वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण महाभारत अशा प्राचीन ग्रंथात विशेष वर्णन केलेले भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे श्रीक्षेत्र घृष्णेश्वर.
September 16, 2020
आरती करताना दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्या जातात.दोन्ही हातानी टाळ्या वाजवल्या की तळहातावरील प्रेशर पाॅईंट दाबले जाऊन आरोग्य मिळते. क्लॅपिंग थेरपी नावाची पोस्ट पण सगळीकडे फिरतेय…. त्यात तथ्य नाही, ते थोतांड आहे, असे आपण म्हणू शकत नाही. आणखी चौकस अभ्यास करायला हवा.
July 22, 2017
भगवान गणेशांच्या स्तोत्रांनंतर जगदंबेच्या स्तोत्रांच्या रसग्रहणाला आरंभ करताना आज नेमकी वसंत पंचमी असावी हा नियतीचा सुंदर योगायोग. वसंत पंचमी हा ज्ञानदायीनी देवी शारदेच्या, सरस्वतीच्या पूजनाचा दिवस
January 28, 2020
यस्यामोतं प्रोतमशेषं मणिमाला-
सूत्रे यद्वत्क्कापि चरं चाप्यचरं च ।
तामध्यात्मज्ञानपदव्या गमनीयां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ८॥
या विश्वाची उत्पत्ती आई जगदंबे पासून होते हे सांगितल्यानंतर, ज्यावेळी हे विश्व दृशमान असते त्यावेळी आई जगदंबेचे स्थान नेमके काय? हे स्पष्ट करतांना आचार्यश्रींनी ही रचना साकारली आहे.
आई जगदंबे च्या विश्व जननी स्वरूपानंतर विश्वाधिष्ठान स्वरूपाबद्दल बोलताना आचार्यश्री म्हणतात,
यस्यामोतं प्रोतमशेषं मणिमाला-
सूत्रे यद्वत्क्कापि चरं चाप्यचरं च ।
एखाद्या धाग्यात ओवलेले मणी जसे माळेत असावेत, तसे संपूर्ण चराचर विश्व जिच्यात ओतप्रोत भरलेले आहे अशी.
येथे दिलेला माळेचा दृष्टांत मोठा रमणीय आहे. जसे माळेतील सर्व मणी एका अंतर्गत सूत्राने बांधलेले असतात, तसे या संपूर्ण विश्वाला बांधणारे आणि संचालित करणारे सूत्र म्हणजे आई जगदंबा.
बाहेरून माळ पाहतांना केवळ मणीच दिसतात. आतला धागा दिसत नाही. मात्र असे असले तरी आत तोच धागा आहे म्हणूनच माळ ही माळ आहे. तो धागा नसता तर सर्वत्र विखुरले पण राहिले असते. त्याप्रमाणे या संपूर्ण विश्वामध्ये जी एक निश्चित नियमानुसार असणारी सुसूत्रता दिसते ती आई जगदंबेची शक्ती आहे. तिचे दिसणे महत्त्वाचे नाहीतर असणे महत्त्वाचे आहे.
एक लहानशी गोष्ट लक्षात घेऊ. या दृष्टांतात धागा आत असतो पण येथे आचार्यश्री म्हणतात ही चराचर विश्व जिच्यात ओतप्रोत भरले आहे. ती आत आहे म्हणायच्या ऐवजी विश्व तिच्यात आहे असे म्हटले आहे. अर्थात विश्वापेक्षा व्यापक आणि श्रेष्ठ आहे, हे सांगण्याची ही किती सुंदर पद्धती आहे.
तामध्यात्मज्ञानपदव्या गमनीयां- त्या अध्यात्मज्ञानरूपी पदवीने प्राप्त होणाऱ्या
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - कमळाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 6, 2020
दादासाहेब फाळकेंचा पहिला मूकपट ‘राजा हरिश्चंद्र’ हा १९१३ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक मूकपटांची निर्मिती झाली. तेव्हा मूकपट पडद्यावर चालू असताना तबला पेटी वाजवून काहीजण संगीताची साथ देत असत.
November 24, 2022
आमच्या ठाणे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात बळीप्रतिपदेला भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावातल्या चावडीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर पेटवण्यात येते. हा पेंडा पेटवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून व आगीच्या ज्वालांमधून गावात असणारी सगळी गुरे ढोरे एका बाजूकडून दुसरीकडे नेली जातात. पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेली ही प्रथा आजही गावोगावी त्याच उत्साहात सुरू आहे.
October 29, 2019
आणखी एक असाच खेळ ज्यासाठी प्रेक्षक वर्षभरात आवर्जून हजेरी लावतात.. तो म्हणजे टेनिस… ह्यातल्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना.. फ्रेंच ओपन टूर्नामेंट, अमेरिकन ओपन टूर्नामेंट, ऑस्ट्रेलियन ओपन टूर्नामेंट आणि सर्वात मानाची म्हणून ओळखली जाणारी विम्बल्डन टेनिस टूर्नामेंट… ह्या ही प्रत्येक स्पर्धसाठी त्यातील होणाऱ्या सर्व सामन्यांना मिळून, पर्यटक लाखाहून अधिक संख्येने उपस्थित राहून खेळातील उत्कंठा कायम ठेवतात.
April 23, 2023
अश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत साजरा केला जाणारा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दिवस असीम आनंदाचे ठरतात. दिवाळीत प्रत्येक दिवसाला आख्यायिकांचा आधार आहे. अमावस्येच्या रात्रीचा अंध:कार दूर सारून प्रकाशाच्या वाटा दाखवणारा हा सण ! या निमित्ताने आयुष्य जगण्याची नवी प्रेरणा मिळते.
November 3, 2010
कम्राकारा मुरारेः करकमलतलेनानुरागाद्गृहीता
सम्यग्वृत्ता स्थिताग्रे सपदि न सहते दर्शनं या परेषां ।
राजन्ती दैत्यजीवासवमदमुदिता लोहितालेपनार्द्रा
कामं दीप्तांशुकान्ता प्रदिशतु दयितेवाऽस्य कौमोदकी नः ॥५॥
युद्धाच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगी भगवान हातात तलवार किंवा धनुष्य धारण करतात. त्यामुळे त्याचे वर्णन वर केले आहे.
मात्र भगवंताच्या हातात सदैव असणारे आयुध म्हणजे गदा. या गदेचे नाव आहे कौमोदकी.
मोद म्हणजे आनंद. सगळ्या जगाला राक्षसांच्या त्रासापासून वाचवून आनंद देणारी असल्याने तिला कौमोदकी असे म्हणतात.
तिचे महात्म्य वर्णन करून वंदन करताना आचार्य श्री म्हणतात,
कम्राकारा - अत्यंत सुंदर आकार असलेली, आकर्षक स्वरूप असणारी,
मुरारेःकरकमलतलेनानुरागाद्गृहीता - मुर नावाच्या राक्षसाचा विनाश करणारऱ्या भगवान विष्णूंना मुरारी असे म्हणतात.
अशा भगवान श्रीविष्णूंनी आपल्या करकमलाच्या अग्रभागाने अर्थात बोटांनी, अत्यंत प्रेमाने धारण केलेली,
सम्यग्वृत्ता - सर्व बाजूंनी व्यवस्थित गोल असलेली. समान असणारी.
स्थिताग्रे सपदि न सहते दर्शनं या परेषां - जिला आपल्यासमोर उभ्या असलेल्या शत्रूचे दर्शनही सहन होत नाही. अर्थात शत्रू दिसताच ती त्याचा विनाश करते. कोणताही शत्रू तिच्यासमोर उभा ही राहू शकत नाही अशी.
राजन्ती दैत्यजीवासवमदमुदिता - त्यांच्या शरीरातून वाहणारे रक्त आणि मदाला जिरवणारी,
लोहितालेपनार्द्रा - त्या रक्ताच्या लेपाने ओली दिसणारी.
कामं दीप्तांशुकान्ता प्रदिशतु दयितेवाऽस्य कौमोदकी नः - ती अत्यंत तेजस्वी कौमोदकी नावाची गदा आमच्या मनोकामना पूर्ण करणारी ठरो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
December 8, 2020
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.
आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो. तबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला – दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.
पथ्यपाणी
ओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.
सोपा घरगुती उपचार –
हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.
कानाचे यंत्र
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्णकर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. संतोष जळूकर
December 30, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti