वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सनग्लासेस म्हणजे गॉगल हे सूर्याच्या प्रखर किरणांपासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करणारे एक साधन आहे. प्रदूषणापासूनही त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते. सनग्लासेसमुळे स्त्री-पुरूषांचे व्यक्तिमत्त्वही खुलून दिसते.
October 27, 2023
कुटुंबे समृद्धी बाग तयार करताना जमिनीचे सपाटीकरण, बांधबंदिस्ती वगैरे जमिनीला खत देण्यापूर्वीच करावे. जमीन हलकी असेल तर किमान १५ ते २० सेंटिमीटर खोल माती राहील इतकी गाळाची वा काळी कसदार माती या क्षेत्रात टाकून घ्यावी. शेणखताबरोबरच तिसरा हिस्सा कोंबडी खत व तिसरा हिस्सा लेंडी खत मिसळून टाकले तर अधिक फायदा होईल.
November 5, 2023
संगणक कसा चालतो? त्यामध्ये काय आहे की त्यामुळे त्याला माणसाची बुद्धी असल्याचा भास निर्माण होतो? सगळेच तंत्रविज्ञान माणसाने स्वत:साठी निर्माण केले आहे. पण संगणक माणसाला सल्ला देतो असे दिसते. त्यामुळे हे शास्त्र काही वेगळे आहे. निश्चितच विज्ञान खूप प्रगत झाले आहे.
July 17, 2023
दिवाळीतील आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते, असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.
या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तीमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखवला आहे. यावरून असे दिसते की, प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निऋती या नावांनीही ओळखतात.. निवृत्ती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आíथक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्य मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
October 7, 2017
निवृत्त किंवा ‘न धरी शस्त्र करी। युक्तीच्या गोष्टी सांगेन मी चार.’ भूमिका घेण्यापूर्वी आपण म्हणजे पतीपत्नी वृद्धापकाळातही आर्थिकदृष्ट्या मुलांच्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी राहतील याची पूर्णपणे काळजी आधीपासूनच घेतली पाहिजे.
January 25, 2022
हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. या व्रता दरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते.
November 10, 2021
हिंसाचार्यांशी लढताना बळी जाणार्या पोलिसांचे, हिंसाचार्यांनी ज्यांचे प्राण घेतले त्या निरपराध नागरिकांचे मानवधिकार आहेत का? हिंसाचारापासून दूर व सुरक्षित असलेल्या विचारवंतांची आणि कायद्याचा कीस काढून अशा हिंसेचा न्याय करायला बसलेल्या तटस्थ न्यायमूर्तींची याबाबत काही जबाबदारी असते की नाही?
July 29, 2013
‘शतावरी’ ही एक उत्तम औषधी वनस्पती असून ती काटेरी झुपकेदार वेल स्वरूपात असते. कडू-गोड चवीची, शीतवीर्य असलेल्या शतावरीची मुळे व पाने औषध म्हणून वापरली जातात. शतावरीचा उपयोग स्त्रियांच्या लैंगिक इच्छाशक्तीत वाढ होणे, बाळंतपणातील अशक्तपणा दूर करण्यासाठी, दूध वृद्धीसाठी व प्रजोत्पादनासाठी होतो.
December 28, 2024
सध्याच्या काळात आयटम सांग्सचे स्वरूप केवळ हिंदी चित्रपटसृष्टीपुरते किंवा केवळ चित्रपटगृहापुरते मर्यादित राहिलेले नाही. आता हे गाणे ‘पॅन-इंडिया’ (Pan-India) आणि ‘सोशल मीडिया रील्स ट्रेंड्स’ (Instagram Reels) च्या दृष्टीने तयार केले जाते.
September 2, 2026
माझ्या आयुष्यातील घडलेल्या एका प्रसंगी मला गवसलेली स्वतःला आनंदी ठेवण्याची आणि नकारात्मक वातावरणात देखील मनाचा समतोल राखण्यास मदत करणारी पद्धती म्हणजे ‘हॅपी डायरी’ होय.
December 5, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti