौरीसाठी माहेरी आल्याने आईला खूपच आनंद झाला आणि एरवी ती जे शॉर्टकटमध्ये करत असे ते आता दोघी होतो म्हणून आम्ही दोघींनी मिळून सगळं अगदी साग्रसंगीत केले. आईकडे गौरी येते ती पाणवठ्यावरून. माझी आजी पूर्वी असा कलश नदीवरून भरून आणत असे.
November 17, 2023
आज दिनांक १ सप्टेंबर. १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर हा आठवडा भारतात राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ह्या सप्ताहाची सुरुवात फूड अँड न्यूट्रीशन बोर्डाने केली. सध्याच्या काळाची पाऊलं ओळखत आपणही संतुलित आहार घेण्यास सुरुवात केली पाहिजे. ह्याने झाला तर फायदाच होईल तोटा होणार नाही.
September 1, 2020
बीट हेसुद्धा पोषक कंदमूळ आहे. एक अत्यंत औषधी तसेच सर्वांना अगदी मनापासून आवडणारे फळ म्हणजे बीट. वास्तविक बीटरूट हा सेंट्रल अमेरिका येथून झाला.
December 2, 2023
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही. - भाग नऊ
विश्वासराव पानीपतच्या लढाईत मारला गेला. आता कोणावर विश्वास म्हणून ठेवायला नको, असे वाक्प्रचार आपण व्यवहारात वापरतो.
औषध देणाऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवून औषध घेणं महत्वाचे असते, तसंच मी बरा होत आहे, बरा होणार आहे, हा स्वतःवरचा विश्वास देखील महत्वाचा असतो.
औषध सेवन करत असताना हा विश्वास मिळवण्यासाठी भाव निर्माण करणं महत्त्वाचा असतो.
औषधं जाह्नवीतोयं, वैद्यो नारायणो हरिः ।
...... श्रद्धय हरिकिर्तनम।
मी हे जे काही औषध घेत आहे, ते जणुकाही गंगोदक आहे, त्याने माझे सर्व रोग नष्ट होत आहेत, आणि "औषध देणाऱ्या वैद्याला, मी नारायण स्वरूपात पहातोय, मग त्याने दिलेले तीर्थ घेतल्यावर मला गुण का येणार नाही," अशी श्रद्धा हवी, म्हणजे साधे एचटुओ सुद्धा तीर्थ बनते.
अकाल मृत्यु हरणम्
सर्व व्याधी विनाशनम्,
विष्णुपादोदकं तीर्थे
जठरे धारयाम्यहम् ।
असा मंत्र आपण देवाचे तीर्थ घेताना म्हणतो, (असा म्हणावा, म्हणजे तसा भाव, कल्पनेने तयार करावा, म्हणजे आपण जे एचटुओ, दूध, पंचामृत, नदीचे, नळाचे पाणी पितो, ते जणुकाही प्रत्यक्ष भगवंताने दिलेले औषध आहे, असा भाव ठेवावा. ब्रॅण्डेड औषध आणि जेनेरीक औषध घेताना सुद्धा असाच भाव ठेवावा का, असा प्रश्न कृपया विचारू नये.
हे तीर्थस्वरूप औषध घेतल्यावर, माझा अकालमृत्यु टळणार आहे, सगळे व्याधी मुळातून नष्ट होत आहेत, म्हणून हे औषध स्वरूपात असलेले तीर्थ, मी माझ्या जठरात म्हणजे पोटात घेत आहेत. (आता मला काळजीचे काहीच कारण नाही. आता माझी काळजी घेणारा, सर्व शक्तीमान परमेश्वर माझ्याबरोबर असताना काळजी कशाला ? काळोख कितीही पडलेला असेना का, जर माझ्याकडे उजेड करण्याचे खात्रीचे साधन जर असेल तर काळोखाची भीती वाटायचे काहीच कारण नाही.)
आता, परमेश्वरच नाही, ही विकल्प भावना आपणच जर तयार करून घेतली असेल तर, तीर्थ काय, पाणी काय. ब्रॅण्डेड काय, जेनेरीक काय, कशानेच गुण येणार नाही. एक भक्कम आधार भक्तीचा हवा तर भीती नाहीशी होते.
"मेरे लिए दुवा करो,"
"प्लीज, प्रे फाॅर मी" असं सांगणारी मुसलमान ख्रिश्चन माणसे आपण अवतीभवती बघतो, पिक्चरमधे असे डायलाॅगदेखील आपण ऐकतो, पण "माझे आजारपण कमी होण्यासाठी तुम्ही, माझ्यासाठी देवाला सांगा", असं विश्वासाने सांगणारी माणसे कमी होत चालली आहेत.
केवळ औषध काम करत नाही.
हरबार दवा काम नही करती, कभी कभी दुवा भी काम करती है !
यालाच दैवं पंचमम् उत्तमम् असे म्हटलेलं आहे.
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
27.04.2017
April 27, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti