वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बाळाचा सर्वांगीण विकास घडविताना काय करावं लागतं ? कोणती पथ्य पाळावी लागतात ?
January 3, 2017
आज पुणे शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ वृत्तपत्राचा वर्धापन दिवस.
सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, व नागपूर या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नारायण भिकाजी परुळेकर उर्फ नानासाहेब परूळेकर यांनी पुण्यात १ जानेवारी १९३२ रोजी सुरू केले.
१९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक प्रताप पवार यांच्याकडे आहे. सध्या सकाळ हे महाराष्ट्रातील आघाडीच्या खपाच्या दैनिकांपैकी एक आहे. वृत्तपत्र म्हणून सुरू झालेला सकाळ आता बहुमाध्यम समूह झालेला आहे.
नव्या-जुन्या पिढीतील वाचकांचे "सकाळ'ला भरभरून प्रेम मिळत आहे. दैनिक किंवा साप्ताहिकच नव्हे, तर "साम वाहिनी', "ई-सकाळ' आणि इतर "सोशल मीडिया'च्या माध्यमातूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाचक "सकाळ'शी जोडला गेलेला आहे. वाचकांच्या प्रतिसादामुळेच "सकाळ' ही वाटचाल करत आहे.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
January 1, 2022
निसर्गराजाने एकदाच… फक्त एकदाच…. असा चमत्कार केला होता, जो पाहून -ऐकून लाखो लोक आश्चर्यचकित झाले होते ! अमेरिकेच्या उत्तरेस असलेल्या आणि अमेरिका-कॅनडा देशांच्या सरहद्दीवर हजारो वर्षे अष्टौप्रहर कोसळत असलेल्या अतिप्रचंड जलप्रपाताचे, नायगारा धबधब्याचे कोसळणे २९ मार्च १८४८ रोजी अचानक थांबले आणि तब्बल तीस तास त्यातून पाणी आलेच नाही. नायगारा ठणठणीत कोरडा पडला होता !
March 29, 2022
डोळ्यांनी बोलणारी फक्त दोन माणसं मला या चित्रपटसृष्टीत आवडली – एक तो “निळ्या डोळ्यांचा जादूगार “(राज कपूर )आणि दुसरा हा! मराठीतला आपला चपखल शब्द वापरायचा तर हा “भोकरडोळ्या ” होता. पण इतकी बोलकी नजर अपवादात्मक ! त्याचे सारे संवाद ओठातून नंतर उमटायचे पण ते काम आधी डोळ्यांनी केलेलं असायचं.
May 7, 2022
भगवान श्रीविष्णूंच्या अलौकिक वैभवाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात….
October 17, 2020
कर्माच्या दोरीवरून चालताना दुसर्या बाजूचा तोलही सांभाळावा लागतो. ही दुसरी बाजू अपेक्षांची! मी एवढं केलं सगळ्यांसाठी पण कुणाला काही नाही त्याचं. साधं थँक्यू म्हटलं नाही. ..वाईट वाटतं. अगदी खरं आहे. पण हळूहळू ते वाईट वाटणं ही कमी व्हायला हवं. कारण ते वाईट फक्त आपल्याला वाटत असतं
January 8, 2022
माणसाला वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी रोज कुठल्याना कुठल्या वाहनाने प्रवास हा करावाच लागतो. मग तो सायकल, स्कूटर, मोटार, बस, बोट-होडी, रेल्वे किंवा विमान असो. प्रवास करतांना अपघात होतात म्हणून प्रवास करण्याचे टाळता येत नाही.
December 31, 2015
विरूद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेदात सांगितलेली आहे असे मला वाटते. दोन विरूद्ध गुणाचे पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. म्हणजे दूध आणि फळे, दूध आणि मासे, दूध आणि मीठ इ.इ. आता हे बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण गाडी योग्य मार्गावर वळत नाही. हाच बदललेला आहार.
December 7, 2016
शाकाहारी की मांसाहारी या द्वैतामधे आपण अजूनही आहोत. आपल्याला नीट निर्णय घेता येत नाहीत की योग्य काय आणि अयोग्य काय ?
मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर माणूस शाकाहारी आहे हे सत्य पटते. पण लगेच आयुर्वेदात सांगितलेले मांसाहारी औषध पण आठवते. आपण सोयीस्कर अर्थ काढणारी जमात आहोत. बुद्धीचा अति वापर करतो, म्हणून गडबड उडते.
न मांसभक्षणे दोषः
न मद्येच न मैथुने
प्रवृत्तिरेषा भूतानां
निवृत्तिस्तु महाफला
असं स्मृतीग्रंथकार म्हणतात.
म्हणजे मांसभक्षणात दोष नाही. मद्यपानात दोष नाही. मैथुनातही दोष नाही. या गोष्टी करण्यामधे लोकांचा नैसर्गिक कल असतो. स्वभावतःच ओढ असते. ही प्रवृत्ती आहे. आणि त्यातून निवृत्ती मिळवता येणे हे महाफल आहे. हे जास्त महत्वाचे.
न मांसभक्षणे दोषः एवढाच (सोयीस्कर अर्थाचा) भाग सांगितला गेला तर अर्थाचा अनर्थ कसा होतो, एवढेच सांगायचे होते.
अर्धवट श्लोक वाचून सोयीस्कर अर्थ काढले की चुकीच्या गोष्टींची भलावण करता येते, असा सध्याचा प्रघातच आहे. योग्य आणि अयोग्य याचा सारासार विचार करणे आणि निर्णय घेणे याला विवेकबुद्धी म्हणतात.
मांसाहार करणारे लोक आपली सोय बघतात. शाकाहार करणारे आम्ही कसे योग्य ते सांगत बसतात. त्याचे पुरावे पण सादर करतात.
गरज आहे वर्तमानात रहाण्याची. इतिहास यासाठी अभ्यासायचा, की त्यावेळी ज्या चुका झाल्या, अज्ञानामुळे केल्या गेल्या, त्या उज्वल भविष्याचा विचार करता, वर्तमानात होऊ नयेत.
प्राचीन भारतात मांसाहार सर्रास चालत असे, सर्व वर्णाचे लोक मांस भक्षण करीत होते, यज्ञासाठी पण प्राण्यांची हत्या होत होती, स्मृतीग्रंथातही मांसाहाराची भलावण दिसते, आयुर्वेदातही मांसाचे वर्णन आढळते.........
या सर्वात नाकारण्यासारखे काही नाही.
त्या काळात ते संमत होते. काळ बदललाय. आपणही नको का बदलायला ?
ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका आपणही परतपरत करायच्या का ?
नरबळींची प्रथा गेल्या शतकापर्यत भारतात सुरू होती. पण आज ? ती नाही. (अगदीच विकृत मनोवृत्तीतून नाकारता येत नाही.)
नरमांसभक्षक टोळ्या पूर्वी होत्या. आता नाहीत.
सतीची प्रथा, बालविवाह, जंगली प्राण्यांची शिकार, पुत्रप्राप्तीसाठी नियोग पद्धत, बहुपत्नीत्व इ.इ. गोष्टी संस्कारीत समाजाने अधिकृतपणे कायद्याने बंद केले आहे. आणि हे मोठे बदल जेमतेम साठ सत्तर वर्षातील आहेत.
वाल्या कोळ्याचा, वाल्मिकी ऋषी होऊन समाजमान्यता पावतो.
सार्वभौम राजा सम्राट अशोक आयुष्याच्या एका टप्प्यावर शाकाहारी बनला. जैन धर्माचे चौवीसावे तीर्थंकर महावीर जैन यांनी मांसभक्षण करू नये, अशी आज्ञाच काढली.
ज्यांच्या जन्मापासून मांसाहार सुरू असतो, अश्या अन्य धर्मातील लोक देखील आता मांसाहाराचा त्याग करू लागली आहेत. एवढेच नव्हे तर अमेरीका स्थित नासा या स्पेस रिसर्च सेंटरचा नियमच आहे, अवकाशात जावू इच्छीणाऱ्या अंतराळरवीरांनी शाकाहारी बनले पाहिजे !
भारतातील आताचा सर्वे असं सांगतोय की भारतात शाकाहारी लोकांची संख्या वाढली आहे. आपण चुकीच्या गोष्टींचा त्याग करतोय, बदल होतोय, ही चांगली गोष्ट आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने, सण व्रतांच्या निमित्ताने चांगले आरोग्य मिळवण्यासाठी चाललेले ही प्रामाणिक प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील, सर्व समाज पुनः सत्वगुणी बनेल अशी आशा आहे.
बदल हा होतच रहातो. चांगल्यासाठी स्थित्यंतर घडणे, हे कालानुरूप होतच आले आहे. होतच रहाणार.
प्रश्न आहे, आपण त्यात सामिल होणार की नाही याचा !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
6.10.2016
October 6, 2016
दरिद्रोऽस्म्यभद्रोऽस्मि भग्नोऽस्मि दूये
विषण्णोऽस्मि सन्नोऽस्मि खिन्नोऽस्मि चाहम् |
भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो
ममाधिं न वेत्सि प्रभो रक्ष मां त्वम् ‖ १६ ‖
भगवान दयासिंधू आहेतच मात्र व्यवहारात देखील ज्याप्रमाणे एखादे बालक त्याची असहाय्यता प्रगट करत नाही जोपर्यंत त्याची आई सुद्धा त्याला उचलून घेत नाही, त्याच प्रमाणे भगवान देखील सहजासहजी दया करीत नाहीत. याच भूमिकेतून आचार्य स्वतःच्या अगतिकतेला भगवान श्री शंकरांच्या समोर सांगत आहेत. ते म्हणतात,
दरिद्रोऽस्मि- मी दरिद्री आहे. आपल्या दये शिवाय माझ्याजवळ काहीही नाही.
अभद्रोऽस्मि- मी अभद्र आहे. अनेक अमंगल विचारांनी माझे मन युक्त आहे.
भग्नोऽस्मि - मी भग्न आहे. आयुष्यातील इतका सगळा चांगला काळ सत्कर्मा मध्ये न लावल्याने, हाती फार काही उरले नाही म्हणून आतून दुभंगलो आहे.
दूये- मी दु:खी आहे. हे भगवंता तू मला दिव्य मानवी जीवन दिले. पण मी ते कृतार्थ केले नाही याचे दुःख आहे.
विषण्णोऽस्मि- मी विषण्ण आहे. ही संधी गमावल्याची विषण्णता आहे.
सन्नोऽस्मि- मी सुन्न झालो आहे. काय करावे ते मला कळत नाही आहे.
खिन्नोऽस्मि चाहम् - मी खिन्न आलो आहे.
आता माझा उद्धार कसा होईल? या विचाराने माझी बुद्धी कुंठित झाली आहे.
आपल्या सगळ्यांच्या वतीने आपली अवस्था मांडतांना आचार्यश्री ही भूमिका मांडत आहेत.
अर्थात असे असले तरी,
भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो- हे भगवान हो आपण सर्व प्राण्यांचे अंतरात्मा आहात.
ममाधिं न वेत्सि- मग माझे हे अगतिकतेचे दुःख आपल्याला कसे कळणार नाही?
प्रभो रक्ष मां त्वम् - हे प्रभो! आपण माझे रक्षण करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 25, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti