वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भुसावळला वसंत टॉकीज च्या वरती “राजश्री ” चे ऑफिस होते. गल्लीमित्र कमलाकर भोळे याचे वडील तेथे नोकरीला होते. बरेचदा सायकलवर मोठ्या लोखंडी पेट्या किंवा रिळांच्या बॉक्सेसची ते ने-आण करीत. त्यांनी आम्हाला एकदा टीप दिली होती- “कोणताही सिनेमा पाहायचा असेल तर तो फर्स्ट डे फर्स्ट शो बघावा किंवा लास्ट डे लास्ट शो !”
कारण गावात रिळं आलीत की टॉकीज मधील पहिल्या शोला कापाकापी नसते.
July 17, 2021
अमर्याद वाढणारी लोकसंख्या, त्यांच्या गरजा आणि पायभूत सुख-सोयी निमार्ण करण्यासाठी वापरले जाणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि त्यातून रोजचे वाढणारे सर्व प्रकारचे प्रदूषण आणि त्यावर मात करण्यासाठी अमलात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत आणि भविष्यात हीच मोठी अडचण ठरणार आहे. आज आपला परिसर ध्वनी, जल, वायू आणि माहित नसलेल्या अनेक प्रदूषणाने व्यापला आहे आणि त्यातून कोणाचीही सुटका नाही असा अनुभव आहे. मग यावर उपाय काय?
October 11, 2014
दर्जेदार चित्रपट निर्मिती गेली ५० वर्षांपेक्षा जास्त काळ भारतभर आपण अनुभवत आहोत. २१व्या शतकाची दोन दशके आपण पार केली आहेत. या कालखंडात आमूलाग्र माध्यमक्रांती झालेली आपण बघतो.
April 29, 2024
स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहीले. मात्र खरे म्हणजे सावरकर जरी हिंदुत्त्ववादी होते तरीही त्यांनी इतर धर्मांचा नेहमीच आदर राखला. आजच्या तथाकथित बाजारबुणग्या सेक्युलरवाद्यांसारखे नव्हते. आजचे सेक्युलरवादी म्हणजे केवळ हिंदूविरोधी असतात. आपल्या देशात ज्यांना हिंदूंनी निवडून दिले ते स्वत:ला हिंदू म्हणायला तयार नाहीत.
दिवंगत राजीव गांधी, नेल्सन मंडेला.. अगदी महाराष्ट्रात १०५ हुतात्म्यांचा संहार करणार्या मोरारजी देसाईसारख्या माणसाला भारतरत्न पुरस्कार दिला जातो. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून क्रांतीकारक घडविणारे, देशासाठी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या सावरकरांना मात्र तो मिळत नाही. त्यांना तो देण्यात यावा म्हणून प्रयत्न करावे लागणे यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही.
राहूल गांधी, सोनिया गांधी आणि त्यांची पलटण यांनी कधीतरी सावरकर काय होते त्याचा अभ्यास केला आहे का? सावरकरांनी ज्या नरकयातना भोगल्या त्या भोगायची कल्पना तरी राहूल गांधी करु शकतात का?
अगदी परवाचेच साधे उदाहरण. राहुल गांधींनी मोठा गाजावाजा करुन मुंबईच्या डम्पींग ग्राऊंडचा दौरा आखला. डम्पींग ग्राऊंडवरच्या दुर्गंधीने त्रासून त्यांनी अक्षरश: पाच मिनिटात त्या ठिकाणाहून पळ काढला. असे हे आमच्या देशाचे “युवराज”. सावरकरांनी अंदमानच्या ज्या सेल्युलर जेलमध्ये उमेदीची वर्षे काढली तिथे आमचे आजचे नेते दोन दिवस तरी राहून दाखवतील का?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न जाहीर करण्याची मागणी अनेकदा सरकारकडे केली गेली. मात्र राजकीय कारणांसाठी कॉंग्रेस सरकारने त्याचा कधीच विचार केला नाही. भाजप सरकार प्रचंड बहुमताने निवडून आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली खरेतर पंतप्रधानांच्या शिफारसीनंतर भारतरत्न किताब देण्यात कोणतीही इतर औपचारिक शिफारस आवश्यक नसते. त्यामुळे यावर्षी तरी सावरकरांना भारतरत्न मिळतोय का ते बघायचे.
-- मराठीसृष्टी टिम
July 4, 2016
बाह्वन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभेया हारावलीव हरिनीलमयी विभाति।कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
कल्याणमावहतु मे कमलालयाया:।।५।।
बाह्वन्तरे- बाहू म्हणजे हात. त्यांच्या अंतरे म्हणजे आत मध्ये. दोन हातांच्या आत असणारा अवयव म्हणजे छाती.
मधुजित:- मधु नावाच्या राक्षसाला जिंकणारे. भगवान श्रीविष्णु.
विश्व रचनेच्या आरंभी भगवान श्रीविष्णूच्याच कानातून निघालेल्या मळा च्या दोन थेंबांमधून मधु आणि कैटभ या नावाचे दोन राक्षस जन्माला आल्याची कथा आहे. त्यांच्याशी युद्ध करून श्रीविष्णूंनी त्यांना मारले.
श्रितकौस्तुभेया- कौस्तुभ हे भगवान विष्णूच्या गळ्यातील रत्नाचे नाव. त्याने अलंकृत.
एकत्रित अर्थ पाहता, मधू राक्षसाचे विनाशक भगवान श्रीविष्णूंच्या वक्षस्थलावर रुळणाऱ्या कौस्तुभ मण्याने अलंकृत.
आई जगदंबेची दृष्टी वारंवार भगवान श्रीहरीच्या हृदयावर जात असल्याने तेथे असणाऱ्या कौस्तुभमण्याने ती दृष्टी अलंकृत होते असा भाव.
हारावलीव हरिनीलमयी विभाति- हरी म्हणजे हिरवा तर नील म्हणजे निळा. हिरवे रत्न पाचू तर निळे रत्न नीलम. महालक्ष्मी चे डोळे तसे हिरवट निळे आहेत. जणु त्या मण्यांची माळ तयार केली तर ती जशी दिसेल तशी आईची कटाक्ष मालिका विभाति म्हणजे शोभून दिसत आहे.
कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला- भगवंताला देखील जी काम म्हणजे प्रेमभावना प्रदान करते अशी ती कमलालयाया:- कमळामध्ये निवास करणाऱ्या आई महालक्ष्मीची कटाक्षमाला- वारंवार टाकलेले कटाक्ष यांची जणू माला.
कल्याणमावहतु मे - मला कल्याण प्रदान करणारी होवो."
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 14, 2020
माझ्या परिचयातील दोन चित्रकार असे आहेत की, जणू दोन ध्रुवच! दोघांनीही कलेची उपासना ही संघर्षातूनच केलेली आहे. मात्र आज दोघांच्यातही मोठी तफावत आहे. त्यातील एक म्हणजे, राम. रामला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती.
July 27, 2023
चीनच्या इतिहासात इ.स. ६६० मध्ये वू झाओ ही विलक्षण व्यक्तिमत्त्वाची स्त्री सम्राज्ञीपदावर विराजमान होऊन गेली. वू झाओपूर्वी किंवा नंतरही चीन देशात कुणा स्त्रीला सम्राज्ञीपद लाभले नाही. त्यामुळेच चीनची एकमेव सम्राज्ञी असे वू झाओला म्हटले जाते.
December 12, 2023
आचार्यश्री आई जगदंबे ला प्रार्थना करीत आहेत की, कृपापांगालोकं वितर तरसा साधुचरिते- हे साधुचरिते अर्थात अत्यंत सुयोग्य वर्तन करणाऱ्या आई जगदंबे ! तू तुझ्या कृपारूपी दृष्टिपाताला माझ्यावर तरसा अर्थात अत्यंत शीघ्रपणे वितर अर्थात प्रदान कर.
February 14, 2020
जगभरात सर्व स्तरांमध्ये ट्विटर हे लोकप्रिय माध्यम बनले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी, हॉलीवुड-बॉलीवुड कलावंत किंवा नरेंद्र मोदींपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेक नेते ट्विटरची मदत घेतात.
December 25, 2014
पूर्ण जीवसृष्टीची ही डीएनएची गाथा लिहिली जाते ती फक्त ४ मुळाक्षरांनी (A, T, G, C). पण आपल्या साहित्यसृष्टीत फक्त ३६ मराठी मुळाक्षरांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक वेगळे असते तशीच प्रत्येक जीवाची अशी एक खास गाथा या डीएनएवर आलेखलेली असते. शेवटी जीव म्हणजे काय तर अनेक प्रथिने, मेद आणि कर्बोदकांची एक पेशी. प्रत्येक पेशीतील महत्त्वाची कामे केली जातात मूलतः ती वेगवेगळ्या प्रथिनांद्वारे. चयापचयासाठी लागतात ती विकरे, सजीवाची वाढ अवलंबून असते ती हॉर्मोन्स ही सर्व प्रथिनेच असतात.
October 25, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti