(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी `सेबी’

    सिक्युरिटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात “सेबी (SEBI)” ही भारतातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विविध मार्ग वापरते. सामान्य गुंतवणूकदारांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी आणि शेअरबाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांच्या बाबतीत कोणतीही तक्रार करण्यासाठी “सेबी”ने जुन २०११ मध्ये एका वेबसाईटची निर्मिती केली. scores.gov.in या संकेतस्थळावर आता कोणताही सामान्य गुंतवणूकदार आपली तक्रार नोंदवून तिचा पाठपुरावा करु शकतो.

    गुंतवणूकदारांकडून आलेल्या तक्रारींचा निपटारा वेगाने होत असल्याचा “सेबी”चा दावा आहे.

      June 20, 2016


  • अशी असेल २०२५ ची “ई-दिवाळी”

    आजच आपण पोस्टात फिरकत नाही. पण २०२५ मध्ये पोस्ट ऑफिस अस्तित्वात नसल्याचीही आपल्याला सवय झाली असेल. बँकांचे बरेच व्यवहार ऑनलाईन होत आहेत. आगामी काळात तर धनादेशही इतिहासजमा होतील. ब्रिटनमध्ये २०१८ पर्यंत धनादेशांचा वापर बंद करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

      January 26, 2024


  • किळस आलीय आम्हाला तुमची..

    भाजपा-सेना यांच्यातली ‘लोकसेवे’साठी चालणारी झोंबाझोबी पाहून मन कसं भरून यायला हवं, काळीज दाटून यायला हवं आपलं.. पण तसं काहीच न होता चीड, संताप, तिरस्कार, किळसं वाटू लागलीय..

      February 1, 2017


  • गोष्ट_जगातल्या_सर्वकालीन_सर्वोत्कृष्ट_सिनेमाची

    जिथे सर्वोत्तम दहा सिनेमांची यादीच बनवणे मुळात अवघड, तिथे सर्वकालिक सर्वोत्तम सिनेमा ठरवणे किती अवघड ना?
    आपल्यापैकी प्रत्येकाचे आवडते चित्रपट वेगवेगळे असतील..शंकाच नाही. या विषयावर उहापोह करताना सहजीच सामोरे येणारे काही प्रश्न असे आहेत..

      April 12, 2023


  • मेरे प्यारे मित्रों ssss

    आपण आपला दिवसाचा सरासरी किती महत्वाचा वेळ फेसबुक (आणि व्हॉटसअॅपवर) वर वायां घालवला, पोस्ट्सवर टाकलेल्या प्रतिक्रियांच्या वेळां पहिल्या तर) किती जागरणे केली, ज्या वेळात आपण सकारात्मक, विधायक, चिरंतन असं कांहीतरी करूं शकलो असतो, एखादे वाचानालय सुरूं करून चांगली पुस्तके वाचूं शकलो असतो, लिहूं शकलो असतो, चांगल्या विचारांचं आदान-प्रदान करूं शकलो असतो….

      October 16, 2018


  • गुडघेदुखीवर भारतीय पुष्पौषधी उपाय

    २-३ पिवळा सोनचाफ्याच्या फुलाच्या पाकळ्या काळपट होई पर्यंत अर्धी वाटी तीळाच्या तेलामध्ये तळाव्यात. तेल गार झाल्यावर गाळुन घ्यायचे आहे.

    हे सोनचाफ्याचे तेल दररोज गुडघ्यामध्ये लावुन जिरवावे. ह्यामुळे गुडघ्याच्या वेदना कमी होतात.

    सप्तरंगी स्वस्तिक थेरपी
    लाल स्वस्तिक गुडघ्याला व पिवळे स्वस्तिक माकडहाडाला रात्रभर बांधुन ठेवायचे आहे. दिवसा निकँपमध्ये लाल स्वस्तिक ठेवले तरी चालते.

    सूर्य किरण चिकीत्सा
    पांढ-या लहान बाटलीला लाल रंगाचा चौपदरी जिलेटीन पेपर सर्व बाजूंनी गुंडाळून त्यामध्ये २०० ग्रँम तीळाचे तेल घ्यावे. ही बाटली सकाळी ९ ते दुपारी ४पर्यंत सुर्यप्रकाशात ठेवावी. ही बाटली सलग १५ दिवस सुर्यप्रकाशात चार्ज करावी. नंतर ते तेल गुडघ्यांना जिरवावे.

    --- अरविंद जोशी, BSc.
    मोबा. नं. 9421948894

      May 20, 2017


  • आहारातील बदल भाग ४ – मांसाहारी भाग एक

    मांसाहारी प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. जी खास आहेत. वैश्विक सत्य आहेत. म्हणजे जगात कुठेही गेलात तरी ही सत्य बदलत नाहीत. वाघ भारतात असो, वा बांगला देशात त्याची वैशिष्ट्ये तीच रहातात.

    सर्व मांसाहारी प्राणी पाणी पिताना जीभेने पितात. जीभ खूप खरखरीत असते. जीभेला आतल्या बाजूला वळलेल्या खाचा असतात. त्यामुळे पाणी चाटले जाते. चाटलेले पाणी या खाचांमधे भरलेले रहाते. सिंह पाणी पिताना पाहिलेत. सिंहच कशाला कुत्रा, मांजर देखील असंच पाणी पितात.

    यांचे दात आणि सुळ्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. भक्ष्य पकडण्यासाठी, खाल्लेले मांस तोडण्यासाठी, हाडे फोडण्यासाठी, सुळे आतमधे वळलेले, वर खाली दोन्ही जबड्यात असतात. या सुळ्यांना धार असते. तीक्ष्ण टोके असतात. यामुळे भक्ष्य एकदा पकडले की सहसा सुटत नाही. मगरीच्या तोंडातील दातांची रचना लक्षात घ्या.

    यांना अन्न बारीक करायचे नसते. अन्न रवंथ करायचे नसते. सुळ्यांनी भक्ष्याचे तुकडे केले की अख्खे तुकडे गिळतात. म्हणून यांच्या जबड्यात दाढा कमी असतात. दाढा कमी, चावणे नाही म्हणून यांची पचन करणारी आतली अन्नपचन करणारी काही एन्झाईम्स खूप जास्ती प्रमाणात पाझरत असतात, ज्यामुळे त्या अम्लामधे मांसाचे तुकडे सहज विरघळून जातात. अजगर तर अख्खी नीलगाय गिळतो. त्याच्या पोटात एवढे तीक्ष्ण पाचकरस असतात की त्यात नीलगाईची शिंगे, हाडे, केस, दात, पायाचे खूर सगळं काही सहज विरघळून जाते. यांना शिजवणे सोडाच, जाळले तरी ते भस्म होत नाहीत, असे हे अत्यंत कठीण अवयव पोटातील पाचकरसात सहज विरघळून जातात. ईश्वराने/ निसर्गाने, त्यांना अन्नपचन करण्यासाठी केलेली ही मदतच आहे. त्यामुळे यांनी अन्नाचे तुकडे गिळले तरी सहज पचून जातात. अपचन, अजीर्ण, पोटफुगी, गॅस, ढेकर असे काही लक्षणे किंवा आजार त्यांना नसतात.

    पायांची नखे देखील सुळ्यांप्रमाणे टोकदार धारदार आणि तीक्ष्ण असतात.झडप घालून भक्ष्याला पकडणे, परत सुटू नये म्हणून नखे रोवून ठेवणे, गरूड, घार, घुबडाची नखे पाहिलीत किती अणकुचीदार असतात ती !

    या नखांचे आणखी एक वैशिष्ट्य. ती हलवता येतात. आत बाहेर करता येतात. भक्ष्याला पकडण्यासाठी ही रचना असते. काम झाले की फोल्डींग करून ठेवायची.

    यांना अंगावर पाणी घ्यायचा खूप कंटाळा येतो.त्यामुळे ही मंडळी आंघोळ करीत नाहीत. यांच्या अंगाला खूप उग्र वास येतो. दुर्गंधी पण असते.

    आवाज तर विचारूच नका. एवढा मोठा आणि भेदक असतो, की डरकाळी फोडली तरी उरात धडकी भरावी.

    त्यांची नजर पण एवढी तीक्ष्ण असते, की दूरवरचे भक्ष्य देखील सहज दिसते. घारीला किती वरून जमिनीवर असलेले भक्ष्य दिसते.

    आणि यांनी एकदा पोटभर खाल्ले तर पुढे आणखी काही दिवस एखादा प्राणी खायला नाही मिळाला तरी चालते. एवढे प्रोटीन्स त्यांना मिळतात की ते पुढे पुरवून पुरवून वापरता येतात. हाय प्रोटीन डाएट !

    सर्व मांसाहारी प्राणी नजर रोखून ठेवत, कळपाने, समुहाने ठरवून शिकार करतील, पण शिकार खाताना एकट्या एकट्यानेच खातील, डूक धरून खातील. खाताना इतर कोणी त्याचेच भाऊबंद शिकार खायला आले तर त्यांच्या अंगावर गुरगुरतील, ओरडतील, धावून जातील. मांजराची पिल्ले, उंदीर पकडताना बघीतलंय कधी.

    ईश्वराने यांची आतडी लांबीला कमीच ठेवली आहेत, न जाणो कोणता रोगट प्राणी चुकुन खाल्ला गेला, तर तो लवकरात लवकर पोटातून बाहेर पडून जावा. पुढे जाऊन त्याच्या शरीरातील रोगजंतु, किंवा टाॅक्झीन्स, खाणाऱ्याला त्रास देणार नाहीत.

    ईश्वर /निसर्ग महान आहे.
    .......क्रमशः ऊद्या

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    25.09.2016

      September 25, 2016


  • ब्लॅकबेरी

    ब्लॅकबेरी हा मोबाईल ईमेल व स्मार्टफोन यांचे एकत्रीकरण करून बनवलेला एक फोन आहे. कॅनडातील रीसर्च इन मोशन या कंपनीने १९९९ मध्ये ८५० हा ब्लॅकबेरी पहिल्यांदा तयार केला, पण तेव्हा त्याचे स्वरूप संदेशाची देवाणघेवाण करणाऱ्या पेजरसारखे होते.

      September 17, 2023


  • विमानप्रवासाचे विज्ञान

    विमानप्रवास आता सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे. विमानात बसण्याची पूर्वतयारी म्हणजे तारीख ठरवून तिकीट काढणे अशी बहुतेकांची समजूत असते. ‘मला विमान चालवायचे नाही. त्याच्या संबंधातील तांत्रिक गोष्टींचा मला काय उपयोग?’ असा प्रश्न रास्त आहे. पण यामागील विज्ञानासंदर्भात एक प्रश्न विचारून फक्त सुरुवात तर करून बघा? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल वगैरे बाबतीतील कुतुहल वाढत जाईल. जसजशी उत्तरे मिळतील तसतसे प्रश्न वाढतील. करूया सुरुवात? ‘विमानप्रवास सुरक्षित आहे का?’ हा काहींचा पहिला प्रश्न असू शकतो.

      September 11, 2019


  • सातवा राष्ट्रीय हॅन्डलूम दिवस

    केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २०१५ साली ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन’ साजरा करण्याचे घोषित करण्यात आला होते.

    हातमाग उद्योगाला अच्छे दिन

    खूप वर्षापूर्वी म्हणजे भारतात इंग्रज लोक येण्यापूर्वी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. त्यांच्यात आपापसातील व्यवहार हे फारच वेगळ्या पद्धतीची होती. कामाच्या मोबदल्यात धान्य द्यायची पद्धत खरोखरच लोकांना सर्व काही मिळवून देत होती. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला काम मिळत होते आणि त्याच्या मोबदल्यात खाण्यास लागणारे अन्नधान्य मिळत होते. शेतात उत्पादित झालेले धान्य त्याच गावात फिरत राहत होते. पैसा नावाची वस्तू त्यांना माहीतच नव्हते, त्यामुळे जो तो आपापली कामे अगदी चोख आणि व्यवस्थितपणे करीत असत. यांच्यासाठी गावात बारा बलुतेदार ही पद्धत आस्तित्वात आली होती. ज्यामुळे प्रत्येकाचे काम अगदी सहजपणे कुठलीही समस्या निर्माण न होता पूर्ण होत असे.

    ज्याचे काम त्यानी करावे जसे की वारकांनी केस कापावी, वरटी लोकानी कपडे धूवावी,चांभारानी चपला शिवाव्यात,गुरवानी मंदिरांची देखभाल करावी, कुणब्यानी शेती करावी, साळयानी कपडे विणावी आणि रंगारी लोकानी त्यास रंग लावावी ही पद्धत लोकाना स्वावलंबी जीवन जगवायला शिकवायचे. मात्र इंग्रजानी भारतात व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि हळूहळू पाय पसरवीत संपूर्ण देशावर आपले वर्चस्व निर्माण केले. कपड्यांचा बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण व संपन्न देश होता कारण येथील लोक फारच सुंदर कलाकूसर करून कपडे तयार करीत असत. आजही खादीचा कापड भारतात प्रसिद्ध आहे. त्या कापडाची वैशिष्ट्य म्हणजे हे कापड जाडजूड, टिकाऊ आणि अनेक वर्षे ते कापड फाटले तरी फाटत नव्हते.

    उन्हाळ्याच्या दिवसात तर या कापडाला जास्तीची मागणी असते . भारताचा खरा कपडा म्हणजे खादीचा कपडा. हा कपडा खेड्यातील पद्मशाली समाजातील लोक हातमागावर विणून तयार करीत असत. आज ही ह्या समाजातील बरीच मंडळी हा उद्योग करतात. देशात आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात भिवंडी, सोलापूर, जालना, नांदेड, चंद्रपूर सारख्या ठिकाणी हा समाज फार मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. या समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे कपडे विणणे ; परंतु इंग्रजांनी भारतात येऊन ज्याप्रमाणे इतर व्यवसायावर घाला घातला तसेच या हातमाग उद्योगांवर सुध्दा घाला घातला गेला.

    इंग्रजांनी भारतात येऊन जाडजुड कपड्यांच्या जागी मऊ तलम व वजनाने हलकी वाटणारी टेरीकॉट कापड तयार करण्याची यंत्रणा आणली आणि या खादी उद्योगाला घरघर सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशीचा तीव्र लढा सुरू करण्यात आला होता. बाबू गेनू नावाच्या क्रांतीकारकाने परदेशी कापडाच्या गाडीसमोर आपले बलिदान देऊन स्वदेशीचा लढा सर्वदूर पोहोचविला होता. याच दिवशी भारतात जागोजागी परदेशी कापडाची होळी करण्यात आली होती .

    यावरून विदेशी कपड्याने भारतात किती मोठे साम्राज्य निर्माण केले होते, याची जाणीव होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तरी या खादी कपड्यांच्या उद्योगाला चालना मिळेल अशी छोटी आशा होती. मात्र झाले उलटेच. खादी उद्योगाला स्वातंत्र्यानंतर सुध्दा घरघर लागली. ज्या समाजातील लोकांचा हा मुख्य व्यवसाय होता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या लोकांना पोट भरण्यासाठी इतर कामाच्या शोधात भटकत रहावे लागू लागले यातूनच हा समाज जो पूर्वी एका ठिकाणी स्थिर होता तो संपूर्ण देशात पसरलेला दिसून येतो. तरी ही त्या॑नी मूळ व्यवसाय सोडलेली नाही. आज ही या समाजातील ४३ लाख हून अधिक लोक खास करून हातमागाचा व्यवसाय करतात.

    ग्रामीण भागातील महिला आणि दारिद्रय रेषेखालील जीवन जगणारी कुटूंबातील महिलांसाठी हाच व्यवसाय उदरनिर्वाहचे एक साधन आहे. या खादी व्यवसायास चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावे, या राष्ट्रीय हॅण्डलूम दिवसा मुळे सरकारच्या या निर्णयाने भविष्यात खादी हातमाग उद्योगाला अच्छे दिन येतील असा विश्वास करण्यास काही हरकत नाही. आपण सर्व भारतीय नागरिकांनी देखील या उद्योगास चालना मिळावी म्हणून वर्षातून एक तरी खादीच्या कापडाचा पोशाख वापरावे, असे वाटते.

    - नागोराव सा. येवतीकर

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      August 7, 2021