वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कर्करोगाची त्यांची ओळख रंगाद्वारे पामेला महिलेने जगाला दिली असे म्हणावयास हरकत नाही.
September 22, 2021
समीर गांगुली दिग्दर्शित शर्मिली हा हिंदी चित्रपट २५ एप्रिल १९७१ रोजी प्रदर्शित झाला. गीतकार नीरज आणि संगीतकार एस. डी. बर्मन या सदाबहार गाणी देणाऱ्या जोडीची या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. आजही या चित्रपटाचं शीर्षक गीत ‘ओ मेरी शर्मिली’ हे गाणं गाताना किशोरकुमारने आपल्या खास शैलीत गाऊन एकच धमाल उडवून दिली होती. यातील इतर गाणी ही तेवढीच गाजली होती.
April 29, 2021
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 22, 2018
चार हात, लाल रंग, सोंडे सह असलेला अवतार हे या द्वापार युगातील आपल्या सगळ्यात जवळच्या अवताराचे वैशिष्ट्य असल्याने सामान्यतः गणेशमूर्ती याच स्वरूपात केल्या जातात. या अवताराचा प्रगटोत्सव देखील भाद्रपद शुद्ध चतुर्थीचाच आहे.
September 4, 2019
परब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवंताच्या दिव्यत्वाचे वैभव वर्णन करताना आचार्य श्री वेगवेगळ्या अंगाने आपल्याला भासमान असणाऱ्या संपूर्ण विश्व पेक्षा त्याचे स्वरूप कसे वेगळे आहे ते उलगडून दाखवत आहेत.
November 5, 2020
आकांत ह्या चित्रपटाचं संपूर्ण कथानक ग्रामीण जीवनातील एक भयावह वास्तव मांडणारं आजही ग्रामीण समाजात किती अनिष्ट प्रथा आणि रुढी प्रचलित आहेत. याच्यावर अगदी नेमकेपणाने भाष्य करणारा पारधी दुर्लक्षित, उपेक्षित समाजावर काही अंशी प्रकाश टाकण्याचे काम “आकांत” मधून रेखाटलय.
March 20, 2013
जुलै २००२ आणि जुलै २००३ मध्ये घडलेल्या दोन घटनांची एक आठवण.....
एप्रिल २००२ मध्ये विंडीज दौर्यात सचिन तेंडुलकरने सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्याची गौरवपर भेट म्हणून फेरारी या विख्यात स्वयंचलित वाहनोद्योगाच्या कंपनीने त्याला ७५ लाख रुपये एवढ्या किमतीची फेरारी ३६० मोडेना (एंजिन मध्यभागात असणारी दोन लोक बसू शकतील अशी आरामदायी क्रीडा कार) देण्याचे ठरविले. २३ जुलै २००२ रोजी ब्रिटिश ग्रां प्रीच्या (कार ‘पळविण्याची’ स्पर्धा) उद्घाटनावेळी मायकल शूमाकरच्या हस्ते प्रतीकात्मक चावी सचिनला देण्यात आली.
४ सप्टेम्बर २००२ रोजी भारतीय संघराज्याच्या तत्कालीन अर्थमंत्र्यांनी सचिनला पत्र लिहून त्याच्या विक्रमाच्या गौरवार्थ सरकार त्या गाडीवरील सीमाशुल्क माफ करेल अशी माहिती दिली. (हे शुल्क सुमारे १ कोटी १५ लाख म्हणजे गाडीच्या किमतीच्या १२५% एवढे होत होते.) प्रचलित नियमांनुसार परदेशातून बक्षीस म्हणून मिळालेल्या गाडीला सीमाशुल्क माफ होते, ‘भेट’ म्हणून मिळालेल्या गाडीला नाही.
जुलै २००३ मध्ये सीमाशुल्कमाफीची बातमी प्रसिद्ध झाली आणि मग वादप्रवादांना ऊत आला. अर्थ मंत्रालयाने नियमात बदल घडवून आणला (असे म्हटले जाते) आणि ऑगस्ट २००३ मध्ये ही ‘मोडेना’ मुंबईत दाखल झाली.
मुंबईतील एका प्रसिद्ध पक्षनेत्याने आपले मत ‘सचिनने पाच पिढ्यांना संपणार नाही एवढे कमवून ठेवले आहे, त्याला अशी मुभा देण्याची गरज नाही’ अशा शब्दांत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या कृत्याचे समर्थन केले – केंद्रातील सरकार विरोधी पक्षाचे असूनही. (भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टानुसार सीमाशुल्क हा केंद्रसूचीतील विषय असल्याने तो केंद्रशासनाच्या अखत्यारीत येतो.)
दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहितार्थ याचिका दाखल करण्यात आली आणि ‘सचिन तेंडुलकर हा भारतीय नागरिक कायद्याहून मोठा नाही. त्याला अशी मुभा का देण्यात आली’ या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. सचिनने करमाफीसाठी अर्ज केला होता अशी माहितीही पुढे आली.
मग मात्र फियाट ग्रुपला जाग आली आणि ‘ज्या उदात्त उद्देशाने ही भेट देण्यात आली होती त्याला जागण्यासाठी’ फियाट ग्रुपने सीमाशुल्क भरण्याची तयारी दर्शविली. वस्तुतः हा शहाणपणा फियाटने ही ‘भेट’ भारतीय सार्वभौम शासनाचे नियम पाळून, ती कार भारतात आणून, मग ती सचिनला देऊन करावयास हवा होता.
सचिन असामान्य आहे, त्याच्यासंबंधीच्या चर्चा (आणि वादही) तसेच असामान्य असणार हे या निमित्ताने स्पष्ट झाले.
July 8, 2016
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त” भाजी निवडतांना एकीकडे माझा जप चालू होता,इतक्यात माझ्या नातवाचा, रोहिनचा प्रश्न आला.
January 19, 2024
भारताचा इतिहास चाळतो म्हटले तर इतिहासात ठिकठिकाणी, पानापानावर मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला दिसतो. लढाईचे मैदान असो अथवा साहित्याची मुलूखगिरी, मराठी माणसाचा आदराने उल्लेख केल्याशिवाय इतिहास पुढे सरकूच शकत नाही. अगदी अलीकडील काळापर्यंत ‘मराठी पाऊल’ सगळ्याच क्षेत्रात पुढेच होते.
October 30, 2005
भारत-पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या दुस-या युद्धात भारतीय सैन्याच्या पराक्रमासमोर पाकिस्तानने अक्षरश: गुडघे टेकत शरणागती पत्करली होती. पाकिस्तानी लष्कराच्या पूर्व कमांडने शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर हे युद्ध समाप्त झाले.
December 16, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti